Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ससूनच्या ‘कॅथलॅब’ला जीवदान

$
0
0
दहा वर्ष जुने असलेल्या ‘कॅथलॅब’चे मशीन नादुरुस्त असल्याने आता नव्या वर्षात मशीनच्या खरेदीसाठी राज्य सरकारने पाच कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. त्यामुळे ससून हॉस्पिटलमध्ये आता पुन्हा नव्याने अँजिओग्राफीसह अँजिओप्लास्टी करण्यास गती येणार आहे.

एलबीटीचा प्रस्ताव तयार

$
0
0
येत्या एक एप्रिलपासून स्थानिक संस्था कर (लोकल बॉडी टॅक्स) लागू होण्याची शक्यता गृहीत धरून पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. नव्या करप्रणालीमुळे महापालिकेच्या जकातीच्या वार्षिक उत्पन्नात दहा टक्के कमी किंवा जास्त असा फरक होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

शुद्ध पाण्याची शाश्वती वाढणार

$
0
0
येत्या एक एप्रिलपासून स्थानिक संस्था कर (लोकल बॉडी टॅक्स) लागू होण्याची शक्यता गृहीत धरून पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. नव्या करप्रणालीमुळे महापालिकेच्या जकातीच्या वार्षिक उत्पन्नात दहा टक्के कमी किंवा जास्त असा फरक होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

‘वनभवना’चे बांधकाम रखडले सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

$
0
0
शहराच्या वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या वन विभागाच्या कार्यालयांना एकत्र आणण्यासाठी खुद्द वनमंत्री पतंगराव कदम यांनी पुढाकार घेतला असला, तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे भांबुर्डा येथील वनभवनाचे कामकाज रखडले आहे. पुरेसा निधी उपलब्ध असूनही बांधकाम धिम्या गतीने सुरू आहे.

‘जेईई-मेन्स’ला पुण्यातून बारा हजार विद्यार्थी

$
0
0
‘एआयईईई’ बंद होऊन त्या ऐवजी होत असलेली परीक्षा, अशी झालेली ओळख आणि एकूणच इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल यामुळे ‘जेईई-मेन्स’ या परीक्षेसाठी देशभरातून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४ लाखांवर गेली आहे. केवळ पुण्याचा विचार करता सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचा अंदाज आहे.

डीटीएड कॉलेजांना द्यावी लागणार ‘तपासणी’ परीक्षा

$
0
0
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) डीटीएड कॉलेजांची स्थापना करण्यासाठी ठरवून दिलेल्या निकषांच्या पार्श्वभूमीवर येत्या सात ते १२ जानेवारीदरम्यान राज्यातील सर्व डीटीएड कॉलेजांची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीमध्ये कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी या प्रक्रियेचे व्हिडिओ शूटिंग करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) घेतला आहे.

‘ई-मोजणी’ला जोड ‘ई-पेमेंट’ची

$
0
0
जमीन मोजणीमध्ये अधिकाधिक पारदर्शकता येण्याबरोबरच दिलेल्या मुदतीत जमिनीची मोजणी पूर्ण व्हावी, यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘ई - मोजणी’ अभियानाला ‘ई-पेमेंट’ ची जोड दिली जाणार आहे.

स्त्री अत्याचार विरोधी युवा जागरण मोहीम

$
0
0
डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियातर्फे (डीवायएफआय) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ३ जानेवारी ते २३ मार्च या कालावधीत राज्यव्यापी स्त्री अत्याचार विरोधी युवा जागरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेची सुरुवात ३ जानेवारीला पुण्यातून होणार आहे.

‘खूणगाठ ठेवा... चांगले वागण्याची’

$
0
0
जेलच्या चार भिंतीमधून बाहेर आल्यानंतर सुधारण्यासाठी हात देणारे कमीजण भेटतात.. वाईट गोष्टी टाळा..चांगले जगण्याची खूणगाठ मनाशी ठेवा..

गाजावाजा मोठा; निराशाही मोठी

$
0
0
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र शासनाच्या २६ योजनांमधील अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात रोखीने हस्तांतरण (कॅश ट्रॉन्सफर) होणार, असा डांगोरा गेले महिनाभर पिटला जात असताना प्रत्यक्षात मात्र भोर तालुक्यातील एकाही व्यक्तिच्या नावावर एक नवा पैसा जमा झाला नसल्याचे दिसून आले आहे. येथील स्टेट बॅक आँफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्रच्या येथील शाखा व्यवस्थापकांकडून ही माहिती देण्यात आली.

पवना धरणग्रस्तांसाठी नवी पहाट

$
0
0
पवना धरणासाठी तब्बल ४७ वर्षांपूर्वी विनामोबदला जमीन दिलेल्या धरणग्रस्तांना दोन पिढ्यांच्या लढ्यानंतर अखेर न्याय मिळाला आहे. ८६३ धरणग्रस्तांना प्रत्येकी एक एकर जमीन मिळणार असल्याने त्यांच्या जीवनात नवी पहाट उगवणार आहे.या धरणग्रस्तांना येत्या १० जानेवारी रोजी काले गावातील शांताई मंगल कार्यालयात सोडत पद्धतीद्वारे जमिनीचे वाटप करण्यात येणार आहे.

मराठा ‘व्होट बँके’चे आठवलेंना स्वप्न

$
0
0
मराठा समाजाला क्रिमिलेयरच्या आधारावर आरक्षण देण्याच्या मागणीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार रामदास आठवले यांनी पाठिंबा देत मराठा ‘व्होट बँक’ वाढविण्यासाठी कंबर कसण्यास सुरुवात केल्याचे मंगळवारी स्पष्ट केले.

फटाक्याच्या आवाजाने शेकडो कोंबड्यांचा मृत्यू

$
0
0
फटाक्याच्या आवाजामुळे धक्का बसून शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना मावळ तालुक्यातील साळुंब्रे गावामध्ये घडली. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांमध्ये फटाके वाजविणाऱ्या तरुणाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोल्ट्रीफार्मचे मालक वामन राक्षे यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. रवी रामचंद्र विधाते यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

‘तोरणा’वर तरुणांची स्वच्छता मोहीम

$
0
0
वारजे येथील शिवशंभू राजे प्रतिष्ठान या युवकांच्या ग्रुपतर्फे नुकतीच तोरणा गडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गडाच्या दुर्गम वाटेवर नादुरूस्त झालेल्या रेलिंगजवळ ट्रेकर्सच्या सोयीसाठी दोरही बसविण्यात आला.

आंबेडकर जयंतीला काम सुरु करा

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जागतिक विद्वत्ता व प्रतिमा लक्षात घेता आंतरराष्ट्रीय कीर्तीचे स्मारक होईल असा आराखडा तयार करून त्याच्या बांधकामाचा शुभारंभ १४ एप्रिलला करावा, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. इंदू मिलची जागा सर्व आंबेडकरी जनतेच्या संघशक्तीमुळे स्मारकासाठी मिळाली आहे. त्यामुळे त्याचे श्रेय कोणी घेऊ नये, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

शालेय शिक्षण विभाग अतिरिक्त कार्यभारांवर

$
0
0
शालेय शिक्षण विभागाकडे सध्या पूर्णवेळ संचालकांची कमतरता आहे. या विभागातील आठ संचालनालयांपैकी पाच संचालनालयांवर पूर्णवेळ संचालक नाहीत. त्यामुळे तीन संचालक आठ संचालनालयांचा कार्यभार सांभाळत असल्याचे चित्र आहे.

भिडे वाडा स्मारकाचे भूसंपादन अंतिम टप्प्यात

$
0
0
महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या देशातील मुलींच्या पहिल्या शाळेला मंगळवारी (एक जानेवारी) १६५ वर्षे पूर्ण झाली. या ठिकाणी सार्वजनिक स्मारक उभारण्यासाठी भूसंपादनाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली असून, एक जानेवारी स्त्री शिक्षण गौरव दिन म्हणून जाहीर करावा, अशी मागणी मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक निर्माण समितीतर्फे करण्यात आली आहे.

‘शिवनेरी’चा प्रवास होणार अधिक सुरक्षित

$
0
0
एसटीच्या शिवनेरी व्होल्वोने प्रवास करणा-या मंडळींचा प्रवास आता अधिक सुरक्षित होणार आहे. एसटी महामंडळाकडून या सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची योजना एसटी महामंडळाकडून लवकरच हाती घेण्यात येणार आहे. येत्या महिन्याभरात त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.

खासगी शाळांतील आरक्षणासाठी वेळापत्रक

$
0
0
मोफत व सक्तीच्या शिक्षणहक्क कायद्यांतर्गत शाळांमधील २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले. राज्यातील अल्पसंख्याक विनाअनुदानित शाळा वगळता इतर सर्व शाळांना या वेळापत्रकानुसारच आपली प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या सूचना शाळांना करण्यात आल्या आहेत.

क्षणात फिरूनी थंडी पळे...

$
0
0
एक दिवस हुडहुडी भरवणारी थंडी.... पुढच्या दोन दिवसांत थंडीची रजा... काही दिवस ढगाळ हवामान अन् अचानक पुन्हा बोचणारे वारे सोबत घेऊन येणारा गारठा.... किमान तापमानात दिवसागणिक जाणवलेल्या तीव्र चढ-उतारामुळे दोन महिन्यांनंतरही थंडी स्थिरावली नसल्याचेच चित्र दिसत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images