Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

चित्रपटांच्या जमान्यातही शास्त्रीय संगीताची मोहिनी

$
0
0
‘चित्रपट संगीत आणि शास्त्रीय संगीताची तुलना करू नका. यामध्ये कदाचित चित्रपट संगीताच्या लोकप्रियतेचे पारडे जड असेल; परंतु शास्त्रीय संगीताच्या श्रोत्यांमध्ये युवा पिढीचा मोठा सहभाग आहे. त्यांच्याकडून मिळणा-या प्रतिसादाने शास्त्रीय संगीताची मोहिनी टिकून राहील,’ असा ठाम विश्वास ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांनी नुकताच व्यक्त केला.

‘जेईई-मेन’च्या अर्जातील चुका दुरुस्त करण्याची मुभा

$
0
0
‘जेईई-मेन’ या परीक्षेसाठी ‘ऑनलाइन’ अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जात वैयक्तिक तपशिलात काही चुका झाल्या असतील, तर त्यात दुरुस्ती करण्याची मुभा १५ ते २४ जानेवारीदरम्यान मिळणार आहे.

राजमाची किल्ल्याजवळ कॉलेजियन्स चुकले वाट

$
0
0
लोणावळ्याजवळील राजमाची किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेला कॉलेजियन्सचा पंधरा जणांचा एक ग्रुप वाट चुकल्याचे रविवारी रात्रीपर्यंत जंगलात भरकटला होता. मोबाइलवरून पोलिसांशी संपर्क साधता येत असला, तरी आपण नेमके कुठे अडकलो आहोत, याची ठोस माहिती पोचविण्यात त्या ग्रुपला अपयश येत होते. परिणामी, मध्यरात्रीपर्यंत त्यांचा ठावठिकाणा समजू शकला नव्हता.

रेशनकार्डांचे नूतनीकरण सुलभ करा

$
0
0
शहर आणि जिल्ह्यात आतापर्यंत ५१ टक्के रेशनकार्ड कम्प्युटराइ‍ज्ड झाली असल्याची माहिती जिल्हा दक्षत‌ा समितीच्या बैठकीत देण्यात आली. जुन्या झालेल्या रेशनकार्डचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया सरळ आणि सोपी करून नागरिकांना कमीत कमी वेळेत रेशनकार्ड मिळेल, असा प्रयत्न करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

प्राध्यापकांचा परीक्षांवर बहिष्कार

$
0
0
राज्य व राष्ट्रीय पात्रता परीक्षांमधून (सेट-नेट) सवलत देण्यासंदर्भातील प्रस्ताव गेल्या सात महिन्यांपासून अनिर्णित ठेवल्याने संतप्त होऊन राज्यभरातील प्राध्यापकांनी चार फेब्रुवारीपासून परीक्षाविषयक सर्व कामांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

हडपसर येथे तरुणीचा विनयभंग

$
0
0
घरगुती वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात चाललेल्या १९ वर्षांच्या तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी हडपसर येथे एका २१ वर्षांच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

पाटा घालून खून; पतीला जन्मठेप

$
0
0
पत्नीच्या डोक्यात पाटा घालून तिचा खून केल्याप्रकरणी पतीला जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. बी. कुलकर्णी यांनी हा निकाल दिला. या प्रकरणी भिलाजी नामदेव बंबाळे (वय ४०, रा. वारजे ) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. सखुबाई भिलाजी बंबाळे हिचा खून करण्यात आला होता. जनुबाई सोमनाथ गबाले (४५) यांनी फिर्याद दिली होती.

दगडूशेठ मंदिर उडविण्याची धमकी

$
0
0
असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले दगडूशेठ गणपतीचे मंदिर तासाभरात उडवून देण्यात येईल, असा धमकीचा फोन थेट पोलिस आयुक्तालयातच आल्याने रविवारी रात्री एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने कारवाई करून मंदिराभोवती कडेकोट सुरक्षा तैनात केली. तसेच, बाँबशोधक पथकालाही पाचारण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या धमकीत तथ्य आढळले नाही.

मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र थिएटर?

$
0
0
'चित्रपटगृहे मिळण्यात हिंदी चित्रपटांची असलेली दादागिरी मोडून काढण्यासाठी मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र चित्रपटगृहे बांधण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. ही कल्पना प्रत्यक्षात आली, तर त्याचा व्यावसायिकदृष्ट्या निश्चितपणे फायदा होईल', असे निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सांगितले.

पुणे स्फोट: NCPकार्यकर्ता अटकेत

$
0
0
पुण्यातील जंगली महाराज रोडवर झालेल्या स्फोटप्रकरणी प्रमुख संशयिताला दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले असून त्याला थोड्याच वेळात मोक्का कोर्टात हजर करण्यात येणार आहे. अहमदनगर येथून पकडण्यात आलेल्या या संशयिताचे नाव बंटी जहागीरदार असून तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, असे सांगण्यात येते.

रविवार पेठेतील सत्यनारायण मंदिरात चोरी

$
0
0
रविवार पेठेतील सत्यनारायण मंदिरातील दोन पेटी फोडून रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी सहा हजार रुपयांची रोकड लांबविली. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

नापासचे पास करण्यास १५-२० हजारांची लाच

$
0
0
नापास विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी परीक्षा विभागातील कर्मचा-यांनी प्रत्येकी पंधरा ते वीस हजार रुपये घेतल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पुणे विद्यापीठातील कर्मचा-यांना पैसे देणारे आणखी दोन एजंट फरार असून, त्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

बंटीवरील कारवाई दबावामुळे स्थगित

$
0
0
जंगली महाराज रस्त्यावरील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेला बंटी जहागीरदार उर्फ अस्लम शब्बीर शेख (वय ३८) याच्यावर ‘महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हिटी’ (एमपीडीए) या कायद्याखाली नगर पोलिसांनी कारवाई केली असून, गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रस्ताव नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात धूळ खात पडून आहे.

उत्तरपत्रिकांना ‘बारकोड’लावणार

$
0
0
परीक्षेला डमी विद्यार्थी बसवण्याचे प्रकरण आणि नंतर पुनर्मूल्यांकनातील घोटाळा यामुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची विश्वासार्हता धोक्यात आली असताना परीक्षा विभागाने आता ‘डॅमेज कंट्रोल’साठीही काही पावले उचलली आहेत. येत्या मार्चपासून सुरू होणाऱ्या परीक्षांसाठी उत्तरपत्रिकांना ‘बारकोड’ बसविण्यासाठी विभागाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

पोलिसाला अटकपूर्व जामीन

$
0
0
कुंभारवेस चौकात वॉकीटॉकीने एका युवकाला मारहाण केल्याप्रकरणी कोर्टात दाखल करण्यात आलेल्या खासगी फौजदारी केसमध्ये कोर्टाने वाहतूक कॉन्स्टेबलचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सत्र न्यायाधीश एस. डी. टेकाळे यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

क्रीडांगण आरक्षणांतील बदल अडचणीत?

$
0
0
राज्याच्या क्रीडा धोरणानुसार कोणत्याही क्रीडांगणाच्या आरक्षणात कोणत्याही स्थितीत बदल करू नयेत, असा राज्य सरकारचा पूर्वीचा आदेश आता नव्याने समोर आला आहे. त्यामुळे शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यात (डीपी) क्रीडांगणांच्या आरक्षणात केलेले विविध बदल अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जानेवारीतल्या थंडीला उकाड्याची सोबत

$
0
0
शहर आणि परिसरातला रात्री आणि पहाटेचा गारवा कायम असला, तरी सोमवारी दिवसभर उन्हाची तीव्रता वाढली होती. किमान तापमानाचा पारा ९.१ अंशांवर स्थिरावला असताना कमाल तापमानाने ३४.२ अंशांची मजल गाठली. गेल्या दहा वर्षांत २००९ चा अपवाद वगळता पाऱ्याने जानेवारीत प्रथमच ३४ अंशांचा टप्पा ओलांडला आहे.

दोषी ३४ ग्रंथालयांवर कारवाई नाही

$
0
0
बनावट कागदपत्रे सादर करून राज्य सरकारकडून अनुदान लाटणाऱ्या जिल्ह्यातील ३५ दोषी ग्रंथालयांवर कारवाई करण्याचा अहवाल राज्य सरकारकडे देऊनही आजपर्यंत या ग्रंथालयांवर कोणतीही कारवाई झालेली‌नाही. तसेच, जिल्ह्यातील ४३४ ग्रंथालयांनी अद्यापही वार्षिक अहवाल सादर केला नसल्याची माहिती पुढे आली आहे.

दुर्बलांसाठी हॉस्पिटलमध्ये राखीव बेड वाढणार

$
0
0
हॉस्पिटल आणि मॅटर्निटी होममध्ये दहाऐवजी आता वीस टक्के बेड्स दारिद्र्य रेषेखालील किंवा दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. संबंधित बदल जुन्या पुण्याच्या विकास आराखड्यात (डीपी) करण्यात आला आहे.

गांजा विकणा-याला अटक

$
0
0
सुतारदरा परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या रिक्षाचालकाला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक किलो ३०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याला अटक करून मंगळवारी सुट्टीच्या कोर्टात हजर करण्यात आले होते.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images