Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कसाबला पुण्यात देणार फाशी?

$
0
0
पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद अजमल कसाब याचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला असून कसाबला पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात (जेल) हलवण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे कसाबच्या फाशीची अंमलबजावणी पुण्यामध्येच केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दहशतवादी कसाबला दिली फाशी

$
0
0
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत पाकिस्तानी अतिरेकी मोहम्मद अमीर अजमल कसाब याला आज फासावर लटकण्यात आले. पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात सकाळी ठीक ७.३० वाजता क्रूरकर्मा कसाबचा 'हिशेब' करण्यात आला.

शहिदांना ही खरी श्रद्धांजली: RR

$
0
0
‘होय, सकाळी ७.३० वाजता क्रूरकर्मा कसाबला फासावर लटकवण्यात आले आहे,’ असे जाहीर करतानाच, ‘२६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिद पोलीस व निष्पाप नागरिकांना ही ख-या अर्थाने श्रद्धांजली आहे,’ अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली.

कस्मे-वादे कसाबला फासावर चढवितानाचे...

$
0
0
अजमल अमीर कसाबला फासावर चढविण्यास चार वर्षांचा कालावधी लागला. त्या दरम्यान गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याच्या घोषणा झाल्या. अगदी पोलिसांच्या हाती बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी नि एके ४७ देण्यापर्यंत. त्यापैकी किती वादे पूर्ण झाले नि किती कागदावरच आहेत, याचा हा आढावा...

फासावर लटकावणा-यास ५ हजारांची बक्षिसी

$
0
0
येरवडा कारागृहात कसाबला फासावर लटकावणा-या अधिका-याला या कामाबद्दल पाच हजार रुपयांची बक्षिसी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी जाहीर केली आहे. मात्र, या अधिका-याची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.

‘ऑपरेशन एक्स’ होते ‘टॉपमोस्ट सिक्रेट’!

$
0
0
येरवडा कारागृहात अजमल कसाब याच्या फाशीची तयारी करण्यात येत असताना कारागृह प्रशासनाबरोबरच पोलिसांनाकडूनही कमालीची गुप्तता पाळली गेली. कसाबला येरवड्यात फाशी दिल्याची बातमी पोलिस दलातीलही अनेकांना ‘ब्रेकिंग न्यूज’ झळकेपर्यंत ठाऊक नव्हती!

व्वा, क्या बात है...

$
0
0
मुंबई येथे झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाब याला फाशीवर चढविल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरभर पसरली. ‘कध‌ी नव्हे तर राज्य सरकारने चांगले काम केले’, ‘हे काम फार पूर्वीच करायला हवे होते’, ‘व्वा क्या बात है...’ यापासून कसाबला नक्की कशा पद्धतीने फाशी दिली गेली याच्या चर्चा आणि गप्पा सर्वत्र रंगल्या होत्या.

आनंदोत्सव... न्याय मिळाल्याचा

$
0
0
दहशतवादी अजमल कसाबच्या फाशीनंतर पुण्यातील विविध संघटना, संस्था आणि राजकीय पक्षांतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मिठाईवाटप, फटाके वाजवून नागरिकांनी न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली.

अखेर कसाबला लटकावले

$
0
0
मुंबईवरील ‘२६/११’च्या हल्ल्यात शेकडो निष्पाप जिवांचे बळी घेणारा दहशतवादी अजमल अमीर कसाब याला बुधवारी सकाळी ७.३० वाजता पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पाच नोव्हेंबरला दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर कमालीची गुप्तता राखत या फाशीची अंमलबजावणी करण्यात आली.

खडकीत जल्लोष

$
0
0
अजमल कसाबला फाशी दिल्याची बातमी प्रसिद्ध झाली आणि विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खडकीतल्या विविध चौकामध्ये फटाक्यांची अतिषबाजी करत दिवाळी साजरी केली. गांधी चौक, टांगा स्टँड, ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या चौकामध्ये फटाक्याच्या माळा लावण्यात आल्या होत्या.

फाशीचा व्हर्च्युअल आनंद

$
0
0
‘कसाबचा केला हिसाब’, ‘कसाबचे दिवस भरले’, ‘आज भारतात परत एकदा दिवाळी साजरी केली जाईल’ अशा स्टेट्सच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंग साइटवर अजमल कसाबच्या फाशीबद्दल व्हर्च्युअली आनंद व्यक्त करण्यात आला. बुधवारी सकाळी फाशीची अंमलबजावणी झाल्यानंतर दिवसभर याच विषयाची चर्चा नेटकरांमध्ये रंगली होती.

एके ४७शी लढली पोलिसांची लाठी

$
0
0
मिरवणुका, सभांचा बंदोबस्त राखण्याचे प्रशिक्षण मिळालेल्या पोलिसांनी मोठ्या धाडसाने अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या बळावर धुमाकूळ घालणा-या दहशतवाद्यांचा मुकाबला केला. कसाबला आज झालेल्या फाशीमुळे एके ४७ विरुद्ध लढलेल्या लाठीचाच गौरव झाला आहे!

उसाला हवी तीन हजारांची उचल

$
0
0
‘उसाला प्रति टन ३००० रुपये पहिली उचल घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, उसाचे एक कांडेही साखर कारखान्यांना देणार नाही, इतकेच नाही तर येत्या १२ डिसेंबरपासून ‘साखर अडवा’ आंदोलनही सुरू करू,’असा इशारा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद जोशी यांनी बुधवारी राज्यस्तरीय ऊस परिषदेत बोलताना दिला.

जल्लाद जाधव यांची इच्छा अपूर्ण

$
0
0
मुंबई दहशतवादी‌ हल्यातील आरोपी मोहम्मद कसाब याला फासावर लटकाविण्याची राज्यातील एकमेव जल्लाद अर्जुन जाधव यांची इच्छा अखेर अपूर्णच राहिली. जाधव यांचे अडीच महिन्यांपूर्वीच निधन झाल्याने त्यांची ही इच्छा अधुरीच राहिली.

फॅशन स्ट्रीट व्यावसायिकांची जागा देण्याची मागणी

$
0
0
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि फॅशन स्ट्रीटमधील दुकानदार यांच्यातील तडजोडीच्या मुद्द्यावरून आता वादाला सुरुवात झाली आहे. फॅशन स्ट्रीट येथील ९२ व्यावसायिकांना तातडीने जागा देण्याची मागणी या दुकानदारांनी लावून धरली आहे.

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक पुण्यात

$
0
0
पुणे विभागातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने गुरुवारी पुरंदर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली. हे पथक सातारा, सांगली व सोलापूरमधील दुष्काळी भागांनाही भेट देणार आहे.

अस्थिकलश दर्शनासाठी नागरिकांची गर्दी

$
0
0
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थिदर्शनासाठी पिंपरी-चिंचवडच्या विविध भागात नागरिकांनी गुरुवारी (२२ नोव्हेंबर) गर्दी केली होती. दर्शन घेताना अनेकांना भावना अनावर झाल्या.

थंडीची तीव्रता घटली

$
0
0
आठवड्याच्या सुरुवातीस पुणेकरांना गारठविणाऱ्या थंडीची तीव्रता अल्पावधीतच घटली आहे. गुरुवारी १३.४ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. गेल्या शनिवारपासून पारा घसरला होता.

पोलिस मुख्यालयात हास्याचे स्फोट...

$
0
0
वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि अन्य सहकारी कामाचा प्रचंड ताण विसरून खो-खो हसत आहेत, असे दृश्य नुकतेच शिवाजीनगरमधील पोलिस मुख्यालयात पाहायला मिळाले.

सावधान... तुम्हालाही मॉर्निंग वॉक पडेल महागात

$
0
0
सोन्याची अंगठी आणि चेन घालून मॉर्निंग वॉकला जाणे ज्येष्ठ नागरिकास महागात पडले. पत्ता विचारण्याचा बहाणा अन पोलिस असल्याची बतावणी करून दोन भामट्यांनी हातचलाखीने या ज्येष्ठाकडील सोने लुटले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images