Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

लेनची शिस्त कधी पाळणार?

$
0
0
बेदरकारपणे चालविल्या जाणा-या वाहनांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मृत्यूचे प्रवेशद्वार ठरत असूनही रस्ते विकास महामंडळाने सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. ‘एक्स्प्रेस वे’वरील अपघातांच्या १८ ‘ब्लॅक स्पॉट’कडे महामंडळाचे दुर्लक्षच होत आहे.

तीर्थक्षेत्र विकासाचे प्रकल्प १ वर्षात पूर्ण होणार

$
0
0
राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी निधी मंजूर असल्याने एक वर्षाच्या कालबद्ध कार्यक्रमात सर्व विकास प्रकल्प पूर्ण केले जातील, अशी ग्वाही राज्य सरकारतर्फे देण्यात आली आहे. विधिमंडळात विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मोळक यांनी एका वर्षात विकासकामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असल्याचे आमदार जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ज्योतिकुमारी, जर्मन बेकरी आणि सागर सहानी...

$
0
0
शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी कधी चढू नये असे म्हणतात. मात्र, कधी ना कधी शहाण्या माणसाला कोर्टाची पायरी चढावी लागते. आपल्या आयुष्यातील दैनंदिन जीवनातील काही कामांच्या निमित्ताने का होईना कोर्टात जावे लागतेच. कधी स्वतःसाठी तर कधी इतरांना मदत करण्यासाठी जावे लागते.

नव्या गावांच्या विकासात राज्य सरकारचा पुढाकार

$
0
0
पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट केल्या जाणा-या २८ गावांतील तीन वर्षांच्या विकासाची जबाबदारी राज्य सरकार उचलणार आहे. तसेच, शहरात या गावांचा समावेश होणारच, असे स्पष्टीकरणही सरकारतर्फे विधिमंडळात देण्यात आले.

खेड तालुक्यात बेकायदा वाळू उपसा

$
0
0
खेड तालुक्यात भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा वाळू उपसा सुरू असून, या वाळू तस्करांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने बिनदिक्कत ही चोरी होत आहे.

महिला सुरक्षा कायद्यासाठी ‘अंनिस’कडून प्रस्ताव

$
0
0
स्त्री अत्याचारविरोधी कठोर कायदा करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठविण्यात आला असल्याचे समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

आरोपींना कडक शिक्षा व्हावी

$
0
0
दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा ‘स्वाधार’ संस्थेने निषेध केला आहे. या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना जामीन मिळून देता, त्यांच्यावर जलदगती न्यायालयाच्या माध्यमातून कडक शासन करण्याची मागणी ‘स्वाधार’तर्फे करण्यात आली आहे.

महिला आयटी कर्मचा-यांची बससेवा लालफितीत

$
0
0
आयटी क्षेत्रातील महिला कर्मचा-यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘आयटी’ कंपन्यांनी पुरेसे प्रयत्न केले असले तरी पुणे महापालिकेतर्फे सुरू होणारी पीएमपीएमएल सेवा लालफितीतच अडकली आहे.

पुण्यात महिला सुरक्षित

$
0
0
देशभर महिलांवर होणा-या अत्याचारांविषयी आणि महिलांच्या सामाजिक सुरक्षिततेविषयी सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याही परिस्थितीत पुण्यातील वातावरण मात्र महिलांसाठी देशातील इतर शहरांच्या तुलनेमध्ये अधिक सुरक्षित असल्याची भावना महिलावर्गाकडून व्यक्त केली जात आहे.

थकबाकी नसताना कनेक्शन कट

$
0
0
थकबाकीदार वीज ग्राहकांवर कारवाई करण्यासाठी महावितरणतर्फे हाती घेण्यात आलेल्या धडक मोहिमेअंतर्गत अतिउत्साहाचा फटका महापालिकेतील वरिष्ठ अधिका-यांनाही सहन करावा लागला. वेळेत वीज बिल भरूनही ‘डिफॉल्टर’ ठरविलेल्या या अधिका-यांना पुन्हा ‘कनेक्शन’ सुरू करण्यासाठी सुमारे चार तासांहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागली.

किमान तापमान सरासरीवरच

$
0
0
काही मोजक्या दिवसांचा अपवाद वगळता नोव्हेंबरसह डिसेंबरमध्येही शहराचे किमान तापमान सरासरीपेक्षा अधिकच असल्याने अद्याप थंडी जाणवत नसल्याची भावना पुणेकरांमध्ये पसरली आहे. किमान तापमानात अंशतः घट होण्याचे संकेत वेधशाळेने दिले असले, तरी १० अंशांखाली पारा घसरण्याची शक्यता महिन्याच्या उर्वरित दिवसांत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पीएमपी’साठी राबवा ‘ई-निविदा’ प्रक्रिया

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) निविदा प्रक्रियेत ठेकेदार संगनमत करीत असल्याचे समोर आल्याने ‘पीएमपी’साठीही ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी विनंती प्रशासनाने महापालिकेला केली आहे.

हिंसाचाराच्या समस्येवर एकात्मता व प्रेमानेच मात

$
0
0
‘तंत्रज्ञानामुळे माणसाच्या जीवनशैलीत खूप प्रगती झाली असली तरी हिंसाचार आणि गरिबांवर होणा-या अत्याचाराचे प्रमाण वेगाने वाढते आहे. चांगली वर्तणूक, एकात्मता आणि प्रेमानेच या सामाजिक समस्येवर मात करता येणार आहे,’ असे मत पुणे प्रांताचे बिशप थॉमस डाबरे यांनी व्यक्त केले.

बारावी प्रॅक्टिकलला बहिःस्थ पर्यवेक्षक नाही

$
0
0
बारावी विज्ञान विषयांच्या प्रॅक्टिकल परीक्षांना बहिःस्थ पर्यवेक्षक (एक्स्टर्नल एक्झामिनर) न नेमण्याच्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (एचएससी/एसएससी बोर्ड) निर्णयाबाबत शिक्षकांमध्ये नाराजी आहे. या निर्णयामुळे प्रॅक्टिकल परीक्षांचे गांभीर्यच नष्ट होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

‘थर्टी फर्स्ट’रात्री १ वाजेपर्यंतच

$
0
0
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पुण्यात आयोजित केल्या जाणाऱ्या ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्ट्यांना रात्री एक वाजेपर्यंतच परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे पार्ट्यांचा जल्लोषाला रात्री एकनंतर आवर घालावा लागणार आहे.मुंबईत थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांना पहाटे पाचपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

निवडणुकीला मारहाणीचे गालबोट

$
0
0
‘नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया’च्या राज्य संघटनेच्या अध्यक्षपदी क-हाडच्या शिवराज मोरे यांची बहुमताने निवड झाली असली, तरी या निवडणुकीला मारहाणीचे गालबोट लागले आहे.

पाषाण तलावात बुडून भावांचा मृत्यू

$
0
0
पाषाण तलावात बुडत असलेल्या छोट्या भावाला वाचविण्यासाठी मोठ्या भावाने शर्थीचा प्रयत्न केले. मात्र, नियतीपुढे त्यालाही हार मानावी लागली. भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघाही भावंडाना जलसमाधी मिळाली. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.

अडीच FSI चा बिल्डरकडून गैरफायदा

$
0
0
म्हाडा वसाहतींचे पुनर्विकसन करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने अडीच एफएसआय मंजूर केला असला, तरी अद्याप त्याची नियमावली जाहीर झालेली नाही. त्याचा गैरफायदा घेत बिल्डर लॉबी नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप पुणे म्हाडा महासंघातर्फे करण्यात आला आहे.

टुरिस्ट व्यावसायिक दाम्पत्याचा खून

$
0
0
वारजे येथील स्टर्लिंग अपार्टमेंटमध्ये टुरिस्ट व्यवसाय करणाऱ्या एका दापत्याचा गुरुवारी पहाटे धारदार हत्यारांनी वार करून निर्घृण खून करण्यात आला. या खुनाच्या मागे एका इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यासह तिघांचा हात असल्याचा संशय आहे. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. कमलाकर शंकर रंजेरी (वय ५५) आणि त्यांची पत्नी सिमला असे खून झालेल्या दांपत्याचे नाव आहे.

कुसुम देव यांचे निधन

$
0
0
स्वतंत्र भारतातील पहिल्या महिला पोलिस अधिकारी श्रीमती कुसुम देव यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>