Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मंगळसूत्र चोरीच्या दोन घटना

0
0
शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोनसाखळी चोरी करून पळ काढला. या दोन्ही घटनांमध्ये चोरटे मोटारसायकलवरून आले होते.

राजगुरूनगर विमानतळाचे लवकरच ‘टेकऑफ’

0
0
राजगुरूनगर परिसरात उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा ‘विमानतळ प्राधिकरणा’च्या तांत्रिक समितीने निश्चित केली असून, जागेचे नकाशे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील आठ ते दहा दिवसात हे नकाशे पूर्ण होतील, त्यानंतर हे नकाशे मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविले जातील, असे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांन‌ी बुधवारी सांगितले.

तिरूपती कॉम्प्लेक्सला नुकसानभरपाई

0
0
स्वतंत्र वीजमीटर न दिल्यामुळे सदनिकाधारकांना वीज महामंडळाकडे रक्कम भरून वीजमीटर घ्यावे लागल्याप्रकरणी खरसानी अँड खरसानी प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स या कंपनीने तिरूपती कॉम्प्लेक्सला सहा लाख ५० हजार रुपये द्यावेत, असा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे. तक्रारदाराला झालेल्या त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून एक हजार रुपये देण्याचाही आदेश देण्यात आला आहे.

इंदू मिल स्मारकाच्या निर्णयाचे पुण्यात स्वागत

0
0
इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे शहरातील विविध संस्था, संघटनांनी जोरदार स्वागत केले आहे. तसेच, स्मारकाची उभारणी लवकर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

तारेत अडकलेल्या घारीला जीवदान

0
0
बी. जे. मेडिकल कॉलेजच्या आवारातील विजेच्या तारेत अडकून जायबंदी झालेल्या घारीला सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी जीवदान दिले. कॉलेज परिसरातील विजेच्या तारांमध्ये एक पक्षी अडकला असल्याचे सर्जेराव जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

सामान्य हक्कांसाठी आम्हीही लढणार

0
0
सामान्य नागरिकांप्रमाणे आम्हांलाही कायदेशीर हक्क मिळालेच पाहिजेत, यासाठी भविष्यात तीव्र लढा देण्याचा निर्णय देहविक्रेय करणाऱ्या महिला, पुरुष तसेच तृतीयपंथियांच्या राज्यस्तरीय अधिवेशनात बुधवारी (पाच डिसेंबर) करण्यात आला.

वेळेत तपासणी हाच प्रभावी उपाय

0
0
‘वेळेत तपासणी करणे आणि आरोग्याची काळजी घेणे हाच स्तनांच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठीचा प्रभावी उपाय आहे,’ असे मत पिंपरी- चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी व्यक्त केले.

...तर देशाच्या सुरक्षिततेला धोका

0
0
‘काही देशांकडे त्यातही आपल्या शेजारील राष्ट्रांकडे जैविक, रासायनिक, रेडिओलॉजिक क्षेपणास्रे आणि अण्वस्त्रे आहेत. ही शस्रे दहशतवाद्यांच्या हाती लागल्यास त्यापासून देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो,’ असा इशारा लष्कराच्या ट्रेनिंग विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल के. सुरेंद्र नाथ यांनी दिला.

सरनोबत येसाजी कंक यांचे समाधीस्थळ उजेडात

0
0
शिवशाहीच्या पाऊलखुणा सर्वांत जास्त उमटल्या बारा माव‍ळांच्या कुशीत. या पाऊलखुणांचा मागोवा घेत पुण्यातील तरुणांनी राजघर (ता. भोर) गावाच्या परिसरात शिवछत्रपतींचे सरनोबत येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक यांचे शिवकालीन समाधीस्थळ, राहत्या वाड्याचे अवशेष, अश्वस्मारक आणि अस्सल शिवराई नाणे असा ऐतिहासिक ठेवा उजेडात आणला आहे.

आकुर्डी सब-वे ला रेल्वेची परवानगी

0
0
पुणे-मुंबई लोहमार्गावर आकुर्डी येथे सब-वे उभारण्याला रेल्वे खात्याने तत्त्वतः मान्यता दिली आहे. लेखी पत्रानंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करता येऊ शकेल, असे आश्वासन रेल्वेचे विभागीय जनरल मॅनेजर एस. के. जैन यांनी बुधवारी (पाच डिसेंबर) दिले.

पुणे-मुंबई टॅक्सी सेवा विस्कळीत

0
0
दि पुणे टॅक्सीमॅन कन्झ्युमर को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील गोंधळाच्या मुद्यावरून गेले पाच दिवस पुणे-मुंबई टॅक्सी सेवा बंद पडली आहे. त्यामुळे टॅक्सीचालकांबरोबरच प्रवाशांचीही अडचण झाली आहे. टॅक्सीसेवा बंद झाल्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणा-यांनी दरामध्ये वाढ केल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. तसेच पुण्याहून मुंबईकडे जाणा-या एसटी बसेस, एशियाडकडेही गर्दी वाढली आहे.

पुणेःप्लॅटफॉर्म ६चे विस्तारीकरण

0
0
पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक सहाची लांबी वाढवण्याचे काम पूर्ण झाले असून, या ठिकाणी २२ डब्यांच्या गाड्या थांबणार आहेत. मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर एस. के. जैन यांनी बुधवारी पुणेभेटी दरम्यान त्याची पाहणी केली. गेल्या काही वर्षांपासून पुणे स्टेशनवरुन ये-जा करणा-या गाड्यांची संख्या वाढली आहे.

आळंदी यात्रेसाठी जादा बस

0
0
आळंदी यात्रेसाठी पीएमपीतर्फे सात ते १३ डिसेंबर दरम्यान जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्वारगेट, हडपसर, पुणे स्टेशन, मनपा भवन, निगडी, पिंपरी, चिंचवड, देहूगाव, भोसरी या ठिकाणांहून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

गँगस्टर बबलू श्रीवास्तव अटकेत

0
0
दाऊद इब्राहीम आणि इरफान गोगा यांचा साथीदार असलेल्या कुख्यात गँगस्टर ओमप्रकाश श्रीवास्तव उर्फ बबलू श्रीवास्तव याला पुणे पोलिसांनी बुधवारी अटक केली. श्रीवास्तवने १९९८ साली ‘एनआयबीएम’ रोड येथे सागर लडकत यांचा खून घडवून आणला होता. उत्तरप्रदेश पोलिसांच्या कडक बंदोबस्तात त्याला पुण्यात आणण्यात आले.

आकुर्डीत सव्वालाखाची घरफोडी

0
0
दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एक लाख २९ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिराशेजारी असलेल्या विठ्ठल हेरिटेज मध्ये ही घटना घडली. मंगळवारी (चार डिसेंबर) पहाटे पावणेचारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. प्रशांत सोमनाथ दशपुत्रे (वय ४३) यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.

शहराबाहेर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती

0
0
पुणे महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागातर्फे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेसाठी संबंधित विद्यार्थी शहरातील रहिवासी असावा, ही घातलेली अट महापालिका कर्मचाऱ्यांसाठीच अडचणीची ठरली आहे. शहराबाहेर राहणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या मुलांना योजनेचा लाभ घेता येत नसल्याने अशा कर्मचाऱ्यांच्या मुलांना ही शिष्यवृत्ती देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महिला आणि बालकल्याण समितीसमोर ठेवला आहे.

बालवाडी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

0
0
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याची राज्यभरात काटेकोर अमलबजावणी व्हावी, यासाठी राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून प्राथमिक प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले. शाळांनी दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी आरक्षित २५ टक्के जागांवरील प्रवेशांसाठी हे वेळापत्रक पाळणे सक्तीचे करण्यात आले आहे.

बॉम्बस्फोट टाळण्यासाठी पोलिसांचे टेस्टकॉल

0
0
फर्ग्युसन रस्त्यावर नेहमीचीच वर्दळ सुरू होती... हॉटेल रुपाली आणि वाडेश्वर येथे दोघे घुसले... त्यांनी आपल्याजवळ असलेली एक संशयित बॅग हॉटेलमध्ये ठेवली आणि पसार झाले... हॉटेलमधील वेटरने ती बॅग उचलली आणि मॅनेजरकडे दिली... मॅनेजरने त्या बॅगची चेन उघडली अन्...!

पुण्यातील बँकांवरील 'काळा डाग' कायम

0
0
बँक खात्याचे बनावट स्टेटमेंट देत असल्याचा ठपका ठेवत देशातील १,९४० बँकांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकणाऱ्या ब्रिटनने नव्या वर्षातही तोच डाग, त्याच बँकांवर कायम ठेवला आहे. आमच्यावर अनावश्यक आणि सरसकटपणे लावलेला हा डाग काढण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने कोणताही प्रयत्न केला नाही, असे खापर आता या बँका फोडत आहेत. कारवाई झालेल्यांमध्ये प्रामुख्याने नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँकांचा समावेश आहे.

लातूर, नांदेडसाठी पुण्याहून जादा रेल्वे

0
0
प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे ते हुजूरसाहेब नांदेड आणि सोलापूर येथे जादा रेल्वेगाड्या सोडण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून कळवण्यात आले आहे. पुणे ते हुजूरसाहेब नांदेड या मार्गावर ७ आणि १३ डिसेंबर रोजी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. पुणे स्टेशनवरून रात्री दहा वाजता ही गाडी सुटणार असून, नांदेडला सकाळी १० वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images