Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

धमकीनंतरही आयुक्त खंबीर

$
0
0
अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या मुद्द्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याबाबतीत अनाहूत धमक्या, लोकप्रतिनिधींकडून दबाव आणि असहकाराची भूमिका असे प्रकार घडू लागले आहेत. या स्थितीत ते एकाकी आहेत की नाहीत, अशा दृष्टीने घेतलेल्या माहितीची ही मालिका….

कॅन्सरही होऊ शकतो बरा!

$
0
0
कॅन्सर एक जागतिक समस्या... विकसित शहरांमधील खर्चिक आजार.... कॅन्सर म्हणजे मरणयातना... कॅन्सर म्हणजे नशिबाचाच भाग... ... या आहेत कॅन्सर पेशंटसह त्यांच्या नातेवाईकांच्या मनातील चुकीचे चार गैरसमज. यावर आंतरराष्ट्रीय पातळीवरील युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल (यूआयसीसी) या संघटनेने प्रकाश टाकला आहे.

गडकिल्ल्यांना फार्म हाउसेसचा वेढा

$
0
0
धनदांडग्यांची अनियंत्रित बांधकामे, बेसुमार वृक्षतोड, वनखाते, पुरातत्त्व खाते आणि शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष यामुळे मावळातील शिवकालीन गडकिल्ल्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. लोणावळ्याजवळच्या कोराईगड आणि राजमाचीपाठोपाठ आता तुंग, तिकोना आणि लोहगड परिसरातही फार्म हाउसेसचा वेढा पडला आहे.

‘राज्य संघटनांनाही क्रीडानगरीत अॅकॅडमीची परवानगी मिळावी’

$
0
0
‘म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत काही खेळांच्या अॅकॅडमी सुरू आहेत. यातील काही अॅकॅडमी वैयक्तिक आहे.

प्राध्यापकांच्या आंदोलनावर ‘एसआयडी’ची नजर

$
0
0
प्राध्यापक महासंघाने (एम-फुक्टो) राज्यभरातील विद्यापीठांच्या परीक्षा प्रक्रियेवर टाकलेल्या बहिष्कार आंदोलनावर आता राज्य गुप्तवार्ता विभागातर्फे (एसआयडी) नजर ठेवण्यात येत आहे.

प्राध्यापकांच्या आंदोलनाला राज्यभरातून उत्तम प्रतिसाद

$
0
0
सीनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांनी परीक्षांच्या कामांवर बहिष्कार टाकत आपल्या मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला राज्यभरातील प्राध्यापकांकडून पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला.

नगरसेविकांच्या दौ-याला सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध

$
0
0
‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट’तर्फे आयोजित अभ्यास दौऱ्यासाठी जाणाऱ्या नगरसेविकांच्या दौऱ्याला महापालिका आयुक्तांनी परवानगी देऊ नये, अशी मागणी विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.

अपघात रोखण्यासाठी ‘क्रॅश बॅरिअर्स’

$
0
0
पुणे मुंबई ‘एक्स्प्रेस-वे’ वरील अपघातांमध्ये नाहक बळी गेल्यानंतर ‘एक्स्प्रेस-वे’ वर ‘क्रॅश ब‌ॅरिअर्स’ उभारण्याचा पर्याय पुढे आला आहे. परिणामी, वाहनचालकांना शिस्त लागण्याबरोबरच वाढत्या अपघातांना ‘ब्रेक’ लागण्याची आशा आहे.

नियमावली धुडकावणा-या १५ स्कूलबसवर कारवाई

$
0
0
विद्यार्थ्यांच्या जीवाची पर्वा न करता पुण्यात स्कूलबस सुसाट धावत असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. बेजबाबदारपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करणा-या पंधरा स्कूलबसला कारवाईचा ‘ब्रेक’ लागला असून, या बसमालक आणि चालकांना नोटीस धाडण्यात आली आहे.

‘MPSC’ ची वेटिंग लिस्ट जाहीर करा

$
0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणा-या विविध परीक्षांसाठी आयोगाकडून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांविषयी प्रतीक्षा यादी (वेटिंग लिस्ट) जाहीर करण्याची मागणी या परीक्षांची तयारी करणा-या उमेदवारांकडून करण्यात आली आहे.

पाइपदुरुस्तीवरून खून : दोघे अटकेत

$
0
0
पाइप दुरूस्तीवरून झालेल्या किरकोळ भांडणातून सत्तूर आणि लोखंडी पाइपने मारहाण करून खून केल्याचा प्रकार रविवारी रात्री रविवार पेठेत घडला. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

कुलसचिव नेमणुकीसाठी मुंबई हायकोर्टात कॅव्हेट

$
0
0
कुलसचिव पदाच्या नेमणुकीत कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी पुणे विद्यापीठाकडून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई हायकोर्टामध्ये कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे.

महापौरांच्या स्वाक्षरीसाठी ‘डीपी’ला विलंब नको

$
0
0
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर झालेल्या ठरावांवर महापौरांची स्वाक्षरी आवश्यक नसून, ती केवळ परंपरा आहे.

‘आधार’साठी शाळांकडून पालकच वेठीला

$
0
0
शालेय विद्यार्थ्यांची सर्व वैयक्तिक माहिती राज्य शासनाला देण्याची सक्ती असल्याचे सांगत शहरातील शाळांनी आता पालकांनाच वेठीस धरले आहे. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांचा आधारकार्ड क्रमांक भरून देण्याचा ‘फतवा’ शाळांनी काढला आहे.

मेट्रोचे फायनल बजेट १० हजार कोटी रुपये!

$
0
0
पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये राबविण्यात येणाऱ्या दोन्ही मेट्रोमार्गांचा खर्च दहा हजार कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. वनाझ ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन्ही मेट्रोमार्गांचे काम पूर्ण करण्यासाठी २०१९ची डेडलाइन निश्चित करण्यात आली आहे.

‘विद्यार्थ्यांचे नुकसान टाळा’

$
0
0
‘कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आधार कार्ड काढण्यात नानाविध अडचणी येत असल्याने त्यांचे नुकसान होऊ न देता शिष्यवृत्तीच्या कॅश ट्रान्स्फरच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी,’ अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी जिल्हाधिका-यांना केली.

पाणी वाटपाचा आराखडा २ दिवसांत

$
0
0
‘कुकडी प्रकल्प हा केवळ पुणे जिल्ह्यासाठी मर्यादित नसून नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजना यावर अवलंबून आहेत. पिण्याचे पाणी हे सर्वांना उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे.

साखळीचोरांचे थैमान सुरूच

$
0
0
पुण्यात सोनसाखळी चोरांचे थैमान सुरूच असून, पोलिसांना या चो-या रोखणे अशक्य बनत चालले आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पुण्यातील सर्वसामान्य महिला मात्र भयभीत झाल्या आहेत.

तंत्रनिकेतन विद्यालयात १७ लाखांचा ‘घोळ’

$
0
0
घोले रोड येथील शासकीय तंज्ञनिकेतन विद्यालयातील तत्कालीन मुख्याध्यापकांसह इतरांनी सुमारे साडे सतरा लाख रुपयांची शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विदर्भ, मराठवाड्यासारखे संकट पुण्यातही ओढवेल

$
0
0
‘पाण्याच्या बेसुमार उपशामुळे पुण्यातही मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसारखे पाण्याचे संकट ओढावेल, अशी भीती विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी सोमवारी व्यक्त केली. पाण्याचा उपसा करण्यापूर्वी त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images