Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

फेसबुक वाढवते समाजिक तेढ

$
0
0
सोशल नेटवर्किंग साइटवर आक्षेपार्ह मजकूर टाकून समाजात तणाव वाढविण्याचा नवा ‘उद्योग’ सुरू झाला आहे. पोलिसांना फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइटकडून माहिती मिळण्यास ठराविक कालावधी लागत असल्याने नागरिकांनी संयम बाळगावा आणि समाजात तणाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

शिक्षकांसाठी निबंध स्पर्धा

$
0
0
यशवंत-शरद प्रबोधिनी व संशोधन संस्थेतर्फे पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्राथमिक शाळांमधील उपशिक्षकांपासून ते कॉलेजमधील प्राध्यापकांपर्यंत सर्व प्रकारचे शिक्षक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

पक्षी निरीक्षणाच्या अभ्यासासाठी शॉर्टकट नाही

$
0
0
‘पक्षी निरीक्षणाचा अभ्यास करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. सध्याच्या तरुण पिढीला फक्त माहिती हवी आहे. त्यांची अभ्यास करण्याची इच्छा नाही,’ अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांनी व्यक्त केली.

हिमाचलमध्ये भाजप रिपीट होईल : जाजू

$
0
0
हिमाचल प्रदेशामध्ये कोणत्याही पक्षाला सलग दुस-यांदा सत्ता मिळालेली नाही. मात्र, यावेळी प्रेमचंद धुमल यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पुन्हा सरकार येईल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि हिमाचलचे प्रभारी श्याम जाजू यांनी व्यक्त केला.

विजयदुर्गावर होणार यंदाचे दुर्गसाहित्य संमेलन

$
0
0
दुर्गसाहित्य, दुर्गचर्चा, संवर्धन उपक्रम, प्रदर्शन आदी विविध विषयांना व्यासपीठ देणारे तिसरे दुर्गसाहित्य संमेलन यंदा २६ ते २८ जानेवारी या कालावधीत विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) येणे होणार आहे. गोनीदां दुर्गप्रेमी मंडळातर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

आडत्यांमध्ये बंदवरून फूट

$
0
0
बाजार बंद असतानाही शेतीमालाची आवक होत असल्याने कांदा-बटाटा बाजार विभागातील काही व्यापा-यांनी परस्पर माल खरेदी करून बाहेर पाठविला. या व्यापा-यांवर आडते असोसिएशननने दंडात्मक कारवाई केली असून, हा संघटनेच्या दबावतंत्राचा भाग असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

वाटचाल पर्यटनाच्या दिशेने

$
0
0
पिंपरी- चिंचवडच्या चिरंतन आणि चिरस्थायी विकासासाठी एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला असून, या प्रकल्पाचे मंगळवारी (चार डिसेंबर) सादरीकरण करण्यात आले. या प्रकल्पासाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, याअंतर्गत सिटी सेंटर विकसित करण्याबरोबरच पर्यटन केंद्राचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न राहील, असे सांगण्यात आले.

शिवनेरी, ऐरावतच्या तिकीटदरात वाढ

$
0
0
नाताळच्या सुटीमध्ये प्रवास करणा-यांना आता तिकिटासाठी अधिक पैसे मोजावे लागणार असून, पुणे-बेंगळुरू दरम्यान धावणा-या शिवनेरी व्होल्वोच्या तिकीट दरामध्ये ३०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. प्रवाशांना २१ ते ३१ डिसेंबर दरम्यान ऐरावत आणि शिवनेरी या बसचे तिकीट दर एक हजार तीनशे रुपये असेल.

‘त्याच्या’ जीवासाठी ठेवला ९ तास वीजपुरवठा बंद

$
0
0
वानवडी बाजार परिसरात पहाटे झाडावर चढलेल्या व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी या सर्व परिसरातील वीजपुरवठा सुमारे नऊ तास बंद ठेवण्याची वेळ मंगळवारी आली. सकाळी अकरा वाजता येथील वीजपुरवठा सुरळीत झाला.

सासवडमध्ये डेंगीचे चार पेशंट

$
0
0
शहरात डेंगीचे चार पेशंट आढळल्याने भीतीचे वातावरण असून, सांडपाणी व स्वच्छतेबाबत नगरपालिका प्रशासन उदासीन असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

घरकुलाचा ताबा देण्यात अडचण

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वस्त घरकुल प्रकल्पाचे काम पूर्ण होऊनही तांत्रिक अडचणीमुळे लाभार्थींना ताबा देता येऊ शकत नसल्याचे प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी (चार डिसेंबर) मान्य केले. नवनगर विकास प्राधिकरणाकडून जागेचे पैसे न दिल्यामुळे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मंडई बंदमुळे ग्राहकांची गैरसोय

$
0
0
शासनाने शेतमालावर सहा टक्के आडत घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून पिंपरी-चिंचवडमधील व्यापा-यांचा बंद सुरू आहे. परिणामी शेतकरी आणि ग्राहकांना त्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. ही आडत पूर्वीसारखी दहा टक्केच ठेवावी, अशी मागणी व्यापारी करीत आहेत.

कमर्शिअल सिलिंडरच्या दरात वाढ

$
0
0
आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरच्या दरात ७५ रुपयांनी वाढ झाली. नोव्हेंबरमध्ये एक हजार ७०१ रुपयांना मिळणारा सिलिंडर या महिन्यात एक हजार ७७६ रुपयांना उपलब्ध होणार आहे. दरम्यान केवायसी (नो युवर कस्टमर) अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळाल्याने नागरिकांचा थंडा प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे.

देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरीत स्फोट

$
0
0
देहूरोड येथील शस्त्रास्त्रनिर्मिती कारखान्यात स्फोटके हाताळताना मंगळवारी (चार डिसेंबर) सकाळी झालेल्या अपघातात चार कामगार जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. या सर्वांवर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

रॉकेलसाठी बँक अकाउंट गरजेचे

$
0
0
रेशनवर रॉकेल घेणा-या नागरिकांना यापुढे बँक अकाउंट असणे गरजेचे असणार आहे. रॉकेलवरील सबसिडी थेट ग्राहकाच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार असल्याने रॉकेलधारकांनी आपले बँक अकाउंट नंबर विक्रेत्याकडे द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी मंगळवारी केले.

फेसबुक वाढवतेय समाजिक तेढ

$
0
0
सोशल नेटवर्किंग साइटवर आक्षेपार्ह मजकूर टाकून समाजात तणाव वाढविण्याचा नवा 'उद्योग' सुरू झाला आहे. पोलिसांना फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइटकडून माहिती मिळण्यास ठराविक कालावधी लागत असल्याने नागरिकांनी संयम बाळगावा आणि समाजात तणाव वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

भाजप महिला मोर्चा संग्राम यात्रा काढणार

$
0
0
महागाई, भ्रष्टाचार आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत राज्य शासन निष्क्रिय आहे. नागरिकांच्या मनात शासनाच्या विरोधात तीव्र असंतोष असून या असं‌तोषाला वाट करून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीने ‘संग्राम यात्रा’ आयोजित करण्यात आली असल्याची माहिती मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा नीता केळकर यांनी दिली.

बालवाडी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

$
0
0
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याची राज्यभरात काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून प्राथमिक प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले. शाळांनी दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी आरक्षित २५ टक्के जागांवरील प्रवेशांसाठी हे वेळापत्रक पाळणे सक्तीचे करण्यात आले आहे.

‘कसबा गणपती’वरील खटला निकाली

$
0
0
गणेशविसर्जन मिरवणुकीदरम्यान दाखल करण्यात आलेले काही मंडळांवरील खटले कोर्टात निकाली काढण्यात आले. यात बैलाचा छळ केल्याचा कसबा गणपती मंडळावरील खटल्याचाही समावेश आहे. फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये दाखल अठरा केसेसपैकी आतापर्यंत सहा केसेस निकाली काढण्यात आल्या आहेत.

पुण्यातील बँकांवरील ‘काळा डाग’ कायमच

$
0
0
बँक खात्याचे बनावट स्टेटमेंट देत असल्याचा ठपका ठेवत देशातील १,९४० बँकांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकणा-या ब्रिटनने नव्या वर्षातही तोच डाग, त्याच बँकांवर कायम ठेवला आहे. आमच्यावर अनावश्यक आणि सरसकटपणे लावलेला हा डाग काढण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने कोणताही प्रयत्न केला नाही, असे खापर आता या बँका फोडत आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images