Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अन्न सुरक्षेला हत्तीचे बळ!

$
0
0
राज्यातील महानगर पालिका आणि नगरपालिकांच्या अखत्यारित कार्यरत असलेल्या ५९ पैकी ३२ अन्न सुरक्षा अधिका-यांनी (एफएसओ) राज्याच्या अन्न व औषध प्रशासनात (एफडीए) वर्ग होण्यास संमती दिली आहे. त्यामुळे सध्याच्या ‘एफएसओ’च्या संख्येत भर पडणार असल्याने एफडीएला कारवाई करण्यास हत्तीचे बळ येणार आहे.

जयंत नारळीकर यांना जीवनगौरव

$
0
0
महाराष्ट्र फाऊंडेशनचा साहित्य विभागाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर तर समाजकार्य विभागाचा पुरस्कार ठाकूरदास बंग यांना यांना जाहीर करण्यात आला आहे. जीवनगौरव पुरस्कार ५ जानेवारी २०१३ रोजी पुणे येथे प्रदान करण्यात येईल.

दुकान चॉपरच्या धाकाने लुटले

$
0
0
चॉपरच्या धाकाने बिबवेवाडी येथील दुकानदाराला लुटल्याची घटना सोमवारी रात्री उशीरा घडली. बिबवेवाडी पोलिसांना आरोपींबाबत माहिती मिळाली असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

विवाहितेची मुलीसह आत्महत्या

$
0
0
स्वयंपाक नीट करता येत नाही या कारणावरुन विवाहितेचा छळ करुन तिला तीन वर्षाच्या मुलीसह आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांनी पतीला अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता १९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यशश्री मारुलकर यांनी हा आदेश दिला.

एलबीटीला तीव्र विरोध

$
0
0
जकात रद्द झाला पाहिजे अशी मागणी होत असली तरी स्थानिक संस्था कर किंवा इतर कोणताही कर लागू करण्यास पुणे व्यापारी महासंघाने तीव्र विरोध दर्शविला आहे. वेळप्रसंगी त्याविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. महासंघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांच्य अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

'लखोबा'ला धाडले गजाआड

$
0
0
पहिले लग्न लपवून दुस-या लग्नाचा टिळाही लावणा-या ‘लखोबा लोखंडे’ला कोथरुड पोलिसांनी गजाआड केले. भावी पत्नीला आपल्या नवऱ्याची वस्तुस्थिती समजताच तिने बोहल्यावर चढण्यास काही तास बाकी असतानाच पोलिस स्टेशनचा रस्ता धरला.

विकासकामांसाठी १०८ कोटी

$
0
0
पुण्यात करण्यात येणारी भांडवली कामे आणि कर्मचा-यांना वेतन देण्यासाठी पडलेली निधीची कमतरता यामुळे वर्गीकरणाद्वारे १०८ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. आकर्षक योजना जाहीर करण्यासाठी समितीकडून महसुली खर्चाला लावण्यात आलेली कात्री आणि प्रशासनाचा बजेटचा अंदाज चुकल्याने ही वेळ महापालिकेवर आली आहे.

विक्रेत्यांना सफाईशुल्क

$
0
0
शहरात रस्त्यावर बसून व्यवसाय करणा-यांना दररोज ५० रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव मान्य झाला आहे. रस्ते आणि चौकांमध्ये बसून व्यवसाय करणा-यांना आतापर्यंत दहा रुपये कचरा निर्मूलन शुल्क द्यावे लागत होते. आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

मूल्यमापनाला ५० टक्के वेटेज?

$
0
0
पदवी अभ्यासक्रमांसाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून (२०१३-१४) अंतर्गत मूल्यमापनाला ५० टक्के वेटेज येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ‘चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टिम’ही लागू होईल.

अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ

$
0
0
आयआयटी प्रवेशासाठी आणि इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या अखिल भारतीय १५ टक्के कोट्यासाठी आवश्यक असलेल्या ‘जेईई-मेन’ या परीक्षेसाठी ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्याची मुदत २४ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. आधी ही मुदत १५ डिसेंबरपर्यंतच होती.

झुरमुरे यांना राज्य सरकारच्या सेवेत पुन्हा पाठवा

$
0
0
अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांच्या वादग्रस्त विधानावरून पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी प्रचंड गदारोळ झाला. अखेर सर्वपक्षीय सदस्यांनी ‘झुरमुरे यांना राज्य सरकारच्या सेवेत परत पाठविण्यात यावे,’ असा ठराव करून सभा तहकूब केली.

आंदोलन-निदर्शनांनी पालिका दणाणली

$
0
0
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा शहरातील विविध पक्ष-संघटनांनी आंदोलन-निदर्शने करून सोमवारी निषेध केला. दिवसभर सुरू असलेल्या या घटनांमुळे महापालिकेच्या परिसरात काहीसा तणाव निर्माण झाला होता.

फी वाढीच्या पाहणीच्या अहवाल सादर करा

$
0
0
शहरातील विना अनुदानित शाळांमधील फी वाढ व या शाळांमध्ये पालक शिक्षक संघाची स्थापना झाली आहे का, याची पाहणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश प्राथमिक शिक्षण संचालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

बाबासाहेबांच्या मराठी लेखनाचा अभ्यास होण्याची आवश्यकता

$
0
0
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठी भाषेवर प्रचंड प्रेम होते. म्हणूनच परदेशात शिकूनही त्यांनी मराठीत वृत्तपत्रे सुरू केली. त्यामुळे डॉ. आंबेडकर यांनी मराठीत केलेल्या लेखनाचाही अभ्यास होणे आवश्यक आहे,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांनी नुकतेच व्यक्त केले.

‘अ’ जीवनसत्वाच्या डोसची खरेदी करणार

$
0
0
पुढील वर्षी आवश्यक असलेल्या ‘अ’ जीवनसत्वाच्या साडेपाच लाख बाटल्यांची खरेदी प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करण्यात येईल. तसेच, पुरवठा झालेले सोळा जिल्हे वगळता उर्वरीत राज्यात या डोसचा पुरवठा डिसेंबर अखेर करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांनी दिली.

ऑनलाईन वीजबिल भरणा सुविधा जोरात

$
0
0
ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणने सुरू केलेल्या ऑनलाईन वीजबिल भरणा सुविधेला उत्स्फूर्त मिळत असून बारामती परिमंडळातील तब्बल दीड कोटी ग्राहकांनी या सुविधेचा वापर केला आहे. या सुविधेद्वारे महावितरणच्या खात्यात सोळा कोटीहून अधिक रक्कम जमा झाली आहे.

दबावाला न जुमानता निःपक्ष चौकशी करू

$
0
0
‘कथित सिंचन घोटाळ्याची चौकशी करताना कोणत्याही राजकीय, तसेच प्रशासकीय दबावाला न जुमानता नि:पक्षपाती चौकशी केली जाईल,’ असे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या विशेष चौकशी समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सेवा कमी; एजंटांचा सुळसुळाट फार

$
0
0
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नागरी सुविधा केंद्र शिवाजीनगर शासकीय गोदामात स्थलांतरीत झाल्यानंतरही एजंटांचा सुळसुळाट कमी होण्यापेक्षा उलट वाढलाच आहे. त्यामुळे कामानिमित्त येणा-या नागरिकांना एजंटांच्या नाहक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

सराफाला लुटणारी परप्रांतीय टोळी ताब्यात

$
0
0
गहाणवटीचा व्यवसाय करणा-या कासारवाडीतील सराफावर वार करून त्याच्याकडील सुमारे पाच लाख रूपयांचे दागिने चोरून नेलेल्या चोरट्यांना क्राइम ब्रांच युनिट तीनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. मात्र, या संदर्भात माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.

चोरी हा इंडस्ट्रीजचा कॅन्सर

$
0
0
चोरी हा इंडस्ट्रीजचा कॅन्सर आहे, भुरटे चोर श्रमिकांना लुबाडत आहेत, मशिनरी भंगारांच्या दुकानांमध्ये कवडीमोल किमतीत विकल्या जात आहेत, मंदीने धास्तावलेले उद्योग अधिकच चिंताग्रस्त आहेत, अशा व्यथा पिंपरी-चिंचवडमधील लघुउद्योजकांनी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्यासमोर सोमवारी (१७ डिसेंबर) मांडल्या.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images