Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मनोरंजनातील अनोखी हॅट्‍‍‍ट्रिक

$
0
0
हार्बेरिअमचा इम्पॅक्ट आणि त्याच्या समारोपाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद अशा सकारात्मक दृष्ट‌िकोनातून २०१२ची सुरूवात झाली. या वर्षाने आपल्याला काय दिले, याचा विचार करताना रंगभूमी आणि चित्रपट अशा दोन्ही माध्यमांत घडलेल्या एका ठळक हॅट्ट्रिककडे मला लक्ष वेधावेसे वाटते.

आला आला... मतवाला ‘बर्फी’

$
0
0
माझ्या दृष्टीने २०१२मध्ये प्रदर्शित झालेला ‘बर्फी’ हा सिनेमा खूप महत्त्वाचा आहे. त्याची दोन-तीन कारणे आहेत. रुढार्थाने हा पारंपरिक सिनेमा नाही. मुख्य धारेतल्या सिनेमाची असते तशी या सिनेमाची पटकथा सरळसोट नव्हती. तिचे स्वरूप खूप गुंतागुंतीचे होते. त्यामुळे ती चटकन आकलन व्हायला अवघड होती.

विदारकतेचं प्रतिबिंब उमटेल

$
0
0
साहित्य म्हणजे काय? एका अर्थानं सभोवतालच्या घटनांचं शब्दांच्या रूपात उमटणारं प्रतिबिंब. सरत्या वर्षात साहित्याच्या क्षेत्रात काय घडलं आणि त्याचा याच क्षेत्रावर काय दूरगामी परिणाम होऊ शकतो, याचा थोड्या वेगळ्या अंगानं विचार करावासा वाटतो.

शहरात आता थेट शेतमाल विक्री

$
0
0
पुणेकारांना आता नव्या वर्षात स्वस्तात ताजी भाजी मिळणार असून, येत्या एक जानेवारीला शहरातील सोसायट्या आणि जिल्ह्यातील काही ठिकाणी थेट ‘शेतकरी ते ग्राहक’ हा उपक्रम सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात २० ठिकाणी या उपक्रमाच्या माध्यमातून भाजी विक्री सुरू होणार आहे.

दुहेरी खुनामागे घरकाम करणारा तरुण

$
0
0
वारजे माळवडीतील स्टर्लिंग अपार्टमेंटमधील दाम्पत्याच्या खुनाचा उलगडा झाला असून, त्यांच्याच घरात काम करणा-या नेपाळी तरुणाने सहा मित्रांच्या साथीने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी वारजे पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

मुख्याध्यापकासह रेक्टर निलंबित

$
0
0
कोळवाडी येथील आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांचा विषबाधेने मृत्यू झाल्याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक आणि हॉस्टेलचे रेक्टर यांना सकृतदर्शनी दोषी ठरवून निलंबित करण्यात आले आहे.

कोठीच्या खरेदीचे नियम अधिक कडक

$
0
0
महापालिकेच्या कोठी कार्यालयाच्या वतीने करण्यात येणा-या खरेदीचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. वॉर्डस्तरीय निधीतील कामांच्या ठरलेल्या यादीव्यतिरिक्त अन्य वस्तू खरेदी करू नयेत, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे; तसेच किरकोळ वस्तू खरेदीसाठी सरसकट टेंडर न काढता राज्य सरकारच्या रेट काँट्रॅक्टप्रमाणे खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणेकरांकडून ‘तिला’ श्रद्धांजली

$
0
0
दिल्लीमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारातील पीडित तरुणीच्या निधनानंतर पुणेकरांनी हळहळ व्यक्त केली. या घटनेच्या निषेधार्थ रॅली आणि सभा आयोजित करून शहरातील संस्था, संघटना, विद्यार्थी तसेच राजकीय पक्षांनी तिला श्रद्धांजली अर्पण केली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी यापुढे तरी सरकारने सक्षम यंत्रणा उभारावी, अशी मागणी या संघटनांनी केली आहे.

महिला सुरक्षा सर्वांचीच जबाबदारी

$
0
0
‘प्रत्येक माता, भगिनीसह मुलींचा आदर, सन्मान तसेच त्यांचे संरक्षण होईल यासाठी पोषण वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी देशातील प्रत्येक व्यक्तीसह सरकारची आहे. हीच बांधिलकी सर्वांनी नव्या वर्षात जपली पाहिजे,’ असे आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी येथे केले.

‘रेडी रेकनर’चा इमला १५ टक्क्यांनी वाढणार

$
0
0
सर्वसामान्य पुणेकरांचा किफायतशीर घरांचा शोध सुरूच असताना नवीन वर्षात रेडी रेकनरच्या दरातील सुमारे १५ टक्क्यांची वाढही त्याला सोसावी लागणार आहे.

कनेक्शन... गॅसवरील नि ‘कॅश ट्रान्स्फर’चे

$
0
0
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील ‘गळती’ रोखून विविध योजनांचे थेट ग्राहकांना लाभ मिळवून देण्यासाठी उद्याचा नववर्षदिन इतिहास घडविणार आहे. त्याचप्रमाणे, नियमबाह्य रीतीने सरकारी योजनांचा लाभ घेणा-यांनाही लगाम लावण्यासाठी ‘केवायसी’सारखी खबरदारी महत्त्वाची ठरणार आहे. ‘केवायसी’चा अर्ज भरून देण्याची मुदत ३१ डिसेंबरला संपत आहे.

‘हॅपी न्यू इयर’साठी पुणे सज्ज

$
0
0
सरत्या वर्षाच्या कडू-गोड आठवणींना उजाळा, नववर्षातील संकल्प सिद्धीस नेण्याचा निर्धार... आप्तेष्ट, मित्र-मैत्रिणींवर शुभेच्छांचा वर्षाव...खवय्यांना आव्हान देणारा मेन्यू आणि पार्ट्यांचा दणदणाट...

सांडपाणी प्रक्रियेचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळात मांडणार

$
0
0
शहरातील शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा प्रस्ताव लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, राज्य सरकारने या प्रकल्पातील वाटा उचलण्यास नकार दिल्यामुळे या योजनेसाठी महापालिकेस १४० कोटी रूपये अधिक मोजावे लागणार आहेत.

मनोरुग्ण महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0
कर्वे रोडवरील महिला सेवाग्राममधील महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. मानसिक स्थिती बिघडल्याने तिने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. वृषाली सचिन साळुंके ( वय २६, रा. जेजुरी) असे महिलेचे नाव असून या प्रकरणी प्रीती विजयकुमार भिलवार ( वय २७, रा. कर्वे रोड) यांनी डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.

विवाहितेची आत्महत्या: चौघांवर गुन्हा

$
0
0
माहेरहून पैसे आणण्याचा तगादा मागे लावून विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कात्रजमधील गोकुळनगरमध्ये मे २००९ रोजी ही घटना घडली होती.

बांगड्याखरेदीच्या बहाण्याने सराफाला १.५ लाखांचा गंडा

$
0
0
सोन्याच्या बांगड्या खरेदी करण्याचा बहाणा करून दोन म‌हिलांसह तिघांनी सराफाला फसविल्याची घटना रविवार पेठेतील चंदूकाका सराफ अॅण्ड सन्समध्ये बुधवारी दुपारी घडली. या घटनेमुळे सराफ बाजारात खळबळ उडाली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये घरफोड्यांचे सत्र सुरू

$
0
0
पिंपरी चिंचवडमध्ये मध्यंतरी थांबलेले घरफोड्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले असून, गेल्या दोन दिवसांत चिंचवडमध्ये तीन घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. त्यात सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे पावणेसात लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला. गेल्या काही दिवसांत पुणे शहर आणि परिसरात घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत.

‘...माणूस बनूया, स्त्रीलाही माणूस म्हणूया’

$
0
0
‘पुरूष आहात, माणूस बनूया, स्त्रीलाही माणूस म्हणूया,’ ‘माझं शरीर, माझा हक्क,’ ‘कोणती वेळ, कोणती जागा, कोणते वय, सुरक्षित सांगा,’ अशा घोषणा देत ‘स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती’तर्फे रविवारी आंदोलन करण्यात आले.

वनवासी विकासाच्या कायद्यात बदल करणार

$
0
0
‘वनवासी भागाच्या विकासासाठी केंद्रसरकारने १९९६ मध्ये तयार केलेल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी या कायद्यात लवकरच बदल करण्यात येणार आहे,’ अशी माहिती केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी रविवारी दिली.

ग्रामीण भागातील पार्ट्याही राहणार ‘अंडरस्कॅनर’

$
0
0
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित पार्ट्यांमध्ये गैरप्रकार होऊ नयेत या साठी जिल्हाप्रशासनाच्यावतीने विशेष काळजी घेतली जात आहे. शहर आणि ग्रामीण भागात आयोजित पार्ट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली सतराहून अधिक पथके तैनात करण्यात आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images