Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बीडीपीच्या निर्णयावर गावकरी नाराज

$
0
0
समाविष्ट गावांतील टेकड्यांवर बांधकामांना परवानगी न देता तेथील जैववैविध्य उद्यानांचे आरक्षण (बीडीपी) कायम ठेवल्याबद्दल स्थानिक गावक-यांमध्ये नाराजी पसरली आहे. तसेच, या मोकळ्या जागांचे संरक्षण कसे करणार हा प्रश्न उभा राहिला आहे.

विद्यापीठ सुरक्षारक्षकाचा खुनी ‘मोकाट’च

$
0
0
पुणे विद्यापीठात सुरक्षारक्षकावर गोळीबार करून पसार झालेल्या आरोपीचा आणि त्याच्या मैत्रिणीचा ठावठिकाणा शोधण्यास पोलिसांच्या पदरी अपयशच आले आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात झालेल्या या खुनानंतर पोलिसांनी हजारो साक्षीदारांकडे चौकशी केली मात्र, ना खुनी सापडला ना ‘अंजू’.

एस. टी. कर्मचारी पगारवाढीवर नाराज

$
0
0
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कामगारांना मिळालेली पगारवाढ कमी असून, राज्य सरकारने कामगारांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचे राष्ट्रीय एस. टी . कामगार काँग्रेसने म्हटले आहे. तसेच, कामगारांच्या मागण्यांकडे आंदोलन केले जाणार असल्याचे म्हटले आहे.

वाघिरे टोळीचा फरारी गजाआड

$
0
0
नुकतीच जन्मठेपेची शिक्षा झालेल्या वाघिरे टोळीतील फरारी आरोपी संजय बाबूराव देशमुख (वय २७, रा. लोणावळा) याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसेही जप्त केली.

उपसरपंच खूनप्रकरणी ५ आरोपी गजाआड

$
0
0
भिलारवाडी येथील उपसरपंच संतोष धनावडे यांच्यावर गुरुवारी रात्री खुनी हल्ला करणा-या पाच आरोपींना राजगड पोलिसांनी गजाआड केले. पूर्ववैमनस्यातून हा खून केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले.

‘गोखले इन्स्टिट्यूट’च्या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा

$
0
0
कर्मचा-याची बनावट नेमणूक दाखवून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपावरून गोखले इन्स्टिट्यूटच्या संचालकांसह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इन्स्टिट्यूटच्याच माजी कर्मचा-याने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे न्यायालयाने या चौघांविरोधात अजामिनपात्र गुन्हा नोंदवून तत्काळ चौकशीचे आदेश नुकतेच दिले.

रेल्वेच्या धडकेने २ महिला ठार

$
0
0
तळेगावजवळ बेगडेवाडी येथे सरपण घेऊन जाणा-या एकाच कुटुंबातील दोन महिला रविवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी नागरकोइल एक्स्प्रेसखाली आल्याने जागीच मरण पावल्या. मनीषा सुभाष बिले (वय ३१) आणि सुरेखा बबन बिले (वय २१, दोघीही रा. शंकरवाडी, देहूरोड) अशी अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत.

उलगडला ‘घाशीरामच्या चाळीशी’चा पट

$
0
0
घाशीराम कोतवाल या नाटकाचा जुना संच पुन्हा एकदा रंगमंचावर एकत्र आला होता.. नाट्यप्रयोगाची जागा यावेळी घेतली होती गप्पांनी, जुन्या आठवणींनी, गाण्यांनी, टाळ्यांनी, हशांनी... प्रत्यक्ष प्रयोग नसला तरी दाद मात्र पूर्वीइतकीच दिलखुलास होती...

दाखला जातमुक्ततेवर प्रकाश आंबेडकर ठाम

$
0
0
‘शाळेच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख असू नये, या भूमिकेवर आपण ठाम असून, त्यातूनच नव्या पिढीला आशय आणि दिशा मिळेल, ’असे मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी शनिवारी मांडले.

नागरिकांनीच केला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

$
0
0
वडगाव शेरी येथील एका पॉश सोसायटीत चालणारे ‘सेक्स रॅकेट’ नागरिकांनीच येरवडा पोलिसांच्या मदतीने उद्ध्वस्त केले. या ठिकाणाहून पाच महिलासंह ११ दलालांना अटक करण्यात आली आहे.

आम्ही लोकशाही बुडविली:जावेद अख्तर

$
0
0
‘स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन भारताला स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्ष लोकशाही दिली. मात्र, त्यानंतरच्या काळात आमच्या पिढीने भ्रष्टाचार, घोटाळे, विषमता, धर्मवादाच्या माध्यमातून ही लोकशाही बुडविली. त्याबाबत माझ्या पिढीने युवा पिढीची माफी मागितली पाहिजे,’ अशी खंत ज्येष्ठ गीतकार, खासदार जावेद अख्तर यांनी व्यक्त केली.

पिंपरीतील ४५२ हॉटेल बेकायदेशीर

$
0
0
परिमंडळ तीनच्या हद्दीतील ४५२ बेकायदेशीर आणि विनापरवाना हॉटेल्सवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाचे आदेश आल्यानंतर ही कारवाई करण्यात येईल, असे पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

मागण्यांचे ठराव अधिवेशनात मंजूर

$
0
0
अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जावा, वेतन आणि पेन्शनबाबतचे निर्णय तातडीने घेण्यात यावेत, त्यांच्यावर अतिरिक्त कामे लादू नयेत यासह वेतनवाढ, बोनस, पाल्यांना स्कॉलरशिप आदींबाबतचे ठराव रविवारी भरलेल्या अंगणवाडी सेविका संघाच्या राज्य अधिवेशनात मंजूर करण्यात आले.

जातीपाती आड आल्या नाहीत

$
0
0
‘शिक्षण आणि आर्थिक सुस्थिती असलेल्या कुटुंबातील जन्म हा अपघातच...वडिलधा-यांकडून मिळालेली संस्काराची शिदोरी... पुढच्या काळात जुळलेली सामान्यांशी नाळ...अशा घरगुती वातावरणातूनच वयाच्या तब्बल ८१ व्या वर्षांपर्यंत वेगवेगळ्या घटकांसाठी झटण्याची प्रेरणा मिळाली!

‘आधार’साठी अनंत अडचणी

$
0
0
‘आधार’ची नोंदणी करून पंधरा महिने उलटून गेले, मात्र अद्यापही ‘आधार’ मिळाले नाही, नोंदणी केलेल्या केंद्रांवर माहिती दिली जात नाही, टोल फ्री क्रमांकावर उत्तर मिळत नाही, वेबसाइटवर माहिती विचारली तर तुमची माहिती उपलब्ध होत नाही, असा मेजेस येतो.

विद्यार्थ्यांना ‘आधार’चा मनस्ताप

$
0
0
केंद्र सरकारकडून मिळणा-या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पाच फेब्रुवारीपर्यंत आधार कार्डाची नोंदणी करण्याची सक्ती करण्यात आली असली, तरी त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे करण्यात आली आहे.

१०तील मार्कांची खिरापत बंद होणार

$
0
0
दहावीच्या सायन्स विषयात विद्यार्थ्यांना सध्या अंतर्गत मूल्यमापनामध्ये मिळणारी मार्कांची खिरापत पुढील वर्षीपासून (२०१३-१४) बंद होणार असून, ‘इंटर्नल’ला ४० ऐवजी २० मार्क असणार आहेत.

कैद्याच्या भेटीला नातेवाइकाचे भूत

$
0
0
येरवडा जेलमधील एका कैद्याला त्याचे तीस वर्षांपूर्वी निवर्तलेले नातेवाइक भेटून गेल्याचा चमत्कार नुकताच घडला. आश्चर्याची बाब् अशी की जेलच्या रेकॉर्डवर तरी नातेवाइकाची तशीच नोंद करण्यात आली आहे. हा सावळा गोंधळ समोर आल्यामुळे जेलमधील व्हिजिटरच्या एन्ट्रीवर निर्बंध घालण्यात आले आहे.

लोहगाव, लोणावळ्यातही ‘ससून’

$
0
0
पुण्यातील लोहगाव आणि ‘एक्स्प्रेस वे’ वरील लोणावळा शहरात प्रत्येकी शंभर खाटांचे उपजिल्हा हॉस्पिटल उभारण्याच्या आरोग्य खात्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

'कॅश ट्रान्स्फर'ची खाती रिक्तच

$
0
0
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘कॅश ट्रान्स्फर’ योजनेचे खातेच पुणे जिल्ह्यात उघडलेले नाही. आधारकार्ड, पॅनकार्ड काढण्यात ग्रामस्थांना येणाऱ्या समस्यांमुळे बँकांची खाती काढण्याचा वेग मंदावलेला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images