Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आमदार विनायक मेटे अपघातात जखमी

$
0
0
विधान परिषदेचे आमदार विनायक मेटे यांच्या कारला बाणेर येथे मंगळवारी पहाटे तीनच्या दरम्यान अपघात झाला. कार विजेच्या खांबाला धडकून झालेल्या अपघातात मेटे जखमी झाले असून, त्यांच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मेटे मंगळवारी पुण्यात होणा-या लोकलेखा समितीच्या बैठकीला पुण्यात आले होते.

प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायला बांधील नाही

$
0
0
‘साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडून आला की प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास तो बांधील नाही. वाद निर्माण होणे हे लोकशाहीचे वैशिष्ट्य असले तरी ते चर्चेने सोडवता येतात,’ असे नियोजित अखिल भारतीय साहित्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी स्पष्ट केले.

अल्पवयीन मुलीवर शिक्षकाकडून बलात्कार

$
0
0
धार्मिक पंथाचा अनुयायी म्हणून मिरविणाऱ्या नारायणगाव येथील एका शिक्षकाने संगोपनासाठी आणलेल्या बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी शिक्षक दीपकराज शास्‍त्री याला नारायणगाव पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याने सातत्याने या मुलीवर बलात्कार केला.

संचालकांची लष्करी संग्रहालयाला भेट

$
0
0
सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल (निवृत्त) सुहास जतकर यांनी राष्ट्रीय लष्करी संचालनालयाला नुकतीच भेट दिली. संग्रहालयाचे संचालक सुधाकर खांबे यांनी प्रास्ताविक केले.

कारागृहे सुधारणागृहे झाली पाहिजेत

$
0
0
‘राज्यातील कारागृहांच्या प्रत्येक अडचणी सोडविल्या जातील. कारागृह अधिकारी,रक्षकांना पोलिसांप्रमाणेच सुविधा देण्यात येतील. मात्र, कारागृहातील प्रत्येक कैदी हा सुधारणा होऊनच बाहेर पडला पाहिजे तसेच कारागृहे ही सुधारणागृहे झाली पाहिजेत,’ अशी अपेक्षा राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी व्यक्त केली.

स्टेशनवर पुरेशा पाण्यासाठी रेल्वे प्रशासनाची धावपळ

$
0
0
उन्हाळ्याला दोन महिन्याचा अवधी बाकी आहेत. या काळात प्रवाशांना पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी आतापासूनच रेल्वे प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. पुणे स्टेशनवर पाण्याची कपात करण्यात येऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने पत्रव्यवहार सुरू केला आहे. उन्हाळ्याच्या काळात स्टेशनला पुरेसे पाणी देण्यात यावे, या संदर्भात महापालिकेला पत्र देण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

ठेकेदार प्रमोद गो-हेंची जामिनावर मुक्तता

$
0
0
वाघोली येथील स्लॅब दुर्घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेले ठेकेदार प्रमोद मधुकर गोऱ्हे यांची कोर्टाने ५० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्याचा आदेश दिला आहे. विशेष न्यायाधीश व्ही. जी. जोशी यांनी हा आदेश दिला. वाघोली येथे १८ डिसेंबर रोजी भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या आर्युवेदिक हॉस्पिटलच्या इमारतीचा स्लॅब कोसळून कनिष्ठ अभियंत्यासह १३ जणांचा मृत्यू झाला.

ग्रंथपाल, कलाशिक्षकही अधिवेशनाच्या सुट्टीवर

$
0
0
शाळांमधील विषयशिक्षक अधिवेशनासाठी सुट्टीवर गेल्याने शाळांचे कामकाज थंडावले असतानाच आता ग्रंथपाल आणि कलाशिक्षकही अधिवेशनासाठी सुट्टीवर जाणार आहेत. त्यामुळे शाळांचे कामकाज पूर्णतः ठप्प होणार असून यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. राष्ट्रवादी ग्रंथालय सभेचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन २० जानेवारीपासून मुंबईतील परळ येथे होणार आहे.

इमल्यांवर इमले

$
0
0
परवडणा-या घरांना अडीच एफएसआय, री-डेव्हलपमेंटसाठी अधिक एफएसआय, पूरग्रस्त वसाहतींना अडीच एफएसआय अशा वेगवेगळ्या मार्गांनी पुणेकरांना एफएसआय-टीडीआरची ‘न्यू इयर गिफ्ट’ विकास आराखड्यातून (डीपी) देण्यात आली आहे. पुण्याच्या जन्या हद्दीचा लोकप्रतिनिधींनी केलेला हा पहिलाच आराखडा ठरणार आहे.

अनेक उपसूचना केवळ निवासीकरणासाठी

$
0
0
सत्ताधारी आणि विरोधकांनी जुन्या पुण्याच्या विकास आराखड्याला (डीपी) प्रसिद्धीसाठी मंजुरी देण्यास मध्यरात्रीपर्यंत झुंजीचा दिखावा केल्याचे उघड झाले आहे. कारण सर्वांचाच आटापिटा निवासीकरणासाठी होता. त्यामुळे एकमेकांच्या मूक संमतीने शहरातील अनेक खेळांची मैदाने, शाळा, इडब्ल्यूएस, भाजी मंडई, उद्याने आदींसाठी आरक्षित जमिनी निवासी झाल्याने ‘ग्रीन पुणे’ या संकल्पनेला धक्का बसला आहे.

विद्या प्रतिष्ठानला नोटीस

$
0
0
शैक्षणिक प्रयोजनासाठी सरकारी भूखंड पदरात पाडून घेतल्यानंतर त्याचा निर्धारित वेळेत वापर न करणा-या ४८ शिक्षण संस्थांना नोटीस बजावण्यात आली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी संबंधित विद्या प्रतिष्ठानचाही त्यात समावेश आहे.

मतदार यादीचा टक्का घसरला

$
0
0
‘बोगस’ मतदारांमुळे फुगलेल्या मतदार यादीतून तब्बल दोन लाख ९० हजार २७५ मतदार वगळण्यात आले आहेत. बोगस मतदार डिलिट केल्याने पहिल्यांदाच मतदारांच्या संख्येत घट झाली आहे. चुकीच्या मतदारांच्या आकडेवारीवर मोजली जाणारी मतदानाची टक्केवारी यामुळे अचूक होणार आहे. लाखो बोगस मतदारांमुळे शहर व जिल्ह्याची मतदार यादी फुगली असल्याची वृत्तमालिका ‘मटा’ने प्रसिद्ध केली होती.

इंडिका-ट्रकच्या धडकेत चुलत बहिणींचा मृत्यू

$
0
0
पुणे-नाशिक महामार्गावरील एकल घाटात ट्रकची इंडिका कारला धडक बसल्याने इंडिका गाडीतील दोन चुलत बहिणींचा जागीच मृत्यू झाला. या दोघी जणी जुन्नरच्या अंजुमन विद्यालयाच्या विद्यार्थीनी होत्या. नबीला निसार इनामदार (वय १८) आणि आयेशा जहीर इनामदार (वय १०) अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बहिणींची नावे आहेत.

कांदा बटाटा विभागात ‘काम बंद’ आंदोलन

$
0
0
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या व कारखान्यांमधून माथाडी कामगार कायदा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाला विरोध दर्शविण्यासाठी कांदा बटाटा विभागातील कामगारांनी मंगळवारी ‘काम बंद’ आंदोलन केले.

‘सेट’ परीक्षेसाठी लाखापेक्षा जास्त अर्ज

$
0
0
पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणा-या आणि प्राध्यापक होण्यासाठीची आवश्यक पात्रता असलेल्या राज्य पात्रता परीक्षेसाठी (सेट) यंदा राज्यभरातून लाखभरांवर उमेदवारांनी आपले ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. परीक्षेचे दीर्घोत्तरी स्वरूप बदलून यंदापासून ती पूर्णपणे वस्तुनिष्ठ स्वरूपात होणार आहे. त्यामुळेच गेल्या काही परीक्षांच्या तुलनेत यंदा परीक्षा अर्ज भरणा-या उमेदवारांचा आकडा अचानक दुप्पटीने वाढला आहे.

प्रतिष्ठा ‘अटक’ होऊनही कुलगुरूंची भूमिका मवाळच

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील गैरव्यवहारप्रकरणी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर विद्यापीठाची उरलुसुरली प्रतिष्ठाही ‘अटक’ झाली आहे. तरीही, कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांची भूमिका मवाळच असून योग्य ती पावले उचलत आहोत, दोषींवर कारवाई केली जाईल, अशीच भाषा केली जात आहे. परिणामी, विद्यार्थ्यांसाठी सर्वांत संवेदनशील ठरणाऱ्या परीक्षा विभागातील खरे दोषी मोकाटच असून विश्वासार्हताही फेल झाली आहे.

‘मोका’प्रकरणी कागदपत्रे दाखल करण्याचे निर्देश द्या

$
0
0
जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींवर ‘मुंबई एटीएस’ने मोका लावला असून या संदर्भातील कागदपत्रे दाखल करण्याचे निर्देश ‘एटीएस’ला देण्यात यावेत, अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी मंगळवारी अर्जाद्वारे कोर्टात केली.

विद्यापीठाचे तीन कर्मचारी अटकेत

$
0
0
एकवीस नापास विद्यार्थ्यांना पास करणा-या विद्यापीठातील तीन कर्मचाऱ्यांना अखेर मंगळवारी अटकेच्या कारवाईला सामोरे जावे लागले. चतुश्रृंगी पोलिसांनी या तिघांना अटक करून त्यांची कोठडी घेतली आहे. पोलिसांच्या तपासात आता मुख्य गुन्हेगार समोर येतील, अशी चर्चा विद्यापीठीच्या वर्तुळात सुरू झाली आहे.

‘सर्वाधिक कडक’ नियम आजपासून

$
0
0
शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा प्रसिद्ध करण्यास मान्यता मिळाल्याने आता जुन्या व नव्या आराखड्यातील तरतुदींपैकी अधिक कडक असलेल्या तरतुदींचीच (स्ट्रिंजंट अमंग्स्ट टू) सध्या तरी अंमलबजावणी होणार आहे. शिथिल केलेल्या तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी त्यावर राज्य सरकारच्या मान्यतेची मोहोर उमटणे आवश्यक आहे.

‘कामापेक्षा झाले नियम महत्त्वाचे’

$
0
0
कामाच्या गतीपेक्षा नियम महत्त्वाचे झाल्याने चौकट मोडून काम करण्यास कोणी तयार नाही. विरोधी पक्ष, ‘कॅग’ ठपका ठेवत असल्याने कामकाजावर त्याचा परिणाम होत असल्याची खंत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी व्यक्त केली. येरवडा कारागृहाच्या आवारात शंभराव्या तुकडीच्या दिक्षांत संचलनाच्या कार्यक्रमानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images