Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मोहिमेत तरुणांना सामावून घेणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी आणि शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी सुरू केलेली मोहीम यापुढे अव्याहतपणे चालावी, यासाठी येत्या काळात अधिकाधिक तरुणांना यामध्ये सामावून घेतले जाणार आहे. त्यासाठी मकरंद अनासपुरेसह मी स्वतः कॉलेजांमध्ये जाऊन तरुणांशी संवाद साधणार आहोत,’ अशी माहिती अभिनेते व नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांनी सोमवारी दिली.

‘नाम’ फाउंडेशनच्या वतीने राज्यातील २० शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी अडीच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. या वेळी कारगिल युद्धामध्ये पराक्रम गाजविलेले सुभेदार योगेंद्रसिंह यादव, सैनिक कल्याण मंडळाचे अध्यक्ष कर्नल सुहास जतकर (निवृत्त), मकरंद अनासपुरे आदी या वेळी उपस्थित होते. जवान सीमेवर कोणत्या परिस्थितीत लढत असतो, यापासून आपण पूर्णपणे अनभिज्ञ आहोत. जवान या परिस्थितीला सामोरे जात असताना, समाज म्हणून कोणीतरी आपल्या कुटुंबीयांकडे लक्ष देत आहे, ही भावना त्यांच्या मनात निर्माण होईल. अवघ्या १९ ते २५ या वयोगटातील तरुण जवान शहीद होतात, तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांची परिस्थिती नाजूक असते. त्यांना आधार देण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे, या विचारानेच शेतकऱ्यांसह जवानांसाठी काम करण्याचे ठरविले, असे पाटेकर यांनी सांगितले.

जवानांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी येत्या काळात अरुणाचल, मेघालय या भागांत तीन शाळा उभारण्याचे ध्येय आहे. तसेच, पुण्यामध्ये जवानांच्या मुलांसाठी वसतिगृह उभारण्याचा प्रयत्न असेल, असेही पाटेकर यांनी सांगितले.

माझ्या आई-वडीलांनी मला जन्म दिला आणि देशसेवेच्या मार्गावर चालण्याचे संस्कार दिले, याचा मला गर्व आहे, असे उद्गार यादव यांनी काढले. कारगिल युद्धाच्यावेळी प्रत्यक्ष रणभूमीवर काय परिस्थिती
होती, शत्रू साडेसोळा हजार फूट उंचीवर असताना, पायथ्यापासून शिखरापर्यंत कसा प्रवास केला, अंधारातील शिखर चढाईची मोहीम कशी होती, याबाबत यादव यांनी माहिती देऊन, कारगिल युद्ध डोळ्यासमोर उभे केले.

गोखले यांची आठवण

ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले व आमची टीम एका नाटकासाठी परदेशात होती. तेव्हा आम्हाला जेवणासाठी दररोज प्रत्येकी पैसे मिळत होते. मात्र, गोखले केवळ एक वेळ जेवण करत. एका वेळच्या जेवणाचे पैसे त्यांनी साठवले होते. माघारी येताना गोखलेंनी साठवलेले एक हजार आठ डॉलर सहकाऱ्यांकडे दिले. भारतात आल्यानंतर गोखले यांनी ते संपूर्ण पैसे मुंबई येथील सावरकर निधीला दिले. या गोष्टीचा कोठेही गाजावाजा त्यांनी केला नव्हता, अशा वृत्तीची आवश्यकता असल्याचे नाना पाटेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येरवड्यात भीषण आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

येरवडा येथील लक्ष्मीनगर झोपडपट्टीत मंगळवारी सकाळी अचानक लागलेल्या आगीत घरगुती चार सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत शेजारील पाच घरांचे मोठे नुकसान झाले आहे. स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दलाच्या तीन गाड्यांनी आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

लक्ष्मीनगर पोलिस चौकीच्या मागे सम्यक मित्र मंडळाशेजारी झोपडपट्टीत सकाळी साडेदहाच्या सुमारास सार्थक तानाजी भुसारे (वय ३०) या तरुणाच्या घरात अचानक आग लागली. आगीची तीव्रता वाढू लागल्यानंतर घरातून सगळे बाहेर पडले. काही क्षणातच घरातील सिलिंडरचा मोठा स्फोट झाल्याने घरावरील पत्रे उडाले आणि घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यानंतर लगेचच शेजारील अय्याज रियाज कुरेशी (वय ३०) यांच्या घरातील दोन सिलिंडरने पेट घेतल्याने स्फोट झाला. त्यापाठोपाठ कासीम दस्तगीर कुरेशी (वय ५५) यांच्या घरातील छोट्या सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आजूबाजूला राहणारे लता भोपाळ सकटे, राहुल महादेव पारडे, आकाश सत्यवान जोगदंड, आरती दिलीप आठवले, सुनीता सुरेश परदेशी आणि जया बसवंत यांच्या घरांना आग लागून मोठे नुकसान झाले. स्फोट झालेल्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने कुटुंब उघड्यावर पडली.

आगीची घटना समजताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, गाडी झोपडपट्टीत जाण्यासाठी जागाच मार्गच नसल्याने पाइपला पाइप जोडून पाणी मारून आग आटोक्यात आणण्यात आली. तत्पूर्वी स्थानिक नागरिकांनी नळाला पाइप लावून आणि घरातील पाणी टाकून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. नगरसेवक संजय भोसले, अविनाश साळवे, श्वेता चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन आगीत नुकसान झालेल्या घरातील कुटुंबीयांची भेट घेतली. घरांची दुरुस्ती होईपर्यंत नुकसान झालेल्या कुटुंबीयांची या भागातच असणाऱ्या ऊर्दू शाळेत राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सिल‌िंडरची चोरी

लक्ष्मीनगर पोलीस चौकीच्या मागील झोपडपट्टीत सिलिंडरचे स्फोट झाल्याचे समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घरातील सिलिंडर काढून सुरक्षितस्थळी ठेवण्यासाठी धावाधाव चालू होती. काही वेळाने आग आटोक्यात आल्यानंतर सिलिंडर परत आणण्यासाठी गेलेल्या अनेकांचे सिलेंडर जागेवरून गायब झाले होते. तर, शकुंतला यादव या महिलेचे दाराचे कुलूप तोडून सिलिंडर गायब झाल्याने त्यांनी पोलिस चौकीत धाव घेतली. पंचनाम्यात नावे नोंदविण्यासाठी नुकसान झालेल्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी लक्ष्मीनगर पोलिस चौकीत मोठी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारागृह शेतीतून कमावला नफा

$
0
0

संदीप भातकर, येरवडा

महाराष्ट्र कारागृह शेती विभागाने नुकत्याच पार पडलेल्या आर्थिक वर्षात साडेतीन कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. विविध कारागृहात शेती करताना एक कोटी ७३ लाखांचा खर्च झाला असून, त्यातून कैद्यांनी एक कोटी ७५ लाखांचा नफा कमविला आहे.

राज्यात एकूण ५४ कारागृहे आहेत. त्यातील सहा मध्यवर्ती, तेरा जिल्हा कारागृहे, दहा खुले कारागृहे असून, २९ कारागृहात शेतीचे उत्पादन घेतले जाते. सद्यस्थितीत कारागृह विभागाकडे ५८८.९१ हेक्टर शेती क्षेत्र आहे. त्यापैकी पिकाखाली ३२७.२३ हेक्टर, वनांमध्ये १८०.७७ हेक्टर आणि ८०.९१ क्षेत्र पडिक आहे. खुले कारागृहांतर्गत तुलना करता सर्वाधिक शेती उत्पन्न पैठण कारागृहाने ७८.०८ लाख रुपये, विसापूर कारागृहाने ५०.३६ लाख आणि नाशिक कारागृहाने ३६.६१ लाखांचे उत्पन्न कमावले आहे.

मध्यवर्ती कारागृहाच्या अंतर्गत सर्वाधिक शेती उत्पन्न नागपूर कारागृहाने मिळवले असून, १९.३६ लाख रुपये मिळाले आहेत. तर, येरवडा कारागृहाने १५.२१ आणि ठाणे कारागृहाने १३.४२ लाख उत्पन्न प्राप्त केले आहे. तर जिल्हा कारागृह अंतर्गत सर्वाधिक शेती उत्पन्न अकोला कारागृहाने ५.१० लाख, वर्धा कारागृहाने ४.८४ लाख आणि बुलडाणा कारागृहाने ३.७१ लाख उत्पन्न मिळविल्याची माहिती कारागृह मुख्यालयाचे विशेष महानिरीक्षक सी. एच. वाकडे यांनी दिली. महाराष्ट्रातील कारागृहातील शेती कैद्यांमार्फत केली जाते. चालू वर्षी ७७५ कैद्यांना शेतीतून रोजगार प्राप्त झाला आहे. कारागृह शेतीत प्राधान्याने पालेभाजी व फळभाजीचे उत्पादन घेण्यात येते, तर उर्वरित क्षेत्रावर भात, ज्वारी, गहू, सोयाबीन, तूर आणि इतर पिकांचे उत्पादन घेतले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॅली क्रॉसिंगचा जुन्नरमध्ये थरार

$
0
0


जुन्नर ः जुन्नरच्या रेंज अॅडव्हेंचरतर्फे आयोजित व्हॅली क्रॉसिंग उपक्रमात नवख्या ३५ गिर्यारोहकांनी सहभाग घेऊन थरारक अनुभव घेतला. जीवधन किल्ला आणि त्यापासून काही अंतरावर असलेल्या वानरलिंगी सुळक्यादरम्यान ‘व्हॅली क्रॉसिंग’ करण्यात आले. ऐन उन्हाळ्यातली उष्णतेच्या काहिलीने वातावरण तप्त असताना ३३० फुटांचे रॅपलिंग आणि २५० फुटांच्या ‘व्हॅली क्रॉसिंग’ करून गिर्यारोहकांनी वाहवा मिळवली. त्यामध्ये पुरुषांबरोबरच जुन्नर तालुक्यातील खोडद येथील पाच महिलाही सहभागी झाल्या होत्या. २०१४ मध्ये पुण्यातील २५ जणांनी या प्रकारचे ‘व्हॅली क्रॉसिंग’ पूर्ण केले होते. यंदा त्यात आणखी काही जणांची भर पडली, अशी माहिती संयोजक रमेश खरमाळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतीमालाला हवा दीडपट हमीभाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बारामती

‘आम्हाला एकदाच कर्जमाफी द्या आणि मग शेतकरी जो पिके काढेल त्याला उत्पादनाच्या दीडपट हमी भाव द्या,’ अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ‘आम्ही सरकारकडे शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्यासाठी प्रयत्न करतो आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य म्हणतात की, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यास देशातील कर्जवाटप व वसुलीच्या शिस्तीला मोठा धक्का बसेल आणि भविष्यात हा पायंडा पडून अर्थव्यवस्था अडचणीत येईल. हे म्हणणे चूक आहे,’ असेही अजित पवार म्हणाले.

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकत्यांचा मेळाव्यात पवार बोलत होते. या वेळी जालिंदर कामठे, मानसिंग पाचूरकर, वैशाली नागवडे, जितेंद्र इंगवले बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे आदी उपस्थित होते. ‘आजी, माजी, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कमीपणा होईल असे वर्तन करू नये, अन्यथा राष्ट्रवादी जर पदे देऊ शकते, तर राष्ट्रवादी पदे काढून घेऊ शकते,’ असे पवार म्हणाले.

‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करा. आम्ही पुन्हा कर्जमाफी मागणार नाही. मोठ्या उद्योगपतींचे साडेआठ लाख कोटींचे कर्ज सरकार माफ करते. मात्र, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल निर्णय घेण्यास सरकार वेळकाढूपणा करत आहे. आम्ही सरकारमध्ये असताना केंद्राकडे पाठपुरावा करत शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटींचे कर्ज माफ केले,’ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उलगडणार पुण्यातील भुयारी वाटा

$
0
0

Abhijit.Thite@timesgroup.com
Tweet : @abhijitMT

पुणे : देखण्या शिल्पांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या त्रिशुंड गणपती मंदिराच्या तळघरात साचणारे पाणी थांबविण्यासाठी सुरू झालेले काम पुढील महिनाभर सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यासाठी मंदिराच्या पुढे खड्डा खणण्यात आला असून, त्या निमित्ताने आतील भुयारी मार्गाचा पुढील भाग प्रथमच समोर आला आहे. अठराव्या शतकातील स्थापत्य शैलीच्या अभ्यासासाठी हे मंदिर महत्त्वाचे आहे आणि वास्तू संवर्धनाच्या कामामुळे आजपर्यंत न दिसलेला भागही समोर आला आहे.

मंदिराच्या तळघरातून नागझरीकडे जाणारा भुयारी मार्ग आहे. या निमित्ताने तोही खुला करून संशोधन करण्याची मागणी करण्यात येत आहे. सोमवार पेठेत असलेल्या त्रिशुंड गणपती मंदिराचे बांधकाम इ. स. १७५४ ते १७७० या दरम्यान झाले. तीन सोंडा असलेल्या गणेश मूर्तीमुळे हे मंदिर प्रसिद्ध आहे. मंदिरावर असणारी विविध प्रकारची शिल्प, आतील शिलालेख हे अभ्यासकांच्या औत्सुक्याचे विषय असतात. ऐतिहासिक नोंदीनुसार गोसावी भीमगिरजी यांनी हे मंदिर बांधले. मंदिराला मोठे तळघर असून, त्यामध्ये प्रशस्त मंडप आणि खोल्या आहेत. येथेच एका गुरूंची समाधीही आहे. दर गुरू पौर्णिमेला हे तळघर दर्शनासाठी खुले केले जाते. या तळघरामध्ये झऱ्याचे पाणी गोळा होतो. त्यामध्ये सांडपाण्याचीही भर पडते आहे. पाणी झिरपणे थांबविण्यासाठी हे काम सुरू करण्यात आले आहे.

‘या मंदिराच्या निमित्ताने पहिल्यांदाच एखाद्या ऐतिहासिक वास्तूच्या जमिनीखालील भागाची देखभाल-दुरुस्ती करण्यात येत आहे,’ असे महापालिकेच्या हेरिटेज विभागाचे प्रमुख श्याम ढवळे यांनी ‘मटा’ ला सांगितले. मंदिराच्या तिन्ही बाजूने बांधकामे असल्यामुळे समोरच्या भागातूनच काम करणे शक्य होत आहे. पाणी थांबविण्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना हा भाग दाखविण्यात येत आहे. येत्या आठवड्यात उपाययोजना ठरेल आणि पुढील महिनाभरात काम पूर्ण होईल,’ अशी माहिती त्यांनी दिली. तळघरातून दोन भुयारी वाटा जातात. उघडी झालेली बाजू समोरील आहे. ती काही अंतरावर पूर्वी असलेल्या विहिरीत उघडत होती, असे स्थानिक सांगतात. बंद खोलीतून जाणारी वाट नागझरीपर्यंत जात होती. मंदिरातील साधक या मार्गाचा वापर करून विहीर किंवा नागझरीकडे जात असत. खोदकामाच्या निमित्ताने या दोन्ही वाटा उघडल्यास अधिक संशोधन करणेही शक्य होणार आहे.

प्राचीन इतिहासाचा वारसा

आजच्या पुण्याखाली प्राचीन पुणे दडलेले आहे. बंडगार्डन पुलाच्या खालच्या बाजूला पूर्व पुराश्मयुगीन, तर वेताळ टेकडीवर मध्याश्मयुगीन मानवाची हत्यारे सापडली आहेत. जुने पुणे शहर हे प्राचीन अवशेषांच्या टेकाडांवरच वसलेले आहेत. अशा कामांच्या निमित्ताने अधिक खोलात गेल्यास, प्राचीन शहराचा अभ्यास करणेही शक्य होईल. पुढे शहराची जडणघडण आणि शहाराचा सांस्कृतिक इतिहास जाणून घेण्यासाठी ते उपयुक्त ठरेल.

अभ्यासकांसाठी उपयुक्त

कामाच्या निमित्ताने तळघराच्या समोरील भाग उघडा झाला आहे. तळघरातून हा भाग पाहता येत होता; परंतु पुढील बाजूने हा मार्ग कसा असेल, हे आता दिसते आहे. याचा अभ्यासकांना फायदा होईल. मंदिराच्या बांधकामाचे तंत्र आणि रचना समजून घेणे सुलभ होईल, असे मत पुरातत्वज्ञ डॉ. मंजिरी भालेराव यांनी व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रिळांचे योग्य जतन करणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात चित्रपटांच्या रिळ योग्य व्यवस्थेत व आवश्यक त्या तापमानात ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहेत. रिळांची योग्य काळजी घेतली जात असून यापुढेही रिळांची योग्य काळजी घेतली जाईल,’ असे आश्वासन संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी ‘मटा’शी बोलताना दिले.

‘राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील (एनएफएआय) चित्रपटांची दुर्मिळ रिळे वातानुकूलित वातावरणात ठेवणे आवश्यक असताना वाढत्या तापमानात ही रिळे पंख्याच्या हवेत ठेवण्यात आली आहेत,’ असे वृत्त ‘मटा’ने प्रसिद्ध केले होते. वॉल्ट्समध्ये पंखे लावण्यात आल्याचे मगदूम यांनी मान्य केले, मात्र केवळ पंख्याच्या आधारे रिळ जतन केले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संग्रहालयामध्ये १८ ते १९ हजार चित्रपटांची एकूण एक लाख ३२ हजार रिळे आहेत. अनेक चित्रपटप्रेमींकडून तसेच चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींकडून विविध चित्रपटांचा व चित्रपट विषयक साहित्याचा ठेवा संग्रहालयाला उपलब्ध होत असतो. ही संख्या दिवसेंदिवस वाढत असताना हे सर्व साहित्य ठेवायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रिळांच्या जतनासाठी १२ ते १४ अंश तापमानाची गरज असते; मात्र येथील तापमान २० अंशाच्या पुढे जात असल्याची माहिती समोर आली होती.

‘योग्य काळजी घेणार’

या पार्श्वभूमीवर मगदूम म्हणाले, ‘संग्रहालयातील वातानुकूलित यंत्रणा २५ वर्षांपूर्वीची होती. ती बदलण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या बदलाच्या प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत आहेत. चित्रपट जतनामध्ये केवळ रिळ नाही, तर वॉल्ट्सचे पण जतन आवश्यक आहे. प्रभात रस्त्यावरील संग्रहालयात तीन वॉल्ट्स असून ते कृष्णधवल रिळांसाठी आहेत. त्यातील एक वॉल्ट्स सध्या बंद आहे. रिळांसाठी आवश्यक तापमान २४ तास व्यवस्थित ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. वातानुकूलित यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. रिळांचे जतन करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. रिळ आमच्याकडे आणून दिल्या जातात, तेव्हा त्या कधी चांगल्या तर कधी खराब अवस्थेत असतात. काही रिळ अशा आहेत की हातात पकडल्या तरी तुटू शकतात. यादृष्टीने काळजी घेत आहोत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैफलीत उलगडले ‘गझल’रंग...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मनाचा ठाव घेणारी आणि जीवनाचे तत्त्वज्ञान मांडणारी गझल सुरांचा मागोवा घेते; तेव्हा शब्दसूरांचा अनोखा मिलाफ घडतो. शनिवारची रात्रही शब्द आणि सूरांनी रसिकांना मोहून टाकणारी ठरली. दत्तप्रसाद रानडे आणि अंजली मराठे यांच्या गोड गळ्यातून गझलांचे शब्द बाहेर पडले आणि वातावरणानेही सुरांची लय साधली.

निमित्त होते महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘सब रंग’ या कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक दत्तप्रसाद रानडे आणि अंजली मराठे यांनी गाजलेल्या गझल सादर करून रसिकांवर स्वरांची बरसात केली. दुसऱ्या बाजूला ज्येष्ठ हिंदी साहित्यिक आणि निवेदक डॉ. सुनील केशव देवधर यांनी गझल आणि तिच्या शब्दांची मैफल जागवली. अर्थपूर्ण शब्द आणि सूरांची जादुई सफर रसिकांना या वेळी अनुभवायला मिळाली.

‘चुपके चुपके रात दिन’, ‘हंगामा हे क्यू बरपा’, ‘रंजीश ही सही’ अशा गाजलेल्या गझल दत्तप्रसाद रानडे यांनी सादर केल्या. या गझलांच्या प्रत्येक शब्दाला रसिकांची भरभरून दाद मिळत होती. रानडे यांनी आळवलेला प्रत्येक सूर रसिकांना त्यांच्या प्रेमाची आठवण करून देत होता. अंजली मराठे यांनीही भावना धुंद मैफलीत आपल्या सुरांनी रंग भरले. ‘आज जाने की जिद ना करो’, ‘सलोना सा सजन हे और मे हू’, या गझल सादर करून त्यांनी रसिकांवर स्वरांची मोहिनी टाकली. उत्तरोत्तर रंगलेली ही मैफल रात्रभर सुरू रहावी, अशीच प्रत्येक रसिकाची भावना होती.

कार्यक्रमात डॉ. सुनील देवधर यांचा बहरदार आवाज आणि त्यातून बाहेर येणारी शब्दप्रतिभा रसिकांना अतंर्मुख करणारी होती. शब्द, सूर, ताल, लय, संगीत आणि रसिकांचा एकमेकांशी संवाद घडवणारा हा सोहळा होता. त्यात साथसंगत करणाऱ्या वाद्यवृंदांनीही रंग भरले. समीर शिवगार यांनी तबल्यावर छेडलेल्या तालाने रसिकांना ठेका धरायला लावला. निनाद सोलापूरकर यांनी सिंथेसायजर आणि संवादिनीवर सूरांचा अविष्कार घडवला. गिटारच्या तारा छेडून मिलिंद शेवरे यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. पूर्वा पेटकर, संजय रानडे आदी या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उलगडले ‘गीतों के बोल...’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चित्रपटसृष्टीतील जुन्या हिंदी गाण्यांचे भावनाप्रधान शब्द आणि त्यांचा मतितार्थ जाणून घेऊन रसिकांनी रविवारी संध्याकाळी शब्दांची मैफल जागवली. कविता, शायरी आणि गीतांचे अनमोल शब्द आणि त्यांचा आशय अंगावर झेलत ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.

निमित्त होते प्रसिद्ध लेखक व आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे माजी सहाय्यक संचालक डॉ. सुनील देवधर लिखित आणि बुकमार्क पब्लिकेशनतर्फे प्रकाशित ‘बडे अनमोल गीतों के बोल’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे. ज्योत्स्ना भोळे सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते देवधर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. हिंदी साहित्यिक डॉ. दामोदर खडसे, आमदार मेधा कुलकर्णी, बुकमार्कचे पराग पिंपळे, वर्षा पिंपळे आदी या वेळी उपस्थित होते. हा कार्यक्रम केव‍ळ पुस्तक प्रकाशनाचा नव्हता तर शब्दप्रभूंची जमलेली एक अनोखी मैफल होती. जुन्या गाण्यांचे अर्थ सांगत त्यातील शब्दांचा आशय स्पष्ट करत, एवढेच नाही तर ती गाणी गुणगुणत रसिकांवर शब्दांची बरसात झाली.

डॉ. देवधर यांनी जुन्या गाण्यातील शब्दांचे वर्णन करून त्याची सांगड रोजच्या जीवनाशी असल्याचे सांगितले. ‘जुन्या गाण्यांचे शब्द हे जगायला शिकवतात. त्याचे अर्थ थेट जीवनाशी संबंधित असतात. जुनी गाणी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगतात,’ असे त्यांनी सांगितले. गाण्यातील एखाद्या ओळीचे, शब्दाचे वर्णन करताना देवधर यांच्या तोंडून सहजरीत्या येणारा एखादा शेर या वेळी रसिकांच्या काळजाला भिडत होता. उर्दू, हिंदी आणि मराठीचे शब्दप्रभू असलेले देवधर शेरोशायरी आणि कवितांची उदाहरणे देत रसिकांच्या मनाशी निर्मळ संवाद साधत होते. रसिकही त्यांना वाह क्या बात हे.. अशी उस्फूर्त दाद देत होते. शब्दांच्या या देवाणघेवाणीत हा सोहळा रंगत गेला. आमदार मेधा कुलकर्णी यांनीही या शब्दमैफलीत रंग भरले. त्या म्हणाल्या, ‘सध्याच्या गाण्यांमध्ये आशयघन शब्द नाहीत. जुनी गाणी हाच एक अनमोल ठेवा आहे. तो ठेवा तरुण पिढीला कळायला हवा. त्यासाठी डॉ. देवधर यांच्यासारख्या मार्गदर्शकाची गरज आहे.’ कुलकर्णी यांनी या वेळी अनेक मराठी कविता आणि गाण्यांची समर्पक उदाहरणे देत रसिकांची वाहवा मिळवली.

डॉ. मोहन आगाशे म्हणाले, ‘छपाईचा शोध लागेपर्यंत शब्दांचा प्रवास सजीवतेकडून सजीवतेकडे होता. छपाई आल्यानंतर लेखन आणि वाचनाला सुरूवात झाली. त्यामुळेच आज शिक्षण लिखाण आणि वाचनापुरते मर्यादीत राहिले आहे. शब्द कधी आणि कसा वापरायचा याचे शिक्षण शाळांमधून द्यायला हवे.’ दिप्ती पेठे, राहुल श्रीवास्तव यांनी सूत्रसंचालन केले. राहुल श्रीवास्तव यांनी गाणी सादर करून कार्यक्रमात रंग भरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा मनमानी कारभार, पालकांची तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बेकायदेशीर शुल्कवाढ व शैक्षणिक साहित्यांची बंधनकारक खरेदी यावरून शहरातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा चर्चेत असतानाच कॅम्प परिसरातील द बिशप्स स्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा मनमानी कारभार करीत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. शाळा प्रशासनाने कोणतीही सूचना किंवा नोटीस न देता त्यांच्या मुख्याध्यापकांनाच राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यामुळे पालक संतप्त झाले असून, मुख्याध्यापकांचा राजीनामा रद्द करण्यासाठी त्यांनी मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. तर, बुधवारपासून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कॅम्प परिसरात द बिशप्स स्कूल नावाने इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेच्या उभारणीत मोलाचा वाटा असलेल्या व गेल्या अठरा वर्षांपासून शाळेत कार्यरत असलेल्या मुख्याध्यापकांना शाळा प्रशासनाने मात्र अचानक ३१ एप्रिलच्या आतमध्ये राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. मुख्याध्यापक हे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची काळजी घेणारे असून पालकांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर राहतात, असे पालकांनी सांगितले.त्यामुळे शाळेतील कर्मचार्‍यांबरोबर पालक संतप्त झाले असून, त्यांनी राजीनामा रद्द करण्याची मागणी केली आहे; तसेच जर त्यांचा राजीनामाच घ्यायचा असेल तर किमान तीन वर्षे इतर कुणाला तरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित करून मगच त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात ठिय्या आंदोलनासाठी जमलेले पालक म्हणाले, द बिशप्स स्कूल या संस्थेच्या कल्याणीनगर, उंड्री, कॅम्प या तीन शाखा आहेत. या तिन्ही शाखांची जबाबदारी कॅम्प शाखेच्या मुख्याध्यापकांवरच आहे. बिशप्स स्कूल संस्थेची नऊ सदस्यीय समिती आहे. याच समितीला मुख्याध्यापकांचा राजीनामा हवा आहे. त्यांनी मुख्याध्यापकांचा राजीनामा घेऊ नये यासाठी शिक्षक-पालक संघटनेच्या वतीने निवेदन देखील देण्यात आले. समितीने या निवेदनांकडे लक्ष न देता उलट पालकांनासोबत अरेरावी केली आहे व मुख्याध्यापकांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यामुळे शाळा प्रशासनाच्या या अरेरावीविरुद्ध पालक संतप्त झाले असून त्यांनी बुधवारपासून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. यासंदर्भात नऊ सदस्यीय समितीची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता शाळा प्रशासनाने बोलण्यास नकार दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धायरीतील इमारतीला दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
धायरीतील रायकरमळा येथील ‘लक्ष्मीवंदन’ या इमारतीवर बांधलेला अनधिकृत पाचवा मजला आणि दहा दुकाने पाडण्याचे आदेश पुणे महानगर प्रदेश क्षेत्रविकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) दिले आहेत. संबंधित बांधकाम एक आठवड्यात न पाडल्यास जमिनीचे मूळ मालक, विकसक आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार आहे.
या इमारतीमध्ये चार मजले बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अनधिकृतपणे पाचवा मजला आणि तळमजल्यावर दहा दुकाने बांधण्यात आली आहेत. याबाबत ‘पीएमआरडीए’कडे तक्रार करण्यात आली होती; तसेच राज्य सरकारच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवरही तक्रार देण्यात आली होती. त्याची चौकशी करून ‘पीएमआरडीए’ने संबंधितांना नोटिसा बजावल्या होत्या. ‘पीएमआरडीए’चे विशेष कार्य अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यानंतर चव्हाण यांनी सात एप्रिल रोजी संबंधित बांधकाम पाडण्याचे आदेश दिले.
ही जमीन मूळ मालकांनी विकसनासाठी कराराद्वारे दिली आहे. विकसकाने पाचव्या मजल्यावरील तीन फ्लॅट आणि तळमजल्यावरील तीन दुकाने ही मूळ मालकाला दिली आहेत. त्याचा वापर मूळ मालक करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे ‘पीएमआरडीए’कडून सांगण्यात आले.
सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधलेले फ्लॅट आणि दुकाने यांचे वाटप आणि वापराच्या व्यवस्थापनात सहभाग घेतला. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. संबंधित अनधिकृत बांधकामाचा वापर करणाऱ्यांनाही​ नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, ते सुनावणीला हजर राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर होणारी कारवाई त्यांना मान्य असल्याचा निष्कर्ष ‘पीएमआरडीए’ने काढला आहे.

शहानिशा करूनच फ्लॅट घ्या
नागरिकांनी फ्लॅट खरेदी करताना सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेण्यात आली आहे का, याची शहानिशा करावी. त्यानंतरच फ्लॅट खरेदी करावेत, असे आवाहन ‘पीएमआरडीए’ने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमपी कर्मचाऱ्यांना ‘ओव्हरटाइम’ नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिला जाणाऱ्या ‘ओव्हरटाइम’मुळे होणारा खर्च टाळण्यासाठी पीएमपी प्रशासनाने ओव्हरटाइम न देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांनी या पुढे ओव्हरटाइम न करता ठरलेल्या वेळेतच शिस्तबद्ध काम करावे, अशी सूचना पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी दिले. तसेच, पीएमपीच्या ताफ्यातील भाडेतत्त्वावरील बसची संख्या हळूहळू कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करा, अशी सूचनाही त्यांनी दिली.
विविध कारणांनी पीएमपीमध्ये ड्रायव्हर, कंडक्टरची कमतरता भासते. त्यामुळे ओव्हरटाइम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. ओव्हरटाइममुळे पीएमपीवर अतिरिक्त ताण पडतो. प्रत्येक कर्मचाऱ्याला नेमून दिलेल्या वेळेत त्याने शिस्तबद्ध काम केल्यास ओव्हरटाइम करण्याची वेळ येणार नाही, असे पीएमपी प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, ड्रायव्हर, कंडक्टर यांना दररोजचा मिळणारा वीस रुपये चहाभत्ता रोखीने देण्याऐवजी त्यांच्या मासिक वेतनात जमा करण्याचा निर्णयही मुंढे यांनी घेतला आहे.
पीएमपीमध्ये विशेष काम करणाऱ्या किंवा उत्पन्न वाढीसाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याची योजना या पूर्वीपासून राबविली जाते. या भत्त्याच्या स्वरूपातही बदल करण्यात येणार असून, अभ्यास करून लवकरच त्याचे स्वरूप ठरविण्यात येणार आहे.

बस बंद पडल्यास दंड
पीएमपीच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील ८०० बसचा समावेश आहे. या बसच्या ब्रेकडाउनचे प्रमाणही जास्त आहे. यावर उपाय म्हणून, भाडेतत्त्वावरील बस रस्त्यात बंड पडल्यास संबंधित बसला पाच हजार रुपये दंड आकारण्याचा आदेश तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. येत्या १६ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅम्युनिशन फॅक्टरीतून चंदनाच्या झाडांची चोरी

$
0
0

पुणे : भारतीय लष्कराला दारूगोळ्याची रसद पुरविणाऱ्या खडकी येथील अत्यंत महत्त्वाच्या अॅम्युनिशन फॅक्टरीलाच चंदनचोरीने ग्रासले आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांत येथून ६० हून अधिक झाडांची चोरी झाली आहे, तर काही झाडांची नुकतीच कत्तल करण्यात आली असून त्यांच्या फांद्या याच परिसरात तात्पुरत्या दडविण्यात आल्या आहेत. त्याबाबत फॅक्टरी प्रशासनाला माहिती देऊनही त्यांच्याकडून कार्यवाही होत नसल्याचे सूत्रांकडून समजते.
खडकी येथील मोठ्या जागेवर अॅम्युनिशन फॅक्टरी पसरलेली आहे. अॅम्युनिशन फॅक्टरीत विविध संरक्षण दलांसाठी व अन्य संस्थांसाठी लागणाऱ्या स्फोटकांची निर्मिती व चाचणी होते. त्यासाठी येथे ज्वालाग्रही वस्तूंचाही साठा असतो. त्यामुळे या परिसरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था असते. त्यामुळे येथे सहजासहजी प्रवेश करणे कोणालाही शक्य होत नाही. अशा परिस्थितीतही येथून चंदनाच्या झाडांची चोरी होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
प्रचंड मोठे आवार असलेल्या या फॅक्टरीच्या परिसरात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षराजीही आहे. यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बंगल्यांच्या आवारात आणि फॅक्टरीच्या मोकळ्या जागेत असलेली चंदनाची झाडे तस्करांच्या रडारवर आली आहेत. त्यांच्याकडून या भागातील चंदनाच्या झाडांची बेसुमार कत्तल केली जात आहे. यापूर्वीही सात-आठ वर्षांपूर्वी फॅक्टरीच्या याच परिसरातून चंदनाच्या झाडांची चोरी झाली होती.
‘गेले अनेक दिवस येथून चंदनाच्या झाडांची चोरी होत आहे. सकाळी कामावर आल्यानंतर ही झाडे बुंध्यापासून तोडल्याचे दिसून येते. कटरच्या साह्याने ही झाडे कापली जात आहेत. अनेकदा तर याच परिसरात चंदनाच्या कापलेल्या फांद्या टाकल्याचेही दिसून येते. काही वेळातच या फांद्या गायब केल्या जातात. यामागे मोठे अर्थकारण दडले असल्याची शक्यता आहे,’ असे फॅक्टरीतील विश्वसनीय सूत्रांनी स्पष्ट केले.
फॅक्टरीमधील काही व्यक्तींनी याबाबत फॅक्टरी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. तसेच फॅक्टरीच्या सुरक्षा यंत्रणांनाही त्याची कल्पना दिली आहे. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. साधी पोलिस तक्रारही करण्यात आलेली नाही, असेही सूत्रांनी नमूद केले.
दरम्यान, याबाबत फॅक्टरीच्या प्रशासन व जनसंपर्क विभागाचे सरव्यवस्थापक नंदकुमार नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.

चोरीत टोळक्यांचा सहभाग
अॅम्युनिशन फॅक्टरीत चंदनचोरीसाठी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर जमाव रात्री उशिरा आत शिरतो. त्यांच्याकडील कटरच्या साहाय्याने ते झाडे कापतात. त्या वेळी एक दोनच सुरक्षारक्षक या परिसरात असल्याने त्यांना या जमावाला थांबवणे शक्य होत नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला तलाठ्यास लाच घेताना पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सातबारा उताऱ्यावर वारस नाव नोंदणीसाठी चार हजार रुपयांची लाच घेताना सजा बोपोडीच्या महिला तलाठ्याला रंगेहात पकडण्यात आले. खडक येथील तलाठी कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
वैशाली अशोक कोळेकर (वय ३०, रा. बोपोडी, ता. हवेली) असे अटक केलेल्या तलाठ्याचे नाव आहे. तक्रारदार यांनी दापोडीतील जागेच्या सातबारा उताऱ्यावर वारस नावनोंदणीसाठी बोपोडी तलाठी कार्यालयाकडे अर्ज केला होता. तक्रारदार यांना नावनोंदणी करून देण्यासाठी कोळेकर हिने पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीमध्ये चार हजार रुपये लाच देण्याचे ठरले. त्यानुसार मंगळवारी खडक येथील तलाठी कार्यालयात चार हजारांची लाच घेताना कोळेकर हिला पकडण्यात आले. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांना दम देणाऱ्या नगरसेवकावर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
जंगली महाराज मंदिरासमोर ‘नो पार्किंग’मध्ये कार लावून मोबाइलवर गेम खेळत बसलेल्या कारचालकाला कार काढण्यास सांगण्यात आले. परंतु, त्याने कार न काढता पोलिसांशी हुज्जत घातल्याने वाहतूक पोलिसांनी कारला जॅमर लावला. त्यामुळे संतापलेले भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नगरसेवक अमोल बालवडकर यांनी वाहतूक पोलिस निरीक्षकाला फोन करून ‘तुम्हाला पाहून घेतो’ असे म्हणत दमबाजी केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिस निरीक्षक शंकर डामसे यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून नगरसेवक अमोल बालवडकर यांच्यासह चालक गणेश वसंत चौधरी (दोघे रा. बालेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगली महाराज मंदिरासमोर पोलिस निरीक्षक शंकर डामसे हे त्यांच्या सहकाऱ्यासह नो पार्किंग आणि नो-हॉल्टींगबाबत विशेष कारवाई करत होते. त्या वेळी जंगली महाराज मंदिरासमोर ‘नो पार्किंग’मध्ये कार लावून बालवडकर यांचा चालक चौधरी हा मोबाइलवर गेम खेळत होता. त्या वेळी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्याला कार काढण्यास सांगितली. परंतु, त्याने पोलिसांशी हुज्जत घालत गाडी काढण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी गाडीला जॅमर लावला. पुढील कारवाईसाठी ते निघून गेले.
बालवडकर यांनी वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक डामसे यांना फोन करून ‘तुम्ही गाडीवर कारवाई करू नका, कारवाई केली तर तुम्हाला बघून घेतो’ अशी दमबजी करत सरकारी कामात अडथळा आणला. तसेच चालक चौधरीला नाव विचारले असता, त्याने प्रशांत शंकर मोटे असे खोटे नाव सांगून पोलिसांची दिशाभूल केली. या प्रकरणी उपनिरीक्षक एस. बी. पाटील हे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मेट्रोसाठी कर्वे रोडवर भूसंपादन नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कर्वे रोडवर मेट्रोचे काम सुरू झाल्यावर अनेक अडचणी निर्माण होतील, ही भीती निराधार असून, मेट्रोसाठी कर्वे रोडवर एकाही खासगी जागेचे भूसंपादन करावे लागणार नाही, असा निर्वाळा ‘पुणे मेट्रो’च्या सल्लागार समितीचे सदस्य आणि मेट्रोचे माजी विशेष कार्याधिकारी शशिकांत लिमये यांनी मंगळवारी दिला. कर्वे रोडपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यावर देशात अनेक ठिकाणी मेट्रो यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या असून, काही दिवस नागरिकांनी संयम राखणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.

‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’तर्फे (महामेट्रो) आयोजित ‘मेट्रो संवाद’ कार्यक्रमात लिमये बोलत होते. ‘महामेट्रो’चे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रह्मण्यम आणि हैदराबाद मेट्रोचे माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक गाडगीळ या वेळी उपस्थित होते. या मेट्रो संवाद कार्यक्रमात सुब्रमण्यम यांनी मेट्रो प्रकल्पाविषयी सविस्तर सादरीकरण करताना, जिओ-टेक्निकल आणि टोपोग्राफी सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असल्याचे नमूद केले. पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स दरम्यानच्या मेट्रोचे प्रत्यक्ष काम पुढील महिन्यापासून सुरू होणार असल्याचे संकेत दिले.

वनाझ ते रामवाडी मेट्रो कर्वे रोडने जाणार असल्याने अनेक दुकाने आणि संस्था बाधित होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच, हे काम सुरू असताना, वाहतुकीची आणखी कोंडी होणार असल्याचा दावा केला जात आहे. हे आक्षेप खोडून काढताना, कर्वे रोडवरील मेट्रो संपूर्णतः रस्त्याच्या दुभाजकावरून जाणार असल्याने एकही खासगी जागा ताब्यात घेण्याची गरज नसल्याचे स्पष्टीकरण लिमये यांनी दिले. तसेच, कर्वे रोडवरील मेट्रोचे सर्व काम एकाच वेळी सुरू होणार नसून, टप्प्याटप्प्याने काम केले जाणार आहे. तरीही, काही भागांत अडचणी उद्भवल्या, तरी नागरिकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

‘उड्डाणपूलही मार्गी लावा’

कर्वे रोडवर मेट्रोचे काम करतानाच, अभिनव चौकातील (नळस्टॉप चौक) वाहतूक कोंडी कायमची दूर करण्यासाठी उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव आहे. या उड्डाणपुलासाठी निधी नसल्याचा दावा पालिकेतर्फे केला जात असून, मेट्रोच्या पिलरवर पहिल्या टप्प्यावर उड्डाणपूल, तर दुसऱ्या टप्प्यावर मेट्रो अशी रचना करता येऊ शकते. त्यासाठी, नागरिकांनी लोकप्रतिनिधींवर दबाव आणून हा उड्डाणपूल व्हावा, यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे, असे मत लिमये यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी पर्दाफाश; मग गुन्ह्याचा ‘पाश’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कथित ३२ जमीन घोटाळ्यांचा पर्दाफाश करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या तत्कालीन विरोधी पक्षनेते, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर पुण्यातच एका भूखंड घोटाळ्यात गुन्हा दाखल होण्याची नामुष्की ओढवली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राज्यात सत्तारूढ झाल्यानंतर एका वरिष्ठ सत्ताधारी नेत्याच्या विरोधात दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा ठरला आहे.

खडसे हे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी राज्यातील ९५ कथित जमीन घोटाळ्यांची यादी तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्याकडे दिली होती. राज्यपालांनी त्या वेळी ती यादी तत्कालीन मुख्य सचिवांकडे चौकशीसाठी पाठवली होती. मुख्य सचिवांनी त्या यादीनुसार संबंधित विभागांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यामध्ये पुण्यातील ३२ घोटाळ्यांच्या आरोपांचा समावेश होता. खडसेंनी कथित जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष्य करत राज्यात ​त्यांच्या विरोधात रान उ‍ठवले होते. तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनमत तयार करण्यात खडसेंच्या या आरोपांनी मोलाचा वाटा उचलला होता. सत्तेत आल्यानंतर महसूल मंत्री बनलेल्या खडसेंवर याच पुण्यात भूखंड घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून खडसेंसह त्यांचे कुटुंबीय त्यात आरोपी बनले आहेत. या आरोपींच्या चौकशीचे आदेश तत्कालीन पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी दिले होते.

राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये महसूलमंत्री झाल्यानंतरही खडसे यांनी पूर्वी आरोप केलेल्या या घोटाळ्यांच्या चौकशीचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या आरोपांवरून काही प्रकरणांमध्ये या सरकारमध्येही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होत्या. त्यानंतर खडसे यांच्या विरोधात भोसरी भूखंड प्रकरणात आरोप झाल्यानंतरही हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे खडसे यांचे म्हणणे होते. अखेर त्यांना या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर खडसे हे या प्रकरणांमधून सहीसलामत बाहेर येतील, असे प्रशस्तीपत्रक खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनीही दिले होते. मात्र, आता या प्रकरणात फडणवीस सरकारच्या काळातच गुन्हा दाखल झाल्याने खडसे हे अधिक गोत्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सर्वाधिक आरोप पुणे परिसरातील

रामोशी वतन जमीन, शहीद भगतसिंग स्मारक, कोथरूड येथील १४ कोटी रुपयांचा जमीन घोटाळा, पिंपरी-चिंचवड येथील लिंक रस्त्यालगतच्या लक्ष्मीनगर येथील गैरव्यवहार, येरवडा आणि लोहगाव येथील जमीन, धनकवडी चैतन्यनगर येथील ओपन स्पेसचा घोटाळा, एरंडवणे, पाषाण येथील मुकुंदभवन आदी घोटाळ्यांची यादी पोलिस ठाण्यांमध्ये त्या वेळी पाठवण्यात आली होती. खडसे यांनी केलेल्य आरोपांमधील सर्वाधिक आरोप पुणे व परिसराशी संबंधित होते. त्याच पुण्यात आता स्वतः खडसे यांच्यावरच गुन्हा दाखल होण्याची चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांना अर्थसंकल्पाचे वेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या निवडणुकीत नुकत्याच निवडून आलेल्या अनेक सभासदांना आता स्थायी समितीतर्फे तयार केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाचे वेध लागले आहेत. नवीन-नवीन निवडून आलेल्या तर बहुतेकांना एकाचवेळी प्रभागातील सगळी विकासकामे करण्याची इच्छा असून, पाणीपुरवठ्यापासून ते ड्रेनेजपर्यंत आणि विरंगुळा केंद्रापासून ते उद्यानापर्यंत सर्वच कामांसाठी पुरेशी तरतूद करण्याचा आग्रह धरला जात आहे.

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी गेल्या आठवड्यात २०१७-१८चा अर्थसंकल्पीय आराखडा स्थायी समितीला सादर केला. आयुक्तांचा आराखडाच पाच हजार सहाशे कोटी रुपयांचा असून, त्यामध्ये कोणत्याही नव्या योजनेचा अंतर्भाव नाही. त्याऐवजी, शहरासाठी महत्त्वाच्या आणि अपूर्ण योजनांच्या पूर्ततेवर भर देण्यात आला आहे. आयुक्तांच्या आराखड्यावर आता स्थायी समितीतर्फे चर्चा सुरू झाली असून, त्यामध्ये मात्र नगरसेवकांच्या विविध मागण्यांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी पहिल्यांदाच पालिकेत प्रवेश केला. त्यानंतर, आता चालू वर्षासाठी अर्थसंकल्प केला जात असल्याने नागरिकांनी दिलेल्या विविध आश्वासने पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे.

महापालिकेत आत्तापर्यंत भारतीय जनता पक्ष कायमच विरोधी पक्ष राहिला होता. त्यामुळे, सत्ताधाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या बजेटवर अनेक सदस्यांना समाधान मानावे लागायचे. काही महत्त्वाचे पदाधिकारी किंवा ज्येष्ठ नगरसेवक आपल्या प्रभागात जादा निधी वळवून घेण्यात यशस्वी होत असले, तरी प्रभागातील विकास कामे पूर्णत्वास नेण्यासाठी पुरेसा निधी मिळेलच, याची शाश्वती नसायची. आता चित्र बदलले असून, भाजपला प्रथमच महापालिकेतील सत्ता मिळाली आहे. १६२ सदस्यांपैकी तब्बल ९३ सदस्य भाजपचे असून, पाच सदस्य भाजपचा मित्रपक्ष असलेल्या आरपीआयचे आहेत. या सर्व ९८ नगरसेवकांना प्रभागातील विविध विकास कामांसाठी चांगला निधी मिळेल, अशी आशा आहे.

शहरातील ४१ प्रभागांपैकी १५ ते १६ प्रभागांमध्ये सर्वच्या सर्व सदस्य भाजपचे आहेत. त्यामुळे, अशा प्रभागांना स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात काहीसे झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. या प्रभागातील नागरिकांच्या समस्या, तेथे आवश्यक असलेली विकासकामे, पक्षाने प्रभागनिहाय जाहीरनामा करताना दिलेली आश्वासने, या सर्वांचा आढावा घेऊन पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य, भवन, रस्ते-फूटपाथ अशा विविध कामांसाठी निधी मिळावा, अशी मागणी बहुतेक सदस्यांकडून केली जात आहे. भाजपने सर्वच नगरसेवकांकडून कोणत्या विकासकामांना प्राधान्य हवे, याबद्दल माहिती मागवली असून, त्यानुसार संबंधित प्रभागासाठी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. बहुतेक नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील मागण्यांची सविस्तर यादीच पक्षाला सादर केली आहे. यापैकी, कदाचित सर्व मागण्यांचा समावेश पहिल्याच अर्थसंकल्पात होण्याची शक्यता नसली, तरी आवश्यक कामांना प्राधान्य मिळेल, असे संकेत दिले जात आहेत.

शहराच्या काही भागांत गेल्या वर्षीच काही विकासकामांची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. ही कामे अपूर्ण असल्याने अशा कामांसाठी पालिका आयुक्तांनी भरभक्कम तरतूद केली आहे. ही तरतूद स्थायी समितीकडून कायम राखली जाणार, की स्थानिक नगरसेवकांच्या आग्रहानुसार नव्या विकासकामांसाठी वेगळ्या निधीची तरतूद होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीपूर्वी रस्ते डांबरीकरण, त्यांचे काँक्रिटीकरण, आपापल्या भागांतील जुन्या जलवाहिन्या बदलून तेथे नव्या वाहिन्या टाकणे, ड्रेनेज लाइन बदलणे, प्रभागात उद्यान विकसित करणे, लहान मुलांसाठी क्रीडांगण, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र उभारणे, यासारख्या अनेक विकासकामांचे उद्घाटन झाले आहे. तर, काही माजी नगरसेवकांनी आपण पुन्हा निवडून येऊ, ही खात्री बाळगत काही विकासकामांचे भूमिपूजन केले होते. आता, संबंधित भागांत जुन्या पक्षाऐवजी नवे नगरसेवक निवडून आल्याने यापूर्वी केलेल्या एखादे विकासकाम केवळ भूमिपूजनापुरतेच राहणार का, अशी विचारणा केली जात आहे. काही माजी नगरसेवकांनी जुन्या पक्षाला राम-राम करून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना, पुन्हा प्रभागातील अपूर्ण कामांसाठी जादा निधी देण्याची शिफारस स्थायी समितीला करता येऊ शकणार आहे.

निवडून आल्यानंतर पहिल्याच वर्षी प्रभागासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा प्रयत्न सर्वांकडून सुरू असून, सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षातील नगरसेवकांनाही आपापल्या प्रभागातील कामे पूर्ण करायची आहेत. त्यामुळे, ठराविक कामांसाठी आवश्यक निधी मिळावा, याकरिता अनेक नगरसेवकांनी गेल्या काही दिवसांत स्थायी समितीच्या अध्यक्षांची भेट घेतली आहे. आता सर्व लक्ष स्थायी समितीकडून सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागले असून, पुढील आठवड्याच्या अखेरीपर्यंत तो सर्वसाधारण सभेला सादर केला जाण्याची शक्यता आहे.

पालिकेचा अर्थसंकल्प

६ हजार कोटींच्या पुढे जाणार?

महापालिका आयुक्तांनी सुचविलेल्या अर्थसंकल्पीय आराखड्यात साधारणतः स्थायी समितीकडून नेहमीच चारशे ते पाचशे कोटी रुपयांची वाढ केली जाते. गेल्या वर्षी आयुक्तांनी ५ हजार १९९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केल्यावर तत्कालीन स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांनी तब्बल ५ हजार ७४८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यंदा आयुक्तांनी ५ हजार सहाशे कोटी रुपयांचा आराखडा सादर केला असल्याने स्थायी समितीचा अर्थसंकल्प सहा हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखापरीक्षणाबाबत वेळकाढूपणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लेखापरीक्षण अहवालातील आक्षेपाधीन रक्कम वसुलीबाबत आणि रेकॉर्ड उपलब्ध न झाल्याबाबत प्रशासन चालढकल करीत असून, वेळकाढूपणाची भूमिका घेत असल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणी पुन्हा एकदा जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी दिला आहे.

महापालिकेच्या लेखापरीक्षणाबाबत सन २०००मध्ये जनहित याचिका दाखल झाली होती. त्यावरील सुनावणीवेळी पिंपरी-चिंचवड महापालिका बरखास्त का करू नये, असे कडक ताशेरे हायकोर्टाने ओढले होते. त्यावर प्रलंबित लेखापरीक्षण आणि जनहित याचिकेतील मुद्द्यांचे लेखापरीक्षण करण्याची हमी राज्य सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे हायकोर्टाला दिली होती. त्यानुसार एकाच वर्षांत १८ वर्षांचे लेखापरीक्षण करण्यात आले होते. लेखापरीक्षणातील प्रलंबित आक्षेप, प्रलंबित आक्षेपाधीन रक्कम, प्रलंबित वसुलपात्र रक्कम आणि रेकॉर्ड तपासणीकामी उपलब्ध न झालेली रक्कम याबाबत पालिकेने योग्य कारवाई भूमिका काय आहे, अशी विचारणा हायकोर्टाने महापालिकेकडे वेळोवेळी केली होती. परंतु, कार्यवाहीबाबत प्रशासन उदासीन भूमिका स्वीकारत असल्याचा आरोप भापकर यांनी केला आहे.

महापालिकेच्या १९८२-८३ ते २०१४-१५ या आर्थिक वर्षांतील अंतर्गत लेखापरीक्षणातील एकूण प्रलंबित आक्षेपांची संख्या ३३ हजार ७७७ आहे. याशिवाय, प्रलंबित आक्षेपाधीन रक्कम २५३.१० कोटी रुपये आहे. प्रलंबित रेकॉर्ड तपासणीसाठी उपलब्ध न झालेली रक्कम १४५६.३० कोटी आहे. लेखापरीक्षण आणि विशेष लेखापरीक्षणातील १७८७.५४ कोटी रुपये वादाच्या भोवऱ्यात आहे. महापालिकेत सत्तांतर होण्यापूर्वी प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांनीही पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

महापालिकेने २०१४-१५ पर्यंत लेखापरीक्षण करून स्थायी समितीसमोर ठेवले आहे. २०१५-१६ च्या वर्षातील लेखापरीक्षणाचे कामकाज सुरू आहे. वास्तविक, नियमानुसार प्रत्येक सरकारी वर्ष सुरू झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर महापालिकेच्या मुख्य लेखा परीक्षकाने मागील सरकारी वर्षाच्या संपूर्ण लेख्यावरील अहवाल स्थायी समितीला सादर करणे आवश्यक आहे. परंतु, स्थायी समिती, प्रशासन आणि आयुक्त यांच्याकडून जबाबदारीचे पालन होत नसल्याची बाबही निदर्शनास येत असल्याचे भापकर यांनी म्हटले आहे.

लेखापरीक्षणाबाबत दोषींवर योग्य कारवाई व्हावी, अशी मागणी गेल्या १६ वर्षांपासून करण्यात येत आहे. परंतु, संबंधित विभागांना आणि अधिकाऱ्यांना आक्षेपाधीन रक्कमांबाबत नोटीसा काढणे, वेतनवाढ रोखणे या प्रकारच्या किरकोळ कारवाई केल्या जात आहेत. त्या माध्यमातून प्रशासन वेळकाढूपणाची भूमिका घेत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. आक्षेप निरस्त करण्यासाठी मुदतवाढ देण्याचे असंख्य प्रकार घडले आहेत. लेखापरीक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोयीसुविधा आणि वेतनभत्त्यापोटी वार्षिक सुमारे दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली जाते. परंतु, वर्षानुवर्षे कुठलीच कारवाई होत नसेल, तर प्रक्रियेवर होणारा खर्च निरर्थक म्हणता येईल. ठोस कारवाई न झाल्यामुळे आयुक्त, प्रशासन आणि स्थायी समिती गैरकारभाराला पाठीशी घालत असल्याची शंका भापकर यांनी उपस्थित केली आहे.

लेखापरीक्षण आक्षेपांबाबत गोषवारा

एकूण आक्षेप संख्या - १ लाख १६ हजार ८७६

प्रलंबित आक्षेप संख्या - ३३ हजार ७७७

एकूण आक्षेपाधीन रक्कम - ३६५.२२ कोटी रुपये

प्रलंबित आक्षेपाधीन रक्कम - २५३.१० कोटी रुपये

एकूण वसूलपात्र रक्कम - १०३.०३ कोटी रुपये

प्रलंबित वसूलपात्र रक्कम - ५५.८१ कोटी रुपये

रेकॉर्ड उपलब्ध न झालेली रक्कम - १४५६.३० कोटी रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसाचे पिस्तुल हिसकविण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारती विद्यापीठ हॉस्पिटलजवळील गल्लीत रात्री उशिरा फिरणाऱ्या तरुण-तरुणीला हटकल्यामुळे त्यांनी महिला पोलिस उपनिरीक्षकाचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना अडविण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. गोंधळ घालणाऱ्या या तरुण-तरुणीला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे.

फरहा शेख (वय २१), शौर्य संजीव हंडरियाल (वय २३) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक स्नेहल संभाजी थोरात यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक थोरात या सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत इतर कर्मचाऱ्यांसह सोमवरी रात्री गस्त घालत होत्या. त्या वेळी फरहा शेख व शौर्य हंडरियाल हे दोघे रात्री एकच्या सुमारास भारती विद्यापीठ हॉस्पिटलशेजारी चैतन्यनगर गल्लीमध्ये फिरत होते. त्या वेळी थोरात यांनी त्यांना हटकले आणि त्यांना निघून जाण्यास सांगितले. त्यामुळे शेख व तिचा मित्र शौर्य यांनी त्यांना शिवीगाळ सुरू केली. पोलिसांना दमदाटीही केली. त्यानंतर फरहा शेख ही थोरात यांच्या अंगावर धावून गेली. तसेच, तिने थोरात यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तिला थोरात यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने त्यांनाही मारहाण केली. तर, बीट मार्शल कर्मचाऱ्याला हंडरियाल याने मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सहायक निरीक्षक विनायक कोळी हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images