Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘होऊ दे जरासा उशीर’

$
0
0
ऑस्करच्या शर्यतीच्या अंतिम टप्प्यामध्ये धडक मारत ‘होऊ दे जराशा उशीर’ने आता एक वेगळा इतिहास घडवला आहे. या सिनेमाने यंदा ‘बेस्ट फिल्म’ प्रकारात ऑस्करच्या शर्यतीत असलेल्या १३७६ सिनेमांमधून सर्वोत्कृष्ट २८२ सिनेमांमध्ये स्थान मिळविण्यामध्ये यश मिळवले आहे. या टप्प्यापर्यंत मजल मारणारा हा पहिलाच मराठी सिनेमा ठरला आहे.

पुणे विद्यापीठातील ३ कर्मचारी निलंबित

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील गैरप्रकारांमध्ये सामील असल्याचे स्पष्ट झाल्याने विभागातील तीन कर्मचाऱ्यांवर विद्यापीठ प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली.

‘YCM’चे सुहास काकडे निलंबित

$
0
0
नॉन स्ट्रेस टेस्ट (एनएसटी) मशिन खरेदी निविदा प्रक्रियेत अनियमितता असल्याचा ठपका ठेवून महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी शुक्रवारी वायसीएम हॉस्पिटलच्या मध्यवर्ती औषध भांडाराचे व्यवस्थापक सुहास एकनाथ काकडे यांना तडकाफडकी निलंबित केले. प्राथमिक चौकशी होईपर्यंत निलंबनाची कारवाई कायम राहिल. असे आयुक्त परदेशी यांनी सांगितले.

‘घटनेतील मूल्यांच्या आधारावर रोखता येईल सांस्कृतिक दहशतवाद’

$
0
0
‘अलीकडच्या काळात सांस्कृतिक दहशतवाद फोफावत आहे. संविधानातील मूल्यांच्या आधारावरच तो रोखता येईल. तसेच, संविधानामुळे नैतिक बळ वाढीस लागून अशा दहशतवादाविरोधात प्रश्नही उपस्थित होतील,’ असे मत शनिवारी तिसऱ्या सम्यक साहित्य संमेलनात परिसंवादातून मांडण्यात आले.

दिघीमध्ये घरफोडी; १.५ लाखांचा ऐवज लंपास

$
0
0
दिघी येथील समर्थनगर मधील एका घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून एक लाख ५३ हजार रुपयांचा माल चोरुन नेला.

जकातचोरीच्या संशयावरून ३ ट्रक ताब्यात

$
0
0
जकात चुकविल्याच्या संशयावरून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहराच्या मध्यभागातून तीन ट्रक पकडून शनिवारी प्रशासनाच्या ताब्यात दिले. यासंदर्भात प्रशासनाकडून तक्रारींवर तपासणी सुरू आहे.

पणन व विपणन कायद्याच्या दुरुस्तीसाठी आता समिती

$
0
0
राज्याच्या पणन व विपणन कायद्यात पारदर्शकता आणण्यासाठी त्यात दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या अधिवेशनात कायद्याच्या दुरुस्तीसाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे.

बेकायदा बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आणणार

$
0
0
महापालिकेत समाविष्ट होणा-या २८ गावांतील बेकायदा बांधकामे नियमित करण्याबाबत सकारात्मक पावले टाकणार असल्याचे आश्वासन नगर विकास राज्यमंत्री भास्करराव जाधव यांनी विधिमंडळात दिल्याचे शिवसेनेच्या संपर्कप्रमुख आणि आमदार ‌डॉ. नीलम गो-हे यांनी शनिवारी सांगितले.

आळंदी रोडच्या BRT चे फेब्रुवारीमध्ये प्रस्थान

$
0
0
आळंदी रोडवरील नियोजित बीआरटीची कामे पूर्ण होत आली असून येत्या जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीस येथील सात किलोमीटरची बीआरटी सुरू होईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने शनिवारी देण्यात आली.

MPC आपल्याच मिळकतीबाबत अनभिज्ञ ?

$
0
0
पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सदाशिव पेठेत अत्यंत मोक्याच्या जागी असलेल्या आपल्या कोट्यवधी रुपयांच्या मिळकतीबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ स्वतःच अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रदूषण मंडळाच्या नावावरील या मिळकतीचा कर आणि वीज बिल तिऱ्हाइतामार्फत भरले जात असल्याने याचे नेमके गौडबंगाल काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महापालिका करणार महिला संवेदनशील अहवाल

$
0
0
पुणे महापालिकेच्या वतीने महिला संवेदनशील अहवाल तयार करण्यात येणार आहे. या अहवालामध्ये महिलांच्या प्रश्नांवर विचार करून, त्या प्रश्नांचा समावेश जेंडर बजेटमध्ये केला जाणार असल्याचे महापौर वैशाली बनकर यांनी सांगितले.

इतिहासाच्या साक्षीदारांना हवी आहे पुणेकरांची साथ

$
0
0
‘पुनवडी ते पुणे’ या शहराच्या स्थित्यंतराचे साक्षीदार असलेले ऐतिहासिक वाडे, जुनी मंदिरे, तलाव आणि वेगवेगळ्या वास्तूंच्या जतनासाठी पुणे पालिकेने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखल्या जाणाऱ्या ‘इंडियन हेरिटेज सिटीज नेटवर्क’शी महापालिकेने नुकताच वारसा संवर्धनाचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. हे पाऊल उचलणारे पुणे राज्यातील पहिले शहर ठरले आहे.

लोणावळा-पुणे रेल्वे विस्कळित

$
0
0
मालवाहू रेल्वेच्या इंजिनामध्ये बिघाड झाल्याने पुणे-लोणावळा रेल्वे वाहतूक शनिवारी (१५ डिसेंबर) सकाळी सुमारे दोन तास विस्कळित झाली होती. घोरपडीहून लोणावळ्याकडे जाणा-या रेल्वे मालगाडीत लोखंडी जाड पत्र्याचे रोल होते.

कामगार समितीचे मंगळवारी आंदोलन

$
0
0
कामगार वर्गाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परीक्षा अधिनियमाला विरोध करण्यासाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने येत्या मंगळवारी (१८ डिसेंबरला) जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे.

सुपर मीटची विक्री सुरू

$
0
0
इलेक्ट्रॉनिक मीटरचे उत्पादन करणा-या सुपर मीटर कंपनीला आता मीटरची विक्री करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या मीटरमधील दोष दूर झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विक्रीची परवानगी मिळाली असून, पुण्यासह राज्यभर कंपनीचे मीटर पुन्हा उपलब्ध झाले असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

कृषी आयुक्तालय हलविण्यास विरोध

$
0
0
गेल्या सव्वाशे वर्षांहून अधिक काळ पुण्यात असलेले कृषी आयुक्तालय औरंगाबाद येथे हलविण्यास कृषी खात्यातील कर्मचा-यांनी विरोध केला असून, त्या विरोधात शनिवारी (१५ डिसेंबर )जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

खासगी विद्यापीठात आरक्षणाला हरताळ

$
0
0
खासगी विद्यापीठाचे विधेयक मंजूर करताना आरक्षणाच्या तरतुदीला हरताळ फासण्यात आला आहे, असा दावा आरक्षण हक्क समितीने केला आहे. या संदर्भात राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात येईल, असेही समितीने स्पष्ट केले.

१२ तासांत कचरा साफ

$
0
0
‘कचरापेटी साफ झाली नाही,’ ‘कंटेनर उचलला नाही,’ ‘फुटपाथ साफ नाहीत,’ अशा तक्रारी करण्यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने एसएमएस सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यावर एसएमएस केल्यास पुढील आठ ते बारा तासांत तक्रारीचे निवारण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

‘पीएमपी’च्या टेंडरची ‘डबल’ बेल

$
0
0
आर्थिक तोट्यात अडकलेल्या ‘पीएमपी’ला आता खासगी वाहतुकदारांच्या अव्वाच्या सव्वा दरांनी घेरले आहे.‘पीएमपी’ला खासगी वाहतुकदारांकडून बस भाड्याने देण्यासाठी कंत्राटदारांनी सध्याच्या दरापेक्षा दुप्पट दरांनी टेंडर भरल्याचे समोर आले आहे.

उद्योजकांनी उलगडले ‘शरद पवार’

$
0
0
देशाचे कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी केवळ राज्यकर्ता किंवा केंद्रातील ‘वजनदार’ मंत्री म्हणून जवळीक साधण्यापलीकडे जाऊन मैत्रीचे नाते कसे निर्माण झाले या संदर्भात बड्या उद्योजकांनीच आपले अनुभव शब्दबद्ध केले आहेत. ‘इंडस्ट्रियस’ आणि ‘उद्यमशील’ या दोन्ही पुस्तकांतून त्यांच्या अनुभवाची शिदोरी वाचकांच्या भेटीला आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images