Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘ न्यू इयर’छेडछाडीवर पोलिसांची काकदृष्टी

$
0
0
सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या उत्साहात तरुणींची छेडछाड करणा-यांना यंदाचा ‘थर्टी फर्स्ट’ भलताच महागात पडेल. कारण, दिल्लीतील बलात्काराच्या घटनेनंतर महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी महाराष्ट्र् पोलिसांनीही मोहीम उघडली असून, ‘हॅपी न्यू इयर’च्या बहाण्याने केली जाणारी छेडछाड रोखण्यासाठी विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.

एक टक्का व्हॅट घ्यावा

$
0
0
फ्लॅटधारकांनी २००६ ते २०१० या दरम्यान खरेदी केलेल्या सदनिकांवर व्हॅट आकारण्याच्या संदर्भात वाद सुरु आहे, राज्य सरकारने एक टक्का व्हॅट आकारुन हा वाद संपवावा, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक यांनी सांगितले.

‘FTII’मध्ये झळकणार टागोरांच्या कवितांवरील फिल्म

$
0
0
नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या १३ सर्वोत्कृष्ट कवितांवर आधारित शॉर्ट-फिल्म्स् पाहण्याची संधी चार ते सहा जानेवारीदरम्यान पुणेकरांना मिळणार आहे. सिनेमाच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रख्यात दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता दिग्दर्शित या फिल्म्स राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेमध्ये (एफटीआयआय) रसिकांना पाहता येणार आहेत.

खादाडांच्या सेलिब्रेशनला अंगारकी चतुर्थीची ‘वेसण’

$
0
0
नववर्षाच्या बेधुंद स्वागतासाठी उत्तररात्रीपर्यंत सेलिब्रेशन जागविण्याचे मनसुबे यंदा अनेकांना आवरते घ्यावे लागणार आहे. गजर ने किया हैं इशारा म्हणत मध्यरात्रीच्या बाराचे ठोके पडल्यानंतर खादिष्टांना तोंड आवरते घ्यावे लागेल... अंगारकी चतुर्थीचा योग वर्षातून दोन किंवा तीन वेळा येत असला, तरी नववर्षाच्या स्वागतालाच अंगारकी येण्याचा ‘योगायोग’ मात्र गेल्या काही वर्षांमध्ये प्रथमच आला असल्याचे मानले जात आहे.

अंधत्व नियंत्रणासाठी अद्ययावत तंत्रज्ञान वापरा

$
0
0
मधुमेहामुळे येणारे अंधत्व नियंत्रित करण्यासाठी अद्ययावत वैद्यकीय उपकरणांसह अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर नेत्रतज्ज्ञांनी करावा, असे आवाहन गुजरातमधील ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. पी. एन. नागपाल यांनी येथे केले.

नववर्ष स्वागताला थंडीही ‘पळाली’

$
0
0
शहर आणि परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून वाढलेली थंडीची तीव्रता रविवारी कमी झाली. बुधवारपासून १० अंशांखाली असणारा पारा रविवारी १०.९ अंशांवर स्थिरावला.

नववर्षाचे स्वागत ‘ब्लॅकआउट डे’ने

$
0
0
सरत्या वर्षाला निरोप देत, नववर्षाच्या स्वागताचे शुभेच्छा संदेश पाठविताना तुमच्या ‘मोबाइल बॅलन्स’कडे जरूर लक्ष द्या. ‘टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथोरिटी’च्या (ट्राय) निर्देशांनुसार सोमवारी (३१ डिसेंबर) आणि मंगळवारी (एक जानेवारी) ‘एसएमएस’साठी कोणत्याही सवलती मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या दोन दिवशी संदेशांची देवाणघेवाण केल्यास ‘टेरिफ प्लॅन’नुसार दरआकारणी केली जाणार आहे.

लाखभर नागरिकांची कनेक्शन ‘गॅसवर’

$
0
0
एकाच पत्त्यावरील दोन गॅस कनेक्शन रद्द होऊ नये, यासाठी आवश्यक असलेले केवायसी (नो युवर कस्टमर) अर्ज भरण्याचा सोमवारी अखेरचा दिवस आहे. एक लाखाहून अधिक ग्राहकांनी अद्यापही आपले केवायसी अर्ज भरले नसल्याने एक जानेवारीपासून असे सर्व गॅस कनेक्शन ब्लॉक होण्याची शक्यता आहे.

नव्या वर्षापासून ‘कॅश ट्रान्स्फर’ योजना लागू

$
0
0
सरकारच्या वतीने देण्यात येणा-या विविध योजनांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी नवीन वर्षापासून सुरुवात केली जाणार आहे. जिल्ह्यात एक जानेवारीपासून कॅश ट्रान्स्फर योजना लागू होणार असून, डिसेंबर अखेरपर्यंत सुमारे ९५ टक्के नागरिकांची बँकेत खा‌ती काढली आहेत. आठवड्याभरात उर्वरित नागरिकांची बँक खाती काढली जाणार आहेत.

‘पीएमपी’ देणार चालकांना प्रशिक्षण

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाद्वारे (पीएमपी) भाडेतत्त्वावर बस चालविण्यास देण्यात आलेल्या चालकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. तसेच, संबंधित चालकाकडे प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचेही संकेत पीएमपी प्रशासनाने दिले आहेत.

म. फुलेंच्या वारसांना न्याय द्या

$
0
0
‘महात्मा जोतिबा फुले यांच्या वारसांना न्याय द्यावा, फुलेंचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करावे, पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचे नाव द्यावे, भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करावे, आदी मागण्या फुले यांच्या पणतू सून नीता होले यांनी केल्या.

शिवनेरीला खास सवलती

$
0
0
कर्नाटक परिवहन महामंडळाकडून पुणे-बेंगळुरु दरम्यान चालवण्यात येणा-या ऐरावत बससाठी ज्या सवलती देण्यात येतात, त्याच धर्तीवर राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे- बेंगळुरु आणि मुंबई- बेंगळुरु शिवनेरी व्होल्वो सेवेला सवलती देण्यात येणार आहेत. येत्या दोन महिन्यांमध्ये या बाबतचा निर्णय होणार असल्याचे एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी सांगितले.

एकाच दिवशी दोन घरफोड्या

$
0
0
घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील दोन लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना चिंचवड येथील इंदीरानगर येथे घडली. शनिवार (२८) ते रविवार (२९ डिसेंबर) दरम्यान ही घटना घडली. रणजित संपतराव पवार (शिवहरी अपार्टमेंट चिंचवड) यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली.

अधिका-यांना मारहाण

$
0
0
थकबाकीमुळे शेतीपंपाची वीज खंडित केल्यामुळे ‘महावितरण’च्या कर्मचा-यांना मारहाण करून कार्यालयास कुलूप ठोकण्याचा प्रकार आळंदीजवळ घडला. या प्रकरणी चौघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

PMPमध्ये महिला सुरक्षा वा-यावर

$
0
0
पीएमपी बसमध्ये महिलांच्या सुरक्षेकडे प्रशासन लक्ष देत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी ‘पीएमपी प्रवासी मंच’चे प्रमुख जुगल राठी आणि विवेक वेलणकर यांनी केली आहे.

कोंढव्यामध्ये विनयभंगाचे २ गुन्हे दाखल

$
0
0
कोंढवा रविवारी येथे दोन स्वंतत्र घटनांमध्ये एका १४ वर्षीय मुलीसह तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी दोघाही आरोपींना अटक केली आहे.

सेलिब्रेशनला किनार सहवेदनेची!

$
0
0
जल्लोषी दणदणाटात धमाल पार्ट्या, गिफ्ट्स आदानप्रदान करीत मेजवानीचा बेत, मोबाइल आणि ई-मेलच्या माध्यमातून शुभेच्छांची देवाणघेवाण... ... नवीन वर्षाच्या स्वागताच्या दरवर्षीच्या या चित्राला यंदा दुसरी बाजूही होती.

‘जेईई-मेन्स’ला पुण्यातून १२ हजार विद्यार्थी

$
0
0
‘एआयईईई’ बंद होऊन त्या ऐवजी होत असलेली परीक्षा, अशी झालेली ओळख आणि एकूणच इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल यामुळे ‘जेईई-मेन्स’ या परीक्षेसाठी देशभरातून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४ लाखांवर गेली आहे. केवळ पुण्याचा विचार करता सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचा अंदाज आहे.

शिक्षण मंडळाचे बजेट २९२ कोटींचे

$
0
0
पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या २९२ कोटी ३८ लाख रुपयांच्या बजेटला सर्वसाधारण सभेत सोमवारी मंजुरी देण्यात आली. या बजेटचे आकडे ‘फुगले’ असले, तरी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने बजेट निराशाजनक असल्याने मुले ‘रुसणार’ आहेत. कारण मंडळ प्रत्येक विद्यार्थ्यामागे सुमारे ३३ हजार रुपये खर्च करणार आहे; पण तरीही विद्यार्थ्यांना या वर्षी कंपासपेटी, पेन्सिल, खोडरबर, फूटपट्टी आणि स्केचपेन मिळणार नाहीत.

ससूनमध्ये पुन्हा सुरू होणार हृदयशस्त्रक्रिया

$
0
0
दहा वर्ष जुने असलेल्या ‘कॅथलॅब’चे मशीन नादुरुस्त असल्याने आता नव्या वर्षात मशीनच्या खरेदीसाठी राज्य सरकारने पाच कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. त्यामुळे ससून हॉस्पिटलमध्ये आता पुन्हा नव्याने अँजिओग्राफीसह अँजिओप्लास्टी करण्यास गती येणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images