Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सातत्य नसणे हेच एक धोरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘धोरण सातत्य नाही, असे सध्याच्या सरकारबद्दल म्हटले जाते; पण धोरणात सातत्य नसणे हे ही एक ‘धोरण’ आहे. आपली प्रतिक्रिया काय असेल किंवा आपण कोणती कृती करणार आहोत, हे प्रत्येकवेळी शत्रूला का कळू द्यावे? आज आम्ही सर्जिकल स्ट्राइक केले तर उद्या चांगले संबंध ठेऊ शकतो, हे दाखविणारे सध्याचे धोरण आहे. राजकीय इच्छाशक्ती बदलत असून वेगळा प्रयत्न सुरू आहे. चांगल्या परिणामांसाठी वाट पाहावी लागेल,’ अशा शब्दांत माजी पोलिस महासंचालक जयंत उमराणीकर यांनी रविवारी सरकारच्या धोरणांची पाठराखण केली. ‘आपले पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी बलुचिस्तानच्या संघर्षाविषयी बोलतात, तेव्हा त्या मागे मोठा विचार असतो,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.

‘गंधर्ववेद प्रकाशन’तर्फे ज्येष्ठ पत्रकार अरविंद. व्यं. गोखले यांनी लिहिलेल्या ‘संघर्ष बलुचिनस्तानचा’ या पुस्तकाचे प्रकाशन निवारा सभागृह येथे झाले. झी चोवीस तासचे संपादक डॉ. उदय निरगुडकर, लेखक गोखले, प्रकाशक दीपक खाडिलकर, प्रकाश खाडिलकर उपस्थित होते.

‘पाकिस्तानच्या लोकांना खुमखुमी आहे; पण जुन्या लोकांच्या मनात भारताविषयी हळवा कोपरा आहे. तरुणांना भारताविरोधात भडकवले जात आहे. १९६५चे युद्ध सोडले, तर भारतावरील सर्व चढाया काश्मीरमधून झाल्या आहेत. पाकिस्तानचे मानसिक विश्लेषण करणे आवश्यक आहे. ते लोक आक्रस्ताळे का होतात, छोट्या गोष्टींचे पर्वत का करतात, याचा विचार केला पाहिजे,’ यावर उमराणीकर यांनी बोट ठेवले. ते म्हणाले, ‘बलूच लोकांची संख्या पाकिस्तानच्या तीन-चार टक्के आहे. काश्मीरमधील लोकांची संख्या भारताच्या अर्धा टक्के आहे, तरी भारतालाच जास्त त्रास होतो. दुसऱ्या देशांना त्यांच्या संघर्षासाठी मदत करू शकतो. एवढी आपली ताकद आणि क्षमता आता नक्कीच आहे.’

‘देशात बलुचिस्तानविषयी कमी माहिती आहे. आपल्याकडील भावसार समाजाची देवता तिथे आहे. उद्या जगाचा इतिहास मध्य आशियातून लिहिला जाणार आहे. रक्त, अश्रू याचे बलुचिस्तान हे उदाहरण आहे. पंतप्रधानांनी मध्यंतरी बलुचिस्तानविषयी केलेले सूतोवाच नव्हते, तर ती एक घोषणा होती. भारताने मैत्रीचा हात पुढे केला असून भारताची योग्य नजर या भूभागावर आहे. इतर देशांत सपाटून मार खाल्ल्यानंतर दुसऱ्या भागातून देशाला आर्थिक फायदा होतो का या विचारात अमेरिका आहे. बलुचिस्तान अस्थिर राहिला, तर अमेरिकेला फायदा होणार आहे. त्याउलट सुशासन असलेला बलुचिस्तान हे आपले धोरण आहे,’ या शब्दांत निरगुडकर यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा वेध घेतला. सूत्रसंचालन राहुल सोलापूरकर यांनी केले.

ब्रह्मचारी लोक देश चालवतात

‘दोन भावांचे पटते आणि ते एकत्रित व्यवसाय करू शकतात, हे खाडिलकर बंधूंनी दाखवून दिलेले राजकीय आश्चर्य आहे,’ अशी कोटी डॉ. उदय निरगुडकर यांनी भाषणाच्या सुरुवातीला केली. त्यावर ‘ते दोघेही अविवाहित आहे,’ असा आवाज प्रेक्षकांमधून आला. या पुणेरी उत्तराला निरगुडकर यांनी ‘अविवाहित आणि ब्रह्मचारीच लोक सध्या देश चालवत आहे,’ अशा शब्दांत फटकारले आणि सभागृहात हशा उसळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात कडकडीत बंद

$
0
0

शेतकऱ्यांची सरकारविरोधात निदर्शने; बाजारपेठांतील व्यवहार ठप्प

टीम मटा
राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफी, तसेच विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या संपाच्या पाचव्या दिवशी सोमवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावांमध्ये सोमवारी सकाळपासूनच व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून संपाला पाठिंबा दिला. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शने केली. बंददरम्यान दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठा विस्कळित होऊन टंचाई निर्माण झाली.

राजगुरुनगरमध्ये निदर्शने

राजगुरुनगर : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ ला खेड तालुक्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंद दरम्यान रस्त्यांवर शुकशुकाट होता, तसेच तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सरकारी कार्यालये, रुग्णालये आणि औषधांची दुकाने सुरू होती.

शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या विविध शेतकरी संघटनांनी शांततेत आंदोलन करून सरकारचा निषेध केला. सातबारा कोरा झालाच पाहिजे, स्वामीनाथन समितीच्या शिफारसी लागू कराव्यात, तसेच सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या बंदला सत्ताधारी शिवसेना, तसेच विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला. तालुक्यातील राजगुरुनगर, चाकण तसेच कडूस, पाईट, वाडा, चास, वाफगाव या मोठ्या गावांसह बहुतांश गावांमधील बाजारपेठा सोमवारी पूर्णतः बंद होत्या. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून शेतकऱ्यांना पाठिंबा दिला.

दरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी संपामुळे गावोगावच्या आठवडे बाजारांवर लक्षणीय परिणाम झाला आहे. बंद दरम्यान तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी टोल नाक्याजवळ मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. शेतकरी संपाच्या पहिल्याच दिवशी चांडोली टोल नाक्यावर दोन दुधाच्या टँकरमधून हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडून देण्यात आले होते.

जुन्नर तालुक्यात उत्स्फूर्तपणे बंद

जुन्नर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला जुन्नर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जुन्नह बाजार समितीचे ओतूर, बेल्हा, नारायणगाव उपबाजार, तसेच सर्व दुकानदार, हॉटेलचालकांनी व्यवहार बंद ठेवले. काही ठिकाणी वाहनांवर दगडफेकीचे प्रकार वगळता बंद शांततेत पार पडला.

नारायणगाव, ओतूर, आळेफाटा येथील राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य चौकांत पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता, तसेच दंगल नियंत्रक पथकेही सज्ज ठेवली होती. त्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही. महामार्गावरील हॉटेल बंद राहिल्याने प्रवाशांचे मात्र हाल झाले.

छोट्या गावांमध्येही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. बंददरम्यान भाजीपाला, दूध यांची टंचाई झाल्याने नागरिकांचे हाल झाले. सोमवारी सकाळपासूनच शेतकऱ्यांनी बाजारपेठेत जाऊन बंदचे आवाहन केले. नारायणगाव, ओतूर, आळेफाटा, जुन्नर येथे काही ठिकाणी आंदोलकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.

बारामतीत ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

बारामती : कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पाचव्या दिवशी सोमवारी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये येथील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून सहभाग घेतला. विविध पक्ष, संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला होता.

बारामतीतील व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होऊन सकाळपासूनच सर्व व्यवहार बंद ठेवले होते. अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू होत्या. महाराष्ट्र बंदची पूर्वकल्पना असतानाही नागरिकांना काही प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागले. बंदमुळे सरकारी कार्यालये, बँका ओस पडल्या होत्या. गणेश भाजी मार्केट, जुनी मंडई, बाजार समितीत शुकशुकाट होता.

बारामती तालुक्यातील सुपे, मोरगाव येथील बाजारपेठाही बंद राहिल्या. कोऱ्हाळे व करंजेपूल येथे नीरा-बारामती रस्त्यावर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. साखर कामगारांनीही काम बंद ठेऊन शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच शिवसेनेच्या काही तरुण कार्यकर्त्यांनी गावातून मोटारसायकल फेरी काढली होती. शहराच्या उपनगरात काही ठिकाणी व्यवहार सुरू असल्याचे दिसल्यावर या तरुणांनी दुकानदारांना व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले. काही ठिकाणी बाचाबाचीचे प्रकार घडले.

शिरूरमध्ये बाजारपेठेत शुकशुकाट

शिरूर : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला शिरूर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरात सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. शिरूर बाजार समितीच्या आवारात पहाटेपासून होणारी भाजीपाल्याची आवक बंद होती. शहरातील भाजीबाजारासह मुख्य बाजारपेठ बंद होती.

पाच कंदील चौकातील कापड बाजार, सरदार पेठ परिसरातील किराणा मालाची दुकाने, हलवाई चौकातील मिठाईची दुकाने, सोनार बाजारपेठेतील सर्व व्यवहार व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवले. एसटी स्टँड परिसरातील हॉटेलही सकाळपासून बंद होती. बंदमुळे शहरात शेतकऱ्यांनी रतिबासाठी दूध आणले नाही. त्यामुळे दुधाची टंचाई निर्माण झाली होती. भाजीपाल्याचाही तुटवडा निर्माण झाला होता.

सासवडमध्ये संमिश्र प्रतिसाद

सासवड : शेतकरी संपास सक्रिय पाठिंबा देण्यास तयार नसलेले व्यापारी, ठोक व किरकोळ भाजी विक्रिते आणि कापड, सराफ आणि हॉटेल व्यावसायिकांनी अखेर बळीराजा संघटन आणि काही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विनंतीनंतर सोमवारी दुपारनंतर शहरात बंद पाळला.

सोमवार हा आठवडे बाजारचा दिवस असल्याने पुरंदर तालुक्यासह महाड, कोकण आणि नगर, संगमनेर, बारामती भागातून शेतमाल आणि धान्य, कापड विक्रेते व्यवसायासाठी येतात.

संपकरी शेतकऱ्यांच्या आवाहनानंतर या व्यावसायिकांना व्यवसाय बंद करावा लागला. त्यामुळे दुपारनंतर बाजारात शुकशुकाट पसरला. महात्मा गांधी चौकातील धान्य बाजार, कडधान्ये बाजार आणि कापड, बियाणे बाजार बंद राहिल्याने स्थानिक मुलांनी या चौकात क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.

सर्व व्यावसायिकांनी शनिवारी स्वयंस्फूर्तीने बंद पाळून शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिला होता. मात्र, लगेचच सोमवारीही बंदची हाक दिल्याने व्यावसायिकांमध्ये नाराजी होती. त्यामुळे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. औषध दुकाने वगळता सर्व दुकाने बंद होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्यप्रमुखाचे पद रिक्तच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची महानगरपालिका अशी ओळख असलेल्या पुणे महापालिकेला आरोग्यप्रमुख मिळण्यास तयार नाही. पालिकेचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी पालिकेच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर या पदावर पालिकेने अद्यापही पूर्ण वेळ अधिकारी नेमला नाही. आरोग्यप्रमुख म्हणून राज्य शासनाने अधिकारी द्यावा, अशी मागणी पालिकेने सरकारकडे केलेली असतानाही त्यावरही सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही.

महापालिकेत गेली साडेचार वर्षे प्रभारी आरोग्यप्रमुख म्हणून डॉ. परदेशी काम पाहत होते. ३१ मे ला ते पालिकेच्या सेवेतून निवृत्त झाले. डॉ. परदेशी यांच्यानंतर महापालिकेला पूर्णवेळ आरोग्य प्रमुख मिळेल अशी आशा होती. मात्र, आता पुन्हा एकदा या पदावर प्रभारी अधिकाऱ्याची नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली आहे. उपआरोग्य प्रमुख डॉ. अंजनी साबणे यांच्याकडे सध्या हा पदभार देण्यात आला आहे. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची महापालिका म्हणून पुणे महापालिकेचा नावलौकीक आहे. शहराची लोकसंख्या ३५ ते ४० लाखांच्या घरात आहे. झपाट्याने वाढणारे शहर अशी ख्याती असलेल्या पुणे पालिकेला पूर्णवेळ आरोग्य अधिकारी मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, आरोग्य प्रमुख या पदावर राज्य सरकारचा अधिकारी नेमावा, अशी मागणी पालिकेने दोन महिन्यांपूर्वीच सरकारकडे पत्राद्वारे केली होती. मात्र, राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी या पदावर येण्यास अनुत्सुकता दर्शविली. त्यामुळे हे पद रिक्त आहे. या पदावर राज्य सरकारचे अधिकार येण्यास तयार नसल्याने या पदावर पालिकेतील अधिकाऱ्यांना संधी मिळणार आहे. मात्र, या पदावर नियुक्तीसाठी एकही अधिकारी पात्र ठरत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे सद्यस्थितीला जे अधिकारी इच्छुक आहेत. त्यांच्यापैकी कोणाची नियुक्ती करायची याबाबत प्रशासनाने आता राज्य सरकारकडूनच अभिप्राय मागविला आहे.

राज्य सरकार घेणार निर्णय

महापालिकेतील आरोग्य विभागातील कोणत्या अधिकाऱ्याला आरोग्य प्रमुख पदावर संधी मिळणार हे राज्य सरकारच ठरविणार आहे. सरकारचा अभिप्राय येइ‍पर्यंत पालिकेला आरोग्यप्रमुख मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅरिस करारावर भारत ठाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘भारताने हवामानबदलाविषयीच्या पॅरिस कराराबाबत आग्रही भूमिका घेतली होती. आणि भारत आजही आपल्या भूमिकेवर ठाम आहे,’ असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी स्पष्ट केले. त्याचबरोबर जे हा मार्ग (पॅरिस करार) सोडून निघून गेले आहेत, ते लवकरच योग्य मार्गावर परत येतील, अशी टिपण्णीही जावडेकर यांनी अमेरिकेचे नाव न घेता केली.

एका कार्यक्रमानंतर जावडेकर पत्रकारांशी बोलत होते. डिसेंबर २०१५ मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक परिषदेत हा करार करण्यात आला. त्यानंतर डिसेंबर २०१६ मध्ये भारताने त्यावर स्वाक्षरी केली. यामध्ये तत्कालीन पर्यावरणमंत्री म्हणून जावडेकर यांचा सक्रिय सहभाग होता. नुकताच अमेरिकेने या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जावडेकर यांनी ही माहिती दिली.

‘पर्यावरण रक्षण, संवर्धन आणि जीवनसंतुलन हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारताने पॅरिस करारामध्ये सकारात्मक भूमिका घेतली होती. या कराराबाबत भारत ठाम आहे. आम्ही (भारत) आमच्या प्रशस्त मार्गावरून चालत राहू. जे मार्ग सोडून गेले आहेत, ते परत येतील, अशी आम्हाला आशा आहे,’ असे जावडेकर या वेळी म्हणाले.

‘जायकाचे भूमिपूजन लवकरच’

‘मुळा मुठा नदीच्या शुद्धीकरणासाठी एक हजार कोटी रुपयांचा प्रकल्प (जायका अर्थसाहाय्यित) राबविण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्राने ८९० कोटी रुपये मंजूर केले आहेत. पालिकेनेही त्यासाठी तरतूद केली आहे. या प्रकल्पात ११ सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. हे प्रकल्प उभारणाऱ्या कंत्राटदारांनाच दहा वर्षे हा प्रकल्प चालवावा लागणार आहे. या प्रकल्पाचे भूमीपूजन लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल,’ असेही प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाफगावच्या हद्दीत बेकायदा वृक्षतोड

$
0
0

वन आणि महसूल विभागाचे दुर्लक्ष

म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर
खेड तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या वाफगाव गावाच्या हद्दीत जऊळक्याच्या ओढ्यालगत परप्रांतीय टोळक्याकडून झाडांची बेकायदा कत्तल सुरू आहे. हा सर्व प्रकार माहिती असूनही वन विभाग आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. ही झाडे आमच्या हद्दीत येत नसल्याचा दावा दोन्ही विभागांनी केला आहे. मात्र, वृक्षतोड करणारी टोळी आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

खेड तालुक्याच्या पश्चिम व पूर्व भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा वृक्षतोड होत आहे. या प्रकारात परप्रांतीयांच्या दहा-बारा टोळ्या सक्रिय आहेत. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांन या गोष्टींची माहिती आहे. परंतु, या टोळ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. बेकायदा वृक्षतोडीतून लाखो रुपयांची उलाढाल होते. एका टोळीमध्ये साधारण पाच ते सात जण असतात. टोळीतील लोक शेतकऱ्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या शेतातील आणि बांधावरील झाडे विकत घेतात. आर्थिक अडचणींमुळे काही शेतकरी नाईलाजास्तव त्यांच्या जाळ्यात फसतात. अधिसूचित असलेली झाडे तोडण्यासाठी वन विभागाची, तसेच अधिसूचित नसलेल्या झाडे तोडण्यासाठी महसूल विभागाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु, बहुसंख्य शेतकरी आणि टोळ्यांचे ठेकेदार संबंधित दोन्ही विभागांची परवानगी घेत नाहीत. एकदा झाडे विकत घेतली की टोळीवाले कटिंग मशिनने सरसकट लहान मोठ्या सर्वच झाडांची कत्तल करतात. या टोळ्या चोरट्या पद्धतीने ओढे आणि नदीकाठच्या झाडांचीही सर्रास कत्तल करतात. झाडे तोडल्यानंतर लाकडाची रात्रीच्या वेळी वाहतूक केली जाते.

वन कर्मचाऱ्यांना लाच

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक गाडीमागे ठराविक रक्कम देऊन बेकायदा तोड केलेल्या लाकडांची वाहतूक केली जाते, असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका वन कर्मचाऱ्याने सांगितले. तसेच तोडलेला माल रांजणगाव एमआयडीसीमधील काही कंपन्या, तसेच पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविला जात असल्याचेही या कर्मचाऱ्याने सांगितले. दरम्यान, चाकण येथील वन विभागाच्या चेक पोस्टवर रोज रात्री लाकडांची मुंबईला वाहतूक करणाऱ्या गाडी चालकांकडून सक्तीने टोल वसुली केली जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखी मार्गावर अतिक्रमणांचा अडथळा

$
0
0

कारवाईबद्दल सरकारी विभागांची अनास्था

म. टा. प्रतिनिधी, हडपसर
हडपसर-भेकराई-सासवड-जेजुरी चौपदरीकरण रस्ता रखडला आहे. या पालखी मार्गावर अतिक्रमणे वाढत असल्याने वाहतूक कोंडीत मोठी भर पडत आहे. हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेला रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे नुकताच वर्ग केला आहे. पालखी मार्गातील अतिक्रमणे हटवण्याची जबाबदारी दोन्ही कार्यालये एकमेकांवर ढकरत आहेत.

आषाडी एकादशीसाठी लाखो वारकरी श्री संत ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखी मार्गाने माऊलीचा जयघोष करीत पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला जातात. या मार्गावरील अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे हडपसर-सासवड येथील पालखी मार्गातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

हडपसर-सासवड-जेजुरी रस्ता चौपदरीकरणाचे काम मागील पाच वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे तुकाईदर्शन ते वडकीपर्यंत मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामध्ये रस्त्याच्या कडेला अनुधिकृत चायनीज पदार्थांचे स्टॉल, फळांची दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने थाटली आहेत. येथील वाहतूक सुरळीत होण्यासाठी या मार्गावरील अडथळा ठरणारी शंभर वर्षे जुनी झाडे तोडण्यात आली. मात्र, झाडे तोडलेल्या जागेत अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीत भर पडली आहे.

मार्गावर मोठे खड्डे

पालखी मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागते. फुरसुंगी ग्रामपंचायतीने यासंदर्भात कार्यवाही करणे अपेक्षित आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग काम करेल, असा दावा ग्रामपंचायत करते. तर, हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केल्याने आम्ही काहीही करू शकत नसल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभाग करतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे रेल्वे स्टेशनला दुसरे प्रवेशद्वार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे रेल्वे स्टेशनमध्ये ये-जा करण्यासाठी सध्या एकच प्रवेशद्वार असल्याने स्टेशन परिसरात वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावतो आहे. गेल्या कित्येक वर्षांपासूनची ही परिस्थिती बदलण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यानंतरही बदल काही झाला नाही. त्यामुळे अखेर रेल्वे प्रशासनाने आता रेल्वे स्टेशनसाठी आणखी एक प्रवेशद्वार करण्याचा निर्णय घेतला आहे. राजा बहादूर मिल रस्त्याच्या बाजूला हे प्रवेशद्वार असेल. येथून स्टेशनवरील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पादचारी पूल असणार आहे.

पुणे रेल्वे स्टेशन बाहेर पीएमपी, एसटी आणि रिक्षा स्टँड आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागातून येथे येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण खूप आहे. तसेच, खासगी वाहनांबरोबरच पीएमपी, एसटी आणि रिक्षांची संख्याही अधिक असते. त्यातच स्टेशनमध्ये येणाऱ्या वाहनांच्या रांगा रस्त्यापर्यंत लागलेल्या असतात. या सर्वांमुळे स्टेशन परिसरातील कोंडी नित्याचीच झाली आहे. आता राजा बहादूर मिल रस्त्याच्या बाजूला रेल्वे स्टेशनसाठी दुसरे प्रवेशद्वारे करण्यात येणार आहे. त्याचे बांधकामही सुरू झाले आहे. या रस्त्याच्या बाजूला स्टेशनचा प्लॅटफॉर्म क्रमांक सहा आहे. येथील संरक्षक भिंत तोडण्यात आली आहे. येथून प्रवेशद्वार केले जाणार आहे. या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या एका पादचारी पुलाशेजारीच आणखी एक मोठा पादचारी पूल उभारण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनमध्ये येणारे निम्मे प्रवासी नवीन प्रवेशद्वारातून स्टेशनमध्ये येऊन, मुख्य प्रवेशद्वारावरील भार हलका होईल, अशी अपेक्षा रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

राजा बहादूर मिल रस्त्याच्या बाजूला सध्या एक पादचारी पूल आहे. या पुलावरूनही अनेक प्रवासी स्टेशन मध्ये ये-जा करतात. मात्र, मुख्य प्रवेशद्वाराच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळेच या रस्त्याच्या बाजूला प्रत्यक्ष दुसरे प्रवेशद्वारे करण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांच्या मानसिकतेतही बदल होईल आणि एका प्रवेशद्वाराचा भार विभागला जाईल. या बाजूला सध्या रेल्वेचे एक तिकीट काउंटर आणि तिकीट व्हेंडिंग मशीन उपलब्ध आहे. तसेच, वाहनांची पार्किंगची सुविधा आधीपासूनच उपलब्ध असून, ते देखील विकसित केले जात आहे. त्यामुळे प्रवाशांना मुख्य प्रवेशद्वाराप्रमाणेच सोयीसुविधा येथे देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

नवीन रॅम्प

रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरील रस्ता अरुंद असल्याने, तसेच मुख्य रस्त्यावरून स्टेशनमध्ये गाडी नेण्यासाठी काटकोनात वाहन वळवावे लागते. त्यामुळे वाहनाचा वेग मंदावतो, तसेच पुढे वाहनांची रांग असल्यास बाहेरील रस्त्यावर रांगा लागतात. ही कोंडी फोडण्यासाठी स्टेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी मुख्य चौकातूनच नवीन रॅम्प करण्यात आला आहे. हा रॅम्प स्टेशनमध्ये येणाऱ्या वाहनांसाठी सोयीस्कर आहे. येत्या महिनाभरात हा रॅम्प वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सध्याचे वाहनांसाठीचे प्रवेशद्वारे केवळ पादचारी प्रवाशांसाठी खुले ठेवले जाणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.


एस्कलेटर कायमच बंद

पुणे : पुणे रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या एस्कलेटरमध्ये (इलेक्ट्रॉनिक जीना) सातत्याने बिघाड होत असतो. त्यामुळे अनेकदा ते बंद अवस्थेतच पाहायला मिळते. सध्या देखील ते तांत्रिक बिघाडामुळे अधून-मधून बंद ठेवण्यात येत आहे. हे ‘एस्कलेटर’ कोलकाता येथील कंपनीने बसविले आहे. त्यामुळे काही बिघाड झाल्यानंतर त्याच्या दुरुस्तीसाठी कोलकात्यावरून टेक्निशियन येतात, किंवा एखादा पार्ट तेथून मागवावा लागतो. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीस विलंब लागत असल्याचे रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरण मूल्यांकन सहा महिन्यांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मेट्रो मार्गांचे पर्यावरणावर होणारे सखोल परिणाम जाणून घेण्यासह त्याद्वारे निर्माण होणारे संभाव्य धोके कमी करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे (महामेट्रो) ‘पर्यावरण आघात मूल्यांकना’ची (एन्व्हॉयर्न्मेंट इम्पॅक्ट अॅसेसमेंट) सर्व प्रक्रिया पुढील चार ते सहा महिन्यांत पूर्ण केली जाणार आहे. नदीपात्रातील १.७ किलोमीटरच्या मार्गाचे मूल्यांकन सुरू झाले असून, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणासमोर (एनजीटी) त्याचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महामेट्रोतर्फे आकुर्डी येथे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर, महामेट्रोतर्फे घेण्यात येत असलेल्या विविध पर्यावरण पूरक उपक्रमांची माहिती देताना दीक्षित म्हणाले, ‘नदीपात्रातील मेट्रो मार्गाचे मूल्यांकन ‘मिटकॉन’तर्फे करण्यात येणार आहे. मूल्यांकनासाठी आवश्यक सर्वेक्षणाला त्यांनी सुरुवात केली असून, चार महिन्यांत त्यांचा अहवाल प्राप्त होईल. या मार्गासह मेट्रोच्या दोन्ही मार्गांचेही पर्यावरण मूल्यांकन केले जाणार आहे. हे दोन्ही अहवाल पुढील चार ते सहा महिन्यांत प्राप्त होतील. त्यानुसार, मेट्रोच्या बांधकामातून होणारी पर्यावरणाची संभाव्य हानी कमी करण्यासाठी सर्व उपाययोजना महामेट्रोतर्फे केल्या जातील.’ नदीपात्रातील मेट्रोच्या पर्यावरण मूल्यांकन अहवालावर नॅशनल एन्वहायर्नमेंटल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (नीरी) आणि सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन (सीडब्ल्यूपीआरएस) यांच्याकडून तज्ज्ञ अभिप्राय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मेट्रोच्या नदीपात्रातील मार्गाला आक्षेप घेत, त्याविरोधात एनजीटीमध्ये याचिका दाखल असली, तरी सुप्रीम कोर्टाने नदीपात्रातील कामाला कोणतीही स्थगिती दिलेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. नदीपात्रातील मार्गासह दोन्ही मार्गांचे पर्यावरण मूल्यांकन अहवाल एनजीटीसमोर सादर केले जातील, असे त्यांनी नमूद केले.


सात हजार झाडे लावणार

मेट्रोच्या सविस्तर प्रकल्प आराखड्यानुसार (डीपीआर) साडेसहाशे झाडे काढावी लागणार असली, तरी त्यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी तब्बल सात हजार झाडे लावण्यात येणार असल्याचे ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले. दीक्षित यांच्या उपस्थितीत बॅटरीवर चालणाऱ्या फीडर कारचे अनावरण या वेळी करण्यात आले. या कारमधील बॅटरी सौरऊर्जेच्या माध्यमातून चार्ज करता येते, अशी माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गडकरींऐवजी बेंद्रेंचा पुतळा हवा

$
0
0

डॉ. सदानंद मोरे यांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी बागेतून हटवल्याने अनेकांची अस्मिता दुखावली गेली. संभाजी महाराजांबद्दल प्रचलित असलेल्या अपशब्दांमधून त्यांची जी प्रतिमा निर्माण केली गेली ती गडकरींनी त्यांच्या नाटकातून मांडली. परंतु, संभाजी महाराजांवर होणारे सर्व आरोप ज्येष्ठ इतिहास संशोधक वासुदेव बेंद्रे यांनी संशोधनाच्या आधारे खोडून काढले. त्यामुळे, संभाजी उद्यानात गडकरी यांच्या ऐवजी वासुदेव बेंद्रे यांचा पुतळा बसवावा,’ अशी मागणी संत साहित्याचे अभ्यासक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी.

बाळाजी आवजी चिटणीस चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दिला जाणारा स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस पुरस्कार मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते ज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक डॉ. सदाशिव शिवदे यांना प्रदान करण्यात आला. त्या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मोरे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर आमदार धैर्यशील पाटील, बाळाजी आवजी चिटणीस चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, उपाध्यक्ष राजेश गोळे आदी उपस्थित होते.

‘संभाजी महाराजांवर संशोधन करणाऱ्या आणि खरा इतिहास समोर आणणाऱ्या वासुदेव बेंद्रे यांचा पुतळा संभाजी बागेत बसवला नाही, तर बेंद्रे यांच्याशी कृतघ्नतेने वागल्यासारखे होईल. ज्यांना राजकारण करून हित साध्य करून घेता येत नाही, असे राजकारणी इतिहासकारांचा आधार घेऊन हवा तसा इतिहास लिहून घेतात. राजकारणी त्यांचा स्वार्थ साधून घेण्यासाठी इतिहासाच्या भूमीचे देखील रणांगण करून टाकतात, ही दुर्दैवी बाब आहे,’ असे सांगून मोरे यांनी राजकीय संघटनांवर ताशेरे ओढले. ‘इतिहास हा गणितापेक्षा कठीण विषय आहे. गणित पायरी पायरीने सोडवत गेल्यास अचूक उत्तर मिळतेच. परंतु, इतिहासात संशोधनाअंती उत्तरापर्यंत आले की त्याला फाटे फुटतात. खंडो बल्लाळ चिटणीसांची स्वामीनिष्ठा प्रखर, आदर्श होती. परंतु, तो इतिहास पुढे आला नाही. ज्यांच्या कर्तृत्वाने इतिहास घडतो त्यांचा इतिहास मांडतांना गल्लत होते हे खेदजनक आहे,’ अशी खंत डॉ. देगलूरकर यांनी व्यक्त केली.

‘मोठमोठ्या इतिहासकारांनी देखील इतिहासाची मांडणी करतांना गल्लत करून ठेवली आहे. केवळ डोळ्यांनी पाहिले म्हणून ते सत्य, असे सरसकट म्हणता येत नाही. पुढील पिढीमध्ये निष्ठा हा सद्‍‍गुण रुजवायचा असल्यास खंडो बल्लाळांच्या स्वामीनिष्ठेचे पाठ पाठ्यपुस्तकात आले पाहिजेत,’ अशी अपेक्षाही डॉ. देगलूरकर यांनी व्यक्त केली. डॉ. सदाशिव शिवदे,आमदार धैर्यशील पाटील यांनीही विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र देशपांडे यांनी केले, तर प्रकाश चिटणीस यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरण संवर्धनाचा जागर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वृक्षारोपण, रोपांचे वाटप, रेनवॉटर हॉर्वेस्टिंग आणि गवती चहाचे वाटप या उपक्रमांच्या आयोजनातून सोमवारी जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील विविध संस्था, संघटनांनी यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. महापालिकेतर्फे डेक्कन नदीपात्र येथे सोमवारी सकाळी मोबाइल टॉयलेट बस उपलब्ध करून देण्यात आली. त्याचे उद्घाटन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते झाले. तसेच, या वेळी सर्वांनी वृक्षारोपण करून, वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली. आयुक्त कुणाल कुमारही कार्यक्रमासाठी उपस्थित होते. रेल्वेच्या पुणे विभागातर्फे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. रेल्वे ट्रॅक शेजारील जागेत सुमारे साडेबाराशे रोपांची लागवड केली गेली. याबरोबरच पुणे विभागातील अन्य स्टेशनवरही वृक्ष लागवड करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पर्यावरण विभागातर्फे ५५० रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच, ४२५ जणांना पावसाळी आजार प्रतिबंधक चहा (काढा) मोफत वाटण्यात आला. माजी नगरसेविका रूपाली पाटील, ज्योती खुटवड, मीना पवार, उषा काळे उपस्थित होत्या.

गंगा फाउंडेशनने झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. कचरा व्यवस्थापनातून कचऱ्याचा पुनर्वापर, रेनवॉटर हार्वेस्टिंग, स्वच्छता अभियान यासारख्या उपक्रमांची सुरुवातही या माध्यमातून करण्यात आली. वानवडी येथील गंगा सॅटेलाइट येथे पर्यावरण दिनानिमित्त ५०० झाडे लावण्यात आली. कँटोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव, फाउंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल, गीता गोयल, अतुल गोयल, अमित गोयल, अमित कुमार या वेळी उपस्थित होते.

श्रीराम एकत्व योगातर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळजाई टेकडीवर पिंपळ, वड, बाभू‍ळ व अन्य प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच, रोपांचेही वाटप करण्यात आले. संस्थेचे भानुदास पायगुडे, विलास भगणे, अनंत शिर्के, किशोर हिंगमिरे यावेळी उपस्थित होते. सुयोग ग्रुपतर्फेही सीएसआर अंतर्गत जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. गंगाधाम चौक येथे ग्रुपच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. संचालक कल्पेश शाह, निलेश शाह यावेळी उपस्थित होते.

वाहतुकीच्या क्षेत्रात बदल घडवून आणणारा ‘राइड शेअरिंग अॅप’ उबेरने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘ग्रीन इंडेक्स’चे अनावरण केले. शहरामध्ये ‘उबेर पूल’च्या आगमनानंतर ५, ३०,००० लिटर इंधन व १ कोटी १२ लाख ७० हजार किमी प्रवासाचे अंतर कमी करण्यामध्ये मदत झाली आहे. ‘सार्वजनिक परिवहन व राइड शेअरिंगचा वापर हा शहरातील वाहतूकीची कोंडी व वाढते प्रदूषण टाळण्याचा उत्तम मार्ग आहे, असे उबेरचे महाव्यवस्थापक शैलेश सावलानी यांनी यावेळी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोविंदराव टेंबेंच्या आठवणींना उजाळा

$
0
0

ऐतिहासिक हार्मोनियम केळकर संग्रहालयाकडे सुपूर्द

म. टा. प्रतिनिधी, पुणे
संगीत मानापमान नाटकात गोविंदरावांनी नायक व्हावे आणि नाटकाला संगीत द्यावे, अशी इच्छा व्यक्त केली जात होती. भास्करबुवा बखलेंनी नाटकातील पदांची तयारी करून घेतली आणि मार्गदर्शन केले तरच मी हे करेन, अशी अट गोविंदरावांनी घातली. भास्करबुवांनी मार्गदर्शन केले आणि तीनच महिन्यांनी हे नाटक संगीत रंगभूमीवर आले. कमी कालावधीत तयारी करून गोविंदरावांनी धैर्यधर ही भूमिका रंगभूमीवर जिवंत केली. बालगंधर्व असतानाही त्यांच्या पदांना पाच-पाच वन्समोअर मिळाले... प्रख्यात हार्मोनियम वादक गोविंदराव टेंबे यांच्या अशा आठवणींमध्ये सोमवारची सायंकाळ स्वराभिषेक करणारी होती. गोविंदरावांच्या आठवणी आणि त्यांच्या हार्मोनियमचे स्वर या मिलाफातून ही मैफल सुंदर अनुभूतीची साक्ष देणारी ठरली.

निमित्त होते, गोविंदराव टेंबे यांच्या १३६व्या जन्मदिनाचे. यानिमित्त त्यांनी वापरलेले ११२ वर्षांचे हार्मोनियम त्यांचे नातू दीपक टेंबे यांनी राजा दिनकर केळकर संग्रहालयाकडे सुपूर्द केले. तरुण सतार वादक उस्ताद शाकीर खाँ यांनी हार्मोनियमचा स्वीकार केला. संग्रहालयाच्या रेखा रानडे, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य व संगीत अभ्यासक संजीव साठे, प्रमुख सुधन्वा रानडे आणि टेंबे परिवारातील सदस्य या वेळी उपस्थित होते. संग्रहालयात रंगलेल्या छोटेखानी समारंभात तरुण वादक भूषण कुलकर्णी यांनी या हार्मोनियमवर संगीत मानापमान नाटकातील ‘झाले युवती मना’ हे पद सादर करून उपस्थितांना संगीत रंगभूमीच्या सुवर्ण काळाची सुरेल सफर घडवली.

साठे यांनी याप्रसंगी गोविंदरावांच्या विविध आठवणी जागवल्या. ‘मानापमान नाटकाला गोविंदरावांनी संगीत दिले; पण गुरू असलेल्या भास्करबुवांनी रचनांवर हात फिरवावा म्हणजे त्या आणखी सफाईदार होतील, अशी गोविंदरावांची भावना होती. मानापमानचे संगीत गाजल्यानंतर ते भास्करबुवांचे कायम नाव घेत. ही कृतज्ञता गोविंदरावांकडे होती,’ अशा शब्दांत साठे यांनी गोविंदरावांचे मोठेपण उलगडले.

‘गोविंदरावांनी कोल्हापूर येथील पहिल्याच प्रयोगावेळी चार, तर पुण्यात पाच वन्समोअर मिळविले. पुण्यातील कार्यक्रमांचे वृत्त आणि जाहिराती मुंबईच्या वृत्तपत्रांमध्ये असत. त्यामुळे पुण्यातील यशाचा फायदा मुंबईत झाला,’ असे साठे यांनी सांगितले.

टेंबे म्हणाले, ‘पहिला बोलपट ‘अयोध्येचा राजा’मध्ये गोविंदरावांची प्रमुख भूमिका होती. हे हार्मोनियम १९०५मध्ये पॅरिस येथून मागविण्यात आले होते. गोविंदरावांनी त्यांच्या हयातीत १९२०पर्यंत याच हार्मोनियमच्या सहायाने अनेक कार्यक्रम केले. त्यांचे चिरंजीव माधवराव टेंबे हे देखील उत्तम हार्मोनियम वादक होते.’

गोविंदरावांविषयी खूप ऐकले आहे. त्यांच्या हार्मोनियमला स्पर्श करायला मिळाल्याने त्यांचा आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटले. वाद्य हे माणसाच्या शरिराचाच एक भाग असते. शरिराचा भाग म्हणूनच ते वाजवत असतो. वाद्य हे सर्वांत मोठे धन आहे, असे उ. शाकीर खाँ म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्व, युवा संमेलनांवर महामंडळाची फुली

$
0
0





म. टा. प्रतिनिधी, पुणे
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने विश्व साहित्य आणि राज्य सरकारच्या युवा संमेलनाच्या आयोजनावरून हात झटकले आहेत. विश्व संमेलन भरवणे ही आमची जबाबदारी नाही तसेच युवा संमेलनासाठी महामंडळ असमर्थ असल्याचा निर्णय महामंडळाने घेतल्याने यापुढील काळात ही दोन्ही संमेलने होणार नसल्याचीच शक्यता वाढली आहे. ‘तुटपुंज्या निधीमध्ये सरकारची कामे करायला महामंडळ सरकारचा विभाग नाही. आम्हाला आमची कामे आहेत, त्यामुळे सरकारने आपली कामे आमच्यावर लादू नयेत,’ अशी टिप्पणी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.
राज्य सरकारच्या युवक धोरणामध्ये महाविद्यालयीन युवक-युवती यांच्यातील वाङ्मयीन कलागुणांना संधी
देण्यासाठी युवा संमेलन घेण्याचा समावेश करण्यात आला आहे. या संमेलनासाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, हे युवासंमेलन आयोजित करण्याची जबाबदारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने स्वीकारावी, अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१४ मध्ये सासवड येथे झालेल्या साहित्य संमेलनात केली होती. तीन वर्षांनंतरही संमेलन न झाल्याने महामंडळाने हात झटकले आहेत. जोशी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना भूमिका स्पष्ट केली.
‘युवा संमेलन आयोजित करण्यास महामंडळ असमर्थ असून, या संदर्भात राज्य सरकारला लवकरच महामंडळाची भूमिका पत्राद्वारे कळविण्यात येणार आहे. युवा संमेलन हा विषय महामंडळाच्या दृष्टीने संपला आहे. सरकारच्या विविध विभागांमधील टोलवाटोलवीमुळे साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करूनही युवा संमेलन होऊ शकले नव्हते. हे संमेलन शालेय सांस्कृतिक विभागाने घ्यायचे, शालेय शिक्षण विभागाने घ्यायचे की युवक कल्याण आणि क्रीडा विभागाने या विषयी शासकीय अध्यादेशामध्ये स्पष्टता नसल्याने प्रत्येक विभाग दुसऱ्या विभागाकडे या संमेलनाचा चेंडू टोलावत आहे,’ असे टीकास्त्र जोशी यांनी सोडले.
‘राज्य सरकारने २५ लाख रुपयांची तरतूद केली असली, तरी ती मिळविण्यासाठी महामंडळालाच खटाटोप करावा लागेल. वर्षातून एक संमेलन घेताना नाकीनऊ येते,’ अशी कबुली जोशी यांनी दिली.



विश्व साहित्य संमेलन भरवणे महामंडळाची जबाबदारी नाही. कोणी आमंत्रण देत असेल तर प्रोत्साहन देणे ही नक्कीच जबाबदारी आहे. संमेलनासाठी गेल्या दोन वर्षांमध्ये एकही आमंत्रण आले नसल्याने संमेलन झाले नाही. महामंडळ आधी राज्यातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचायला हवे. विश्व संमेलन हा काही कामाच्या अग्रभागाचा मुद्दा नाही.
- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी

विश्व संमेलन इंडोनेशियाला
विश्व मराठी परिषदेतर्फे सातवे विश्व मराठी साहित्य संमेलन इंडोनेशिया येथील बाली येथे १० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आल्याची घोषणा परिषदेचे अध्यक्ष निलेश गायकवाड यांनी सोमवारी केली. परिषदेचे प्रमुख सल्लागार डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, रवींद्र पाटील, बापूसाहेब जगताप या वेळी उपस्थित होते. गेल्यावर्षी भूतान येथील संमेलनानंतर इंडोनेशियासह दुबई, स्कॅनफ्रँन्सिसस्को, टोरांटो, लंडन, फ्रान्स व सिंगापूर येथून आमंत्रणे आली होती. इंडोनेशियातील मराठी फेडरेशन संस्थेला आयोजनाचा मान देण्यात आला असून, वैद्यकशास्त्र हा यंदाच्या संमेलनाचा विषय असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्यदायी अन् प्लास्टिकमुक्त वारीचा निर्धार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सुरू होण्यास अवघे काही दिवस राहिले असून, आषाढी वारी आरोग्यदायी, स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त करण्याचा पुणे जिल्हा परिषदेने निर्धार केला आहे. फिरते स्वच्छतागृह, वारीचा मुक्का आणि विसावाच्या ठिकाणी औषध फवारणी, प्लास्टिक कचरा उलण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा अशा विविध उपाययोजना पालखी सोहळ्यादरम्यान केल्या जाणार आहेत.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे १६ जून आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीस १७ जूनपासून आळंदी, देहू येथून पंढरपुराकडे प्रस्थान होणार आहे. या संदर्भात वारीच्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात गटविकास अधिकारी, सरपंच आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महिला व बाल कल्याण सभापती राणी शेळके, समाजकल्याण विभागाचे सभापती सुरेखा चौरै, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल साकोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय जठार आदी उपस्थित होते.
‘ज्या ठिकाणी पालखी विसावा किंवा मुक्काम करते त्या ग्रामपंचायतींना यात्रा निधी उपलब्ध करून द्यावा. पालखीमध्ये सॅनिटरी नॅपकीन, टॉयलेट सोपची व्यवस्था करण्यात यावी. दिवे घाटामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा आहे. पालखी मार्गस्थ होण्यापूर्वी कचरा काढून टाकावा. पालखी विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी विद्युत पुरवठा आणि विजेचे दिवे लावण्यात यावे. घाटामध्ये दरडी कोसळू नये यासाठी उपायोयजना कराव्यात,’ अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी केल्या आहेत. त्यावेळीच संपूर्ण पालखी सोहळ्या दरम्यान जिल्ह्यात स्वच्छता, आरोग्यदायी, प्लास्टिकमुक्त फिरते स्वच्छतागृह, औषध फवारणी, प्लास्टिक कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबविण्याचे आदेशही त्यांनी दिले.
पाणी शुद्धीकरणाचे औषधे विहिरांऐवजी टँकरमध्ये टाकावे. पालखी काळात अपघात होणाऱ्या पेशंटना तातडीने उपचार मिळावे यासाठी ससून आणि तर खासगी हॉस्पिटलशी समन्वय साधण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. सासवड रस्त्यावरील अतिक्रमण काढावे. पालखी मार्गावरील खड्डे दुरुस्त करावे अशा सूचनाही अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या.

फोन न घेतल्यास कारवाई
पालखी सोहळ्या दरम्यान अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांची गरज असते. परंतु, अशा वेळी ग्रामसेवक किंवा संबंधित विभागाचे अधिकारी फोन घेत नाहीत अशा तक्रारी या बैठकीत करण्यात आल्या. विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी महावितरण विभागाद्वारे तात्पुरते वीज कनेक्शनसाठी आगाऊ पैसे घेतात, अशा तक्रारी ग्रामसेवकांनी केली होती. त्यावर देसाई यांनी वारीच्या काळात फोन न घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. तसेच तात्पुरता वीज मीटर घेण्यासाठी पैसे घेऊ नये याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. परंतु, ग्रामपंचायतीने अनधिकृतपणे वीज पुरवठा घेऊ नये, असेही देसाई यांनी बजावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ लाखांच्या दागिन्याची बॅग लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
टिळक रोडवर हिराबाग चौकात कार चालकाला पैसे खाली पडल्याचे सांगून दागिने व इतर ऐवज असा आठ लाख रुपयांचा ऐवज असलेली बॅग लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संगीता निंबाळकर (वय ५६, रा.मंगलदास रोड, कोरेगाव पार्क) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, निंबाळकर या कामाच्या निमित्ताने टिळक रोड परिसरात आल्या होत्या. हिराबाग चौकात दुपारी एकच्या सुमारास चारचाकी कार पार्क केली होती. चालक कारमध्ये बसला होता. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने चालकाला खाली पैसे पडल्याचे सांगितले. त्यामुळे चालक खाली उतरला. त्यावेळी त्याना पैसे पडल्याचे दिसले. पैसे घेत असताना चोरट्यांनी कारचा दरवाजा उघडून हिऱ्याचे दागिने, एक मोबाईल आणि पॅनकार्ड, मतदानकार्ड आणि अन्य कागदपत्रे असा एकूण आठ लाख रुपयांचा ऐवज असलेली निंबाळकर यांची बॅग लंपास केली. त्यांनी त्यांनी तत्काळ स्वारगेट पोलिसांकडे तक्रार दिली आहे. स्वारगेट पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तीन ते चार व्यक्ती असल्याचे दिसत आहेत. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अहिवळे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा मद्यविक्री; शहरात तिघे अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांपासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर मद्याची दुकाने आणि बिअर बारवर बंदी घालण्यात आली असतानाही बेकायदा मद्यविक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. बाणेर, दिघी, विश्रांतवाडी आणि मोशीत भरारी पथकांनी छापे टाकून सुमारे दोन लाख ३७ हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांना अटक झाली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मोहन वर्दे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘बाणेर येथील हॉटेल ग्रीन लाउंज समोरील टपरीमध्ये विदेशी मद्यविक्री करण्यात येत होती. भरारी पथकाने येथे छापा टाकून एकाला अटक केली. त्याच्याकडून सुमारे चार हजार ४४५ रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. दिघी आणि विश्रांतवाडी परिसरात अवैधरीत्या गावठी दारूची वाहतूक करताना दोन चारचाकी वाहने पकडण्यात आली. त्यामध्ये सुमारे ६६ हजार रुपयांची गावठी दारू होती.’
‘मोशी येथे दोन अवैध गावठी दारुच्या भट्ट्यांवर छापे घालून सुमारे चार हजार ५०० लिटर रसायन आणि ७०० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली,’ असेही वर्दे यांनी सांगितले. भरारी पथकातील निरीक्षक रामहरी भिसे, उपनिरीक्षक तानाजी शिंदे, अरविंद टेंभुर्णे आणि कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयडीबीआय, देना बँकेला ठेवी स्वीकाण्याची मुभा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आयडीबीआय आणि देना बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले असले, तरीही या बँकांना ठेवी स्वीकारण्यावर कोणतीही बंदी नाही. बँकांचे नियमित कामकाज सुरू आहे, अशी माहिती या बँकांच्या अधिकाऱ्यांनी दिली.
‘रिझर्व्ह बँकेने पाच मे २०१७ रोजी आयडीबीआयवर काही निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध लाभांशाचे वितरण, शाखाविस्तार, भांडवली खर्च आणि बँकेमार्फत उपकंपन्यांमध्ये होणारी गुंतवणूक यावर घालण्यात आले आहेत. बँकेच्या निकषांची पूर्तता करणारे रिटेल ग्राहक व प्राथमिकता क्षेत्राला कर्जवितरणही करण्याची मुभा बँकेला आहे. त्यामुळे बँकेचे दैनंदिन कामकाज नियमित सुरू आहे. बँकेकडून ठेवी स्वीकारण्यात येत असून कर्जवितरणही केले जात आहे,’ अशी माहिती आयडीबीआयच्या पुणे विभागाचे चीफ जनरल मॅनेजर ब्रिज मोहन शर्मा यांनी दिली.
दरम्यान, ‘देना बँकेवर निर्बंध लादण्यात आले असले, तरी बँकेला ठेवी स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बँक खातेदारांकडून ठेवी स्वीकारत असून बँकेचे कामकाज नियमित सुरू आहे,’अशी माहिती बँक प्रशासनातर्फे देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन लाख प्रलंबित प्रकरणे

$
0
0

न्यायासाठी पक्षकारांवर तिष्ठत राहण्याची वेळ; जिल्हा कोर्टातील स्थिती

Vandana.Ghodekar@timesgroup.com
Tweet : @VandanaaMT

पुणे : पुणे जिल्हा कोर्टात प्रलंबित प्रकरणांची संख्या तीन लाख ३०,८०३वर पोहोचली आहे. एकूण प्रलंबित प्रकरणांमध्ये एक लाख ३,३५४ दिवाणी तर, दोन लाख २७,४४९ फौजदारी प्रकरणांचा समावेश आहे.
प्रलंबित प्रकरणे अधिक असल्यामुळे पक्षकारांना न्याय मिळण्यासाठी अनेक वर्षे थांबावे लागत आहे. न्यायाधीशांची तसेच कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, साधनांची कमतरता, कोर्टाची किचकट प्रक्रिया आदी अडचणींवर मात करून उभ्या राहणाऱ्या खटल्यांमध्ये ‘तारीख पे तारीख’चा प्रश्न निर्माण होत असल्याने प्रलंबित प्रकरणांमध्ये मोठी वाढ होत आहे.
कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची वाढती आकडेवारी लक्षात घेऊन ती निकाली काढण्यासाठी कोर्टाच्या यंत्रणेकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. महालोकअदालत, लोकन्यायालय, स्थायी लोकअदालत, समुपदेशन आदी मार्गांचा उपयोग करून तडजोडयोग्य प्रकरणे सामंजस्याने आणि सामोपचाराने निकाली काढली जातात. त्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाकडून पुढाकार घेण्यात येतो.
प्रलंबित प्रकरणांमध्ये दहा वर्षांहून अधिक काळ प्रलंबित प्रकरणांची संख्या ३७,५७८वर पोहोचली आहे. पाच ते दहा वर्षे या काळात प्रलंबित प्रकरणे ६४,४३२ आहेत. तर, दोन ते पाच वर्षे या काळात प्रलंबित प्रकरणे ९४,०३७ असून, दोन वर्षापर्यंत प्रलंबित राहिलेली १,३४,७५६ प्रकरणे आहेत.

जिल्हा कोर्टातील प्रलंबित प्रकरणे
प्रकार संख्या
दिवाणी १,०३,३५४
फौजदारी २,२७,४४९
एकूण ३,३०,८०३
............................
वर्षनिहाय प्रलंबित प्रकरणे
वर्षे दिवाणी फौजदारी एकूण
दहा वर्षांपेक्षा अधिक८६४४ २८,९३४ ३७,५७८
पाच ते दहा वर्षे २२,१०३ ४२,३२९ ६४,४३२
दोन ते पाच वर्षे ३५,०९२ ५८,९४५ ९४,०३७
दोन वर्षापर्यंत ३७,५१५ ९७,२४१ १,३४,७५६
.........................
जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणे
कोर्ट संख्या
अतिरिक्त सत्र न्यायालय बारामती ६३९१
अतिरिक्त सत्र न्यायालय खेड ३७४४
कॅन्टोन्मेंट कोर्ट खडकी ४७२८
मुख्य न्यायदंडाधिकारी कॅन्टोंमेंट १७,४२९
मुख्य न्यायदंडाधिकारी, पुणे १,१२,१७५
जुन्नर कोर्ट ७१७६
दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालय, पुणे ३४,२३७
दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालय, बारामती ३५७४
दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालय, खेड १६६६
दिवाणी कोर्ट, भोर २९२७
दिवाणी कोर्ट, दौंड ६३०३
दिवाणी कोर्ट, घोडेगाव ४५६१
दिवाणी कोर्ट, इंदापूर ८२३४
दिवाणी कोर्ट, खेड ८९५६
दिवाणी कोर्ट, पीसीएमसी ७०४
दिवाणी कोर्ट, पिंपरी २९,६३१
दिवाणी कोर्ट, पीएमसी ९२५
दिवाणी कोर्ट, पीएमसी सिव्हील १३९५
दिवाणी कोर्ट, सासवड ४८८९
दिवाणी कोर्ट शिरूर ९३३०
एकूण ३,३०,८०३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काश्मिरींच्या गोळ्यांना गोळ्यांनीच उत्तर

$
0
0

म​निंदर​जितसिंग बिट्टा यांच्याकडून लष्करी कारवाईचे समर्थन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

काश्मीर खोऱ्यात दगडफेक करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्यापैकी एकाला नव्हे तर चौघांना गाडीला बांधून फिरवायला हवे, असे सांगून अखिल भारतीय दहशतवाद विरोधी संघटनेचे अध्यक्ष मनिंदरजितसिंग बिट्टा यांनी सोमवारी काश्मिरमधील लष्करी कारवाईचे समर्थन केले. पाकिस्तानची मदत घेऊन दहशत माजवणाऱ्या काश्मिरींच्या गोळ्यांचे उत्तर गोळ्यांनीच द्यायला हवे, असेही त्यांनी नमूद केले.
पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या बिट्टा यांनी काश्मीरची समस्या आणि दहशतवादी कारवायांसंदर्भात पत्रकारांशी संवाद साधला. काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या तरुणांवर त्यांनी सडकून टीका केली. ‘पाकिस्तान दहशतवादी राष्ट्र आहे, हे सगळ्या जगाने मान्य केले आहे. पाकिस्तानच्या सहकार्यानेच काश्मीर पेटवले जात आहे. फुटीरतावाद्यांना पाकिस्तान पैसे पुरवत असून, त्या जोरावर दगडफेकीसारखे प्रकार घडवून आणले जात आहेत,’ असेही बिट्टा म्हणाले. लष्करी अधिकारी मेजर नितीन गोगोई यांनी दगडफेक करणाऱ्या तरुणाला गाडीला बांधून फिरवले. या घटनेचे बिट्टा यांनी समर्थन केले. ‘काश्मीरमधील दगडफेक थांबवण्यासाठी लष्कराने प्रत्येक गाडीला चार तरुण बांधावेत आणि त्यांना गावभर फिरवावे. त्या शिवाय दगडफेकीला आळा बसणार नाही. काश्मीरमधील सामान्य नागरिकही गप्प आहेत. त्यांनी दगडफेकीविरोधात एकत्र येऊन लष्कराचे समर्थन करायला हवे,’ अशी अपेक्षाही बिट्टा यांनी व्यक्त केली.
‘काँग्रेसप्रणीत यूपीए सरकार केवळ वेळकाढूपणा करत होते. फुटीरतावाद्यांशी चर्चा करून त्यांचे ऐकले जात होते. आता तसे होत नाही. हे सरकार फुटीरतावाद्यांना विचारत नसल्याने काश्मीर स्वतंत्र नसून भारताचाच एक अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसची बिकट अवस्था राहुल गांधींमुळे नाही तर, हिंदू आणि मुस्लिम असा भेदभाव करून राजकारण करणाऱ्या दिग्विजयसिंह सारख्या नेत्यांमुळेच झाली आहे,’ अशी टीकाही बिट्टा यांनी केली.

‘पाकिस्तानबरोबर क्रिकेट नाहीच’
चँपियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानसोबत खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्याबद्दल बिट्टा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, की जोपर्यंत पाकिस्तान वठणीवर येत नाही, तोपर्यंत पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळले जाऊ नये. बंदुकीच्या गोळ्या आणि बॅट-बॉल एकत्र राहू शकत नाहीत.

प्रसिद्धीचा सोस टाळा
कुलभूषण जाधव यांच्या सुटकेचा मुद्दा सरकारवर सोडायला हवा. सरकार त्यांना सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. भारताला पाकिस्तानवर दबाव टाकण्यात यश आले आहे. त्यामुळे, माध्यमांमध्ये फोटो येण्यासाठी कुलभूषणला समर्थन देणाऱ्यांनी या प्रकरणाचे राजकारण करू नये. सरबजीत सिंग प्रकरणी त्यांची बहीण पाकिस्तानला गेली नसती, तर आज ते जिवंत असते, अशी टीकाही बिट्टा यांनी केली.

राज्य सरकारवरही टीका
लष्करात भरती होणाऱ्या तरुणांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या तुलनेत इतर राज्यातील शहीद होणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांना चांगल्या सुविधा मिळतात. त्यांच्या कुटूुबासाठी नोकरी आणि मोठी अर्थिक मदत दिली जाते. महाराष्ट्रात मात्र अर्थिक मदतीचे प्रमाण कमी असल्याची टीका त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमिनींचे नकाशे डिजिटल करणार

$
0
0

प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण होणार; मोबाइलवरही पाहता येणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील जमिनींच्या नकाशांचे डिजिटायझेशन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला असून, सहा विभागीय आयुक्त कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एका गावात याप्रमाणे सहा गावांमध्ये हा पायलट प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यास सुमारे तीन वर्षांचा कालावधी लागणार असून, त्यानंतर नागरिकांना मोबाइलवरही नकाशे पाहणे शक्य होणार आहे.
‘सध्या जमिनींच्या सातबाराचे स्कॅनिंग करण्याचे काम सुरू आहे. आता नकाशांचे डिजिटायझेशन करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागीय आयुक्त कार्यालयांच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमधील एका गावात पायलट प्रकल्प राबविला जाणार आहे. कोकण विभागीय आयुक्त कार्यालय हे मुंबईशी संलग्न असून, त्यांचे काम सुरू झाले आहे. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयातील रायगड जिल्ह्याचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील सहा गावांमध्ये पायलट प्रकल्पाची अंमलबजावणी होणार आहे,’ असे राज्याचे जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी सांगितले.
‘नकाशांचे डिजिटायझेशन करताना येणाऱ्या अडचणी आणि त्रुटी पाहून त्यानंतरच राज्यात या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. येत्या तीन वर्षांत राज्यातील सर्व नकाशांचे डिजिटायझेशन करण्याचे नियोजन आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. नकाशांचे डिजिटायझेशन करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना मोबाइलवर नकाशे पाहता येणार आहे.

‘रिको’च्या कामाचा घेणार आढावा
‘नागरिकांना ई-सातबारा, ई-फेरफार आणि अन्य विविध अभिलेख ऑनलाइन देण्यासाठी संबंधित कागदपत्रांचे स्कॅनिंग करण्याचे कंत्राट ‘रिको’ या कंपनीला देण्यात आले आहे. त्यांच्याकडून या कामात दिरंगाई झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. या कामाचे कंत्राट देताना शंभर टक्के काम पूर्ण झाल्यानंतरच संबंधित कंत्राटदाराला कामाचे बिल देण्याची अट आहे,’ असे चोक्कलिंगम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पर्धा परीक्षा एन्जॉय करा

$
0
0

अविनाश धर्माधिकारी यांचा भावी अधिकाऱ्यांना कानमंत्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना अभ्यासाची प्रक्रिया एन्जॉय करा. अभ्यास करताना जिद्द, चिकाटी, मेहनत आणि सातत्य या गोष्टींची कास धरा. त्यानंतर मिळणारे यश हे तुमचेच असणार आहे,’ असा सल्ला चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी मोठ्या संख्येने जमलेल्या आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सोमवारी दिला. परीक्षेत अपयश आल्यास खचून न जाता पूर्वीच्या प्रयत्नांपेक्षा अधिक प्रयत्न करा, असेही धर्माधिकारी यांनी सांगितले.
चाणक्य मंडल परिवारातर्फे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी धर्माधिकारी बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सनदी अधिकारी शशांक देवगडकर उपस्थित होते. या वेळी परीक्षेत राज्यात पहिली आणि देशात अकराव्या आलेली विश्वांजली गायकवाड, सूरज जाधव, महेश चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
धर्माधिकारी म्हणाले, ‘स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यापूर्वी स्वत:ला ओळखण्याची गरज आहे. एकदा आपण स्वत:ला ओळखले की त्यानंतर स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार करा. परीक्षा देण्याचा विचार पक्का झाला की अभ्यासाला सुरुवात करा. अभ्यासाच्या प्रक्रियेचा कंटाळा येऊ देऊ नका. अभ्यासाची प्रक्रिया एन्जॉय करा. अभ्यास करताना जिद्द, चिकाटी, मेहनत आणि सातत्य या गोष्टींची कास धरा. या गोष्टी व्यवस्थित केल्या की त्यानंतर तुमचे लक काम करते. या संपूर्ण प्रक्रियेनंतर मिळणारे यश हे तुमचेच असते. ज्ञानार्जनाची प्रक्रिया ही निरंतर सुरू असते. त्यामुळे यश मिळल्यानंतर देखील ही प्रक्रिया सुरू ठेवा.’ या वेळी जाधव आणि चौधरी यांनी देखील आपला प्रवास उपस्थितांसमोर उलगडला.

परीक्षेच्या अभ्यासात सातत्य राखा. यूपीएससीच्या परीक्षेचा नियमितपणे अभ्यास करत राहणे गरजेचे आहे. अभ्यास करताना आपण आपली मूळ ओळख गमवू नका. प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास परीक्षेत यश नक्की मिळते.
विश्वांजली गायकवाड

परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात यशाची हवा जाता कामा नये. यशस्वी विद्यार्थ्यांनी प्रशासनात स्वच्छ आणि कार्यक्षम कारभार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. समाजासाठी आपल्याकडून जे करणे शक्य आहे, त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रशासनाला पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी सदैव प्रयत्न हवेत.
अविनाश धर्माधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images