Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

जोते तपासणी आता 'टीपी' करणार

$
0
0
शहर हद्दीबाहेरील बांधकामांच्या जोते तपासणीचे (प्लिंथ चेंकींग) काम आता नगर रचना विभागाकडे (टाउन प्लॅनिंग) सोपविण्यात आले आहे. महसूल विभागामार्फत केले जाणारे हे काम टाउन प्लॅनिंगकडे गेल्यामुळे या प्रक्रियेतील विलंब टळणार आहे.

'ड्रील मशिन' खरेदीत भ्रष्टाचार

$
0
0
राज्यातील मोठ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये होणा-या हाडांच्या ऑपरेशनसाठीच्या उपकरणांचा बाजारातील किमतीच्या आठपट, अर्थात प्रत्येकी सव्वासहा लाख रुपये मोजून खरेदी केल्याचा आरोग्य खात्यातील कारभार उघडकीस आला आहे.

'ट्रॅफिक पार्लमेंट'चा उतारा

$
0
0
पुण्याच्या वाहतूक समस्येवर उपाय योजण्यासाठी केवळ सरकार, प्रशासन यांच्यावर अवलंबून न राहता समाजाने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे या हेतून ‘ट्रॅफिक पार्लमेंट’चे आयोजन पुण्यात होणार आहे. कॉलेजमधील विद्यार्थी, वाहतूक तज्ज्ञ, पोलीस आणि नागरिक यावर आपली मते मांडणार आहेत. हा कार्यक्रम २२ डिसेंबर रोजी ऑटो या प्रदर्शनात दुपारी अडीच वाजता होणार आहे.

परीक्षा कर्मचा-यांवर गुन्हा

$
0
0
परीक्षा विभागातील गैरप्रकाराचे प्रकरण आता पुणे विद्यापीठाचा कॅम्पस ओलांडून पुणे पोलिसांच्या हद्दीत गेले आहे. परीक्षा गैरप्रकारप्रकरणी अखेर विद्यापीठाने केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी तीन कर्मचा-यांवर गुन्हा दाखल केला आहे. बनावट दस्ताऐवज तयार करणे, फसवणूक करणे आदी कलमांखाली चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली.

येरवड्याच्या सुरक्षिततेसाठी निधी

$
0
0
अजमल कसाबला फासावर लटकाविण्यात आलेल्या येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या डागडुजीसाठी तसेच सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यासाठी सात कोटी २० लाख रुपयांची तरतूद राज्य सरकारने केली आहे.

मेट्रो मार्गाला ग्रीन सिग्नल

$
0
0
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रोमार्गाला पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी देताना, हा मार्ग कात्रजपर्यंत वाढवण्याची उपसूचनाही मान्य केली आहे. त्यामुळे आता पिंपरी-चिंचवड ते कात्रजपर्यंत मेट्रो होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या मार्गासाठी दोन्ही महापालिकांना प्रत्येकी दहा टक्के खर्च करावा लागणार आहे.

बादलीत बूडून बालकाचा अंत

$
0
0
खेळता-खेळता पाण्याने भरलेल्या बादलीत पडल्यामुळे गुदमरून एक वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्दैवी अंत झाला. रहाटणीमध्ये सोमवारी (१७ डिसेंबर) दुपारी ही दुर्घटना घडली.

इमारतीचा स्लॅब कोसळून चार ठार

$
0
0
पुण्यातील वाघोली परिसरातील आयुर्वेदिक महाविद्यालयाजवळ बांधकाम सुरु असणा-या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने चार मजूर ठार झाले आहेत. या अपघातामध्ये १० ते १५ जण ढिगा-याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे.

स्लॅब दुर्घटनेतील मृतांची संख्या १३

$
0
0
वाघोली येथील आयुर्वेद कॉलेजच्या प्रांगणात बांधकाम सुरू असलेल्या हॉस्पिटलचा स्लॅब मंगळवारी दुपारी कोसळून १३ मजुरांसह एक इंजिनीअर ठार झाला. दुर्दैवाने या ढिगाऱ्याखालून एकालाही जिवंत बाहेर काढण्यात यंत्रणांना यश आले नाही. या अपघाताने कन्स्ट्रक्शन साइटवरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

प्रियकाराच्या आईचा खून; प्रेयसीला जन्मठेप

$
0
0
प्रियकराच्या आईचा खून केल्याप्रकरणी एका महिलेला जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी हा निकाल दिला.याप्रकरणी दीपी महेंद्रसिंग दोग्रा (वय - ४८, रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) हिला शिक्षा सुनावण्यात आली आहे. अॅलेस अन्वर मसिह (५६) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

किरकोळ कारणावरून भावा-भावांना पेटविले

$
0
0
रात्री घडला. पेटवून दिलेल्या भावाला वाचविण्यास गेलेला दुसरा भाऊही वीस टक्के भाजला असून दोघांवर उपचार सुरू आहेत.

चक्रव्यूह सरकारी मोहिमांचा जातपडताळणी ‘रजे’वर

$
0
0
जातपडताळणी समितीच्या तीन सदस्यांपैकी दोन सदस्य महिनाभरापासून अचानकपणे रजेवर गेले आहेत. यामुळे पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे काम ठप्प झाले असून पडताळणी समितीकडे तब्बल २३ हजार १७२ प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत. अॅडमिशन टिकविण्यासाठी पडताळणीचे सर्टीफिकेट आवश्यक असल्याने हे सटीर्फिकेट मिळविण्यासाठी समितीच्या कार्यालयात कॉलेजच्या विद्यार्थ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत.

मृतदेह काढण्यासाठी प्रयत्नांची शर्थ

$
0
0
सकाळी नऊ वाजता सुरू झालेला डोमचा स्लॅब दुपारी अडीच वाजता तळमजल्यावरच कोसळलाही. स्लॅबखाली एक दोघे मजूर अडकल्याचा अंदाज खोटा ठरला अन सिमेंटमिश्रित वाळू, सळई, लोखंडी पाइपच्या ढिगा-याखाली अक्षरश: मृतदेहांचा ढीगच दिसून होता.

‘एम्प्लॉएबिलिटी वाढविणा-या नव्या अभ्यासक्रमांना मान्यता

$
0
0
उच्चशिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगारक्षम युवा पिढी घडविण्याच्या उद्देशाने विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये विविध शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्यास पुणे विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने मान्यता दिली.

वाघोलीत स्लॅब कोसळून १३ ठार

$
0
0
वाघोली येथील आयुर्वेद कॉलेजच्या प्रांगणात सुरू असलेल्या पंचकर्म हॉस्पिटलच्या बांधकामाची चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून मंगळवारी दुपारी १३ जण ठार झाले. मृतांमध्ये १२ मजुरांसह एका इंजिनीअरचाही समावेश आहे. तळजाई येथील इमारत कोसळून ११ जण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच हे बांधकाम कोसळल्याने कन्स्ट्रक्शन साइटवरील सुरक्षा आणि प्रभावी बचावकार्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

‘डीडी’मुळे थांबला नंबर वाटपाचा गोंधळ

$
0
0
दुचाकीच्या चॉईस नंबरसाठी आता डिमांड ड्राफ्ट (डीडी) स्वीकारण्याच्या योजनेला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे नंबर मिळविण्यासाठी होणारा गोंधळ थांबला असून, त्यामुळे नंबर वाटपाची प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत झाली आहे. थेट येणा-या नागरिकांना यापुढे नंबर मिळणार नसल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) स्पष्ट केले आहे.

निधीबाबत पालिकेची ‘बोलाचीच कढी’

$
0
0
देदीप्यमान परंपरा असलेल्या अनेक संस्था पुण्यात असून, त्यांना मदत करण्यासाठी महापालिका निधी देण्याचे मान्य करते; पण प्रत्यक्षात निधी देत नसल्याचे मंगळवारी उघड झाले.

... आणि सारेच कोसळले

$
0
0
स्लॅब कोसळून जखमी झालेल्या एका पेशंटला चंदननगर येथील रक्षक हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. लोबाक कोलेशा (वय २५) असे जखमी मजुराचे नाव आहे. ‘चौथ्या मजल्यावर डोमची स्लॅब टाकण्याचे काम दुपारी सुरू होते.

हतबल प्रशासन; ढिम्म सरकार

$
0
0
बांधकाम पडण्याची दुर्घटना घडल्यावर राडारोड्यामधून जखमींना बाहेर काढण्याची कोणतीही यंत्रणा जिल्हाधिकारी प्रशासनाकडे नाही. या यंत्रणेअभावी मदतकार्याला विलंब होत असल्याचे वाघोलीतील घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

पालिकेतील विषयतज्ज्ञांचा आत्मदहनाचा इशारा

$
0
0
पुणे महापालिकेच्या सर्व शिक्षा अभियानाचे प्रकल्प अधिकारी सुभाष स्वामी आणि सहायक कार्यक्रम अधिकारी शुभांगी नाईक यांच्या विरोधात सर्व कंत्राटी विषयतज्ज्ञांकडून मानसिक छळ आणि आर्थिक पिळवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. आपल्यावर होणा-या या अत्याचारांची दखल न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images