Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बहुमजली वाहनतळाचा हत्ती पालिका पोसणार का?

0
0
जंगली महाराज रोडवर संभाजी बागेच्या जागेत चारचाकीसाठी उभारण्यात आलेले बहुमजली पार्किंग ‘बडा घर पोकळ वासा’च ठरणार, अशी चिन्हे आहेत. या पार्किंगमध्ये येणाऱ्या चारचाकी वाहनांच्या अपुऱ्या संख्येमुळे केवळ ‘मेन्टेनन्स’साठी पाच वर्षांत पालिकेला ६७ लाख रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे.

नूमवीय १९६० चे शनिवारी संमेलन

0
0
‘नूमवीय १९६०’ या नूतन मराठी विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे वार्षिक स्नेहसंमेलन येत्या शनिवारी (२९ डिसेंबर) होणार आहे. सारसबाग येथील आनंद मंगल कार्यालयात सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे

कुस्ती स्पर्धेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली

0
0
महापालिकेची आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली असताना सत्तेत भागीदार असलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर बाहू सरसावून उभे ठाकले आहेत.

वन विभागाची वीस हजार रोपे संकटात

0
0
पुण्यातील वनक्षेत्र अधिक घनदाट करण्यासाठी वन विभागातर्फे मोट्या प्रमाणात वृक्षारोपणाचे उपक्रम राबविण्यात येत असले, तरी लावलेल्या रोपांना पाणी घालायला मात्र वनाधिकाऱ्यांकडे पैसे नाहीत.

‘माझा भाऊ निर्दोष आहे... ’

0
0
‘दिल्ली पोलिसांनी जंगली महाराज स्फोट प्रकरणी माझ्या भावाकडे चार वेळा चौकशी केली होती. त्याचा जबाबही नोंदविला होता. एकीकडे दिल्ली पोलिसांनी त्याला ‘क्लीन चिट’ दिली असताना दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मात्र त्याला अटक केली आहे.

अपहरण केल्याप्रकरणी दोघांना जन्मठेप

0
0
एका साडेपाच वर्षीय मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी दोघांना जन्मठेप आणि प्रत्येकी ११ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आणखी दोघांना तीन वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

‘ब्रेन डेड’ पेशंट घोषित करण्याचा मार्ग मोकळा

0
0
अतिदक्षता विभाग (आयसीयू), ऑपरेशन थिएटरची सुविधा असणाऱ्या सरकारी हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटल यांनी राज्याच्या खात्याकडे ‘नॉन ट्रान्स्प्लांट ऑर्गन रिट्रायव्हल सेंटर’साठी (एनटीओआरसी) ३८ प्रस्ताव पाठविले आहेत.

अटकेनंतर चौकशीचे सत्र

0
0
साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी तिघा संशयितांची कोठडी घेतल्यानंतर ‘एटीएस’चे फारुक बागवानच्या घरी चौकशीचे सत्र अवलंबिवले. ‘एटीएस’च्या सहायक आयुक्तांसह चार अधिकाऱ्यांनी चौकशी केली असून, आजूबाजूच्या रहिवाशांचीही माहिती घेण्यात आली आहे.

विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

0
0
माळशेज घाट परिसरातील कोळवाडीमधील अनुदानित आश्रमशाळेतील विषबाधा झालेल्या दोघा विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान पुण्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.

नामदेव ढसाळ यांना पालिकेचे पुरस्कार

0
0
पुणे महानगरपालिकेतर्फे यंदा प्रथमच देण्यात येणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार साहित्यिक नामदेव ढसाळ यांना जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांना पं. भीमसेन जोशी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

पुण्यात हुडहुडी; पारा ७.४ अंशांवर

0
0
राज्यभरात थंडीचा कडाका वाढला असून, शहरात यंदाच्या हंगामातील नीचांकी ७.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद गुरुवारी झाली. नगरमध्ये पारा ५.९ अंशांपर्यंत घसरला आहे. पुढच्या दोन दिवसांत थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

अबब ! सव्वा कोटींचा सोन्याचा शर्ट

0
0
रांका ज्वेलर्सने भोसरी येथील दत्ता फुगे यांच्या मागणीनुसार सुमारे एक कोटी २७ लाख रुपये किमतीचा सोन्याचा शर्ट तयार केला आहे. जगातील या सर्वात महाग शर्टची निर्मिती केल्याचा दावा तेजपाल रांका यांनी केला आहे.

एक्स्प्रेस वेवरील फोनला कॅमेऱ्याची जोड

0
0
प्रवाशांना अडचण आल्यास मदत मिळावी, म्हणून ‘एक्स्प्रेस वे’वर बसवण्यात आलेली इमर्जन्सी टेलिफोन सिस्टीम अद्ययावत करण्यात येणार आहे. नव्या यंत्रणेमध्ये या सिस्टीमला कॅमेऱ्याची जोड असणारी व्हिडिओ सिस्टीम राहणार आहे.

पुणे बॉम्बस्फोट: आणखी तिघांना अटक

0
0
पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात पुणे दहशतवाद विरोधी पथकाला यश आले आहे. यापूर्वी यासंदर्भात चौघांना अटक करुन आली असू,न त्यांच्या चौकशीत या तिघांची नावे कळली.

निवृत्तीच्या दिवशी टाटा रमले कामगारांत...

0
0
असंख्य कुटुंबीयांचे अन्नदाते, टाटा समूहाचे भाग्यविधाते आणि भारतीय उद्यमशीलतेचे कर्ते रतन टाटा यांनी टाटा समूहातील आपल्या निवृत्तीचा दिवस मुंबईतील ‘बॉम्बे हाउस’मध्ये नव्हे, तर ‘टाटा मोटर्स’च्या पिंपरी प्रकल्पातील कामगारांसोबत घालविला. याच कामगारांसोबत त्यांनी आपला पंचाहत्तरावा वाढदिवस साध्यापणाने; पण अत्युच्च समाधानाने साजरा केला.

हवाई नाट्यातून खडसे, मठकरी बचावले

0
0
विमानातून अचानक यायला लागलेला धूर..., जमिनीपासून वीस हजार फूट उंचीवर असल्याने उदभवलेला धोका..., वैमानिकाचे प्रसंगावधान..., अन् अखेर अर्ध्या तासानंतर धडधडणा-या श्वासांनी टाकलेला सुटकेचा निःश्वास....!

टाटा समूहाच्या योगदानावर संशोधन

0
0
‘भारतीय अर्थव्यवस्थेत टाटा उद्योगसमूहाचे योगदान काय?’ ...रतन टाटांच्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नाची सध्या माध्यमांत विविधांगांनी चर्चा होत आहे. खुद्द टाटा समूहसुद्धा याचे विश्लेषणात्मक उत्तर शोधण्यासाठी प्रयत्नशील असून, या कामात त्यांना मदत करताहेत पुण्याच्या ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स’मधील संशोधक!

विद्यार्थी, गर्भवती महिलांना तूर्त ‘आधार’

0
0
केंद्र सरकारने थेट अनुदान देण्यासाठी निश्चित केलेल्या ३५ योजनांपैकी गर्भवतींसाठी जननी सुरक्षा योजना, विद्यार्थ्यांच्या पदवी व पदव्युत्तर शिष्यवृत्तीसारख्या फक्त अकरा योजनांचाच लाभ ‘आधार कार्डा’वर मिळणार आहे.

जखमी हरणाला धायरीत जीवदान

0
0
धायरी गावाजवळ जखमी अवस्थेत सापडलेल्या हरणाला राष्ट्रसेवा समूहाच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ मदत केल्यामुळे हरणाचे प्राण वाचविण्यास यश आले आहे. धायरी गावाजवळील आंबाई द-यातील धनगर वस्तीत गुरुवारी सकाळी एका झुडपात हरिण जखमी अवस्थेत पडले होते.

‘CBSE’च्या अभ्यासक्रमात योगशिक्षणाचा समावेश

0
0
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०१३-१४) योग शिक्षणाच्या अभ्यासक्रमाचा समावेश होणार आहे. लोणावळ्यातील कैवल्यधाम या संस्थेच्या सहकार्याने याचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.कैवल्यधाम येथे आयोजित सातव्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन योगा अँड यूथमध्ये याबाबत गुरुवारी घोषणा करण्यात आली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images