Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सांगलीत १ कोटीचे सर्पविष जप्त

$
0
0
सांगली पोलिसांनी विश्रामबाग परिसरातून सुमारे एक कोटी १२ लाख रुपये किमतीचे सापाचे एक लिटर विष जप्त केले. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी एक जण सांगलीचा तर एक जण चंदगड (जि. कोल्हापूर) येथील राहणारा आहे. हा तस्करीचा प्रकार असावा, असा पोलिसांचा संशय आहे.

‘इसॉन’चे काउंटडाउन सुरू..

$
0
0
‘इसॉन’ या धूमकेतूची तुलना १६८० मध्ये पाहिल्या गेलेल्या तेजस्वी ‘ग्रेट कॉमेट’शी केली जात आहे. पौर्णिमेच्या चंद्राएवढे तेज धारण केलेला हा धूमकेतू, तब्बल दोन महिने उत्तर गोलार्धातील आकाशात दिसणार आहे. तेजस्वितेमुळे हा धुमकेतू संधिप्रकाशातही स्पष्टपणे दिसणार आहे.

पुण्यातून पीएचडीसाठी १६१३ अर्ज

$
0
0
पुणे विद्यापीठामधून पीएचडी करण्यासाठी यंदा १६१३ विद्यार्थ्यांनी आपले अर्ज सादर केले आहेत. विद्यापीठाने या प्रवेशांसाठी नुकत्याच राबविलेल्या ऑनलाइन प्रक्रियेच्या माध्यमातून हे अर्ज विद्यापीठाकडे सादर झाले आहेत. येत्या जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत अंतिम प्रवेश निश्चित केला जाणरा आहे.

पुण्याबाहेर गेलात तर खबरदार....

$
0
0
जुन्या पुण्याचा विकास आराखडा (डीपी) सर्वसाधारण सभेत येत्या १८ डिसेंबर रोजी सादर केला जाणार असून, या वेळी कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने खबरदारी घेतली आहे. या दोन्ही पक्षांनी त्यांच्या नगरसेवकांसाठी व्हिप जारी करून कोणीही १८ आणि १९ डिसेंबरला पुण्याबाहेर न जाण्याचा आदेश दिला आहे.

राजगुरुनगर विमानतळाला विरोध

$
0
0
राजगुरुनगर येथील प्रस्तावित विमानतळाला पाइट, रौंधळवाडी, धामणे, कोये, आसखेड या पाच गावांनी विरोध केला असून तसा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे. या विमानतळामुळे बाराशे कुटुंबे विस्थापित होणार असल्याचा दावा विमानतळ हटाव कृती समितीने केला आहे.

पुरेशा पाण्यामुळे पुणेकरांना माज!

$
0
0
‘पाणी वापराबाबत पुणेकर माजले आहेत...,’ ‘पुणेकर दररोज ३९५ लिटर पाणी वापरतात...,’ पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांनी शनिवारी एका जाहीर कार्यक्रमात ही धक्कादायक विधाने केली आहेत.

खंडणी न दिल्याने हल्ला

$
0
0
येरवडा येथे खंडणी देण्यास नकार दिल्याने ‘लोकल दादा’ने एका छोट्या व्यावसायिकाच्या पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार केला. येरवडा पोलिसांनी या खंडणीखोराविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

वाहतुक पोलिसांना बक्षीस योजना

$
0
0
वाहतूक शाखेतील पोलिस अधिकारी आणि कर्मचा-यांसाठी ‘बेस्ट ऑफिसर आणि बेस्ट कर्मचारी ऑफ दि मंथ’ अशी बक्षीस योजना वाहतूक उपायुक्तांनी जाहीर केली आहे. नागरिकांशी सौजन्याने वागत वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांचा गौरव करण्यात येणार आहे.

काँग्रेसचे वचनपूर्तीचे राजकारण

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा, शेतक-यांच्या फायद्यासाठी एफडीआय आणि गोरगरीबांना थेट बँक खात्यात अनुदान अशा योजना लागू करून काँग्रेसने वचनपूर्तीचे राजकारण केले आहे, असे राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी सांगितले.

बिबवेवाडीत अतिक्रमणांवर कारवाई

$
0
0
बिबवेवाडी परिसरातील हॉटेल आणि दुकाने यांच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे ३५ हॉटेल व दुकानांचे सुमारे अकरा हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.

संलग्नीकरणाचा बोजा?

$
0
0
विद्यापीठांच्या प्रशासकीय अव्यवस्थेचा मुद्दा अलीकडच्या काळात ऐरणीवर आला आहे, तो कॉलेजांच्या संलग्नीकरण पद्धतीबाबत फेरविचार करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नेमलेल्या प्रा. त्यागराजन समितीमु‍ळे. या समितीच्या शिफारशींवर चर्चा करण्यासाठी पुण्यात झालेल्या परिसंवादात उपस्थित झालेल्या काही मुद्द्यांचा हा उहापोह.

म्हात्रे पुल एसटीला बंद

$
0
0
म्हात्रे पुलावरुन ये-जा करणा-या एसटी बसेसवर कारवाई करावी, अशा आशयाचे पत्र एसटीकडून वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहे. शहरातील रस्त्यांवरील ताण आणि एसटी बसमुळे अपघाताच्या धोक्यात होणारी वाढ लक्षात घेऊन ही कडक भूमिका स्वीकारण्यात आली आहे.

मोफत उपचार न दिल्यास कारवाई

$
0
0
राज्य सरकारकडून जमिनीसह अन्य सोयी-सुविधा मिळविणाऱ्या धर्मादाय हॉस्पिटलांनी ५० हजार आणि एक लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या पेशंटला मोफत उपचाराच्या सेवा न दिल्यास त्या संबंधित हॉस्पिटलवर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा धर्मादाय आयुक्तालयाने दिला आहे.

थंडीने भरली हुडहुडी

$
0
0
गेल्या चार दिवसांपासून जोर धरलेल्या थंडीचा फळ आणि पालेभाज्यांच्या काढणीवर परिणाम जाणवू लागला असून, त्यामुळे भाज्यांची आवक रोडावली आहे. बटाटा, पावट्याचे भाव उतरले असले तरी आता भेंडी, गवार, घेवडा, कोबी, फ्लॉवर आणि टोमॅटोच्या भावात मात्र वाढ झाली आहे.

मनसेतर्फे शिक्षणाच्या आयचा घो

$
0
0
शिक्षकांना इलेक्शन ड्युटीला पाठविण्याच्या शासनाच्या धोरणाविरोधात मनसेच्या पुणे शहर शाखेतर्फे शहरातील विविध शाळांमध्ये जनजागृती करत 'शिक्षणाच्या आयचा घो' या अभिनव आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

माजी सैनिकांसाठी 'एमआयडीसी'

$
0
0
माजी सैनिकांनी उद्योजक व्हावे, यासाठी सैनिक कल्याण विभागाच्या वतीने औद्योगिक वसाहत विकसित केली जाणार असल्याचे सैनिक कल्याण विभागाचे संचालक निवृत्त कर्नल सुहास जतकर यांनी सांगितले.

पथारी व्यावसायिकांना 'आधार'

$
0
0
शहरातील पथारी व्यावसायिकांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यामध्ये उपग्रहाच्या आधारे त्यांचे ठिकाण निश्चित करण्यात येणार आहे. तसेच महापालिकेच्या वतीने सर्व पथारी व्यावसायिकांची बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी होणार असून, या नोंदी 'आधार' कार्डाशी लिंक करण्यात येणार आहेत.

पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू

$
0
0
लोणावळ्या जवळील लायन्स पॉइंट येथे पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाचा दरीत पडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (१६ डिसेंबर दुपारी चारच्या सुमारास घडली. ही घटना आत्महत्या का अपघात याबाबत अद्याप सांशकता आहे.

फेब्रुवारीअखेर आंबेच आंबे!

$
0
0
दीड महिन्याच्या कालावधीनंतर कर्नाटक लालबागच्या माध्यमातून फळांचा राजा आंबा पुन्हा पुण्याच्या बाजारात दाखल झाला. यंदाच्या सीझनमध्ये अपेक्षेपेक्षा लवकर, म्हणजे फेब्रुवारी अखेरपर्यंत मुबलक संख्येने आंबा उपलब्ध होणार असल्याने खवय्यांना त्याची चव स्वस्तात चाखता येण्याची आशा आहे.

झुरमुरेंना पाठवा चंद्रपुरात!

$
0
0
‘पुणे महापालिकेच्या सेवेत राहून पुणेकरांचा अवमान करणारी भाषा कोणी करीत असेल, तर अशांना चंद्रपूरच्या जंगलातच पाठवा,’ अशा शब्दांमध्ये विविध पक्ष-संघटनांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांच्या विधानाचा रविवारी निषेध केला. त्यांनी पुणेकरांची माफी मागावी; अन्यथा त्यांना महापालिकेच्या बैठकांना बसू देणार नाही, असा इशाराही पक्षांनी दिला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images