Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

जातीचा दावा खोटा

$
0
0

महापौर नितीन काळजे यांच्यावर तक्रारदारांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘महापौर नितीन काळजे सत्ताधारी पक्षाचे असल्याने त्यांना वाचविण्यासाठी समितीच्या कामकाजामध्ये राजकीय हस्तक्षेप केला जाण्याची शक्यता तक्रारदार घनःश्याम खेडकर यांनी व्यक्त केली. या लढाईत निकाल जर विरोधात गेला तर क्षणाचाही विलंब न करता हायकोर्टात धाव घेणार आहे,’ असे माजी नगरसेवक घनःश्याम खेडकर यांनी रविवारी (६ ऑगस्ट) पत्रकार परिषेदत सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील मुख्याध्यापिकेने महापौर नितीन काळजे यांच्या शाळेच्या दाखल्यावर खोडाखोड करून कुणबी असा उल्लेख केला आहे. तसेच महापौर काळजे यांना मिळालेल्या जातीच्या दाखल्यावर उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नाव एकाचे, सही दुसऱ्याची आणि शिक्का तिसऱ्याचाच असल्याचे समोर आले आहे. याबाबतचे सर्व पुरावे पुण्यातील जात पडताळणी समितीकडे सादर करण्यात आल्याची माहिती तक्रारदार माजी नगरसेवक घनःश्याम खेडकर यांनी दिली. त्याचप्रमाणे महापौर काळजे यांच्यासह संबंधित मुख्याध्यापिका आणि त्यांना कुणबी जातीचा खोटा दाखला देणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.

खेडकर म्हणाले, ‘काळजे यांचे वडील, आजोबा, पणजोबा, चुलते व चुलतभाऊ यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यांवर जातीची नोंद हिंदू-मराठा अशी आहे. हे समितीच्या निदर्शनास आणून दिले आहे. महापौर नितीन काळजे इतर मागासवर्गीयांसाठी राखीव (ओबीसी) या जागेवर निवडून आले आहेत. महापौरपद हे इतर मागासवर्गीयांसाठी राखीव होते. त्यामुळे काळजे महापौर झाले. मात्र, ते ओबीसी नसून त्यांना मिळालेले जात प्रमाणपत्राविरोधात आपण हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने काळजे यांना जात पडताळणी पुन्हा करून घेण्याचे आदेश दिले. कोर्टाच्या आदेशानुसार पुण्यातील जात पडताळणी समितीने काळजे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून तुमचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र का रद्द करू नये अशी विचारणा केली. तसेच २६ जुलै रोजी पहिली सुनावणी घेण्यात आली. ३ ऑगस्ट रोजी दुसरी सुनावणी झाली.

मृणाल ढोले-पाटील म्हणाल्या, ‘काळजे यांच्या कुटुंबाला गावात ९६ कुळी मराठा म्हणूनच ओळखले जाते. गावात वावरताना उच्चवर्णीय म्हणून वावरायचे व आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी फक्त मागासलेले आहोत, असे दाखवायचे हे वागणे चुकीचे व इतर समाजावर अन्याय करणारे आहे. जात पडताळणी समितीवर राजकीय दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सत्य बाहेर येण्यासाठी जातपडताळणी समितीसमोर सादर केलेले काही पुरावे आम्ही माध्यमांसमोर मांडत आहोत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आयुष’साठी हवा ‘पंचसूत्री’वर भर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘आयुष क्षेत्रामध्ये उत्तम प्रगती करण्यासाठी पाच प्रमुख घटकांवर भर देण्याची गरज आहे. त्यात संशोधनाच्या सुविधा वाढविणे, संशोधन संस्थांची निर्मिती, संशोधनाची व प्रशासकीय यंत्रणेची सांगड घालणे, पारंपरिक औषधी टिकवून ठेवणे आणि भविष्यातील संशोधकांसाठी डेटा उपलब्ध करून देणे या पंचसूत्रांवर भर देण्याची आवश्यकता आहे,’ असे मत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) महासंचालक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय आरोग्यशास्त्र विभागामध्ये ‘सेंटर फॉर कॉम्प्लिमेंटरी अँड इंटिग्रेटिव्ह हेल्थ’ (सीसीआयएच) या स्वायत्त केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्राचे उद्घाटन स्वामिनाथन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या वेळी आयुष मंत्रालयाचे विशेष सचिव डॉ. राजेश कोटेचा, ज्येष्ठ कम्प्युटर तज्ज्ञ डॉ. विजय भटकर, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, केंद्राचे संचालक डॉ. भूषण पटवर्धन, प्रा. अनिता कर आदी उपस्थित होते. ‘आयुष’मध्ये नावीन्यपूर्ण वैज्ञानिक संशोधन करण्यासाठी आणि संशोधमनाचा उपयोग हा नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच आरोग्य विभागाला मजबूत करण्यासाठी होणार आहे. केंद्राला नुकताच ‘सेंटर ऑफ एक्स्लन्स’चा दर्जा मिळाला आहे.

डॉ.स्वामिनाथन म्हणाल्या, ‘केंद्र सरकार ‘आयुष’मध्ये नावीन्यपूर्ण संशोधन करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘सेंटर फॉर कॉम्प्लिमेंटरी अँड इंटिग्रेटिव्ह हेल्थ’ची स्थापना करण्यात आली आहे.’ डॉ. करमळकर म्हणाले, ‘आयुष आणि आधुनिक औषधांमध्ये ‘मिक्सिंग’ होण्याऐवजी ‘फ्युजन’ निर्माण होण्याची आवश्यकता आहे. डॉक्टरांनी पारंपरिक औषधांचा वापर करणेच बंद केले आहे. अनेक डॉक्टर हे एकाच प्रकारच्या औषधी देण्यावर भर देत आहेत. त्यामुळे आरोग्यात एकाच क्षेत्राला अवास्तव महत्त्व मिळत आहे.’ . पटवर्धन यांनी स् केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांच्या’ कौतुकाच्या सोहळ्याला नक्की या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘मटा हेल्पलाइन’च्या यंदाच्या शिलेदारांना चेक प्रदान करण्याचा कार्यक्रम येत्या रविवारी (१३ ऑगस्ट) आयोजिण्यात आला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांचे स्फूर्तिदायी शब्द ऐकण्यासाठी विद्यार्थीही आता आतुर आहेत.
बिकट आर्थिक स्थितीशी सामना करून इयत्ता दहावीमध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना ‘मटा हेल्पलाइन’ या उपक्रमाद्वारे आर्थिक मदत दिली जाते. यंदा या उपक्रमात १५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची माहिती बातम्यांच्या स्वरूपात ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाली असून, त्यांच्यासाठी वाचकांच्या मदतीचा प्रचंड ओघ अजूनही सुरू आहे.
वाचकांनी दिलेली ही मदत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांच्या मनात ‘विश्वास’ जागवणारे विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते यंदाच्या शिलेदारांना चेक प्रदान करण्यात येणार आहेत. हा केवळ चेक प्रदान करण्याचा समारंभ नाही, तर या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचा कौतुक सोहळाही आहे. त्याचप्रमाणे ‘मटा’चे वाचक दर वर्षी ज्या विश्वासाने मदत करतात, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचेही हे औचित्य आहे.
आबासाहेब गरवारे कॉलेजच्या सभागृहात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे. प्रतिकूल परिस्थितीच्या पाषाणावर पाय रोवून जिद्दीने अभ्यास करून त्यांनी दहावीमध्ये मार्कांची नव्वदी पार केली. तुमच्या आर्थिक मदतीने आता त्यांना बळ प्राप्त होते आहे आणि त्याच जोरावर ते आणखी उंच भरारी मारण्यासाठी सज्ज होत आहेत. त्यांच्या या भरारीचे साक्षीदार होण्यासाठी तुम्हा सर्वांनाही अगत्याचे निमंत्रण!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात दोन वर्षांत दुष्काळमुक्ती

$
0
0

वॉटर कप कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची ग्वाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘जल, जमीन आणि जंगल याची व्यवस्थित राखण केली, तर राज्यात पुन्हा शेतकरी कर्जमाफीची गरज भासणार नाही. जलयुक्त शिवारसह राज्यात आता साडेचार कोटी वृक्षलागवड केली जात आहे. दुसरीकडे राज्यातील ५४ हजार तलावातील गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. या सर्व उपायांमुळे येत्या दोन वर्षांत राज्यात दुष्काळमुक्ती झालेली असेल,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.

सत्यमेव जयते व पाणी फाउंडेशनच्या वतीने राज्याच्या ३० तालुक्यांतील १३०० गावांमध्ये घेण्यात आलेल्या ‘वॉटर कप’ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात फडणवीस बोलत होते. या वेळी अभिनेते शाहरुख खान, अतुल कुलकर्णी, रिलायन्स फाउंडेशनच्या नीता अंबानी, राजीव बजाज, पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘पावसाच्या पाण्यात माती वाहून जाण्याचे प्रमाण अधिक आहे. नदीकिनारी झाडे लावली पाहिजेत. शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेऊन फळझाडे लावावीत. राज्यात आता गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार, योजना राबविली जाणार आहे. यामध्ये ५४ हजार तलावातील माती काढली जाणार आहे. ‘वॉटर कप’ने राज्यात जलक्रांती झाली. एक व्यक्ती काय करू शकते हे आमीरने दाखवले आहे. नागरिक एकत्र आल्यावर काय घडू शकते १३०० गावातील नागरिकांनी दाखवले आहे. वॉटर कपने ‘जलयुक्त शिवार’ला नवे रूप दिले. असेच काम होत राहिले तर राज्य २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त होईल.’

पुढील वर्षी वॉटर कप स्पर्धा १०० तालुक्यांमध्ये घेण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी केली.

विदर्भातील काकडदरा प्रथम

वॉटर कप स्पर्धेत विदर्भातील काकडदरा गावाला (ता. आर्वी, जि. वर्धा) प्रथम क्रमांक मिळाला. मुख्यमंत्र्यांसह शाहरुख खान व नीता अंबानी यांच्या हस्ते त्या गावास ५० लाखांचे पारितोषिक देण्यात आले. जायभायवाडी (ता. धारूर, जि. बीड) गावाने व भोसरे (ता. खटाव, जि. सातारा) गावाने संयुक्त द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांना १५ लाखाचे पारितोषिक देण्यात आले. तर, बिदाल गाव (ता. माण, जि. सातारा) व पळसखेडा (ता. केज, जि. बीड) या गावांनी संयुक्तरीत्या तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना पाणी फाउंडेशन व राज्य सरकारतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्यात आले. या वेळी फडणवीस यांनी या गावांना एकूण साडेसहा कोटी रुपयांचे पारितोषिके जाहीर केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी हाच खरा देशाचा हिरो: शाहरूख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘शेतकरी हे खरे देशाचे हिरो आहेत. उन्हातान्हात, पावसाळ्यात शेतात कष्ट करतात. एकोपा हीच त्यांची मोठी शक्ती आहे. मनात आणले, तर शेतकरी पाणीदेखील पिकवतील,’ असा विश्वास चित्रपट अभिनेता शाहरूख खान याने सत्यमेव जयते व पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमादरम्यान रविवारी व्यक्त केला.

‘मला मराठीतील, ‘गतिरोधक पुढे आहे,’ एवढेच वाक्य येते. परंतु, शेतकऱ्यांचे काम पाहता गतिरोधक पुढे नाही, याची जाणीव झाली,’ असेही शाहरुख याने सांगितले. विचार कितीही मोठा असला, तरी त्यामागे मेहनत नसेल, तर त्याला काही अर्थ नसतो, असे शाहरुखने या वेळी सांगितले. नीता अंबानी यांनी मराठीतून उपस्थितांशी संवाद साधला. जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह, पोपटराव पवार, डॉ. अविनाश पोळ आदींनीही आपले विचार मांडले. जितेंद्र जोशी, सोनाली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामाच्या तणावामुळे एसटी बस चालकाचा मृत्यू?

$
0
0

पुणे

राज्य परिवहन मार्ग (एसटी) मधील एका बसचालकाचा ५ ऑगस्ट रोजी हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. परंतु या मृत्यूला एसटी प्रशासन जबाबदार असून कामाच्या तणावामुळे माझ्या भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत बसचालकाच्या भावाने केला आहे.

महादेव फुंडे (वय ४१) असं या मृत बसचालकाचं नाव आहे. ते पुणे विभागात गेल्या ९ वर्षापासून एसटीचालक म्हणून कार्यरत होते. महादेव फुंडे हे मूळचे अहमदनगरमधील पाथर्डीचे. तुटपुंज्या मिळणाऱ्या पगारात शहरात राहणे कठीण असल्याने त्यांनी अहमदनगरला राहण्याचा निर्णय घेतला. अहमदनगर जिल्ह्यात बदली व्हावी यासाठी त्यांनी विनंती केली. डिसेंबर २०१६ पासून अहमदनगरमध्ये ड्युटी करत होते. परंतु पुणे विभागाकडून त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांना रोज पाथर्डी ते पुणे अशी ड्युटी करावी लागत होती.

महिन्याला केवळ १० ते १२ हजार रुपये मिळत असल्याने इतक्या कमी पैशांत घर कसं चालवायचं?. तीन मुलं आणि पत्नी यांचा खर्च, नापिक जमीन यामुळे ते नेहमी ही नोकरी सोडण्याच्या विचारात होते. परंतु नोकरी सोडू नको, असे त्यांना आम्ही सांगायचो, असं महादेव फुंडे यांचा मित्र सुभाष खेडकर यांनी सांगितले. मुंबई-गेवराई मार्गावर सकाळी ६ वाजता ड्युटीवर असताना माझ्या भावाला पहिला अटॅक आला. दुसरा अटॅक हा घराजवळ आला असताना आला. त्यावेळी प्रवाशांनी त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले परंतु त्यांचा त्याआधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टारांनी सांगितले. हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची माहिती त्यांची सासू तुलसीबाई बाटुले (५५) यांना माहिती होताच त्यांनाही हार्ट अटॅक आला, असे बाबुराव फुंडे यांनी सांगितले.

दरम्यान, फुंडे परिवाराने केलेले सर्व आरोप हे चुकीचे आहेत, एमएसआरटीसीमध्ये आधीच कमी चालक आहेत, त्यामुळे सर्वांना पुणे विभागातून मुक्त करता येत नाही, असे महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉरपोरेशनचे (MSRTC) पुणे विभागीय नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदाभाऊ खोत यांची 'स्वाभिमानी'तून हकालपट्टी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

राज्याचे कृषि व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांबद्दलच्या त्यांच्या निष्ठा संशयास्पद असल्याचं कारण देत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पक्षाच्या चौकशी समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत आज ही घोषणा केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपप्रणीत एनडीए आघाडीत सहभागी झाल्यानंतर पक्षाच्या कोट्यातून खोत यांना राज्य सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले होते. मात्र, सरकारमध्ये गेल्यानंतर ते संघटनेपासून दूर गेले. त्यातून संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी त्यांचे मतभेद झाले होते. कर्जमुक्तीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चाच्या वेळी खोत यांनी सरकारला अनुकूल भूमिका घेतल्यानं हे मतभेद आणखी तीव्र झाले. तेव्हापासून खोत यांच्या हकालपट्टीची चर्चा होती. मात्र, राजू शेट्टी यांनी थेट कोणताही निर्णय न घेता चार सदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली.

खोत यांनी या चौकशी समितीसमोर आपलं म्हणणंही मांडलं होतं. मात्र, त्यानंतरही ते संघटनेपासूनच अंतर राखून होते. परिणामी त्यांना संघटनेतून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. खोत यांच्यावर सातत्यानं होणाऱ्या आरोपांमुळं संघटनेची बदनामी होत आहे, असा दावा दशरथ सावंत यांनी यावेळी केला. खोत यांनी तात्काळ मंत्रिमंडळातील जागा रिकामी करावी, असंही त्यांना सांगण्यात आलं आहे. तसंच, सरकारमध्ये राहायचं की नाही, याचा निर्णय आठ दिवसांत घेतला जाईल, असं सावंत यांनी स्पष्ट केलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुतात्मा स्तंभाचे काम पुन्हा सुरू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दौंड
हुतात्मा स्तंभाचे बांधकाम अर्धवट झाल्याबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन प्रशासनाने या स्तंभाच्या बंद पडलेल्या कामाला गती दिली आहे. हुतात्मा स्तंभाचे काम अर्धवट असल्याचे वृत्त ‘मटा’मध्ये छायाचित्रासह प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दौंड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित कामाच्या ठेकेदाराला आदेश देऊन तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यानंतर स्मारकाच्या काँक्रिटच्या कॉलमचे काम पूर्ण करण्यात आले. आता स्मारकाचा ढाचा पूर्ण झाला असून, त्यावर सुशोभीकरणासाठी ग्रेनाइट लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
दौंड शहरातील हुतात्मा स्तंभाच्या नूतनीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत होते. या अपूर्ण बांधकामात पावसाचे पाणी साठले होते. त्यात कचरा साठल्याने डासांची पैदास होत होती. दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी या स्तंभाच्या नूतनीकरणाच्या कामाचे वाजतगाजत भूमिपूजन झाले होते. मतदान होऊन निवडणूक निकाल लागण्याच्या दिवसापर्यंत हे काम जोरदार सुरू होते. मात्र, निवडणूक निकाल लागल्यानंतर अचानक हुतात्मा स्तंभाच्या नूतनीकरणाचे काम थांबविण्यात आले. गेले सात महिने हे काम बंद पडले असल्याचे वृत्त ‘मटा’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले. निवडणुकीपूर्वी या कामाची सुरवात करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे निवडणुकीनंतर दुर्लक्ष झाले होते. आता पुन्हा कामाला सुरुवात झाली असून, हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दौंडमध्ये विद्यार्थ्याचा ‘रेबिज’मुळे मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दौंड
दौंड शहरात एका शालेय विद्यार्थ्याला रेबिज झाल्यामुळे आपले प्राण गमवावे लागले. अरमान जलील मण्यार (१४, रा. शिवाजी चौक, दौंड) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
१२ जुलैला घराबाहेर खेळत असताना अरमानला भटका कुत्रा चावला. त्याला दौंड शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला रेबिज प्रतिबंधक लस देऊन उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याची प्रकृती खालावल्यामुळे त्याला पुणे येथे एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान शनिवारी पाहटे अरमानचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षी एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात सेवानिवृत्त शिक्षक जबर जखमी झाले होते.
..
भटक्या प्राण्यांना विशेषतः कुत्र्यांना पकडून कोंडवाड्यात ठेवण्यासाठी एजन्सी नेमण्यात येणार आहे. त्यासाठीची जाहिरात देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
- विजय थोरात, मुख्याधिकारी, दौंड नगरपरिषद
.....
भटक्या कुत्र्यांच्या गंभीर समस्येबाबत मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून लक्ष वेधले होते. अरमानच्या दुर्दैवी मृत्यूनंतर तरी प्रशासनाने तातडीने उपाय योजना कराव्यात.
- जीवराज पवार, नगरसेवक
....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राखीपौर्णिमा उत्साहात

$
0
0

रक्षाबंधनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम
म. टा. प्रतिनिधी, पुणे
मनगटावर बांधलेल्या रेशमी धाग्यातून भाऊ आणि बहीण यांच्या अनोख्या विश्वासाच्या, प्रेमाच्या नात्यातील ऋणानुबंधांची वीण घट्ट करीत सोमवारी घराघरात राखीपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. भावाप्रती कृतज्ञता व्यक्त करून बहिणीने भावाला राखी बांधून औक्षण केले. सामाजिक संघटनांतर्फे विविध उपक्रमांनी राखीपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. झाडांना राखी बांधून ‘वृक्ष वाचवा, पर्यावरण वाचवा’ असा संदेश देण्यात आला तर कुठे पोलिस, पोस्टमन, बसचालकांना राखी बांधण्यात आली.
उत्सवांच्या काळात रात्रंदिवस काम करून नागरिकांना सुरक्षित ठेवणारे पोलिस आणि पारंपारिक वादनाने उत्सवाचा आनंद द्विगुणित करणारे वादक यांचे रक्षाबंधन कर्वेनगर येथील अलंकार पोलिस स्टेशनमध्ये साजरे झाले. या वेळी युवकांनी महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधली.
शिवसाम्राज्य वाद्य पथकातर्फे राखीपौर्णिमेनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या वेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रेखा साळुंखे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक गणेश माने तसेच अमरिश देशमुख, इब्राहिम पिंजारी, पथक प्रमुख अक्षय बलकवडे, शर्वरी जगताप, शांभवी मांडके आदी उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा चौथे वर्ष होते.
‘पोलिसांकडे तक्रारी घेऊन येणारे अनेक जण असतात. परंतु राखी पौर्णिमेसारखा भावनिक सण साजरा करायला येणारे मोजकेच लोक आहेत,’ असे मत साळुंखे यांनी व्यक्त केले.
‘पोलिस हे नागरिकांच्या रक्षणासाठी आहेतच; पण नागरिकांनी जागरूक रहायला हवे. यामुळे गुन्ह्यांना प्रतिबंध घालणे शक्य होईल. वादकांनीदेखील पुढे येऊन पोलिसांना मदत केल्यास विविध कामांसाठी तरुणाईची आवश्यकता आहे,’ असेही त्यांनी सांगितले. बलकवडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
...
पोस्ट कर्मचाऱ्यांना राखी
निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे पोस्टाच्या कर्मचाऱ्यांबरोबर रक्षाबंधन साजरे करण्यात आले. या वेळी त्यांना त्यांच्या आयुष्यातील मुख्य घटक असणाऱ्या पोस्टकार्डची राखी बांधण्यात आली. संस्थेच्या सिद्धीता गटातर्फे जीपीओ मुख्य कार्यालयात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात उपडाकपाल अश्विनी पोतदार,वरिष्ठ डाकपाल आर.एस. गायकवाड, रेखा भळगट,डॉ. प्राजक्ता कोळपकर, शुभांगी धूत, पूनम राठी आदी महिला उपस्थित होत्या. या वेळी सर्व पोस्टमनकाकांना भेटवस्तू देखील देण्यात आल्या. ‘पोस्ट खात्याचे काम कमी झाले असले तरी आजही अनेकदा पत्रव्यवहारासाठी पोस्टमन शिवाय पर्याय नसतो. त्यामुळे त्यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता,’ असे धूत यांनी सांगितले.
मानवी साखळीद्वारे राखी
साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे नूमवि प्राथमिक शाळेत चारशे विद्यार्थ्यांनी मानवी राखी साकारून सफाई कर्मचाऱ्यांबरोबर रक्षाबंधन साजरे केले. या वेळी अभिनेत्री आणि लेखिका विभावरी देशपांडे, मुख्याध्यापिका आशा नागमोडे, सुनिता गजरमल, मंडळाचे अध्यक्ष पीयूष शहा, किशोर आदमणे आदी उपस्थित होते. या वेळी सफाई कर्मचाऱ्यांचे औक्षण करीत त्यांना राख्या बांधण्यात आल्या.
‘सफाई कर्मचारी हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहेत. भाऊ बहि‍णीचे रक्षण करतो, म्हणून राखीपौर्णिमेला बहीण त्याला राखी बांधते, त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेऊन सफाई कर्मचारी देखील आपले रोगराईपासून रक्षण करीत असतात. त्यामुळे त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी,’ असे मत देशपांडे यांनी व्यक्त केले. शहा यांनीही मनोगत व्यक्त केले.
..
झाडांना ‘आपुलकी’ची राखी
पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या झाडांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपुलकी संस्थेतर्फे सिंहगड रोडवरील झाडांना पर्यावरणपूरक राखी बांधण्यात आली. ‘शेणाच्या गोवऱ्यांपासून बनविलेल्या या राख्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. राख्यांमध्ये वापरण्यात आलेले साहित्य झाडांना खत म्हणून उपयोगी ठरणार आहे,’ अशी माहिती आपुलकी संस्थेच्या अध्यक्षा प्राजक्ता समीर रूपदे यांनी दिली. या वेळी सहायक आयुक्त गणेश सोनूने आणि पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते समीर रूपदे, चेतन कुलकर्णी, पियूष चव्हाण, संकेत भट आदींनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रज्ञा शोध परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एनसीईआरटी) इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) राज्यस्तरावर ५ नोव्हेंबर; तर राष्ट्रीयस्तरावरील परीक्षा १३ मे २०१८ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी दिली आहे.
देशभरात ही परीक्षा राज्यस्तर व राष्ट्रीयस्तर अशा दोन स्तरांवर घेण्यात येते. इयत्ता दहावीच्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेवून, त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करण्यात येते. या परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांना पीएचडीपर्यत शिक्षण घेण्यासाठी दर महिन्याला शिष्यवृत्ती देण्यात येते. यामध्ये इयत्ता अकरावी व बारावीसाठी एक हजार २५० रुपये, पदवीचे शिक्षण घेताना प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये; तर पदव्युत्तर पदवीसाठी देखील दोन हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते. पीएचडीच्या वर्षांसाठी विद्यापीठ आयोगाच्या (यूजीसी) नियमानुसार शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. महाराष्ट्रातील सुमारे ३६६ विद्यार्थी राष्ट्रीयस्तराच्या परीक्षेसाठी पात्र होतात.
इयत्ता दहावीत शिकणारा किंवा बाहेरून ही परीक्षा देणारा ज्याचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असेल असा कोणताही विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. ही परीक्षा मुंबई व पुणे या दोन केंद्रावर घेण्यात येणार असून, मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दू, सिंधी, कन्नड व तेलगू या आठ माध्यमांतून देता येणार आहे. एकूण २०० गुणांसाठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत बौद्धिक क्षमता चाचणी ५० गुण, शालेय विषय भाषा चाचणी ५० गुण व शालेय क्षमता चाचणी १०० गुण अशी वर्गवारी असणार आहे. राज्यस्तरावरील परीक्षा ५ नोव्हेंबर तर राष्ट्रीयस्तरावरील परीक्षा १३ मे २०१८ रोजी घेण्यात यणार आहे. या परीक्षेचा अर्ज भरण्याबाबतची माहिती आणि परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक परिषदेतर्फे लवकर जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थी व पालकांना परीक्षेची अधिक माहिती http://mscepune.in या वेबसाइटवर मिळेल, असे डेरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदर्शनातून ‘भारत छोडो’वर प्रकाश

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या घटनासमितीने देशाला घटना दिली असून, या घटनेमुळे लोकशाही टिकून आहे. ही घटना बदलण्याचा कोणी प्रयत्न केला तर देशाची जनता राज्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवून देईल,’ अशी टीका निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल मोती धर यांनी सोमवारी केली.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या अमृत महोत्सवानिमित्त बालगंधर्व कलादालनात छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन धर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महात्मा गांधीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, अॅड. अभय छाजेड, म. वि. अकोलकर, धनंजय दाभाडे, अजित दरेकर, अविनाश बागवे, राजू डांगी, रमेश अय्यर, शेखर कपोते, केदार पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाखो नागरिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. देशाची लोकशाही मजबूत ठेवून देश एकसंध ठेवणे हीच शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल,’ असे धर यांनी सांगितले.
अनिवाश बागवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले; तर विकास लांडगे यांनी आभार मानले. ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या काळातले विविध फोटो, तसेच त्यावेळी वर्तमानपत्रात आलेल्या विविध बातम्यांच्या कात्रणांचे फोटो या प्रदर्शनात पाहण्यास उपलब्ध करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुकांवरून ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांचे आरोप

$
0
0



उत्तरतालिकेतील काही प्रश्नांच्या उत्तरांवर आक्षेप

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेची उत्तरतालिका नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या उत्तरतालिकेत पेपर एकच्या ‘अ’ प्रश्नसंचातील प्रश्न क्रमांक ४८ चे उत्तर चुकले असून, पेपर दोनच्या ‘अ’ प्रश्नसंचातील प्रश्न क्रमांक २५ योग्य असताना तो रद्द केला आहे, असा आरोप परीक्षार्थ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे परीक्षार्थ्यांचे नुकसान होत असून, एमपीएससीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी परीक्षार्थ्यांनी केली आहे. दरम्यान, एमपीएससीने परीक्षार्थ्यांचे आरोप फेटाळून लावले आहे.
एमपीएससीने राज्यातील विविध जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांवर २ एप्रिल जुलै रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेतली. एमपीएससीने परीक्षेची पहिली उत्तरतालिका प्रसिद्ध केली. या उत्तरतालिकेतील काही प्रश्नांच्या उत्तरांवर राज्यातील अनेक परीक्षार्थ्यांनी आक्षेप नोंदविले. या आक्षेपानुसार एसपीएससीने अंतिम उत्तरतालिका १३ जुलै रोजी जाहीर केली. मात्र, या उत्तरतालिकेत पेपर एकच्या ‘अ’ प्रश्नसंचातील प्रश्न क्रमांक ४८ चे उत्तर चुकीचे दिले, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच, पहिल्या उत्तरतालिकेत या प्रश्नाचे उत्तर बरोबर होते. यासोबतच पेपर दोनच्या ‘अ’ प्रश्नसंचातील प्रश्न क्रमांक २५ च्या उत्तरात केवळ बदल करणे अपेक्षित असताना तो प्रश्नच एमपीएसीने रद्द केला आहे. त्यामुळे परीक्षार्थ्यांच्या गुणात देखील फरक पडणार आहे, असे परीक्षार्थ्यांनी सांगितले.
या प्रकारामुळे उत्तरतालिकेनुसार पूर्व परीक्षेत १८५ ते १८८ गुणांच्या दरम्यान असणाऱ्या परीक्षार्थ्यांचे नुकसान होत आहे. काही गुणांच्या अंतराने परीक्षार्थी मुख्य परीक्षा देण्यासाठी अपात्र ठरणार आहे. त्यामु‍ळे एमपीएससीने या प्रकणात योग्य निर्णय घेतल्यास तर परीक्षार्थी मुख्य परीक्षा देऊ शकतील. अशा प्रकारे २०१४ सालामध्ये एमपीएससीने निर्णय घेत परीक्षार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी पात्र केले होते. त्यामुळे एमपीएससीने याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, असे परीक्षार्थ्यांनी सांगितले. दरम्यान, याबाबतचे सर्व आरोप एमपीएससी प्रशासनाने धूडकावून लावले आहेत. एमपीएससी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

परीक्षार्थ्यांकडून प्रश्नांवर येणारे आक्षेप संबंधित विषयांच्या तज्ज्ञांकडे पाठविले जातात. त्या आक्षेपांवर योग्यप्रकारे चर्चा करण्यात येते. त्यासाठी पुरेसा कालावधी दिलेला असतो. तज्ज्ञांचे एकमत झाल्यानंतरच या उत्तरतालिका तयार करण्यात येतात. या कारणाने त्यात चुका होत नाहीत. एमपीएससीचे प्रशासन एखादा निर्णय घेते, तो हजारो परीक्षार्थ्यांचे हित लक्षात ठेऊन घेतला असतो. त्यामुळे अशा प्रकारे परीक्षार्थ्यांचे नुकसान करणारा निर्णय एमपीएससी घेत नाही.
- व्ही. एन. मोरे, अध्यक्ष, एमपीएससी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा असूनही ‘पीजीडीबीएम’ अभ्यासक्रम सुरू

$
0
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘पीजीडीबीएम’ अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची (एआयसीटीई) मान्यता लागत असल्याचे कबूल करत विद्यापीठाच्या नियंत्रणातील कॉलेजांना एआयसीटीईची मान्यता घेण्याचे आदेश दिले. मात्र, राज्यात अजूनही विविध विद्यापीठांशी संलग्नित असणाऱ्या सुमारे ३०० कॉलेजांमध्ये पीजीडीबीएम, पीजीडीएमएम, पीजीडीएफएम असे प्रमुख पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम एआयसीटीईच्या मान्यतेशिवाय सर्रास सुरू आहेत. या कॉलेजांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आदर्श राज्यातील प्रमुख विद्यापीठे घेतील याकडे आता लक्ष लागले आहे.
राज्यात व्यवस्थापन (मॅनेजमेंट) विद्याशाखेत मास्टर्स इन बिझिनेस मॅनेजमेंट (एमबीए), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझिनेस मॅनेजमेंट (पीजीडीबीएम), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट (पीजीडीएमएम), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायनान्स मॅनेजमेंट (पीजीडीएफएम) असे पदवीनंतर दोन वर्षांचे अभ्यासक्रम सुरू आहेत. मॅनेजमेंट विद्याशाखेत चालणारे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी एआयसीटीईची मान्यता घ्यावी लागते, याबाबतची माहिती एआयसीटीईमे हॅंडबुक आणि प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध केली आहे. असे, असताना राज्यात सावळागोंधळ सुरू आहे. राज्यातील कॉलेजांमध्ये ‘एमबीए’ची प्रवेश प्रक्रिया ही सरकारच्या राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे राबविण्यात येते. त्यामुळे राज्यातील अनेक कॉलेजांनी ‘एमबीए’ अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी एआयसीटीईची परवानगी घेतली आहे. मात्र, पीजीडीबीएम, पीजीडीएमएम, पीजीडीएफएम अभ्यासक्रमांचे प्रवेश हे कॉलेजस्तरावर देण्यात येतात. त्यामुळे अनेक कॉलेजांनी हे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी एआयसीटीईची परवानगीच घेतलेली नाही.
एमबीए अभ्यासक्रमाच्या तुलनेत या अभ्यासक्रमांचे शुल्क कमी आहे. त्यामुळे एमबीएला काही कारणास्तव प्रवेश न मिळ‍णारे विद्यार्थी हे या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. एमबीएची प्रवेश प्रक्रिया संपत आली आहे. अशातच काही विद्यापीठांचे पदवीचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाही. अशातच या कॉलेजांमध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्यामु‍ळे पदवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकतात. अशा वेळी विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ शकते. तसेच, एआयसीटीईची मान्यता नसल्याने अभ्यासक्रम बेकायदा ठरून हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना नोकरी मिळविण्यात देखील अडचणींचा सामना करावा लागणार आहे. याबाबत, विद्यापीठांचे कुलगुरू आणि एआयसीटीईकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने तज्ज्ञांकडून आर्श्चय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आमदार मेधा कुलकर्णी यांनी देखील याबाबत एआयसीटीईकडे तक्रार केली आहे. याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

महाराष्ट्रात एआयसीटीईच्या मान्यतेशिवाय अभ्यासक्रम सुरू असल्याचे आढळून आले आहे. त्यांनी अभ्यासक्रम सुरू करताना एआयसीटीईची मान्यता घेणे अपेक्षित होते. मात्र, आता एआयसीटीईच्या यंत्रणेकडून संबंधित कॉलेजांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत.
- डॉ. अनिल सहस्रबुद्धे, अध्यक्ष, एआयसीटीई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेकेदारावर मेहेरबानी

$
0
0

करारनाम्यात बदल करण्याचा स्थायी समितीचा प्रताप

पुणे : शहरातील मिळकतींचे जिओग्राफिक इन्फर्मेशन सिस्टीमद्वारे (जीआयएस) सर्वेक्षण करण्यासाठी पालिकेने ठेकेदाराला घातलेल्या अटींमध्ये, तसेच त्याच्याबरोबरच करण्यात आलेल्या करारनाम्यात बदल करण्याचा ‘प्रताप’ स्थायी‌ समितीने केला आहे. हे काम करण्यासाठीच्या निविदा मान्य करताना पालिकेने घातलेल्या अटींमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. विशेष म्हणजे समितीने देखील याचा मागचा पुढचा विचार न करता याला मंजुरी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

संबधित ठेकेदाराचे हित जपण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा पालिकेत सुरू झाली आहे. महापालिकेच्या हद्दीत येत असलेल्या मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. कर आकारणी आणि कर संकलन कार्यालयाच्या वतीने जीआयएस यंत्रणेचा वापर करून सर्वेक्षण करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. मिळकत वापरातील बदल, वाढीव बांधकाम, कर आकारणी न झालेल्या मिळकती, तसेच जीपीएस अक्षांश, रेखांश मिळकतींचे फोटो काढणे, अशी कामे यामध्ये केली जाणार होती. या प्रक्रियेत पाच ठेकेदार पात्र ठरले होते. त्यापैकी सर्वांत कमी दर दिलेल्या ‘सार आयटी रिर्सोसेस प्रा. लि.’ आणि ‘सायबरटेक सिस्टिम व सॉफ्टवेअर लिमिटेड’ या दोन कंपन्यांना हे काम देण्यात आले होते. प्रत्येक मिळकतीमागे या दोन्ही कंपन्यांना ३४० रुपये दिले जाणार आहेत. संबधित कंपनीने मिळकतीचे सर्वेक्षण केल्यानंतर १० टक्के रक्कम आणि ९० टक्के रक्कम ठेकेदाराने अंतिम बिल काढल्यानंतर दिली जाणार होती. त्याचा करारनामा देखील पालिकेने या दोन्ही कंपन्यांबरोबर केला आहे.

शहरातील मिळकतींचे जीआयएस सर्वेक्षण करताना आर्थिक अडचण भासत असून त्याचा परिणाम मनुष्यबळावर होत आहे. उपलब्ध मनुष्यबळाला प्रत्येक महिन्याला त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला देणे अडचणीचे ठरत असून सर्वेक्षणाचे काम सुरू ठेवण्यासाठी करारनाम्यातील अटींमध्ये बदल करून अधिकची रक्कम पालिकेने द्यावी, अशी मागणी या दोन्ही कंपन्यांनी पालिकेकडे केली होती.

कंपनीने केलेल्या विनंतीनुसार प्रशासनाने करारनाम्यातील अटींमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. नवीन अटीनुसार संबधित कंपनीने प्रत्येक महिन्याला प्रत्यक्ष जागेवर जाऊन मिळकतींचे सर्वेक्षण केल्यानंतर ५० टक्के, पेठ ‌निरीक्षक पातळीवर आल्यानंतर २५ टक्के, तर उर्वरित २५ टक्के रक्कम त्यानंतर देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. निविदा प्रक्रिया मान्य झाल्यानंतर घालण्यात आलेल्या अटीशर्तींना आधीन राहून ठेकेदारांना काम करावे लागते. मात्र, ठेकेदारच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे.
...
शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण जलद गतीने व्हावे, यासाठी करारनाम्यात बदल करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला होता. त्यामुळे पालिकेचे उत्पन्न वाढणार असून चुकीचे असे काहीही केलेले नाही.
- मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष, स्थायी समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुण्यातही वाढणार दहीहंड्यांचे थर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दहीहंडीच्या थरावर घालण्यात आलेले सर्व निर्बंध मुंबई हायकोर्टाने मागे घेतल्याने मुंबई-ठाण्यासह पुण्यातील दहीहंडी पथकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे यंदा पुन्हा हंडीच्या थरांची उंची वाढण्याची शक्यता आहे.

शहराच्या वेगवेगळ्या भागांत मोठ्या प्रमाणात दहीहंडी साजरी केली जाते. या वेळी होणाऱ्या अपघातांमध्ये लहान मुलांना गंभीर इजा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. प्रामुख्याने मुंबईमध्ये हा प्रश्न महत्त्वाचा असला, तरी राज्याच्या इतर भागांमध्येही त्याचे लोण पसरत असल्याने हायकोर्टाने दहीहंडी फोडण्यासाठी रचल्या जाणाऱ्या थरांवर निर्बंध लादले होते. २० फुटांपेक्षा जास्त थर असू नयेत आणि १८ वर्षांखालील लहान मुलांना त्यामध्ये घेण्यात येऊ नये, अशा अटी घालण्यात आल्या होत्या. राज्य सरकारने दिलेल्या प्रतिज्ञापत्रानंतर कोर्टाने सोमवारी या अटी शिथिल केल्या.

पुण्याच्या मध्यवस्तीमध्ये सुवर्णयुग तरुण मंडळ, बाबूगेनू मंडळ अशा मंडळांच्या दहीहंडी मोठ्या उंचीवर असतात. त्यासाठी रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी होत असते आणि उपनगरांतून येणारी अनेक पथके ही उंच हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. कोर्टाने उंचीवरील सर्व निर्बंध मागे घेतल्याने यंदा दहीहंडी पथकांसह आयोजकांमध्येही उत्साह संचारला आहे. त्यामुळे, या वर्षी दहीहंडीचा उत्सव आणखी दणक्यात साजरा होण्याची चिन्हे आहेत. ‘मुंबईच्या तुलनेत पुण्यात दहीहंडीच्या थरांची उंची जास्त नसते. पुण्यात उंचीपेक्षाही संगीताच्या ठेक्यावर ताल धरण्यास आणि विविध सेलिब्रेटींना पाहण्यास जास्त गर्दी होते,’ असे निरीक्षण सुवर्णयुग तरुण मंडळाचे नगरसेवक हेमंत रासने यांनी नोंदविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदाभाऊ खोत यांची हकालपट्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. संघटनेने नेमलेल्या चौकशी समितीने हा निर्णय जाहीर केला असून सरकारमध्ये राहायचे की नाही, याबाबत येत्या आठ दिवसांत संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय होणार आहे. या निर्णयामुळे सदाभाऊ आणि खासदार राजू शेट्टी यांची गेल्या १३ वर्षांची दोस्ती संपुष्टात आल्याने ‘सख्खे मित्र, पक्के वैरी’ झाले आहेत.
चौकशी समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी यांनी पत्रकार परिषदेत हा निर्णयांची घोषणा केली. याबाबत सावंत म्हणाले, ‘खोत यांनी आजवर केलेले काम आणि त्यांच्यावर गेल्या काही दिवसांत झालेल्या आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत आहे. त्यामुळे तत्काळ हा निर्णय घेण्यात आला आहे. समितीने घेतलेल्या या निर्णयाची माहिती संघटनेचे प्रमुख खासदार शेट्टी यांना देण्यात आली आहे,’ असे सावंत म्हणाले.
‘खोत यांना चौकशी समितीकडून प्रश्नावली देण्यात आली होती. त्या प्रश्नावलीला उत्तरे देताना त्यांनी काही महत्त्वाच्या धोरणात्मक आणि नैतिक प्रश्नांना तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेऊन बगल दिली आहे. त्या उत्तरांमधून खोत यांच्या मानसिकतेचे दर्शन झाले आहे. त्यांनी उत्तरांतून केलेला शब्दच्छल समितीला अनावश्यक वाटला. त्यानंतर त्यांना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय समितीने घेतला आहे,’ असे सावंत यांनी स्पष्ट केले.
‘सरकारमध्ये राहायचे की नाही, याबाबतचा निर्णय येत्या आठ दिवसांत कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाईल,’ अशी माहिती चौकशी समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेत चौकशी समितीचे सदस्य आणि संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोपळे, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, सतीश काकडे उपस्थित होते. ‘खोत यांना सत्तासुंदरीचा स्पर्श झाला आणि त्यांना मोह सोडविला गेला नाही,’ ​अशी टिप्पणी पोकळे यांनी केली. सांगलीतील बागणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सदाभाऊंचे पुत्र सागर यांचा झालेला पराभव हा दोन मित्रांमध्ये वादाची ठिणगी पडण्यास कारणीभूत ठरला. त्यानंतर सदाभाऊ स्वाभिमानी शेतकरी संघटनेपासून दूर गेले. संघटनेने वेळोवेळी केलेल्या आंदोलनाकडे पाठ फिरवून त्यांनी भाजपशी सलगी केली. दिवसेंदिवस या घनिष्ठ दोस्तांमध्ये अंतर पडत गेले. ही दरी एवढी वाढत गेली की, शेट्टी यांनी खोत यांच्या वडिलांच्या आजारपणासाठी दिलेल्या उसन्या पैशांचा हिशेबही जाहीरपणे मांडला. सदाभाऊंवर पक्षनिष्ठेबाबत आरोप करण्यात आले. त्यांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली. सुरुवातीला सदाभाऊंनी समितीसमोर येण्यास टाळाटाळ केली. समितीने त्यांना प्रश्नावली दिली. त्यांची उत्तरे देऊन ते समितीला सामोरे गेले. आंदोलनकर्ते शेतकरी आणि सरकार यांच्यातील दुवा बनण्याचे काम केल्याची भूमिका त्यांनी समितीसमोर मांडली. समितीशी चर्चा केल्यानंतर लगेचच त्यांनी बांधाबांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे जाहीर करून स्वतंत्र संघटना स्थापन करण्याचे संकेत दिले होते. तेव्हापासून सदाभाऊंना पक्षातून काढणार का, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर समितीने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
सदाभाऊंचा प्रवास
* शेतकरी संघटनेमध्ये १९९० पासून कार्यरत.
* २००४ नंतर खासदार राजू शेट्टी यांच्याशी दोस्ती.
* स्वाभिमानी शेतकरी संघटनेत २००९ पासून सामील.
* २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघातून निवडणूक लढविली. विजयसिंह मोहिते पाटील यांना कवडी झुंज देऊन सुमारे २५ हजार मतांनी पराभव.
* भाजपतर्फे जून २०१६ मध्ये विधानपरिषदेवर निवड.
* राज्याचे कृषी, पणन राज्यमंत्री म्हणून जुलै महिन्यात मंत्रिमंडळात स्थान.
* जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सदाभाऊंच्या मुलाचा पराभव झाल्यावरून शेट्टी यांच्याबरोबर मतभेद.
* संघटनेकडून होणाऱ्या आंदोलनात सहभाग नाही.
* संघटनेच्या चौकशी समितीला सामोरे गेल्यावर स्वतंत्र संघटना सुरू करून बांधाबांधावर जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याचा निर्धार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशात राज्यघटनेला आव्हान

$
0
0

एस. एम. मुश्रीफ यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘झुंडशाहीत वाढ, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी, चुकीचा इतिहास असे प्रकार आज घडत असून त्याच्या मुळाशी जातीयवाद आणि धर्मांधता आहे. देशातील सध्याचे वातावरण राज्यघटनेला आव्हान देऊ पाहत आहेत. या सर्व समस्यांची मुळे ही उजव्या विचारसरणीच्या जात्यांधतेत दडलेली आहेत,’ अशी घणाघाती टीका माजी विशेष पोलिस महानिरीक्षक एस. एम. मुश्रीफ यांनी सोमवारी केली.

ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन आणि ऑल इंडिया युथ फेडरेशन यांच्यातर्फे देशातील असहिष्णुतेच्या वातावरणाविरोधात कन्याकुमारी ते हुसेनीवाडा असा निघालेला लाँग मार्च सोमवारी पुण्यात पोहचला. या वेळी राष्ट्र सेवा दलाच्या साने गुरुजी स्मारक येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.

कम्युनिस्ट नेत्या आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या शांता रानडे, सहित तिरुमलाई रमण, विश्वजित कुमार, आफताब अलम खान, सईद वलिउल्लाह खादरी, अनिल रोहम, लता भिसे, अरविंद जक्का, तसेच दिल्ली येथून आलेले ‘एआयएसएफ’चे अनेक पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

या वेळी कबीर कला मंचच्या कलाकारांनी शहीद भगतसिंग यांच्यावरील एक गीत सादर केले. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी अमर रहे...भारत वाचवा, देश वाचवा...इन्कलाब जिंदाबाद...पानसरे को लाल सलाम...अशा अनेक घोषणा देत विविध पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी असहिष्णुतेविरोधात एल्गार पुकारला.

केंद्र सरकारची धोरणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे, खासगीकरण, गोहत्या, लेखकांची मुस्कटदाबी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी, अल्पसंख्यांकांवरील हल्ले, गोसेवकांचा धुमाकूळ अशा सर्व प्रकारांवर सभेत टीकेची झोड उठविण्यात आली.
...
देशातील बिघडत चाललेल्या वातावरणात आज विद्यार्थी चळवळींचा पुढाकार आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेस आज धर्मांध शक्तींचा विळखा पडला आहे. त्यापासून आपण वेळीच सावध व्हायला हवे. नागरिकांचे मूलभूत हक्क जपणाऱ्या चळवळी मजबूत होण्याची गरज आहे.
- उमा पानसरे, कम्युनिस्ट नेत्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यायाधीश बदलण्याचा अर्ज फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
रोहित टिळक यांचा अंतरिम जामीन रद्द करण्यासाठीच्या सुनावणीदरम्यान संबंधित न्यायाधीशांकडून चांगली वागणूक, तसेच सहानुभूती मिळत नाही. त्यांच्याकडून योग्य न्याय मिळत नसल्याच्या आरोप करून फिर्यादी महिलेकडून न्यायाधीश बदलण्यासाठी करण्यात आलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम मोडक यांच्या कोर्टाने हा अर्ज फेटाळला. याप्रकरणात संबंधित न्यायाधीशांकडून कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा केल्याचे निदर्शनात येत नाही. फिर्यादी यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसून न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून तारखा दिल्या आहेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. रोहित टिळक यांनी लग्नाचे अामिष दाखवून बलात्कार, अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात कोर्टाने टिळक यांना तात्पुरता अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मात्र, हा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी फिर्यादीतर्फे कोर्टात करण्यात आली आहे.

दरम्यान, कोर्टात फिर्यादी महिलेकडून करण्यात आलेल्या अर्जावर टिळक यांचे वकील अॅड. नंदू फडके यांनी युक्तिवाद केला. आम्ही विशिष्ट कोर्टात सुनावणी घेण्याचा कोणताही आग्रह कोर्टात करत नाही. कोणत्याही पीठासीन अधिकाऱ्यांपुढे हे प्रकरण ठेवण्यास तयार आहोत. टिळक यांच्याविरोधात कोणताही दोष नसताना खोटे आरोप करण्यात येत आहेत. फिर्यादीच्या इच्छेनुसार कोर्ट बदलण्याचा अर्ज करण्यात आला असून त्यामध्ये खोटे आरोप करण्यात आले आहे. परिणामी, हा अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद अॅड. फडके यांनी कोर्टात केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी चोरणाऱ्या दोन जणांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दुचाकीचोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणून १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

महेश रघुनाथ जवरट उर्फ जाधव (वय २६, रा. फुगेवाडी, दापोडी) आणि आकाश राजेंद्र गोळे (वय २०, रा. किवत, जि. भोर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. यातील जाधव याच्याकडून सात दुचाकी, तर गोळे याच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुरेश भोसले, पोलिस निरीक्षक नितीन भोसले पाटील आणि सीताराम मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सराईत गुन्हेगार जाधव टिळख रोडवर असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनला मिळाली. त्यानुसार सहायक निरीक्षक रवींद्र बाबर, संदीप राठोड, संदीप तळेकर, कल्पेश बनसोडे यांनी त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याच्याजवळील दुचाकी चोरीची असल्याचे सांगितले. तसेच, त्याने विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून पाच दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीवर पेण पोलिस ठाण्यात यापूर्वी वाहनचोरीचा गुन्हा दाखल आहे. चोरलेल्या गाड्या फिरवून आरोपी सोडून देत होता. तसेच, कधी-कधी हजार व दोन हजार रुपयांना विक्री करत होता.

साखळीचोरीचा प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने शहरात पेट्रोलिंग सुरू होती. त्या वेळी आशीष गार्डन येथे रस्त्याच्या कड्याला थांबलेल्या गोळे याला सहायक निरीक्षक धनंजय कापरे व उपनिरीक्षक दिनेश पाटील यांच्या पथकाने संशयावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख ८० हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपी पुण्यात मजुरीचे काम करतो. डुप्लिकेट चावी वापरून तो दुचाकी चोरत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images