Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

​पैसा गुंतवण्यामध्ये मराठी माणूस मागे

$
0
0

अर्थतज्ज्ञ दीपक घैसास यांचे निरीक्षण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘पैसा साठवला की तो कुजतो. गुंतवला तर तो वाढतो. दुर्दैवाने मराठी माणसाला पैसा साठवायला आवडत असल्याने मराठी माणूस धनवान होऊ शकत नाही. भारतात सोन्यामध्ये पैसा गुंतवला जातो. मात्र, त्याचा कुणालाही उपयोग होत नाही, हे वास्तव आपण मान्य करत नाही,’ अशा शब्दांत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ दीपक घैसास यांनी मराठी माणसाच्या प्रवृत्तीवर बोट ठेवले. भारतात सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आयटी क्षेत्र आहे, असेही ते म्हणाले.
मनोविकास प्रकाशनच्या वतीने अतुल कहाते लिखित ‘पैसा’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन घैसास आणि लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. ‘मनोविकास’चे अरविंद पाटकर आणि लेखक कहाते उपस्थित होते.

भारत देश गरीब असता, तर परदेशी राज्यकर्त्यांनी इतकी वर्षे आपल्यावर राज्य केले नसते. आपल्याकडे संपत्ती विपुल प्रमाणात असल्यानेच अनेक आक्रमणे झाली. त्यामुळे भारत हा गरीब देश नाही तर इथले लोक गरीब आहेत, असे टीकास्त्र घैसास यांनी सोडले.

‘अंथरुण पाहून पाय पसरावे’, ‘पैसा हे अंतिम सुख नाही’ यासारख्या अनेक पारंपरिक शिकवण्यांमुळे पैसा किती प्रमाणात मिळवावा, याबाबतीत गैरसमजुती लोकांमध्ये आहेत. आपल्या संतांनी काही शिकवण दिली आहे, ती समाजासाठी योग्यच असली, तरी आर्थिक प्रगतीचा आणि विकासाचा विचार करून ती शिकवण कधी उपयोगात आणायची हे समजायला हवे. श्रीमंत आणि धनवान या दोन कल्पनांची नेहमी गल्लत केली जाते. ‘श्रीमंत’ म्हणजे सर्व बाबतीत संपन्न; तर ‘धनवान’ म्हणजे केवळ पैशाने धनवान असतो, हे समजून घेतले पाहिजे,’ याकडे घैसास यांनी लक्ष वेधले.

गोडबोले म्हणाले, ‘सध्याची अर्थव्यवस्था भविष्यातील पैसा ही संकल्पना नष्ट करेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. ई-पेमेंट, बीट कॉइन्स याचे वाढते महत्त्व यातून पैसा हा अदृश्य होणार आहे. त्यामुळे भविष्यात आपण पैशाला हातही लावू शकणार नाही.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नयना पुजारी हत्याकांड: नराधमांना फाशीच द्या

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुण्यासह अख्या महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर नयना पुजारी खून खटल्यातील योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम या तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी. निर्भया हत्याकांडासारखेच हे हत्याकांड असल्याने आरोपींना दया दाखविण्यात येऊ नये. त्यांना फाशीचीच शिक्षा द्यावी, असा जोरदार युक्तिवाद सरकारी पक्षाचे वकील अॅड. हर्षल निंबाळकर यांनी आज न्यायालयात केला.

विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्यासमोर नयना पुजारी बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. यावेळी अॅड. निंबाळकर यांनी या खटल्यातील क्रोर्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करताना सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी यापूर्वी घडलेल्या अनेक प्रकरणांचे आणि त्यामध्ये न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे दाखले दिले. युक्तिवादाच्या अखेरीस निंबाळकर यांनी मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील निर्भया प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेचा दाखला देताना आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. आरोपींनी अतिशय थंड डोक्याने हे घृणास्पद कृत्य केल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

सॉफ्टवेअर इंजिनीअर नयना पुजारी हिच्यावर बलात्कार करून तिचा खून करणे हे कृत्य अमानवी व राक्षसी आहे. ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ असून यातील आरोपींना फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी कोर्टापुढे केली. त्याचबरोबर आयटी क्षेत्रात महिलांचे प्रमाण ५० टक्के असून आरोपींच्या कृत्याचा परिणाम या महिलांवरही झाला आहे, असेही निंबाळकर यांनी कोर्टापुढे सांगितले.

आरोपींनी घटनेच्या दिवशी नयनाला लिफ्टच्या बहाण्याने बस स्टॉपवरून आपल्या गाडीत घेतले. त्यानंतर त्यांनी तिला सुरक्षित स्थळी सोडणे अपेक्षित होते. मात्र, आरोपींनी तिचे अपहरण केले. तिला विवस्त्र करून पाच तास विवस्त्र अवस्थेत कारमध्ये फिरवले. ती मदतीसाठी रडत होती, तिची काय अवस्था झाली असेल?, असा सवाल अॅड. निंबाळकर यांनी केला.

ते बलात्कार एन्जॉय करत होते...

आरोपींनी तिच्यावर तीन वेळा बलात्कार केला. नयना मदतीसाठी याचना करत होती. मात्र आरोपी ही घटना एन्जॉय करत होते. बलात्कारानंतर त्यांनी तिच्यासमोरच जेवणही केले. ही घटना उघडकीस येऊ नये, यासाठी आरोपींनी तिचा गळा आवळला व तिच्या चेहऱ्यावर दगड टाकून तिची ओळख मिटविण्याचा प्रयत्न केला. या खटल्याची कोर्टात सुनावणी सुरू असताना राऊत पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला, त्यामागे खटल्याची सुनावणी लांबविण्याचाच हेतू होता. आरोपींनी केलेल्या कृत्याचा त्यांना कोणताही पश्चाताप नाही.आरोपींनी केलेले कृत्य महिलांच्या सुरक्षेला धक्का पोहचविणारे आहे,त्यामुळे त्यांना फाशीचीच शिक्षा देणे योग्य आहे, असे अॅड. निंबाळकर यांनी सांगितले.

नयना पुजारी प्रकरणानंतर तिच्या नातेवाईकांवर त्याचा जितका परिणाम झाला तितकाच आयटी व इतर क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांवरही झाला आहे. महिलांना आदराने वागविले पाहिजे, मात्र सध्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढते आहे. महिलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे व तरतूदी असतानाही अशा घटना वाढत आहेत, ही बाब गंभीर आहे, असे निरीक्षणही अॅड. निंबाळकर यांनी मांडले.

काल कोर्टाने नोटीस बाजावल्याने आज आरोपीना सकाळी पावणे दहाला कोर्टासमोर हजर करण्यात आले. सकाळी ११ वाजता कोर्ट हॉल मध्ये आरोपी हजर झाले. कोर्टाची सुनावणी सुरु झाल्यावर आरोपीना शिक्षण बाबत काही सांगायचे आहे का असे विचारले आणि या तिन्ही दोषींना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली. तेंव्हा योगेश राऊत या आरोपीने राजेश चौधरी हा गुन्ह्यात सहभागी असल्यानं त्यालाही शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच आपण निर्दोष आहोत. मी गुन्हा केला नाही. मला गुन्ह्यात गोवण्यात आल्याचं त्यानं कोर्टाला सांगितलं. गुन्ह्यात वापरलेली गाडी त्या दिवशी माझ्याकडे नव्हती. मला एक मुलगी, पत्नी आणि आई आहे. शिक्षा देताना त्याचा विचार व्हावा.’ असं योगेश म्हणाला. महेश ठाकूर या आरोपीनं मात्र बोलण्यास नकार दिला. विश्वास कदमला विचारलं असता हा गुन्हा माफीचा साक्षीदार झालेल्या राजेश चौधरीने केल्याचा दावा त्याने केला. त्यामुळे राजेश चौधरीलाही शिक्षा देण्याची मागणी विश्वास कदमने केली.

आरोपींनी ८ ऑक्टोबर २००८ रोजी नयना पुजारी हिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तिचा खून केला. या घटनेने पुण्यातील माहिती-तंत्रज्ञान उद्योगातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला होता. गेली सात वर्षे याबाबतचा खटला सुरू होता. त्यामध्ये सरकारी पक्षातर्फे ३७ साक्षीदारांच्या, तर बचाव पक्षातर्फे १३ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. एकूण चार न्यायाधीशांसमोर सुनावणी झाली. सुनावणी जलदगतीने व्हावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड. हर्षद निंबाळकर पाहत आहेत. अॅड. सचिन ठोंबरे, अॅड. सत्यम निंबाळकर, अॅड. हृषीकेश कांबळे, अॅड. अबोली मुळे यांनी त्यांना साह्य केले. बचाव पक्षातर्फे अॅड. बी. ए. आलूर यांनी काम पाहत आहेत. अॅड. जयमिका जहागिरदार, अॅड. रणजीत ढोमसे पाटील, अॅड. अंकुशराजे जाधव यांनी यावेळी सहाय्य करत आहेत.

या कलमांखाली आरोपी दोषी

३०२ : खून करणे

३६६ : अपहरण करणे

३७६(ग) : सामूहिक बलात्कार

४०४ : मृताच्या शरीरावरील ऐवज चोरणे

१२०(ब) : कट रचणे

३९७ : जबरी चोरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवना धरणात मुंब्र्यातील दोघे जण बुडाले

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पोहण्यासाठी पवना धरणात उतरलेले दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. मुंब्रा येथील १५ तरूणांचा गट फिरण्यासाठी आला होता. त्यावेळी पवना धरणात सर्व जण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, त्यातील दोन जण बुडाले.

साजीद सलाम अली शेख (वय २० वर्ष) अब्दुल रहमान बादशहा (वय १८ वर्ष) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि लोणावळा ग्रामीण पोलीसांकडून बुडालेल्या तरूणांचा शोध सुरू होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नयना पुजारी हत्याकांड, तिन्ही नराधमांना फाशी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

बलात्कार आणि हत्याकांडाच्या सात वर्षानंतर सॉफ्टवेअर इंजिनियर नयना पुजारीला निर्भयासारखाच न्याय मिळाला आहे. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या खून खटल्यातील योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम या तिन्ही नराधमांना न्यायालयाने दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली आहे. विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी ही शिक्षा सुनावली असून या निर्णयावर सर्वच स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे.

विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी सोमवारी नयना पुजारी बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील आरोपींना खून, सामूहिक बलात्कार, अपहरण, जबरी चोरी, मृताच्या शरिरावरील ऐवज चोरणे, कट रचणे अशा सहा कलमांखाली दोषी ठरविले होते. आज या हत्याकांडातील योगेश अशोक राऊत (वय २४, रा. गोळेगाव, ता. खेड), महेश बाळासाहेब ठाकूर (वय २४, रा. सोळू, ता. खेड), विश्वास हिंदुराव कदम (वय २६, रा. दिघी, मूळ - ‍भुरकवडी, ता. खटाव, जि. सातारा ) या तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. राजेश पांडुरंग चौधरी (वय २३, गोळेगाव, ता. खेड) हा माफीचा साक्षीदार असून, त्याची खटल्यातून सुटका करण्याचा आदेश कालच कोर्टाने दिला होता. तिन्ही दोषी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आला होता. या हत्याकांडातील वस्तूस्थितीजन्य सबळ पुरावे असल्याने न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.

न्यायालयात सुनावणी सुरू झाली तेव्हा न्यायालयाने या तिन्ही दोषींना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली. तेव्हा योगेश राऊत या आरोपीने राजेश चौधरी हा गुन्ह्यात सहभागी असल्यानं त्यालाही शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच मी निर्दोष आहे. मी गुन्हा केलेला नाही. मला गुन्ह्यात गोवण्यात आल्याचं त्यानं कोर्टाला सांगितलं. गुन्ह्यात वापरलेली गाडी त्या दिवशी माझ्याकडे नव्हती. मला एक मुलगी, पत्नी आणि आई आहे. शिक्षा देताना त्याचा विचार व्हावा.’ असं योगेश म्हणाला. महेश ठाकूर या आरोपीनं मात्र बोलण्यास नकार दिला. विश्वास कदमला विचारलं असता हा गुन्हा माफीचा साक्षीदार झालेल्या राजेश चौधरीने केल्याचा दावा त्याने केला. त्यामुळे राजेश चौधरीलाही शिक्षा देण्याची मागणी विश्वास कदमने केली.

निर्भयाचा दाखला...

यावेळी अॅड. निंबाळकर यांनी या खटल्यातील क्रोर्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करताना सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी यापूर्वी घडलेल्या अनेक प्रकरणांचे आणि त्यामध्ये न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे दाखले दिले. युक्तिवादाच्या अखेरीस निंबाळकर यांनी मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील निर्भया प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेचा दाखला देताना आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. आरोपींनी अतिशय थंड डोक्याने हे घृणास्पद कृत्य केल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

रेअरेस्ट रेअर केस...

आरोपींनी केलेले कृत्य महिलांच्या सुरक्षेला धक्का पोहचविणारे आहे. नयना पुजारी हत्याकांडानंतर तिच्या घरच्यांवर जेवढा परिणाम झाला तितकाच परिणाम बाहेर काम करणाऱ्या महिलांवरही झाला आहे. महिलांना आदराने वागविले पाहिजे, मात्र सध्याची परिस्थिती पाहता महिलांवर होणाऱ्या अन्यायाचे प्रमाण वाढतं आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीतूनही महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढलेले स्पष्ट होत असल्याचं सांगतानाच ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ आहे. निर्भया, ज्योती कुमारी चौधरी या प्रकरणांएवढीच गंभीरही आहे. त्यामुळे आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी, असा युक्तिवादही निंबाळकर यांनी केला.

आरोपींनी ८ ऑक्टोबर २००८ रोजी नयना पुजारी हिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तिचा खून केला. या घटनेने पुण्यातील माहिती-तंत्रज्ञान उद्योगातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला होता. गेली सात वर्षे याबाबतचा खटला सुरू होता. त्यामध्ये सरकारी पक्षातर्फे ३७ साक्षीदारांच्या, तर बचाव पक्षातर्फे १३ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. एकूण चार न्यायाधीशांसमोर सुनावणी झाली. सुनावणी जलदगतीने व्हावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड. हर्षद निंबाळकर पाहिलं. अॅड. सचिन ठोंबरे, अॅड. सत्यम निंबाळकर, अॅड. हृषीकेश कांबळे, अॅड. अबोली मुळे यांनी त्यांना साह्य केले. बचाव पक्षातर्फे अॅड. बी. ए. आलूर यांनी काम पाहिले. अॅड. जयमिका जहागिरदार, अॅड. रणजीत ढोमसे पाटील, अॅड. अंकुशराजे जाधव यांनी सहाय्य केले.

या कलमांखाली आरोपी दोषी

३०२ : खून करणे

३६६ : अपहरण करणे

३७६(ग) : सामूहिक बलात्कार

४०४ : मृताच्या शरिरावरील ऐवज चोरणे

१२०(ब) : कट रचणे

३९७ : जबरी चोरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कँटोन्मेंटमध्ये गांडूळ खत प्रकल्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
काही दिवसांपासून पुण्याच्या कचऱ्याचा प्रश्न पेटला असताना शहराच्या हद्दीजवळ असलेल्या पुणे कँटोन्मेंट बोर्डाने त्यांच्या कचऱ्याचा प्रश्न मात्र सोडविला आहे. ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यातून गांडूळ खताचा प्रकल्प यशस्वीपणे राबविला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कामगिरीचे कौतुक केले आहे.

येत्या काही महिन्यांत कँटोन्मेंट बोर्डाचा हा गांडूळ खत प्रकल्प पाहण्यासाठी धुळे महापालिकेचे पदाधिकारी येथे येणार आहेत. त्या संदर्भात त्यांनी बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला आहे. पुण्यातील कचरा टाकण्यास फुरसुंगीतील ग्रामस्थांनी विरोध केला होता. त्यामुळे अनेक दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी कचरा साचलेला पाहायला मिळत होता. त्यामुळे शहरात दुर्गंधी पसरली होती. त्या पार्श्वभूमीवर पुणे कँटोन्मेंट बोर्डाने केलेल्या गांडूळ खत प्रकल्पाची महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने सोमवारी पाहणी केली.

हडपसर येथील स. नं. २९८मध्ये कँटोन्मेंटच्या हद्दीतून गोळा करण्यात येणारा कचरा टाकला जातो. दहा एकर जागेत कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. लष्कराच्या हद्दीतील शिवाजी मार्केट, वानवडी बाजार, घोरपडी बाजारासह, कुंभार बावडी येथे असलेल्या भाजी मार्केटमधील भाजीपाल्याचा कचरा गोळा करून या खत प्रकल्पाच्या जागेत टाकला जातो. भाजीपाल्याचा कचरा यंत्राद्वारे कापला जातो. त्यानंतर स्प्रिंकलरने या कचऱ्यावर पाणी टाकून तो कुजवला जातो. एका वेगळ्या भागात गांडुळांची निर्मिती केली जाते. तेथे नंतर हा कचरा टाकण्यात येतो. त्यातून गांडूळ खत तयार होते.

बागांसाठी खताचा उपयोग

बोर्डाच्या गांडूळ खत प्रकल्पातंर्गत एका महिन्यात अडीच ते तीन टन खत तयार होते. या खतांचा लष्करातील राजेंद्रसिंग राठोड, तारापूर, फेअर रोड, लॉरेन्स रोड, नेजिअर रोड येथील विविध बागांसाठी वापर करण्यात येत आहे. त्यामुळे खतांची निर्मिती आणि त्याचा वापरही होत आहे. प्रामुख्याने या प्रकल्पात खत निर्मिती होत असली, तरी आता दुर्गंधी येत नसल्याचे प्रदूषण महामंडळाने पाहणी अहवालात म्हटले आहे.

पालिकेनेही प्रकल्प करावा

पुणे कँटोन्मेंट बोर्डाने गांडूळ खत प्रकल्प यशस्वीपणे राबवून कचऱ्याची विल्हेवाट लावली आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात कचरा संकलित होत असल्याने पुणे महापालिकेने कचरा समस्येवर तोडगा काढणे अपेक्षित आहे. त्यासाठी पालिकेने बोर्डाप्रमाणे गांडूळ खत प्रकल्प राबवावा, असे प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सूचविले आहे.
...
पूर्वी कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत होती. त्याचा अनेकांना त्रास होत होता. त्यामुळे हा प्रकल्प राबविण्यात आला. बोर्डाचा हा स्वतंत्र गांडूळ खत प्रकल्प यशस्वी झाला आहे. त्यामुळे बोर्डाला फायदा होत आहे.
- डॉ. डी. एन. यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कँटोन्मेंट बोर्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रहारचा झेडपी अधिकाऱ्यांना घेराव

$
0
0

अपंग कल्याण निधी खर्च न केल्याचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अपंगांच्या विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नातील तीन टक्के राखीव निधी जिल्हा परिषदेने अद्याप खर्च केलेला नाही. अपंगांसाठी तातडीने तो निधी खर्च करावा, अशी मागणी करीत प्रहार अपंग क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार बच्चु कडू यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला.

राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभाग व अपंग कल्याण आयुक्तालयाकडून अपंगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना जिल्हा परिषदेच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जातात. मात्र, जिल्हा परिषद अंपगाच्या योजनांची अंमलबजावणीच करीत नसल्याचा आरोप करीत प्रहार संघटनेने प्रशासनाचा निषेध केला. आमदार कडू यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयाचा ताबा घेतला. पंधरा दिवसांत अंपगाना योजनांचा लाभ देऊ, असे आश्वासन समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगटिंवार आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी या वेळी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ‘प्रहार’चे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष धर्मेंद्र सातव, जिल्हाध्यक्ष सुरेखा ढवळे, सुप्रिया लोखंडे, बाळू काळभोर, भास्कर मनसुख, अनिता कदम, महेंद्र निंबाळकर, रफिक खान, अनिता काबळे आदी या वेळी उपस्थित होते.

अपंगांसाठीचा राखीव निधीची सात कोटी रक्कम जिल्हा परिषदेकडे पडून आहे. मात्र, तिचे वाटप झाले नाही. याबाबत सातत्याने पाठपुरावा करून देखील काहीच झालेले नाही. तसेच, अधिकारी उडवा उडविची उत्तर देतात. या निधीचा विनियोग कसा करायचा, त्यासाठी अपंग समितीची मदत घ्यावी लागते. परंतु, अशी समितीच अस्तित्त्वात नसल्याचे या वेळी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. सुमारे दोन तास हे आंदोलन चालले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुनर्विकासासाठी नवी योजना

$
0
0

स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्र सरकारची मदत

पुणे : शहराच्या गजबजलेल्या भागाचा पुनर्विकास आणि शहराच्या विस्तारणाऱ्या भागाचे योग्य नियोजन करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना तांत्रिक आणि आर्थिक मदत करण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. त्या अंतर्गत विविध राज्यांच्या राजधानीची शहरे आणि स्मार्ट सिटी अंतर्गत निवडण्यात आलेल्या शंभर शहरांचा प्राधान्याने विचार केला जाणार असून, पुढील दोन महिन्यांत प्राथमिक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने दिल्या आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये देशात झपाट्याने नागरीकरण होताना, शहराच्या पायाभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे, अनेक शहरांच्या जुन्या, गजबजलेल्या भागांमध्ये अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी यासारख्या समस्यांनी डोके वर काढले आहे. नागरीकरण होताना शहराच्या हद्दीवरील भागांमध्येही पुरेशा प्रमाणात पायाभूत सुविधांची कमतरता असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे, या दोन्ही भागांतील नागरिकांचे जीवन अधिक सुसह्य करण्यासाठी ‘पुनर्विकास आणि नागरी विस्तारीकरणा’ची योजना केंद्र सरकारने आखली आहे. शहरांतर्गत कोणत्या भागांमध्ये पुनर्विकासाची योजना राबवायची आणि कोणत्या परिसरात विस्तारीकरणाच्या दृष्टीने नियोजन करायचे, याचा प्राथमिक आराखडा स्मार्ट सिटीमध्ये सहभागी झालेल्या सर्व शहरांकडून मागविण्यात आला आहे. स्मार्ट सिटीप्रमाणेच चालू आर्थिक वर्षात २० शहरांचा समावेश योजनेत केले जाणार असून, त्यांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. तर, पुढील दोन वर्षे अनुक्रमे ५० आणि ३० शहरांचा यामध्ये समावेश केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातील ५० ते पाचशे एकरपर्यंतच्या भागाचा विचार पुनर्विकास योजनेसाठी केला जाणार आहे. विस्तारीकरणासाठी जागेची मर्यादा ५० ते पाचशे हेक्टरदरम्यान निश्चित केली गेली आहे. पुनर्विकास योजनेमध्ये प्रामुख्याने अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकांचा (एफएसआय) वापर करण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. त्याद्वारे, रस्ते आणि इतर नागरी सुविधा या भागांत उपलब्ध करून देता येतील, असे उद्दिष्ट आहे. तर, विस्तारीकरणाच्या योजनेमध्ये नगर रचना आराखड्याच्या (टीपी स्कीम) माध्यमातून सर्व नागरी सुविधांचे जाळे निर्माण करण्याचा सरकारचा हेतू आहे. राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्यातून संबंधित योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. योजनांचा सविस्तर आराखडा तयार करण्यासह स्थानिक स्तरावरील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च केंद्राकडून केला जाणार आहे. पुढील एक वर्षात त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

नागरी सहभागाला महत्त्व

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये नागरी सहभागावर भर देण्यात आला होता. नव्या योजनेमध्येही पुनर्विकास किंवा विस्तारीकरण योजनेमध्ये संबंधित भागातील नागरिकांचा कल नेमका काय आहे, हे जाणून घेण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

पुणे पुन्हा अग्रभागी राहणार का?

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत राज्य सरकारने शिफारस केलेल्या दहा शहरांची प्राथमिक यादीत निवड करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात देशभरातून पहिल्या २० शहरांमध्ये दुसरा क्रमांक मिळविण्यात पुण्याने यश मिळवले होते. त्यामुळे, आता या योजनेतही पुणे अग्रस्थानी राहणार का, याविषयी उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅम्पमध्ये होणार बहुमजली पार्किंग

$
0
0

शहरातील पहिले दहा मजली चारचाकी पार्किंग

म. टा. प्रतिनिधी, पुणे
लष्कर भागातील रहिवाशांना, तसेच या भागात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना भेडसावणारा पार्किंगचा प्रश्न आता निकालात निघणार आहे. लवकरच पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत इस्ट स्ट्रीटवरील जनरल थिमय्या रस्त्यावर बहुमजली पार्किंग होणार असून एका वेळी पावणेतीनशे चार चाकी वाहनांच्या पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. शहरातील हे पहिले दहा मजली पार्किंग ठरणार आहे.

पुणे कँटोन्मेंट बोर्डाने पाठविलेल्या बहुमजली पार्किंगच्या प्रस्तावाला केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे आता पार्किंगचा प्रश्न निकालात निघण्याची चिन्हे आहेत. या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येते.

लष्कराच्या हद्दीतील रहिवाशांना सातत्याने दुचाकीसह चारचाकी पार्किंगच्या समस्येला वारंवार सामोरे जावे लागत होते. पार्किंगसाठी ‘पे अँड पार्क’ची सुविधा मोठ्या प्रमाणात या भागात उपलब्ध नाही. दुचाकींसाठी अशी सुविधा असली, तरी चारचाकी वाहनांचा प्रश्न कायम होता. त्यामुळे चारचाकी वाहनचालकांना दूरपर्यंत वाहने लावून चालत इच्छित ठिकाणी जावे लागत होते. त्याशिवाय अनेक जण रस्त्याच्या बाजूला जागा मिळताच त्या ठिकाणी वाहने पार्किंग करीत होते. त्यातून वाहतूक पोलिस, पार्किंग ठेकेदार यांच्यासोबत वाहनचालकांना हुज्जत घालावी लागत होती. या सर्व समस्यांमुळे बोर्डाच्या सदस्यांनी प्रशासनाकडे चारचाकी वाहनांसाठी बहुमजली पार्किंगची मागणी वारंवार केली होती. अखेर त्या संदर्भात बोर्डाच्या विशेष सर्वसाधारण बैठकीत काही महिन्यांपूर्वी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याला बोर्डाच्या सभेने मान्यता दिली. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवला होता.

‘पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत चारचाकी वाहनांसाठी बहुमजली पार्किंग करण्यात यावे, अशी आमच्या सर्व सदस्यांची मागणी होती. मंगलविहार आणि जनरल थिमय्या या दोन्ही ठिकाणी पार्किंग उभारावे असा प्रस्ताव होता. बोर्डाच्या प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर आता केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने त्यापैकी जनरल थिमय्या रस्त्यावरील बहुमजली पार्किंगला मंजुरी दिली आहे. त्यामुळे इस्ट स्ट्रीटवर बहुमजली पार्किंग उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे,’ असे पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्रीय सरंक्षण मंत्रालयाने पार्किंगच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याच्या वृत्ताला बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले, ‘लष्कराच्या हद्दीत पुणे शहरातील पहिले दहा मजली चारचाकी स्वयंचलित पार्किंग उभे राहणार आहे. त्यामुळे एका वेळी सुमारे २७५ चारचाकी वाहने पार्क करण्याची सुविधा उपलब्ध होईल. त्याचा पुणेकरांसह बोर्डाच्या रहिवाशांना फायदा होणार आहे.’
...
बहुमजली पार्किंगसंदर्भात लवकरच निविदा काढण्यात येणार आहे. यासाठी सुमारे १८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वाहनांना शुल्क कसे आकारावे हे पार्किंगच्या उभारणीनंतर निश्चित केले जाईल.
- डॉ. डी. एन. यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कँटोंन्मेंट बोर्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिंपरीत ‘स्वीकृत’पदासाठी उमेदवारी जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून माउली थोरात, बाबू नायर आणि अॅड. मोरेश्वर शेडगे यांनी; तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाऊसाहेब भोईर, संजय वाबळे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपकडून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हस्तक्षेप करून उमेदवारांची नावे निश्चित केल्यामुळे निवड प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत झाली.
स्वीकृत सदस्यपदासाठी सत्तारूढ भारतीय जनता पक्षामध्ये इच्छुकांची संख्या मोठी होती. संख्याबळानुसार भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य निवडण्यात येणार होते. भाजपमधील नवे आणि जुने कार्यकर्ते यांच्यातील वादामुळे निवडणूक रंगणार अशी शक्यता होती. परंतु, पुण्याच्या तुलनेत येथील प्रक्रिया सुरळीत पार पडली. निवडीसाठी स्थानिक नेतृत्त्वाच्या शिफारशीला महत्त्व प्राप्त झाल्यामुळे पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे आणि आमदार महेश लांडगे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. त्या अनुषंगाने इच्छुकांनी ‘फिल्डिंग’ लावली होती. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत सकाळी अकरा वाजता उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, असे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले होते. त्यानुसार इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांची पालिकेत गर्दी होती.
आमदार जगताप यांच्याकडून अॅड. अमर मूळचंदानी, सारंग कामतेकर या नावांची शिफारस अपेक्षित होती. तर, आमदार लांडगे यांच्याकडून योगेश लांडगे यांच्या नावाचा आग्रह धरण्यात आला होता. पक्षातील अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांनी निष्ठावंत आणि जुन्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी जोरदार मागणी होती. त्यानुसार काही नावांची तोंडी शिफारसही केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यावरून परतल्यानंतर दुपारी पावणेचारच्या सुमारास थोरात, नायर आणि शेडगे यांची नावे जाहीर करण्याचे आदेश पक्षनेते पवार यांना दिले. त्यानुसार या तिघांची नावे जाहीर करण्यात आली.

पवार म्हणाले, ‘स्थानिक पातळीवरून कोणत्याही नावाची शिफारस मुख्यमंत्र्यांना केली नव्हती. त्यांना कार्यकर्त्यांची माहिती होती. त्यानुसार त्यांनी पक्षसंघटनेला महत्त्व देत नावे जाहीर केली. त्यावर कोणीही नाराज होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पक्षाकडे इच्छुकांची संख्या जास्त असली तरी उर्वरित कार्यकर्त्यांना भविष्यात अन्य पदांवर काम करण्याची संधी दिली जाईल. या निवडीमुळे पक्षसंघटनेत राजकीय समतोल साधण्यास मदत झाली आहे.’
महापौर नितीन काळजे आणि खासदार साबळे यांनीही पक्षात गटबाजी नसल्याचा दावा करीत एकमताने निवड जाहीर झाल्याचे स्पष्ट केले. उमेदवारी अर्ज सादर करतेवेळी आमदार जगताप आणि लांडगे दोघेही अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही. उमेदवारी अर्ज भरलेल्या सदस्यांच्या नावांची अधिकृत घोषणा १९ मे रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे.

‘राष्ट्रवादी’ची पराभूतांना पसंती
राष्ट्रवादी काँग्रेसडून महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या भोईर आणि वाबळे यांना पसंती देण्यात आली. पक्षाकडे माजी नगरसेवक नीलेश पांढरकर, प्रशांत शितोळे, संदीप पवार, आनंदा यादव यांनी तीव्र मागणी केली होती. परंतु, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सल्लामसलत करून भोईर आणि वाबळे यांना उमेदवारी दिल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी जाहीर केले. वाबळे यांच्यासाठी माजी आमदार विलास लांडे यांनी विशेष प्रयत्न केले. तर, भोईर यांच्या नावावर थेट अजित पवार यांनीच शिक्कामोर्तब केले.

भाजप उमेदवारांचे राजकीय ‘कनेक्शन’
माउली थोरात - खासदार अमर साबळे व्हाया प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे
बाबू नायर - पालकमंत्री गिरीश बापट व्हाया सहकारमंत्री चंद्रकांत पाटील
अॅड. मोरेश्वर शेडगे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हाया ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत बांधकामे पाडणारच : आयक्त हर्डीकर

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय प्रलंबित असला तरी पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या चालू असलेली अनधिकृत बांधकामांवरील कारवाईवर प्रशासन ठाम आहे, असे महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय प्रलंबित आहे. तरीही शहरात ठिकठिकाणी अनधिकृत बांधकामे जोमाने चालू आहेत. त्यावर कठोर कारवाईचे सूतोवाच आयुक्त हर्डीकर यांनी दिले आहेत. ते म्हणाले, ‘अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यांनी सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा, संबंधित अधिकाऱ्यांवरच कारवाईचा बडगा उगारण्यात येईल. यापुढील काळात अनधिकृत बांधकामे होणार नाहीत, याबाबत दक्षता घेण्यात येईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ चौघांना कधी मिळणार न्याय?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या काही वर्षांमध्ये पुणे व परिसरात झालेल्या चार सॉफ्टवेअर इंजिनीअरच्या खुनाचे गूढ अद्यापही कायम आहे. या गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. यातील दोन सॉफ्टवेअर इंजिनीअरचे खून मारुंजी आणि वाघोली येथे एकाच आठवड्यात झाले होते. तर, तिसरी घटना बावधन येथे सहा वर्षांपूर्वी घडली होती. तर काही महिन्यांपूर्वीच तळवडे येथील केबीसी चौकात सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणीच्या खुनात ठोस माहिती मिळालेली नाही.

सॉफ्टवेअर इंजिनीअर नयना पुजारी, ज्योती कुमारी यांच्या मारेकऱ्यांना अटक करून शिक्षा देण्यात आली. मात्र, अभिषेक शरदचंद्र रॉय (वय २१, रा. वाघोली, मूळगाव भोपाळ), वरुण सुभाष सेठी (वय ३४, रा. हिंजवडी, मूळ गाव - पंजाब), अंतरा देवानंद दास (वय २३, रा. प्राधिकरण, मूळ - पश्चिम बंगाल) आणि दर्शना देविदास टोंगारे (रा. बावधन) या चार सॉफ्टवेअर इंजिनीरच्या खुनाचे गूढ कायम आहे. गेल्या सहा वर्षांत पुणे शहर व परिसरातील चार सॉफ्टवेअर इंजिनीअरचे हे खून असून, यामध्ये पोलिसांना आरोपीबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना कधी न्याय मिळणार, हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांकडून पुन्हा नव्याने प्रयत्न केले जाणार का, हा खरा प्रश्न आहे.

वाघोली येथे राहणारा अभिषेक रॉय याला एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून नोकरी मिळाली होती. तो खून झाला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून नोकरीवर जाणार होता. वाघोलीत तो दोन मित्रांसोबत राहत होता. एक जून २०१४ ला पहाटे त्याच्या मित्राला दोन व्यक्तींनी त्याच्यावर हल्ला करून पळून जाताने पाहिले होते. या गुन्ह्याचा पुणे ग्रामीण पोलिसांना अद्याप तपास लावता आलेला नाही. या गुन्ह्याचा तपास लागावा म्हणून अभिषेकचे वडील पाठपुरावा करत आहेत; पण यामध्ये पोलिसांना यश आलेले नाही.

हिंजवडी-मारुंजी रस्त्यावर २९ मे २०१४ रोजी वरुण सेठी या सॉफ्टवेअर इंजिनीअरच्या खून करण्यात आला होता. सेठी काही दिवसांपूर्वीच पुण्यातील एका नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून रुजू झाले होते. ते राहण्यासाठी घर शोधण्यासाठी मारुंजी परिसरात गेले होते. त्या ठिकाणाहून परत येताना त्यांच्यावर वार करून खून केल्याचे आढळून आले. या गुन्ह्याचा हिंजवडी पोलिसांनी विविध पद्धतीने केला. त्यांचे सर्व फोन कॉलची तपासणी केली. तसेच, खून झाला त्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेजही पडताळून पाहिले. त्याच्या मारेकऱ्यांचा शोध पोलिसांना लावता आला नाही.

तळवडे येथील केबीसी चौकात सॉफ्टवेअर इंजिनीअर अंतरा दास हिचा अज्ञात व्यक्तीने वार करून खून केला होता. ती कामावरून घरी निघाल्यानंतर तिच्यावर वार करून खून केल्याचे समोर आले. अंतरा हिचे शिक्षण पश्चिम बंगालमध्ये झाले आहे. तळवडे येथील सॉफ्टवेअर कंपनीत ती नोकरीला लागली होती. प्राधिकरण येथे पेइंग गेस्ट म्हणून ती राहत होती. पुण्याला येण्याच्या सात महिने अगोदर ती बेंगळुरू येथे प्रशिक्षणासाठी होती. अंतरा हिच्या अंगावरील दागिने काहीच चोरीला गेलेले नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तिचा खून खासगी कारणावरून झाल्याचा पोलिसांना संशय होता. तसेच, या प्रकरणी तिच्या मित्राला देखील पोलिसांनी अटक केली. मात्र, त्याच्याकडून काहीच निष्पन्न न झाल्याचे आरोपपत्र दाखल केलेले नाही. त्यामुळे तिच्याही खुनाचे गूढ कायम आहे.

‘सीआयडी’ही अपयशी

बावधन परिसरात राहणाऱ्या दर्शना टोंगारे या सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणीचा जुलै २०१०मध्ये खून करण्यात आला होता. बावधन परिसरातील शिंदे पेट्रोल पंपासमोर वर्दळ असलेल्या गल्लीत रात्री साडेनऊच्या सुमारास भोसकून खून करण्यात आला होता. चाकूसारख्या धारदार हत्याराने दर्शनाच्या छातीवर जोरदार वार करून हल्लेखोर फरार झाले होते. या गुन्ह्याचा तपास हिंजवडी पोलिसांनी केला. मात्र, आरोपीचा शोध लावता आला नाही. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे देण्यात आला आहे; पण त्यांनाही या गुन्ह्यात आरोपींना शोधण्यात यश आलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा’नाट्यमहोत्सवात ‘कोडमंत्र’, ‘साखर खाल्लेला माणूस’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दर्जेदार नाट्यकृतींची मेजवानी रसिकांना मिळावी, या हेतूने ‘महाराष्ट्र टाइम्स’ कल्चर क्लबतर्फे ‘कोडमंत्र’ आणि ‘साखर खाल्लेला माणूस’ या गाजलेल्या नाटकांच्या प्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मटा सन्मान’ नाट्यमहोत्सव या उपक्रमांतर्गत ‘कोडमंत्र’ नाटकाचा प्रयोग १३ मे रोजी रात्री ९.३० वाजता पद्मावती इथल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात; तर ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकाचा प्रयोग १४ मे रोजी रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे.
मराठी रंगभूमीवर उत्तम कलाकृतींना आजही दाद मिळते, हे ‘कोडमंत्र’ आणि ‘साखर खाल्लेला माणूस’ या कलाकृतींना पुन्हा दाखवून दिले आहे. मुक्ता बर्वे आणि अजय पूरकर यांच्या अभिनयाने गाजलेले ‘कोडमंत्र’ हे नाटक देशाच्या सीमेवरील जवानांचे आयुष्य, त्यांची शिस्त, भावविश्व यावर बेतलेले आहे. ‘मटा सन्मान’मध्ये ‘कोडमंत्र’ने व्यावसायिक नाटक विभागात सर्वोत्कृष्ट नाटकाचा सन्मान पटकावला आहे.
मधुमेहासारख्या आजारावर, त्याच्याशी दोन हात करण्यासाठीच्या कणखर मानसिकतेवर अतिशय हलके-फुलके आणि विनोदी अंगाने भाष्य करणारे नाटक म्हणजे ‘साखर खाल्लेला माणूस’. रसिकांचे लाडके अभिनेते प्रशांत दामले यांच्या उत्स्फूर्त अभिनयाने सजलेल्या या नाट्यकृतीत माणसाचे आयुष्य किती सुंदर आहे आणि आजारांवर मात कशी करावी, हे मांडण्यात आले आहे. विनोदी अभिनेता विभागात दामले यांना या नाटकासाठी ‘मटा’ सन्मान पुरस्काराने गौरविण्यातही आले.
‘महाराष्ट्र टाइम्स’ कल्चर क्लब सभासदत्व आणि त्याच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या दोन्हीचा फायदा नाटकांची तिकीटे घेताना मिळवता येणार आहे. या दोन्ही नाटकांची तिकीटे सकाळी ९ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर आणि अण्णा भाऊ साठे सभागृह या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहेत. कल्चर क्लब सभासदांना तिकीटांवर विशेष सवलत दिली जाणार आहे. सभासदांना ६०० रुपयांचे सीझन तिकीट ४५० रूपयांना मिळणार आहे, तर ३०० रुपयांचे सिंगल तिकीट २२५ रुपयांना मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काय घडले होते त्या रात्री?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे हे ‘आयटी’ शहर म्हणून उदयाला येत होते. हिंजवडीमध्ये ‘आयटी’ कंपन्यांची रेलचेल वाढली तशी ती पुणे शहराच्या पूर्वेला हडपसर, मगरपट्टा, खराडी आणि नगर परिसरातही वाढली होती. हिंजवडीमध्ये २००७ साली ‘बीपीओ’मध्ये नोकरी करणाऱ्या एका तरुणीवर कॅब चालकाने बलात्कार करून खून केल्याची घटना घडली. या घटनेने पुणेच नव्हे तर सारा देश हादरला होता. त्यामुळे ‘आयटी’, ‘बीपीओ’मधील तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी देशभरात अनेक उपाययोजना करण्यात येत होत्या. पुणे पोलिसांकडूनही मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जाऊन सुरक्षेविषयी जनजागृतीचे धडे गिरवण्याचे काम सुरू झाले होते. मात्र, याच वेळी नियतीच्या मनात वेगळेच काही तरी होते.

खराडीमध्ये ‘आयटी’, ‘बीपीओ’ कंपन्या वाढत चालल्या होत्या. झकपक कपडे घातलेल्या, गळ्यात ‘आयकार्ड’ लटकवणाऱ्या तरुणाईची गर्दीही वाढली होती. येथील एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करणारी नयना पुजारी ही विवाहिता ७ ऑक्टोबर २००९ रोजी सायंकाळी आपले काम आटोपून घरी जाण्याच्या गडबडीत होती. रात्रीची वेळ असेल तर कंपनीकडून ड्रॉप असायचा. मात्र, लवकर जायचे असल्याने नयनाने नेहमीप्रमाणे खराडी येथील झेन्सॉर कंपनीच्या बाहेरून ड्रॉपचा व्यवसाय करणारी एक कॅब पकडली. या वेळी कॅबमध्ये योगेश अशोक राऊत, महेश बाळासाहेब ठाकूर आणि विश्वास हिंदूराव कदम हे तिघे होते. नयना कात्रजला जाण्यासाठी राऊतच्या कॅबमध्ये बसली. या तिघांनी तिला वाघोलीच्या दिशेने ​नेले. तेथे त्यांनी त्यांचा एक रमेश चौधरीला बोलवले होते. या चौघांनी नयनाला धमकावत खराडी, हडपसर, वाघोलीमार्गे खेडला नेले. या प्रवासात या नराधमांनी गाडीतच तिच्यावर बलात्कार केला. ‘हवे ते करा, मात्र मला सोडा’, अशी विनवणी करणाऱ्या नयनावर या नराधमांनी अत्याचार तर केलाच ​मात्र, खेड येथे तिच्याच ओढणीने तिचा गळा आवळून खून केला. तिचा चेहरा ओळखू येवू नये, म्हणून डोक्यात दगड घातला आणि मृतदेह फेकून पळ काढला.

नयना घरी परतली नाही म्हणून घाबरलेल्या वडिलांनी खराडी गाठली. तिचा शोध घेतला. अखेर येरवडा पोलिस ठाण्यात जाऊन त्यांनी नयना हरवली असल्याची तक्रार दाखल केली. तिकडे दुसऱ्या दिवशी खेड पोलिसांना नयनाचा मृतदेह सापडला होता. मात्र, ओळख पटलेली नव्हती. तिच्याकडे सापडलेल्या वस्तूंच्या आधारे आणि येरवडा पोलिस ठाण्यात महिला हरवली असल्याची दाखल असलेल्या तक्रारीमुळे खेड पोलिस येरवडा पोलिसांपर्यंत पोहोचले. त्यानंतर एका सॉफ्टवेअर इंजिनीअर विवाहितेचा खून झाल्याची वार्ता पसरताच हलकल्लोळ झाला. नयना खराडीतून गायब झाल्याने ग्रामीण पोलिसांकडून या घटनेचा तपास पुणे पोलिसांकडे आला होता. येरवडा पोलिसांसह गुन्हे शाखा या तपासात गुंतली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी अपार मेहनत घेत योगेश राऊतसह त्याच्या तिन्ही साथीदारांना त्यांनी पकडले आणि सर्व आरोपी गजाआड झाले. पोलिसांच्या दृष्टीने एक महत्त्वाचे काम फत्ते झाले होते. या गुन्ह्यांचा तपास पूर्ण होवून चार्जशीट दाखल झाले. आरोपींविरुद्ध शिवाजीनगर न्यायालयात खटला सुरू झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवीप्रदान रद्द?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून येत्या ११ मे रोजी आयोजित केलेला १११ वा पदवीदान समारंभ मंगळवारी अचानक रद्द करण्यात आला आहे. तांत्रिक कारणास्तव समारंभ रद्द करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, कर्मचारी संघाने मंगळवारी सायंकाळी पत्रक काढून समारंभ उधळून लावण्याची धमकी दिली होती, या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून समारंभच रद्द करण्यात आला, अशी चर्चा रंगली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) वर्षातून दोन वेळा पदवीदान समारंभ आयोजित करण्याचे निर्देश विद्यापीठांना दिले आहेत. त्यानुसार वर्षातील दुसरा पदवीदान समारंभ ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. हा समारंभ ११ मे रोजी होणार असल्याची माहिती प्रभारी कुलसचिव अरविंद शाळीग्राम यांनी मंगळवारी दुपारी ५ वाजता पत्रकार परिषदेमध्ये दिली. त्यानंतर अवघ्या ३ तासांमध्ये हा पदवीदान समारंभ रद्द करण्याचे पत्रक विद्यापीठाच्या वतीने काढण्यात आले आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे ११ मे होणारा पदवीदान समारंभ स्थगित करण्यात आलेला असून पुढील पदवीदान समारंभाची माहिती नंतर जाहीर करण्यात येईल, असे या पत्रकामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे विद्यापीठ कर्मचारी संघाच्या मागण्या विद्यापीठाकडून मान्य न करण्यात आल्याने ११ मे रोजी होणारा पदवीदान समारंभ उधळून लावण्यात येत असल्याचे पत्रक कर्मचारी संघाच्या वतीने मंगळवारी कुलसचिव कार्यालयास देण्यात आले. कर्मचारी संघाच्या दिलेल्या या पत्राने काही तासांतच हा समारंभ रद्द करण्यात येत असल्याचे पत्रक विद्यापीठाकडून जारी करण्यात आले आहे.
कर्मचारी संघाचे सरचिटणीस संतोष मदने यांनी सांगितले की, ‘विद्यापीठाकडून वर्ग ३ व वर्ग ४ च्या २१० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला राज्य सरकारने अद्याप मंजुरी दिलेली नाही. त्यांचा पगार विद्यापीठ फंडातून करण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेले कुलसचिव नरेंद्र कडू नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांचा कार्यकाळ येत्या १५ रोजी संपत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुलगुरूंचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पदवीदान समारंभ उधळून लावण्याचा निर्णय कर्मचारी संघाकडून घेण्यात आला होता.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काजवा महोत्सवांनी लुकलुकली जंगले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
निसर्गाचा चमत्कार असलेला पिटुकला काजवा कधी लहानशा झुडपात उडत गेला, तरी लहान मुले त्याच्या मागे धावतात... एखाद्या रात्री एक दोन नव्हे; तर हजारो काजव्यांनी बहरलेली झाडे बघायला मिळाली तर? वळवाच्या पावसानंतर जंगलांमध्ये हजारोंच्या संख्येने मुक्तपणे वावरणाऱ्या या लुकलुकणाऱ्या चांदण्यांचा नेत्रदीपक सोहळा अनुभवण्यासाठी विविध गावांमध्ये यंदा काजवा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
चोहोबाजूला पसरलेल्या मिट्ट काळोखामध्ये मनमुराद उडणाऱ्या या लुकलुकत्या दिव्यांचा सोहळा अनुभवण्यासाठी निसर्गप्रेमींनी आता काजवा महोत्सव अशी संकल्पना गेल्या तीन वर्षांत पुढे आणली आहे. कळसुबाई शिखराच्या पायथ्याला, भीमाशंकर अभयारण्यालगतच्या गावांमध्ये, पश्चिम घाटातील जंगलात हा सोहळा रंगतो. विशेष म्हणजे निसर्गाचा हा चत्मकार बघण्यासाठी गेल्या वर्षी तीस हजारांहून अधिक पर्यटक विविध संस्थांनी आयोजित केलेल्या महोत्सवांत सहभागी झाले होते.
दर वर्षी मे महिन्याचा शेवटचा पंधरवडा आणि जून महिन्याचा पहिला पंधरवडा या काळात जंगलांमध्ये काजव्यांची कळसुबाईच्या पायथ्याशी मायावी दुनिया अवतरते. भंडारदरा, मुरशेत, पांजरे, उडदावणे, कोलंटेंभे या आदिवासी खेड्यांच्या शिवारात तसेच रंधा धबधब्याजवळ हजारो झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडतात. मुख्यतः हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवड झाडांवरच त्यांचा मुक्काम असतो. काजवे आल्यावर ही झाडे ख्रिसमस ट्री प्रमाणे लुकलुकतात. दर वर्षी पर्यटकांचा प्रतिसाद वाढतो आहे. यंदा २५ मेनंतर महोत्सवाला सुरूवात होणार आहे, अशी माहिती अकोले येथील महोत्सव संयोजक रवी थोंबाडे यांनी दिली.
मे महिन्यात काजव्यांचे जीवनचक्र सुरू होते. साधारणतः जून महिन्याच्या मध्यापर्यंत त्यांची संख्या वाढत जाते. दाजीपूर- राधानगरी अभयारण्यातही दर वर्षी मेच्या अखरेच्या आठवड्यात काजव्यांचे संमेलन भरते. आतापर्यंत आम्ही मित्रमैत्रिणींना काजवे दाखवायला घेऊन येत होतो. यंदा आम्ही राधानगरी अभयारण्यामध्ये काजवा महोत्सव आयोजित केला आहे. राधानगरीमध्ये येत्या २६ मेला रात्री महोत्सव होणार आहे. पर्यटकांसाठी दिवसभर जंगलभ्रमंती आणि चांदणे पडल्यावर काजव्यांसाठी जंगलवॉक आणि वनभोजन जेवण असे नियोजन केले आहे. या उपक्रमाद्वारे वाघ, हत्ती, गवे, हरणे यांच्याही पलीकडे जंगलात अनेक रहस्ये लपलेली असतात, याची पर्यटकांना जाणीव करून देणे, जंगलाबद्दल त्यांचे कुतुहल वाढवण्याचा उद्देश आहे, असे ‘बायसन नेचर क्लब’चे सम्राट केरकर यांनी सांगितले.

काजवे बघा; पण उपद्रव नको
गेल्या दोन वर्षांत भंडारदरा, हरिश्चंद्रगड परिसरात येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढते आहे; पण जंगलात फिरण्याचे नियम पाळण्यास ही मंडळी टाळाटाळ करतात. काही उपद्रवी पर्यटक जंगलात फिरताना मद्यपानाची मागणी करतात. महोत्सवाच्या निमित्ताने जंगलाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन रवी थोंबाडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


असे झाले नराधम गजांआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नयना पुजारी या सॉफ्टवेअर इंजिनीअर महिलेच्या खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या गुन्ह्यातील आरोपींना शोधून गजाआड करण्याचे आव्हान पेलले होते ते गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी. अवघ्या चार दिवसांत आरोपींचा शोध घेऊन या नराधमांना गजाआड करून या गुन्ह्याचा छडा लावण्यात आला होता. हा गुन्हा उघड करण्यासाठी उपयोगी ठरलेले तांत्रिक कौशल्य महाराष्ट्र पो​लिस दलासाठी गेली काही वर्षे अभ्यासाचा विषय ठरले आहेत.

नयना ही सात ऑक्टोबर २००९ गायब झाल्याची तक्रार येरवडा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ ऑक्टोबर रोजी या महिलेचा मृतदेह खेड येथे सापडला होता. या घटनेची माहिती येरवडा पोलिसांना समजल्यानंतर येरवडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आणखी एका सॉफ्टवेअर इंजिनीअर महिलेवर बलात्कार आणि तिचा खून या घटनेने पुणे आणि ‘आयटी विश्व’ हादरले होते.

येरवडा पोलिस ठाण्यातील खुनाच्या तपासासाठी गुन्हे शाखेच्या युनिट चारचे तत्कालीन पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपासासाठी वेगाने चक्रे फिरू लागली होती. पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्राथमिक तपासात नयनाच्या ‘एटीएम’ कार्डवरून विमाननगर परिसरातून रात्री साडेनऊच्या सुमारास पैसे काढल्याचे लक्षात आले. तेथील ‘सीसीटीव्ही’ फूटेजचा तपास केला असता दोन संशयितांनी तोंडाला रूमाल बांधला असल्याचे उघड झाले. त्यानंतर पुन्हा आठ आक्टोबरला सकाळी ११ च्या सुमारास तिच्या कार्डवरून ‘एटीएम’मधून पैसे काढण्यात आले. मात्र, या ‘एटीएम’ सेंटरमध्ये ‘सीसीटीव्ही’ नव्हते. आरोपींनी नऊ आक्टोबरला पुन्हा खडकी येथून ‘एटीएम’मधून पैसे काढले. दुर्देवाने तेथेही ‘सीसीटीव्ही’ कॅमेरा नव्हता.

पोलिस निरीक्षक पवार आणि त्यांचे सहकारी आरोपींच्या शोधासाठी प्रयत्न सुरू होते. ‘सीसीटीव्ही’मध्ये मिळालेले फूटेज, खबरे, विविध ठिकाणांचे साक्षीदार यांच्याकडे आरोपींची माहिती मिळवण्यात येत होती. हा तपास सुरू असताना १२ ऑक्टोबर रोजी मिळालेल्या एका महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे पवार यांच्या पथकाने योगेश राऊत, राजेश चौधरी, महेश ठाकूर या संशयितांना ताब्यात घेतले. या तिघांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी दिलेल्या जबानीत एक क्रूर घटना उघड झाली. आरोपींनी क्रूरतेची परिसिमा ओलांडल्याचे आपल्या जबाबातून पोलिसांना सांगितले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोपखेलला तात्पुरता पूल बांधणार : आयुक्त हर्डीकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
बोपखेलमधील ग्रामस्थांच्या दळणवळणासाठी मुळा नदीवर तात्पुरता पूल बांधण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रयत्नशील असल्याचे आश्वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा चालू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लष्कराच्या हद्दीतून ये-जा करण्यास प्रतिबंध केल्यानंतर बोपखेलवासीयांसाठी मुळा नदीवर तात्पुरत्या स्वरूपात पूल उभारण्यात आला होता. परंतु, हा पूलही गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते आहे. पर्याय म्हणून बोपखेल ते खडकी दरम्यान नवीन पूल उभारण्याची कार्यवाही चालू आहे. परंतु, प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिकांनी तात्पुरत्या पुलाची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन स्थानिक नगरसेविका हिराबाई घुले, निर्मला गायकवाड, नगरसेवक लक्ष्मण उंडे, विकास डोळस यांनी आयुक्तांना दिले आहे.
यावर आयुक्त म्हणाले, ‘बोपखेलमधील नागरिकांची दळणवळणाची समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. मुळा नदीवर तात्पुरता पूल बांधण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तात्पुरता पूल बांधण्यास परवानगी द्यावी, यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. लष्कराचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि महापालिकेची एकत्रित बैठक घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे.’
नदीवर तात्पुरता पूल उभारण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक खर्चाला स्थायी समितीकडून तातडीने मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी दिले आहे. पुलाचा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आळंदीला देणार ‘पीसीएमसी’चे पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र आळंदीला दररोज दोन लाख लिटर पाणीपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नगरपरिषदांच्या निवडणुकांपूर्वी आळंदीमध्ये सभा घेतली होती. तेव्हा त्यांनी आळंदीमधील पाणीपुरवठ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते. त्याच बरोबर आळंदीला शुद्ध पाणीपुरवठा कसा करता येईल याची चाचपणी करून अहवाल देण्याच्या सूचना पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांना देखील केल्या होत्या.
गेल्या काही दिवसांपासून आळंदीकरांना दुषित पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून आळंदीसाठी पिण्यासाठी पाणीपुरवठा करावा. यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा सुरू केला होता. दरम्यान, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि आमदार लांडगे यांची बैठकही झाली होती.
आळंदी आणि परिसरात सध्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामुळे आळंदीकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. वास्तविक, पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक वसाहती आणि महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे इंद्रायणीच्या प्रदूषणात वाढ झाली. तेच पाणी पुढे आळंदीत बांधलेल्या बंधाऱ्यामध्ये जाते. या पाण्यावर प्रक्रिया करून नगरपरिषद आळंदीकरांना पुरवठा करीत आहे. मात्र, पाणी प्रक्रिया प्रकल्प सदोष असल्यामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने तोडगा काढावा, अशी आग्रही मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली होती. त्याला महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
पवना धरणातून पिंपरी-चिंचवडकरांसाठी पाणीपुरवठा केला जाते. त्यासाठी आवश्यक असलेल्या पाणीसाठ्याव्यतिरिक्त शिल्लक कोट्यातून महापालिका आळंदीला पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
इंद्रायणी नदीची प्रदूषणाच्या विळख्यात सुटका करण्यात यावी, अशी मागणी देखली वारंवार होत असते. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर आणि आमदार लांडगे यांनी काही दिवसांपूर्वीच आळंदीला भेट देऊन पाहणी केली होती. या वेळी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील तळवडे, चिखली, जाधववाडी, मोशी, चऱ्होली, डुडूळगाव आदी भागांतील नाले आणि औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून निर्माण होणारे सांडपाणी इंद्रायणी नदीपात्रात सोडले जाते. तसेच मानवी मैलामिश्रित सांडपाणीही प्रक्रिया न करता नदीपत्रात सोडले जाते. परिणामी, इंद्रायणी प्रचंड प्रदूषित झाली आहे. यावर प्रभावी तोडगा काढण्यासाठी आणि नदीसुधार प्रकल्प हाती घेण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नदीची सध्यस्थिती पाहावी. त्याआधारे ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली होती.
या ठिकाणी मैलाशुद्धीकरण प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्याद्वारे नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या प्रदूषित पाण्यावर मोठ्याप्रमाणात नियंत्रण आणता येईल. त्याबाबत महापालिका स्तरावर योग्य ती कार्यवाही करून निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी या वेळी दिले. त्यानंतर आता आळंदीला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासोबत बैठक घेण्यात घेण्यात येणार आहे.

भामा आसखेड प्रकल्पातून पुणे महापालिका ५ एमएलडी पाणी देणार आहे. मात्र, आळंदीचा भविष्यातील विस्ताराचा विचार करून कुरळी येथील पंपिंग स्टेशनमधून १५ एमएलडी पाणी आळंदी शहराला मिळावे, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात येणार आहे.
- महेश लांडगे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील ९५ धोकादायक वाड्यांवर कारवाई प्रलंबित

$
0
0






म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील मध्यवर्ती पेठांमधील धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण महापालिका प्रशासनाने अनेकदा करूनही हे वाडे मोकळे करण्यास मात्र प्रशासनाला अपयश आले आहे. शहरातील २०७ वाडे आणि इमारती धोकादायक असल्याचे प्रशासनाने केलेल्या पाहणीत समोर आलेले असतानाही त्यापैकी ९५ धोकादायक इमारतींवरील कारवाई आजही प्रलंबितच आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी धोकादायक इमारतींवर कारवाई करण्याचे नवीन आश्वासन आता प्रशासनाने दिले आहे.
पंधरा दिवसापूर्वी शहरातील मध्यवर्ती भागातील एका वाड्याला आग लागली होती. ही आग लागल्यानंतर या वाड्याची भिंत कोसळल्याने शहरातील धोकादायक वाड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भाडेकरू आणि मालक यांच्यातील वादामुळे राहण्यास धोकादायक झालेले वाडे रिकामे केले जात नाहीत. वाडे सोडल्यास जागेचा हक्क जाईल, या भीतीने अनेक भाडेकरू जिवावर उदार होत याच ठिकाणी राहत असल्याचे समोर आले आहे; तर महापालिकेकडे याबाबतची स्पष्ट नियमावली नसल्याने हे धोकादायक वाडे रिकामे केले जात नाहीत. धोकादायक वाडे कोसळण्याची दुर्घटना घडल्यास तातडीने जागे होत प्रशासन शहरातील धोकादायक वाड्यांवर कारवाई करून हे वाडे रिकामे केले जातील, अशी घोषणा करते. मात्र, काही दिवस उलटून गेल्यानंतर याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. परिणामी धोकादायक वाड्यांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरात २०७ धोकादायक इमारती असून, यातील केवळ ७४ धोकादायक वाड्यांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. तर ९५ ठिकाणी कारवाई झाली नसल्याच्या माहितीला प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. ज्या धोकादायक इमारतींचा ठरवीक भाग धोकादायक झाला आहे, अशा २० इमारतींमधील नागरिकांना पालिकेने नोटीस बजाविली आहे. तसेच, काही इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील धोकायदा इमातींचा प्रश्न पावसाळ्यापूर्वी मार्गी लावण्याचा प्रयत्न असल्याने या अधिकाऱ्यांनी सांगितले.


हक्क आबाधित राहण्यसाठी प्रमाणपत्र
भाडेकरू आणि जागामालक यांच्यातील वादामुळे अनेक भाडेकरू जागा सोडायला तयार होत नाहीत. राज्य सरकारने कायद्यात काही वर्षांपूर्वी दुरुस्ती करून महापालिका धोकादायक वाडे जबरदस्तीने खाली करून घेऊ शकते, असा नियम केला आहे. तेथील भाडेकरूंचा त्यांच्या जागेवरील हक्क अबाधित राहावा म्हणून पालिका संबंधित वाड्यात एवढे क्षेत्रफळ होते असे प्रमाणपत्र देते. त्याचा न्यायालयात पुरावा म्हणून उपयोग करता येतो, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका हद्दीलगतच्या सात गावांचा कचरा समस्या

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
कचरा समस्येबाबत दक्ष झालेल्या महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने हद्दीलगत असलेल्या सात गावांचा कचरा घेणे बंद केले आहे. शहरातील कचऱ्याचीच विल्हेवाट लावणे प्रशासनास जिकरीचे बनल्याने या गावांचा कचरा बंद केला असल्याचे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले. पालिकेतील सभासदांच्या आग्रहावरून या गावांचा कचरा पालिकेकडून उचलला जात होता. या गावांनी पुढील काळात पालिकेच्या हद्दीत कचरा टाकल्याचे लक्षात येताच संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
पालिकेच्या हद्दीलगत असलेल्या गावातील कचरा पालिकेच्या वतीने उचलला जातो. सुमारे सव्वाशे ते दीडशे टन हा कचरा असतो. हा सर्व कचरा उरळी, फुरसुंगी येथील कचरा डेपोत टाकला जातो. मात्र, सध्याच्या कचऱ्याची गंभीर स्थिती पाहता या गावांचा कचरा न घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. हद्दीतील काही गावे सर्रास पालिकेच्या हद्दीत कचरा टाकत असल्याचे समोर आल्याने संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला असून, यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तसेच ज्या ठिकाणी शहराच्या हद्दीत कचरा टाकण्यात आला आहे. त्या ठिकाणचा कचरा जेसीबीने पुन्हा संबधित गावांच्या हद्दीत टाकण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
पालिका हद्दीलगत असलेल्या हांडेवाडी, औताडेवाडी, शेवाळवाडी, मांजरी, वडकी, वडाचीवाडी, उंड्री, पिसोळी, उरुळी देवाची, फुरसुंगी तसेच मंतरवाडी या ११ गावांचा कचरा महापालिकेच्या कचरा प्रकल्पांमध्ये प्रक्रिया केला जातो. या कचऱ्याचे प्रमाण सुमारे शंभर ते दिडशे टन आहे. त्यातील केवळ उरुळी देवाची, फुरसुंगी तसेच मंतरवाडी महापालिकेच्या मुख्यसभेने केलेले ठराव आणि तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव पालिकेकडून हा कचरा घेतला जात होता. प्रत्यक्षात ही गावे महापालिकेच्या हद्दीबाहेर असल्याने त्यांनी आपल्या कचऱ्याची विल्हेवाट स्वत: लावणे आवश्यक आहे. मात्र, ही गावे याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे जगताप यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images