Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

रसिकांसह हळहळली सिने-नाट्यसृष्टी

0
0
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर रविवारी रात्री झालेल्या अपघातात चित्रपट आणि नाट्य अभिनेते आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे यांच्यासह पेंडसे यांचा दोन वर्षांचा मुलगा प्रत्युष यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर पुण्यात सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार झाले. मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील विविध कलाकारांसह रसिकांनी या दोन कलावंतांना साश्रू निरोप दिला.

माझी 'एक्झिट' साहेबांनी घेतली...

0
0
कार चालवणे हे माझे काम होते... साहेबांना मी म्हणालो होती की मी कार चालवतो... पण साहेबांनी काही ऐकले नाही... वेळ माझ्यावरच आली होती... माझी 'एक्झिट' साहेबांनी घेतली. डिव्हायडर ओलांडून आलेल्या टेम्पोने धडक दिली आणि... आनंद अभ्यंकर यांचे कारचालक सुरेश पाटील यांना हुंदके अनावर झाले.

पेन्शनर्सचे राष्ट्रीय अधिवेशन

0
0
महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अधिवेशन येत्या ३० व ३१ डिसेंबर रोजी बार्शी येथे होणार आहे. यामध्ये राज्य शासनाच्या सर्व पेन्शनरांना केंद्र सरकारच्या पेन्शनरांप्रमाणेच सर्व लाभ मिळावेत, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांविषयी चर्चा होणार आहे.

ज्येष्ठ महिलेला मारहाण

0
0
हडपसर गावातील तुपेआळी येथे राहणा-या ८० वर्षीय ज्येष्ठ महिलेला मारहाण करून त्यांच्याकडील सुमारे एक लाख रुपयांचे दागिने हिसकावून नेल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी घडला. हडपसर पोलिसांनी दोघा आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुस्ती स्पर्धेत राजकीय खडाखडी

0
0
महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या आखाड्यात आता महापालिकेतील दोन्ही काँग्रेसमध्ये खडाखडी सुरू झाली आहे. या कुस्तीस्पर्धेच्या आयोजनात राष्ट्रवादीकडून आपल्याला विश्वासात घेण्यात येत नसून, आता पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्याला मान्यता देऊ नये, अशी भूमिका काँग्रेसजनांनी घेतली आहे.

आळंदीच्या लॉजमध्ये हत्या!

0
0
आळंदीजवळील लॉजमध्ये अनैतिक संबंधातून मेव्हणीचा गळा दाबून खून करून आत्महत्या केल्याचा गुन्हा विश्रांतवाडी येथे दाखल करण्यात आला आहे. पोस्ट मार्टेमच्या अहवालात महिलेचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे ढगाळले; नागपूर गारठले

0
0
ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला शहर आणि परिसरातील थंडीही सुट्टीवर गेली असून, सोमवारी १४ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद वेधशाळेत झाली. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पारा वाढला असला, तरी विदर्भ थंडीने गारठला आहे. राज्यातील नीचांकी ६.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद नागपूर येथे झाली.

सातजणांना दहा वर्षे सक्तमजुरी

0
0
पैसे मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकाला मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी सातजणांना दहा वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी हा निकाल दिला.

‘डी. वाय. पाटील जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर

0
0
राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण, फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्यासह विविध क्षेत्रांमधील चार कर्तृत्ववान व्यक्तींना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीतर्फे देण्यात येणारा यंदाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

दापोलीतील अपघातात कॉलेजचे विद्यार्थी जखमी

0
0
दापोलीच्या (जि. रत्नागिरी) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील चार विद्यार्थी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापकासह खासगी स्विफ्ट गाडीतून येताना सोमवारी रात्री झालेल्या अपघातात विद्यार्थी गंभीर जखमी झाले. संबंधित व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवत असल्याने आसूद गावाजवळ नियंत्रण सुटून अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

खुनाच्या बदल्यासाठी तरुणावर कोयत्याने वार

0
0
मित्राच्या खुनाचा वचपा काढण्यासाठी तरुणावर कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून दोघा तरुणांना कोंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी रात्री साडेअकरा वाजता कोंढव्यात ही घटना घडली.

लवळे खून ; आणखी एकाला अटक

0
0
मुळशी तालुक्यातील लवळे येथे जमीनवाटपाच्या कारणावरून एका तरुणाचा कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणी आणखी एकाला पौड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पौड पोलिस स्टेशनमध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी दोघांना अटक करण्यात आली आहे.

निवृत्त कर्नलच्या कोठडीत वाढ

0
0
इच्छेविरूद्ध झालेल्या लग्नाचा राग मनात ठेवून पत्नीला बेदम मारहाण करून तिचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या निवृत्त कर्नलच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्याला ३१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला.

आता डायरी नव्हे; टेबल कॅलेंडर...

0
0
नवीन वर्षाची भेट म्हणून वेगवेगळ्या प्रकरातील आकर्षक डाय-या ‘कार्पोरेट गिफ्ट’ म्हणून देण्याची वर्षानुवर्षांची परंपरा आता टेबल कॅलेंडरनी मोडून काढली आहे. डायरीऐवजी ‘थिम बेस्ड’ टेबल कॅलेंडरचा जमाना आला असून कॉर्पोरेट कल्चरमध्येही सध्या त्याचीच चलती आहे.

बजेट वाढले त्यात चूक ती काय?

0
0
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे बजेट ४२ कोटीवरून १४२ कोटी रुपयांवर गेले आहे. ते आता १०० कोटी वाढले, त्यात आमची काय चूक आहे. तांत्रिक बाजू आम्ही पाहत नाही अभियंत्यांचे ते काम असते, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

वाहतूक समस्या सोडविण्यासाठी एकत्रित काम करणे आवश्यक

0
0
वाहतुकीच्या संदर्भातील कामाच्या व्यवस्थापनामध्ये समन्वय आणल्यास वाहतूक समस्या सोडविण्यास मदत होईल, असे मत सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले.

आरटीओ एजंटचा गोळीबारात मृत्यू

0
0
अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका आरटीओ एजंटचा मृत्यू झाला. ही घटना पिंपरी- चिंचवडच्या चिखली भागात सोमवारी (२४ डिसेंबर) रात्री घडली. बाळासाहेब मिसाळ (वय ४२) असे मृत्युमुखी पडलेल्या एजंटचे नाव आहे.

लिपस्टिकबरोबर बाळगा मिरची पूड

0
0
नवी दिल्लीतील सामूहिक बलात्कार घटनेचा निषेध करीत शिवसेनेच्या महिला आघाडीने निगडी बसस्थानकाच्या परिसरात मंगळवारी (२५ डिसेंबर) महिलांना स्वसंरक्षणासाठी मिरची पूडचे वाटप केले.

‘हिंदू जनजागृती’चा राजगडावर पहारा

0
0
नववर्षाच्या पूर्वसंध्येला ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर जाणा-या मंडळींकडून कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, म्हणून हिंदू जनजागृती समिती आणि अभिनव निर्माण संघटनेचे स्वयंसेवक ३० आणि ३१ डिसेंबर रोजी राजगडावर पहारा देणार आहेत.

समुद्रतळातील जीवसृष्टी ‘अॅक्वा लाइफ’मध्ये

0
0
समुद्राच्या तळात लपलेले अद‍्भूत निसर्ग सौंदर्य आणि तेथील जीवसृष्टीचे अंतरंग उलगडणारे ‘अॅक्वा लाइफ २०१२’ हे प्रदर्शन गणेश कला क्रीडा मंच येथे भरविण्यात आले आहे. लौकिक क्रिएशनतर्फे आयोजित या प्रदर्शनामध्ये तीनशेहून जास्त माशांच्या प्रजाती, शंभरपेक्षा जास्त एक्झॉटिक प्लांटस्बरोबरच अंडरवॉटर फोटोग्राफी प्रदर्शनाचाही समावेश करण्यात आला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images