Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सध्याचे शिक्षण व्यवसाय केंद्री

$
0
0
‘बदलत्या काळाच्या गरजा लक्षात घेता, अनेकांमध्ये काय उत्तम आहे हे शोधणारी शिक्षणपद्धती आपल्याकडे आवश्यक आहे. मात्र, ही बाब दुर्लक्षित राहत असून आपले शिक्षण व्यवसायकेंद्री होत चालले आहे,’ अशी खंत चित्रपट अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी पुण्यात व्यक्त केली.

११ लाख नागरिक टँकरवर अवलंबून

$
0
0
पुणे विभागातील चार जिल्ह्यांत पाण्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट होऊ लागली असून, तब्बल ११ लाख नागरिकांना टँकरवर विसंबून राहावे लागत आहे. या जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी ५२० कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे.मराठवाड्यातील नागरिक पाण्यासाठी मेटाकुटीला आले असताना पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांना पाणीटंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत.

शालेय वर्गातच ते गिरवताहेत स्वावलंबनाचे धडे

$
0
0
शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी, दुर्गम भागातील वास्तव्य अन सोयीसुविधांची वानवा... ... परिस्थितीला दूषणे देत हातपाय गाळून न बसता त्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा खर्च भागविण्यास पेललाय पर्याय स्वयंरोजगाराचा. सेंद्रीय भाजीपाला, किचेन्स, ट्रॉफी, बेंचेस, डिजिटल फोटो, फॅब्रिकेशनची कामे अशा विविध कामांतून ते चार पैसे कमवत आहेत.

शिक्षक गेले अधिवेशनाला

$
0
0
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनासाठी पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील हजारो शिक्षक सिंधुदुर्ग येथे गेल्याने शाळांचे कामकाज थंडावले आहे. अधिवेशनासाठी मिळणा-या सात दिवसांच्या विशेष सुट्टीचा गैरफायदा घेत, उपस्थितीच्या खोट्या पावत्या देऊन संघटनांतर्फे कोट्यवधींचा व्यवहार सुरू आहे, त्यामुळे शिक्षण कायद्याचा भंग होत आहे, असा आरोप काही शिक्षकांनी आणि संघटनांनी केला आहे.

पुटा-पुक्टोचे लाक्षणिक उपोषण

$
0
0
प्राध्यापकांच्या मागण्यांकडे शासनाच्या होणाऱ्या दुर्लक्षाविरोधात पुणे विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक संघटना (पुक्टो) आणि पुणे विद्यापीठीय शिक्षक संघातर्फे (पुटा) सोमवारी विद्यापीठामध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपाषण आयोजित करण्यात आले होते.

भेसळविरहित अन्नासाठी जिल्हाधिका-यांची समिती

$
0
0
शहर आणि जिल्ह्यांत खाद्यान्नासह धान्यातील होणा-या भेसळीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि जनतेला भेसळविरहित अन्न उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

बारा फूल आडत्यांचे परवाने निलंबित

$
0
0
सहाऐवजी दहा टक्के आडत वसुली करणा-या बारा फूल व्यापाऱ्यांचे परवाने निलंबनाची कारवाई प्रादेशिक बाजार समितीने केली. त्यामुळे आडत्यांमध्ये संतापाची लाट उसळली.

दुष्काळावरील उपायांसाठी बैठक

$
0
0
राज्यात निर्माण झालेली दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी, खाजगी साखर कारखाने, तसेच सहकारी बँकांच्या संचालक आणि अधिकाऱ्याची विशेष बैठक येत्या शुक्रवारी (११ जानेवारीला) बोलाविण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘पीएमपी’ने पकडली पुन्हा डावी लेन

$
0
0
‘पीएमपी’ची वाहतूक डाव्या बाजूने व्हावी,म्हणून कर्वे रोड ते कोथरूड दरम्यान प्रशासनाने पुन्हा एकदा डाव्या लेनचा प्रयोग सुरू केला आहे. गेल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबवण्यात आला होता. मात्र, महापालिकेकडून बसस्टॉपवर पिवळे पट्टे आखून देण्यात केलेली दिरंगाई आणि अपुरे मनुष्यबळ अशा कारणांमुळे हा प्रयोग काही दिवसांमध्ये बंद पडला होता.

‘आधार’साठी एलपीजी रांगेतच

$
0
0
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘कॅश ट्रान्स्फर’ योजनेसाठी गर्भवती महिला व शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांपाठोपाठ शाळांना प्राधान्य दिले जाणार असल्याने रॉकेल व ‘एलपीजी’धारकांना मात्र आधारसाठी रांगेतच थांबावे लागणार आहे.

राजीनामा देण्याचा प्रश्नच उद‍भवत नाही

$
0
0
कोणी काय मागणी करायची, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मी निवडून आलो असलो, तरी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे मी राजीनामा द्यायचा प्रश्नच उद‍्भवत नसल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. नागनाग कोत्तापल्ले यांनी स्पष्ट केले.

रब्बी व उन्हाळी पिकांना ‘खडकवासल्या’तून पाणी

$
0
0
पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे शेतीचे पाणी थांबविण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली असली, तरी खडकवासला व चासकमान धरणातून रब्बी पिकांना पाणी सोडणे शक्य आहे. खडकवासल्याच्या पाण्यात बचत करून उन्हाळी पिकांनाही पाणी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहेत.जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अविनाश सुर्वे यांनी ‘मटा’ला ही माहिती दिली.

पुणे @ ७.५

$
0
0
शहराच्या पा-यात पुन्हा अंशतः घट झाल्याने ७.५ अंश सेल्सियस या किमान तापमानासह सोमवारी थंडीची हुडहुडी कायम राहिली. पुढील दोन दिवसांत थंडी कायम राहणार असली, तरी किमान तापमानात अंशतः वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. गेल्या शनिवारपासून शहरात थंडीची तीव्रता वाढली आहे.

चित्रपट महामंडळाचे कार्यालय बंद

$
0
0
पुण्यातील उपाध्यक्षपद रद्द; तसेच को-ऑप सदस्य करून घेण्याच्या तरतुदीकडे दुर्लक्ष करून पुण्याला सापत्न वागणूक देणा-या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने पुण्यातील कार्यालयही हेतूपुरस्पर बंद केल्याचा आरोप चित्रपट निर्माते, महामंडळाचे सदस्य मेघराज राजेभोसले यांनी केला आहे.

‘डीपी’वरून पालिकेत रणकंदन

$
0
0
जुन्या पुण्याच्या विकास आराखड्यावरून (डीपी) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. विरोधकांनी ‘डीपी’तील तरतुदी पुणेकरांसाठी अन्यायकारक असल्याचे सांगत तोंडसुख घेतले, तर सत्ताधाऱ्यांनी पाठराखण केली. ‘डीपी’साठी झालेल्या खास सर्वसाधारण सभेला सोमवारी वादाने सुरुवात झाली.

पुणेकरांचे स्वप्न करणार ‘डीपी’ साकार

$
0
0
जुन्या पुण्याच्या विकास आराखड्यातून (डीपी) पुणेकरांना अनेक गोष्टी मिळणार आहेत. त्यामध्ये परवडणारी घरे मिळण्यासाठी योजना आणि वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी वनाझ ते रामवाडी या मेट्रोमार्गासह आणखी सहा मार्गांवर मेट्रोसाठी आरक्षणे सुचवण्यात आली आहेत.

‘डीपी’ मंजुरीसाठी अखेर कंबर कसली

$
0
0
जुन्या पुण्याचे भवितव्य ठरणारा विकास आराखडा (डीपी) प्रसिद्ध करण्यास सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी दोन्ही काँग्रेसने कंबर कसली असून, दुपारी तीन वाजता सुरू झालेल्या सभेत मध्यरात्रीपर्यंत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते.

महावितरणकडून ४७ कोटींच्या दंडाचा शॉक

$
0
0
‘महावितरण’च्या दक्षता आणि सुरक्षा विभागाने पुणे परिमंडळातील पाच हजार ९५६ बेकायदा वीज वापर आणि वीजचोरीचे प्रकार उघडकीस आणून ४७ कोटी २५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

दोन वर्षांत एकही तक्रार नाही

$
0
0
सरकारी कार्यालयांत काम करताना महिला कर्मचा-यांचा होणारा लैंगिक छळाच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीकडे गेल्या दोन वर्षांत एकही तक्रार आलेली नाही. जिल्हापातळीवर ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

चाकण-आळंदी रस्त्यावरील प्रेसिंग कंपनीला आग

$
0
0
चाकण-आळंदी रस्त्यावरील गणगे प्रेसिंग कंपनीला मंगळवारी ( ८ जानेवारी) सायंकाळी सातच्या सुमारास मोठी आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>