Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अर्थव्यवस्थेवर अनुदानांचा न झेपणारा ताण

$
0
0
‘देशाच्या अर्थव्यवस्थेवर विविध प्रकारच्या अनुदानांचा ताण असून पेट्रोलियम, अन्न आणि खते यांचाही त्यामध्ये मोठा वाटा आहे,’ असे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शनिवारी स्पष्ट केले. तसेच, परकी गुंतवणूक हवी की नको, यापेक्षा ती मिळवायची कशी ही बाब आव्हानात्मक आहे, असेही त्यांनी सांगितले. ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’तर्फे ‘भारताचा पुनर्शोध’ या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.

नव्या वर्षात अनुदान थेट बँक खात्यात

$
0
0
‘देशातील ५१ जिल्ह्यांत आधार कार्डवर आधारित यंत्रणेच्या आधारे विविध प्रकारचे अनुदान थेट नागरिकांच्या बँक खात्यात रोख स्वरूपात देण्यात येणार असून त्याची सुरुवात एक जानेवारी २०१३ पासून होईल,’ अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी येथे शनिवारी केली.

भारतात जागतिक दर्जाच्या बँका व्हाव्यात

$
0
0
बँकिंग प्रणालीमध्ये एकत्रिकरणाला पर्याय नसून, भारताने जागतिक दर्जाच्या दोन ते तीन बँका निर्माण करण्याची गरज आहे. बँकांच्या कामकाजामध्ये एकसारखेपणा असू नये आणि तशी सक्तीही बँकांना केली जाणार नाही. परंतु बँकांनी नावीन्यपूर्ण योजना राबविण्यावर भर देणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शनिवारी व्यक्त केले.

सरकारी जमिनींवरील विकास कामांबाबत संभ्रम

$
0
0
राज्य सरकारच्या जमिनींवर विकासकामे करायची की नाहीत, याबाबत पुणे महापालिकेने दोन वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. पोलिस वसाहतींची जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याने त्यामध्ये महापालिका खर्च करू शकत नसल्याचे कारण सांगून प्रशासनाने विकासकामे करण्यास नकार दिला होता. मात्र, एसआरपीएफ ग्रुप एकमधील रस्त्यांच्या डांबरीकरणास प्रशासनाने होकार दिला आहे.

जकातीला आता ‘एलबीटी’चा पर्याय

$
0
0
जकात रद्द करण्याच्या व्यापा-यांच्या मागणीचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार केला असून राज्यातील मोठ्या शहरांमधील जकात हळहूळ रद्द करण्यात येणार आहे. त्याला ‘एलबीटी’ (लोकल बॉडी टॅक्स) आकारणीचा पर्याय देण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी दिली.

सिंचन श्वेतपत्रिकेचा मसुदा मंगळवारी कॅबिनेटपुढे ?

$
0
0
राज्यात राजकीय स्फोट घडविणा-या सिंचनाच्या श्वेतपत्रिकेचा मसुदा येत्या मंगळवारी मंत्रिमंडळापुढे सादर होण्याची दाट शक्यता आहे. याच मुद्द्यावरून उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावे लागलेले अजित पवार यांच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा होणार काय, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

नदीपात्रातील रस्ता जोडणार

$
0
0
कोथरूड-कर्वेनगरसह सिंहगड रोडच्या परिसरातील नागरिकांना आता थेट नदीकाठच्या रस्त्याने शहरात येणे सुलभ होणार आहे. नवसह्याद्री सोसायटीतील डीपी रोडपासून ते रजपूत झोपडपट्टीपर्यंतच्या रस्त्याला जोडणा-या रस्त्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता येथील शेकडो वाहनचालकांना काही मिनिटांतच शहराच्या मध्यवस्तीत पोहोचणे शक्य होऊ शकेल.

‘डीम्ड कन्व्हेअन्स’मधला आणखी एक अडथळा दूर

$
0
0
सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना बिल्डर व मूळ जमीन मालकाकडून ‘डीम्ड कन्व्हेअन्स’ करून देण्यातील आणखी एक अडथळा राज्य सरकारने दूर केला आहे. बिल्डरने सोसायटीच्या नावे नोंदणीकृत दस्त दिल्यावर संबंधित गृहनिर्माण सोसायटीचे नाव सातबारा उता-यावर लावण्यासाठी तलाठ्याकडून बजावली जाणारी नोटीस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आजपासून स्त्री अत्याचारविरोधी पंधरवडा

$
0
0
जागतिक स्त्री अत्याचार विरोधी पंधरावड्यानिमित्त स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समितीतर्फे येत्या दहा डिसेंबरपर्यंत व्याख्याने, स्क्रिनिंग, पपेट शो, पत्रके वाटप, पोस्टर्स प्रदर्शन असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

‘इकेबाना’ पद्धतीने साकारल्या पुष्परचना

$
0
0
पितळी भांडी, वेगवेगळी वाद्य, भातुकलीच्या खेळातील छोटीशी भांडी, परड्या एवढेच नव्हे; तर घरामध्ये असलेल्या काही टाकाऊ वस्तूंचा वापर करून इकेबाना पद्धतीने केलेल्या पुष्परचनांचे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनामध्ये भरविण्यात आले आहे.

व-हाड निघालं तुळशीच्या लग्नाला

$
0
0
नटून-थटून आलेली वऱ्हाडी मंडळी, लगीनघाईत व्यस्त झालेली घरची मंडळी, सनई-चौघड्याचे मंगल सूर अशा उत्साही वातावारणात शनिवारी तुळशीचा विवाह संपन्न झाला.

कनेक्शनआधीच वीजबिल महावितरणचा अजब कारभार

$
0
0
नियमित वीजबिल न मिळाल्याच्या तक्रारी शहरातील असंख्य ग्राहकांकडून करण्यात येतात. परंतु, सिंहगड रोड परिसरातील एका ग्राहकाला विजेचे कनेक्शन मिळण्याआधीच वीजबिल देण्याची तत्परता महावितरणने दाखविली आहे.

विजय कोलते यांना महासंचालकांकडून शिवीगाळ

$
0
0
महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष विजय कोलते यांना परिषदेच्याच महासंचालकांनी मोबाइलवरून अर्वाच्य शब्दांत शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी रात्री दीड वाजता (उजाडता शनिवार) घडली. कार्यालयीन वादातून हा शिवीगाळीचा प्रकार घडल्याचे कळते.

‘प्रशिक्षणाची गुणवत्ता सुधारा’

$
0
0
‘आयटीआय’मधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून, त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी मूलभूत साधन सामग्रीची उभी करण्याची गरज आहे, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी व्यक्त केले.

एक्स्प्रेस-वेवर ट्रकचा विचित्र अपघात

$
0
0
पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर आडोशी गावाच्या हद्दीत साखरेचा ट्रक तीनशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात ट्रकच्या चालक आणि क्लिनरचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हा अपघात शनिवारी (२४ नोव्हेंबर ) सायंकाळी साडेपाच वाजता झाला. सुदैवाने दिवाळी सुट्टी असल्याने बसमध्ये कोणीही विद्यार्थी नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

भेटी लागी जीवा लागलेसी आस...

$
0
0
टाळ-मृदंगाच्या तालावर, विठूनामाच्या गजरात शनिवारी हजारो भाविकांनी छोट्या पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतले. कार्तिकी एकादशीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. खांद्यावर पताका घेऊन परिसरातून वारकऱ्यांच्या दिंड्या पावली खेळत छोट्या पंढरपुरात दाखल होत होत्या.

तिजोरी पडल्याने चोरटे पसार

$
0
0
वॉचमनला मारहाण करून ऑफिसमधील तिजोरी पळवून नेण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसल्याची घटना शनिवारी रात्री एकच्या सुमारास घडली. शिवाजीनगरमधील अभिनव अपार्टमेंट येथील प्रतीक एजन्सीमध्ये असा प्रकार घडला. या प्रकरणी केतन दत्तात्रय गायकवाड ( वय २५, रा. गणेशनगर, एरंडवणा) यांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. नितीन श्रीराम कदम (वय ३९, रा. औंध) असे मारहाण झालेल्या वॉचमनचे नाव आहे.

चिंचवडमध्ये सव्वा लाखाची घरफोडी

$
0
0
फ्लॅटच्या दरवाज्याचा कोयंडा तोडून चोरट्यांनी बेडरुममधील तिजोरीतील रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे सव्वालाख रुपयांचा ऐवज पळवून नेला. चिंचवडमधील गांधी पेठेतील देवकर पॅराडाइजमध्ये ही घटना घडली होती. गेल्या तीन दिवसांत ही घटना घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

स्वारगेट कॅनॉलमध्ये बेवारस मृतदेह

$
0
0
स्वारगेट येथील कॅनॉलमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आलेल्या महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून अद्याप तिची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी कळविले आहे. तेरा नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता कॅनॉलच्या पाण्यात महिला वाहून आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते.

त्रिपुरारी पौर्णिमेला चंद्रग्रहण

$
0
0
चालू वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण पाहण्याची संधी पुणेकरांना येत्या २८ नोव्हेंबरला मिळणार आहे. सायंकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत ग्रहण उत्तमपणे पाहता येणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images