Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

महिलांसाठी राज्यव्यापी ‘हेल्पलाइन’च नाही

$
0
0
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी, लहान मुलांवरील अत्याचार कमी करणारी ‘चाइल्डलाइन’, एवढेच नव्हे तर आत्महत्या रोखण्यासाठी सरकारच्या सहकार्यातून वेगवेगळ्या संस्थांनी हेल्पलाइन सुरू केल्या असून त्यांना समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून उल्लेखनीय प्रतिसाद मिळतो आहे.

महिलांना आधाराबरोबर आता संरक्षणही

$
0
0
सामाजिक परिस्थितीमुळे निराधार झालेल्या महिलांना आधारापाठोपाठ नव्या वर्षात आता भक्कम संरक्षणही मिळणार असून राज्यभरातील राज्यगृहे, आधारगृह, स्वाधारगृह आणि अल्पमुदत निवासस्थानांमधील सुरक्षा व्यवस्था चोख केली जाणार आहे.

ढगाळ हवेने गारवा ‘थंडावला’

$
0
0
सरत्या वर्षाची अखेर गुलाबी थंडीने होण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पुणेकरांवर सोमवारी पंख्याचा रेग्युलेटर फिरविण्याची वेळ आली. किमान तापमानात अवघ्या २४ तासांत तब्बल सहा अंशांहून अधिक वाढ झाली अन् पारा थेट १७.२ अंशांवर पोहोचला. पुढच्या दोन दिवसांतही शहरात थंडी परतण्याची शक्यता नसून, हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

अंतराळ गप्पा मारा थेट सुनीता विल्यम्सशी

$
0
0
अंतराळात जाऊन आलेल्या सुनीता विल्यम्सशी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना नव्या वर्षाच्या सुरवातीला मिळणार आहे. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्यातर्फे येत्या तीन जानेवारी रोजी सुनीता विल्यम्सशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एमआयटीच्या स्वामी विवेकानंद सभागृहात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

CNG, LPG साठी रिक्षांच्या पुन्हा मोठ्या रांगा

$
0
0
शहरात ‘सीएनजी’ आणि ‘एलपीजी’च्या पंपांसाठी जागा उपलब्ध करून या इंधनाचा पुरवठा सुरळीत करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातील अडथळे अजूनही दूर झालेले नाहीत. त्यामुळे शहरातील सुमारे २५ हजार रिक्षाचालकांना या इंधनासाठी पाच पाच तास रांगेत राहावे लागत आहे.

'एक्स्प्रेस वे'वर अखेर धावणार 'इमर्जन्सी उपचार'

$
0
0
चार ते पाच वर्षांपासून रखडलेली तातडीची वैद्यकीय सेवा नवीन वर्षात प्रत्यक्षात येणार आहे. ‘१०८’ संकेतांकावर उपलब्ध होणारी ही सेवा पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वर मार्चपर्यंत धावेल. त्यासाठीच्या ९२७ अॅम्ब्युलन्स खरेदीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला असून ऑटोमोटिव्ह रिसर्च सेंटरकडून मान्यता मिळाल्यानंतर त्यापैकी दहा प्रत्यक्ष सेवेत येतील.

‘कॅश ट्रान्स्फर’साठी बँकांचीही लगीनघाई

$
0
0
जानेवारीपासून थेट लाभार्थींच्या बँक अकाउंटमध्ये रोख स्वरूपात अनुदान जमा सुरू करण्याची सरकारची महत्त्वाकांक्षी योजना सुरू होत आहे. सरकारी बँकांनी यासाठी विविध उपक्रम हाती घेतले असून, काही लाख अकाउंट उघडली आहेत, अशी माहिती बँकांनी दिली.

रेडी रेकनरच्या दरांत २० टक्क्यांपर्यंत वाढ

$
0
0
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील रेडी रेकनरच्या दरात अपेक्षेप्रमाणे दहा ते वीस टक्के वाढ करण्यात आली आहे. शहराची उपनगरे अशी ओळख असलेल्या भागांचा यात प्रामुख्याने समावेश असून या भागातील घरांच्या किंमतीत यामुळे वाढ होणार आहे. नगरपरिषदा आणि महापालिकांना चिकटून असलेल्या प्रभाव क्षेत्रात येणाऱ्या भागातील रेडी रेकनरच्या दरात वीस टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

.....तर भारतीय शास्त्रज्ञालाही नोबेल

$
0
0
सहस्रकातील महामानव म्हणून गौरवण्यात आलेले अल्बर्ट आइनस्टाइन यांचे भौतिकशास्त्रातील स्वप्न पूर्ण करतानाच विश्वाचे रहस्य उलगडण्यासाठी महत्वाचे गणितीय योगदान देणारे प्रा. अशोक सेन भारतातील मूलभूत विज्ञान संशोधनाबद्दल मोठे आशादायी आहेत.

नववर्षात होणार डीटीएड कॉलेजांची तपासणी

$
0
0
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) डीटीएड कॉलेजांची स्थापना करण्यासाठी ठरवून दिलेल्या निकषांच्या पार्श्वभूमीवर येत्या सात ते १२ जानेवारीदरम्यान राज्यातील सर्व डीटीएड कॉलेजांची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीमध्ये कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी या प्रक्रियेचे व्हिडिओ शूटिंग करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) घेतला आहे.

आता रडायचं नाही.. लढायचं

$
0
0
आता रडायचं नाही, लढायचं..महिलांवरील अत्याचाराला सडेतोड उत्तर द्यायचं ...अशी प्रतिज्ञा घेत पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी (३१ डिसेंबर) दामिनी ब्रिगेडची स्थापना करण्यात आली.

माती, वाळू रस्त्यावर; दुर्लक्ष बेतणार जिवांवर

$
0
0
रस्त्यावर माती, वाळू पसरण्याचे प्रकार अद्याप घडत असूनही, पालिका त्याकडे दुर्लक्षच करीत असल्याचा आरोप क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या संदीप खर्डेकर यांनी केला आहे. याबाबत दोषी असणाऱ्यांना केवळ दंड करण्याऐवजी जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी महापालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

गुप्त संदेशवहनासाठी बालगणितज्ज्ञाचे संशोधन

$
0
0
‘कुठलीही संख्या आणि त्यातील आकड्यांची बेरीज यांच्यात एक ठराविक रचना दिसून येते. तसेच, बेरीज, वजाबाकी, गुणाकार यांसारख्या क्रिया केल्या तरीही या पॅटर्नमध्ये बदल होत नाही. त्याचा वापर गुप्त संदेश यंत्रणेसाठी होऊ शकतो...’

तरुणाई होणार 'पर्यटनदूत'

$
0
0
राज्यातील पर्यटनस्थळांच्या विकासामध्ये तरुणांची थेट मदत उपलब्ध व्हावी, या हेतूने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आता राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) सहकार्याने राज्यभरात पर्यटन क्लब स्थापन करणार आहे. पर्यटनस्थळांच्या संवर्धनासोबतच त्यांच्याविषयीची जनजागृती करण्याची जबाबदारी या निमित्ताने स्थानिक पातळीवरील कॉलेजांमधील युवक-युवती पेलणार आहेत.

... आणि नववर्ष पार्टी रोखली

$
0
0
कल्याणीनगर परिसरातील मुळीक गार्डन येथे नववर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीला पुरेशी परवानगी घेण्यात न आल्याने पोलिसांनी ती रोखली. हजारो रुपयांचे तिकीट घेत परदेशी डान्सरचा सहभाग असल्याची जाहिरात करणाऱ्या फ्लेक्सवरून ही कारवाई करण्यात आली.

३ अपत्यामुळे पतीचे सरपंचपद रद्द

$
0
0
जुन्नर तालुक्यातील दाऱ्या घाटाचे कार्यक्षेत्र असलेल्या आंबोली ग्रामपंचायतीचे सरपंच गोविंद खुटाण, आणि त्यांच्या पत्नी सोनाली खुटाण यांचे ग्रामपंचायत सदस्यपद रद्द करण्यात आले आहे.

ताजी भाजी, पुणेकरांच्या दारी

$
0
0
महागाईच्या जाळ्यात अडकलेल्या पुणेकरांना दिलासा देण्यासाठी कृषी आणि पणन खात्याच्या ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ या उपक्रमाला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. या उपक्रमात सुमारे दोनशे शेतकरी सहभागी झाले असून नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून पुणेकरांना ताजी भाजी उपलब्ध होईल.

सदाशिव पेठेत फ्लॅट कोटींना

$
0
0
शहराच्या विस्तारणा-या उपनगरांमध्ये लक्झुरियस फ्लॅटच्या किमती केव्हाच गगनाला भिडल्या असताना, आता ‘हार्ट ऑफ द सिटी’ अर्थात, अस्सल पुणेरी सदाशिव पेठेतही टूबीएचके फ्लॅटसाठी कोट्यवधी खर्ची घालावे लागण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. ‘नऊ सदाशिव’ या प्रोजेक्टच्या निमित्ताने सदाशिव पेठेतील घरांच्या भावाने ‘कोटीं’चा टप्पा पार केला आहे.

पुण्यात ६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

$
0
0
पुणे येथील हडपसर भागात एका सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना आज, मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपी सध्या फरार असून पीडित मुलीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही मुलगी प्रातर्विधीसाठी मोकळ्या पटांगणात गेली असताना ही प्रकार झाला.

कॉलेज विद्यार्थ्याकडून बलात्कार

$
0
0
दिल्ली येथील अत्याचाराच्या घटनेचे पडसाद साऱ्या देशभर उमटत असतानाच हडपसरमध्ये एका सहा वर्षांच्या मुलीवर बारावीतील विद्यार्थ्याने बलात्कार केल्याची घटना बुधवारी घडली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images