Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

लिपिकांसाठीच्या परीक्षा एकाच दिवशी

$
0
0
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभाग आणि तंत्रशिक्षण विभागातर्फे एकाच दिवशी आणि एकाच वेळी आयोजित केलेल्या लिपिक संवर्गातील कर्मचारी भरतीसाठीच्या परीक्षेमुळे या दोन्ही परीक्षांसाठी अर्ज भरलेले उमेदवार आता अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे दोन्हीपैकी एका परीक्षेची वेळ आणि तारीख बदलण्याची मागणी अशा उमेदवारांकडून करण्यात आली आहे.

टॉवर कंपन्यांवर पालिकेची कारवाई

$
0
0
मिळकतकर थकविल्यामुळे चार मोबाईल कंपन्यांच्या टॉवरवर महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये रिलायन्स, व्होडाफोन आणि टॉवर व्हिजन या कंपन्यांची कंट्रोलरूम सील करण्यात आली, तर इंडस कंपनीने दोन कोटी रुपयांची थकबाकी महापालिकेकडे भरली.

बिल्डरला १० हजारांचा दंड

$
0
0
सहकारनगर येथील येथील समर्थ प्रसाद अपार्टमेंटची स्थापना करुन देण्याचा आदेश ग्राहक मंचाने एमव्हीआर कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिला आहे. नुकसान भरपाईपोटी दहा हजार रुपये आणि तक्रारीचा खर्च म्हणून एक हजार रुपये देण्याचाही आदेश त्या कंपनीला दिला आहे.

थकबाकीदारांची वीज तोडली

$
0
0
वीजदेयकांच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या पुणे विभागाअंतर्गत सुरू असलेल्या विशेष मोहिमेत गेल्या आठवड्यात तब्बल साडेतेवीस हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यातील सुमारे १९ हजार थकबाकीदारांनी सहा कोटी ९१ लाख रुपयांचा भरणा केल्यानंतर त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

विश्व केवढे? ज्याच्या त्याच्या मनाएवढे!

$
0
0
‘विश्व म्हणजे नेमके काय, ते किती मोठे आहे, त्याचे भविष्य काय, या विश्वात आपण कसे आणि का आलो... विचार करायला लागल्यापासून मानवाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांमध्येच लपलेली आहेत,’ असे मत प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. सँड्रा फेबर यांनी नुकतेच पुण्यात मांडले.

किलबिल किलबिल पक्षी बोलती...

$
0
0
रात्रीच्या वेळी घरात एखाद्या कोपऱ्यात किर्रर्र आवाज ऐकू येतो.. अन् किडा मात्र दिसतच नाही; पण लगेचच खिडकीच्या बाहेरून दुसऱ्या किड्याचा प्रतिसाद येतो. छोट्याशा किड्यांपासून ते अगदी पक्ष्यांपर्यंत सगळेच जीव त्यांच्या भाषेत कसा संवाद साधतात? स्वतःची हद्द ठरविण्यासाठी, संवाद साधण्यासाठी, एवढेच नव्हे, तर समागमाच्या कालावधीत ते आवाज कसे बदलतात?

छात्र संसदेसाठी १२ हजार विद्यार्थी

$
0
0
येत्या १० ते १२ जानेवारीदरम्यान एमआयटी येथे होणा-या तिस-या भारतीय छात्र संसदेत देशातील २८ राज्यांमधील ४०० विद्यापीठांमधील १२ हजारांवर विद्यार्थी प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

नाट्यसंमेलनाचा 'पडदा' उघडला

$
0
0
ढोल-लेझीम, झांज पथकासह दशावतारी नमन, खेळे, भारूड, गोंधळी, पोतराज, वाघ्या-मुरळी या परंपरेची प्रातिनिधीक स्वरूपातील रूपे अन् रंगभूमीवर लोकप्रिय ठरलेल्या नाटकांच्या चित्ररथांच्या शोभायात्रेने ९३ व्या नाट्य संमेलनाचा ‘पडदा’ उघडला.

शहरात डेंगीचे एक हजार पेशंट

$
0
0
गेल्या वर्षभरात पुणे शहरातील डेंगीच्या पेशंटची संख्या एक हजारांवर गेल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. यापैकी दहा जणांचा डेंगीने बळी घेतला आहे. शहरात जानेवारी ते जुलै महिन्यादरम्यान शहरात तुरळक स्वरूपात डेंगीचे पेशंट आढळत होते. मात्र, ऑगस्ट महिन्यापासून एडीस इजिप्ती नावाच्या डास चावल्याने डेंगीचे पेशंटची संख्या वाढू लागली.

स्वारगेट- पिंपरी मेट्रो लांबणीवर

$
0
0
स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मेट्रोच्या दुस-या मार्गासाठी पाचऐवजी दहा टक्के निधी महापालिकेने उभारण्याचा प्रस्ताव कसा मांडला, असा प्रश्न स्थायी समितीमध्ये विचारण्यात आला. मात्र, आयुक्त महेश पाठक उपस्थित नसल्याने हा विषय आठवडाभर पुढे ढकलण्यात आला.

सायलीला दुहेरी मुकुटाची संधी

$
0
0
पुण्याच्या सायली भिलारेला महिलांच्या फर्ग्युसन करंडक अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकाविण्याची संधी आहे. दरम्यान, एकेरीच्या उपांत्य लढतीत हरियाणाच्या व्हिक्टोरिया चेहलने अव्वल मानांकित सानिया मदानला पराभवाचा धक्का देत अंतिम फेरी गाठली.

पुण्यात थंडीचा कडाका वाढला

$
0
0
शहर आणि परिसरात थंडीने पुन्हा चाहूल दिली असून, गुरुवारी पारा १०.५ अंशांपर्यंत घसरला. पुढील दोन दिवसांत किमान तापमानात अंशतः घट होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. राज्यातील नीचांकी ९.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद नाशिक येथे झाली.

केमिस्ट्रीची 'मिस्ट्री' सुटेना

$
0
0
राज्यातील बोर्डाच्या बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठीचा केमिस्ट्री हा विषय म्हणजे न संपणारा ‘मिस्ट्री’ बनला आहे. तब्बल ५६५ पानांच्या पुस्तकाचे ओझे विद्यार्थ्यांनाच काय, शिक्षकांनाही पेलवत नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

...नाहीतर साखर अडवू

$
0
0
राज्यातील १९० पेक्षा अधिक खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाच्या अंतिम बिलाची सात हजार कोटी रुपयांची रक्कम थकविली आहे. ही रक्कम न दिल्यास आता हंगामातील उत्पादित साखरेचे पोतेच कारखान्याबाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला.

प्रवेश परीक्षांवर मार्गदर्शन

$
0
0
इंजिनीअरिंग आणि मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या परीक्षा, अकरावीचे प्रवेश, इंजिनीअरिंगमधील करिअरच्या संधी आदी जिव्हाळ्याच्या विषयांबाबत दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे म्हणून शनिवारी आणि रविवारी (१५ आणि १६ डिसेंबर) विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

क्रॉसिंगसाठी हवा पुरेसा वेळ

$
0
0
पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी योग्य वेळ मिळावा, या मागणीसाठी सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेंटतर्फे १५ डिसेंबर रोजी लक्ष्मी रोडवरील सेवासदन चौकामध्ये अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी नऊ ते दहा या वेळेमध्ये त्याचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकसंख्या-अर्थशास्त्र सांगड हवी

$
0
0
जागतिक पातळीवर भारत एक आर्थिक महासत्ता म्हणून उदयाला येत आहे. तसेच, देशाची लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देशाच्या प्रगतीला हातभार लावण्यासाठी देशातील अर्थशास्त्रज्ञांनी लोकसंख्याशास्त्रज्ञांच्या जोडीने संशोधन करण्याची गरज आहे, असे मत युनायटेड नेशन्स पोप्युलेशन फंडाचे (यूएनएफपीए) प्रतिनिधी अँडर्स थॉमसन यांनी गुरुवारी पुण्यात व्यक्त केले.

कात्रज देहूरोड बायपासवर सावधान

$
0
0
कात्रज-देहूरोड बायपासवर लुटमारीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. तसेच या बायपासवरील अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळत नसल्याने अपघातातील मृत्यूंचा आकडा वाढत आहे. पोलिसांची हायवेवरील उपस्थिती वाढली, तर लूटमारही थांबेल आणि जखमींनाही मदत मिळेल, असा विश्वास वाटतो.

अधिष्ठातांची बिनविरोध निवड

$
0
0
नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या अधिष्ठातांची बिनविरोध निवड करण्यात आली.

दूध उद्योग विकासासाठी निधी

$
0
0
देशातील दूध डेअऱ्यांचा विकास साधण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाला २२४२ कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यासाठी देण्यात आला आहे. त्यातून महाराष्ट्राच्या वाट्याला सातशे ते आठशे कोटींचा निधी मिळणार आहे, अशी माहिती ‘नॅशनल को- ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया’चे चेअरमन विनायकराव पाटील यांनी बुधवारी दिली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images