Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘टीईटी’बाबत संभ्रम कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शालेय शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी परीक्षा) यंदा होणार किंवा नाही यावरून विद्यार्थ्यांपेक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अधिकारीच संभ्रमात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. टीईटी परीक्षा २०१७ मध्ये नेमकी कधी होणार की होणारच नाही, याबद्दल परिषदेचे अध्यक्ष, आयुक्त व उपायुक्त यांच्यामध्ये एकमत नसून, प्रत्येक अधिकारी वेगवेगळी माहिती देत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेवरून मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

राज्यात विविध केंद्रांवर एप्रिल महिन्यात टीईटी परीक्षा घ्यावी, असा प्रस्ताव राज्य परीक्षा परिषदेने शालेय शिक्षण विभागाकडे काही दिवयांपूर्वी पाठविला होता. मात्र, त्यावर लवकर निर्णय होऊ शकला नाही. अशातच या परीक्षेची प्रक्रिया राबविणाऱ्या खासगी एजन्सीच्या कामाची मुदत संपली आणि नवीन एजन्सीच्या नेमणुकीसाठी ई-टेंडरिंग प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या कारणामुळे परीक्षा घेण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे ‘टीईटी’ परीक्षा जुलै महिन्यात होणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी एप्रिल महिन्यातच दिली होती.

राज्यात साधारण २०१३ पासून दर वर्षी टीईटी परीक्षा घेण्याचे ठरले आहे. त्यानुसार परिषदेकडून आतपर्यंत तीन परीक्षा उन्हाळ्यात घेण्यात आल्या. मात्र, २०१७ च्या परीक्षेबाबत काहीच माहिती नसल्याने मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने टीईटी परीक्षा घेण्यासंदर्भात एप्रिल २०१७ परिषदेकडे विचारणा केली होती. मात्र, त्या काळात परिषदेकडे अन्य परीक्षांचे नियोजनाचे काम असल्यामुळे ही परीक्षा एप्रिलमध्ये घेता येत नसल्याचे परिषदेने शिक्षण विभागाला कळविले होते. तसेच, आता ही परीक्षा कधी घ्यावी, याबाबत शिक्षण विभागाला विचारणाही केली असल्याची माहिती परिषदेचे उपायुक्त राजेश क्षीरसागर यांनी दिली. तर, याबाबत परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे म्हणाले, ‘परीक्षा घेण्यासाठी साठ दिवसांचा नियोजन कालावधी लागतो. त्यामुळे जेव्हा सरकारचा आदेश येईल, त्यानंतर साठ दिवसांनी परीक्षा घेण्यात येईल.’

अधिकाऱ्यांमध्ये मतभेद

परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दिनकर पाटील यांना यासंदर्भात पुन्हा विचारले असता त्यांनी परीक्षा कोणत्याही परिस्थितीत जुलै महिन्यातच होणार असल्याचे सूतोवाच पुन्हा एकदा केले असून, येत्या आठवड्यात यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे परिषदेच्या अधिकाऱ्यांमध्येच मतभेद असल्यामुळे टीईटी परीक्षा कधी होणार, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहिला आहे. तसेच, विद्यार्थ्यांमध्येही परीक्षेबाबत संभ्रम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संतपीठासाठी अभ्यासदौरा

$
0
0

देशातील प्रमुख गुरुकुलमला भेटी देणार

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे चिखली येथे उभारण्यात येणाऱ्या राज्यातील पहिल्या ‘जगद्‍‍गुरू संत तुकाराम महाराज संतपीठा’च्या पूर्वतयारीचा भाग म्हणून देशातील प्रमुख गुरुकुलमला भेटी देण्यासाठी अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत संतपीठाचा अभ्यासक्रम आराखडा, त्यातील विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी-सुविधा, निवास-भोजनाची सोय, संतसाहित्य, वाङ्‍‍मयाची रचना याबाबत माहिती घेण्यात येणार आहे.

दौऱ्यात दिल्ली, हरिद्वारपासून ते कटक, ओडिशापर्यंतच्या विविध पीठांचा अभ्यास करण्यात येणार आहे. या दौऱ्यात आमदार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांच्यासह १२ अभ्यासक (ही संख्या कमी-जास्त होऊ शकते असेही स्पष्ट करण्यात आले आहे.) भाग घेणार आहेत. यासाठीच्या येणाऱ्या अपेक्षित प्रत्यक्ष खर्चास मंजुरी देण्याचा प्रस्ताव ११ मे रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीसमोर ठेवण्यात आला आहे.

भागवत धर्माच्या प्रसार आणि प्रचाराच्या उद्देशाने, तसेच वारकरी सांप्रदायाचे पारंपारिक शिक्षण लोकांना मिळावे, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्यातील पहिले ‘जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ टाळगाव-चिखली येथे उभारण्याचा संकल्प केला आहे. श्री क्षेत्र देहू आणि आळंदीचा वारसा लाभलेले ठिकाण आणि महापालिकेची हद्द यामुळे चिखलीची निवड करण्यात आली.

संतपीठाच्या उभारणीला १३ मे २०१५ रोजी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर माध्यमिक शाळेसाठी आरक्षित असलेली चिखली येथील सर्व्हे क्रमांक १६५३मधील एक हेक्टर ८० गुंठे जागाही महापालिकेला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काही अटी-शर्तींवर या जागेचा आगाऊ ताबा देण्याचा आदेश जारी केला आहे. जमीन ताब्यात आल्यानंतर या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या संतपीठामध्ये निवासी स्वरूपाचे, प्राथमिक शाळेपासून ते उच्च पदवीपर्यंतचे केवळ संतसाहित्यावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे.

या ठिकाणी वसतिगृह, सभागृह, अभ्यासवर्गाचा समावेश असेल. तसेच येथे सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना प्रवेश असून, हे संतपीठ मराठी माध्यमातून शिक्षण देणारे असणार आहे. संतपीठाचा अभ्यासक्रम ठरविण्यासाठी समिती नेमण्यात आली असून, त्यामध्ये संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, श्री क्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त अभय टिळक आणि वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त दिनकर शास्त्री भुकेले यांचा समावेश आहे. संतपीठाच्या इमारतीचे स्ट्रक्चर, अभ्यासक्रमाचा आराखडा, अभ्यासाची रचना, विद्यार्थ्यांची निवास आणि भोजनाची व्यवस्था, वर्ग खोल्यांची रचना, संत साहित्यांची माहिती, अध्यात्मिक शिक्षण ते उपलब्ध असणारी ठिकाणी, सर्व संतांचे वाङ्‍‍मय एकत्रित मिळण्याचे ठिकाण, या संतपीठातून अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांचे भवितव्य आदी बाबींचा अभ्यास करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे दौरा करण्यात येणार आहे.

अभ्यास दौऱ्यासाठी येणारा खर्च महापालिका माध्यमिक शिक्षण विभागाकडील २०१७-१८च्या बजेटमधील ‘टाळगाव चिखली येथे जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ लेखाशिर्षातून करण्यात यावा, असे प्रस्तावात नमूद केले आहे.

अभ्यासदौऱ्यातील ठिकाणे

- पतंजली संस्कृत गुरुकुलम (हरिद्वार)
- गुरुकुलम (कांगडी)
- महेशयोगी गुरुकुल (नोएडा)
- सुधांशू गुरुकुल (नांगलोई, दिल्ली)
- संवीध गुरुकुल (साध्वी ऋतुंभरा, वृंदावन)
- मायावती गुरुकुल (आग्रा रोड-यमुना एक्स्प्रेस वे)
- श्री श्री युनिव्हर्सिटी (ओडिशा)
- गोदी साही विद्यापीठ (कटक)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी पालिकेतच काम देण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पूर्वीश्रमीच्या ‘पीसीएमटी’च्या आणि गेल्या काही दिवसांपूर्वी ‘पीएमपीएमएल’च्या सेवेत रुजू होण्याचे आदेश प्राप्त झालेल्या १७८ कर्मचाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतच काम करू द्या, अशी मागणी महापौर नितीन काळजे यांच्याकडे केली आहे. त्या अनुषंगाने आज, मंगळवारी सकाळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह संयुक्त बैठक होणार आहे.

पूर्वीच्या पिंपरी-चिंचवड महापालिका परिवहन महामंडळाकडील (पीसीएमटी) अतिरिक्त १७८ कर्मचारी महापालिकेच्या विविध विभागांमध्ये वर्ग केले होते. या ठिकाणी जवळपास १६ ते १७ वर्षे काम केल्यानंतर आता पुन्हा या कर्मचाऱ्यांना ‘पीएमपीएमएल’कडे वर्ग करण्याचे पत्र ‘पीएमपीएमएल’चे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला दिले होते. त्यावरून तत्कालीन महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनीही या कर्मचाऱ्यांना ‘पीएमपी’त तत्काळ रुजू होण्यासाठी कार्यमुक्त केले.

यापैकी जवळपास सर्वच कर्मचारी पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्यास आहेत. त्यापैकी अनेक जण लवकरच निवृत्त होणार आहेत. त्यांच्यादृष्टीने ही गैरसोयीची बाब असल्याचे सांगण्यात आले. ‘पीएमपीएमएल’मध्ये पूर्वाश्रमीच्या ‘पीसीएमटी’च्या कर्मचाऱ्यांबाबतीत दुजाभावाची वागणूक दिली जाते, असे गाऱ्हाणे या कर्मचाऱ्यांनी महापौरांकडे मांडले. त्यानंतर आयुक्तांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन काळजे यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीई प्रवेशाची संख्या जाहीर नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत येत्या शैक्षणिक वर्षात २५ टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया मार्च महिन्यात सुरू झाली. सध्या प्रवेशाची चौथी फेरी सुरू आहे. मात्र, वारंवार संपर्क करूनही पिंपरी-चिंचवड शहरातील आरटीई प्रवेशाचा आकडा अद्याप अधिकाऱ्यांना माहिती नाही. त्यामुळे हा ‘आरटीई’ प्रवेशांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

गेल्या वर्षीपर्यंत आरटीईअंतर्गत किती जागा आहेत, प्रत्येक फेरीमध्ये किती प्रवेश झाले याची माहिती मिळत होती. मात्र, आता जिल्ह्यातूनच ‘लॉग इन’ होत असून किती प्रवेश झाले याचे कोणतीही अद्ययावत माहिती नाही, असे कारण पुढे केले जात आहे. त्यामुळे शहरात या प्रक्रियेअंतर्गत किती विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले ही संख्या समोर आलेली नाही.

प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीच्या वेळेसच काही शाळांनी प्रवेश पूर्ण झाल्याचे कारण सांगून विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला आहे. आरटीईच्या किती जागा आहेत. यापैकी किती जागा शिल्लक आहेत याची कोणतीच माहिती नसल्यामुळे पालकांचाही गोंधळ होत आहे. अनेक शाळांनी आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेले नाहीत. प्रवेशासाठी काही शाळा जाणीवपूर्वक काहीतरी कारण सांगून पालकांची अडवणूक करत असल्याचे चित्र आहे.

आरटीई पालक संघाने वारंवार भेटी देऊनही दाद दिलेली नाही. महापालिका शिक्षण मंडळाकडेही मागणी करूनही दखल घेण्यात आलेली नाही, अशी तक्रार पालकवर्गातून होत आहे. प्रवेशाचा आकडा न सांगण्यामागे विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत प्रवेश नाकारण्याचा उद्देश असावा अशी, शंका व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेकडून दोन सुपरफास्ट एक्स्प्रेस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अजनी-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि पुणे-अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेस या साप्ताहिक वातानुकुलीत गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. या गाड्यांचे ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू झाले आहे.

अजनी-पुणे गाडी येत्या मंगळवारी (१६ मे) सायंकाळी सात वाजून ५० मिनिटांनी अजनी येथून सुटेल. ती दुसऱ्या दिवशी पावणेबारा वाजता पुणे स्टेशनला दाखल होईल; तर शुक्रवारी (१२ मे) दुपारी सव्वातीन वाजता ही गाडी पुणे स्टेशनवरून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी ती अजनीला पोहोचेल. या गाडीला वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, दौंड हे थांबे देण्यात आले आहेत.

पुणे-अमरावती गाडी येत्या बुधवारी (१० मे) दुपारी सव्वातीन वाजता पुणे स्टेशन येथून सुटेल. ती अमरावतीला गुरुवारी पहाटे सव्वातीन वाजता पोहोचेल. अमरावतीवरून गुरुवारी (११ मे) सायंकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी सुटेल, ती दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून ४० मिनिटांनी पुण्यात दाखल होईल. या गाडीला दौंड, नगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा हे थांबे देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील कचरा उचलण्यास सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
उरुळी देवाची तसेच फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी कचरा आंदोलन मागे घेतल्याने २३ दिवसांपासून शहरातील विविध भागांत कमी अधिक प्रमाणात साठलेला कचरा उचलण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. सोमवारी सकाळपासूनच पालिकेच्या घनकचरा विभागाने तातडीने यंत्रणा कामाला लावत कचरा डेपोत कचरा टाकण्यास सुरुवात केली. संपूर्ण दिवसभरात ७०० ते ८०० टन कचरा डेपोत टाकण्यात आला असून गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये साठवून ठेवलेला कचराही लवकरच डेपोत पाठविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
कचरा डेपोला आग लागल्यानंतर या दोन्ही गावातील ग्रामस्थांनी पालिकेचा कचरा टाकू देणार नाही, अशी भूमिका घेऊन आंदोलन सुरू केले होते. कचरा डेपो दुसरीकडे हलविल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेऊन ग्रामस्थांनी कचरा डेपोत टाकण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून शहरातील काही भागांतील कचरा उचलला जात नव्हता. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती होती. त्यातच महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह पालिका आयुक्त कुणाल कुमार परदेश दौऱ्यावर गेल्याने हा प्रश्न अधिकच गंभीर झाला होता. या प्रश्नावर कोणताही तोडगा निघत नसल्याने पालिकेसह राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षावर टीका होत होती. अखेर यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामस्थ तसेच सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून कचराकोंडी फोडली.
ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर तातडीने डेपोत कचरा टाकण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आंदोलन काळात प्रशासनाने शहरातील कचरा गोळा करून प्रकल्पांच्या ठिकाणी ठेवला होता. हा कचरादेखील तातडीने डेपोत पाठवून त्यावर प्रक्रिया करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

कचरा जिरवणार प्रभागातच
प्रभागातील कचरा प्रभागातच जिरविला जावा, यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहिल. आंदोलनाच्या काळात शहरातील ज्या छोट्या मोठ्या प्रकल्पांमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावली जात होती, त्याचीच अंमलबजावणी यापुढील काळातही केली जाणार आहे. शहरातील सगळा कचरा डेपोत न टाकता, विविध भागांत उभारण्यात आलेल्या प्रकल्पांच्या माध्यमातून त्याची विल्हेवाट लावली जाईल, असे पालिकेचे सहआयुक्त सुरेश जगताप यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे पालिकेत सोमवार बदल्यांचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांची बदली झाली असून, रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात आली आहे. तर, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (पीएससीडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. अमित सैनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लष्करी सेवेतील अधिकारी राजेंद्र जगताप हे प्रतिनियुक्तीवर २०१२ मध्ये महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून रुजू झाले होते. जगताप हे माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे नातेवाइक असल्याने लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांची बदली करण्याची मागणी केली जात होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही जगताप यांच्याकडे अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी कायम राहिली होती. अखेर प्रतिनियुक्तीवरील त्यांची मुदत संपण्यास काही दिवस शिल्लक असताना, त्यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उगले या भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) २००९ च्या बॅचच्या अधिकारी आहेत. शहरातील परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांच्या उगले या पत्नी आहेत. उगले यांच्या नियुक्तीमुळे पुणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तपदी आता दोन महिला कार्यरत असतील. गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर असलेल्या प्रेरणा देशभ्रतारदेखील लवकरच रुजू होणार आहेत.
स्मार्ट सिटी कंपनीच्या ‘सीईओपदी’देखील नव्याने आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेल्या डॉ. अमित सैनी यांच्याकडे हा कार्यभार सोपविण्यात आला आहे. सैनी यांची काही दिवसांपूर्वीच बदली केली गेली होती; पण त्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली नव्हती. स्मार्ट सिटीचे सीईओ म्हणून महापालिका आयुक्त कुणाल कुमार हेच सर्व काम पाहत होते. सीईओ म्हणून स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देऊनही महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त देशभ्रतार यांच्याकडे हा कार्यभार आयुक्तांनी दिला होता. त्या सुट्टीवर गेल्यानंतर सर्व कार्यभार आयुक्तांनी स्वतःकडे ठेवला होता. स्मार्ट सिटीच्या विविध योजनांवरून सातत्याने आरोप केले जात होते; तसेच अनुदान देऊनही निधी खर्च न केल्याबद्दल केंद्र सरकारने ताशेरे ओढले होते. त्यामुळे डॉ. सैनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आयुक्तांच्या अधिकारांना कात्री?
महापालिकेशी संबंधित सर्व महत्त्वाच्या पदांचा अतिरिक्त कार्यभार पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनाच सांभाळावा लागत होता. आयुक्तपदासह पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि स्मार्ट सिटीचे सीईओ अशी तिहेरी जबाबदारी त्यांच्यावर होती. या सर्व ठिकाणी मनमानी पद्धतीने कारभार केला जात असल्याची टीका सातत्याने होत होती. त्यामुळे सुरुवातीला पीएमपीच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती सरकारने केली. तर, आता स्मार्ट सिटीच्या सीईओपदाचा कारभारही कुमार यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता कुमार हे केवळ स्मार्ट सिटीचे संचालक म्हणून कार्यरत राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाइन फ्लू’ पेशंटना पोटदुखी, रक्तस्राव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘स्वाइन फ्लू’च्या लक्षणांमध्ये पूर्वी जुलाब, उलट्यांचा समावेश होता. आता नाक, तोंडातून अल्प रक्तस्राव आणि पोटदुखी अशी लक्षणे नव्याने आढळत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. या आजाराच्या लक्षणांमध्ये बदल झाल्याचे आरोग्य विभागानेदेखील स्पष्ट केले आहे.
गेल्या दीड ते दोन वर्षांपूर्वी राज्यात स्वाइन फ्लूचा संसर्ग झाला. त्या वेळी सर्दी, ताप, खोकला, घसादुखी यासारखी स्वाइन फ्लूची लक्षणे नियमितपणे दिसत होती. त्यानंतर लक्षणांमध्ये बदल होऊन पेशंटना जुलाब, उलट्या होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे लक्षणांमध्ये बदल होत असल्याचे वैद्यकतज्ज्ञांनी त्या वेळी स्पष्ट केले होते. आता त्या लक्षणांमध्ये पुन्हा बदल झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
‘सर्दी, ताप, खोकला ही स्वाइन फ्लूची साधारण लक्षणे आहेत. त्या लक्षणांमध्ये बदल झाल्याचे या महिनाभरात दिसून आले आहे. स्वाइन फ्लूची लक्षणे आढळलेल्या पेशंटमध्ये पोटदुखी, तसेच डेंगीच्या पेशंटप्रमाणे रक्तस्राव होण्याचे प्रकार आढळले आहे. अशा काही पेशंटच्या रक्ताची चाचणी केली असता त्यांच्या शरीरात प्लेटलेट कमी प्रमाणात असल्याचे आढळले; पण डेंगी झाला नसल्याचे निदान झाले. ती चाचणी निगेटिव्ह आली. त्याशिवाय थुंकीतून काही प्रमाणात रक्तस्राव होत असल्याचे दिसून आले. त्याबाबत फारसे गांभीर्य नसले तरी स्वाइन फ्लूची लक्षणे बदलत आहेत,’ असे निरीक्षण फिजिशियन डॉ. मुकुंद पेनूरकर यांनी नोंदविले. तर काही डॉक्टरांनी स्वाइन फ्लूच्या पेशंटमध्ये रक्तस्राव होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली.
या संदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. मुकुंद डिग्गीकर यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले, ‘स्वाइन फ्लूची लक्षणे पूर्वीप्रमाणेच असली, तरी त्यात थोडासा बदल झाला आहे. शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होणे, जुलाब होणे याबरोबरच डेंगीप्रमाणे नाक-तोंडातून कमी प्रमाणात रक्तस्राव होणे आणि पोटदुखी यासारखी लक्षणे दिसत आहेत. अशी लक्षणे दिसत असल्याचे निरीक्षण काही खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांनी नोंदविली आहेत. रक्तस्राव झाला असला तरी पेशंटची प्रकृती गंभीर होत नाही.’
राष्ट्रीय विषाणू संस्थेने यापूर्वी एच१एन१च्या विषाणूमध्ये थोड्या प्रमाणात बदल झाला असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूचा संसर्ग थोडा वाढत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे, असेही डॉ. डिग्गीकर यांनी सांगितले.

राज्यात स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढत असून आतापर्यंत १८१ जणांचा बळी गेला आहे; तर ९३३ जणांना लागण झाली आहे. त्यात सर्वाधिक लागण पुण्यात झाली आहे.
- डॉ. मुकुंद डिग्गीकर, सहसंचालक, आरोग्य सेवा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कमी उंची , अॅसिड हल्ल्यातील पीडित व्यक्तीही दिव्यांग

$
0
0

अॅसिड हल्ल्यातील पीडित, सिकलसेलच्या रुग्णांनाही सवलती मिळणार

Kuldeep.Jadhav@timesgroup.com
Tweet : @kuldeepjadhavMT

पुणे : पावणेपाच फुटांपेक्षा कमी उंचीच्या व्यक्ती, अॅसिड हल्ल्यातील पीडित, पार्किन्सन्स-थॅलेसेमिया-हिमोफिलिया आणि सिकलसेल या सर्व आजारांच्या रुग्ण या सर्वांना आता अपंग व्यक्तींचा दर्जा आणि सवलती मिळणार आहेत. केंद्र सरकारने अपंग व्यक्ती सुरक्षा कायद्यात अपंगत्वाच्या नवीन अकरा प्रकारांचा समावेश केला आहे. त्यामुळे अपंग प्रवर्गांची संख्या २१ झाली आहे.
केंद्र सरकारने संयुक्त राष्ट्राच्या दिव्यांग व्यक्तिंच्या अधिकार विषयक संमेलनात अधिनियमित झालेल्या दिव्यांग व्यक्ती अधिकार कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. या कायद्यातील तरतुदींचा विचार करता सध्या अस्तित्वात असलेल्या ‘अपंग व्यक्ती अधिनियम १९९५’ या कायद्यात सुधारणा करण्याची गरज भासली. २०१४ मध्ये सर्वप्रथम कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला. त्यामध्ये अपंगत्वाच्या १९ प्रकारांचा समावेश होता. त्या कायद्याला २८ डिसेंबर २०१६ला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता देताना १९ ऐवजी २१ प्रकारांचा समावेश केला.
चार फूट नऊ इंचांपेक्षा कमी उंची असलेली व्यक्ती, अॅसिड हल्ल्यातील पीडित, पार्किन्सन्स, थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेलच्या रुग्णांसह दृष्टिहिन, दृष्टिदोष, कुष्ठरोग बरा झालेली व्यक्ती, कर्ण आणि मूक बधीर, शारीरिक हालचालीवर निर्बंध असलेल्या व्यक्ती, बौद्धिक अपंगत्व, मानसिक आजार, स्वमग्न, सेरेबल पाल्सी, स्नायूंची विकृती, मज्जासंस्थेसंबंधीची तीव्र स्थिती, विशिष्ट शिक्षण अपंगत्व, वाढत जाणारे अतितीव्र स्वरुपाचे अपंगत्व, भाषण आणि भाषा विकलांगता, बहुविकलांगता आदींना अपंग व्यक्तींचा दर्जा आणि सवलती प्राप्त होणार आहेत. अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ अंतर्गत अंपगांचे सात प्रवर्ग होते. त्यानंतर १९९९ मध्ये झालेल्या सुधारणेत वाढ त्यांची संख्या दहावर गेली.
नवीन कायद्याची रुपरेषा ठरविताना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अधिवेशनात निश्चित केलेल्या तरतुदी पायाभूत मानण्यात आल्या. त्याअंतर्गत या कायद्यात आशिया खंडाची सरासरी परिस्थिती समोर ठेवण्यात आली. म्हणूनच, कमी उंचीच्या व्यक्तींना अपंग ठरविताना ४.९ फूटांपेक्षा कमी उंची​ निर्धारित करण्यता आली.

पूर्वीच्या दहा प्रवर्गांतील अपंग सरकारी योजनांपासून वंचित राहत असल्याची परिस्थिती आहे. त्यात आता नव्याने २१ प्रवर्ग केले आहेत. त्यामध्ये ज्यांचा समावेश केला आहे, त्यांना अपंग म्हणणे योग्य ठरेल का, हा प्रश्न आहे. थॅलेसेमिया, हिमोफेलिया, पार्किन्सन्सग्रस्त व्यक्तींवर वैद्यकीय उपचार होतात. त्यामुळे त्यांचा अपंग म्हणून समावेश होणे, योग्य नाही.
गौरी कुलकर्णी, अभ्यासक आणि प्रमुख, सावली संस्था

अपंगत्वाचे नवीन प्रवर्ग
- चार फूट नऊ इंचांपेक्षा कमी उंची असलेली व्यक्ती
- अॅसिड हल्ल्यातील पीडित
- पार्किन्सन्स
- थॅलेसेमिया
- हिमोफिलिया
- सिकलसेलचे रुग्ण

अपंगांना दिलेल्या सुविधा
- उच्च शिक्षणाचे आरक्षण तीन टक्क्यांवरून चार टक्के.
- सरकारी नोकरीमध्ये चार टक्के आरक्षण.
- शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या सहा ते १८ वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिवाचनातून उमगले परिवर्तन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘चित्रपट संपल्यानंतर अम्मी तू बुरखा घालायला घेतलास. तोच बाबांनी विचारलं, बेगम तुला खरचं बुरखा घालावासा वाटतो. अम्मी तू नकारात्मक मान हलवलीस. १९३८मध्ये असं काय घडल की बुरखा घालणं गरजेच नाही, हे तू मान्य केलंस? त्यावर बाबांची प्रतिक्रिया काय होती? त्या बुरख्याचे पुढे काय केलेस? घडी घालून खांद्यावर घेतलास आणि चालू लागलीस ना...जगात घडून आलेल्या क्रांतिकारी परिवर्तनामधील हे सर्वात शांत परिवर्तन होते ना अम्मी...’ दीर्घपत्रातील हा प्रसंग सोमवारी उभा राहिला आणि लोकशाहीवादाची, परिवर्तनवादाची सुरुवात म्हणजे काय, हे उपस्थितांमधील प्रत्येकाने अंतर्मुख होऊन अनुभवले...
निमित्त होते, ख्यातनाम दिग्दर्शक सईद मिर्झा यांच्या मूळ साहित्यकृतीचा मिलिंद चंपानेरकर यांनी केलेल्या ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र’ या अनुवादित पुस्तकाच्या अभिवाचनाचे. आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ कलावंत गजानन परांजपे, वंदना बोकील-कुलकर्णी आणि अमित वझे यांनी अभिवाचनातून एका कुटुंबाच्या लोकशाही प्रक्रियेवर प्रकाश टाकण्यात आला आणि धीरगंभीर, काहीशा मिश्किल अभिवाचनात रसिक गुंतले. ज्येष्ठ विचारवंत गजानन खातू, संजय मं.गो, प्रा. श्रुती तांबे, रोहन प्रकाशनचे प्रदीप चंपानेरकर आणि केंद्राचे कार्यकारी अध्यक्ष गणेश विसपुते उपस्थित होते.
अभिवाचन पुढे जाऊ लागले तशी लोकशाहीवादी अम्मी प्रत्येकाच्या मनावर उदारमतवादाचे गारूड करू पाहत होती. अफगणिस्तानातील एका घरंदाज वातावरणातून आलेली अम्मी (जहाँआरा) आणि कमालीचे आधुनिक विचारांचे बाबा (नुसरत) यांच्या विचारांचा संस्कार सईद मिर्झा यांच्यावर कसा होत गेला आणि लोकशाहीवर असीम विश्वास असणाऱ्या कुटुंबाची जडणघडण कशी होत गेली, याचा भावनिकपट उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे करणारा होता. ‘मी जेनिफरशी लग्न करण्याचे निश्चित केले होते. ती रोमन कॅथलिक होती. लग्न फक्त चर्चमध्येच होईल, अशी अट घालण्यात आली होती. त्यावर दोन भिन्न धर्मीय व्यक्तींची इच्छा असेल तर, कोणतेच धार्मिक विधी नकोत. एक सामाजिक सोहळा करूयात, ही प्रतिक्रिया अम्मीने दिली,’ असा एक-एक उतारा धर्मनिरपेक्ष विचारांची ज्योत पेटविणारा होता. अक्षय वाटवे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश कराळे यांनी आभार मानले.

फुले-गांधी-आंबेडकर यांचे विचार हा ठेवा आहेच; पण यांच्या विचारांशिवाय परिस्थितीवर मात करण्याची प्रज्ञा आपल्यात येत नाही. त्यामुळे प्रस्थापित व्यवस्थेवर आपण मात करू शकत नाही. परिवर्तनवादी विचार सोडून दिल्यामुळे वरवरचे विचार करू लागलो आहोत. पूर्वी जातीयवादी विचार होता; पण त्यांच्या मालाला मागणी नव्हती. शांततेच्या काळात सर्वच लोक चांगले असतात.
- गजानन खातू, ज्येष्ठ विचारवंत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जंकफूडना शाळेत ‘नो एंट्री’

$
0
0

शालेय विद्यार्थ्यांमधील लठ्ठपणा रोखण्यासाठी सरकारची पावले

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुलाबजामुन, रसगुल्ला, चिप्स, बिस्किट, केक, पेस्ट्री, मिठाई, नूडल्स, पिझ्झा आदी उच्च कॅलरीयुक्त ‘जंक फूड’ना शाळांच्या कँटिनमध्ये ‘एंट्री’ मिळणार नाही.
शालेय विद्यार्थ्यांमधील लठ्ठपणा आणि जीवनशैलीविषयक आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी शिक्षण विभागाने कँटिनमधून विक्री करण्यास प्रतिबंध घातलेल्या आणि शिफारस केलेल्या पदार्थांची यादी सोमवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार आता शाळांना निर्णयाची अंमलबजावणी करावी लागणार आहे.
पोषक आहारातून विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास व्हावा या उद्देशाने हैदराबाद येथील राष्ट्रीय पोषण संस्थेने समिती नेमली होती. या समितीने हाय इन फॅट, शुगर अँड सॉल्ट (एचएफएसएस) म्हणजेच ‘जंक फूड’ ज्यात साखर, मीठ आणि मेदाचे प्रमाण अधिक आहे, त्यावर बंदी प्रस्तावित केली आहे. शाळेच्या कँटिनमध्ये कोणते खाद्यपदार्थ ठेवावेत आणि ठेवू नयेत, याबाबत महिला व बालविकास मंत्रालयाला शिफारसी केल्या होत्या. या शिफारशींचे पालन करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार आता शाळांच्या कँटिनमधून ‘जंक फूड’ची विक्री करता येणार नाही. या उलट रोटी, पराठा, डाळभात, कढीभात, इडली सांबार, भाजीपुलाव, खीर, फिरनी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आदी पदार्थांची शिफारस करण्यात आली आहे.

कँटिनमधील प्रतिबंधित पदार्थ
१. चिप्स, तळलेले पदार्थ, बटाट्याचे चिप्स
२. सरबत, बर्फाचा गोळा (आइस गोळा)
३. शर्करायुक्त कार्बोनेटेड आणि नॉन कार्बोनेटेड शीतपेये
४. रसगुल्ला, गुलाबजामुन, पेढा, कलाकंद
५. नूडल्स, पिझ्झा, बर्गर, टिक्का, पाणीपुरी (गोल गप्पे)
६. सर्व प्रकारच्या चघळण्याच्या गोड गोळया, कँडी
७. तीस टक्क्यांपेक्षा अधिक शर्करायुक्त पदार्थ (जिलेबी, बुंदी)
८. सर्व प्रकारची चॉकलेट
९. सर्व प्रकारची मिठाई
१० केक आणि बिस्किट
११. बन्स आणि पेस्ट्री
१२. जाम आणि जेली

शिफारस केलेले पदार्थ
१. गहू रोटी/पराठा
२. धान्याची रोटी/पराठा
३. भात, भाजी पुलाव आणि डाळ
४. भाजीपुलाव
५. भात आणि काळा चना
६. गव्हाचा हलवा सोबत हरभरा (काला चना)
७. गोड दलियासोबत नमकिन दलिया भाजी
९. भात आणि राजमा
१०. कढीभात
११. उपमा किंवा खिचडी, पायसम, पपई, टोमॅटो, अंडी
१२. चिंचेचा भात
१३. डाळभात
१४. भात, सांबार
१५. इडली, वडा, सांबार
१६. खीर, फिरनी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
१८. भाज्यांचे सँडविच
१९. भाज्यांची खिचडी, नारळाचे पाणी, शिकंजी, जलजिरा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निरीक्षण विहिरींचे जाळे वाढविणार

$
0
0

यंदा जिल्ह्यातील १,४५० विहिरींची निवड

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्ह्यातील गावांमधील भूजलसाठ्याच्या नियमित नोंदी घेण्यासाठी जिल्हा भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेमार्फत कानाकोपऱ्यातील गावांमध्ये निरीक्षण विहिरींचे जाळे वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी १,४५० निरीक्षण विहिरींची निवड झाली आहे. जूनपासून जल सुरक्षारक्षक गावनिहाय भूगर्भातील पाणीसाठ्याच्या नोंदी घेणार आहेत.
पुणे जिल्हा भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेतर्फे दर तीन महिन्यांनी तेरा तालुक्यांमधील भूजलसाठ्याच्या नोंदी घेतल्या जातात. साधारणतः १९७२ पासून ही प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रातिनिधिक गावांमध्ये १९२ निरीक्षण विहिरी निश्चित करण्यात आल्या. भूजल सर्वेक्षण अभ्यासक प्रत्येक विहिरीला भेट देऊन नोंदी घेत होते. ‘गेल्या काही वर्षात भूजलसाठा वेगाने घटत असून त्याचा सविस्तर अभ्यास व्हावा, या उद्देशाने आम्ही निरीक्षण विहिरींची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या जलस्वराज योजनेअंतर्गत संशोधकांनी विहिरींचे जाळे वाढविले आहे. यापुढे १,४५० जलसाठ्यांमधून पाण्याच्या पातळीच्या नोंदी घेण्यात येणार आहेत,’ अशी माहिती उपसंचालक डॉ. पी. पी. रेड्डी यांनी दिली.
निरीक्षण विहिरींची माहिती दरमहा उपलब्ध व्हावी, यासाठी आम्ही तेरा तालुक्यांमध्ये जलसुरक्षारक्षक नेमले आहेत. त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जूनपासून प्रत्येक महिन्याला भूजलसाठ्याची मोजणी करण्यात येणार आहे. ही सर्व माहिती वेबसाइटवर उपलब्ध होईल. त्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीचा तौलनिक आणि सखोल अभ्यास करणे शक्य होणार असल्याचेही रेड्डी म्हणाले.

जलपुनर्भरणाची सक्ती
ग्रामीण भागाबरोबरच पुणे शहराला लागून असलेल्या गावांमधून आम्हाला भूजलसाठा शोधण्यासाठी सातत्याने मागणी होत असते. बोअरवेलची परवानगी देण्यापूर्वी कागदपत्रांच्या पूर्ततेदरम्यान आम्ही त्यांना रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प (जलपुनर्भरण) उभारण्याची सक्ती करीत आहोत. जमिनीतील पाणी उपसताना, पावसाचे पाणी पुन्हा जमिनीत साठवले पाहिजे, याची जाणीव आम्ही करून देतो, असेही रेड्डी म्हणाले.

भूजल पातळीत घट
गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे दोन वर्षांच्या तुलनेत यंदा भूजलसाठ्यामध्ये कमी घट झाली आहे. राज्य सरकारने राबवविलेल्या जलयुक्त शिवार योजनेमुळे अनेक गावांमध्ये बंधारे, पाझर तलावात पाणी साठविण्यात यश आले आहे. पुणे जिल्ह्यात मार्च महिन्यात तेरा तालुक्यांमध्ये घेतलेल्या नोंदीमध्ये बारामती आणि पुरंदर तालुक्यांमध्ये गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत अनुक्रमे ०.५३ आणि ०.८४ मीटरने पाण्याची पातळी घटली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जन्म, मृत्यूचे दाखले केंद्राच्या वेबसाइटवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जन्म-मृत्यूचे दाखले घरबसल्या मिळावेत यासाठी केंद्राने स्वतंत्र कम्प्युटर प्रणाली विकसित केली आहे. पुढील महिन्यापासून
crosorgi.gov.in या वेबसाइटवर ही सुविधा उपलब्ध होणार आहे. अशी माहिती पालिकेचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. सोमनाथ परदेशी यांनी दिली.
नागरी नोंदणी पद्धती अंतर्गत काम केले जाणार आहे. पालिका हद्दीत झालेले जन्म आणि मृत्यूच्या नोंदींचा प्रणालीत समावेश करण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार जून २०१७ नंतर शहरात होणाऱ्या जन्म-मृत्यूची नोंद यंत्रणेत केली जाणार आहे. पालिकेच्या, खासगी हॉस्पिटलमध्ये तसेच घरांमध्ये झालेल्या जन्म आणि मृत्यूंची नोंदणी पालिकेच्या जन्म-मृत्यू केंद्राकडे केली जाते. त्यासाठी २१ दिवसांचा कालावधी लागतो. नोंदणी झाल्यानंतर त्यांची माहिती प्रणालीत घेतली जात आहे. माहितीवर संबंधित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर केंद्र सरकारच्या वेबसाइटवर ही माहिती टाकली जाईल. पालिकेकडून ही प्रक्रिया सात ते आठ दिवसांमध्ये पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे केंद्राच्या वेबसाइटवर डिजिटल स्वाक्षरी असलेले दाखले मिळणार आहेत.

क्षेत्रीय कार्यालयातही सुविधा
केंद्राच्या वेबसाइटवर ही सुविधा मिळणार असली तरी, नागरिकांना पूर्वीप्रमाणे क्षेत्रीय कार्यालयातही जन्म आणि मृत्यूचे दाखले दिले जाणार आहेत. ज्या दिवशी पालिका केंद्राच्या वेबसाइटवर माहिती टाकण्यास सुरुवात करेल, त्यानंतरचे दाखले नागरिकांना केंद्रीय वेबसाइटवरून मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाव तेथे ग्रामरक्षक दल

$
0
0

गुन्ह्यांना आळा घालण्याची जिल्ह्यात उपक्रम; अधीक्षकांचा पुढाकार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्ह्यातील गुन्हे रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून प्रत्येक गावात ‘ग्रामरक्षक दल’ उभारण्यात आले आहे. हे दल रात्रीच्या वेळी गावात गस्त घालून गुन्हेगारी रोखण्यास पोलिसांना मदत करणार आहे. या पथकाचे प्रमुख पोलिस पाटील असून, त्यांना पोलिसांकडून शस्त्रपरवाना आणि प्रशिक्षणासाठी मदत करण्यात येणार आहे.
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते उपस्थित होत्या. ‘जिल्ह्यात मार्च ते मे या काळात जास्त गुन्हे घडत असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांकडून गस्त घातली जाते. पण, त्यामध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी दल तयार करण्यात आले आहे. दलामध्ये प्रत्येक गावातील २५ ते ३० तरुणांचा समावेश आहे. रात्रीच्या वेळी काही तास तरुण गावात गस्त घालतील. त्यांना पोलिसांकडून लाठी, टॉर्च, टोपी आणि बॅच दिला जाणार आहे. ग्राम पंचायतीजवळ सायरन बसविण्यता येणार आहे. काही अनुचित प्रकार वाटल्यास सायरन वाजवून नागरिकांना सावध करण्यात येईल.’
दलातील तरुणांना पोलिस ठाण्यांच्या पातळीवर प्रशिक्षण देण्यात येत आहे. दलातील चांगली कामगिरी करणारी व्यक्ती आणि पोलिस पाटील यांची पडताळणी करून त्यांना शस्त्रपरवाना देण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. तसेच, त्यांना पोलिसांकडून शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षणही दिले जाईल. दलाच्या मदतीने जिल्ह्यातील गुन्ह्यांना आळा घालण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहील, असेही हक म्हणाले.

प्रत्येक गावात सीसीटीव्ही
ग्रामीण पोलिसांकडून ‘एक गाव एक सीसीटीव्ही’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. येत्या महिनाभरात जिल्ह्यातील प्रत्येक गावात महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. प्रत्येक गावात सीसीटीव्ही असणारा पुणे हा राज्यातील पहिला जिल्हा असेल, असेही हक यांनी सांगितले. जिल्ह्यात साधारण चौदाशे गावे आहेत. गावात सीसीटीव्ही बसविण्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ग्रामपंचायतीकडून त्यासाठी निधी देण्यात येणार आहे. सीसीटीव्हीमुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यात सीसीटीव्ह नियंत्रणासाठी एकाची नेमणूक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औंध परिसरातील सहा फ्लॅट फोडले

$
0
0

सामान अस्ताव्यस्त करून चोरट्यांचा पोबारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

औंध परिसरात दोन सोसायट्यांमधील बंद असणारे सहा फ्लॅट फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. सोसायटीतील व्यक्तींना फ्लॅटचे तुटलेले कुलूप आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. मात्र, या घरफोडीमध्ये चोरट्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय देशमुख (वय ३०, रा. डीपी रोड औंध ) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध परिसरातील डी. पी. रोड येथील पुष्पनगर सोसायटीमध्ये देशमुख यांचा फ्लॅट आहे. शनिवारी रात्री आठ ते रविवारी दुपारी एकच्या दरम्यान चोरट्यांनी फ्लॅटचे कुलुप उचकटून प्रवेश केला. घरातील सामान अस्ताव्यस्त करून चोरीचा प्रयत्न करून ते पसार झाले. या शिवाय पुष्पनगर सोसायटीतील अमित चव्हाण आणि सुजीत जरिमल यांचे फ्लॅटही फोडण्यात आले आहेत. त्यानंतर चोरट्यांनी डी.पी. रोडवरील क्लोरिओन पार्क या सोसायटीमधील एम.व्ही. करोडे आणि आशिष डोंगरे यांचेही फ्लॅट फोडले. त्यांच्याही फ्लॅटमधील सामान्य अस्ताव्यस्त करण्यातच चोरट्यांनी धन्यता मानली आहे.
क्लोरिओन पार्क सोसायटीच्या अध्यक्षांना रविवारी दुपारी फ्लॅटचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी तत्काळ चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही सोसायट्यांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. फोडलेल्या फ्लॅटचे मालक बाहेरगावी गेले आहेत. त्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यामध्ये चोरट्यांचे चेहरे स्पष्ट नाहीत. तसेच, सुरक्षारक्षक झोपलेले दिसून आले आहे. दोन फ्लॅटमधून किरकोळ ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक पी. ए. क्षीरसागर तपास करत आहेत.

सुट्टीला जाताय... काळजी घ्या...
उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे नागरिक फ्लॅट बंद करून कुटुंबासह बाहेरगावी फिरायला जात आहेत. त्याचा फायदा चोरटे घेत आहेत. गेल्या वर्षी उन्हाळी सुट्टीत मोठ्या प्रमाणात घरफोडीचे प्रकार घडले होते. आताही घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सुट्टीला बाहेरगावी जाताना काळजी घ्यावी. घरात मौल्यवान वस्तू ठेवू नयेत. बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना कल्पना देण्याची गरज आहे. दारात पेपर किंवा अन्य साहित्य पडू नये याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालमत्तेची माहिती मिळवा ऑनलाइन

$
0
0

राज्याचा नोंदणी, मुद्रांक शुल्क विभाग सुविधा देणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मालमत्तेची खरेदी करण्यापूर्वी त्यावर कर्ज घेतले असेल, मालमत्ता गहाण ठेवली असेल किंवा कोर्टाने आदेश दिला असेल तर ही महत्त्वपूर्ण माहिती नागरिकांना ऑनलाइन मिळणार आहे. राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून अशाप्रकारची सु​विधा सुरू करण्यात येणार आहे.
सद्यपरिस्थितीत कोणतीही मालमत्ता खरेदी करायची असेल, तर तिची माहिती मिळविण्यासाठी खर्च करावा लागतो. माहिती मिळविल्यानंतर खरेदी आणि विक्रीचे व्यवहार होतात. मात्र, आता प्रत्येक मालमत्तेबाबतची माहिती नागरिकांना ‘ऑनलाइन’ पाहता येईल. ‘या बाबत बँका आणि कोर्टाला प्रस्ताव देण्यात आले आहेत. कोणत्याही मालमत्तेवर बोजा असल्यास ही माहिती बँकांकडून दिली जावी, यासाठी संबंधित यंत्रणेकडे प्रस्ताव दिला आहे. बोजासंदर्भातील माहिती नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे देण्यात आल्यावर ती विभागाच्या वेबसाइटवर अपडेट करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांना एखाद्या मालमत्तेवर कर्ज आहे का, ती गहाण ठेवली आहे का आदी माहिती समजेल,’ असे राज्याचे नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी सांगितले.
‘अनेक मालमत्तांबाबत कोर्टाकडून आदेश देण्यात येतात. ती माहिती कोर्टाच्या वेबसाइटवर असते. संबंधित माहिती नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या वेबसाइटशी लिंक करण्याचा प्रस्ताव आहे. तांत्रिक माहिती असलेल्या दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन ही सुविधा कार्यान्वित करण्यात येईल,’ असे कवडे यांनी स्पष्ट केले. मालमत्ता खरेदी करताना नागरिकांची फसवणूक होऊ नये, यासाठी या सुविधेचा घाट घालण्यात येत आहे. ही सर्व माहिती उपनिबंधक कार्यालयांकडेही असणार आहे. त्यामुळे नोंदणी करण्यासाठी गेल्यानंतर मालमत्तेवर बोजा असल्यास किंवा कोर्टाने कोणताही आदेश दिल्यास ते उपनिबंधकांच्या लक्षात येईल. नोंदणी होत असतानाच ही माहिती निदर्शनास आल्यानतंर फसवणुकीचे प्रकार टाळण्यास मदत होणार आहे.

हवेली कार्यालयाचे स्थलांतर
हवेली क्रमांक दोनच्या सहदुय्यम निबंधक कार्यालयाचे बिबवेवाडी कॉर्नर येथील पुष्पा हाइटस इमारतीत स्थलांतरण करण्यात आले आहे. या कार्यालयात ‘आय सरिता’ प्रणालीद्वारे नोंदणीचे कामकाज सुरू झाले आहे; तसेच दस्त ठेवण्यासाठी स्वतंत्र अभिलेख कक्ष करण्यात आला आहे. या कार्यालयाचे उद्घाटन नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांच्या हस्ते झाले. या वेळी नोंदणी उपमहानिरीक्षक चिंतामणी भुरकुंडे, पुणे विभागाचे नोंदणी उपमहानिरीक्षक सोनप्पा यमगर, सहजिल्हा निबंधक अनिल पारखे आणि प्रशासकीय अधिकारी बी. के. खांडेकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विचारभारती संमेलन २१ मे रोजी शहरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय विचार साधना आणि विश्व संवाद केंद्र यांच्या वतीने एकदिवसीय विचारभारती साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी, २१ मे रोजी पद्मावतीतील अण्णा भाऊ साठे सभागृहात रंगणाऱ्या संमेलनाचे उद्घाटन आचार्य गोविंददेव गिरी यांच्या हस्ते होणार आहे.
प्रसिद्ध लेखक विचारवंत संदीप वासलेकर संमेलनाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. संमेलनात उद्धाटन सत्र, तीन परिसंवाद, कवी संमेलन आणि समारोप सत्र असे कार्यक्रम होणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा मिरासदार यांचा नव्वदीनिमित्त विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी खासदार प्रदीप रावत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. संमेलन संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार या वेळी उपस्थित होते.
उद्घाटन सत्रानंतर ‘व्यक्ती, समाज आणि साहित्य – परस्पर संबंध’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. प्रा. प्रभाकर पुजारी, प्रा. जयंत कुलकणी, शेफाली वैद्य यामध्ये सहभागी होतील. माध्यमतज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे परिसंवादाचे अध्यक्ष असतील. दुपारी प्रसिद्ध गप्पाटककार डॉ. संजय उपाध्ये यांचे ‘मातृभाषेतून मन:शांती’ या विषयावर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ माधवराव गाडगीळ ‘मराठी विकीपीडिया : एक लोकचळवळ आणि भाषा समृद्धीचे दालन’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सायंकाळच्या सत्रात विश्वास गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली निवडक निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन होणार आहे. त्यात सामाजिक आणि आशयघन कविता सादर केल्या जातील. ख्यातनाम प्राच्यविद्यासंशोधक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिप्र मंडळी’ची नऊ वर्षांनी सभा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षण प्रसारक मंडळी (शिप्र) संस्थेची सर्वसाधारण सभा नऊ वर्षांनी रविवारी पार पडली. या सभेत संस्थेच्या कॉलेज आणि शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या रोस्टरला राज्य सरकारने मान्यता दिल्याने त्यांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे तात्पुरत्या पदांमुळे येणारा आर्थिक भार कमी होणार असल्याची माहिती नियामक मंडळाचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन यांनी दिली.
अॅड. सदानंद फडके यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. सभेत चर्चेला आलेले सर्व मुद्दे एकमताने मंजूर करण्यात आले. तसेच, २००८-०९ ते २०१४ - १५ या आर्थिक वर्षांतील हिशेब तपासणीच्या अहवालांचे काम लेखापरीक्षकांकडून करण्यात येत असून लवकरच ते पूर्ण होईल. २००७ -०८ आणि २०१५ - १६ या वर्षांच्या वार्षिक अहवालाला आणि लेखापरीक्षकांच्या पत्रकांना मंजुरी देण्यात आल्याचे अॅड. जैन यांनी सांगितले.
एसपी कॉलेजच्या परिसरात होणारे गैरप्रकार थांबविण्यासाठी सुरक्षाव्यवस्था नेमण्यात आली आहे. टेनिस कोर्ट, बॅडमिंटन हॉल, जलतरण तलावात विशेष सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या असून, सीबीएसई शाळेच्या इमारतीच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे अॅड. जैन यांनी सांगितले. सभेला नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, आमदार माधुरी मिसाळ, जयंत किराड, केशव वझे, सतीश पवार, अॅड. मिहिर प्रभूदेसाई, डॉ. न. म. जोशी, माजी खासदार प्रदीप रावत, माजी नगरसेवक उज्वल केसकर आदी उपस्थित होते. मेधा पंडित यांनी सूत्रसंचालन केले.

अध्यक्षनिवडीचा प्रस्ताव तहकूब
सर्वसाधारण सभेत पोद्दार आणि रुईया कुटुंबातील प्रतिनिधी सदस्य उपस्थित नव्हते. त्यामुळे संस्थेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्याचा प्रस्ताव तहकूब करण्यात आला. सभा सुरू होण्यापूर्वीच हा निर्णय घेण्यात आला, असे अॅड. जैन यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगरांत जोरदार पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सलग दुसऱ्या दिवशी शहराच्या काही उपनगरांत हजेरी लावलेल्या पावसाने मध्यवर्ती पुण्याकडे पाठ फिरवली. शहराच्या दक्षिण भागांत म्हणजेच कात्रज, धायरी, वडगाव, खडकवासला परिसरात सोमवारी गारांसह वादळी पाऊस झाला. पुढील दोन ते तीन दिवस शहरात सायंकाळनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शहराच्या दक्षिण भागात कात्रज, कोंढवा, धायरी, खडकवासला, नांदेड सिटी परिसरात दुपारनंतर वादळी वाऱ्यांसह जोरदार सरी बसरल्या. काही ठिकाणी गारांसह पाऊस झाला. खेड शिवापूर, वेळू परिसरातही गारांसह दमदार पाऊस झाला. इतरत्र मात्र, नागरिकांना दाटलेले मळभ आणि मेघगर्जनेवरच समाधान मानावे लागले. दरम्यान, सोमवारी पुण्यात कमाल तापमानात वाढ झाली, तर किमान तापमानात घट झाली. पुण्यात सोमवारी ३९.१ अंश सेल्सिअस कमाल आणि २१ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले.
राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानात वाढ झाली. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर येथे (४६.४ अंश सेल्सिअस) झाली. नगर येथे ४१.९, जळगाव येथे ४३.८, नाशिक येथे ३९.३, सोलापूर येथे ४१.८, औरंगाबाद येथे ४१.८, परभणी येथे ४४, नांदेड येथे ४३, अकोला येथे ४४.२ तर नागपूर येथे ४२.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
राज्यातही काही ठिकाणी पावसाच्या सरींनी हजेरी लावली. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडील नोंदीनुसार सायंकाळी साडेपाचपर्यंत सोलापूर येथे नऊ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अन्यत्रही कमी अधिक स्वरूपाचा पाऊस झाला. काही ठिकाणी गारांसह पाऊस झाला. उत्तर प्रदेश व लगतच्या परिसरात वातावरणाच्या वरच्या थरात हवेची चक्राकार स्थिती आहे. तिथपासून आसामचा पूर्व भाग, झारखंड व पश्चिम बंगालच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तेलगंणा ते तामिळनाडूच्या दक्षिण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा आहे. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागावर व राजस्थानच्या वायव्य भागावर हवेची चक्राकार स्थिती आहे. त्यामुळे राज्यात हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. त्यातच राज्यात तापमानातही मोठी वाढ झालेली असल्याने काही ठिकाणी पाऊस होत आहे. पुढील दोन ते तीन दिवसात राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुण्यात सायंकाळनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिन्ही आरोपी दोषी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सॉफ्टवेअर इंजिनीअर नयना पुजारी खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना खून, सामूहिक बलात्कार, अपहरण, जबरी चोरी, मृताच्या शरीरावरील ऐवज चोरणे, कट रचणे अशा सहा कलमांखाली विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी सोमवारी दोषी ठरविले. आरोपींना आज (मंगळवारी) शिक्षा ठोठावण्याची शक्यता आहे.

योगेश अशोक राऊत (वय २४, रा. गोळेगाव, ता. खेड), महेश बाळासाहेब ठाकूर (वय २४, रा. सोळू, ता. खेड), विश्वास हिंदुराव कदम (वय २६, रा. दिघी, मूळ - ‍भुरकवडी, ता. खटाव, जि. सातारा ) हे या प्रकरणातील आरोपी आहेत. राजेश पांडुरंग चौधरी (वय २३, गोळेगाव, ता. खेड) हा माफीचा साक्षीदार असून, त्याची खटल्यातून सुटका करण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. तिन्ही दोषी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

या खटल्याच्या सुनावणीसाठी सोमवारी आरोपींना न्यायालयात वेळेवर हजर न केल्याबद्दल तुरुंग अक्षीक्षकांना नोटीस बजावण्यात आली आहे.

आरोपींनी ८ ऑक्टोबर २००८ रोजी नयना पुजारी हिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तिचा खून केला. या घटनेने पुण्यातील माहिती-तंत्रज्ञान उद्योगातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला होता. गेली सात वर्षे याबाबतचा खटला सुरू होता. त्यामध्ये सरकारी पक्षातर्फे ३७ साक्षीदारांच्या, तर बचाव पक्षातर्फे १३ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. एकूण चार न्यायाधीशांसमोर सुनावणी झाली. सुनावणी जलदगतीने व्हावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती.

या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड. हर्षद निंबाळकर पाहात आहेत. अॅड. सचिन ठोंबरे, अॅड. सत्यम निंबाळकर, अॅड. हृषीकेश कांबळे, अॅड. अबोली मुळे यांनी त्यांना साह्य केले. बचाव पक्षातर्फे अॅड. बी. ए. आलूर यांनी काम पाहिले. अॅड. जयमिका जहागिरदार, अॅड. रणजीत ढोमसे पाटील, अॅड. अंकुशराजे जाधव यांनी साह्य केले.

या कलमांखाली आरोपी दोषी

भारतीय दंड विधान कायदा कलम

३०२ : खून करणे

३६६ : अपहरण करणे

३७६(ग) : सामूहिक बलात्कार

४०४ : मृताच्या शरीरावरील ऐवज चोरणे

१२०(ब) : कट रचणे

३९७ : जबरी चोरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images