Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ससूनला आता औषधांची चिंता नको

0
0
अपु-या निधीमुळे औषधांचा तुटवडा होत असल्याची ओरड आता यापुढे ससूनमध्ये ऐकायला येणार नाही. पुरेशा औषधांच्या खरेदीसाठी ससून हॉस्पिटला राज्य सरकारने पाच कोटींचा अतिरिक्त निधी दिला आहे. त्यामुळे यापुढे पेशंटला बाहेरून औषधे आणण्याची वेळ येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने ससूनला केवळ औषध खरेदीसाठी पाच कोटींचा निधी मिळू शकला.

दोन्ही काँग्रेसचा वरचष्मा सिद्ध

0
0
भाषणांतून केलेली प्रचंड टीका काही तासांतच विसरून, विकास आराखड्याला उपसूचना सुरू करण्यासाठी सत्ताधा-यांबरोबरच विरोधकांची धावाधाव सुरू झाली आणि एकत्र आलेल्या दोन्ही काँग्रेसचा महापालिकेच्या सभागृहातील वरचष्मा सोमवारी पुन्हा दिसून आला.

रेफ्री- गाइड्सचे साटेलोटे थांबणार?

0
0
पुणे विद्यापीठामार्फत चालणा-या संशोधनांचा दर्जा सुधारण्यासाठी विद्यापीठानेही आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून विद्यापीठाकडून प्रत्येक विषयांसाठीच्या पीएचडी रेफ्रींचे पॅनेल तयार करण्यात येणार आहे.

मेट्रोसाठी आज दिल्लीत बैठक

0
0
वनाझ ते रामवाडी या मेट्रो रेल्वेमध्ये आलेले अडथळे दूर करून मेट्रो ट्रॅकवर आणण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने दिल्लीत गुरुवारी केंद्रीय नगरविकास मंत्री कमलनाथ यांच्याशी सर्व पक्षनेत्यांची बैठक होणार आहे.

कोर्टाच्या अवमानाची याचिका दाखल

0
0
शिक्षकांना एकदिवसीय शिक्षक अधिवेशनाला जाण्यासाठी सात दिवसांची पगारी रजा देण्याच्या सरकारी अध्यादेशाबाबत कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी दिले.

बलात्कारासाठी फाशी देताना दुष्परिणाम पाहणे आवश्यक

0
0
‘बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला फाशी देण्याची मागणी होत आहे. असे झाल्यास, आरोपी संबंधित मुलीला ठार मारण्याचीच शक्यता आहे. कठोर शिक्षेची मागणी करताना त्याचे दुष्परिणाम आणि अंमलबजावणी या गोष्टीही पडताळणे आवश्यक आहे,’ असे मत ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी व्यक्त केले.

‘एलबीटी’लाही विरोध कायम

0
0
जकातीऐवजी पुणे शहरात ‘स्थानिक संस्था कर’ (एलबीटी) लागू झाल्यास व्यापार शहराबाहेर जाईल आणि पर्यायाने महापालिकेचे उत्पन्न बुडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘एलबीटी’ला विरोध करीत असल्याची भूमिका ‘द पूना मर्चंट्स चेंबर’सह व्यापा-यांनी कायम ठेवली आहे.

टेरेसवरून पडून तरुणाचा मृत्यू

0
0
कॅम्पमधील चार मजली अशा ‘सिटी सेंटर’ या कॉम्प्लेक्सच्या टेरेसवरून दुस-या ​इमारतीवर जाण्याचा प्रयत्न करणा-या तरुणाचा बुधवारी दुपारी जमिनीवर पडल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रस्तावित विमानतळामुळे प्रकल्पग्रस्तांची स्वप्ने धुळीत

0
0
खेड तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कोट्यवधींचा भाव आलेल्या निघोजे, भोई, केळगाव आणि कुरळी या गावांतील लाभक्षेत्रांमधील आरक्षित जमिनी वगळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लाभक्षेत्रातील सुमारे सव्वाचार हजार एकर जमीन वगळून काही मंडळींवर विशेष मेहेरनजर दाखविण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे.

पतंगोत्सवात दक्षतेचे ‘महावितरण’चे आवाहन

0
0
संक्रातीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना नागरिकांनी वीजवाहिन्या आणि ट्रान्स्फॉर्मर यांच्यापासून सावधगिरी बाळगावी, असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.

‘समाजातील सर्व प्रश्नांचे शिक्षणातून उत्तर शक्य’

0
0
‘समाजातील सर्व प्रश्नांची उत्तरे शिक्षणाच्या माध्यमातून दूर होऊ शकतात,’ असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले. नातू फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा नातू पुरस्कार प्रभुणे यांना, तर सेवाव्रती पुरस्कार ज्ञानेश्वर भोसले यांना वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विलास चाफेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

भारताचा ऑटो हब म्हणून उदय

0
0
सरकारने सुरू केलेल्या ऑटोमोटिव्ह मिशन प्लॅनची फळे मिळायला लागली असून, वाहन उत्पादनाच्या बाबतीत जगातील महत्त्वाचे एक ‘हब’ म्हणून भारत पुढे आला आहे, असे प्रतिपादन अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी केले. इलेक्ट्रीक व्हेइलकबाबतचे धोरण जाहीर होणार असल्याने पटेल या परिषदेस उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, व्हिडीओ क्लिपमधून त्यांनी आपले विचार मांडले.

जवान हत्येच्या निषेधार्थ ‘पतित पावन’ची निदर्शने

0
0
सीमारेषेवरील तैनात दोन भारतीय जवानांची पाकिस्तानी सैनिकांनी निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ पतित पावन संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. कर्वेरोड नळस्टॉप चौकात संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब वाढवणे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.

‘मसाप’तर्फे संमेलनाध्यक्षांना १ लाखाचा निधी

0
0
चिपळूण संमेलन विविध वादांच्या भोव-यात अडकले असले, तरी नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे एक लाख रुपयांचा धनादेश दिला जाणार आहे. ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात हा धनादेश सुपूर्त केला जाईल, अशी माहिती परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

शौचालय न बांधणारे १८८ सदस्य अपात्र?

0
0
शौचालय बांधण्यासाठी अनेक वेळा मुदतवाढ देऊनदेखील शौचालय न बांधणा-या पुणे जिल्ह्यातील १८८ ग्रामपंचायत सदस्यांचे सभासदत्व अपात्र ठरविण्याच्या नोटिसा जिल्हा प्रशासन बजाविणार आहे.

विकिपीडियाला द्या तुमचा आवाज...

0
0
विषय कोणताही असो... अगदी छोट्या मोठ्या बारकाव्यांसह संदर्भ देणारा, हक्काचा ऑनलाइन विश्वकोश समजला जाणारा ‘विकिपीडिया’ आता बोलता होणार आहे आणि तेही मराठीत... येत्या १३ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या या उपक्रमासाठी पुणेकरांनी आवाज द्यावा, असे आवाहन विकिपीडिया क्लबने केले आहे.

आसाराम बापूंविरोधात ‘मनसे’चे आंदोलन

0
0
दिल्लीतील बलात्कारप्रकरणी आसाराम बापू यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे फ्लेक्स जाळून निषेध केला. आसाराम बापू यांचा आळंदीत सत्संग मेळावा होणार आहे. त्याचे फ्लेक्स ‘एसएनडीटी’ येथे लावण्यात आले होते. मनसेचे वाहतूक विभागाचे अध्यक्ष हेमंत संभूस यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले.

‘ग्रीन पुणे’ विसरा; आता फक्त ‘टीन पुणे’

0
0
‘ग्रीन पुणे’ ही संकल्पना यापुढील काळात पुणेकरांना विसरावी लागणार असून, ‘टीन पुणे’ (झोपड्यांचे शहर)​ किंवा ‘सिमेंटच्या जंगलातले पुणे’ म्हणून भविष्यात पुण्याची नवी ओळख होणार आहे. त्यास कारणीभूत ठरलाय जुन्या पुण्याचा विकास आराखडा (डीपी). या डीपीमध्ये पुण्याचे हरितवैभव कमी करून ते निवासी करण्याबरोबरच ग्रीन बेल्टमध्येही बांधकामे करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.

डीपी सेलच्या अधिकारी, कर्मचा-यांना बक्षिसी

0
0
राजकारणी आणि बिल्डर यांचे हितसंबंध जोपासत आणि विरोधकांच्या विरोधाला तोंड देत जुन्या पुण्याचा विकास आराखडा (डीपी) यशस्वीपणे तयार केल्याबद्दल डीपी सेलच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बक्षिसी देण्यात आली आहे. संबंधित सर्व कर्मचा-यांना दोन वेतनवाढ देण्यात येणार आहेत.

‘ससून’च्या‘कॅथलॅब’मध्ये शॉर्टसर्किटमुळे आग

0
0
ससून हॉस्पिटलमधील कॅथलॅब विभागातील मशिनच्या वायरला शॉर्टसर्किट झाल्याने बुधवारी दुपारी अचानक आग लागली. ससून हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. जी. कुलकर्णी म्हणाले, ‘कॅथलॅबमध्ये दुपारपर्यंत दोन ते तीन पेशंटवर उपचार प्रक्रिया करण्यात आले. त्यानंतर दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान, कॅथलॅबमध्ये वीज पुरवठा करणा-या वायरला शॉर्टसर्किट झाल्यामुळे थोडीशी आग लागली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images