Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कचरा केला, तर दंड आकारणार

0
0
पुणे रेल्वे स्टेशनवर अस्वच्छता करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याच्या मोहिमेला जानेवारी महिन्यापासून सुरुवात होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने स्टेशनवर अस्वच्छता करणा-यांकडून ५०० रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला या संदर्भातील अध्यादेश मिळाला आहे.

‘अपघातांना मानवी चुकाच कारणीभूत’

0
0
एक्स्प्रेस-वे वर होणा-या अपघातांपैकी सुमारे ७५ टक्के अपघात मानवी चुकांमुळे होतात. या ठिकाणची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्याची आवश्यकता आहे. एक्स्प्रेस-वे वरील समस्यांसंदर्भात पुणे महामार्ग पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ यांच्याशी केलेली ही बातचीत...

नागरी सुविधा... ऑनलाइन, ऑफलाइन!

0
0
सरकारी ऑफिसमधील कागद एका टेबलावरून दुस-या टेबलावर जाण्यासाठी ‘लक्ष्मी’चे दर्शन हे घडवावेच लागते. ‘सरकारी काम आणि वर्षानुवर्षे थांब’ अशी चर्चा नेहमीच सरकारी कार्यालयाच्या कारभाराबाबत होत असते.

हौशी छायाचित्रकारांची दादागिरी

0
0
सिंहगडावर पर्यटनासाठी जाणा-या पर्यटकांबरोबरच गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘बर्ड व्हॅली’मध्ये हौशी छायाचित्रकारांचीही संख्या वेगाने वाढत असून, सुट्ट्यांच्या दिवशी तर पक्षी संमेलन नव्हे, तर छायाचित्रकारांचे संमेलन पाहायला मिळते आहे. पाणवठ्यावर बसून पक्ष्यांच्या हालचालींवर निर्बंध आणणारे हे छायाचित्रकार सध्या पर्यटकांवर दादागिरी करीत आहेत.

लर्निंग लायसन्स नव्या वर्षातच

0
0
तीन आठवड्यापासून बंद असलेले ‘आरटीओ’तील लर्निंग लायसन्स विभाग सुरू करण्याचा मुहूर्त पुन्हा टळला. परिणामी, या लायसन्ससाठी नागरिकांना आठवडभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत लर्निंग लायसन्स विभाग बंद ठेवण्याचा निर्णय ‘आरटीओ’ने घेतला आहे.

नववर्षात कलावंतांचा ‘ट्रॅफिक सेन्स’चा संकल्प

0
0
प्रसिद्ध अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांच्या आकस्मिक अपघाती निधनामुळे हादरलेली नाट्य-चित्रसृष्टी नवीन वर्षात एक्स्प्रेस हायवेवरील ‘ट्रॅफिक सेन्स’ वाढविण्यासाठी एकत्र येणार आहे. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलात मराठी नाट्य-चित्र सृष्टीतील सर्व कलावंत-तंत्रज्ञ नववर्षदिनी त्यासाठीचा संकल्प करून कृती आराखडाही निश्चित करणार आहेत.

लेन तोडणा-यांवर कारवाई करा

0
0
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा नियमित सुरक्षा ऑडिट न झाल्याने अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. त्यामुळे हे ऑडिट करण्याबरोबरच लेन कटिंग करणा-या वाहनांवर कारवाई, दुभाजक इंडियन रोड काँग्रेसच्या निकषाप्रमाणे व वाहनांच्या स्पीडवर लक्ष ठेवण्यासाठी स्पीडगन ठेवण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.

आणि लेखणीतून प्रकटला निषेध

0
0
दिल्लीमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराविषयीच चीड व्यक्त करण्यासाठी पुणेकरांनी बुधवारी लेखणी उचलली अन् आपल्या भावना आणि विचार फलकावर मांडून त्यांचा जाहीर निषेध व्यक्त केला. संभाजी उद्यानाबाहेर लावण्यात आलेल्या लेखणी फलकावर अवघ्या काही वेळात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रतिक्रिया लिहिल्या.

कोथरूड येथे सोनसाखळी चोरी

0
0
पौड रोडवरील आनंदनगर येथे बुधवारी सकाळी पायी चाललेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील २२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ हिसकावण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी कुमुदिनी निलकंठ गोडबोले (वय ७८, रा. पौड रस्ता) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

‘बंद’मध्ये सहभाग नाही

0
0
केंद्र सरकारच्या जाचक अटींविरोधात एक जानेवारीपासून पुकारलेल्या बंदमध्ये अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक महासंघ सहभागी होणार नसल्याचे बुधवारी जाहीर करण्यात आले. मात्र, सरकारच्या धोरणांविरोधात आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिली.

एनआयव्हीवरील ताण होणार कमी

0
0
स्वाइन फ्लू, डेंगी, लेप्टो, चिकुनगुनिया, हिपेटायटिससारख्या रोगांचे निदान करण्यासाठी आता ‘राष्ट्रीय विषाणू संस्थे’वर (एनआयव्ही) अवलंबून राहावे लागणार नाही. पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, सिंधुदुर्ग, नागपूर, अमरावती या विभागीय सहा ठिकाणी स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्याचा आरोग्य खात्याने निर्णय घेतला आहे.

शिक्षण मंडळ बजेटचे सर्वाधिकार चांदेरेंना

0
0
महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या बजेटवर बुधवारी स्थायी समितीमध्ये चर्चा झाली; परंतु त्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार स्थायी समिती अध्यक्षांनाच सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘दोन आठवड्यांचे अधिवेशन ही विदर्भवासीयांची चेष्टा’

0
0
विदर्भाचा अनुशेष दूर करण्यासाठी नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान सहा आठवडे व्हायला हवे. अवघ्या दोन आठवड्यात अधिवेशन गुंडाळून सरकार विदर्भवासीयांची चेष्टा करत असल्याचा आरोप करत विदर्भवासीयांपासून पळ काढण्याचा हा प्रकार असल्याची टीका लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गिरीश बापट यांनी बुधवारी केली.

‘शिवनेरी’चे पडदे गायब

0
0
दिल्लीत बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे दरम्यान धावणा-या शिवनेरी व्होल्वो बसमधील पडदे काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे उन्हाचा चटका सहन करीत प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली. पडदे काढून टाकण्याची ही कारवाई मुंबईत करण्यात आली आहे.

अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन

0
0
दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ‌पुण्यात ३१ डिसेंबरला होणा-या पार्ट्यांवर पोलिस आणि महसूल विभागाने वॉच ठेवावा; तसे न झाल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुख आणि आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी दिला आहे.

मुलींनो, महिला पोलिसांसह कराटे शिका

0
0
दिल्ली येथील बलात्काराच्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी महिला पोलिसांसमवेत महाविद्यालयीन तरुणींना कराटे प्रशिक्षण देण्याचे ठरवले आहे. पोलिस मुख्यालयात जानेवारी महिन्यात हे प्रशिक्षण देण्यात येणार असून इच्छुक तरुणींनी आपले नावे नोंदवावीत, असे आवाहन पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी केले आहे.

संजय नांदेसह तिघांवर चार्जशीट दाखल

0
0
तळजाई पठार येथील चार मजली बेकायदा इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी माजी नगरसेवक संजय नांदेसह तिघांवर कोर्टात दोषारोपपत्र (चार्जशीट ) दाखल करण्यात आले आहे.सहकारनगर पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. पी. जैन देसरडा कोर्टात नुकतेच चार्जशीट दाखल केले आहे.

सातारा रस्त्यावरील रिलायन्स मॉलला आग

0
0
पुणे- सातारा रोडवरील रिलायन्स मॉलमध्ये बुधवारी रात्री आग लागली. सातारा रोडवरील साईबाबा मंदिराच्या जवळ असलेल्या या मॉलच्या सहाव्या मजल्यावर ही आग लागली.

दोन विद्यार्थ्यांचा विषबाधेने मृत्यू

0
0
माळशेज घाट परिसरातील कोळवाडीमधील अनुदानित आश्रमशाळेत आठवीत शिकणा-या दोन विद्यार्थ्यांचा अन्नातून विषबाधा झाल्याने मृत्यू झाला, तर दोन विद्यार्थी अत्यवस्थ आहेत. या विद्यार्थ्यांना फरसाणमधून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मशिनमध्ये अडकून दोन कामगारांचा मृत्यू

0
0
भोर तालुक्यातील राजगड सहकारी साखर कारखान्याच्या बगॅस विभागातील इलेव्हेंटर मशिनमध्ये अडकून दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर कारखान्यातील सर्व काम तात्काळ बंद करण्यात आले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images