Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

महिला अत्याचार रोखण्यास पुरुषांवर संस्कार गरजेचे

$
0
0
‘महिलांवर होणारे अत्याचार केवळ कडक कायदे करून थांबणार नाहीत. महिलांकडे बघण्याची समाजाची मानसिकता जोपर्यंत बदलणार नाहीत, तोपर्यंत अशा घटना घडतच राहणार.

नशिबाचे तारू अखेर किनाऱ्यावर...

$
0
0
सातत्याने समुद्रावरचा प्रवास, कमी लाइट आणि शीतकरण केलेले अन्न खाऊन आलेले आजारपण... आणि त्यातच करार संपल्यावरही केवळ कंपनीच्या थकबाकीमुळे त्याच्यासह १३ जणांना पुढचे दोन महिने जहाजावरच काढावे लागले.

चोरांना पकडण्यासाठी टाकल्या ब्रिजवरून उड्या

$
0
0
बी. टी. कवडे रोडवर संशयित तिघा गुन्हेगारांचा पाठलाग करण्यासाठी घोरपडी येथील रेल्वे ओव्हरब्रिजवरुन उडी टाकावी लागल्याने एक फौजदार आणि एक पोलिस कर्मचारी जखमी झाला.

दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही?

$
0
0
पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वरील पायाभूत रचनेतील त्रुटी दूर करण्याचे प्रस्ताव लालफितीत अडकविणाऱ्या अधिकारी-कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे का नोंदविले जात नाहीत, असा प्रश्न गेल्या काही दिवसांमधील जीवघेण्या अपघातांनंतर उपस्थित झाला आहे.

‘ज्येष्ठ नागरिकांची कार्डे आत्ता नाहीत...’

$
0
0
‘ज्येष्ठ नागरिकांची आधारकार्डे आता होणार नाहीत..., ‘पन्नास वर्षांच्या पुढील नागरिकांची कार्डे फेब्रुवारीत होणार आहेत...!’ या शहरातील अफवा नसून आधार कार्डाच्या नोंदणी केंद्रामधून नागरिकांना देण्यात आलेली उत्तरे आहेत.

तुम्ही प्रतीक्षेत आहात.....

$
0
0
‘भारत संचार निगम लिमिटेड’चे (बीएसएनएल) लँडलाइन कनेक्शन मंजूर झाले, तरी फोन चालू होण्यासाठी मंजुरीला लागणाऱ्या कालावधीपेक्षा ‘इन्स्ट्रूमेंट’ मिळविण्यासाठीच अधिक प्रतीक्षा करावी लागत असल्याचा अनुभव ग्राहकांना येत आहे.

तिहेरी खूनप्रकरणी अद्याप अटक नाही

$
0
0
नगर जिल्ह्यातील सोनई या गावी (ता. नेवासा) नववर्षदिनी तीन दलित सफाई कामगारांच्या झालेल्या निर्घृण खुनाप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती नगर जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुनीता साळुंके-ठाकरे यांनी दिली.

सुनीता विल्यम्सचा अनोखा ‘क्लास’

$
0
0
पुण्यातील ‘एमआयटी’मध्ये गुरुवारी होते एक गेस्ट लेक्चर... लेक्चरसाठी तयार केलेल्या ‘व्हर्च्युअल क्लासरूम’मध्ये जमले होते विविध कॉलेजांतील ५०० हून अधिक विद्यार्थी... विषय होता ‘स्वतःमधील प्रेरणास्रोत’ शोधणे... ‘स्काइप’ कनेक्ट झाले आणि समोरच्या पांढऱ्या स्क्रीनवर ‘लाइव्ह’ अवतरली शब्दशः ‘अवकाश भरारी’ घेतलेली सुनीता विल्यम्स!...

हजार सीसीटीव्हींचा मार्ग मोकळा

$
0
0
शहरात एक हजार सीसीटीव्हीची यंत्रणा बसविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात नियुक्त केलेल्या उच्चाधिकार समितीने टेंडरना अंतिम रूप दिले आहे. आहेत.

चाकूने जखमी करा, ठार मारू नका

$
0
0
‘गुन्हेगारांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तुम्हीच आता मिरची पूड, चाकू किंवा बेशुद्ध पाडण्याचा स्प्रेदेखील जवळ ठेवा, वेळ आली तर गुन्हेगाराला जखमीही करा, मी भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभा आहे,’ असा कानमंत्र देत पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी महिलांवरच स्वसंरक्षणाची जबाबदारी सोपावली.

पुण्यात महिलेची आत्महत्या

$
0
0
कंम्प्युटर इंजिनिअर महिलेने येरवडा येथील आयबीएम बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावरुन उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

‘एक्स्प्रेस वे’वरील दुभाजकांची उंची वाढविणार

$
0
0
पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वरील वाढत्या अपघातांच्या आणि हे अपघात रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याबाबत होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, या महामार्गावरील दुभाजकांची उंची वाढविण्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी केली. दुभाजक अधिक मजबूतही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बारामतीत मेडिकल कॉलेजला मंजुरी

$
0
0
पुणे जिल्ह्यातील बारामतीसह चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यात प्रत्येकी शंभर विद्यार्थी प्रवेशक्षमतेचे नवीन मेडिकल कॉलेज सुरू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. याशिवाय पाचशे खाटांचे संलग्नित हॉस्पिटल सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

यू-ट्यूब आता देणार विद्यार्थ्यांना धडे

$
0
0
सोशल नेटवर्किंगचा गैरवापर करण्यात युवापिढी आघाडीवर असल्याची टीका केली जात असतानाच, आता याच नेटवर्किंगच्या माध्यमातून विद्यापीठीय तरुणाईला तज्ज्ञांकडून धडे गिरविण्याची संधी मिळणार आहे.

दुबार प्रॉपर्टी टॅक्सला प्रशासनच जबाबदार

$
0
0
शहरातील नागरिकांना मिळणारी दुबार प्रॉपर्टी टॅक्सची बिले रद्द करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलली असली, तरी या परिस्थितीला प्रशासनच जबाबदार असल्याची कबुलीही देऊन टाकली आहे.सध्या महापालिकेकडे सुमारे ७३७ कोटी रुपयांची थकबाकी असून, या थकबाकीच्या आकड्यात दोन टक्के व्याजाच्या रकमेमुळे दर महिन्याला १८ कोटी याप्रमाणे वर्षाला सुमारे २२२ कोटी रुपयांची भर पडत आहे.

विनापरवाना पार्ट्यांकडून एकोणीस लाखांचा दंड

$
0
0
नवीन वर्षाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पार्ट्यांसाठी करमणूक कर विभागाची परवानगी न घेणा-या शहर आणि जिल्ह्यातील ३३ आयोजकांना प्रशासनाने दंड ठोठावला आहे. हॉटेल्स, पब आणि डिस्कोथेक यांचा यामध्ये समावेश असून त्यांच्याकडून साडे एकोणीस लाख रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.

कुलगुरू भरविणार विद्यार्थी दरबार

$
0
0
‘पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना जर काही अडचणी असतील तर ते थेट माझ्याकडे मांडू शकतील. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मी दररोज दुपारी चार ते सहा या वेळेत नक्की उपलब्ध असेन,’ अशी हमी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी शुक्रवारी विद्यार्थी संघटनांना दिली. त्याचवेळी बहि:स्थ शिक्षण पद्धती बंद केली जाणार नाही, असे ठोस आश्वासनही त्यांनी दिले.

धरणांतील पाणीगळती वाढली

$
0
0
शहर आणि जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या धरणांची कार्यक्षमता आणि टिकाऊपणा मजबूत असताना, अलीकडे बांधण्यात आलेल्या धरणांतून पाणीगळती वाढत चालली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या गळतीकडे लक्ष वेधून, ती रोखण्यासाठी उपाययोजना सुचविणा-या शासनाच्याच अहवालातील सूचनांची दखल घेण्यात आली का, असा प्रश्न स्वयंसेवी संस्थांतर्फे उपस्थित करण्यात आला आहे.

स्पर्धात्मक विभागाला हवे ‘डिजिटल’चे कोंदण

$
0
0
‘सेल्युलॉइड’वर येणा-या चित्रपटांच्या संख्येवर मर्यादा येत असल्याने पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (पिफ) जागतिक स्पर्धात्मक विभागासाठी ‘डिजिटल’ स्वरुपात बनणा-या चित्रपटांना स्थान देणारी नवी नियमावली बनवावी, अशी मागणी संयोजकांनी राज्य सरकारकडे केली आहे.

एजन्सीचालक करताहेत ग्राहकांची फसवणूक

$
0
0
‘केवायसी अर्ज भरून दिले तरी एजन्सीचालक तुमचा सिलिंडर ‘ब्लॉक’ असल्याचे कारण सांगतात. सिलिंडर पाहिजे असेल तर मनाला वाटेल तेवढी रक्कम मागून ग्राहकांची फसवणूक करतात,’ अशा तक्रारी नागरिकांकडून येत आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images