Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

साहित्यिकांच्या मांदियाळीत राजकारण्यांचीही जत्रा

$
0
0
राजकारणी आणि साहित्यिक एकत्र व्यासपीठावर असावेत की नाही, याबद्दल सातत्याने चर्चा होत असतानाच, चिपळूण येथे होणाऱ्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तिन्ही दिवस साहित्यिक मांदियाळीत राजकारण्यांचीही जत्रा भरणार आहे.

विद्यार्थी संघटनांचा आव्वाज आज विद्यापीठात घुमणार

$
0
0
पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे निकाल वेळेत लावण्यात यावेत, परीक्षा विभागाच्या कारभाराची सखोल चौकशी व्हावी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची रखडलेली शिष्यवृत्ती, ऑनलाइन परीक्षा अर्ज प्रक्रियेतील त्रुटी दूर कराव्यात, यासह अनेक मागण्यांसाठी विविध विद्यार्थी संघटनांतर्फे शुक्रवारी (४ जानेवारी) कुलगुरू कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

सावधान... पुढे शाळा आहे!

$
0
0
शाळा असलेल्या रस्त्यावरून जाताना अवजड वाहनांच्या चालकांनी अधिक काळजीपूर्वक आणि सुरक्षितरीत्या वाहने चालविणे, ही त्यांची जबाबदारीच आहे, असे कोर्टाने शालेय मुलाला झालेल्या अपघातप्रकरणी निकाल देताना नमूद केले आहे.

नाट्यरूपातून साकारणार थेट प्रकल्प व्यवस्थापन

$
0
0
प्रज्ञाशोध स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा सर्रास होतात. सांस्कृतिक महोत्सवाचा एक भाग म्हणून अनेक ठिकाणी नाट्यस्पर्धाही रंगतात, मात्र एखाद्या प्रकल्पाचे सादरीकरण नाटकाच्या रुपात करणे ही एक अनोखी स्पर्धा आहे.

‘ड्रग्ज’ची विक्री करताना कॉलेज विद्यार्थी गजाआड

$
0
0
विमानतळ येथील सिम्बायोसिस कॉलेजसमोर ड्रग्जची विक्री करणाऱ्या एका ‘एमआयटी’च्या विद्यार्थ्याला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.

दुचाकीचोर अटकेत

$
0
0
वारजे पोलिसांनी एका दुचाकीचोराला अटक केली असून, त्याच्या ताब्यातून चोरीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. मूळचा राजस्थान येथील असलेल्या या दुचाकीचोराने बहुतांश नुकत्याच विकत घेतलेल्या दुचाकी चोरल्या आहेत.

‘एफआयआर’ न घेतलेल्या लोकांची होणार जनसुनावणी

$
0
0
अनेकदा लोक पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यासाठी जातात. मात्र, त्यांच्या तक्रारींची नोंद घेतली जात नाही. ज्यांच्या तक्रारींची दखल घेण्यात आलेली नाही किंवा एफआयआर नोंदवताना ज्यांना वाईट अनुभव आले, अशा लोकांची सहयोग ट्रस्टतर्फे ‘जनसुनवाई’ घेण्यात येणार आहे.

तरुणीला शिवीगाळ; भावावर चॉपरहल्ला

$
0
0
बहिणीस शिवीगाळ केल्याचा जाब विचारायला गेलेल्या भावावर त्याच्या मित्रानेच खुनी हल्ला केला. या भावावर चॉपरने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

माहिती अधिकारात माहिती देण्यासाठी लाच

$
0
0
माहिती अधिकारात माहिती देण्यासाठी लाच घेण्याचा अजब प्रकार जिल्हा पुनर्वसन कार्यालयात घडला आहे. टेमघर प्रकल्पासाठी संपादित जमिनींच्या रजिस्टरच्या प्रती देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या क्लार्कला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केली.

अनुभवा ‘सह्याद्री’ची जैववैविध्यता

$
0
0
कोयना-चांदोलीतील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या झालर भागात (बफर झोन) पर्यटनाला परवानगी देतानाच प्रकल्पालगतची जैववैविध्यताही पर्यटकांना पाहता येणार आहे. अशी ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

‘सीमॅट’साठी प्रवेश अर्ज भरण्याची मुदत वाढवली

$
0
0
राज्यातील विद्यार्थ्यांना ‘एमबीए’ अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदा आवश्यक असलेल्या ‘कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट’ अर्थात ‘सीमॅट’साठी अर्ज भरण्याची मुदत एक आठवड्याने वाढविण्यात आली आहे. प्रवेश अर्ज भरण्याची नवी मुदत आता ९ जानेवारी आहे.

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी जैसै थे...

$
0
0
दिवसागणिक जीवघेणी होऊ लागलेली चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कायमस्वरुपी फोडण्यासाठी उड्डाणपूल उभारण्याचा पर्यायसमोर आला. मात्र, त्यासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न उभा ठाकल्याने हा पर्यायही बाजूला झाला आहे.

माता, बाल मृत्यू टाळण्यासाठी ‘ईएमएस’चा आधार

$
0
0
‘तातडीची वैद्यकीय सेवा’ (ईएमएस) सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने ‘एक्सप्रेस वे’ वरील होणाऱ्या अपघातातील जखमींसह आता माता व बाल मृत्यू टाळण्यासाठी आरोग्य प्रशासनाला या सेवेचा ‘आधार’ मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

थेट भाजीविक्रीची वेळ वाढवा

$
0
0
ताजी भाजी उपलब्ध करून देण्यासाठी सोसायट्यांमध्ये सुरू केलेला ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ हा उपक्रम पूर्णवेळ सुरू ठेवण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सध्या दुपारपर्यंत भाजी विक्री केली जात आहे.

सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

$
0
0
स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १८२ वी जयंती गुरूवारी शहर आणि परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली.

‘इंडस्ट्रियल टाउनशिप’चा लाभ नेमका कुणाला?

$
0
0
महाराष्ट्राचे बहुप्रतीक्षित उद्योग धोरण अखेर वादंगामध्ये का होईना, पण जाहीर झाले. त्यामधील तरतुदींचा घेतलेला हा आढावा...

जनावरं जगवायची की पैलवान करायची?

$
0
0
दुष्काळी तालुक्यात सुरू केलेल्या छावण्यांतील जनावरे जगवायची की पैलवान करायची असा गहन प्रश्न राज्य सरकारला पडला आहे. छावण्यांवर होणारा खर्च काहीशे कोटी रुपयांवर गेल्याने सरकारच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

लर्निंग लायसन्स मंगळवारपासून सुरू

$
0
0
गेल्या महिनाभरापासून बंद असलेला ‘आरटीओ’तील लर्निंग लायसन्स विभाग सुरू करण्यासाठी आता मुहूर्त सापडला आहे. येत्या मंगळवारपासून लोकांना लायसन्स मिळणार आहे. नवी यंत्रणा कार्यान्वित केल्याने परीक्षेची प्रक्रिया सुरळीत पडेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोघांचा शोध सुरू

$
0
0
जंगली महाराज साखळी स्फोटांसदर्भात आणखी दोघांची नावे तपासात निष्पन्न झाली आहेत. या दोघांचा शोध सुरू असून, त्यातील एक संशयित पुण्यातील तर दुसरा मराठवाड्याचा असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

...पुन्हा जिवंत झाला ‘सत्यशोधक’ इतिहास

$
0
0
शोषित, पीडित आणि वंचितांच्या उद्धाराची हाक ‘त्या’ वाड्यात सर्वप्रथम घुमली... मुली-महिला शिक्षणाचा विचार ‘त्या’ वाड्यात रूजला.... दीन-दुबळ्यांना समाजघटक म्हणून स्वीकारण्याच्या लढ्यास ‘त्या’ वाड्यातून प्रारंभ झाला.... अशा ‘महात्म्या’च्या वाड्यातच गुरुवारी इतिहास पुन्हा जिवंत झाला....!
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images