Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आम्ही हतबल, असहाय...

$
0
0
देशातील नागरी सहकारी बँकांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा निर्णय रद्द करण्यासाठी ब्रिटन सरकारवर दबाव आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्यासाठी रिझर्व्ह बँकेशी चर्चा केली. केंद्रीय अर्थ मंत्रालयाला आणि ब्रिटिश उच्चायुक्तालयाकडे निवेदन दिले; पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

पीएमपीच्या बसेससाठी ‘प्रसन्न पर्पल’चे सोल्यूशन

$
0
0
‘जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजने’अंतर्गत (जेएनएनयूआरएम) मिळालेल्या बसेस मेन्टेनन्ससाठी ‘प्रसन्न पर्पल मोबिलिटी सोल्यूशन’ या खासगी कंपनीला चालविण्यास देण्याचा आदेश ‘पीएमपी’ प्रशासनाने बुधवारी दिला. दरम्यान, या निर्णयास कामगार संघटनेने विरोध केला असून, खासगीकरणाचे धोरण सुरू ठेवल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

‘एलबीटी’तून सोळाशे कोटी मिळणार का?

$
0
0
जकातीऐवजी लागू करण्यासाठी विचाराधीन असणा-या ‘स्थानिक स्वराज्य संस्था करा’तून (एलबीटी) सोळाशे कोटी रूपयांचे उत्पन्न मिळणार का, असा प्रश्न पुणे महापालिकेपुढे उभा राहिला आहे. अशा महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी उद्या (गुरूवारी) मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील महापालिका आयुक्तांची बैठक बोलाविली आहे.

जिल्हाधिका-यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

$
0
0
देहूरोड येथील रेडझोनप्रकरणी राज्य सरकारने नेमलेल्या अधिका-याने योग्य त‌ी बाजू न मांडल्याने जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी स्वत: कोर्टात हजर राहावे, असा आदेश हायकोर्टाने दिला आहे. रेडझोनची मूळ कागदपत्रे आणि त्यावरील सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा, असेही हायकोर्टाने सांगितले आहे.

कलाकार मोठा की मालिका

$
0
0
अभिनेता बरूण सोबतीनं ‘इस प्यार को क्या नाम दूं’ ही मालिका सोडण्याचा घेतलेला निर्णय त्याच्या टीमसाठी इतका धक्कादायक होता, की त्यांनी थेट ही मालिकाच बंद करण्याचं ठरवलं. त्यामुळे टीव्ही इंडस्ट्रीत सध्या कलाकार मोठा की मालिका अशी चर्चा रंगली आहे.

पुण्यात शनिवारपासून आंतरराष्ट्रीय सहकार परिषद

$
0
0
पुण्याच्या ‘दि कोऑपरेटिव्ह लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशन’तर्फे येत्या शनिवारपासून (८ डिसेंबर) दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते शनिवारी सकाळी गोखले इन्स्टिट्यूटमध्ये या परिषदेचे उद्घाटन होणार आहे.

जखमींचे जबाब नोंदविले

$
0
0
स्वारगेट बसस्टँडमधून एसटी पळवून मृत्यूचे थैमान घालणारा बसचालक संतोष मानेविरुद्ध कोर्टात सुरू असलेल्या केसमध्ये आतापर्यंत १९ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. मंगळवारी कोर्टात स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम पठारे यांची साक्ष नोंदविण्यात आली.

अरविंद पिळगावकर यांना संगीत रंगभूमी जीवनगौरव

$
0
0
संगीत रंगभूमीप्रमाणेच व्यावसायिक रंगभूमीवर छाप पाडणारे ज्येष्ठ रंगकर्मी अरविंद पिळगावकर यांना यंदाचा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

स्वस्त दरात भाजी देण्याचा शहरात मनसेचा उपक्रम

$
0
0
आडत्यांच्या संपामुळे वाढलेल्या भाजीदरांनी हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी शहराच्या काही भागांमध्ये स्वस्त भाजी विक्री केंद्रे सुरू केली.

‘राज्य सरकार बघ्याची भूमिका घेणार नाही’

$
0
0
राज्य सरकारने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी बाजार समित्यांची आहे. बाजार समित्या बंद राहणार असतील, तर तेथील संचालकांना तसेच प्रशासकांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करू, अशी तंबी पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी दिली. आडत्यांनी पुकारलेल्या ‘बंद’बाबत राज्य सरकार बघ्याची भूमिका घेणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

बॉम्बस्फोट टाळण्यासाठी पोलिसांचे टेस्टकॉल

$
0
0
फर्ग्युसन रस्त्यावर नेहमीचीच वर्दळ सुरू होती... हॉटेल रूपाली आणि वाडेश्वर येथे दोघे अज्ञात घुसले... त्यांनी आपल्या जवळ असलेली एक संशयित बॅग हॉटेलमध्ये ठेवली आणि पसार झाले... हॉटेलमधील वेटरने ती बॅग उचलली आणि मॅनेजरकडे दिली... मॅनेजरने त्या बॅगची चेन उघडली अन्...!

व्रण दूर करण्यासाठी लेसर थेरपी

$
0
0
पिंपल्स, व्रण, मुरुमे, पुटकुळ्या, कांजण्यांचे डाग; तसेच अपघाताच्या डागांमुळे चेह-याचे अथवा शरीराच्या त्वचेचे सौंदर्य कमी झाले असेल तर आता चिंता करण्याचे कारण नाही. त्यावर उपाय म्हणून स्कार्स लेसर थेरपी ही उपचार पद्धती पुण्यात सुरू झाली आहे.

फळांची आवक घटली; ज्यूस बार ‘थंडगार’

$
0
0
मार्केट यार्डात पाचव्या दिवशीही बाजार बंद असल्याने फळांची आवक होऊ शकली नाही. फळाच्या अवघ्या दोन टक्के झालेल्या आवकीमुळे ज्युसबार, हॉटेलचालकांचा मोठा खोळंबा झाल्याचे चित्र आहे.

‘बंद’वर आज तोडगा?

$
0
0
आडतीच्या वादामुळे मार्केट यार्डातील बाजार पाचव्या दिवशीही, बुधवारी बंद राहिला. मात्र, राज्याच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात फळभाज्यांची आवक वाढल्याने भाज्यांचे दर उतरले. राज्य सरकारने नेमलेल्या अभ्यासगटाच्या समितीची पणन मंडळात गुरुवारी (६ डिसेंबर) होणा-या चर्चेतून तोडगा निघण्याची शक्यता आहे.

पुणे व सॅनहोजे शहरांत करार

$
0
0
शिक्षणाची राजधानी पुणे आणि माहिती तंत्रज्ञानाची राजधानी सॅनहोजे या शहरांमध्ये शाश्वत विकासाच्या योजनांबाबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. पर्यावरणाचे रक्षण, ऊर्जाबचत आणि गतिमान प्रशासन यासंदर्भातील योजना आणि तंत्रज्ञानाचे याद्वारे आदान-प्रदान करण्यात येणार आहे.

उपकुलगुरूपद भरण्याबाबत अद्याप हालचाली नाहीत

$
0
0
पुणे विद्यापीठात उपकुलगुरू नेमण्याबाबत अद्याप पावले उचलली गेली नसून, उपकुलगुरूपदासाठी असलेल्या वयाच्या अटीचा तांत्रिक मुद्दा मात्र चर्चिला जात आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी गरीब रथ चार वेळा

$
0
0
दक्षिणेकडे जाणा-या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेतर्फे पुणे ते चेन्नई मार्गावर सोडण्यात येत असणा-या गरीब रथचा कालावधी वाढवण्यात आला आहे. येत्या ५ ते २६ डिसेंबर या कालावधीत ही गाडी चारवेळा धावणार असल्याचे मध्यरेल्वेकडून कळवण्यात आले आहे.

पालिकेच्या ‘हेरिटेज वॉक’ची गती धिमी

$
0
0
शहरातील ऐतिहासिक, पारंपरिक वास्तूंची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणे महापालिकेने सुरू केलेल्या ‘हेरिटेज वॉक’ची पावले पुरेशा प्रसार-प्रचाराअभावी धीम्या गतीने पडत आहेत. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्रतिसाद मिळविण्यासाठी आता ‘जनवाणी’तर्फे ‘इन्सेन्टिव्ह’ची मात्रा सुरू करण्यात येणार आहे.

कल्याणीनगरने घेतला मोकळा श्वास

$
0
0
कल्याणीनगर परिसरातील विविध हॉटेल आणि दुकानांच्या अतिक्रमणांवर महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाच्या वतीने बुधवारी कारवाई करण्यात आली.

पासपोर्टचे अडथळे अजूनही कायम

$
0
0
पासपोर्ट मिळविण्यासाठी नागरिकांना सुविधा मिळावी यासाठी सेवा केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असली, तरी या केंद्रावर वारंवार हेलपाटे मारूनही असुविधाच पदरी पडत असल्याचे गा-हाणे नागरिकांनी मांडले आहे. या सेवा केंद्रावर नागरिकांना पुरेशी माहिती मिळत नसून, नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या वेबसाइटवरही तांत्रिक अडचणींनीच ‘लॉग इन’ केले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images