Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पर्वती आणि वडगावमध्ये नवे जलशुद्धीकरण केंद्र

$
0
0
पुणेकरांची पाणीकपातीतून सुटका करण्यास महापालिका आयुक्तांनी बजेटचा आराखडा तयार करताना प्राधान्य दिले आहे. त्यानुसार खडकसवाला धरणातून पुण्यात पुरेसे पाणी आणणे आणि भामा आसखेड धरणातील पाणी उचलण्याच्या योजनांचा पाठपुरावा करण्याबरोबरच पर्वती आणि वडगाव बुद्रूकमध्ये नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे प्रस्तावित केले आहे.

कुस्ती निधी ठराव मान्य

$
0
0
महापौर चषक कुस्ती स्पर्धेवरून राष्ट्रवादी विरुद्ध सगळ्या पक्षांत झालेल्या वादाचे कवित्व अजूनही सुरूच आहे. विरोधकांमध्ये फूट पाडून राष्ट्रवादीने मान्य करवून घेतलेल्या ठरावाची मंगळवारी विरोधकांनी परतफेड केली. या स्पर्धेला निधी देण्याच्या ठरावाचा फेरविचार मतदानाद्वारे मान्य करण्यात आला. मात्र, मुळात या स्पर्धेची बहुतांश बिले देऊन झाल्यानंतर निधीचा ठराव नामंजूर झाल्याने प्रशासनापुढे आता पेच उभा राहिला आहे.

अटक झालेले कर्मचारी निलंबित होणार

$
0
0
पुणे विद्यापीठातील पुनर्मूल्यांकन घोटाळ्यात अटक झालेल्या परीक्षा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर नियमानुसार निलंबनाची कारवाई केली जाईल, असे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांनी ‘मटा’ला सांगितले.

बहिःस्थ विभागाच्या माजी प्रमुखाला शिक्षा

$
0
0
महिला कर्मचा-याबरोबर असभ्य वर्तन केल्याप्रकरणी पुणे विद्यापीठाच्या बहिःस्थ विभागाच्या माजी प्रमुखाला सहा महिने साधी कैद व दीड हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

प्री-पेड कनेक्शनवरील ‘आयएसडी’साठी ‘ट्राय’तर्फे मुदतवाढ

$
0
0
प्री-पेड मोबाइलवरून तुम्ही जगभरातील कुठल्याही भागांत सहज संपर्क साधू शकत असलात, तरी दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) निर्देशांनुसार ‘आंतरराष्ट्रीय कॉलिंग’ची (आयएसडी) सुविधा यापुढे केवळ ग्राहकांच्या मान्यतेवरच सुरू ठेवली जाणार आहे.

अन् काळजाचा ठोका चुकला...

$
0
0
पुण्यातील शिवाजीनगर रेल्वे स्टेशन... दुपारची साडेबाराची वेळ... बॉम्बशोधक पथकाची रोजची तपासणी... वेटिंग रूमच्या शेजारी एक बेवारस बॅग... श्वान पथकातील श्वानाने भुंकून देऊन दिली धोक्याची सूचना... आणि त्यानंतर नियंत्रण कक्षात संशयित बॉम्ब सापडल्याची एकच चर्चा....

....आणि सुरू झाले ‘ऑपरेशन शिवाजीनगर’

$
0
0
शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवर संशयित बॅगमध्ये बॉम्ब असण्याची शक्यता गडद झाल्यावर गुन्हे शाखेने आणि ‘एटीएस’ने तपासाच्या दृष्टीने धावपळ सुरू केली होती. शहरातील संशयितांची धरपकड, शिवाजीनगर परिरातील ‘सीसीटीव्ही’ची तपासणीबरोबरच साक्षीदारांकडे विचारपूस करण्यास सुरुवात झाली होती. बॉम्ब शोधक पथकाला रेल्वेस्टेशनवर संशयित बॅगमध्ये बॉम्ब असल्याचे संकेत मिळाल्यावर त्यांनी पोलिस नियत्रंण कक्षाला माहिती दिली होती.

सव्वादोन एकर जागेचा ‘ससून’ला ‘बूस्टर’

$
0
0
मंगळवार पेठेतील विष्णू सदाशिव परिसरात असलेल्या राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यातील प्लॉट क्रमांक ४०५ मधील सुमारे सव्वादोन एकर जागा (८९०० चौमी) ससून हॉस्पिटल प्रशासनाला हस्तांतरणातील तांत्रिक अडथळे दूर झाले आहेत. महामंडळाने ही जागा देण्यास हिरवा कंदिल दिल्यामुळे लवकरच ही जागा ससूनला मिळणार आहे.

नवे वर्ष करवाढीचे

$
0
0
महापालिकेच्या हद्दीत नव्याने येणारी २८ गावे आणि स्थानिक संस्था कर (एलबीटी) याचा परिणाम पुणेकरांना भोगावा लागणार असून, पुणेकरांसाठी आगामी आर्थिक वर्षे करवाढीचे ठरणार आहे. महापालिका आयुक्तांनी तयार केलेल्या बजेटच्या आराखड्यामध्ये प्रॉपर्टी टॅक्समध्ये आठ टक्के, तर पाणीपट्टीत प्रत्येक स्लॅबमध्ये सुमारे शंभर रुपयांनी वाढ करण्याचे सुचवले आहे.

शहर, समाविष्ट गावांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद

$
0
0
शहरातील अनेक जलकेंद्रांमध्ये दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी (१७ जानेवारी) शहर आणि समाविष्ट गावांमध्ये अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

चित्रपटात साउंडला दृश्यात्मकतेपेक्षा गौण स्थान

$
0
0
‘साउंड हा चित्रपटाचा अविभाज्य भाग असतो. व्यक्तिरेखांच्या भावभावनांचा अनुभव त्यातून मिळतो. चित्रपटाची परिणामकारता वाढवण्यातील सर्वांत महत्त्वाचा घटक असूनही आजवर त्याला दृश्यात्मकतेपेक्षा नेहमीच गौण स्थान मिळाले,’ अशी खंत ऑस्कर विजेते साइंड डिझायनर रसुल पुकुट्टी यांनी केली.

लॅपटॉपवर २ महिन्यांत सातबारा उतारे

$
0
0
गावच्या जमीनविषयक अभिलेखांची माहिती (गाव दफ्तर) संगणकावर नोंदविण्याचे काम दोन महिन्यांत पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात लॅपटॉपवर सातबारा उतारे दिले जाणार आहेत. गावपातळीवरील जमीन अभिलेखांची माहिती संगणकावर नोंदविण्याचे काम देशात पहिल्यांदाच होत आहे.

आडत्यांवर बाजार समितीचे बारीक लक्ष

$
0
0
चोख हिशे-ब न दाखविणाऱ्या मार्केट यार्डातील आडत्यांवर कारवाई करण्याबाबत पावले उचलली जाणार आहेत. अशा व्यापाऱ्यांवर बाजार समिती बारकाईने लक्ष ठेवणार असून, व्यवसायातील उलाढालीबाबत समितीला अंधारात ठेवणाऱ्या आडत्यांचा परवाना निलंबित करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

... तर त्यांची गय नाही!

$
0
0
खुनाच्या गुन्ह्यातील एका आरोपीने स्वतःला अल्पवयीन सिद्ध करण्यासाठी कोर्टात शाळा सोडल्याचा बनावट दाखला दाखल केल्याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने कोर्टाच्या अधीक्षकांना आरोपीविरूद्ध फौजदारी तक्रार दाखल करण्याचा आदेश दिला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश विनय जोशी यांनी हा आदेश दिला आहे.

शिवाजीनगर स्टेशनवर सीसीटीव्हीच नाहीत

$
0
0
पुण्यात गजबजलेल्या ठिकाणी असणाऱ्या शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवर प्रशासनाने सीसीटीव्ही यंत्रणा बसवली नसल्याचे समोर आले आहे. या स्टेशनवर सुमारे ३० सीसीटीव्ही बसवण्यासंदर्भात गेल्या वर्षी सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, त्यामधून काहीच निष्पन्न होऊ शकले नाही, त्यामुळे या स्थानकाची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुण्याच्या निधीला दुष्काळाचा चटका

$
0
0
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका जिल्हा नियोजन समित‌ीच्या (डीपीसी) निधीला बसला आहे. आर्थिक वर्षात दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी होणारा खर्च लक्षात घेऊन डीपीसीच्या निधीला कात्री लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे पुणे जिल्ह्याला मिळणारा निधी पंधरा ते साडेपंधरा कोटी रूपयांनी कमी झाला आहे.

शिक्षण मंडळाच्या बजेटला आयुक्तांची कात्री

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाच्या २०१३-१४ च्या बजेटला आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी कात्री लावत सुमारे नऊ कोटी रुपये खर्चाची कपात सुचविली आहे. त्यामुळे बजेटचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी (१५ जानेवारी) तहकूब ठेवण्यात आला.

सुट्टे पैसे नसल्याने विद्यार्थी बसबाहेर

$
0
0
केवळ सुट्टे पैसे नसल्याने पीएमपीएलच्या कंडक्टरने एका विद्यार्थ्याला (वय दहा वर्षे) बसमधून खाली उतरवून दिल्याची घटना धायरी गावात नुकतीच घडली.

मेट्रोने खोलले खाते...

$
0
0
शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पासाठी पुणे महापालिकेच्या बजेटच्या आराखड्यात स्वतंत्र मेट्रो खाते उघडण्यात आले आहे. त्यामध्ये प्रारंभीची साडेपंधरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून भविष्यात मेट्रो झोनमधील एफएसआयच्या प्रिमियममधून या प्रकल्पासाठी निधीउभारणी करण्यात येणार आहे.

'दगडूशेठ' ला धमकी देणारा ताब्यात

$
0
0
पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन करून दगडूशेठ मंदिर उडवून देण्याची धमकी देणाऱ्याने सातारा आणि कोल्हापूर पोलिसांनाही रविवारी रात्री स्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्यानंतर या बहाद्दराला पोलिसांनी साताऱ्यात ताब्यात घेतले. कोयना धरण तसेच कोल्हापुरातही बॉम्बस्फोट घडवणार असल्याचे ‘कॉल’ आल्यामुळे तिन्ही पोलिस दलांची धावपळ उडाली होती.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images