Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

तत्कालीन पोलिस निरीक्षक दत्तात्रय टेमघरे दोषमुक्त

$
0
0
पोलिस कोठडीत सुर्यकांत उर्फ बंडू आंदेकरला मारहाण केल्याच्या प्रकरणी तत्त्कालीन पोलिस निरीक्षक दत्तात्रय टेमघरे यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपातून त्यांना दोषमुक्त करण्यात आले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. तावडे यांनी हा आदेश दिला.

सर्वपक्षीय नगरसेवकांची प्रशासनावर टीका

$
0
0
तळजाई पठार येथे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाला आणि जखमींना पुणे महापालिकेकडून २० लाख रुपये अर्थसाह्य देण्यास सर्वसाधारण सभेने मंगळवारी मंजुरी दिली. मात्र, या विषयाच्या निमित्ताने बेकायदा बांधकामांवरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर तोंडसुख घेतले.

बांधकाम साइटवरून पडून मजूर ठार

$
0
0
पाषाण-लिंक रोड येथे व्ही. ई. एन. सेंटर येथील तिस-या मजल्यावर प्लॅस्टरचे काम करताना पहाड तुटून अपघात झाला. गेल्या आ‍ठवड्यात झालेल्या या अपघातात एक मजूर ठार झाला, तर तिघेजण जखमी झाले आहेत. चतुशृंगी पोलिसांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.

विरोधासाठी विरोध करू नका

$
0
0
‘विरोधकांच्या मागणीवरूनच जलसंपदा खात्याच्या कारभाराबाबत विशेष तपास पथकाची (एसआयटी) ची स्थापना करण्यात आली आहे. आता त्या पथकातील व्यक्तींविषयी शंका उपस्थित करत विरोधकांनी विरोधासाठी विरोध करू नये,’ असे मत कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मंगळवारी व्यक्त केले.

उघड्यावर खाद्यपदार्थ विकणा-यांवर कारवाई

$
0
0
उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री करणारे विक्रेते आणि कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या विकणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिकेच्या कोंढवा-वानवडी क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने कारवाई करण्यात आली.

लाचखोर अधिकारी डॉ. महाजन पुन्हा सेवेत

$
0
0
लाचखोरीप्रकरणी अटक झालेले जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळ कायदा शाखेचे उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांना पुन्हा शासकीय सेवेत रुजू करून घेण्यात आले आहे. सांगलीमध्ये अकार्यकारी पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रदेश काँग्रेस झाले 'हायटेक'

$
0
0
‘महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसतर्फे संपूर्ण राज्यभरात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची यंत्रणा उभारली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून लवकरच मंत्र्यांचा जनता दरबार भरविण्यात येणार असून नागरिकांना आपल्या शहरातून थेट मंत्र्यांशी संपर्क साधता येणार आहे,’ अशी माहिती कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पत्रकारांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिली.

पेन्शनसाठी लढा उभारण्याचा बँक कर्मचा-यांचा निर्धार

$
0
0
देशभरातील हजारो निवृत्त बँक कर्मचा-यांना निवृत्तीवेतन योजनांमधील त्रुटींचा फटका बसत असून, या अन्यायाविरोधात लढण्याचा निर्धार ‘ऑल इंडिया बँक रिटायरिज फेडरेशन’ने केला आहे.

१४ लाखांच्या दागिन्यांची विक्री करून फसवणूक

$
0
0
विश्वासाने विक्रीसाठी दिलेल्या १४ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची परस्पर विक्री करून पैसे न देणा-या सराफाला खडक पोलिसांनी गजाआड केले. आपल्या सहकारी सराफाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइलला धोका सायबर हल्ल्याचा

$
0
0
देशातील इंटरनेट वापरणा-यांची संख्या १३.७ कोटी असून, दहा पैकी सात नेट यूजर मोबाइलच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करतात, तर सोशल मीडिया वापरणा-यांची संख्या सहा कोटी आहे. ही आकडेवारी कंपन्यांसाठी चांगली असली, तरी सायबर गुन्हेगारांना खुणावत आहे. २०१३ मध्ये मोबाइल आणि सोशल मीडियावर सायबर हल्ला होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बांधकामावरील १३ मजूर ठार

$
0
0
वाघोली येथील आयुर्वेद कॉलेजच्या प्रांगणात बांधकाम सुरू असलेल्या हॉस्पिटलचा स्लॅब मंगळवारी दुपारी कोसळून १३ मजुरांसह एक इंजिनीअर ठार झाला. दुर्दैवाने या ढिगा-याखालून एकालाही जिवंत बाहेर काढण्यात यंत्रणांना यश आले नाही. तळजाई येथील इमारत कोसळून ११ जण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच हे बांधकाम कोसळल्याने कन्स्ट्रक्शन साइटवरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

पोटचा गोळा गेला नि आता कुकूही!

$
0
0
दोनच वर्षापूर्वी अपघातात पोटचा गोळा गेला... आता तर, माझ्या कपाळाचे कुंकूही पुसले. लग्नाला आलेल्या पोरीसह आता कुठे जाऊ...माझ्या आयुष्याचा आधार गेला... ... विदर्भातील वाशीम जिल्ह्यातून मजुरीसाठी आलेल्या दादाराव चव्हाण यांची पत्नी शांताबाई हुंदके देत सांगत होत्या. नवऱ्याबरोबर मामाच्या जाण्याचे संकट त्यांच्यावर ओढवले आहे.

समाजकंटकांनी गाड्या जाळल्या

$
0
0
धनकवडी येथील त्रिमूर्ती चौक, मामा येनपुरेनगर येथे सोमवारी रात्री काही समाजकटकांनी वाहने पेटवून दिली. या आगीत तीन दुचाकी आणि एक रिक्षा भस्मसात झाली आहेत. ही आग कोणी आणि का लावली हे स्पष्ट न झाल्याने पोलिसांची डोकेदुखी अधिकच वाढली आहे. त्रिमुर्ती चौकात तळीरामांची होत असलेली गर्दी या आगीपाठीमागे असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

जुन्या विकास आराखड्यावरून वाद

$
0
0
राजकीय पक्षांचे नेते आणि नगरसेवकांमध्ये एकमत न झाल्यामुळे शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा मंगळवारी (१८ डिसेंबर) पुन्हा पुढे ढकलण्यात आला. आता नव्या वर्षात तरी या आराखड्याला मान्यतेचा मुहूर्त लागणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भरतीसाठी उत्तरपत्रिका वेबसाइटवर

$
0
0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांसाठी कनिष्ठ लिपिक भरतीसाठीची लेखी परीक्षा नुकतीच घेण्यात आली. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या संचनिहाय उत्तरपत्रिका मंडळाच्या www.msbshse.ac.in या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

स्लॅब कोसळल्याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नाही

$
0
0
वाघोली येथील पंचकर्म हॉस्पिटलचे बांधकाम पडून १३ मजुरांच्या मृत्युप्रकरणी अद्यापपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. या प्रकरणाची चौकशी संपल्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी दिली.

ताडीवाला रोड येथे युवकाचा खून

$
0
0
ताडीवाला रोड येथे भाईगिरीतून एका अल्पवयीन मुलाचा खून झाल्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला. या प्रकरणी तिघा आरोपींना बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. दीपक राजू घोडके (वय १७, रा. ताडीवाला रोड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी एका अल्पयवीन मुलासह राकेश माने आणि त्याच्या चार-पाच साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्वे रोडवर घेतला PMP बसने पेट

$
0
0
कर्वे रोडवर एमईएस कॉलेजसमोरील स्टॉपजवळ सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका पीएमपी बसने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून चालक-वाहकासह सर्व प्रवासी सुखरूपपणे बाहेर पडले. अन्यथा, मोठी दुर्घटना ओढवली असती.

महिलेने अधिका-याली कानफटवले

$
0
0
काही महिने काम रखडल्याने संतप्त झालेल्या महिलेने एका अधिका-याच्या श्रीमुखात लगावल्याचा प्रकार महापालिकेत घडल्याचे समजते. बुधवारी सायंकाळी महापालिकेच्या बांधकाम विभागात हा प्रकार घडल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

होर्डिंग धोरण न्यायप्रविष्ट

$
0
0
पुणे महापालिकेने आखलेल्या होर्डिंग धोरणाचा विषय न्यायप्रविष्ट आहे, असे उत्तर नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी विधान परिषदेत दिले. दरम्यान, या धोरणास राज्य सरकारने अजूनही मान्यता न दिल्याच्या मुद्यावरून शहरातील आमदारांनी बुधवारी राज्य सरकारचा निषेध केला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images