Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

घटस्फोटाचा समुपदेशनाने फैसला

$
0
0
एकमेकांबरोबर राहण्याची इच्छाच न उरल्यामुळे त्यांनी वेगळे होण्याचे ठरविले…..मात्र त्याच्याकडून पाच लाख रुपये घेण्याच्या मागणीवर तिचे वडील अडून राहिले….परिणामी कोर्टात केस रेंगाळत राहिली….रकमेवर अडून राहिले तर तिच्या भविष्यावर होणारा परिणाम पैशांनी भरून निघणार नाही, अशी समजूत न्यायाधीशांनी घातल्यामुळे तिच्या घटस्फोटाचा अडथळा दूर झाला.

हरविलेली वाहने शोधा ऑनलाइन

$
0
0
हरवलेल्या वाहनांचा शोध ‘ऑनलाइन’ घेता यावा, तसेच बेवारस वाहनांची माहितीही देता यावा, यासाठी www.findlostvehicle.com ही वेबसाइट सुरू करण्यात आली आहे.

परीक्षा विभागाची पाहणी

$
0
0
पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी गुरुवारी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला भेट देत तेथील कामकाजाचा आढावा घेतला.

२ अपघातात २ दुचाकीस्वार ठार

$
0
0
एनडीए रोड आणि नगर रोडवर झालेल्या स्वतंत्र अपघातांच्या घटनेत दोन दुचाकीस्वार ठार झाले. दोन्हीही घटनांमध्ये अपघातानंतर वाहन चालक पळून गेले आहेत.

पालिका आयुक्तांना मनसेचा घेराव

$
0
0
जकात कर रद्द करून स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्यात येणार असल्याने याबाबत महापालिकेने नागरिकांना सविस्तर माहिती द्यावी, या मागणीसाठी मनसेच्या रस्ते, साधन-सुविधा, आस्थापना विभागाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त महेश पाठक यांना घेराव घातला.

पुण्यात गदिमांच्या नावाने चित्रनगरी व्हावी

$
0
0
‘हिंदी चित्रपट दिग्दर्शक राज कपूर आणि ग. दि. माडगुळकर यांच्या हस्ते १९७२ साली कात्रजला सर्पोद्यान असलेल्या जागी चित्रनगरीची कोनशिला बसवण्यात आली होती. नंतरच्या काळात त्याचा सर्वांनाच विसर पडला आणि पुण्यात चित्रनगरी आकाराला आली नाही. पुणे हे चित्रिकरणासाठी सर्वोत्तम असून, आता पुण्यात गदिमांच्या नावे चित्रनगरी व्हावी,’ अशी मागणी गदिमांचे सुपूत्र आणि गदिमा प्रतिष्ठानचे विश्वस्त आनंद माडगुळकर यांनी केली.

वयोवृद्धांना वैद्यकीय मदतीचा पालिकेचा निर्णय

$
0
0
पुण्यातील एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न आणि ८० वय असणा-या ज्येष्ठ नागरिकांना महापालिकेकडून दोन लाख रुपये वैद्यकीय सहाय्य देण्याचा निर्णय महिला आणि बालकल्याण समितीने शुक्रवारी घेतला.

नोकरीच्या आमिषाने ५ लाखांची फसवणूक

$
0
0
पेट्रोनाज मलेशिया, मारुती सुझकी या कंपन्यांमध्ये नोकरी लावून देण्याच्या आमिषाने पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हडपसरला स्वतंत्र रेल्वे टर्मिनल

$
0
0
पुणे स्टेशनवर होणारी रेल्वेगाड्यांची वर्दळ कमी करण्यासाठी हडपसरमध्ये रेल्वे टर्मिनन्स उभारण्यात येणार आहे. स्टेशनवरील कोंडी टाळून नवीन गाड्या सुरू करणेही त्यामुळे शक्य होईल. दौड-पुणे रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरण प्रकल्पाचा प्रारंभ शुक्रवारी करण्यात आला. त्या वेळी मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर सुबोध जैन यांनी हडपसर टर्मिनलबाबत सूतोवाच केले.

मिशेल काकडे यांची ‘अंटार्टिका’ला गवसणी

$
0
0
अंटार्टिकातील अतिशय खडतर अशा ‘द लास्ट डेझर्ट रेस’ यशस्वीपणे पूर्ण करून डेझर्ट क्लबमध्ये (चारही वाळवंटातील शर्यत पूर्ण करणा-यांचा क्लब) पुण्याच्या मिशेल काकडे यांचे नाव समाविष्ट झाले आहे. या क्लबमध्ये सहभागी झालेल्या त्या एकमेव भारतीय महिला आहेत. जगामध्ये केवळ १२४ लोकांनी अशी कामगिरी केली असून, त्यामध्ये केवळ २४ महिला आहेत.

‘सीडीएस’च्या परीक्षेत पुण्याचा झेंडा

$
0
0
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) घेण्यात येणा-या कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेसच्या (सीडीएस) परीक्षेत पुण्याचा संपन्न कोल्हटकर देशात पहिला आला आहे. ‘सीडीएस’च्या अखिल भारतीय गुणवत्ता यादीत पुण्याच्या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच वेळ आहे. संपन्न आता डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अॅकेडमीत (आयएमए) दाखल होईल.

तळजाई दुर्घटनेतील मृतांना ११ लाखांची मदत

$
0
0
तळजाई पठार येथील बेकायदा इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या अकरा जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केली आहे. हा निधी संबंधितांना लवकरच दिला जाणार आहे.

ऑनलाइन अर्जाची प्रिंट पाठवा

$
0
0
‘जेईई-मेन’ या प्रवेश परीक्षेसाठी ‘ऑनलाइन’ अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्याच्या ‘कन्फर्मेशन पेज’ची ‘प्रिंट आउट’ २६ डिसेंबरपूर्वी ‘स्पीड पोस्ट’ने पाठवणे गरजेचे असल्याचे या परीक्षेचे संचालन करणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) कळवले आहे. परीक्षेचा अर्ज ‘ऑनलाइन’ भरण्याचा अंतिम दिनांक १५ डिसेंबर आहे.

‘पुरूषोत्तम’मधील उत्तम पुन्हा रंगमंचावर

$
0
0
महाविद्यालयीन नाट्यजीवनात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आणि महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेचे अमृतमहोत्सवी वर्ष असा दुहेरी योग पुढील वर्षी जुळून येत आहे. यानिमित्ताने गेल्या पाच दशकांत ‘माईलस्टोन’ ठरलेली निवडक दहा नाटके त्यांच्या कलाकारांच्या सहभागासह सादर करण्याचा संस्थेचा मानस आहे.

२०० घरफोड्या करणारा पुन्हा अटकेत

$
0
0
दोनशेहून अधिक घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगारास अटक केली आहे. येरवडा कारागृहातून तीन महिन्यांपूर्वीच सुटलेल्या या गुन्हेगाराने पुणे शहरात पाच घरफोड्या केल्या असून पोलिसांनी त्याच्याकडून पावणे चार लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

झोपड्यांची मालकी देण्यास सुरुवात

$
0
0
शहरातील झोपडपट्टीवासीयांच्या नावावर झोपड्या करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, निवासी झोपडीसाठी ४० हजार रुपये, तर बिगरनिवासी झोपडीसाठी ६० हजार रुपये हस्तांतरण शुल्क आकारण्यात येणार आहे.

CCTV ला सॉफ्टवेअरचा ‘रेड सिग्नल’

$
0
0
शहरातील अतिरेकी कारवायांच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणही सुरक्षा चोख ठेवण्याची गरज असताना पुणे स्टेशनवरील इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीमला मात्र सॉफ्टवेअरमधील अडचणींमुळे रेड सिग्नल मिळत आहे. परिणामी, आयटी सिटी म्हणून मिरविण्यात येणा-या पुण्यातील रेल्वे स्टेशनच्या सुरक्षेविषयीचे प्रश्नचिन्ह कायमच आहे.

फुकट्या वीजचोरांवर बडगा

$
0
0
अनधिकृत वीज वापराचे चाळीस प्रकार उघडकीस आले असून या ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारीत महावितरणने या ग्राहकांना १८ लाख ६७ हजार रूपयांचा दंड केला आहे. त्यापैकी एका ग्राहकाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्टील चोरट्यांची टोळी जेरबंद

$
0
0
मावळात पुणे- मुंबई महामार्गावर स्टील चोरी व तस्करी असणा-या अड्ड्यावर छापा टाकून तस्करी करणा-या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अखेर गजाआड केले आहे. या वेळी पोलिसांनी २७ ट्रकमधील माल जप्त करण्यात आला असून ४२ जणांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यात मनसेचा अनोखा तास

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज पुण्यातील शाळांमधून ‘शिक्षणाच्या आईचा घो’चा तास घेत शिक्षकांना निवडणुकांच्या कामावर लावण्याच्या विरोधात नव्या स्टाईलने आंदोलन केलं. याला शाळांमधून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळ्याचेही मनसे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images