Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

रागातून नदीत मारली उडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
किरकोळ वादातून एका महिलेने रागाच्या भरात मुठा नदीत उडी मारली. त्यानंतर तिला वाचविण्यासाठी तिच्या मित्राने तिच्या पाठोपाठ नदीत उडी मारली. मात्र, त्यांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडणाऱ्या दोघांना काही नागरिकांनी पाण्याबाहेर काढून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. महापालिकेसमोरील जयंतराव टिळक पुलावर शनिवारी सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास हा प्रकार घडला. घटनेनंतर दोन्ही पुलांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
एरंडवणा येथील एका हॉस्पिटलमध्ये दोघेही नोकरीला असून चांगले मित्र आहेत. महिलेचा मित्र त्यांना सोडण्यासाठी मनपा येथील पीएमपी बसस्टॉपवर येत होता. टिळक पुलावर आल्यानंतर दोघेही काही वेळ गप्पा मारत असताना त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे चिडलेल्या महिलेने थेट मुठा नदीत उडी मारली. त्यांना वाचविण्यासाठी पुरुषानेही पाण्यात उडी मारली. दोघांनी पाण्यात उडी मारल्याचे पुलावरील नागरिकांनी पाहिले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे नदीला भरपूर पाणी आले आहे. त्यामुळे दोघेही पाण्यात वाहत जाऊ लागले. पाण्यात दोघे बुडत असल्याची माहिती मिळताच जीवरक्षक राजेश काची यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांना पाण्याबाहेर काढले. त्यांना दुचाकीवरून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ज्वेलर्स दुकानामध्ये कर्मचाऱ्याकडून चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मालक व दुकानातील इतर कर्मचाऱ्यांची नजर चुकवून सराफ दुकानातील ८८ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी दोघांना पाच ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जितेंद्र रतनचंद संघवी (वय ३८, रा. ५०३, सुपार्श्व टॉवर, भाइंदर, मुंबई) आणि रिना जुबेर शेख उर्फ रिना राजेश सिंग (२५, रा. कॉलीपुट्टा, पश्चिम बंगाल) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी दुकान मालक मनोज पुखराज राठोड (४८, रा. सुजय गार्डन, मुकुंदनगर, पुणे) यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी राठोड यांचे रविवार पेठेत राठोड ज्वेलर्स या नावाने दुकान आहे. त्यांच्या दुकानात एकूण १३ कर्मचारी काम करतात. आरोपी जितेंद्र संघवी हा २०११ पासून सदर दुकानात कामाला होता. दुकानातील सोन्याचे नेकलेस सेट विक्री करण्याचे काउंटर त्याच्या ताब्यात होते. सकाळी दुकान उघडल्यानंतर आणि बंद करताना रोज सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मोजदाद करून ते तिजोरीत ठेवले जात असत. अशाप्रकारे दुकानातील कामकाज चालत असे.
फिर्यादी मनोज राठोड हे २० जुलै रोजी नेहमीप्रमाणे दुकानात आले असता, जितेंद्र संघवी गैरहजर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याच्याविषयी इतर कामगारांना विचारणा केली असता वडीलांच्या आजारपणामुळे तो मुंबईला गेल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे दुकानातील दागिन्यांचे मोजमाप केले असता संघवीच्या ताब्यातील काउंटरवरील ३७ सोन्याचे नेकलेस सेट कमी असल्याचे लक्षात आले. या दागिन्यांचा अपहार झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिसांकडे तक्रार दिली. दोन्ही आरोपींना २७ जुलै रोजी पश्चिम बंगाल येथे शेखच्या घरातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर तेथील कोर्टाकडून २९ जुलैपर्यंतची ट्रान्झिट रिमांड घेऊन त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीडित पुरुषांना दिलासा

$
0
0

कलम ‘४९८ अ’च्या गैरवापराला सुप्रीम कोर्टाचा आळा

Vandana.Ghodekar@timesgroup.com
Tweet : @VandanaaMT

पुणे : महिलांकडून कलम ‘४९८ अ’ अंतर्गत दाखल होणाऱ्या खोट्या तक्रारी आणि कायद्याचा वाढता गैरवापर पाहता सुप्रीम कोर्टाने तक्रार आल्यानंतर लगेचच सासरच्या मंडळींना अटक करता येणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या निकालामुळे ‘४९८ अ’ कलमाच्या गैरवापराला बळी पडणाऱ्या पुरुषवर्गाला दिलासा मिळाला आहे.
कलम ‘४९८ अ’चा महिलांकडून मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जात असल्याची ओरड करण्यात येत होती. कोर्टात या कलमांअंतर्गत दाखल होणाऱ्या प्रकरणांचा अनुभव पाहता सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी काही निर्देश दिले. त्यामुळे आता तक्रार केल्यानंतर प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात येणाऱ्या समितीच्या अहवालानंतरच अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. या निकालामुळे पुरुषवर्गाला दिलासा मिळाला आहे. कोर्टात दाखल होणाऱ्या प्रकरणांमध्ये गरजू महिलेचे प्रकरण लक्षात येते. त्यामुळे ‘४९८ अ’ या कलमाचा गैरवापर थांबण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया पुण्यातील वकिलांनी दिली.
‘सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे खोटी प्रकरणे नोंदविण्याचे प्रमाण कमी होईल. आतापर्यंत विवाहितेकडून तक्रार आल्यानंतर सासरच्या सर्वच लोकांवर गुन्हा दाखल केला जात होता. मात्र आता समितीकडून चौकशी करण्यात आल्यानंतरच अटक करता येणार आहे. त्यामुळे समितीच्या चौकशीमध्येच संबंधित महिलेची तक्रार योग्य आहे किंवा नाही याची शहानिशा होईल. अशा प्रकारची चौकशी करण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या समितीमध्ये चांगल्या सदस्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे,’ असे अॅड. दीपक शामदिरे यांनी सांगितले.
भगिनी हेल्पलाइनच्या संचालिका अॅड. सुप्रिया कोठारी यांनी या कलमाअंतर्गत दाखल होणाऱ्या प्रकरणांची पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्याचा अनुभव लोकांना सांगितला. काही प्रकरणे राजकीय दबावापोटी लगेच दाखल होतात. या कलमाचा वापर करून खोट्या तक्रारी दाखल करून पती आणि सासरच्या मंडळींना त्रास दिला जातो. तक्रार दाखल करणारी महिला गरजू आहे अथवा नाही, हे तिच्या माहितीवरून लक्षात येते. सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे खोट्या केसेस दाखल होण्याचे प्रमाण कमी होईल तसेच त्याचा गैरवापर थांबण्यात मदत होईल, असे अॅड. कोठारी यांनी सांगितले.
‘सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे पुरुष वर्गाला मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे. या कलमाचा गैरवापर यामुळे थांबण्यास मदत होईल,’ असे हायकोर्टात कार्यरत अॅड. आनंद शाळगावकर यांनी सांगितले. अशा प्रकरणांमध्ये अनेकदा हायकोर्टात कलम ४८२ नुसार परस्परसंमतीने ४९८ अ अंतर्गत दाखल करण्यात आलेली फिर्याद निकाली काढण्यात येते. पत्नीकडून सुरुवातीला पतीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात येते. मात्र नंतर प्रकरण मिटविण्यासाठी फिर्याद मागे घ्यावी लागते. अशी फिर्याद निकाली काढण्याचे अधिकार हायकोर्टालाच आहेत, असे अॅड. शाळगांवकर यांनी सांगितले.

काय म्हणते सुप्रीम कोर्ट...
राजेश शर्मा विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार या खटल्यात सुप्रीम कोर्टाने वरीलप्रमाणे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ​संबंधित महिलेकडून तक्रार करण्यात मण्यात आलेल्या समितीच्या चौकशी अहवालानंतरच सासरच्या लोकांना अटक करता येईल असे नमूद केले आहे.
* प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात यावी.
* कलम ४९८ अ अंतर्गत पोलिसांकडे किंवा न्यायदंडाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली तक्रार या समितीकडे चौकशीसाठी सोपविण्यात यावी.
* अहवाल येईपर्यंत कोणालाही अटक करण्यात येऊ नये.
* कुटुंबातील सर्व सदस्यांनी तसेच बाहेरगावी असलेल्या सदस्यांनी सुनावणीच्या वेळेस हजर राहण्याची गरज नाही. त्यांना व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे हजर राहण्याची सवलत द्यावी.
* जामीन अर्ज दाखल असेल तर त्याच दिवशी तो निकाली काढण्यात यावा. हुंड्यातील वस्तू जप्त करायच्या आहेत या कारणावरुन जामीन फेटाळू नये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्गणी संकलनासाठी परवानगी आवश्यक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गणरायाचे आगमन अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपले असताना गणेशोत्सव मंडळाची वर्गणी संकलनासाठी लगबग सुरू आहे. परंतु, वर्गणी संकलनासाठी आता धर्मादाय आयुक्तालयाची परवानगी घेणे गणेश मंडळांवर बंधनकारक करण्यात आले आहे. परवानगी न घेणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाईचा बडगादेखील उगारला जाणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची ज्या मंडळांकडे परवानगी आहे, त्या ट्रस्टना परवानगीची गरज नाही. परंतु, इतरांना ऑनलाइन परवानगी घेता येणार आहे.
अवघ्या एका महिन्यावर गणरायाचे आगमन येऊन ठेपले आहे. शहरात गणेशोत्सव साजरा करणारी ६०० ते ७०० मंडळे कार्यरत आहेत. शहरातील गणेशोत्सव मंडळांना उत्सव साजरा करण्यासाठी वर्गणी संकलन करावे लागते. त्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. अशा मंडळांसाठी परवानगी घेण्यासाठी आयुक्तालयात येण्याची गरज नाही. धर्मादाय आयुक्तालयाने परवानगीची सुविधा आता ऑनलाइन केली आहे. याकरिता www.charity.maharashtra.gov.in या वेबसाइटवर संपर्क कऱणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जात आहे, त्या जागा मालकासह संबंधित पदाधिकाऱ्यांची माहिती देणारी विविध कागदपत्रे, ओळखपत्र देणे परवानगी घेण्यासाठी आवश्यक आहे. तसेच स्थानिक नगरसेवक किंवा ग्रामपंचायतीचे उत्सव साजरे करीत असल्यासंदर्भातील शिफारस पत्र जोडणे; तसेच मंडळाला गेल्या वर्षीचा लेखापरीक्षण अहवाल धर्मादाय आयुक्तालयाकडे सादर करणे आवश्यक ठरणार आहे. प्रत्येक मंडळाला गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर एका महिन्याच्या आत हिशेबपत्रके सादर करणे आवश्यक आहे.
परवानगी घेताना वेबसाइटवर जाऊन नवीन यूजर नोंदणी यावर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी. त्यानंतर माहिती ‘सबमिट’ करून त्याद्वारे आयडी व पासवर्ड मिळेल.

वर्गणीसाठी धाक नको
गणेशोत्सवासाठी वर्गणी गोळा करताना कार्यकर्त्यांनी नागरिकांना वर्गणीसाठी कोणताही धाक दाखवू नये. तसेच नागरिकांकडून वर्गणी गोळा केल्यानंतर त्यांना पावती देणे बंधनकारक आहे. संकलित केलेल्या वर्गणीतून उत्सवासाठीच पैसे खर्च करणे अपेक्षित आहे. उर्वरित रक्कम संस्थेच्या बँकेच्या खात्यावर जमा करावी. तसेच त्याचा हिशेब एका महिन्याच्या आत धर्मादाय आयुक्तालयास सादर करावा, असे आदेश बजावण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय शिक्षण आवाक्याबाहेर जाणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एमबीबीएस आणि बीडीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शुल्कात शैक्षणिक शुल्क समितीने २५ ते ३० टक्के वाढ सुचविलेली असताना आणि साडेचार वर्षांच्या अभ्यासक्रमाचे शुल्क २१ लाख रुपयांपासून ४२ लाख रुपयांपर्यंत गेले असतानाही राज्यातील खासगी महाविद्यालये असमाधानी असून, शुल्कात आणखी वाढ करेपर्यंत प्रवेश प्रक्रियेत सहभागी न होण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांच्या काळजीत भर पडली आहे.

‘वैद्यकीय कॉलेजच्या शुल्कात झालेली वाढ आमच्या प्रस्तावानुसार नाही. आम्ही दिलेल्या प्रस्तावांपेक्षा खूपच कमी प्रमाणात शुल्क वाढविण्यात आले आहे,’ असे खासगी संस्थांचे मत आहे. खासगी संस्थांचे प्रस्ताव मान्य झाल्यास काही महाविद्यालयांचे साडेचार वर्षांचे शुल्क पन्नास लाख रुपयांच्या घरात जाईल, असे सूत्रांनी सांगितले. अनिवासी भारतीयांसाठीच्या, तसेच व्यवस्थापन कोट्यातील जागांचे शुल्क सध्याच दीड कोटी ते पावणेदोन कोटी रुपयांच्या घरात असून, ते आणखी वाढण्याची शक्यता आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे शुल्क सध्याच सर्वसामान्यांच्या आवाक्यातील नाही. खासगी संस्थांची मागणी मान्य झाल्यास ते त्यांच्या कल्पनेच्याही पलीकडे जाईल, असा सूर पालकांमध्ये व्यक्त होत आहे. राज्यात खासगी संस्थांत मध्ये एमबीबीएसच्या १६०० तर बीडीएसच्या ८०० जागा आहेत.

यादी प्रसिद्ध

शुल्क वाढवून मिळेपर्यंत वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत सहभागी न होण्याच्या खासगी महाविद्यालयांच्या भूमिकेमुळे फक्त शासकीय आणि महापालिकेच्या महाविद्यालयांची प्रवेशयादी वैद्यकीय शिक्षण व संशोधन परिषदेतर्फे (डीएमईआर) शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आली. या प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना २ ऑगस्टपर्यत सायंकाळी पाच वाजेपर्यत कॉलेजांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. परराज्यांतील ३९६ विद्यार्थ्यांपैकी ४५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. खासगी महाविद्यालयांच्या प्रवेशाबाबत आताच काही सांगता येणार नसल्याचे डीएमईआरचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी सांगितले.


वैद्यकीय महाविद्यालयांचे वार्षिक शुल्क (रुपयांत)

महाविद्यालय… मेरिट कोटा… व्यवस्थापन कोटा
काशीबाई नवले कॉलेज, पुणे – १०.५० लाख- ३५ लाख
के. जे. सोमय्या, मुंबई – ९.२५ लाख - ३५ लाख
एनकेपी साळवे, नागपूर – ७.०८ लाख – ३८.२५ लाख
डॉ. पंजाबराव देशमुख, अमरावती - ७ लाख - ३५ लाख
माईर्स एमआयटी, तळेगाव – ६.६० लाख - ३३ लाख
डॉ. विखे पाटील, नगर – ६.३० लाख – ३१.५० लाख
तेरणा कॉलेज, मुंबई – ५.४० लाख - २७ लाख

(स्रोत - डीएमईआर वेबसाइट)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून चौकशी सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पाणबुडी निर्मितीच्या दैनंदिन प्रक्रियेची माहिती व्हॉट्सअॅपद्वारे बाहेर येत असल्याचे उघड झाल्यानंतर केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी याबाबतची चौकशी सुरू केली आहे. याबाबतचे वृत्त (मटा, २७ जुलै) प्रसिद्ध झाल्यावर ही चौकशी सुरू झाली आहे. माझगाव डॉकमध्ये परदेशी कंपनीच्या सहकार्याने देशी पाणबुडी बनविण्याचे काम सुरू असून, कामकाजाचा दैनंदिन अहवाल व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर होत असल्याने शत्रूराष्ट्र अथवा स्पर्धक कंपन्या याचा गैरवापर करू शकतात का, याची चाचपणी आता सुरू झाली आहे.
दरम्यान, ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर कोणतीही संवेदनशील माहिती या ग्रुपवर दिली जात नसल्याचे स्पष्ट करतानाच यापुढे खबरदारी घेण्यात येणार असल्याचे माझगाव डॉकच्या वतीने गुरुवारी स्पष्ट करण्यात आले होते. या कंपनीत सहा पाणबुड्या बनविण्याचे काम सुरू असून, त्याच्या कामाच्या प्रगतीचा दैनंदिन अहवाल व्हॉट्सअॅप ग्रुपवरून पाठविला जात असल्याची धक्कादायक माहिती ‘मटा’ने उजेडात आणली. एकीकडे व्हॉट्सअॅप हॅकिंगच्या घटना समोर येत असताना संरक्षणविषयक कामकाजाच्या दैनंदिन घडामोडींचे वरिष्ठांना होणारे रिपोर्टिंग व्हॉट्सअॅपद्वारे होत असल्याचे स्पष्ट झाले.
अत्यंत संवेदनशील आणि गोपनीय कामकाज चालणाऱ्या कंपनीतूनच माहिती बाहेर पडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, या शक्यतेने केंद्रातील बड्या अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली. त्यानंतर आता केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी या प्रकरणात सर्व शक्यतांचा विचार करून चौकशी सुरू केल्याचे शुक्रवारी (२८ जुलै) समजले. ग्रुप सुरू केल्यानंतर तो केवळ दैनंदिन प्रशासकीय कामकाजासाठीच वापरण्यात येत असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, यात दैनंदिन अहवाल असो वा मीटिंग बोलविणे, रिपोर्ट करणे, साहित्याची माहिती देताना त्याचा गैरवापर स्पर्धक कंपन्या किंवा शत्रूराष्ट्रांकडून केला जाऊ शकतो का याचा अंदाज देखील आता तपास यंत्रणांकडून घेण्यात येत आहे.

संरक्षण मंत्रालयाकडून दखल
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाशी संबंधित एका बड्या अधिकाऱ्याकडूनदेखील याबाबत चौकशी करण्यात येणार आहे. संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती मागवून त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे शहर बनतेय साथरोगाचे माहेर

$
0
0

पाच वर्षांत डेंगी, चिकनगुनियाच्या पेशंटांत वाढ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वाढते शहरीकरण, वाहनांच्या संख्येमुळे शहर विकासाच्या दिशेने प्रगती करत असले तरी वाढत्या प्रदूषणामुळे अनेक आजारांनी पुणेकरांना ग्रासल्याचे समोर आले आहे. हवा, पाण्याचे प्रदूषण वाढल्याने गेल्या पाच वर्षांत शहरात चिकनगुनिया, मलेरियाबरोबरच डेंगीच्या पेशंटची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पर्यावरणाच्या सद्यस्थिती अहवालातून हे भीषण वास्तव समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत शहरातील स्वाइन फ्लू (एच१ एन१) पेशंटची संख्या कमी झाली असली तरी, चिकनगुनिया आणि डेंगीच्या पेशंटची संख्या वाढली आहे. तलाव तसेच धरणामधील स्वच्छ पाण्यामध्ये घरातील सांडपाणी, कारखान्यातील दूत पाणी मिसळते. तसेच, शेतातील कीटकनाशके, खते पाण्यात मिसळल्यास पाणी खराब होऊन त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. अनेक दिवसांपासून साठून राहिलेल्या पाण्यामुळे डास तसेच इतर कीटकांची उत्पत्ती होते. परिणामी डेंगी, मलेरिया सारखे आजार होतात. गेल्या पाच वर्षांमध्ये शहरात मलेरिया, डेंगी, स्वाइन फ्लू या आजाराच्या पेशंटची संख्या वाढल्याचा निष्कर्ष अहवालात मांडण्यात आला आहे. २०१५ मध्ये शहरात स्वाइन फ्लू च्या पेशंटची संख्या मोठी होती. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने लसीकरण तसेच औषधोपचाराची व्यवस्था केली. पालिकेच्या हॉस्पिटलबरोबरच खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देऊन जनजागृती केल्याने पेशंटची संख्या आवाक्यात आल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सर्वच भागात पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने अनेक जण पाणी साठवण्यावर भर देतात. अनेक दिवसांपासून साठून राहिलेल्या स्वच्छ पाण्यामध्येही डासांची उत्पत्ती होते. डास चावल्याने मलेरिया होतो. ताप येणे, थंडी वाजणे, थकवा येणे ही या आजाराची लक्षणे असून, तापाबरोबरच अंगदुखी, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, सांध्यांना सूज येणे अशी लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांना चिकनगुनिया झाल्याचा निष्कर्ष काढला जातो. गेल्या सहा वर्षांची आकडेवारी पाहता २०१३ आणि २०१४मध्ये शहरात मलेरियाच्या पेशंटची संख्या सर्वाधिक म्हणजे १४० ते १५० दरम्यान नोंदविण्यात आली. २०१६ मध्ये त्यामध्ये घट होऊन ही संख्या १७ वर आली आहे. तीन वर्षापूर्वी शहरात डेंगीच्या पेशंटची संख्या साडेतीन हजाराच्या घरात गेली होती. त्यानंतर त्यामध्ये काही प्रमाणात घट झाली. मात्र, २०१६मध्ये पुन्हा वाढ होऊन हा आकडा तीन हजारांवर गेला आहे. २०१६ मध्ये चिकनगुनियाच्या पेशंटची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. गेल्या सहा वर्षांत शंभरच्या घरात असलेले चिकनगुनियाचे पेशंट २०१६ मध्ये थेट अडीच हजारावर गेल्याचे पर्यावरण अहवालामध्ये म्हटले आहे.

वर्ष मलेरिया चिकनगुनिया डेंगी
२०११ ९० ८० १००
२०१२ ८० ५० १३०
२०१३ १६० १०० १०००
२०१४ १५० ६० ३५००
२०१५ २५ १२० १३००
२०१६ १५ २५०० ३०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण निमशहरी भागात आज-उद्या बँका सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत असून त्यामध्ये सहभागी होण्याची उद्या (सोमवारी) अंतिम मुदत आहे. त्यामुळे कमी कालावधी आणि शेतकऱ्यांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन ग्रामीण आणि निमशहरी भागातील राष्ट्रीयीकृत बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका व सहकारी बँका आज (रविवारी) आणि उद्या सुरू ठेवण्याचा आदेश रिझर्व्ह बँकेने दिला आहे. तसेच सोमवारी साप्ताहिक सुटी असलेल्या बँकाही उद्या सुरू ठेवाव्यात, असे या आदेशात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अहोरात्र पाण्यासाठी फेरनिविदा काढणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणेकरांना चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेली पाइपलाइन टाकण्यासाठीच्या कामाची १७१८ कोटींची निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याचा विचार केला जात आहे. पालिकेने ठरविलेल्या किंमतीपेक्षा तब्बल २६ टक्के अधिक दराने ही निविदा आल्याने पालिकेला सुमारे ४५० कोटी रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. या योजनेचे काम पाहण्यासाठी नेमलेल्या स्वतंत्र विभागाने ही निविदा मंजूर करणे योग्य होणार नाही, असे पत्रच महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना दिल्याने या कामाची फेरनिविदा काढण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी महापौर बंगल्यावर घेतलेल्या बैठकीत यावर चर्चा झाली. त्या वेळी फेरनिविदा काढण्यावर एकमत झाल्याचे समजते.

नागरिकांना २४ तास पाणी मिळावे, यासाठी समान पाणीपुरवठा ही महत्वकांक्षी योजना पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आणली आहे. सुमारे ३४०० कोटी रूपये खर्च करून तीन टप्प्यांत ही योजना राबविली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील विविध भागात १८३ पाण्याच्या टाक्या बांधणे, दुसऱ्या टप्प्यात १६१८ किलोमीटरची नवीन पाइपलाइन टाकणे तर तिसऱ्या टप्प्यात संपूर्ण शहरात ३ लाख १५ हजार पाण्याचे मीटर बसविले जाणार आहेत. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील पाइपलाइन टाकण्याच्या कामासाठी प्रशासनाने ऑक्टोबर २०१६ मध्ये निविदा प्रक्रिया राबविली होती. यामध्ये अचानक बदल करून पाइपलाइनच्या कामाबरोबरच २२५ कोटी रुपये खर्च करून केबल डक्ट टाकण्याचे काम घेण्यात आले. पालिका आयुक्त कुमार यासाठी आग्रही आहेत.

प्रशासनाने या निविदा उघडल्यानंतर पालिकेने ठरविलेल्या दरापेक्षा २६ टक्के वाढीव दराने ठेकेदारांनी निविदा भरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे १७१८ कोटींचे काम २१५० कोटींवर जाणार आहे. या निविदा प्रक्रियेत रिंग झाल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता. ही निविदा मान्य केल्यास पालिकेचे नुकसान होइल, असे पत्र उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी दिले होते. तीन दिवसांपूर्वी भाजपचे खासदार संजय काकडे यांनीही या निविदेत गोंधळ असल्याची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री बापट यांनी महापौर बंगल्यावर शनिवारी बैठक घेतली. या बैठकीला महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

‘स्मार्ट’ कामही निविदांच्या फेऱ्यातच

शहराला ‘स्मार्ट’ करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना गेल्या वर्षभरापासून केवळ निविदांच्या फेऱ्यांमध्येच अडकल्या आहेत. या कामांमध्ये निर्माण होत असलेली विघ्न आणि त्यामुळे प्रकल्पांना होणारा विलंब यामुळे स्मार्ट सिटीचे पुणेकरांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होण्यास अजून काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी शहरातील सिग्नल अद्यावत करण्यासाठी बसविण्यात येणाऱ्या इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएमएस) आराखड्यात अनेक त्रुटी असल्याने याच्या फेरनिविदा काढण्याचा निर्णय स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पथकांना ‘फ्युजन’चा नाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्राच्या ढोल-ताशा परंपरेतील पारंपरिक ठेक्यांनी तरुणाईला झिंग चढत असताना आता पाश्चात्य संगीतातील बीट्सही ढोल पथकांना खुणावू लागले आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी पारंपरिक आणि पाश्चात्य ठेक्यांचा मेळ घालून वादनाचे एक अनोखे ‘फ्युजन’ पुणेकरांना ऐकायला मिळणार आहे. पारंपरिक वादनाची परंपरा कायम ठेवून त्याला अाधुनिक ‘टच’ देऊन वादनाचा एक नवा आविष्कार सादर करण्यावर पथकांनी भर दिला असून वादनातल्या या अनोख्या प्रयोगांची पुणेकरांनाही उत्सुकता लागून राहिली आहे.
गणेशोत्सवाचे यंदाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे शहरात प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळे जय्यत तयारी करत आहेत. ढोल पथकेही यामध्ये मागे नाहीत. चोखंदळ आणि रसिक पुणेकरांना वादनातून काहीतरी वेगळा कलाविष्कार घडवण्यासाठी पथकांनी कंबर कसली आहे. त्यातूनच आता पारंपरिक ठेक्यांना पाश्चात्य संगीताचा साज चढणार आहे. संस्कृतीचे पालन करत असताना सध्याच्या तरुणाईची आवड लक्षात घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे ताल ढोल-ताशामधून साकारण्याचा पथकांचा प्रयत्न आहे. काही वर्षांपूर्वी पथकांमध्ये ‘वी विल रॉक यू’ या गाण्याची क्रेझ वाढली होती. गाण्यातील ठेके ढोलावर वाजवत अनेकांनी एक नवा प्रयोग आणला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा पारंपरिक वादनावरच पथकांनी भर दिला. आता मात्र, जगभरातले संगीत एका क्लिकवर उपलब्ध होत असल्याने अमेरिका, जपान, कोरिया, आफ्रिका येथील संगीतातील विशिष्ट प्रकारच्या बीट्सचा वापर ठेका बसवण्यासाठी केला जात आहे. गाजलेल्या जागतिक संगीतकारांचे संगीत आणि मराठमोळे ठेके एकत्र करून त्याला एका विशिष्ट लयीत बसवून पथकातली ही वादक मंडळी वादनाचा एक वेगळा दर्जा सादर करण्याच्या प्रयत्नात आहेत.
गेल्या दोन तीन वर्षांपासून ढोल पथके वादनामध्ये अभिनव प्रयोग साकारत आहेत. डफ, संबळ, ढोलकी, दिमडी, चौघडा अशा पारंपरिक वाद्यांचे ठेके ढोल ताशावर बसवून त्यातून तालांची निर्मिती करणे ही काही नवी गोष्ट नाही. पण ड्रम, झेंबे, काहोन अशा पाश्चात्य वाद्यांचे ठेके पारंपरिक वादनात मिसळून त्यातून एक नवे फ्युजन तयार करण्याचा ट्रेंड यंदा मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. पाश्चात्य संगीताचा वापर करताना मात्र, पारंपरिक वादनाकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजीही सर्व पथकांनी घेतली आहे. शिवाय पाश्चात्य संगीतातील ठेक्यांचे आवाज काढण्यासाठी थापी, पिंप, कडी अशा ढोलाच्या इतर अंगांचाही वापर केला जात आहे. त्यामुळे नेहमीच्याच तालांमधून काहीतरी वेगळेपण दाखवण्याचा पथकांचा प्रयत्न आहे.
पथकांनी केलेल्या या अशा फ्युजनमधून ढोल-ताशाची एक वेगळी ओळख तयार होत असून परंपरेच्या पुढे जाऊन नवनिर्मिती करण्याची पथकांचा हा ट्रेंड पारंपरिक वाद्यांना प्रतिष्ठा मिळवून देणारा ठरणार आहे.

पारंपरिक ठेके आजही वादकांमध्ये आणि रसिकांमध्ये लोकप्रिय आहेत. याच ठेक्यांना आधुनिक संगीताची जोड देऊन एक वेगळा ताल ढोल-ताशांमधून तयार करण्याचा प्रयत्न पथके करीत आहेत. त्यातून पुणेकरांना नव्या पद्धतीचे संगीत आणि परंपरेचा अनोखा मेळ पाहायला मिळेल.
- गणेश गुंड, ताशा वादक, रमणबाग युवा मंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपारंपरिक उर्जेच्या वापरात मोठी वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अधिकाधिक नागरिकांनी अपारंपारिक उर्जेचा वापर करावा, यासाठी प्रोत्साहन म्हणून पालिकेने सुरू केलेल्या ‘सौरउर्जेचा वापर’, ‘गांडूळखत प्रकल्प’ तसेच ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ या उपक्रमांना गेल्या काही वर्षात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या योजनांच्या माध्यमातून आतापर्यंत ५७ हजार मिळकतींनी फायदा घेऊन मिळकतकरात सवलत प्राप्त केली आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये हे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. दहा वर्षांपूर्वी योजनांचा फायदा अवघे १२६५ मिळकतधारक घेत होते.
वाढत्या नागरिकरणाची राहण्याची गरज भागविण्यासाठी उंच इमारती उभारल्या जात आहेत. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. पर्यावरणाचा योग्य समतोल राखण्यासाठी पारंपरिक उर्जेबरोबरच अपारंपारिक उर्जेचा देखील वापर करणे गरजेचे आहे. याला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने निवासी इमारतींमध्ये गांडूळखत, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणाऱ्यांना मिळकतकरात (प्रॉपर्टी टॅक्स) पाच ते दहा टक्के सवलत देण्यास सुरुवात केली. पालिकेच्या योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला जात असल्याचे समोर आले आहे. पालिकेने सवलत देण्यासाठी निश्चित केलेल्या प्रकल्पांपैकी एक प्रकल्प केल्यास पाच टक्के तर दोन प्रकल्प केल्यास दहा टक्के सवलत दिली जाते.
गेल्या दहा वर्षांच्या आकडेवारीचा अभ्यास करता दरवर्षी हे प्रकल्प राबविणाऱ्या मिळकतींची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. २०१७ पर्यंत ५७ हजार मिळकतदारांनी प्रकल्प राबविले आहेत. प्रत्येक वर्षी प्रकल्प राबविणाऱ्यांची संख्या सर्वसाधारण सात ते आठ हजारांनी वाढत असून, गेल्या तीन वर्षांमध्ये ही संख्या दहा हजारांनी वाढल्याचे पर्यावरण अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
पालिकेच्या मुख्य इमारतीवर सौर उर्जा प्रकल्प राबविण्यात आला असून, दररोज १०० युनिट विजेची निर्मिती केली जाते. पालिकेच्या इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रात सौर उर्जेवर चालणारी यंत्रणा बसविण्यात आली आहे.

वर्ष एकूण मिळकती
२००७ १,२६५
२००८ ३,४३०
२००९ ७,९२१
२०१० १२,०००
२०११ १४,८०४
२०१२ २३,१७०
२०१३ ३०,०७५
२०१४ ३६,८३२
२०१५ ४५,९८६
२०१६ ५७,०६५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाडा कोसळला; दोघे जण सुखरूप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बुधवार पेठेमध्ये विजयानंद चित्रपटगृहाजवळ जुन्या मारटकर वाड्याचा जिना शनिवारी सकाळी अचानक कोसळला. या वाड्याच्या गॅलरीत अडकलेल्या एका ज्येष्ठ महिलेसह दोघांची अग्निशमन दलाची जवानांनी सुटका केली.
लक्ष्मी केशव पेडणेकर (वय ७०) आणि महेश केशव पेडणेकर (वय ४५) अशी सुटका केलेल्या रहिवाशांची नावे आहेत. बुधवार पेठेतील विजयानंद थिएटरजवळ मारटकर वाड्यात पेडणेकर कुटुंब राहण्यास आहेत. या वाड्याच्या पहिल्या मजल्यावर कुटुंब राहते. हा वाडा जुना झालेला असल्याने त्याचा जिना शनिवारी सकाळी अचानक कोसळला. त्यावेळी पहिल्या मजल्यावर लक्ष्मीबाई पेडणेकर या ज्येष्ठ महिलेसह त्यांच्या कुटुंबातील महेश पेडणेकर हे दोघे अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कसबा केंद्रातील जवान रेस्क्यू वाहनासह दाखल झाले. त्यांनी दोघांचीही तत्काळ सुटका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरज थोड्याशा सहनशीलतेची

$
0
0

रोजच्या वाहतुकीच्या कोंडीने तुम्ही-आम्ही त्रासलो आहोत ना? काही दिवसांपूर्वी ठरावीक अंतर जाण्यासाठी लागणारा १५-२० मिनिटांचा कालावधी आता दुप्पट झाला आहे ना? वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी रस्ता निवडला, तरी तिथेही आता गर्दी वाढल्याचा अनुभव येतो ना? गाडी चालविताना सातत्याने ब्रेक-क्लचचा वापर करावा लागत असल्याने हाता-पायांना विश्रांती हवी आहे का? यासारख्या अनेक प्रश्नांचे स्वरूप गंभीर होत चालले असताना, त्यावर सुरू असलेल्या उपाययोजनांच्या मार्गातही आपणच अडथळे निर्माण करतो आहोत का? आपल्या भविष्यासाठी आणि अर्थातच पुढच्या पिढीला तरी किमान वाहतूक कोंडी आणि प्रदूषणापासून मुक्तता मिळावी, यासाठी थोडा त्रास सहन करण्याची आपली तयारी नाही का? या सगळ्या प्रश्नांचे मोहोळ पुढील कालावधीत सातत्याने उठणार आहे. त्याला आपण कशा पद्धतीने सामोरे जातो, त्यावरच वाहतूक कोंडीच्या चक्रव्यूहातून पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांची सुटका होणार का, याचे भवितव्य अवलंबून असेल.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि होणार, होणार अशा चर्चेमध्ये अत्यंत मोक्याचा वेळ वाया घालवल्यानंतर अखेर पुणे मेट्रो प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. पुणे मेट्रोच्या पिंपरी ते स्वारगेट या मार्गापैकी रेंजहिल्सपर्यंतच्या १० किमीचे काम महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) प्राधान्याने हाती घेतले आहे. पिंपरी ते रेंजहिल्स दरम्यानच्या मेट्रो मार्गाची आखणी (अलायनमेंट) प्रामुख्याने मुख्य रस्त्याच्या दुभाजकावरून (डिव्हायडर) असल्याने त्याच्या उभारणीत अडचणी कमी येतील आणि वेगाने काम करणे शक्य होईल, असा अंदाज होता. मुळात, प्राथमिक स्वरूपातील मेट्रोची अलायनमेंट रस्त्याच्या कडेने होती. त्यामुळे सेवा रस्त्यांवर (सर्व्हिस रोड) ताण येण्याची शक्यता असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेनेच ही अलायनमेंट डिव्हायडरवरून घेण्याची विनंती महामेट्रोला केली होती. त्यानुसार मेट्रोचे काम सुरू करण्यात आले. उन्नत (एलिव्हेटेड) मेट्रोसाठी उभारण्यात येणाऱ्या खांबांचा (पिलर) पाया मजबूतच हवा. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खोदाई करावी लागत असून, त्यानुसार सध्या सहा ते आठ पिलरचे काम सुरू आहे. हे काम करताना वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या निम्म्या भागात बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून, नाशिक फाटा ते खराळवाडी भागात वाहतूक कोंडीत आणखी भर पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
पिंपरीतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने मेट्रोचे काम सुरू असलेल्या काही भागांतील वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्याचा प्रयोग नुकताच करण्यात आला. महामेट्रोने पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगकडून (सीओईपी) वाहतुकीचा आराखडा तयार करून घेतला असून, वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रायोगिक स्वरूपात गेल्या मंगळवारी घेतलेल्या या प्रयोगामध्ये सुरुवातीला गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर तातडीने काही आवश्यक बदल केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाल्याचे चित्र दिसून आले. सायंकाळी पुन्हा थोडा वेळ मोठ्या प्रमाणात वाहनचालकांना कोंडीचा अनुभव घ्यावा लागला असला, तरी त्याचे कारण केवळ मेट्रोमुळे रस्ते बंद झाले हे नव्हते. तर, वाहतुकीसाठीचा मुख्य रस्ता बंद केल्यानंतर पर्यायी रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा ठरतील, अशी अतिक्रमणे राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याची गरज होती. प्रामुख्याने कासारवाडीच्या चौकात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत पद्धतीने थांबलेल्या रिक्षा, फेरीवाले-पथारीवाले यांचा मोठा भरणा आहे. शिवाय महामार्गावरच कित्येक तास पार्किंग असते. पर्यायी रस्त्यापैकी निम्म्याहून अधिक रस्ता यांनीच व्यापल्याने कोंडीत अधिक भर पडत गेली. महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी ही अतिक्रमणे दूर करण्यासाठी आधी पावले उचलली असती, तर कदाचित प्रायोगिक स्वरूपात घेतलेल्या चाचणीच्या दिवशी गोंधळ कमी झाला असता. अर्थात, या चाचणीमुळे किमान कोणत्या अडचणी उद्भवू शकतात, हे तरी समोर आले. यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचा जलद बस वाहतुकीचा (बीआरटी) मार्ग बंदच आहे. तो सुरू होण्याची सुतराम शक्यता नाही. या मार्गाचा वापर दुचाकींना करता येईल, असे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. मेट्रोच्या कामाच्या दरम्यान बीआरटी मार्ग फक्त दुचाकीसाठी न ठेवता हलक्या गाड्यांसाठी खुला केल्यास पर्यायी रस्त्यावर सध्या होणारी कोंडी काही प्रमाणात कमी करता येऊ शकेल. त्याचबरोबर रोज याच रस्त्याने असंख्य वाहनचालकांना प्रवास करावा लागतो. त्यांनी आपली घरून किंवा ऑफिसमधून निघायची वेळ थोडीशी बदलून घेतली, नेहमीपेक्षा १०-१५ मिनिटे लवकर निघायची तयारी केली, तरीही कोंडीत अडकण्यापासून सुटका होऊ शकते.
देशाच्या कोणत्याही भागामध्ये मेट्रोचे काम सुरू झाल्यानंतर काही दिवस त्याचा त्रास होणार हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यातही एलिव्हेटेड मेट्रोसाठी पिलर पूर्ण उभे करेपर्यंतचा रस्त्याचा मोठा भाग वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागतो. पिलर उभे राहिल्यानंतर त्यावर ‘व्हाय-डक्ट’ बसविण्याचे सर्व काम अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने पूर्ण केले जाते. त्याचा वाहतुकीला कोणताही अडसर राहत नाही. (नागपूर मेट्रोच्या सोबतच्या छायाचित्रातून हे स्पष्ट होते.) त्यामुळे पिंपरी ते रेंजहिल्सदरम्यान सर्व पिलरची उभारणी होईपर्यंतच वाहतूक कोंडीला कदाचित सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. पिलर उभे राहिल्यानंतर मेट्रो मार्गिकेच्या कोणत्याच कामासाठी रस्ता बंद ठेवावा लागत नाही. सर्व काम वरच्या वरच सुरू राहते. तसेच, प्राधान्य मार्गाचे काम लवकर सुरू झाल्याने स्वाभाविकच सर्वांत पहिल्यांदा मेट्रोचा हाच मार्ग कार्यान्वित होण्याची दाट शक्यता आहे. हा पहिला मार्ग २०१९-२० या आर्थिक वर्षात सुरू करण्याचे संकेत महामेट्रोने दिले असल्याने पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांना सर्वप्रथम मेट्रोच्या प्रवासाची संधी मिळू शकणार आहे.
महामेट्रोने पुणे-पिंपरीच्या ३१ किमीपैकी हा १० किमीचा (जवळपास एक तृतीयांश) भाग प्राधान्य मार्ग निवडण्याचे कारणच मुळात पुणे-मुंबई रस्त्याची एकूण रुंदी आणि पर्यायी मार्गाची उपलब्धता यावर आधारित आहे. शहराच्या अगदी मध्यवस्तीतून जाणाऱ्या पौड रोड-कर्वे रोडची पहिल्या टप्प्यात निवड केली असती, तर आणखी अडचणींना तोंड द्यावे लागले असते. यापुढील टप्प्यात वनाज ते रामवाडी दरम्यानच्या शिवाजीनगर धान्य गोदामापर्यंतच्या (सिव्हिल कोर्ट) मार्गाचे काम हाती घेतले जाणार आहे. पुणे-मुंबई रस्त्याच्या तुलनेत पौड रोड-कर्वे रोड अरुंद असून, या रस्त्यावरही वाहनांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे या रस्त्याने रोज ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही भविष्यात काही महिन्यांकरता वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. सीओईपीकडून या मार्गावर काम सुरू झाल्यावर पर्यायी मार्ग काय असू शकतात, याची चाचपणी केली जात आहे. पौड-कर्वे रोडवर अडीचशे-तीनशे मीटरचे काम पूर्ण करून मग पुढचे काम करणे, काम सुरू असलेल्या ठिकाणी पार्किंगवर पूर्णतः बंदी, ट्रक-बस अशा जड वाहनांसाठी पर्यायी रस्ते असे काही उपाय करावेच लागणार आहेत. कोथरूड आणि परिसरात राहणाऱ्या नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहेच; पण काही कालावधीसाठी त्याचा त्रास सहन केला, तर २०२०-२१ पर्यंत याच भागातील नागरिकांना मेट्रोने सहज प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.
मेट्रोच्या कामासाठी काही प्रमाणात नागरिकांची, वाहनचालकांची गैरसोय होणार असली, तरी ती कमीत कमी व्हावी, या दृष्टीने सर्वांत महत्त्वाची जबाबदारी महामेट्रोवरही आहे. कोणत्याही भागांत काम सुरू करण्यापूर्वी, कोणता रस्ता बंद असेल? किती काळासाठी हा रस्ता बंद ठेवावा लागणार आहे? संबंधित रस्त्याचा नेमका किती भाग वाहनचालकांना वापरता येईल? महापालिका-वाहतूक पोलिस यांच्या समन्वयातून पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत का? वाहनचालकांना समजेल अशा पद्धतीने काम सुरू असल्याबद्दल माहिती-फलक लावण्यात आले आहेत का? अशा अनेक बाबींवर काम करावे लागणार आहे. पर्यायी रस्ते वाहतुकीला मोकळे राहावेत, यासाठी महामेट्रो आणि महापालिका किंवा इतर नियोजन करणाऱ्या सरकारी-निमसरकारी संस्थांनाही पुढाकार घ्यावा लागणार आहे. तसेच, नियोजित वेळापत्रकानुसारच काम सुरू आहे ना, याकडे महामेट्रोला लक्ष द्यावे लागणार आहे. एखाद्या ठिकाणचे काम अपेक्षेपेक्षा लांबणार असेल, तर वेळीच त्याची पूर्वकल्पना संबंधित सर्व घटकांना देणे वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने सयुक्तिक ठरू शकेल.

खासगी वाहनांवर नियंत्रण हवे
देशातील इतर मेट्रो प्रकल्पांच्या तुलनेत याआधीच पुण्याच्या मेट्रोला खूप उशीर झाला आहे. पुणे महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालातील आकडेवारीवर नजर टाकली, तर गेल्या पाच वर्षांत पुण्यातील वाहनांच्या संख्येत तब्बल नऊ लाखांची भर पडली आहे. त्यात सर्वाधिक वाढ २०१६-१७ याच वर्षात झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात पुण्यातील चारचाकी वाहनांच्या संख्येतही लक्षणीय भर पडली असून, त्यातून रस्त्यांवरील कोंडी वाढत चालली आहे. त्यामुळे आताही आपण मेट्रोचे काम सुरू होऊनही त्याची अडचण होत असल्याची ओरड करत राहिलो, तर वाढत्या वाहनांमुळे रस्त्यावरून गाडी चालवणेही अवघड होऊन बसेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंमलबजावणीच्या प्रतीक्षेतील कायदा

$
0
0

शिक्षणाची गंगा आजवर पोहोचली नसलेल्या एका जमातीतील तरुण मुलगा सरकारी अधिकारी झाला आणि कामानिमित्त तो गाव सोडून शहराकडे निघून गेला. नेमणूक होईल तिथे पत्नी आणि दोन मुलांना घेऊन राहू लागला. हळूहळू गावी येणेजाणेही बंद झाले. एक दिवस निवृत्त झाला. मुलगी लग्नाच्या वयाची झालेली. म्हणून आपल्याच समाजातील मुलाचा शोध घेऊ लागला. त्यासाठी अनेक वर्षांनी गावाकडे गेला. सगळेच बदलले होते. गाव आणि माणसेही! कोण, कुठला आणि कशाला आला, हे सांगितल्यावर गावकी जमली. त्यांनी फर्मान सोडले ‘इतकी वर्षे समाज आणि गाव आठवला नाही. आता मुलीचे लग्न जुळवायला समाजाची आठवण झाली का? दंड भर आणि समाजाची माफी माग, तरच चर्चा होईल. नाही तर कुटुंबावर बहिष्कार!’ गावकीच्या या आदेशाने तो हादरलाच...एका उच्चपदस्थ निवृत्त अधिकाऱ्याची ही कथा आणि व्यथा. मग सामान्यांची काय तऱ्हा असेल?
एका मित्राकडून ही कहाणी ऐकायला मिळाल्यावर जातपंचायती आणि गावकी यांची दहशत लक्षात आली. खरं तर जातपंचायती आणि गावकी ही समाजव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी समाजानेच केलेली समाजमान्य यंत्रणा होती; पण या यंत्रणेनेच समाजव्यवस्था अडचणीत आणली. केवळ समाजव्यवस्थाच नाही, तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क हिरावून घेतला आणि अमानुषतेचा कळस केला.
या जातपंचायती, गावकी आणि तत्सम संस्थांचे कायमचे उच्चाटन करण्यासाठी ‘महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण (प्रतिबंध, बंदी व निवारण) अधिनियम २०१६’ हा कायदा देशात पहिल्यांदा लागू करून महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे; पण केवळ कायदा करून थांबून चालणार नाही, त्यासाठी प्रतिबंधात्मक सक्षम यंत्रणा आणि लोकप्रबोधन यासाठी ठोस उपाययोजना करावी लागणार आहे.
आपल्याकडे कायदे होतात; पण त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात सरकारी यंत्रणा मागे पडते. हा कायदा लागू होऊन जेमतेत तीन आठवडे होत आले आहे. तीन जुलै २०१७ रोजी राष्ट्रपतींनी या कायद्याच्या मसुद्यावर स्वाक्षरी केली आणि राज्यात हा कायदा आला. कायदा येताक्षणी राज्यभर गुन्हेदेखील दाखल होऊ लागले. आतापर्यंत पुण्यात दोन, मुंबई आणि रत्नागिरीतील वैभववाडी​ या ठिकाणी प्रत्येकी एक याप्रमाणे चार गुन्हे या कायद्याअंतर्गत नोंदविले गेले आहेत. हे जागृततेचे लक्षण आहे. मात्र, केवळ गुन्हे दाखल झाले म्हणजे कायद्याचा प्रभावी अंमल सुरू झाला, असे म्हणता येत नाही. हे गुन्हे घडणारच नाहीत, यासाठी पहिले काम जातपंचायतींना कायमची मूठमाती द्यावी लागणार आहे. हे काम सोपे नाही, तसे अवघडही नाही. कायद्याने बंधने घातली गेली असली, तरी अजूनही माणसे जातपंचायतींच्या जोखडातून मुक्त व्हायला तयार नाहीत. त्यांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. या कायद्याचे महत्त्व, त्यातील तरतुदी या खेडोपाडी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य सरकारने मोहीम राबविली पाहिजे. गावोगावी जाऊन या कायद्याची माहिती द्यायला हवी. मात्र, याबाबतीत सरकारी यंत्रणा सोयीस्कर​ काणाडोळा करत आहे की काय, अशी शंका येण्याएवढी यंत्रणा ढिम्म आहे.
एखादा लोकोपयोगी आणि मतदारांना आकर्षित करणारा निर्णय घेतल्यावर त्याची माहिती लोकांना देण्यासाठी सरकारी यंत्रणा अग्रभागी असते. मंत्र्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकजण त्याची वाहवा करतात; पण हा नवीन कायदा आल्यावर त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागलेली दिसत नाही. अर्थात सरकारी यंत्रणेला हे एकच काम नाही हे खरे असले, तरी समाजाची मानसिकता बदलण्यासाठी हे एक धाडसी पाऊल आहे. हे सरकारी यंत्रणेच लोकांना दाखवून द्यायला हवे. देशात पहिल्यांदा असा निर्णय घेऊन राज्य सरकारने पुरोगामित्त्व सिद्ध केले आहे, हे सांगून श्रेय घ्यायला हरकत नाही; पण श्रेय घ्यायलाही कोणी तयार नसावे, एवढी निष्क्रियता या कायद्याच्या प्रचाराबाबतीत आहे. या कायद्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक बहिष्कार बंदी अधिकारी नियुक्त करायचे आहेत. मात्र, त्याबाबतीत काहीही हालचाली झालेल्या नाहीत.
या कायद्याच्या प्रचाराची आणि लोकांच्या प्रबोधनाची गरज काय? कायदा झाला म्हणजे त्याचा वापर सुरू होईल, असे म्हणणे हस्यास्पद होईल. कारण जातपंचायतींची समाजात खोलवर रुजलेली पाळेमुळे उखडून काढणे हे मोठे आव्हान आहे. परंपरेने चालत आलेल्या या जातपंचायतीची विशिष्ट पद्धत असते. तिला एक पाटील असतो. हे पद वंशपरंपरेने चालत आलेले असते. शिवाय एक कोतवाल असतो. तो पंचायत बोलाविणे आणि शिक्षेची अंमलबजावणी करण्याचे काम करतो. जातपंचायती ही एक समांतर न्यायव्यवस्था असते. या जातपंचायतीतील दिलेला निर्णय मान्य करावा लागतो. जातपंचायतीची कार्यपद्धतीदेखील ठरलेली असते. पंचायत बोलाविणारा हा ठरावीक रक्कम पंचांपुढे ठेवतो आणि त्यानंतर गाऱ्हाणे मांडतो. प्रतिपक्षाला बाजू मांडता येते; पण ती महिला असेल तर बाजू मांडू दिली जात नाही. महिलेला दुय्यम स्थान असते.
या पंचायतींकडून अमानुष पद्धतीच्या शिक्षा सुनावल्या जातात. कवडीचा दंड केला गेल्यास तो माणूस कवडीमोलाचा होतो. त्यासाठी सांकेतिक भाषा वापरली जाते. कच्चा चार असेल, तर पक्का दंड हा ४-१५ म्हणजे ६० रुपये असतो. कोणाला जातीबाहेर काढले तर ‘आठ फोडा अन् बाहेर फेका’ म्हणजे त्याच्या नावाने आठ रुपये घेऊन सर्व कुळामध्ये वाटप केले जाते. त्यानंतर तो जातीबाहेर गेल्याचे जाहीर केले जाते.
महिलांना या जातपंचायतींकडून देण्यात येणाऱ्या शिक्षा पाहिल्या, तर अमानुषतेलाही लाज वाटेल. एखाद्या महिलेने गुन्हा केला असल्याचे पंचांनी ठरविल्यास उकळत्या तेलातून पैसे काढणे, झाडाचे पान हातावर ठेवून त्यावर तापलेली कुऱ्हाड ठेवणे, थुंकी चाटण्यास लावणे, निखाऱ्यावरून चालायला लावणे, यांसारख्या अघोरी शिक्षा होतात. कुटुंबांकडून चूक झाल्यास त्यांना वाळीत टाकून त्यांच्याशी रोटीबेटी व्यवहार बंद केले जातात. या सर्व प्रकारांना नवीन कायद्यामुळे कायमचा चाप बसणार आहे. जातपंचायतींप्रमाणे गावकीकडूनही अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात. त्यांच्यावरही कायद्याने बंधने आली आहेत.
हा नवीन कायदा आल्यानंतर १८२७ चा मुंबई विनियम २, जातिमूलक निःसमर्थता निवारण अधिनियम १८५०; तसेच मुंबई समाज बहिष्कार प्रतिबंध अधिनियम १९४९ हे कायदे निरसित झाले आहेत. नवीन कायद्यानुसार जात पंचायती किंवा गावकीकडून टाकण्यात येणारा सामाजिक बहिष्कार हा गुन्हा ठरणार आहे. संबंधित गुन्हेगारांना सात वर्षे कैद आणि पाच लाख रुपयांचा दंड किंवा एकाचवेळी दोन्ही शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त हा कायदा १३ एप्रिल २०१६ रोजी विधिमंडळात मंजूर झाला. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी तो राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला होता. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी तीन जुलै २०१७ रोजी या कायद्याला मंजुरी दिली. या कायद्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खूप प्रयत्न केले. समितीचे संस्थापक दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी प्रदीर्घ लढा दिला.
या कायद्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक बहिष्कार बंदी अधिकारी नियुक्त करावे लागणार आहेत. त्या अधिकाऱ्यांकडून सामाजिक बहिष्काराबाबतच्या गुन्ह्यांचा शोध घेतला जाणार आहे. या कायद्यामुळे अनेक अनिष्ट प्रथांना प्रतिबंध होणार आहे. त्यामध्ये समाजातून वाळीत टाकणे, समाजातील कोणत्याही सदस्याला सामाजिक, धार्मिक, सामूहिक कार्यक्रम; तसेच समाज मेळाव्यात प्रतिबंध करणे, विवाह, अंत्यविधी किंवा इतर विधी संस्कार पार पाडण्यासाठी समाजातील सदस्याचा हक्क नाकारणे, कोणत्याही कारणावरून वाळीत टाकण्याची व्यवस्था करणे, समाजातील व्यक्तीचे व्यावसायिक आणि व्यापारविषयक संबंध तोडण्यासाठी प्रवृत्त करणे, समाजातून काढून टाकण्याची व्यवस्था करणे आदी कृत्ये गुन्हा ठरणार आहेत.
न्याय निवाडा करणारी, फतवे काढणारी गावकी किंवा इतर कोणत्याही नावाने संबोधली जाणारी व्यवस्था, मग ती नोंदणीकृत असो किंवा नसो ही ‘जात पंचायत’ समजली जाणार आहे. जात पंचायत बसवून दंड करणे, वाळीत टाकणे किंवा मानवी हक्कांचे उल्लंघन करणे हा दखलपात्र गुन्हा ठरणार आहे. वाळीत टाकण्याचा आदेश देणारी व्यक्ती ही जातपंचायतीमध्ये प्रत्यक्ष हजर नसली तरीही तो अपराध समजला जाणार आहे. सामाजिक बहिष्कार घालण्याचे धाडस कोणी करणार नाही, एवढ्या तरतुदी या कायद्यात केलेल्या आहेत.

‘देर आये दुरुस्त आये’ या न्यायाने हा कायदा आला आहे. हा कायदा कागदावरच राहू नये, यासाठी जनजागृती झाली पाहिजे. हे काम सरकारी यंत्रणेबरोबरच नागरिकांचेही आहे. दोन्ही यंत्रणा एकत्र आल्यास ‘सामाजिक बहिष्कार’ हा प्रकार कायमचा निघून जाईल.
या कायद्यामुळे जातपंचायतींना प्रतिबंध होणार आहे. मात्र, अद्यापही अनेक जमातींमध्ये जात पंचायती अस्तित्त्वात आहेत. या जातपंचायतींच्या पंचांना शोधून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या जात पंचायती काही ठिकाणी छुप्या पद्धतीने सुरू आहेत. जात पंचायतीच्या बिमोड करण्याबरोबरच संबंधित लोकांचे पुनर्वसन करणे हे कामदेखील झाले पाहिजे. जात पंचायतींचा आदेश मानणाऱ्या बऱ्याचशा जमाती या अजूनही भटकंती करणाऱ्या आहेत. त्यामध्ये पारधी जमात आहे. त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडविणे हीदेखील सरकारी यंत्रणेची जबाबदारी आहे.
- राजश्री काळे
नगरसेविका आणि पारधी समाजाच्या नेत्या

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या कायाद्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न केले. त्या प्रयत्नाला यश आले आहे. मात्र, आता या कायद्याच्या प्रचारासाठी सरकारी यंत्रणेने काम केले पाहिजे. त्यासाठी गावोगावी प्रशिक्षण देणे, या कायद्याची माहिती देणे, अधिकाऱ्यांच्या नेमणुका करणे ही कामे करण्याची गरज आहे. या कायद्याच्या मंजुरीनंतर राज्यात आतापर्यंत चार गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबतीत लोकांमध्ये जागृतता निर्माण होणे आवश्यक आहेत.
- अविनाश पाटील
राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्किट बेंच फक्त नावापुरते

$
0
0

ग्राहक हा राजा असतो...ग्राहक देवो भव म्हणून ग्राहकांना चांगली वागणूक मिळावी, त्यांच्या हक्कांचे आणि हिताचे संरक्षण व्हावे, म्हणून ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणण्यात आला. ग्राहकांच्या न्याय्य हक्कासाठी पुण्यातूनच ग्राहक संरक्षणाची चळवळ सुरू झाली होती. ग्राहकांनी तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना अवघ्या तीन महिन्यांच्या आत निकाल मिळाला पाहिजे, अशी तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता ग्राहकांना न्याय मिळण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते.
पुण्यातील जिल्हा ग्राहक न्याय मंच आणि अतिरिक्त जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडून देण्यात आलेल्या निकालावर अपील करायचे असेल; तसेच वीस लाख रुपयांहून अधिक रक्कमेचे दावे असतील, तर पक्षकारांना राज्य ग्राहक आयोगाकडे मुंबईला दाद मागावी लागत होती. मात्र, राज्यातून दाखल होणाऱ्या या दाव्यांची संख्या लक्षात घेऊन अडीच वर्षांपूर्वी राज्यात चार ठिकाणी सर्किट बेंच (परिक्रमा खंडपीठ) सुरू करण्यात आले.
पुण्यातही सात मार्च २०१५ रोजी हे सर्किट बेंच सुरू करण्यात आले. मुंबईला वाऱ्या कराव्या लागणाऱ्या पक्षकारांच्या आणि वकिलांच्या वाट्याला यामुळे दिलासा मिळेल, असे आश्वासक चित्र सुरुवातीला निर्माण झाले. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या बेंचचे कामकाज सुरू झाले. त्यानंतर मात्र अडथळ्यांचीच सुरुवात झाली. कामकाज चालविण्यासाठी अपुरी जागा, कर्मचारी वर्गाची वानवा, बेंचच्या न्यायिक अधिकाऱ्यांसाठी कोणत्याही सुविधाच नाहीत. पक्षकारांना तर केवळ तारखांवर तारखाच मिळत आहेत. मध्यंतरीच्या काळात तर पुरेशा सुविधा दिल्याशिवाय बेंचचे कामकाजच करणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला होता. त्यावर राज्य सरकारकडून नावापुरता एक अध्यादेश काढून बेंचचे कामकाज सुरू राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले. कागदावरची घोषणा सरकारी अनास्थेमुळे नावापुरतीच राहिली आहे. अडीच वर्षांनंतरही सर्किट बेंचचे कामकाज सुरळीत सुरू होवू शकलेले नाही.
‘कनझ्युमर अॅडव्होकेट्स असोसिएशन’चे अध्यक्ष अॅड. संजय गायकवाड सांगतात, ‘या सर्किट बेंचचे कामकाज पुण्यात केवळ एक आठवडा नाही; तर संपूर्ण महिनाभर चालू असेल, इतके दावे पुण्यातून दाखल होत आहेत. पुण्याला केवळ सर्किट बेंच नाही तर ग्राहक आयोगाचे अतिरिक्त खंडपीठ देण्यात यावे, अशी मागणी वकिल वर्गाकडून वारंवार करण्यात आलेली आहे. त्याची फाइल मंत्रालयात प्रलंबित आहे. सध्या पुण्याला देण्यात आलेल्या सर्किट बेंचसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. त्याचा परिणाम कामकाजावर होऊन पक्षकारांचे नुकसान होते आहे. राज्य ग्राहक आयोगाची मुंबईतील हीच परिस्थिती आहे. एका पक्षकाराची केस १६ वर्षांनी निकाली निघाली, असे अॅड. गायकवाड सांगतात.
पुण्यात सर्किट बेंचचे कामकाज पाहण्यासाठी येणाऱ्या न्यायिक अधिकाऱ्यांनाही पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. न्यायाधीशांचीही गैरसोय होते. बेंच दिले पण त्याचे काम पाहण्यासाठी पदेच मंजूर करण्यात आलेली नाहीत. पुण्यातील बेंचपुढे दाखल असलेल्या केसच्या फाइल ठेवण्यासाठीही पुरेशी जागा नाही. एकाच ठिकाणी ग्राहक मंच, अतिरिक्त ग्राहक मंच आणि सर्किट बेंचचे कामकाज चा​लविण्यात येते. पुण्यातील केसेससाठी एक स्थायी सदस्य द्यावा, अशी आमची मागणी आहे, त्यामुळे किमान आयोगाकडे केस दाखल होणे त्यातील नोटीसा निघणे हे काम तरी सुरू होऊ शकेल. सरकारला या सुविधा पुरविणे शक्य नसेल, तर किमान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सुविधा चांगल्या पद्धतीने सुरू करावी. केसेससंदर्भात माहिती मिळणारी कॉन्फोनेट ही वेबसाइट अद्ययावत करण्यात यावी. अशा प्रकारच्या सर्किट बेंचच्या कामकाजासाठी केंद्र सरकारकडून मिळालेला निधी राज्य सरकारच्या अनास्थेमुळे वापरला गेला नाही. पुण्यातील बेंचचे कामकाज पाहण्यासाठी वेळेवर योग्य सुविधा, जागा, कर्मचारी उपलब्ध केल्यास अनेक प्रश्न मिटतील तसेच बेंचचा उद्देश सफल होईल, असे अॅड. गायकवाड नमूद करतात.
पुण्यात बेंच सुरु करण्यात आल्यानंतर गेल्या अडीच वर्षात केवळ ११६ केस निकाली काढण्यात आल्या आहेत. पुण्याचे पालकमंत्री आणि ग्राहक संरक्षण खात्याचेही मंत्री असलेले गिरीश बापट यांनी बेंचच्या कामकाजासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांच्याकडे वकिलवर्गाने वेळोवेळी पाठपुरावा करूनही ही मागणी पूर्ण झालेली नाही, असे अॅड. गायकवाड म्हणतात.
ज्येष्ठ वकील अॅड. हृषीकेश गानू सांगतात, केसचे कामकाज सुटसुटीपणे आणि तांत्रिकदृष्ट्या कोणत्याही अडचणी न येता व्हावे म्हणून ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणण्यात आला. ग्राहकांकडून दाखल होणाऱ्या केसचे प्रमाणही वाढत गेले. मुंबईला ग्राहक आयोगाकडे दाखल होणाऱ्या केसचा फुगवटा वाढत गेला. हे लक्षात घेऊन ग्राहकांना सोयीचे व्हावे, त्यात समन्वय साधला जावा, म्हणून सर्किट बेंच ही संकल्पना पुढे आली. पुणे, नाशिक, अमरावती, कोल्हापूर येथे बेंच सुरू करण्यात आले. पुण्यात बेंच सुरू झाले, मात्र त्यासाठी लागणाऱ्या सुविधांसाठी कोणतीही तरतूदच करण्यात आलेली नाही. पुण्यातील वाढत्या केस आणि प्रलंबित केस लक्षात घेता बेंचच्या कामकाजाचे दिवस आणखी वाढविणे आवश्यक आहे. त्यामुळे कामाचा निपटारा लवकर होऊ शकेल. न्याय आपल्या दारी या तत्वानुसार बेंच पुण्यात आणण्यात आले खरे; मात्र त्यासाठी चांगली जागा, केस चालविण्यासाठी रचना, कोणती केस सुरू आहे याची माहिती देणारे बोर्ड अशा सुविधा द्यायला हव्यात तरच या बेंचचा हेतू साध्य होऊ शकेल, असे अॅड. गानू सांगतात.
अॅड. डी. जी. संत यांनी, सर्किट बेंचच्या या असुविधांकडे लक्ष वेधले. ग्राहक आयोगाचे बेंच पुण्यात आणणे ही सुविधा चांगली आहे. मात्र त्याचे कामकाज चालविण्यासाठी लागणारी यंत्रणा, स्टाफही पुरविणे आवश्यक आहे. राज्य ग्राहक आयोगाकडून या सर्व प्रश्नांकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. अनेकदा पक्षकारांना पुढील महिन्यांच्या तारखाच मिळतात. मुख्य म्हणजे बेंचचे कामकाज चालविण्यासाठी जागेची अडचण आहे. ग्राहक मंचापुढे कामकाज चालविणाऱ्या वकिल वर्गाकडून याबाबत अनेकदा पाठपुरावा करण्यात आलेला आहे. त्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी भेटी घेऊन मागणी करण्यात आलेली आहे. मात्र या प्रश्नाकडे कोणीच लक्ष देत नाही. पुण्यातील अडीच हजारांहून अधिक केस प्रलं​बित आहेत. त्याचा निपटारा व्हावा याबाबत यंत्रणा उदासीन आहेत. पुण्यातील ग्राहकांच्या सोयीसाठी बेंच दिले खरे मात्र त्याचा हेतू अंशतः साध्य झाला आहे, असे अॅड. संत नमूद करतात.
राज्य सरकारकडून या सर्किट बेंचच्या कामकाजासाठी निधीचा अभाव असल्याचे कारण सांगून कोणत्याही सुविधा देण्याकडे लक्षच देण्यात आलेले नाही. त्यामुळे केवळ पुण्यातीलच नाही; तर इतर ठिकाणच्या बेंचच्या कामकाजाचीही अशीच अवस्था आहे. न्यायाच्या अपेक्षेने, सरकार आणि न्याययंत्रणेवर विश्वास ठेवून तक्रारी घेऊन येणाऱ्या पक्षकारांच्या वाट्याला यामुळे केवळ वर्षानुवर्षे प्रतीक्षाच वाट्याला येते. सामान्य लोकांना सरकारी अनास्थेमुळे मूग गिळून गप्प बसावे लागते. मात्र या सर्वाचा उद्रेक झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. लोकांच्या भावनांचा, त्यांच्या अपेक्षांचा आदर करून त्यांना त्यांच्या हक्काच्या सुविधा देण्यासाठीही कोणीही हालचाल करत नाही, हे चित्रच किती निराशाजनक आहे. वकिलवर्गाकडून याबाबत अनेकदा आवाज उठविण्यात येतो; मात्र त्याकडेही दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे पुण्याला मिळालेले हे बेंच नावापुरतेच उरणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खड्ड्यातील पाण्यात दोन मुलींचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

चिखली परिसरातील जाधववाडी येथे खेळण्यासाठी गेलेल्या दोन मुली खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून मरण पावल्या. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पूनम अजय राजवंशी (वय ५ वर्षे) आणि प्रियांशू जोगिंदर राजवंशी (वय ४ वर्षे, रा. ‍वाघेश्वर कॉलनी, बोऱ्हाडेवाडी, मोशी) अशी या मुलींची नावे आहेत. दोघींचे कुटुंब मूळचे बिहारचे असून त्यांचे आई-वडील या परिसरात मजुरी करतात. चिखली परिसरातील गायरानात उद्यान विकसित करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी येथे पाच ते आठ फूटांचे खड्डे खणण्यात आले आहेत. शनिवारी सायंकाळी या दोघी जणी तेथे खेळण्यासाठी गेल्या. तेव्हा या खड्ड्यातील पाण्यात बुडाल्या. काही नागरिकांनी तेथे पोहोचून त्यांनी या मुलींना खड्ड्यातून बाहेर काढले आणि वायसीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तोपर्यंत दोघींचा मृत्यू झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहगड घाटात दरड कोसळली; काही पर्यटक अडकले

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। पुणे

आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमाराला सिंहगडला जाणाऱ्या मार्गावरील घाटात भलीमोठी दरड कोसळल्याने सिंहगडकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ही दरड कोसळल्याने पर्यटक अनेक तास गडावरच अडकून पडले होते, मात्र सुमारे ३ तासांनंतर सिंहगडाहून येणारा मार्ग (एकेरी वाहतूक) सुरू झाल्यानंतर दुचाकीने गेलेल्या काही पर्यटकांनी आपली सुटका करून घेतली आहे. मात्र, कारने गेलेले पर्यटक अद्यापही गडावरच अडकून पडले आहेत. दरम्यान प्रशासनाने दोन जेसीबीद्वारे ही दरड बाजुला करण्याचे काम सुरू केले आहे.

सिंहगड मार्गावरील घाटात भलीमोठी दरड कोसळू शकते असा अंदाज तेथील सुरक्षा रक्षकांना आला होता. प्रसंगावधान राखून त्यांनी या भागातील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. सुरक्षा रक्षकांच्या या निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला असल्याची चर्चा परिसरात आहे. वर्षा सहलीनिमित्त सिंहगडावर सध्या पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आज रविवार असल्याने गडावर मोठ्या संख्येने पर्यटक आले होते.

पर्यटकांची आजची गर्दी पाहून गडाच्या पायथ्याशी सुरक्षा रक्षकांनी टप्पा वाहतूक पद्धत सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक जगताप यांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सासवड
सासवड नगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक मनोहर ज्ञानदेव जगताप यांना अवैध दारू विक्री प्रकरणी शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. जगताप यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

नगरसेवक मनोहर जगताप हे सासवड येथील उत्तम ढाब्याचे मालक असून त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्याचे आदेश दिले. मनोहर जगताप हे दुसऱ्यांदा काँग्रेसप्रणीत जनमत विकास आघाडीच्या तिकिटावर निवडून आले आहेत. दारूबंदीचा ठराव करणाऱ्या काँग्रेस नगरसेवकांनीच ठरावाची ऐशी तैशी केल्याचे या प्रकरणावरून दिसून आले आहे.

राज्य सरकारने महामार्गापासून ५०० मीटर अंतराच्या परिघात असलेल्या दारू धंद्यांवर टाच आणल्याने सासवड शहरातील जवळपास सर्व दारू धंदे बंद पडले होते. सासवड नगरपालिकेने त्यावर शक्कल लढवीत महामार्ग नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचा ठराव करून राज्य सरकारला पाठवला. सरकारने या ठरावाला केराची टोपली दाखवली. बदनामी टाळण्यासाठी नगरपालिकेने सासवड शहरात दारूबंदीचा ठराव केला. पण नगरसेवकच अवैध दारू विक्री करीत असल्याचे समोर आल्याने या ठरावाचा फोलपणा उघड झाला आहे.

पोलिसांची कारवाई

सासवड शहरात जुगार, मटका, ताडी, दारू अशा माध्यमातून अनेक अवैध धंदे सुरू आहेत. पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी सासवड शहरात पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अशा अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे. शहरात नगरसेवक, माजी नगरसेवक आणि अन्य राजकारण्यांचेच अनेक अवैध धंदे आहेत. पोलिस निरीक्षक पाटील यांनी अशा बड्या धेंडांची पर्वा न करता धडक कारवाई सुरू केली आहे.

शिवसेनेचा आरोप

सासवड शहरातील काँग्रेसचे नेते आणि बहुतांश नगरसेवक हे दारू, मटका, जुगार आणि अवैध धंद्यांशी निगडीत आहेत. ५०० मीटरच्या आत दारू विक्रीवर बंदी आल्यापासून सत्ताधारी काँग्रेसचे नेते कासावीस झालेले आहेत. दारूबंदीचा ठराव करण्याचा अधिकार हा ग्रामसभांचा असतो. त्यामुळे नगरपालिकेने केलेला ठराव मुळात धूळफेक होती. सासवडकरांना फसवून आता काँग्रेसचे नगरसेवक जेजुरी शहरवासियांना फसवण्याच्या तयारीत आहेत, असा आरोप सासवडचे शिवसेना नगरसेवक सचिन भोंगळे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारामतीत अज्ञातांनी पेटवल्या दुचाकी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती
शहरातील हरिकृपानगरमधील अभिनव अपार्टमेंटमधील सहा दुचाकी रविवारी पहाटे अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याचा प्रकार घडला. पहाटे दोन ते अडीचच्या सुमारास अभिनव अपार्टमेंटमधील टी-७ या इमारतीतील पार्किंगमध्ये ठेवलेल्या दुचाकींनी पेट घेतल्याचे समोरच्या अपार्टमेंटमधील एका व्यक्तीच्या लक्षात आले, त्याने तातडीने फोनवरून ही बाब या अपार्टमेंटमधील एका व्यक्तीस सांगितल्यावर हा प्रकार पुढे आला.

अपार्टमेंटमधील संजय भिसे, महेंद्र देशमुख, शेलार यांच्यासह इतरांच्याही सहा दुचाकी या भस्मसात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच ठिकाणी एक चारचाकी वाहनही होते. मात्र, तातडीने चारचाकी बाहेर नेण्यात आल्याने तिचे नुकसान टळले. नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारला विद्यार्थी संघटनांचा इशारा

$
0
0

खासगी मेडिकल कॉलेजांची मुजोरी रोखण्याची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यातील खासगी मेडिकल कॉलेजांनी एमबीबीएस आणि बीडीएसच्या राज्याच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, तसेच राज्य सरकारने खासगी मेडिकल कॉलेजांची मुजोरी फोडून काढण्यासाठी कारवाई करावी. अन्यथा राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय), महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे), युवा सेना, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आदी विद्यार्थी संघटनांनी सरकार आणि कॉलेजांना दिला आहे.

राज्याच्या शिक्षण शुल्क समितीने मेडिकल कॉलेजांना एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक शुल्कात २५ ते ३० टक्क्यांची वाढ करण्याची परवानगी दिल्याने अभ्यासक्रमांच्या शुल्कात भरमसाट वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत कॉलेजांनी आणखी शुल्क वाढवून देण्याची मागणी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडे (डीएमईआर) केली आहे. तसेच, शुल्क वाढवून देईपर्यत राज्याच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणार नाही, अशी भूमिका खासगी कॉलेजांनी घेतली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. सध्या राज्यातील मेडिकल कॉलेजांमधील साडेचार वर्षांचे अभ्यासक्रमाचे शुल्क २१ ते ४२ लाख रुपये आहे. समितीने खासगी कॉलेजांनी केलेल्या मागणीनुसार शुल्कवाढ केल्यास हे शुल्क वाढून ५० लाख रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. ‘एनआरआय’ तसेच व्यवस्थापन कोट्यातील जागांचे शुल्क सध्याच दीड कोटी ते पावणेदोन कोटी रुपयांच्या घरात असून, ते आणखी वाढण्याची शक्यता आहे. कॉलेजांचे शुल्क सध्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाही. खासगी संस्थांची मागणी मान्य झाल्यास ते त्यांच्या कल्पनेच्याही पलीकडे जाईल.

खासगी कॉलेजांच्या मनमानी कारभाराविरोधात राज्याच्या वैद्याकीय शिक्षणमंत्र्यांनी हस्तक्षेप करून संबंधित कॉलेजांवर कारवाईची मागणी अभाविप, एनएसयूआय, मनविसे, युवासेनेने केली आहे. मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी राज्याचे ‍वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी शुल्कवाढ करणाऱ्या कॉलेजांनर कारवाईची मागणी केली आहे. एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख म्हणाले, ‘राज्य सरकारने खासगी कॉलेजांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याचे आदेश द्यावेत. गरज भासल्यास कॉलेजांवर कारवाईची मागणी महाजन यांच्याकडे करण्यात येईल.’ युवा सेनेचे शहराध्यक्ष किरण साळी म्हणाले, ‘नीटची परीक्षा आल्यामुळे कॉलेजांची दुकानदारी बंद झाली आहे. त्यामुळे आता शुल्कवाढ करण्याची भाषा कॉलेज करत आहे. यात सरकारने हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.’

‘सरकार आणि खासगी कॉलेजांच्या संगनमताने हा प्रकार सुरू आहे. कॉलेजांवर कारवाईची करण्ची मागणी राज्य सरकारकडे करण्यात येईल,’ असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राकेश कामठे यांनी सांगितले. ‘आप’चे मुकुंद किर्दत यांनी सरकारने कॉलेजांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अभाविपची मंत्र्यांशी चर्चा

‘अभाविपच्या शिष्टमंडळाने महाजन यांची नुकतीच भेट घेतली आहे. राज्य सरकार आणि शिक्षण शुल्क समितीने खासगी कॉलेजांच्या मागणीला बळी न पडता कॉलेजांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. राज्य सरकारने याबाबत आपली भूमिका तत्काळ जाहीर न केल्यास राज्यात आंदोलने करण्यात येतील,’ असे अभाविपचे प्रदेश महामंत्री राम सातपुते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images