Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

एलबीटी बंधनकारक करावा

$
0
0
राज्यात जकात किंवा उपकराऐवजी स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) हाच एकमेव पर्याय ठेवून तोच बंधनकारक करावा, अशी महत्त्वपूर्ण शिफारस यासंदर्भात नियुक्त केलेल्या अभ्यासगटाने राज्य सरकारला नुकतीच केली आहे.

जखमी विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर

$
0
0
डेक्कन येथील एनसीसी प्रशिक्षण केंद्रात गोळीबाराच्या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना शिकवत असताना गोळी लागून जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.

वाहतूक नियंत्रणासाठी ‘एनसीसी’ची मदत

$
0
0
शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत असून, वाहतूक नियंत्रणासाठी ‘एनसीसी’च्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यासाठी पुणे महापालिकेने पुढाकार घेण्याबाबतचा ठराव शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी स्थायी समितीकडे दिला आहे.

पिंपरी-चिंचवड आयुक्तांना पुन्हा धमकी

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रीकर परदेशी यांना पुन्हा धमकावणीचे पत्र आले असून, बेकायदा बांधकामांवरील कारवाई न थांबविल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल अशा आशयाचा मजकूर त्यात लिहिला आहे.

पासपोर्ट मेळ्यात ६५२ अर्ज

$
0
0
पासपोर्ट विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पासपोर्ट मेळ्याला नागरिकांचा शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पासपोर्ट सेवा केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी दिवसभरात ६५२ अर्ज स्वीकारले, अशी माहिती पुणे विभागाच्या पासपोर्ट अधिकारी एस. जी. राणे यांनी दिली.

‘सेंट मॅथ्युज’ला ग्राहक मंचाचा फटका

$
0
0
पाल्याचा शाळेतील प्रवेश रद्द केल्यानंतर पालकांना प्रवेश शुल्काची रक्कम परत देण्यास नकार देणाऱ्या कोंढवा येथील सेंट मॅथ्युज अॅकॅडमीच्या मुख्यध्यापकांना ग्राहक मंचाने फटकारले आहे.

मीडिएशनच्या केसेसमध्ये वाढ

$
0
0
पुणे जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांकडून गेल्या वर्षभरातील ४ हजार ७२३ केसेस मीडीएशनसाठी विधी सेवा प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. यातील एक हजार ७३० केसेस निकाली काढण्यात यश आले आहे, तर ९०७ केसेस अद्याप प्रलंबित आहेत.

कामठे हल्लाप्रकरणी एकाला १० वर्षे सक्तमजुरी

$
0
0
राजकीय वर्चस्वातून सासवड येथे झालेल्या एका भांडणाच्या वेळी मदत केली नाही म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी एकाला दहा वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

‘शॉक ट्रीटमेंट’बद्दल दादांकडून कानउघाडणी

$
0
0
‘महावितरण’च्या विकासकामांसाठी रस्तेखोदाईच्या दरात केलेल्या वाढीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेतील आपल्याच कारभाऱ्यांची कानउघाडणी केली आहे.

खासगी शाळांना शिक्षण हक्काबाबत परिपत्रकाद्वारे आदेश द्या

$
0
0
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरक्षित जागांवर प्रवेश हवाय....रहिवासाचा,उत्पन्नाचा आणि जातीचा दाखला आणा, मगच अर्ज देऊ.... अनेक खासगी शाळा भटक्या जाती-जमातींमधील पालकांना अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांची बोळवण करत आहेत.

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पास गती द्यावी

$
0
0
पुण्याच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात वारंवार होणारे वाद टाळण्यासाठी महापालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी कालव्यात टाकण्याच्या प्रकल्पास गती द्यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केली.

अनधिकृत बांधकामांचे भूत, आरोपांना आलाय ऊत

$
0
0
पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या मुद्द्यावरून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात पुन्हा वादळ निर्माण झाले आहे. दोषारोपामुळे हा प्रश्न चिघळतो आहे.

थीम पार्कसाठी सहकार्य करणार

$
0
0
परदेशांमधील थीम पार्कसारख्या अभिनव कल्पनांचा विचार आता आपल्याकडे केला जात असल्याने भविष्यात पुण्यात थीम पार्कच्या उभारणीसाठी आपण निश्चितच मदत करू, असे आश्वासन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी शनिवारी दिले.

ढगाळ हवेमुळे पारा चढला...

$
0
0
ढगाळ हवेमुळे शहरासह राज्याच्या बहुतांश भागांत किमान तापमानात वाढ झाली आहे. बऱ्याच शहरांत किमान तापमान सरासरीपेक्षा तीन ते चार अंशांनी अधिक असून, पुढच्या दोन दिवसांत थंडी परतण्याची चिन्हे नाहीत, असे वेधशाळेने स्पष्ट केले आहे.

द्वैत ‘कथनी और करनी’चे

$
0
0
एखाद्या घटनेचा संदर्भ लावताना त्यातील सर्वच संबंधितांना सरसकट एखाद्या कप्प्यात टाकून मोकळे होण्याची एक सवय आहे. ‘हिंदुत्ववादी,’ ‘समाजवादी’ किंवा ‘कम्युनिस्ट’ हे त्यातले काही लोकप्रिय कप्पे. पण कोणत्याही आलेखाला ‘एक्स’बरोबरच ‘वाय’ अक्षही असतो.

पेशंटला ‘गुणकारी’ पॅथी मिळणार?

$
0
0
आयुर्वेद, होमिओपॅथी की अॅलोपॅथीपैकी कोणती पॅथी सर्वश्रेष्ठ असे विचारले तर डॉक्टरांकडून त्यांच्या पॅथीचेच कौतुक होईल. परंतु, पेशंटच्या दृष्टीने ‘गुणकारी’ ठरणारीच पॅथी ही सर्वश्रेष्ठ.

१८ की १६?

$
0
0
दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेतील एक आरोपी अल्पवयीनच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कायद्याच्या तरतूदीचा अशा आरोपींना भविष्यकाळात फायदा होऊ नये म्हणून अल्पवयीन आरोपीचे वय १८ वरून १६ करण्याच्या मागणीने सध्या जोर धरला आहे.

‘नाबार्ड’च्या विरोधात उद्या ‘घेराओ आंदोलन’

$
0
0
सहकारी सोसायट्यांमधील शेतक-यांच्या चालू खात्यातून ६० कोटी रुपयांचे कर्ज परस्पर वसुल करण्याच्या नाबार्डच्या अन्यायकारक धोरणाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी येत्या मंगळवारी (५ फेब्रुवारीला) नाबार्डच्या कार्यालयावर मोर्चा काढून घेराओ घालण्यात येणार आहे.

७५ टक्के प्रकल्पांची लटकंती

$
0
0
केंद्र सरकारच्या ‘जवाहरलाल नेहरू शहरी पुनर्निमाण योजने’तून (जेएनएनयूआरएम) राज्यात सर्वाधिक प्रकल्प मंजूर करून घेतले असले, तरीही गेल्या वर्षअखेरीपर्यंत त्यातील केवळ एक चतुर्थांश प्रकल्पच पूर्णत्त्वास गेले आहेत.

‘परीक्षा’ बहिष्कारांची

$
0
0
ज्युनिअर कॉलेज शिक्षकांनी बारावीच्या प्रॅक्टिकल्स व तोंडी परीक्षेवरील बहिष्कार मागे घेतला असला, तरी उत्तरपत्रिकांच्या तपासणीकडे पाठ फिरविण्याचा इशारा कायम ठेवला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images