Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

फसव्या मेसेजविरोधात रिझर्व्ह बँकेचे आवाहन

$
0
0
तुम्हाला पाच लाख पौंडाचे बक्षिस लागले असून, अजूनही त्याचा स्वीकार केलेला नाही. त्यामुळे ते घेण्यासाठी नाव, पत्ता, वय, मोबाइल नंबर, राज्य, शहर आदी माहिती ई-मेल मार्फत रिझर्व्ह बँकेला कळवा, अशी माहिती विचारणारा फसवा मेल आणि एसएमएस सध्या काही जणांना येत आहे.

घरकामगार, नोकरांची जाणून घ्या ‘आयडेंडिटी’

$
0
0
पुणे शहरात आणि परिसरात घातपाताच्या कारवाया होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर शहरातील खासगी मालक आणि व्यावसायिकांनी त्यांच्याकडील नोकर-घरकामगारांच्या चारित्र्याची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन शहर पोलिसांनी गुरुवारी केले.

वेबसार्इटद्वारे विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडून चौकशी

$
0
0
शलाका सुभाष चव्हाण आणि दीपेश दिवाकर मढव नावाच्या विद्यार्थ्यांच्या शोधात मुंबई पोलिसांनी आता पुणे विद्यापीठाकडे चौकशी केली आहे. मात्र, या विद्यार्थ्यांविषयी कोणतीही माहिती उपलब्ध न झाल्याने विद्यापीठाने त्यांच्या चौकशीविषयीचे पत्रच विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रकाशित केले आहे.

उन्हाळी सुट्टीत भेट बालचित्रपट महोत्सवाची

$
0
0
सध्या दिवाळीच्या सुट्टीची मजा लुटण्यात दंग असणाऱ्या बालगोपाळांना उन्हाळी सुट्टीत आंतरराष्ट्रीय चित्रपट, अॅनिमेशनपटांच्या महोत्सवाची मजा लुटता येणार आहे.

येरवडा कारागृह प्रशासनाचे काम चोख

$
0
0
मुंबई हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबला फासावर लटकवणाऱ्या येरवडा कारागृह प्रशासनाचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी कौतुक केले आहे. ‘कारागृह प्रशासनाने केलेले काम कौतुकास्पद असून त्यांनी आपल्या कामात एकही उणीव भासू दिली नाही, अशी प्रतिक्रियाही पाटील यांनी व्यक्त केली.

‘बाळासाहेबांचे पुण्यात स्मारक व्हावे’

$
0
0
‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुण्यावर प्रेम होते. त्यांचे जन्मस्थान असलेल्या पुण्यात त्यांचे स्मारक व्हावे,’ या मागणीचा पुनरुच्चार पुण्यातील शोकसभेत करण्यात आला. दरम्यान, ठाकरे यांच्या अस्थींचे शुक्रवारी सकाळी दहा वाजता आळंदी येथे विसर्जन केले जाणार आहे.

शहरात आत्महत्यांचे सत्र सुरूच

$
0
0
पिंपरी चिंचवड शहरांमध्ये एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडल्या आहेत. तर, एका महिलेने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचे सत्र अजूनही सुरूच असल्याचे चित्र समोर आले आहे.

तालमींना सरसकट करमाफी नाही

$
0
0
‘शहरातील तालमींना काही प्रकारच्या करांमधून सवलत देता येईल, मात्र सरसकट करमाफी करता येणार नाही,’ असे महापालिकेच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जप्त केलेला तेलाचा टँकर पेटला

$
0
0
विश्रांतवाडी पोलिसांनी जप्त केलेल्या तेलाच्या टँकरला आग लागल्याने तो जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी रात्री पावणेनऊ वाजता घडली. विश्रांतवाडी पोलिस स्टेशनजवळ उभ्या केलेल्या टँकरला आग लागल्याने खळबळ उडाली आहे. आगीचे कारण कळू शकले नाही.

अजूनही प्रतीक्षा बुलेटप्रूफ जॅकेटची

$
0
0
जर्मन बेकरीतील बॉम्बस्फोट, जंगली महाराज रोडवरील साखळी स्फोट अशा दहशतवादी हल्ल्यांनी पुणे हादरले असतानाच पुण्यातील सुरक्षा यंत्रणांची बुलेट प्रूफ जॅकेट, हेल्मेटसाठीची वणवण संपलेली नाही. पुणे पोलिसांनी प्रत्येकी २०० बुलेटप्रूफ जॅकेट आणि हेल्मेटची मागणी सरकारदरबारी पडूनच आहे.

घरकामगार, नोकरांची जाणून घ्या 'आयडेंडिटी'

$
0
0
पुणे शहरात आणि परिसरात घातपाताच्या कारवाया होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर शहरातील खासगी मालक आणि व्यावसायिकांनी त्यांच्याकडील नोकर-घरकामगारांच्या चारित्र्याची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन शहर पोलिसांनी केले.

शैक्षणिक गुणवत्तेला हवे प्रशासकीय पाठबळ

$
0
0
पुणे विद्यापीठाचे रँकिंग सुधारण्यासाठी शैक्षणिक गुणवत्तेवर भर द्यावा लागणारच आहे; पण त्याच जोडीने काही प्रशासकीय बाबींचाही फेरविचार करणे निकडीचे असल्याचे विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांतील सदस्यांचे मत आहे.

आशिष लेले यांना इन्फोसिस पारितोषिक

$
0
0
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) शास्त्रज्ञ डॉ. आशिष लेले यांना, संशोधन क्षेत्रात प्रतिष्ठेचे मानले गेलेले इन्फोसिस पारितोषिक जाहीर झाले आहे. सुवर्णपदक आणि पन्नास लाख रुपये रोख असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. तीन जानेवारीला दिल्लीत त्यांना ते समारंभपूर्वक प्रदान दिले जाणार आहे.

अधिवेशनावर वारकरी काढणार मोर्चा

$
0
0
महाराष्ट्र शासन इतर धर्मीयांसाठी हजारो कोटी रुपये खर्च करते, विविध योजना राबवते; मात्र श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी-कार्तिकी वारीच्या वेळी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना साध्या प्राथमिक सुविधांपासून वंचित ठेवले जाते. इतर राज्यांतील शासनाने तेथील तीर्थक्षेत्रांचा चांगला विकास केला. त्याप्रमाणे गेल्या ६५ वर्षांत महाराष्ट्र शासनाला पंढरपूरचा विकास करता आलेला नाही.

फॅशन स्ट्रीट व्यावसायिकांची जागा देण्याची मागणी

$
0
0
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि फॅशन स्ट्रीटमधील दुकानदार यांच्यातील तडजोडीच्या मुद्द्यावरून आता वादाला सुरुवात झाली आहे. फॅशन स्ट्रीट येथील ९२ व्यावसायिकांना तातडीने जागा देण्याची मागणी या दुकानदारांनी लावून धरली आहे. तसेच, फॅशन स्ट्रीट शॉपिंग सेंटरच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास न घेता कोणताही निर्णय घेऊ नका, असेही त्यांनी म्हटले आहे.

दोषींवर कारवाई करू

$
0
0
‘फेसबुक’वर कमेंट टाकल्याप्रकरणी तरुणींवरील कारवाई प्रकरणी पालघर पोलिस दोषी असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले.

खडकवासला धरणावर उड्डाणपूल

$
0
0
पुण्यातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या रिंगरोडच्या आखणीत पुन्हा बदल करण्यात आला आहे. आता हा संपूर्ण रस्ता शहराबाहेरूनच नेण्यात येणार आहे. त्यासाठी खडकवासला धरणाच्या जलाशयावरून पावणेदोन किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन आहे.

शास्त्रज्ञ आशिष लेले यांना पुरस्कार

$
0
0
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) शास्त्रज्ञ डॉ. आशिष लेले यांना संशोधन क्षेत्रात प्रतिष्ठेचे मानले गेलेले इन्फोसिस पारितोषिक जाहीर झाले आहे. सुवर्णपदक आणि पन्नास लाख रुपये रोख असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. येत्या ३ जानेवारीस दिल्लीत त्यांना ते समारंभपूर्वक दिले जाईल.

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात

$
0
0
मुंबई-पुणे महामार्गावर आज सकाळी साडेसातच्या सुमारास एक विचित्र अपघात झाल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. त्यामुळे विकेंण्डची मजा लुटण्यासाठी पुण्याकडे निघालेल्या मुंबईकरांना खंडाळा घाटात मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

‘एफडीआय’बाबत भाजपशी चर्चा उत्साहवर्धक

$
0
0
मल्टि-ब्रँड रिटेलमधील थेट परकी गुंतवणुकीवरून (एफडीआय) विरोधी पक्षांनी संसदेचे हिवाळी अधिवेशन दोन दिवस बंद पाडले असतानाच भाजपच्या सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्याशी शुक्रवारी सर्व मुद्द्यांवर झालेली चर्चा उत्साहवर्धक ठरल्याचे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शनिवारी स्पष्ट केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images