Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

निम्मे अपघात जड वाहनांमुळेच

$
0
0
रस्त्यांवर घडणा-या एकूण अपघातांपैकी पन्नास टक्के अपघात अवजड वाहने आणि बसेसमुळे घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, ड्रायव्हरच्या चुका आणि वाहनांमधील दोषही अशा अपघातांना जबाबदार असल्याचे दिसून आले आहे.

यंदाचे बजेट मोठ्या तुटीचे?

$
0
0
जकातीऐवजी लागू होणा-या स्थानिक स्वराज्य संस्था करामुळे (एलबीटी) उत्पन्नातील संभाव्य घट आणि दुसरीकडे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेच्या (जेएनएनयूआरएम) निधीचे संपलेले सलाइन यांमुळे महापालिकेच्या यंदाच्या बजेटमध्ये मोठी तूट येण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा नाजूक आर्थिक परिस्थितीत मोठ्या विकासकामांना बजेटमध्ये निधीरूपाने किती स्थान मिळणार, यावर प्रश्नचिन्ह आहे.

वाट चुकलेले कॉलेजियन्स अखेर सापडले

$
0
0
लोणावळ्याजवळील राजमाची किल्ला परिसरात पर्यटनासाठी गेलेले व भरकटलेले सात विद्यार्थी व एका वाटसरूला शोधण्यात यश आले आहे. लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र मंडळ, राजमाची ग्रामस्थ व पोलिसांना आठ तासांच्या परिश्रमानंतर किल्ल्याच्या पायथ्याशी सुमारे पाचशे ते सहाशे मीटर खोल दरीत सोमवारी मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास ते सापडले.

विवाह बंधनासाठी भारतीयांचे चलो थायलंड

$
0
0
नयनरम्य, आल्हाददायी वातावरण, उत्तम आदारातिथ्य, देखणी ठिकाणे, परवडणारे दर यांच्यामुळे थायलंड हे पर्यटनाव्यतिरिक्त भारतीयांसाठी लग्न करण्याचे ठिकाण म्हणून पुढे येत आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी शंभर जोडपे लग्न बंधनात बांधली गेली.

निराधार महिलांसाठी आमिरचे ५ कोटी

$
0
0
‘मि. परफेक्ट’ या पदवीबरोबरच प्रसिद्ध अभिनेता आमिर खानला यापुढे ‘क्रियावान’ असेही बिरूद लावावे लागेल. ‘सत्यमेव जयते’ हा टीव्ही रिअॅलिटी शो करण्यापुरतेच मर्यादित न राहता, त्याने नगर येथील प्रसिद्ध स्नेहालय या संस्थेला किमान पाच कोटी रुपयांची मदत केल्याचे समजते.

तुकडेबंदी कायदाच रद्द करणार ?

$
0
0
शेतजमिनीचे छोटे-छोटे तुकडे होऊन शेती उत्पादनात अडथळ होत असल्याने राज्यात लागू करण्यात आलेला तुकडेबंदी व तुकडेजोड कायदा रद्द करण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत. यासंदर्भात लवकरच मंत्रिगटासमोर प्रस्ताव ठेवला जाणार आहे.

तलाठी देणार लॅपटॉपवर सातबारा उतारे

$
0
0
गेल्या सव्वा वर्षापासून अडगळीत पडलेले तलाठ्यांचे लॅपटॉप आता पुन्हा सुरू होणार आहेत. सातबारा उतारा देण्यासाठी ‘इ-चावडी’ हे सॉफ्टवेअर मिळाल्यामुळे तलाठी आता गावात जाऊन लॅपटॉपवर हे उतारे देऊ शकणार आहेत.

सेकंड क्लाससाठी रेशनकार्ड, पासबुक चालणार

$
0
0
रेल्वेच्या सेकंड क्लासच्या डब्यातील प्रवाशांच्या प्रवास सुलभ व्हावा, म्हणून तिकीटासाठी आवश्यक असणाऱ्या ओळखपत्राचे नियम रेल्वेने थोडे शिथिल केले आहेत. रेल्वे बोर्डाने जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार प्रवाशांना आता फोटो असणारे रेशनकार्ड किंवा राष्ट्रीयकृत पासबुकाची साक्षांकित झेरॉक्सप्रत ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.

जमीनविषयक वेबसाइट तयार

$
0
0
जमीनविषयक कागदपत्रे, उतारे, दस्तऐवज या भूधारकांसाठी जिव्हाळ्याच्या असणा-या गोष्टींबाबत ऑनलाइन मार्गदर्शन आणि प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे. त्यासाठी द युनिक अॅकॅडमी आणि संपदा कन्सल्टंटस यांच्यातर्फे www.maza7-12.com ही वेबसाइट तयार केली आहे.

मराठी चित्रपटाचे विषय संवेदनशील

$
0
0
‘मराठी चित्रपटाला व्यावसायिक यश मिळण्यामागे टीव्ही हे मोठं कारण आहे. टीव्हीत अडकलेला मराठी प्रेक्षक जेव्हा बाहेर पडेल तेव्हा हे चित्र बदलेल. तसेच, व्यावसायिक यशाचा विचार करून चित्रपट निर्मिती करणे योग्य नाही,’ असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले.

साखळी बॉम्बस्फोटः बंटी गजाआड

$
0
0
पुण्यातील साखळी स्फोट प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) श्रीरामपूर येथील बंटी जहागीरदार ऊर्फ अस्लम शब्बीर शेख (वय ३८) याला अटक केली. ‘एटीएस’ने त्याला सोमवारी मुंबई येथील ‘मोका’ कोर्टात हजर केले असून, कोर्टाने त्याला २४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुणे स्फोटप्रकरणी बंटीने शस्त्रात्रे पुरविल्याचा आरोप आहे. त्याला रविवारी श्रीरामपूर येथून ताब्यात घेण्यात आले.

बलात्कारप्रकरणी तरुणाला अटक

$
0
0
लग्नाचे अमिष दाखवून एका २४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. त्याला मंगळवारी सुट्टीच्या कोर्टात हजर करण्यात आले होते.

मेट्रोसाठी आता २०१८ची डेडलाइन

$
0
0
मेट्रो प्रकल्पासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांनी विलंब लावल्याने पहिल्या दोन मार्गांवरून मेट्रो धावण्यासाठी आता २०१८ची डेडलाइन ठरविण्यात आली आहे. आधीच्या नियोजनानुसार २०१४ ही डेडलाइन होती. दरम्यान, पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दुसऱ्या मार्गालाही केंद्राने हिरवा कंदील दाखवला आहे. फेब्रुवारीपर्यंत मान्यता देऊन या मार्गाचा प्रस्ताव मार्चमध्ये राज्याला केंद्र सरकारकडे पाठवावा लागणार आहे.

पुण्यातील मेट्रो स्वारगेटपर्यंतच!

$
0
0
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा मार्ग कात्रजपर्यंत वाढण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला असला, तरी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये (डीपीआर) या मार्गाचा समावेश नसल्याने नवी दिल्लीमध्ये झालेल्या चर्चेत या बदलाचा विचारही करण्यात आला नाही. त्यामुळे स्वारगेट ते कात्रज या वाढीव मार्गाला ‘रेड सिग्नल’ लागला आहे.

पुण्यात बोम्बा'बॉम्ब', पोलिसांना घाम!

$
0
0
पुण्यातील शिवाजीनगर रेल्वे स्टेशन... दुपारची साडेबाराची वेळ... पोलिसांची रोजची तपासणी सुरू असताना, अचानक श्वानपथकातील श्वानांनी धोक्याची सूचना दिली आणि सर्वांनाच घाम फुटला. तब्बल चार तासांच्या धावपळीनंतर बॉम्बच्या या भितीतून सर्वजण बाहेर पडले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

डॉ. शरच्चंद्र गोखले यांचे निधन

$
0
0
ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ आणि विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या डॉ. शरच्चंद्र गोखले यांचे मंगळवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. रात्री उशिरा वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

नाट्य परिषदेत रंगला खेळ... निवडणुकीचा!

$
0
0
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तब्बल दहा वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीची पहिली घंटा वाजली आहे. पुणे विभागातील सहा जागांसाठी होत असलेल्या या नाट्यात एंट्री घेतलेल्या उमेदवारांच्या प्रचाराने आता हा मायबाप मतदारांसाठीचा आश्वासनांना खेळ सुरू होत आहे.

पालिका बजेटचा नवा नारा, नवी त्रिसूत्री

$
0
0
विकासकामांना आवश्यक निधीची गरज भागविण्यासाठी मिळकतकरामध्ये सरासरी आठ टक्के आणि पाणीपट्टीत प्रत्येक स्लॅबला शंभर रुपयांची करवाढ महापालिकेच्या बजेटच्या आराखड्यात मंगळवारी सुचविण्यात आली आहे. उत्पन्नाचे स्रोत आटल्यामुळे पुणे महापालिकेने आता विकासकामांसाठी ‘पीपीपी,’ ‘बीओटी’ आणि ‘डिफर्ड पेमेंट’चा नवा नारा दिला आहे. महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांनी मंगळवारी सादर केलेल्या बजेटच्या आराखड्यात हीच त्रिसूत्री मांडली.

नवा विभाग; विद्यार्थी तक्रार निवारणाचा

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसवरील विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच स्वतंत्र विद्यार्थी कल्याण विभागाची स्थापना करण्यात येणार आहे. होस्टेल, कँटीन, कॅम्पसवरील सुरक्षा, पायाभूत सुविधा आदींबाबत वेळोवेळी निर्माण होणाऱ्या समस्यांचे या विभागातर्फे तातडीने निराकरण व्हावे, असा हा विभाग स्थापण्यामागे उद्देश आहे.

जबरदस्तीने लग्न केल्याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा

$
0
0
आई वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन तरुणीशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर जबरदस्तीने लग्न केल्याच्या आरोपावरून वारजे पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जुलै २०११ ते डिसेंबर २०१२ या कालावधीत नऱ्हे आंबेगाव आणि कर्वेनगर या भागात ही घटना घडली. या प्रकरणी एका एकोणीस वर्षीय तरुणीने वारजे पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>