Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आयोजक साहित्याशी संबंधित असावेत

$
0
0

डॉ. श्रीपाद जोशींच्या भूमिकेने नव्या वादाची शक्यता

Aditya.Tanawade@timesgroup.com
Tweet : @AdityaMT

पुणे : राज्यातील कानाकोपऱ्यात साहित्याचा प्रसार करण्यासाठी दर वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा घाट घातला जातो. मात्र, या संमेलनाचे आयोजन करणाऱ्या संस्था साहित्याचा सातत्याने प्रसार करतात का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. त्यामुळे, साहित्य व्यवहाराशी संबंधित संस्थांनीच संमेलनाचे आयोजन करावे, अशी चर्चा साहित्य वर्तुळात रंगली आहे. मात्र, साहित्य महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आयोजक संस्थांबाबतीत काहीशी वेगळी भूमिका घेतल्याने वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
गेल्या काही वर्षांपासून साहित्य क्षेत्राशी फारसा संबंध नसलेल्या संस्थांकडेच संमेलनाचे आयोजन दिले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे, साहित्य महामंडळाने संमेलन आयोजनाच्या संकेतांना कात्री लावली असल्याच्या चर्चेनेही जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर ‘मटा’ने साहित्य संस्थांच्या प्रमुखांची मते जाणून घेतली. ‘गेल्या अनेक वर्षांपासून साहित्य संस्थांना संमेलनाचे आयोजन देण्याचा संकेत मोडून कोणत्याही संस्थेकडे संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी दिली जात आहे. बऱ्याचदा या संस्था मराठी भाषा विभागाच्या नावाखाली संमेलनाचे आयोजन मिळवतात. संमेलन पार पडल्यानंतरही साहित्य प्रसारासाठी त्या फारसे काम करत नाहीत. साहित्य संमेलन ज्या भागात होते. त्या भागातील साहित्यविषयक संस्था वाढावी, असा हेतू असतो. तो साध्य होताना दिसत नाही. यासाठी साहित्याशी निगडीत संस्थांनाच साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याची जबाबदारी द्यायला हवी,’ असे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले.
मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्षा आणि साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षा उषा तांबे म्हणाल्या की साहित्य विषयक संस्थांना संमेलनाचे आयोजन दिले जावे, ही बाब खरी आहे. अशा संस्थांनी दर वर्षी संमेलनाच्या आयोजनासाठी पुढाकार घ्यायला हवा. यामुळे, इतर संस्थांकडे आयोजन देण्याची वेळ येणार नाही. ग्रंथालय, शिक्षण, वाचन, साहित्य यांच्याशी निगडीत संस्थांचाच सहभाग साहित्य संमेलनाच्या आयोजनात असायला हवा.
मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनीही संमेलनाच्या आयोजनात साहित्यविषयक संस्था सहभागी असाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘साहित्य व्यवहारातील संस्था ही साहित्याशी बांधलेली असते. त्यामुळे, संमेलनानंतरही ते साहित्यविषयक कार्य करीत राहतात. इतर संस्था तसे करतातच असे नाही. त्यामुळे, महामंडळाने स्थळाची आणि आयोजक संस्थांची निवड करताना काळजी घेणे आवश्यक आहे. साहित्यात भरीव योगदान देणाऱ्या संस्थेलाच प्राधान्य देणे अधिक गरजेचे आहे,’ याकडे ठाले-पाटील यांनी लक्ष वेधले.
साहित्य महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मात्र, संमेलनाच्या आयोजनाबाबतीत वेगळी भूमिका घेतली आहे. साहित्याचा प्रसार केवळ साहित्य संस्थांनीच करावा, असे काही नाही कोणतीही संस्था साहित्य संमेलनाचे आयोजन करू शकते, असे जोशी यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर आता संमेलनाचे स्थळ आणि आयोजक संस्था याबाबतीत नेमका काय निर्णय होणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

भाषा साहित्य संस्कृतीचा प्रसार केवळ त्यासंदर्भात काम करणाऱ्या संस्थांनीच करावा, असे काही नाही. कोणीही भाषेच्या प्रसारासाठी पुढाकार घेऊ शकतो. महामंडळ अशा कोणत्याही प्रकारची आचारसंहिता संस्थांवर लादत नाही. ज्या संस्थांमध्ये साहित्य संमेलन पेलण्याचे सामर्थ्य असते त्याच दर वर्षी पुढे येतात. या संस्थांचा इतर कोणताही हेतू साध्य होऊ नये, यासाठी स्थळ निश्चितीसमिती कार्यरत असते.

डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष

गेल्या अनेक वर्षांपासून साहित्य संस्थांना संमेलनाचे आयोजन देण्याचा संकेत मोडून कोणत्याही संस्थेकडे संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी दिली जात आहे. बऱ्याचदा या संस्था मराठी भाषा विभागाच्या नावाखाली संमेलनाचे आयोजन मिळवतात. संमेलन पार पडल्यानंतरही साहित्य प्रसारासाठी त्या फारसे काम करत नाहीत. साहित्य संमेलन ज्या भागात होते. त्या भागातील साहित्यविषयक संस्था वाढावी, असा हेतू असतो. तो साध्य होताना दिसत नाही.
प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाहिरांवर रडण्याची वेळ

$
0
0

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे टीकास्त्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘शाहिरांनी आपल्या पोवाड्यांनी महाराष्ट्र सदैव जागता ठेवण्याचे काम केले. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते पेशव्यांपर्यंत अनेकांनी शाहिरांचा योग्य सन्मान केला; परंतु आज मात्र शाहिरांना सन्मानासाठी झगडावे लागत असून, त्यांच्यावर रडण्याची वेळ आली आहे,’ असे टीकास्त्र शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सोडले.
लोकलला क्षेत्रातील योगदानासाठी शाहीर हेमंत मावळे आणि लावणी कलावंत प्रभा शिवणेकर यांना पुणे महापालिकेतर्फे पुरंदरे यांच्या हस्ते ‘लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, निवड समितीचे सदस्य जयप्रकाश वाघमारे, नगरसेवक गोपाळ चिंतल, अशोक जाधव, सत्यजित खांडे या वेळी उपस्थित होते.
‘आज शाहिरांचे महत्त्व कमी झाल्यासारखे वाटते. हा आपल्यातील दोष आहे. शाहिरांचे काम आजही तितकेच महत्त्वाचे आहे; परंतु त्यांना पूर्वीप्रमाणे आज मान, सन्मान आणि गौरव मिळत नाही. आपण केवळ राष्ट्रीयत्वाच्या गप्पा मारतो; परंतु शाहीर स्वत: ते जगत असतात. अशा शाहिरांचा सन्मान करणे आपले कर्तव्य असून, हा उपकाराचा भाग नाही,’ असेही पुरंदरे यांनी ठणकावून सांगितले.
मावळे म्हणाले, ‘शाहिरांसह अनेक कलावंतांची आर्थिक स्थिती बिकट आहे. अनेकांना पुरस्कार मिळतात; परंतु ते पुरस्कार ठेवण्यासाठी स्वत:चे घर नाही, कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ नाही, तरीही लोककला कलावंत आपली समाजाशी बांधिलकी जपून आहेत. त्यांचा उचित सन्मान झाला पाहिजे.’
पद्मजा कुलकर्णी, वैशाली गांगवे, बुवा डावळकर, गोविंद कुडाळकर, आशा मुसळे, सीमा पाटील, ज्ञानेश्वर बंड, शकुंतला सोनावणे, विठ्ठल राशिनकर, रेखा परभणीकर या लोककला कलावंतांनाही विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. रूपाली देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंगचा पेपर पुन्हा फुटला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इंजिनीअरिंग शाखेचे विविध विषयांचे तब्बल दहा विषयांचे पेपर व्हॉट्स अॅपहून व्हायरल होऊन फुटल्याची घटना ताजी असतानाच इंजिनीअरिंगचा आणखी एक पेपर शुक्रवारी परीक्षेपूर्वी फुटला आहे. एका इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडे पेपरमधील प्रश्नांची उत्तरे असलेल्या पुस्तकांच्या पानांची झेरॉक्स प्रत प्रश्नांच्या क्रमांकासहित आढळून आली आहे.

विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग शाखेची परीक्षा सध्या सुरू आहे. ही परीक्षा सुरू झाल्यापासूनच विविध विषयांचे पेपर व्हॉट्स अॅपहून व्हायरल होऊन पेपरफुटीच्या घटना घडत आहेत. आतापर्यत प्रथम ते अंतिम वर्षापर्यंतचे तब्बल दहापेक्षा अधिक विषयांचे पेपर फुटले आहे. यावर विद्यापीठाने केवळ गणित आणि मेकॅनिक्स हे दोन पेपर फुटल्याचे जाहीर केले. तसेच, या पेपरफुटीला कारणीभूत ठरणाऱ्या विद्यानिकेतन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग आणि डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगला कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच, पोलिसांनी मोबाइलमध्ये पेपर सापडणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे पेपरफुटी थांबली, असे विद्यापीठाकडूनही सांगण्यात आले.

पेपरफुटी थांबविण्यासाठी विद्यापीठाकडून कॉलेजला पेपर पाठविण्याचा कालावधी कमी करण्यात आला आहे. तसेच, विद्यार्थ्यांना देखील परीक्षा केंद्रात लवकर बोलविण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, इंजिनीअरिंग शाखेची पेपरफुटी थांबत नसल्याचेच आढळून आले आहे. इंजिनीअरिंगच्या द्वितीय वर्षाच्या मेकॅनिकल शाखेचा शुक्रवारी सकाळी दहा वाजता असणारा इंजिनीअरिंग मेटॅलर्जीचा पेपर व्हॉट्स अॅपहून व्हायरल होऊन फुटला. विद्यार्थ्यांकडे पेपरमधील प्रश्नांची उत्तरे असलेल्या पुस्तकांच्या पानांची झेरॉक्स प्रत थेट प्रश्न क्रमांकासहित आढळून आली आहे. या छायाप्रतींमध्ये शुक्रवारी झालेल्या पेपरमधील प्रश्न क्रमांक 2 (b), 3 (a), 3 (b), 5 (c), 7 (a), 7 (b), 7 (c) यांची उत्तरेच छापील स्वरूपात होती. याशिवाय प्रत्येक छायाप्रतींवर पेपरमधील प्रश्नक्रमांक लिहिलेला होता. त्यामुळे पेपर व्हॉट्स अॅपहून व्हायरल होऊन परीक्षेपूर्वी फुटला आणि विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरे असणाऱ्या पुस्तकाच्या पानांच्या छायाप्रती काढून स्वत:जवळ ठेवल्या आहेत.

‘काळजी घेईन’

इंजिनीअरिंगचे पेपर व्हायरल होणार यासाठी मी गेल्या दोन दिवसांपासून परीक्षा प्रक्रियेवर लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे गेले दोन दिवस असे प्रकार घडले नाही. शुक्रवारी पेपर व्हॉट्सअॅपहून व्हायरल झाल्याची शक्यता कमी आहे. मात्र, तसे झाल्यास त्याबाबत कठोर पावले उचलू. यापुढे पेपर व्हॉट्स अॅपहून व्हायरल होणार नाही की फुटणार नाही, याची काळजी विद्यापीठ प्रशासन घेईल.

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुल्कवाढीविरोधात आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शाळांच्या शुल्कवाढीबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) शुक्रवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाला टाळे ठोकून शुल्कवाढीचा व तावडेंचा निषेध केला. शुल्कवाढीबाबत स्थापन केलेल्या व्ही. जी. पळशीकर पुनर्परीक्षण समितीच्या शिफारशींवर निर्णय घ्यावा, कार्यालयाला शाळांची लेखा परीक्षण तपासणीचे अधिकार द्यावेत अशा विविध मागण्या करण्यात आल्या. कार्यालयाच्या दरवाजाला कुलूप लावल्याने कर्मचारी सुमारे अर्धा तास खोलीच्या आतच होते.खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून मोठ्या प्रमाणात शुल्कवाढ केल्याने पालकांची आर्थिक लूट होत आहे. मात्र, याकडे शिक्षण विभागाकडून गांभिर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे सामान्य पालकांना या शाळांचे शुल्क परवडत नाही. शाळांमध्ये होणाऱ्या बेकायदेशीर शुल्कवाढीमुळे पालक चांगलेच संतप्त झाले आहेत. यासंदर्भात त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. मात्र, त्यांनीही सुनावणीचा फार्स करून पालकांच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळेच मनविसेने शिक्षण उपसंचालक कार्यालयाला टाळे ठोकत शुल्कवाढीचा व शिक्षणमंत्र्यांचा निषेध केल्याचे मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी सांगितले.

मुदत संपल्याने समितीच्या शिफारशींबाबत शिक्षण विभागाकडून खुलासा झालेला नाही अथवा या शिफारशींवर कोणताही ठोस निर्णय तावडे यांनी घेतला नाही. त्यामुळे मनविसेला शुल्कवाढीसंदर्भात आक्रमक व्हावे लागले, असे यादव यांनी सांगितले. अभिषेक जगताप, अभिषेक थिटे, अभिजित यनपुरे, संतोष वारे, अभिजित ढमाले, नीरज शिंदे, रोहित बनकर, जावेद खान, राहुल प्रताप, नीलेश वेल्लाळ, रितेश बढे, कृष्णा ताजवेकर, कुणाल कटके आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्क्रीनच्या खर्चावरून संभ्रमावस्था

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महापालिकेच्या शहरातील सर्वांत मोठे प्रेक्षागृह असलेल्या गणेश कला क्रीडा मंच येथे बसविण्यात आलेल्या विविध अत्याधुनिक साधनांची सध्या दुरवस्था झाली असून, त्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. देशामध्ये सर्वांत लांबवरून होणाऱ्या चित्रपटाच्या प्रोजेक्शनसाठी येथे बसविलेली यंत्रणा सध्या धूळ खात असून, या ठिकाणचा भला मोठा स्क्रीन नादुरुस्त झाला आहे. प्रामुख्याने पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासातील (पिफ) चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी बसविण्यात आलेल्या यंत्रणेवर पुन्हा खर्च करायचा, अशी संभ्रमावस्था महापालिकेसमोर निर्माण झाली आहे.
पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘पिफ’चे उद्घाटन आणि समारोप समारंभ गणेश कला क्रीडा मंच येथे व्हायचे. त्यावेळी, उद्घाटनाचा आणि समारोपाचा चित्रपट सर्व प्रतिनिधींना पाहता यावा, यासाठी महापालिकेच्या खर्चातून गणेश कला क्रीडा मंच येथे अद्ययावत यंत्रणा उभारण्यात आली. ‘पिफ’ दरम्यान त्याचा वापरही केला जायचा. गेल्या काही वर्षांमध्ये कलमाडी सक्रिय राजकारणापासून दूर गेल्यानंतर ‘पिफ’चा उद्घाटन आणि समारोप सोहळा गणेश कला क्रीडा मंचाऐवजी मल्टिप्लेक्समध्ये व्हायला लागला आहे. परिणामी, गणेश कला क्रीडा मंच येथील चित्रपट प्रदर्शन यंत्रणेचा वापरच झालेला नाही.
गणेश कला क्रीडा मंच येथे मोठ्या स्वरूपाचे अनेक कार्यक्रम होतात. या वेळी काही आयोजकांकडून मोठ्या स्क्रीनचा वापर करता येईल का, याबाबत विचारणा केली जाते; पण ही यंत्रणाच वापरली गेली नसल्याने सध्या त्याची पूर्ण दुरवस्था झाली आहे. गणेश कला क्रीडा मंचाच्या मुख्य मंचाच्या वरील बाजूस बसविण्यात आलेला मोठा स्क्रीन एका बाजूने नादुरुस्त झाला आहे. गणेश कला क्रीडा मंचातील या यंत्रणेचा अलीकडे वापरच होत नसल्याने त्याच्या देखभाल-दुरुस्तीवर पुन्हा खर्च करायचा का, याबाबत पालिका संभ्रमात आहे. ‘पिफ’च्या निमित्ताने पूर्वी वर्षभरातून किमान आठ दिवस तरी त्याचा वापर होत असे. आता, पिफमधील चित्रपट या ठिकाणी दाखवले जात नसल्याने त्याच्या दुरुस्तीवर खर्च करून फायदा होणार का, याची चाचपणी केली जात आहे.

गणेश कला क्रीडा मंचातील चित्रपट प्रदर्शनाची यंत्रणा नादुरुस्त असल्याने सध्या त्याचा वापर होत नाही. स्क्रीनच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असून, त्यावर अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल.
- प्रकाश अमराळे,
व्यवस्थापक, सांस्कृतिक केंद्रे, पुणे महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाय घसरून विद्यार्थी कॅनॉलमध्ये बुडाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर
दहावीची परीक्षा नुकतीच दिलेला १६ वर्षांचा मुलगा हडपसर येथील लक्ष्मी कॉलनी येथून वाहणाऱ्या कॅनॉलमध्ये पाय घसरून बुडाला. अग्नीशामक दलाच्या जवानांकडून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सायंकाळपर्यंत मिळून आला नाही. ही घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
दिनेश प्रेमकुमार पनीकर (रा. पंधरानंबर, हडपसर) असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. दिनेश सकाळी त्याचा लहान भाऊ मोहित व दोन मित्र असे चौघेजण कॅनॉलला पोहायला गेले. चौघेही पाण्यात पाय टाकून बसले होते. त्यावेळी पाण्याच्या कडेने बसलेला असताना दिनेश उठण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याचा पाय घसरून तो कॅनॉलमध्ये बुडाला. मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना अपयश आले. दिनेशला पोहता येत नव्हते. दिनेशसह त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला; मात्र सकाळची वेळ असल्याने तेथे कोणीही नसल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही. लहान भावासमोर कॅनॉलला खूप पाणी असल्याने तो बुडाल्यानंतर पुन्हा वर आलाच नाही. मित्रांनी घडलेली सर्व हकीगत घरी सांगितली. त्यानंतर अग्निशामक दलाचे जवान व पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र दुपारी चारपर्यंत तो न सापडल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. दिनेश याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्षपूर्ती म्हणजे ‘बर्बादियों का जश्न’

$
0
0

जयराम रमेश यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेले महोत्सव म्हणजे बर्बादियों का जश्न आहेत,’ या शब्दांत माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी शुक्रवारी मोदी सरकारवर हल्ला चढविला.
सरकार काहीही प्रचार करीत असले, तरी येत्या २०१९ च्या निवडणुकीत २००४ च्या निकालाची पुनरावृत्ती होईल, असा दावाही रमेश यांनी पत्रकार परिषदेत केला. ‘मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरांत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मोदी सरकारच्या बहुतेक योजना म्हणजे पूर्वीच्या यूपीए सरकारनेच सुरू केलेल्या आहेत. जुन्या योजनांची नावे बदलून त्यांचे रिपॅकेजिंग, मार्केटिंग आणि ब्रँडिंग करण्यात आले आहे. त्यामुळे किसने किया काम और मैने जताया नाम, असा या सरकारचा खाक्या आहे,’ अशी टीका रमेश यांनी केली. आर्थिक आघाडीवर निराशाजनक चित्र असून, दर वर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचा दावा सरकारने केला असला तरी प्रत्यक्षात दोन वर्षांत फक्त चार लाख रोजगारांची निर्मिती झाली आहे. सामाजिक तणाव, दंगेधोपे आणि दलितांवर अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. नक्षलवाद आणि जम्मू काश्मीरमधील परिस्थिती पाहता अंतर्गत सुरक्षितता वाऱ्यावर पडली असून, परराष्ट्र धोरणही अस्पष्टच आहे, असे रमेश म्हणाले.
वस्तू आणि सेवा कराचे विधेयक काँग्रेसनेच मांडले होते, तेव्हा फक्त नरेंद्र मोदी यांनीच विरोध केला होता.गेल्या वर्षी सरकारने केलेल्या नोटबंदीमधून किती काळा पैसा जमा झाला, याचे उत्तर केंद्र सरकारने अद्यापही दिलेले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

लोकतंत्र नव्हे; एकतंत्र
मोदी सरकारने जीएसटी वगळता एकाही विषयावर अन्य पक्षांना विश्वासात घेतले नाही आणि चर्चाही केली नाही. मी सर्वकाही जाणतो आणि मला हवे तेच करणार, असा मोदी यांचा खाक्या आहे. त्यामुळे हे लोकतंत्र नसून एकतंत्र आहे, अशी टीका रमेश यांनी केली. यापूर्वीही अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी आमचे विरोधक होते. मात्र, मोदी यांच्याकडे पाहिले, तर अडवानी अधिक सौम्य वाटू लागले आहेत. देशभरात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सीबीआय आणि इडीचा बिनदिक्कत गैरवापर सुरू असल्याचे ते म्हणाले.

‘जावडेकर पर्यावरण सत्यानाश मंत्री’
प्रकाश जावडेकर यांच्याकडे पर्यावरण खाते असताना त्यांनी पर्यावरणाचा नाश करण्यावरच भर दिला. त्यामुळे ते पर्यावरण रक्षणमंत्री नसून पर्यावरणाचा सत्यानाश करणारे मंत्री ठरले, अशी टीकाही रमेश यांनी केली. ‘मी भरपूर प्रकल्पांचे मार्ग मोकळे केले असे सांगत, ते फिरत आहेत. जेव्हा मी लवासा प्रकल्पावर आपण निर्बंध आणले, तेव्हा मला देशद्रोही ठरविण्यात आले होते,’ असेही त्यांनी नमूद केले.

‘हक्सर यांच्यासारखा सल्लागार असावा’

‘देशातील राजकीय, आर्थिक स्तरावरील तर कधी आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध पेचप्रसंगी पी. एन. हक्सर इंदिरा गांधी यांच्यासमवेत ठामपणे उभे राहिले. हक्सर यांनी केवळ सल्लागाराचीच भूमिका बजावली नाही; गांधी यांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून दिली. प्रत्येक सरकारला हक्सर यांच्यासारख्या स्पष्टवक्त्या, धडाडीच्या आणि सत्याची बाजू ठामपणे मांडणाऱ्या सल्लागाराची गरज आहे,’ असे मत माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी व्यक्त केले.
प्रा. एस. व्ही. कोगेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘सेंटर फॉर अॅडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज’तर्फे रमेश यांचे ‘हक्सर अँड मेकिंग ऑफ इंदिरा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, संस्थेचे सहसंचालक मेजर जनरल (निवृत्त) एस. एच. महाजन, एम. मंगलमूर्ती उपस्थित होते. एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी प्रास्तविक केले.
रमेश यांनी व्याख्यानात हक्सर यांच्या स्वभाववैशिष्ट्यांपासून राजकीय, औद्योगिक, आंतरराष्ट्रीय पातळीवरील संबंध हाताळताना त्यांनी ठामपणे घेतलेल्या भूमिकांचे ओघवत्या शैलीत विवेचन केले. ‘भारत-पाकिस्तान करार, बांगलादेशाबाबत भारताची भूमिका, अमेरिकेशी झालेला पत्रव्यवहार, इंदिरा गांधी यांनी वेळोवेळी घेतलेल्या देशहिताच्या निर्णयांमध्ये हक्सर यांचा मोलाचा वाटा होता. गांधी यांच्या सचिवपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर १९६९ ते १९७३ या काळात हक्सर यांनी अनेक धाडसी भूमिका घेतल्या,’ असे रमेश म्हणाले.
हक्सर रोकठोक व्यक्तिमत्त्व होते. एकमेकांवर असलेला विश्वास आणि स्पष्ट विचारांमुळे महत्त्वाचे निर्णय घेताना दोघांचा खूप फायदा झाला. हक्सर यांच्या पाठिंब्यामुळे गांधी यांच्या राजकीय कारकिर्दीला गती मिळाली, असेही रमेश यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घनकचरा आराखडा ७ जूनपर्यंत पाठवणार

$
0
0

कचराप्रश्नी ठाम भूमिका घेणार; महापौरांचे स्पष्टीकरण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिका प्रशासनाने तयार केलेला घनकचऱ्याचा आराखडा ७ जूनपर्यंत राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे. अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी ‌शुक्रवारी दिली. प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्याचे सादरीकरण सर्वपक्षीय गटनेत्यांसमोर नुकतेच करण्यात आले. शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कडक भूमिका घेऊन ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे टिळक यांनी सांगितले.
शहरातील कचरा डेपोत टाकू देणार नाही, अशी भूमिका घेऊन उरुळी देवाची तसेच फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी कचराबंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे शहरातील कचरा उचलला जात नसल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालून महिनाभरात पालिकेने कचऱ्याचा आराखडा तयार करून सरकारकडे पाठवावा, अशी सूचना केली होती. त्यानंतर प्रशासनाने आराखडा तयार करून टिळक यांच्याकडे पाठविला. प्रशासनाकडून आलेल्या आराखड्याचे सविस्तर सादरीकरण पालिकेतील सर्व पक्षांच्या गटनेत्यांना करण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.
शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी प्रलंबित आहे. यामध्ये राडारोडा निर्माण करणाऱ्यांना प्रतिबंध बसावा यासाठी दंडात्मक कारवाई, बफरझोनची निश्चिती, प्लास्टिक पिशव्यांवर बंदी, हॉटेल, मंगल कार्यालयांच्या कचऱ्यावर निर्बंध तसेच महापालिका हद्दीबाहेरील गावांमधून येणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. शहरातील कचराप्रश्न सोडविण्यासाठी डिसेंबर २०१९ अखेरपर्यंत ओपन डंपिंग बंद करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. प्रशासनाने तयार केलेला आराखडा नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यावर हरकती आणि सूचना मागविल्या जाणार आहेत. या सर्व सूचनांचा समावेश करून सात जूनपर्यंत हा आराखडा राज्य सरकारकडे पाठविला जाणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्लॉटच्या खरेदीतून दोन कोटींचा गंडा

$
0
0

‘टेम्पल रोझ’च्या संचालकांवर गुन्हा दाखल; एक अटकेत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुरंदर तालुक्यातील पिंगोरीत प्लॉट खरेदीच्या आमिषाने गुंतवणूकदारांची दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जमीन खरेदीत गुंतवणूक करा; चार वर्षांनी प्लॉट नको असल्यास दुप्पट रक्कम परत मिळविण्याचे आमिष टेम्पल रोझ रियल इस्टेट प्रा. लि.च्या संचालकांनी दाखविले होते.
या योजनेत आतापर्यंत चार हजार जणांनी गुंतवणूक केली असून, फसवणूक झालेल्यांमध्ये डॉक्टर, इंजिनीयर, शास्त्रज्ञ आदी उच्चशिक्षितांचा समावेश आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे. देविदास गोविंदराम सजनानी (वय ६७, रा. बांद्रे, मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दीपा देविदास सजनानी, वनिता देविदास सजनानी, थोरात, केशव नारायण अद्याप फरारी आहेत. या बाबत नितीन शुक्ला (वय ३४, रा. एनसीएल कॉलनी, पाषाण) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देविदास आणि साथीदारांनी २००७ मध्ये गोल्डन रोझ रियल इस्टेट प्रा. लि. आणि गोल्डन रोझ लाइफ स्टॉक प्रा. लि. या दोन कंपन्या स्थापन केल्या. लाइफ स्टॉक कंपनीच्या नावाने पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे २०११-१२ मध्ये ४४० एकर जागा विकत घेतली. या ठिकाणी ‘हप्त्याने पैसे भरा आणि प्लॉट विकत घ्या; प्लॉट नको असल्यासे चार वर्षांत दामदुप्पट रक्कम मिळावा’ अशी योजना जाहीर केली. योजनेला अनेकांनी भरभरून प्रतिसाद दिला. पोलिसांच्या अंदाजानुसार चार हजार जणांनी गुंतवणूक केली आहे. मात्र, मुदत पूर्ण होऊनही पैसे मिळालेच नाहीत आणि प्लॉटही नावावर झाला नाही. प्लॉटची चौकशी करण्यासाठी गेले, असता ही जमीन गोल्डन रोझ रियल इस्टेटची नसून गोल्ड रोझ लाइफ स्टॉकची असल्याचे समजले. तसेच जमीन बिगरशेती नसल्याचेही लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच शुक्ला यांनी मार्चमध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली.
चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून देविदास सजनानीला अटक करण्यात आली, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त सुधीर हिरेमठ आणि पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवर्षीय मुलीवर अत्याचार

$
0
0

विश्रांतवाडी पोलिसांनी केली नराधम काकाला अटक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आयटी इंजिनीयर असलेल्या काकाने आठ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित मुलीने काका माझ्यासोबत डर्टी गेम खेळत असल्याची तक्रार आईकडे केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला. सासरच्यांचा विरोध मोडून काढत पीडितेच्या आईने विश्रांतवाडी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या वडिलांचे २०१४मध्ये अपघाती निधन झाले. त्यामुळे मुलगी आणि तिची आई सासू-सासऱ्याकडे विश्रांतवाडी परिसरात राहतात. आरोपी (वय ३४) आयटी इंजिनियर असून, पीडितेची आईही आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. आरोपीचे लग्न झालेले असून, त्याला दोन मुले आहेत. त्याची पत्नीही नोकरी करते. फेब्रुवारी, मार्च महिन्यात आरोपीला कंपनीने दोन महिन्यांचा ब्रेक दिला. त्या वेळी आरोपी दिवसभर घरात असायचा. पीडितेची आई आणि पत्नी कामावर गेल्यानंतर तुला झोपवतो, असे सांगून मुलीवर अत्याचार करीत असे. या प्रकारामुळे मुलीला मानसिक धक्का बसला. एके दिवशी मुलीच्या आईने तिला दिवसभर घरी राहण्याविषयी बजावले असता, तिने स्पष्ट नकार दिला. बाहेर मी एकटी राहीन, पण काकासोबत घरात थांबणार नसल्याचेही तिने सांगितले. तिच्या या अनपेक्षित वागण्याने आईला शंका आली. तिने विश्वासात घेऊन मुलीकडे चौकशी केली असता, ‘काका माझ्यासोबत डर्टी गेम खेळतात’ असे मुलीने सांगितले. ते ऐकून पीडितेची आईने तिला घेऊन सासरी गेली. माहेरच्या मंडळींनाही तेथे बोलावून घडलेला प्रकार कथन केला. त्या वेळी सासरच्यांनी हे प्रकरण मिटवू, त्याची पोलिसांकडे तक्रार करू नको अशी विनवणी केली. मात्र, मुलीच्या आईने तसे करण्यास नकार दिला.त्यानंतर तिने ‘मुस्कान’या एनजीओशी संपर्क साधला. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निमंत्रण पत्रिकेतील नावांवरून नवा वाद

$
0
0

सावरकर, बाळासाहेबांच्या चित्राचे उद्या अनावरण

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र उद्या, रविवारी (२८ मे) राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात बसविण्यात येणार आहे. तसेच नवी सांगवी येथील उड्डाणपुलाचेही उद् घाटन तावडे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महापौर नितीन काळजे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका तयार करताना नवी सांगवी येथील नगरसेवकांऐवजी अन्यच नगरसेवकांची नावे पत्रिकेत छापण्यात आल्याने काही नगरसदस्यांनी प्रशासनाला
शुक्रवारी धारेवर धरले.
उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते, नगरसेविका झामाबाई बारणे आदी या वेळी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता येताच पहिल्याच सर्वसाधारण सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी २८ मे रोजी सावरकरांची जयंती आहे. जयंतीच्या दिवशीच पालिका सभागृहात तैलचित्र लावण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या शिष्टमंडळाने केली होती, असे एकनाथ पवार म्हणाले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३१ नवी सांगवी येथील महात्मा ज्योतीबा फुले उड्डाण पुलाचे व भुयारी मार्गाचेही शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते रविवारी सकाळी अकरा वाजता लोकार्पण होणार असल्याची माहिती महापौर काळजे यांनी
यावेळी दिली.
तैलचित्र बसविण्याचा कार्यक्रम हा रविवारी दुपारी एक वाजता महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे असणार आहेत. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, प्रांत संघचालक सुरेश जाधव, विरोधी पक्षनेते योगेश बहल, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित राहणार आहेत.
‘निमंत्रण हवे’
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरण सोहळ्याला ठाकरे कुटुंबीयांतील महत्त्वाची व्यक्ती अथवा शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना निमंत्रित करण्याची मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख व पालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांनी महापौर आणि आयुक्तांकडे केली आहे. याबाबत कलाटे यांनी महापौर नितीन काळजे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन
दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंगचा पेपर पुन्हा फुटला

$
0
0

विद्यार्थ्यांकडे पेपरमधील प्रश्नांची उत्तरे असलेल्या पुस्तकांच्या पानांची झेरॉक्स

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इंजिनीअरिंग शाखेचे विविध विषयांचे तब्बल दहा विषयांचे पेपर व्हॉट्स अॅपहून व्हायरल होऊन फुटल्याची घटना ताजी असतानाच इंजिनीअरिंगचा आणखी एक पेपर शुक्रवारी परीक्षेपूर्वी फुटला आहे. एका इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडे पेपरमधील प्रश्नांची उत्तरे असलेल्या पुस्तकांच्या पानांची झेरॉक्स प्रत प्रश्नांच्या क्रमांकासहित आढळून आली आहे.
विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग शाखेची परीक्षा सध्या सुरू आहे. ही परीक्षा सुरू झाल्यापासूनच विविध विषयांचे पेपर व्हॉट्स अॅपहून व्हायरल होऊन पेपरफुटीच्या घटना घडत आहेत. आतापर्यत प्रथम ते अंतिम वर्षापर्यंतचे तब्बल दहापेक्षा अधिक विषयांचे पेपर फुटले आहे. यावर विद्यापीठाने केवळ गणित आणि मेकॅनिक्स हे दोन पेपर फुटल्याचे जाहीर केले. तसेच, या पेपरफुटीला कारणीभूत ठरणाऱ्या विद्यानिकेतन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग आणि डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगला कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच, पोलिसांनी मोबाइलमध्ये पेपर सापडणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे पेपरफुटी थांबली, असे विद्यापीठाकडूनही सांगण्यात आले.
पेपरफुटी थांबविण्यासाठी विद्यापीठाकडून कॉलेजला पेपर पाठविण्याचा कालावधी कमी करण्यात आला आहे. तसेच, विद्यार्थ्यांना देखील परीक्षा केंद्रात लवकर बोलविण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, इंजिनीअरिंग शाखेची पेपरफुटी थांबत नसल्याचेच आढळून आले आहे. इंजिनीअरिंगच्या द्वितीय वर्षाच्या मेकॅनिकल शाखेचा शुक्रवारी सकाळी दहा वाजता असणारा इंजिनीअरिंग मेटॅलर्जीचा पेपर व्हॉट्स अॅपहून व्हायरल होऊन फुटला. विद्यार्थ्यांकडे पेपरमधील प्रश्नांची उत्तरे असलेल्या पुस्तकांच्या पानांची झेरॉक्स प्रत थेट प्रश्न क्रमांकासहित आढळून आली आहे. या छायाप्रतींमध्ये शुक्रवारी झालेल्या पेपरमधील प्रश्न क्रमांक 2 (b), 3 (a), 3 (b), 5 (c), 7 (a), 7 (b), 7 (c) यांची उत्तरेच छापील स्वरूपात होती. याशिवाय प्रत्येक छायाप्रतींवर पेपरमधील प्रश्नक्रमांक लिहिलेला होता. त्यामुळे पेपर व्हॉट्स अॅपहून व्हायरल होऊन परीक्षेपूर्वी फुटला आणि विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरे असणाऱ्या पुस्तकाच्या पानांच्या छायाप्रती काढून स्वत:जवळ ठेवल्या आहेत.

इंजिनीअरिंगचे पेपर व्हायरल होऊ नयेत यासाठी मी गेल्या दोन दिवसांपासून परीक्षा प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे गेले दोन दिवस असे प्रकार घडले नाहीत. शुक्रवारी पेपर व्हॉट्सअॅपवरून व्हायरल झाल्याची शक्यता कमी आहे. मात्र, तसे झाल्यास त्याबाबत कठोर पावले उचलू. यापुढे पेपर व्हॉट्सअॅपवरून व्हायरल होणार नाही की फुटणार नाही, याची काळजी विद्यापीठ प्रशासन घेईल.
- डॉ. नितीन करमळकर,
कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

पेपरफुटी थांबवायची असल्यास पेपर कॉलेजांना ई-मेलद्वारे पाठविण्याचा कालावधी कमी करण्याची गरज आहे. तसेच, पेपर ज्या ठिकाणी डाउनलोड होतो, तेथे सक्तीने सीसीटीव्ही कॅमेरा लावला पाहिजे. परीक्षा केंद्रांवर होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी भरारी पथके वाढविण्याची आवश्यकता आहे.
- प्रा. अतुल बागुल, माजी सिनेट सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टाइम्स प्रॉपर्टी एक्स्पो’ आजपासून सुरू होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे शहर व परिसरातील शंभरपेक्षा अधिक नामांकित बांधकाम विकसकांचे प्रकल्प एकाच छताखाली पाहण्याची सुवर्ण संधी पुणेकरांना ‘द टाइम्स प्रॉपर्टी एक्स्पो’मध्ये मिळणार आहे. गेल्या १२ वर्षांपासून नागरिकांच्या आग्रहास्तव या एक्पोचे आयोजन होत असून, यंदा हा एक्स्पो आज, शनिवारी (२७ मे) आणि उद्या, रविवारी (२८ मे) शेरेटॉन ग्रँड (पूर्वीचे हॉटेल ल मेरेडियन) येथे होत आहे.
या एक्स्पोचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘रेरा’ कायद्याविषयी मार्गदर्शन करणारा एक स्वतंत्र ‘रेरा डेस्क’ एक्स्पोत राहणार आहे. या डेस्कवर नागरिकांना कायद्याविषयी असणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे. तसेच, या कायद्यामुळे सामान्य नागरिकांना काय फायदा होणार आहे, कायद्यामुळे देशातील रिअल इस्टेटचे चित्र कसे बदलणार आहे, नागरिकांना कसा फायदा मिळेल अशा विविध मुद्द्यांबाबत माहिती मिळणार आहे. या एक्स्पोत साडेसाच लाख रुपयांपासूनच्या सदनिकांची माहिती नागरिकांना मिळेल. तसेच, १८० रुपये प्रति चौरसफूटापासून सुरू होणाऱ्या भूखंडांची माहिती मिळेल. एक्स्पोमध्ये सदनिका किंवा भूखंड खरेदी करण्याची उत्तम संधी मिळणार असल्याने आपल्या स्वप्नातील घर पूर्ण करण्याची संधी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२वी निकालाची तारीख सोमवारी जाहीर होणार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी, २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक अर्थात बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख सोमवारी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी 'मटा ऑनलाइन'ला दिली.

गेल्या वर्षी बारावीचा निकाल २५ मे रोजी जाहीर झाला होता. त्यामुळे यंदा बारावीची परीक्षा दिलेले सुमारे १५ लाख विद्यार्थी आणि त्यांचे पालक गेल्या आठवड्यापासूनच निकालाच्या तारखेची वाट पाहत आहेत. व्हॉट्स अॅपवरून निकालाच्या वेगवेगळ्या तारखा फिरत असल्यानं त्यांच्यात संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळे अखेर मंडळाच्या अध्यक्षांनीच याबाबत खुलासा केला आहे.

शनिवार आणि रविवारच्या शासकीय सुटीनंतर सोमवारी मंडळातर्फे तयारीचा अंतिम आढावा घेतला जाईल आणि त्याच दिवशी निकालाची तारीख जाहीर केली जाईल, असं गंगाधर म्हमाणे यांनी स्पष्ट केलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० किंवा ३१ तारखेला बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'चार तासांत ईव्हीएम हॅक करणं अशक्य'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन हॅक करून दाखविण्याचे निवडणूक आयोगाने दिलेले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसने स्वीकारले आहे. मात्र त्यासाठी दिलेला चार तासांचा अवधी अगदी खूपच कमी असल्याने इतक्या कमी वेळेत हे मशीन हॅक करून दाखविणे अशक्य असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी स्पष्ट केले.

विधानसभेपाठपाठ महापालिका निवडणुका महाराष्ट्रात झाल्या. त्या निवडणुकांमध्ये भाजपाला अनपेक्षित यश मिळाले. ज्या ठिकाणी राष्ट्रवादी किंवा अन्य पक्षांचे वर्चस्व होते त्या ठिकाणी देखील भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय जाणकारांसह राजकीय पक्षांना मोठा धक्का बसला आहे. महापालिका निवडणुकानंतर पुण्यातही अन्य पक्षांना मोठा फटका बसला. त्यात पुण्यात महापालिकेत राष्ट्रवादी पक्ष सत्ताधारी असल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले. त्यामुळे हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. त्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांकडून ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यास सुरुवात झाली होती. त्याबाबत अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर निवडणूक आयोगाने सर्वच पक्षांना ईव्हीएम हॅक करण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर राष्ट्रवादीने हे मशीन हॅक करण्याचे आव्हान स्वीकारले. राष्ट्रवादीच्यावतीने अॅड. वंदना चव्हाण, गौरव जाचक, यासिन शेख यांनी हे आव्हान स्वीकारले आहे.

निवडणूक आयोगाचे आव्हान स्वीकारण्यासंदर्भात राष्ट्रवादीच्या खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. 'महापालिका निवडणुकीत ईव्हीएममध्ये फेरफार करून निकाल बदलल्याच्या तक्रारी वाढल्या. त्यानंतर निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय बैठक बोलाविली होती. त्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने माझ्यासह डी. पी. त्रिपाठी उपस्थित होते. ईव्हीएमला वापरण्यात येणारे व्होटर व्हेरीफिकेशन पेपर ऑडीट टेस्ट (व्हीव्हीपॅट) लावण्याच्या सूचना मागविण्यात आल्या. त्यानंतर ईव्हीएम हॅक करणे शक्य नसल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. त्यावेळी हे मशीन हॅक करून दाखविण्याचे आव्हान राजकीय पक्षांना दिले असून त्या करिता २६ मेपर्यंत मुदत दिली आहे,' असे सांगण्यात आले होते, असे अॅड. चव्हाण यांनी नमूद केले.

ईव्हीम हॅक करण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. पण चार तासात कोणी हे मशीन हॅक करू शकत नाही. या कारणाने इतर कोणतेही पक्ष पुढे आले नाहीत. कोणी तज्ज्ञ या संदर्भात जबाबदारी घेत नसले तरी ईव्हीएम हॅक करण्याबाबत त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळणार आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ईव्हीएममध्ये फेरफार होऊ शकतो का, याची तपासणी करण्यात येणार आहे. भाजपने ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी हा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वेत ‘बायो-टॉयलेट्स’ बसवा : हरित लवाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेल्वे रुळावर थेट पडणाऱ्या मानवी विष्ठेमुळे अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण होत असून नागरिकांच्या आरोग्यासही त्या घातक आहेत. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत सर्व रेल्वे गाड्यांमध्ये 'बायो-टॉयलेट्स' बसवावेत, असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने रेल्वे मंत्रालयाला दिले आहेत.

भारतीय रेल्वे गाड्यातील स्वच्छतागृहांची व्यवस्था पर्यावरणीय दृष्ट्या हानिकारक असल्याचा आक्षेप घेत 'सहयोग ट्रस्ट'मधील कायदेविषयक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांकडून अॅड. असीम सरोदे यांनी न्यायाधिकरणासमोर रेल्वे रूळांवरील अस्वच्छतेचे वास्तव मांडले होते. देशातील सर्व रेल्वे गाड्यांमध्ये २०२१ ते २२ पर्यंत पर्यावरणपूरक स्वच्छतागृह बसविणार असल्याचे पत्र रेल्वे मंत्रालयाने पत्र यापूर्वी न्यायाधिकरणाला दिले होते. मात्र एवढ्या मोठ्या कालावधीवर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्याची दखल घेऊन न्यायमूर्ती उमेश साळवी आणि प्रा. पी. सी. मिश्रा यांनी रेल्वे मंत्रालयाला येत्या ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत देशातील सर्व रेल्वे गाड्यांमध्ये बायोटॉयलेट बसविण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत, असे अॅड. असीम सरोदे यांनी सांगितले.

देशातील रेल्वे मार्गावरून साधारणतः ५५ हजार कोचमध्ये तब्बल २ लाख २० हजार बायोटॉयलेट लावण्याची गरज आहे. गेल्या वर्षीपर्यंत ५४ हजार १८८ बायोटॉयलेट बसविण्यात आली आहेत. पण यावर समाधान न मानता आगामी काळात वर्षनिहाय हे काम पूर्ण कसे करणार असल्याचा अहवाल दाखवा, असे न्यायाधिकरणाने सांगितले आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाने सविस्तर अहवाल सादर केला आहे, असे सरोदे म्हणाले. कॅगच्या अहवालानुसार देशभरात रेल्वेच्या रुळांवर दररोज ३ हजार ९८० मेट्रिक टन टन मानवी विष्ठा साठते. रेल्वे मार्गावर विविध ठिकाणी थांबलेल्या तसेच धावत्या ट्रेनमधून रेल्वे रूळांवर पडणारी ही घाण केवळ रुळांवरील प्रदूषणापुरती मर्यादीत नसून रेल्वे मार्गाच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होतो आहे, असे याचिकाकर्ते संजय जाधव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांचा बदल्या दोन तासांत रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी पालिका प्रशासनाने पाच उपायुक्त आणि क्षेत्रीय कार्यालयातील १२ सहायक आयुक्तांच्या बदल्या शनिवारी सकाळी अचानक केल्या. मात्र, अवघ्या अडीच ते तीन तासातं सकाळी झालेल्या बदल्या रद्द करून नवीन आदेश काढण्याची वेळ प्रशासनावर आली. सकाळी काढलेले आदेश अचानकपणे नक्की कोणाच्या दबावामुळे बदलण्यात आले, याची उलटसुलट चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील क्षेत्रीय कार्यालय मिळावे, यासाठी काही‌ अधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांवर दबाव आणल्याने तीन तासांतच जुने आदेश रद्द करून नवीन आदेश काढण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
महापालिका प्रशासनातील पाच उपआयुक्त तसेच १५ क्षेत्रीय कार्यालयात सहायक आयुक्त म्हणून काम करणाऱ्या १६ पैकी १२ अधिकाऱ्यांच्या बदल्या शनिवारी अचानकपणे करण्यात आल्या. महिन्यातील अखेरचा शनिवार म्हणून पालिकेला सुट्टी असतानाही बदल्यांचे आदेश काढण्यात आले. सकाळी साडेअकरा वाजता बदल्या करण्यात आलेल्या सर्व अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे ही माहिती देऊन हाच कार्यमुक्तीचा आदेश समजून तातडीने बदली झालेल्या ठिकाणी रुजू झाल्याचे निवेदन पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे ठेवावे, असे या आदेशात म्हटले होते. महापालिकेची नुकतीच झालेली निवडणूक ही दोनऐवजी चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने झाली आहे. ४१ प्रभाग तयार करून ही निवडणूक घेण्यात आलेली असल्याने जुन्या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत बदल झाला आहे. तसेच काही क्षेत्रीय कार्यालयांची नावेही बदलण्यात आलेली आहेत. ४१ प्रभागातील लोकसंख्येचा विचार करून प्रशासनाने ५ परिमंडळे (विभागीय कार्यालये) व १५ प्रभाग समिती आणि त्यांना संलग्न १५ क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पालिकेच्या प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी उपायुक्त तसेच सहायक आयुक्तांची बदली करण्याचे आदेश पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शनिवारी सकाळी काढले. पालिकेला सुट्टी असल्याने सर्व संबंधितांना ई-मेलद्वारे हे आदेश तातडीने पाठविण्यात देखील आले. मात्र, अवघ्या काही तासांमध्येच या आदेशात बदल करून नव्याने बदल्यांचे आदेश काढण्याची प्रशासनावर आली आहे. प्रशासनाने सकाळी एक आदेश काढलेला असताना अचानकपणे यात बदल कसे झाले, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. काही अधिकाऱ्यांचे ‘हित’ जोपासले जावे, यासाठी अट्टहास करण्यात आला असून मर्जीतील अधिकाऱ्यांना चांगली क्षेत्रीय कार्यालये मिळावीत, यासाठी दबाब आल्याने आयुक्तांनी बदल्यांचे नवीन आदेश काढल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ईव्हीएम हॅक करण्यास वेळ वाढवून द्यावी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) हॅक करून दाखविण्याचे निवडणूक आयोगने दिलेले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसने स्वीकारले आहे. मात्र, त्यासाठी दिलेला चार तासांचा अवधी खूपच कमी असल्याने त्या कमी वेळेत हे मशिन हॅक करून दाखविणे अशक्य असून वेळ वाढवून द्यायला हवी, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी स्पष्ट केले.
विधानसभेपासून महापालिकेपर्यंत भाजपला दणदणीत विजय मिळाल्यानंतर सर्वच राजकीय जाणकारांसह राजकीय पक्षांना मोठा धक्का बसला. त्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप अनेक राजकीय पक्षांनी केला होता. त्याबाबत अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या. या संदर्भात निवडणूक आयोगाने सर्वच पक्षांना ईव्हीएम हॅक करून दाखविण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीने वंदना चव्हाण, गौरव जाचक, यासिन शेख यांनी हे आव्हान स्वीकारले आहे.
‘महापालिका निवडणुकीत ईव्हीएममध्ये छेडछाड करून निकाल बदलल्याच्या तक्रारी वाढल्या. त्यानंतर निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय बैठक बोलाविली होती. त्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माझ्यासह डी. पी. त्रिपाठी उपस्थित होतो. ईव्हीएम मशिनला वापरण्या येणारे व्होटर व्हेरीफिकेशन पेपर ऑडीट टेस्ट (व्हीव्हीपॅट) लावण्याच्या सूचना मागविण्यात आल्या. त्यानंतर ईव्हीएम हॅक करणे शक्य नसल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. त्या वेळी हे मशीन हॅक करून दाखविण्याचे आव्हान राजकीय पक्षांना दिले असून त्या करिता २६ मेपर्यंत मुदत दिली आहे,’ असे चव्हाण यांनी सांगितले.
हे आव्हान आम्ही स्वीकारले आहे; पण चार तासांत कोणी हे मशीन हॅक करू शकत नाही. या कारणाने इतर कोणतेही पक्ष पुढे आले नाहीत. कोणी तज्ज्ञ या संदर्भात जबाबदारी घेत नसले, तरी ईव्हीएम हॅक करण्याबाबत त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळणार आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ईव्हीएमशी छेडछाड होऊ शकते का याची तपासणी करण्यात येणार आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांच्या नावावर शिष्यवृत्ती लाटली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
चंदननगर परिसरातील विद्यार्थ्यांकडून कागदपत्रे घेऊन विविध शाखेत त्यांचा प्रवेश दाखवत त्यांच्या नावावर सरकारकडून शिष्यवृत्ती लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राहुल काटे (वय २३, रा. बोराटे वस्ती, चंदननगर) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार चेतन लक्ष्मण बडगुजर व इतर तीन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन बडगुजर याचे चंदननगर परिसरात रेड पिक्सल अॅनिमेशन कॉलेज आहे. या कॉलेजच्या प्रवेशाकरिता त्याने विद्यार्थी राहुल काटे याच्याकडून कागदपत्रे घेतली. त्यामध्ये शिष्यवृत्तीला लागणारीही कागदपत्रे घेण्यात आली. या कागदपत्रांच्या आधारे कॉलेजने विद्यार्थ्यांच्या नावाची शिष्यवृत्ती परस्पर घेतली. काटे याने २०१२ मध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर २०१६ पर्यंत त्याची अ‍ॅनिमेशनच्या कोर्सची परीक्षाही घेण्यात आली नाही. काटे याच्या नावावर २४ हजार रुपयांची शिष्यवृत्ती लाटण्यात आली आहे. त्याला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार केली. हा प्रकार राज्यात अनेक ठिकाणी झाल्याचे समोर आले असून, याप्रकारे नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावावर शिष्यवृत्ती लाटल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाकडून कारवाई कधी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग शाखेच्या विविध विषयांचे दहापेक्षा अधिक पेपर व्हॉट्सअॅपवरून व्हायरल होऊन फुटले. ही परिस्थिती असताना विद्यापीठाकडून केवळ प्रथम वर्षाचे गणित आणि मेकॅनिक्स असे दोनच पेपर व्हायरल झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, इतर विषयांचे पेपर कोणत्या कॉलेजांमधून व्हायरल झाले, याचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे विद्यापीठाने केवळ नावापुरता दोन कॉलेजांवर कारवाईचा बडगा उगारला असून इतर दोषी कॉलेज शोधून त्यांच्यावर कारवाई कधी करणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
या परीक्षेत मेकॅनिकल शाखेतील एम-टू आणि दुसऱ्या वर्षाचे एम-थ्री हे गणिताचे पेपर, तृतीय वर्षाचा ‘टर्बो मशिन’ हा पेपर, तर अंतिम वर्षाचे ‘मेकॅनिकल सिस्टीम्स डिझाइन’ आणि ‘इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग’चा पेपर व्हॉट्सअॅपवरून व्हायरल झाले. सिव्हिल शाखेचे अंतिम वर्षाचे ‘क्यूएसीपी’ आणि ‘एअर पॉल्युशन कंट्रोल’ असे दोन विषयांचे पेपर व्हायरल झाले. इलेक्ट्रिकल शाखेचा तिसऱ्या वर्षाचा ‘पॉवर सिस्टीम्स’ दोन, तर दुसऱ्या वर्षाचा ‘नेटवर्क अॅनॅलिसिस’ या दोन विषयांचे पेपर व्हॉट्सअॅपहून फुटले आहेत. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना कठीण वाटणाऱ्या ‘मॅकेनिक्स’ विषयाचा पेपरदेखील व्हायरल झाला होता. दोन दिवसांच्या शांततेनंतर शुक्रवारी मेकॅनिकल शाखेच्या द्वितील वर्षाचा इंजिनीअरिंग मेटर्लजी हा पेपर पुन्हा व्हॉट्सअॅपहून व्हायरल झाला आणि विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे असणारी पुस्तकाची पाने परीक्षेत बाळगली. असे गंभीर प्रकार विद्यापीठाच्या परीक्षेत घडत असून विद्यापीठाने केवळ गणित आणि मेकॅनिक्स असे दोनच पेपर व्हायरल झाल्याचे सांगण्यात आले आहे.
गणित आणि मेकॅनिक्स या दोन विषयांचे पेपर विद्यानिकेतन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग आणि डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये डाउननोड झाले. त्यानंतर कॉलेजमधीलच व्यक्तीने त्यांचे मोबाइलवर फोटो काढून ते व्हॉट्सअॅपमार्फत इतर विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर पाठविले. या प्रकरणी विद्यापीठाने दोन्ही कॉलेजांना कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. तसेच, कॉलेजांवर कारवाई का करू नये आणि परीक्षा केंद्राची मान्यता रद्द का करू नये, अशी विचारणा केली आहे. मात्र, इतर विषयांचे पेपर कोणत्या कॉलेजांमधून व्हायरल झाले, याचा शोध अद्याप विद्यापीठाने घेतला नाही. व्हायरल होणाऱ्या पेपरच्या मुखपृष्ठावर कम्प्युटरचा आयपी अॅड्रेस, कॉलेज कोड, दिनांक, वेळ, सर्व्हर क्रमांक आहे. त्यामुळे पेपर कोणत्या कॉलेजामधून डाउनलोड झाला आणि त्यानंतर व्हायरल झाला याची माहिती सहज मिळते. असे असताना देखील पेपर व्हायरल ज्या कॉलेजांमधून झाला त्यांची चौकशी करण्याची आवश्कता आहे. तसेच, या प्रकारांमध्ये दोषी आढळणाऱ्या कॉलेजांवर ठोस कारवाई गरज आहे. त्यामुळे पेपर व्हॉट्सअॅपहून व्हायरल होणार नाही, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

तासाचा वेळ कमी करणे आवश्यक
विद्यापीठाकडून परीक्षेचा पेपर कॉलेजांमध्ये सुमारे तासाभरापूर्वी ई-मेलद्वारे पाठविण्यात येतो. हा वेळ कमी करण्याची आवश्यकता आहे. तसेच, ज्या ठिकाणी हा पेपर कम्प्युटरवर डाउनलोड केला जातो, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे सक्तीचे करण्याची गरज आहे. दरम्यान, ज्या कॉलेजांमध्ये असे प्रकार घडतील त्यांच्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करून दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images