Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

तरुणीचा विनयभंग करणा-यावर गुन्हा

$
0
0
हडपसर येथील वैदवाडी परिसरात गेल्या आठवड्यात रात्रीच्या प्रसंगी तरुणीचा विनयभंग करणाऱ्या तरुणावर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एका १९ वर्षीय तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आनंद पेदोडा शिंदे (वय १९, रा. वैदवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही तरुणी घरात एकटीच असताना, या तरुणाने तिच्याशी असभ्य वर्तन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

प्रयाग यात्रेसाठी उरळीला थांबा

$
0
0
प्रयागधाम यात्रेला जाणा-या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने नऊ गाड्यांना उरळी रेल्वेस्टेशनवर दोन मिनिटाचा थांबा देण्यात येणार आहे.

रस्त्यांवर अश्लील चाळे करणा-यांवर कारवाई

$
0
0
नदी पुलांवर, नदीपात्राच्या कडेला अश्लील चाळे करणा-या जोडप्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना विशेष शाखेच्या उपायुक्तांनी सर्व पोलिस स्टेशनला दिल्या आहेत. दिल्ली येथील अत्याचाराच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी सर्तकता बाळगण्यास सुरुवात केली आहे.

बेकायदा वीज पुरवठादारांविरुद्ध आंदोलन

$
0
0
गाळेधारकांसाठी अधिकृत वीज मीटरसाठी प्रतीक्षेत ठेवणा-या महावितरण कंपनीने गाळेधारकांना बेकायदा वीजपुरवठा करणा-यांवर मात्र वरदहस्त ठेवला आहे. या बेकायदा वीज पुरविणा-यांवर कारवाई व अधिकृत कनेक्शन न देण्याच्या भूमिकेच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा फॅशन स्ट्रीट गाळेधारक संघटनेने दिला आहे.

अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनाचे आयोजन

$
0
0
ऑस्ट्रेलियात स्थानिक मराठी जनांना एकत्र करून उद्योग, व्यवसाय आणि रोजगार मार्गदर्शनासाठी २९ ते ३१ मार्च दरम्यान अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सराफ हल्लाप्रकरणी आणखी ३ अटकेत

$
0
0
कासारवाडी येथील सराफावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीतील तीन फरारी असलेल्या तिघांना युनीट तीनच्या पथकाने अहमदाबाद येथे गुरुवारी (२७ डिसेंबर) अटक केली. यापूर्वी दोन आरोपींना अटक करण्यात आली होती.

पाणीटंचाई रोखण्यासाठी उसावर नियंत्रण हवे

$
0
0
उसाच्या पिकाला राजाश्रय लाभलेला आहे, या पिकाच्या उत्पादनावर वेळीच नियंत्रण आणल्याखेरीज पाणी टंचाईची समस्या कमी होणार नसल्याचे मत राज्याच्या दुस-या सिंचन आयोगाचे सचिव दि. मा. मोरे यांनी व्यक्त केले.

श्रेणीसुधार परीक्षा दोनदा देता येणार

$
0
0
बारावीसाठी श्रेणीसुधार परीक्षा दोनदा देण्याची मुभा देणा-या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे बारावीची परीक्षा मार्च २०१२ मध्ये उत्तीर्ण झालेल्या; परंतु यंदा ‘जेईई’ देऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च २०१३ मधील बारावीच्या परीक्षेस बसता येणार आहे.

दीड वाजेपर्यंत ‘सेलिब्रेशन’ला परवानगी

$
0
0
पुणेकरांना नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मध्यरात्री दीड वाजेपर्यंत परवानगी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ‘डीजे’ला रात्री बारापर्यंतच परवानगी असली, तरी ‘लिकर’ ‘सर्व्ह’ करण्यास मात्र दीडपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो भारावला

$
0
0
फुटबॉलच्या मैदानात त्याला प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध त्वेषाने लढताना पाहिलेले... प्रत्यक्षात मात्र, त्याच्या वेगळ्या स्टाइलने... चेह-यावरील हास्याने...फुटबॉलप्रेमींची मने जिंकली. तो देखील पुणेकरांच्या स्वागताने भारावला... अर्थात, ब्राझीलचा अव्वल फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो पुणेकरांच्या भेटीला येणार आहे, या वृत्तानेच त्याच्या चाहत्यांमध्ये आणि प्रसारमाध्यमांमध्ये उत्साह संचारला होता.

आरोग्यासाठी १० हजार कोटी

$
0
0
‘बाराव्या पंचवार्षिक योजनेत आरोग्य आणि विविध आजारांच्या संशोधनासाठी देशासाठी दहा हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची भरीव तरतूद करण्यात आली आहे,’ अशी घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवार येथे केली. या तरतुदीमुळे आरोग्य क्षेत्रात संशोधनावर भर देण्यास मदत होणार आहे.

थंडी आली मुक्कामाला

$
0
0
शहर आणि परिसरातला थंडीचा जोर शुक्रवारीही कायम होता. किमान तापमान ७.८ अंशांवर स्थिरावला असून, पुढच्या दोन दिवसांत थंडीची तीव्रता कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

पुण्याच्या जनगणनेत घोटाळा?

$
0
0
केंद्र सरकारतर्फे गेल्यावर्षी घेण्यात आलेल्या जनगणना आणि जातिनिहाय जनगणनेच्या आकड्यांमध्ये तफावत समोर आली असून, पुण्यात तब्बल पावणेसात लाख नागरिक घटले आहेत. हा फरक पडण्याच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असून, शहरातील सुमारे दोन लाख कुटुंबांची पालिकेला पुन्हा तपासणी करावी लागणार आहे.

आश्रमशाळेतील विषबाधेचे गूढ

$
0
0
कोळवाडी येथील आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांचा विषबाधेने मृत्यू झाल्यानंतर ही घटना नेमकी कशी घडली, नेमकी कशातून विषबाधा झाली असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत.

पुणे स्फोटासाठी नांदेडचा दारूगोळा

$
0
0
जंगली महाराज रोडवर साखळी बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आलेले बॉल-बेअरिंगसह इतर साहित्य नांदेड येथून खरेदी केल्याचे ‘एटीएस’च्या तपासात समोर आले आहे. आरोपींनी जिलेटीनच्या कांड्या फोडून त्याची भुकटी स्फोटासाठी वापरली होती, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

तीन लाखाची विदेशी दारू जप्त

$
0
0
महागडी विदेशी दारू कारममधून घेऊन जाणाऱ्या दोघांना कोरेगाव पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीची दारू जप्त केली आहे. वाडिया कॉलेजजवळ शनिवारी सापळा रचून ही कारवाई केली.

संकल्प : एक ‘सोडणे’

$
0
0
नवीन वर्षानिमित्त अनेकजण संकल्प सोडतात. हे संकल्प सर्वाधिक कॉमनच असतात. मात्र, या संकल्पांवर सहज नजर टाकली, तरी यातला कुठलाच संकल्प जीवघेणा नाही किंवा जीवनावश्यकही नाही. तरीही, माणसे वर्षानुवर्षं हे संकल्प करत असतात. याचे एकमेव कारण म्हणजे, त्याला आयुष्यात काही तरी बदल हवा असतो.

सवाल पुरुषी मानसिकतेचा

$
0
0
यंदाचे वर्ष महिलांसाठी काळे वर्ष ठरले. दिल्लीतली घटना तर समाजमनाला हादरा देणारी आहे. महिलांवर होणा-या अत्याचारांच्या घटनांमुळे समजात संताप होताच. दिल्लीतल्या घटनेमुळे या संतापाचा उद्रेक झाला. हा उद्रेक केवळ दिल्लीतल्या एका घटनेबाबत नाही तर अत्याचाराच्या घटनांचे समर्थन करण्यासाठी महिलांच्या तोकड्या कपड्यांचे कारण पुढे करणा-या पुरुषी मानसिकतेबद्दल आहे.

वाढीव बिलांचे शॉक

$
0
0
संपूर्ण राज्याला लोडशेडिंगमधून मुक्त करण्याच्या महत्त्वाकांक्षी घोषणेचा या वर्षाअखेरचा मुहूर्त यंदा चुकला असला, तरी जवळपास ८१ टक्के भाग हा लोडशेडिंगमधून मुक्त झाल्याचा दावा महावितरणच्या वतीने करण्यात आला. एकीकडे वीज क्षेत्रात सुधारणांचे वारे वाहत असताना दुसरीकडे दिवसेंदिवस सर्वसामान्यांना वीज महाग ठरू पाहत आहे.

अस्तित्वाच्या लढ्याचं यश

$
0
0
गर्भलिंग निदान आणि मुलींची कमी होणारी संख्या, याबाबत चर्चा सुरू झाली ती २००१मध्ये. १९९१च्या तुलनेत २००१मध्ये मुलींचं प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याचं समोर आलं आणि राज्याचा पुरोगामी विचारसरणीचा अभिमान कोलमडला. २०११च्या जनगणनेत तर अधिक भयावह स्थिती समोर आली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images