Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

देशात दोन-तीनच बँका असाव्यात

$
0
0
बँकिंग प्रणालीमध्ये एकत्रीकरणाला पर्याय नसून, भारताने जागतिक दर्जाच्या दोन ते तीन बँका निर्माण करण्याची गरज आहे. बँकांच्या कामकाजामध्ये एकसारखेपणा असू नये आणि तशी सक्तीही बँकांना केली जाणार नाही.

कार्यक्षमता सुधारून व्याजदरात कपात करावी

$
0
0
रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात करावी, अशी मागणी उद्योग क्षेत्राकडून आणि अप्रत्यक्षपणे सरकारकडून होत असतानाच बँकांनी स्वतःची कार्यक्षमता वाढवून व्याजदरात कपात करावी, अशी सूचना अर्थराज्य मंत्री नमोनारायण मीना यांनी रविवारी केली.

टोलवसुली रस्त्यासाठी का खड्ड्यांसाठी ?

$
0
0
पुणे ते कोल्हापूर रस्त्याची दुर्दशा आणि टोलवसुली या प्रश्नांमध्ये लक्ष घालावे, अशी मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे. या रस्त्यांवर नागरिक रस्त्यासाठी टोल देतात, की खड्ड्यांसाठी हे कळेनासे झाल्याची टीका महाराष्ट्र व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

ST परीक्षेचा निकाल ३० नोव्हेंबरला

$
0
0
एसटीमध्ये नव्याने भरती करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल येत्या ३० नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून कळवण्यात आले आहे.

भावना-कर्तव्यातील फरक ओळखा

$
0
0
भावनेच्या आहारी जाऊ नका. भावना आणि कर्तव्य यातील फरक ओळखण्याची क्षमता निर्माण करा, असे युवकांना आवाहन करीत प्रगत राष्ट्र घडविण्यासाठी युवकांनी पुढे यावे, असे मार्गदर्शन आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी सांगवी येथे केले.

सोन्याची वाढती आयात चिंताजनक

$
0
0
सोन्याच्या वाढत्यामुळे आयातीच्या पार्श्वभूमीवर यावर उपाय योजण्यासाठी रिझर्व्ह बँकेने कुब राव यांच्या अध्यक्षतेखाली एका गटाची स्थापना केली आहे. सोन्याची वस्तूरूपातील मागणी कमी करण्याबरोबरच यातील गुतंवणुकीचे नवे पर्याय आदींबाबतचा अहवाल बँकेकडून लवकरच सूचना आणि हरकतींसाठी लोकांपुढे ठेवला जाणार आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकचे डेप्युटी गव्हर्नर सुबीर गोकर्ण यांनी रविवारी दिली.

थंडीमुळे फळांना उठाव

$
0
0
थंडी जाणवू लागल्याने रसरशीत फळांना ग्राहकांची पसंती मिळू लागली आहे. परिणामी डाळींब, मोसंबी आणि संत्री या रसदार फळांनी बाजारपेठ बहरली आहे. सीझन नसतानाही सीताफळ बाजारात दिसत आहेत. लालचुटूक स्ट्रॉबेरीही बाजारात दाखल होऊ लागली आहे. मागणी असल्याने काही फळे महाग झाली आहेत.

भाज्यांचे भाव स्थिर

$
0
0
वाढत्या थंडीचा फळ आणि पालेभाज्यांच्या काढणीवर परिणामी होऊ लागला असून, आता भाज्यांची आवक कमी झाली आहे. मात्र, तरीही बहुतेक भाज्यांचे भाव स्थिर राहिले आहेत. किरकोळ बाजारात कांद्याचा भाव अजूनही २० रुपये आहे. पालेभाज्यांच्या भावात वाढ झालेली नाही.

लठ्ठपणा वाढतोय...?

$
0
0
मेट्रोपोलेटिन शहरांमधून लठ्ठपणाविषयी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या जनजागृतीमुळे प्रमाणापेक्षा थोडेसेही खाल्ले तरीही आपण लठ्ठ होऊ अशी भीती निर्माण होऊ लागली आहे. अशी भीती बाळगणाऱ्यांनो आता चिंता करू नका... तुमचा लठ्ठपणा कमी करण्याचा रामबाण उपाय तुमच्याच हाती आहे....

गेटच्या धक्क्याने चिमुकलीचा मृत्यू

$
0
0
कंपनीचे गेट बंद करत असतानाच त्याचा जोरात धक्का लागल्याने चार वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पुण्यातील भोसरी ‘एमआयडीसी’त घडली आहे. ही मुलगी आपल्या वडिलांच्या मागे मागे गेली होती. गेट बंद करताना अचानक ही मुलगी पुढे आली आणि हा अनर्थ घडला.

कलाविष्कार रंगणार गुरु-शिष्य परंपरेचा

$
0
0
गेल्या सहा दशकांपासून गुरु-शिष्य नात्याची महती जपणाऱ्या सवाई गंधर्व महोत्सवात या वर्षी बुजुर्ग आणि युवा पिढीचा कलाविष्कार सादर होणार आहे. गुरु-शिष्य परंपरेचा वारसा एकत्रितरीत्या अनुभवण्याची संधी प्रथमच पुणेकरांना मिळणार आहे.

४ टनांच्या गुटख्यापासून ७५ हजार वॅट वीजनिर्मिती

$
0
0
बंदीचे आदेश लागू केल्यानंतर जप्त करण्यात आलेल्या गुटख्यापैकी आतापर्यंत तीस लाख रुपये किंमतीचा आणि चार टन वजनाचा गुटखा नष्ट करण्यात आला. त्यातून ७५ हजार वॅट एवढ्या वीजेची निर्मिती झाली आहे. त्यामुळे शहरातील दीडशेहून अधिक कुटुंबांना वीजेचा लाभ मिळणार आहे.

शिक्षण हक्कभंगाची कारवाई की फुसका बार?

$
0
0
शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा इशारा राज्याच्या शिक्षण खात्याकडून वारंवार देण्यात येत आहे.

तुरुंगातच होणार बायोगॅस प्लांट?

$
0
0
येरवडा तुरुंगात निर्माण होणा-या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी या परिसरात बायोगॅस प्लांट सुरू करण्याचा पर्याय समोर आला आहे. या संदर्भात तुरुंग प्रशासन आणि पुणे महापालिकेच्या अधिका-यांमध्ये प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे.

दिल्लीचे डोहाळे, अन् इच्छुकांना कळा

$
0
0
लोकसभेच्या निवडणुकीला पाचशेहून अधिक दिवस राहिलेले असतानाच पुण्यामध्ये सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सगळ्याच पक्षातून अचानक खासदारकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाल्यामुळे राजकीय वातावरण ढवळण्यास सुरूवात झाली आहे.

नदीकाठचा रस्ता सुसाट

$
0
0
एरंडवण्यातील म्हात्रे पुलापासून शनिवार पेठेतील जयंतराव टिळक पुलापर्यंतच्या नदीकाठच्या रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या रस्त्याच्या कामावरील स्थगिती मुंबई हायकोर्टाने उठविली असून त्याला विरोध करणारी याचिका फेटाळून लावली आहे. गेली अनेक वर्षे पर्यावरणवादी संस्थांच्या विरोधामुळे या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत रखडले होते.

बावधन, सिंहगड रोडवर अतिक्रमणे हटवली

$
0
0
दिवाळीच्या काळात थंडावलेल्या अतिक्रमण विभागाने पुन्हा कारवाईला सुरुवात केली असून, सोमवारी हॉटेल चालकांनी केलेल्या अतिक्रमणांवर हातोडा मारण्यात आला. दिवसभरात बावधन, चांदणी चौक ते भूगाव रस्ता आणि सिंहगड रस्ता या भागातील हॉटलमधील बेकायदा बांधकामे काढण्यात आली.

बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ

$
0
0
राज्यात गेल्या वर्षी भ्रूणहत्येचे १२ गुन्हे दाखल झाले आहेत. तर, शिशू हत्येचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. भ्रूणहत्येबाबत सरकारने कठोर पावले उचलल्याने गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण १४० टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालात उघड झाली आहे. दरम्यान, बालकांवरील अत्याचाराचे ३,३६२ गुन्हे दाखल झाले असून २०१० च्या तुलनेत वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

उत्पन्न मर्यादा वाढल्याने गरिबांना मोफत उपचार

$
0
0
महागड्या धर्मादाय हॉस्पिटलमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सवलतीसह मोफत उपचार मिळण्यासाठी वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ झाली असून या नियमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तालयाने जारी केले आहेत. सवलतीच्या दरात उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने गरिबांना दिलासा मिळणार आहे.

धरणांच्या पाण्यात झपाट्याने घट

$
0
0
सिंचन आणि पिण्यासाठी झालेल्या वापरामुळे राज्यातील धरणांचा पाणीसाठा झपाट्याने खालावत चालला असून सद्यस्थितीत धरणांत फक्त ६१ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. गतवर्षी याच काळात धरणांत ७४ टक्के पाणी होते. धरणांच्या साठ्यात गतवर्षीपेक्षा तब्बल १३ टक्के घट असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images