Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गानसरस्वती महोत्सव १७ फेब्रुवारीपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शास्त्रीय संगीताची अनुभूती देणारा नाट्यसंपदा प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘गानसरस्वती महोत्सव’ यंदा १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी आयोजित या महोत्सवात यंदा किशोरीताईंसह तबला नवाज उस्ताद झाकीर हुसेन यांचे सादरीकरण आकर्षण ठरणार आहे.

‘राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे दुपारी ४ ते रात्री दहा या वेळेत महोत्सव होणार आहे. गायन, वादन, नृत्य अशी शास्त्रीय संगीताची अनुभूती रसिकांना या महोत्सवात घेता येणार आहे. ‘गानसरस्वती किशोरी आमोणकर पुरस्कार’ हा सुप्रसिद्ध मृदंग वादक उमयालपुरम शिवरामन यांना व ‘गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार’ ज्येष्ठ गायिका विदुषी गिरीजा देवी यांना प्रदान करण्यात येणार आहे,’ असे नाट्यसंपदाचे विश्वस्त रघुनंदन पणशीकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

महोत्सवाची सुरुवात १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता प्रसिद्ध त्रिचूर बंधू यांच्या कर्नाटक शैलीतील गायनाने होणार आहे. त्यानंतर गायिका स्वर्णिमा गुसैन कला सादर करतील. तसेच धृपद गायकीसाठी प्रसिद्ध असलेल्या गुंदेचा बंधू यांचे गायन होईल. पहिल्या दिवसाचा समारोप ख्यातनाम तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या वादनाने होणार आहे.

शनिवारी सुप्रसिद्ध सतारवादक शाकीर खान आपली कला रसिकांसमोर पेश करतील. त्यानंतर पं. शौनक अभिषेकी यांचे गायन होईल. प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्य कलाकार विदुषी शोभना यांचा नृत्याविष्कार पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. दुसऱ्या दिवसाची सांगता डॉ. एन. राजम यांच्या व्हायोलिन वादनाने होईल.

महोत्सवाचे तिसरे सत्र रविवारी सकाळी ९ वाजता असून, या सत्रात किशोरीताईंचा अलौकिक स्वर कानात साठवून घेण्याची अभूतपूर्व संधी रसिकांना साधता येईल. अंतिम सत्राची सुरुवात दुपारी ४ वाजता प्रसिद्ध बासरीवादक पं. प्रवीण गोडखिंडी यांच्या बासरीवादनाने होईल. त्यानंतर पं. रघुनंदन पणशीकर यांचे गायन होईल. महोत्सवाची सांगता ख्यातनाम गायिका विदुषी गिरीजा देवी यांच्या गायनाने होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पवना धरण परिसरात महिलेचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी लोणावळा

पवना धरण परिसरातील आंबेगावच्या हद्दीतील लोहगड बोटिंग क्लबजवळ एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. या महिलेचा भोसकून खून करण्यात आला असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप येडे पाटील यांनी दिली.

दोन दिवसांपूर्वी हा मृतदेह पवनानगर लोणावळा मार्गावरील आंबेगावच्या हद्दीत असणाऱ्या लोहगड बोटिंग क्लबजवळ कुजलेल्या अवस्थेत लोणावळा ग्रामीण पोलिसांना आढळला होता. याचा अधिक तपास केला असता, सदर महिलेचा भोसकून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. महिलेच्या अंगावर निळ्या रंगाची जीन्स आहे. सदर महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह रस्त्य‍ाच्या कडेला ठाकून देण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. लोणावळा ग्रामीण पोलिस सदर महिलेची ओळख पटविण्यासोबत खुनाचा तपास करीत आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप सत्तेत आल्यास गुंडांची महापालिका!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

भाजपचे नाही तर गुंडांचे मुख्यमंत्री अशी टीका युती सरकारमधील मित्रपक्ष शिवसेनाच करीत आहे, त्यामुळे हे जर सत्तेत आले तर गुंडाची महापालिका होईल अशी टीका अजित पवार यांनी पिंपरीत केली. राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणारे माजी आमदार अण्णा बनसोडे आणि महिला शहराध्यक्षा सुजाता पालांडे यांची सभेला अनुपस्थिती होती.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या प्रचाराचा प्रारंभ गुरुवारी (२ फेब्रुवारी) अजित पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पिंपरी येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. हिंजवडीतील इंजिनिअर मुलीचा यांच्या कारभारामुळे बळी गेला असल्याची टिका देखील त्यांनी यावेळी केली. आम्ही शहराचा विकास केला आहे. शहरातील जनता विकासाच्या बाजूनेच कौल देईल. शहराचा अधिक विकास करण्याचा विश्वास मी जनतेला देतो. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे आणि आझम पानसरे हे त्रिकुट सत्तेसाठी एकत्र आले असल्याची टीका पवार यांनी केली. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रसने सर्व जाती-धर्मांच्या कार्यकर्त्यांना पदे दिली आहेत.

भाजपने सत्ता आल्यावर १०० दिवसात शहरातील अधिकृत बांधकामाचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सुटल्याचे शहरातील जनतेला सांगत साखर वाटली, शहरात फलकबाजी करत ढोल पिटले. माणसे इकडची तिकडे गेली पण प्रश्न जैसे थेच आहेत. आत्ता अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे आश्वासन देणारे कुठे गेले आहेत. पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालाट झाला आहे. पिंपरीपेक्षा काकणभर जास्त विकास झालेले शहर दाखवा. विरोधकांना शहरातील विकास दिसत नसेल तर त्यांनी डोळे तपासावेत, त्यांच्या डोळ्यात मुसळ गेले आहे का? कोणत्याही पदाधिकाऱ्याला चुकीचे काम करायला सांगितले असेल तर मी राजकारण सोडून देईन. राज्य सरकारमधील मंत्री एकनाथ खडसे यांना भ्रष्टाचारामुळे राजीनामा द्यावा लागला. मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आहेत. भाजपमध्ये जाणारे सोयीचे राजकाण करत आहेत. माझ्याकडे तिकीट मागताना बारामती आठवली नव्हती का? असा प्रश्न उपस्थित करत अजित पवार म्हणाले गरिबांच्या तोंडाचा घास हिसकावून घेणारे भाजपवाले शहराचा काय विकास करणार आहेत. निष्ठा न ठेवणारी गद्दार माणसे शहराचा विकास करू शकणार नाहीत. तसेच पिंपरीत एच. ए. कंपनीतील कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम शरद पवार यांनी केले, असल्याचेही पवार म्हणाले. भाजप म्हणजे ओठावर राम आणि पोटात नथूराम अशी काहीशी स्थिती आहे, अशी तोफही त्यांनी डागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महत्त्वांच्या प्रश्नांकडे भाजपची डोळेझाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

नोटाबंदी, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शास्तीकर, अनधिकृत बांधकामे आदी महत्त्वांच्या प्रश्नांबाबत भारतीय जनता पक्षाकडून धूळफेकच होत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केला. ‘कौरव-पांडव, दुर्योधन-शकुनी या महाभारताच्या गोष्टी सांगून राज्याचा विकास होणार का,’ असा सवालही पवार यांनी केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ पवार यांच्या उपस्थितीत झाला. त्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांनी भाजप-सेनेच्या युती सरकारवर पुन्हा एकदा टीका केली. महापौर शकुंतला धराडे, पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी आमदार विलास लांडे, पक्षनेत्या मंगला कदम, माजी महापौर योगेश बहल या वेळी उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी यादी जाहीर होईल, असे स्पष्ट करून पवार म्हणाले, ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील आघाडीच्या चर्चेमुळे उमेदवारी यादीस विलंब होत आहे. पुण्यात १६१ पैकी सुमारे शंभर जागांवर आघाडीची शक्यता असून, उर्वरित जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्येही आघाडीची शक्यता आहे. त्याबाबतचा फॉर्म्युला अंतिम क्षणी जाहीर केला जाईल.’

नोटाबंदी, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शून्य टक्के दराने पीककर्ज, अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, रेडझोन या प्रलंबित प्रश्नांबाबत जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार राज्यातील युती सरकारने केला आहे, असा आरोप करून पवार म्हणाले, ‘राज्यात सुमारे चार हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्याचे गांभीर्य ओळखून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा. त्यांनी शून्य टक्के दराने पीककर्ज द्या, अशी प्रमुख मागणी आम्ही केली होती. त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका येताच त्या ठिकाणी कर्जमाफी, पीककर्जाबाबत घोषणा करायचे केंद्र सरकार विसरले नाही. निवडणुका आल्या की घोषणा करायच्या. स्वप्ने दाखवायची आणि नंतर त्याच स्वप्नांचा चुराडा करायचा, हे सरकारचे धोरण योग्य नाही.’

राज्य सरकारला मध्यावधी निवडणुकांना सामोरे जावे लागेल काय? यावर ते म्हणाले, ‘मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालावर बरेच काही अवलंबून आहे. सुमारे ४० हजार कोटी रुपयांचे बजेट असलेली या महापालिकेची तिजोरी ताब्यात ठेवण्यासाठी सेना-भाजपमध्ये स्पर्धा चालू आहे. त्यामुळे त्यांच्यात दुरावा वाढत आहे. त्याचा एक दिवस स्फोट होण्याची शक्यतादेखील आहे. त्यामुळे निकालानंतर काय ते स्पष्ट होण्यास मदत होईल.’

कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा

राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला तरी राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याच्या आरोपाचा अजित पवार यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले, ‘गेल्या सव्वा दोन वर्षांत अनेक ठिकाणी महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. हिंजवडी येथेही नुकतीच दुर्दैवी घटना घडली. राज्यात हकनाक बळी जात आहेत. हे सरकारचे अपयशच म्हणावे लागेल. वास्तविक, घडलेल्या ठिकाणच्या पोलिस अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीतील याद्या गुलदस्त्यातच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक राहिला तरीही एकाही पक्षाने त्यांच्याकडील उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. सर्व याद्या गुलदस्त्यात असून, इच्छुकांच्या जीवाची घालमेल थांबलेली नाही. आता सर्वच उमेदवारांची नावे ‘एबी’ फॉर्मच्या माध्यमातूनच जाहीर होणार आहेत.

उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी शुक्रवारी (तीन फेब्रुवारी) दुपारी तीनपर्यंत मुदत आहे. परंतु, अद्याप एकाही पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला आहे. मात्र, अनेकांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे त्यांनी शक्तिप्रदर्शन करून पदयात्रेच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज सादर केले. पक्षातर्फे अधिकृत उमेदवारांची नावे अंतिम क्षणी ‘एबी’ फॉर्मच्या माध्यमातून थेट महापालिका आयुक्तांना सादर केली जातील, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे उमेदवारी मिळविण्याची धावपळ अखेरच्या क्षणापर्यंत करावी लागणार असल्याचे दिसून येते.

सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसचे गेल्या निवडणुकीतील संख्याबळ ९२ वरून ७५ वर घसरले आहे. तर, काँग्रेसचे संख्याबळ १४ वरून केवळ दोनवर आले आहे. तुलनेने भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ तीन वरून २५ पेक्षा अधिक झाले आहे. तर, शिवसेना १४ जागांवर स्थिर आहे. अनेक ठिकाणी विद्यमान नगरसेवक एकमेकांसमोर उभे राहण्याची शक्यता असल्यामुळे इच्छुकांच्या कोलांटउड्यांना उधाण आले आहे. त्यामुळेच सक्षम परंतु, एखाद्या पक्षाची उमेदवारी न मिळाल्यास त्यांना खेचण्याचे प्रयत्न प्रमुख पक्षांकडून होताना दिसत आहेत. काही ठिकाणी वादाचे मुद्दे उपस्थित झाल्यामुळेही यादीला विलंब होत आहे. सर्वोतोपरी प्रयत्न करूनही अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारी न मिळाल्यास अनेकांनी बंडांचे निशाण हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अखेरच्या दिवशी उमेदवार अर्ज सादर करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

पक्षाच्या नावे अर्ज सादर केलेले उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे - राष्ट्रवादी काँग्रेस - किरण तुळसे (२७ अ), बाळासाहेब भागवत (२७ अ), विनोद नढे (२२ अ), विमल काळे (२२ क), कोमल धोदाडे (४ क), सीमा फुगे (७ ब), कैलास कुंजीर (२८ अ), अनिता काटे (२८ ब, २८ क), शीतल काटे (२८ क), विठ्ठल ऊर्फ नाना काटे (२८ ड), आलीशा चाबुकस्वार (२१ अ), राजानंद यळमले (११ क), सुनंदा कांबळे (११ अ), विक्रांत लांडे (८ क, ८ ड).

भारतीय जनता पक्ष - उषा शिंदे (९ अ), आशा काळे (९ क), अंबरनाथ कांबळे (३१ अ), प्रियांका बारसे (५ क), मधुकर बच्चे (१८ ड), शोभा भराडे (१९ क), दिलीप कुदळे (२१ ब), शैला मोळक (३ क), नीलेश काळजे (३ ड), राजेंद्र लांडगे (६ ड), मडिगेरी विलास (८ क).

शिवसेना - कुणाल जगनाडे (९ ब), मंगला भोकरे (३२ ब), सीमा फुगे (७ ब), तुतारे अनिता (२८ ब), अजित पोपट पवार (२५ क).

मनसे - स्वाती दानवले (१५ ब), राजू भालेराव (२१ ड).


बंडखोरी अटळ !

सर्वच प्रमुख पक्षांना बंडखोरीची लागण होण्याची भीती आहे. निवडून येण्याची क्षमतेच्या एकमेव निकषावर उमेदवारी देण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे नाराज कार्यकर्ते बंडखोरी करणार असल्याची बाब अटळ आहे. त्यामुळेच उमेदवारांच्या याद्या जाहीर होण्यास विलंब होत आहे. बंडखोरी टाळण्यात यशस्वी होणाऱ्या पक्षांसाठी ही निवडणूक काहीशी सुलभ जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर आरक्षणाचा आज निर्णय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या आगामी निवडणुकीनंतर शहराचे महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असेल, याचा निर्णय आज, शुक्रवारी होणार आहे. महापालिकेच्या निवडणुका २१ फेब्रुवारीला होणार आहेत. विविध पक्षांकडून इच्छुक असलेल्या सर्वांचे लक्ष सध्या या सोडतीकडे लागले असून, आपल्याला संधी आहे का याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. पहिल्या अडीच वर्षांसाठी हे पद कोणत्या गटासाठी राखीव होणार, याची उत्सुकता शुक्रवारी संपणार आहे.
विद्यमान महापौरपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित होते. त्यात, अडीच वर्षांच्या कालावधीत सव्वा-सव्वा वर्ष संधी देण्याचे राष्ट्रवादीने सुरुवातीपासून ठरविल्याने दत्ता धनकवडे आणि त्यानंतर महापौर प्रशांत जगताप यांना संधी मिळाली. तत्पूर्वी, सुरुवातीची अडीच वर्षे ओबीसी (महिला) गटासाठी महापौरपद आरक्षित होते. या वेळी वैशाली बनकर आणि चंचला कोद्रे यांना महापौरपद भूषविता आले. २००७ ते २०१२ या पाच वर्षांच्या कालावधीत सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण (पुरुष) या गटांसाठी महापौरपद राखीव होते. त्या वेळी राजलक्ष्मी भोसले आणि मोहनसिंग राजपाल यांनी संधी देण्यात आली होती. त्यामुळे, आता महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होणार, याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयातांना ‘कमळा’चे चिन्ह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांतून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या बहुतेक सर्व विद्यमान नगरसेवक आणि माजी नगरसेवकांना ‘कमळा’च्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे. भाजपच्या काही विद्यमान नगरसेवकांना मात्र सक्तीची ‘विश्रांती’ देण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकांची चाहूल लागल्यापासून भाजपमधील इच्छुकांची संख्या दिवसागणिक वाढत गेली. कसबा, कोथरूड आणि पर्वती-शिवाजीनगरचा काही भाग वगळता शहराच्या उर्वरित विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद कमी असल्याने इतर पक्षांतून अनेक उमेदवार आयात करण्यात आले. त्यात काही विद्यमान नगरसेवकांना प्रवेश देण्यात आला, तर काही ठिकाणी विविध पक्षांतील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनाही भाजपमध्ये स्थान देण्यात आले. मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या ‘इनकमिंग’मुळे पक्षातही नाराजी पसरली होती. पक्षात प्रवेश दिलेल्या प्रत्येकालाच तिकीट मिळेलच, असे नाही अशी सारवासारव पक्ष नेतृत्वाने केली होती. परंतु, गुरुवारी जाहीर केलेल्या विविध उमेदवारांवरून पक्षात स्थान दिलेल्या सर्वांनाच संधी देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बापूराव कर्णे गुरुजी, अनिल (बॉबी) टिंगरे, दिनेश धाडवे, मोहिनी देवकर यांनी, तर काँग्रेसच्या शीतल सावंत, सुनंदा गडाळे, सुनीता गलांडे, अभिजित कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मनसेमधून, राजा बराटे, प्रकाश ढोरे, राजाभाऊ लायगुडे हे नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले होते. यापैकी सुनंदा गडाळे वगळता सर्वांना उमेदवारी मिळाली आहे. धाडवे यांच्याऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान नगरसेवकांसह माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, माजी नगरसेवक शंकर पवार, किरण बारटक्के यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.
....
चार नगरसेवकांचा पत्ता कट
इतर पक्षांतून प्रवेश केलेल्या इच्छुकांना उमेदवारी दिली जात असताना, कसबा विधानसभा मतदारसंघातील चार विद्यमान नगरसेवकांना भाजपने घरचा रस्ता दाखवला आहे. अशोक येनपुरे, प्रतिभा ढमाले, दिलीप काळोखे आणि धनंजय जाधव या कसब्यातील चार नगरसेवकांच्या उमेदवारीला कात्री लावण्यात आली आहे. विष्णू हरिहर यांच्या ऐवजी त्यांच्या घरात तिकीट देण्यात आले आहे.
...................
सहयोगी खासदारांचे वर्चस्व
शहराच्या विविध भागांतून इतर पक्षांतील नगरसेवकांना भाजपमध्ये स्थान देण्यात राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी विशेष पुढाकार घेतला होता. त्यामध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नगरसेवकांना स्थान देण्यात आल्याने टीकाही झाली होती. काकडे यांच्या काही उमेदवारांना स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध केला असला, तरीही काकडे यांनी प्रवेश दिलेल्या सर्वांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारीवर काकडे यांचे वर्चस्व राहिल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयोगाच्या आदेशामु‍ळे बंडखोरीला चाप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
उमेदवारी जाहीर केल्यानंतर होणारी बंडखोरी थांबविण्याचे राजकीय पक्षांसमोर असलेले आव्हान निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशामुळे संपुष्टात आले आहे. पक्षांकडून उमेदवारांना ए व बी फॉर्म देण्याऐवजी संबधित पक्षांने नेमून दिलेले पदाधिकारी थेट महापालिका आयुक्तांना सर्व उमेदवारांचे ए फॉर्म एकाच वेळी देऊ शकतात. हे प्राप्त झालेले फॉर्म संबधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे सोपविण्याची जबाबदारी आयुक्तांवर असल्याने याचा फायदा राजकीय पक्षांकडून उठविला जाणार आहे. या आदेशामुळे राजकीय पक्षांना आता याद्याही जाहीर कराव्या लागणार नाहीत, तसेच उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटपही करावे लागणार नाही.
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी (३ फेब्रुवारी) अखेरचा दिवस आहे. मात्र असे असतानाही कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारांची यादीच जाहीर केलेली नाही. त्यातच राजकीय पक्ष थेट पालिका आयुक्तांकडे ए आणि बी फॉर्म देऊ शकतात, असा निर्णय आयोगाने घेतल्याने हे राजकीय पक्षांच्या पथ्यावर पडले आहे. महापालिकेच्या १६२ जागांसाठी प्रत्येक पक्षाकडे एका जागेसाठी सरासरी दहा ते दहा इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले असल्याने तिकीट न मिळाल्यास मोठया प्रमाणात बंडखोरीची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन अद्याप एकाही राजकीय पक्षाने आपल्या याद्या जाहीर न करता उमेदवारांना थेट एबी फॉर्म देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यामध्येही अनेक अडचण होती. पक्षाने एबी फॉर्म दिला ही माहितीही तत्काळ बाहेर आल्यास बंडखोरी होऊ शकते. त्यामुळे पक्षांकडून सरसकट एका जागेवर प्रमुख इच्छुकांना अर्ज भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार संबधित उमेदवारांची बंडखोरी तूर्तास रोखण्यात आली आहे.
राजकीय पक्ष थेट आयुक्तांकडेही एबी फॉर्म देऊ शकतील, या निर्णयामुळे आयुक्तांमार्फत हे फॉर्म संबधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जातील त्यानंतर संबधित उमेदवाराला निवडणूक निर्णय अधिकारी पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निश्चित करतील. यामुळे ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, त्यांचे अर्ज आपोआपच बाद होतील. या उमेदवारांचे इतर पक्षात जाण्याचे रस्तेही बंद होतील. आयोगाचा हा निर्णय अनेक इच्छुकांची बंडखोरी थोपविण्यास महत्त्वाची भूमिका बजाविणार आहे.
०००००००००००
निवडणूक आयोगाने घेतलेल्या नवीन निर्णयामुळे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी ए फॉर्म आयुक्तांकडे देऊ शकतात. बी फॉर्मची यादी संबधित प्रभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे द्यावी लागणार आहे.
- सतीश कुलकर्णी (निवडणूक अधिकारी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संमेलनाबद्दल रसिक काय म्हणतात?

$
0
0

पुण्यातील संस्था जाणून घेणार उपस्थितांची ‘मन की बात’

Chintamani.Patki@timesgroup.com

Tweet : @chintamanipMT

पुणे : गडबडलेले नियोजन किंवा भव्य दिव्य आयोजन, राजकीय लोकांची भाऊगर्दी, लक्ष्मीदर्शन, रटाळ परिसंवाद, तेच-तेच चेहरे आणि कार्यक्रम अशा विविध बाजूंनी साहित्य संमेलन दर वर्षीच टीकेचा विषय ठरत असते; मात्र संमेलनाला जे गर्दी करतात त्या नागरिकांना, साहित्य रसिकांना संमेलनाविषयी काय वाटते, हे कधीच जाणून घेतले जात नाही. या साहित्य रसिकांची संमेलनाविषयीची ‘मन की बात’ जाणून घेण्याचा प्रयत्न पहिल्यांदाच यंदाच्या साहित्य संमेलनातून होत आहे. संमेलनाला येणाऱ्या रसिकांना संमेलन कसे वाटले, काय सुधारणा अपेक्षित आहेत, याबद्दलची माहिती घेणारे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. त्यावर चिंतन होणार आहे.

९०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज, शुक्रवारपासून डोंबिवली येथे रंगणार आहे. संमेलनात येणाऱ्या लोकांचे अभिप्राय कळावेत, संमेलन कसे वाटले, काही सुधारणा अपेक्षित आहेत का, या विविध बाजू समोर याव्यात या उद्देशाने पुण्यातील ‘साहित्य सेतू’ या संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे. साहित्य संमेलन भरवणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सहकार्याने हा उपक्रम होत असून, संमेलनानंतर महामंडळाला अभ्यास अहवाल देण्यात येणार आहे.

‘संमेलनाला येणारे साहित्यप्रेमी, लेखक, वाचक, प्रकाशक, तरुण अशा विविध घटकांना संमेलनाविषयी काय वाटते हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी २५ हजार अर्जांची छपाई केली असून, अर्ज संमेलनस्थ‍ळी व संमेलनाच्या कार्यालयात उपलब्ध असतील. जमा केलेले अर्ज फाइल स्वरूपात साहित्य महामंडळाकडे दिले जाणार आहेत. तसेच जमा झालेल्या अर्जांवरून लोकांचे काय म्हणणे आहे, या स्वरूपाचा अहवाल महामंडळाला देण्यात येईल, ज्याचा उपयोग पुढील संमेलनांच्या आयोजनासाठी होऊ शकतो,’ असे ‘साहित्य सेतू’ संस्थेचे अध्यक्ष प्रा. क्षितिज पाटुकले यांनी ‘मटा’ला सांगितले. ‘या उपक्रमाला अभिप्राय पेटी असे नाव दिले आहे. संमेलनात येणाऱ्या सर्व घटकांनी अर्ज भरून द्यावेत,’ असे आवाहन प्रा. पाटुकले यांनी केले.

..........


साहित्य संमेलनाविषयी लोकांची बाजू जाणून घेण्याच्या उपक्रमाला महामंडळाने परवानगी दिली आहे. लोकांना काय वाटते ही माहिती गोळा करावी, अशी मुख्य कल्पना आहे. संमेलन झाल्यानंतर उपलब्ध माहितीवरून अभ्यास करण्यात येईल. विविध पातळ्यांवर विचार करून पुढील कृती ठरवता येईल.

- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष, साहित्य महामंडळ

...........


निमंत्रण यू-ट्यूबवर

संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून उभे राहिलेले कवी प्रवीण दवणे यांना संमेलनाचे नसलेले निमंत्रण हा चर्चेचा विषय ठरलेला असताना यंदा निमंत्रणे ऑनलाइन पाठवण्यात आली आहेत. ‘साहित्य सेतू’ने सुमारे पाच लाख व्यक्तींना व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून निमंत्रण पाठविले आहे. साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, स्वागताध्यक्ष गुलाब वझे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांचे मनोगत व निमंत्रण यू्-ट्यूबवर ऐकता येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेजर जनरल माधुरी कानिटकर यांची नियुक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मेजर जनरल माधुरी कानिटकर यांची लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या (एएफएमसी) अधिष्ठाता आणि उपप्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. लहान मुलांच्या मूत्रपिंडविकारातील देशातील आघाडीच्या तज्ज्ञ अशी त्यांची ओळख आहे. या पदावर नियुक्ती झालेल्या त्या पहिल्याच महिला अधिकारी आहेत.
कानिटकर यांनी आपले वैद्यकीय शिक्षण एएफएमसीमधूनच पूर्ण केले असून त्या प्रतिष्ठेच्या राष्ट्रपती सुवर्णपदकाच्या आणि कलिंगा ट्रॉफीच्याही मानकरी आहेत. कानिटकर डिसेंबर १९८२ मध्ये लष्करी वैद्यकीय सेवेत दाखल झाल्या. १९९१ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून बालरोगशास्त्रातून एम डी ही पदवी घेतली. त्यानंतर दिल्लीतील एम्समधून त्यांनी पेडियाट्रिक नेफ्रोलॉजीमधील उच्चशिक्षण घेतले. सध्या भारतातील विविध आरोग्यशास्त्र विद्यापीठांमध्ये त्या पदव्युत्तर विभागात अतिथी प्राध्यापक म्हणूनही काम पाहात आहेत.
आपल्या प्रदीर्घ सेवेदरम्यान त्यांनी विविध जबाबदाऱ्यांच्या पदांवर काम केले आहे. या नियुक्तीपूर्वी त्या लष्करी वैद्यकीय सेवेच्या महासंचालकांच्या कार्यालयात उपमहासंचालक (प्रशिक्षण व नियोजन) पदावर कार्यरत होत्या. लहान मुलांच्या मूत्रपिंडविकारांसंदर्भात कानिटकर यांनी काही नवे शोध लावले असून त्यांचे अनेक शोधनिबंधही प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना विशिष्ट सेवा मेडलसह विविध प्रशस्तिपत्रकांनी गौरविण्यात आले आहे. कानिटकर या लेफ्टनंट जनरल आर. व्ही. कानिटकर यांच्या पत्नी असून, त्यांना निखिल आणि विभूती अशी दोन मुले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कथक कलाकारांना 'कलार्पण'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कथक नृत्याचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या कलाकारांना नुकतेच ‘कलार्पण’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ‘नीलिमा प्रॉडक्शन्स’तर्फे टिळक स्मारक मंदिर येथे हा पुरस्कार प्रदान समारंभ झाला. पं. सुभाष चंद्रा (दिल्ली), जयश्री तांबे (इंदूर), संजीवनी कुलकर्णी (नाशिक), अर्चना कुलकर्णी (कोल्हापूर), सीमा गांधी (देवरुख), अशोक आरवाडे (रत्नागिरी), बाळकृष्ण विभूते (सांगली), देवसिंह गौर (खामगाव), रुही मासोदकर (नागपूर) यांना कलार्पण पुरस्काराने गौरवण्यात आले. कथकच्या मराठी साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या पं. मंजिरी देव यांना ‘समर्पण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. अरविंद थत्ते यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

कार्यक्रमाच्या पूर्वार्धात नीलिमा नृत्यालयाच्या विद्यार्थिनींची नृत्यप्रस्तुती झाली. सुरुवात नीलिमा हिरवे लिखित नृत्यवंदनेने झाली. पुढे तीनताल, झपताल, एकताल, सरगम अशा विविध तालांचे सादरीकरण झाले. उत्तरार्धात टिकम शेखावत यांच्या काव्यवाचनावर आधारित ‘नटनागर से बात करे’ हे कथक काव्य सादर करण्यात आले. पराग हिरवे (तबला), ययाती एकबोटे (संतूर), स्वानंद कुलकर्णी (हार्मोनियम), श्रीपाद लिंबेकर (गायन), अवधूत धायगुडे (साइड ऱ्हिदम) यांनी साथ केली. किमया देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्य वैभव दिनदर्शिका यंदाही वैशिष्ट्यपूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दर वर्षीप्रमाणे यंदाही गमभन प्रकाशनाची ‘साहित्य वैभव’ ही दिनदर्शिका वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. विविध साहित्यिकांची छायाचित्रे, त्यांची माहिती, विविध लेख अशा साहित्याने ही दिनदर्शिका नटली आहे. यंदा या दिनदर्शिकेचे १७वे वर्ष आहे.

‘साहित्य या विषयाला वाहिलेली ‘साहित्य वैभव’ ही एकमेव दिनदर्शिका आहे. ज्यांच्या साहित्यामुळे मराठी भाषेला वैभव प्राप्त झाले, अशा काही दिवंगत साहित्यिकांची छायाचित्रे या दिनदर्शिकेत असतात. पानाच्या मागील बाजूस साहित्यिकांची ग्रंथसंपदा, जन्मदिनांक, पुण्यतिथी यासह माहितीपूर्ण लेख असे या दिनदर्शिकेचे स्वरूप असते,’ असे गमभन प्रकाशनाचे जयदीप कडू यांनी सांगितले.

ज्येष्ठ छायाचित्रकार व साहित्यिक ल. म. कडू यांच्या कल्पनेतून साकार होणाऱ्या या साहित्यवैभवात यंदाच्या दिनदर्शिकेत डॉ. रा. चिं. ढेरे, गिरिजाबाई केळकर, प्रा. रा. ग.जाधव, मंगेश पाडगावकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, लक्ष्मण लोंढे या साहित्यिकांची चित्रे व माहिती आहे. डॉ. मेधा सिधये यांनी संपादन केले असून, वर्षा गजेंद्रगडकर, डॉ. विलास खोले, अंजली कुलकर्णी, स्वाती लोंढे यांचे लेख आहेत. साहित्यिकांची चित्रे ल. म. कडू व जयदीप कडू यांनी काढली आहेत. साहित्यप्रेमी, ग्रंथालये, शाळा, संस्था, विद्यार्थी यांसाठी ही दिनदर्शिका उपयुक्त ठरणारी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. नाईक यांना निसर्गमित्र पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अॅडव्हेंचर फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा ‘मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार’ या वर्षी अस्थिरोगतज्ज्ञ आणि पक्षिअभ्यासक डॉ. सत्यशील नाईक यांना जाहीर झाला आहे. येत्या रविवारी (५ फेब्रुवारीला) निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक माधव गोगटे यांच्या हस्ते नाईक यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. नव्या पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

निसर्ग आणि पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीला दर वर्षी हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे यंदाचे अकरावे वर्ष आहे. डॉ. नाईक यांनी पक्ष्यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा संग्रह केला असून, त्यांनी आतापर्यंत अनेक पक्ष्यांना जीवदान दिले आहे. विविध ठिकाणी जाऊन ते आजही स्लाइड शोमार्फत पक्ष्यांबद्दल जनजागृतीचे काम करतात. त्यांनी टिपलेली छायाचित्रे ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सायंटिफिक जर्नल’मध्ये प्रसिद्ध झाली आहेत. इंडियन नेचर सोसायटीचे नाईक अध्यक्ष आहेत, अशी माहिती अॅडव्हेंचर फाउंडेशनचे अध्यक्ष विवेक देशपांडे यांनी दिली. पुरस्कार वितरण समारंभानंतर डॉ. नाईक पक्षिजीवनावर आधारित दुर्मिळ स्लाइड्स दाखवणार असून, पक्ष्यांवर केलेल्या शस्त्रक्रियांबद्दल माहिती सांगणार आहेत, असे देशपांडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिंचवडमध्ये रंगली सुगम संगीत स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

मधुगंधर्व संस्थेने चिंचवड-शाहूनगर येथे आयोजित केलेल्या स्वर्गीय सुधीर फडके सुगम संगीत स्पर्धेत लहान गटात सर्वेश मांडे आणि शास्त्रीय गायन स्पर्धेत खुल्या गटात प्रीती जोशी यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

पिरॅमिड हॉल येथे झालेल्या या स्पर्धेत सुमारे अडीचशेहून अधिक जणांनी भाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन डॉ. सुशील मुथीयान यांच्या हस्ते झाले. परीक्षक म्हणून गीतांजली पुराणिक, संजय कुकडिया, कविता टिकेकर, विनायक लिमये, मानसी बडवे यांनी काम पाहिले. पारितोषिक वितरणप्रसंगी पं. किरण परळीकर यांनी गीत आणि संगीतबद्ध केलेल्या ‘गझल दर्पण’चा कार्यक्रम झाला. त्यात नंदिन सरीन, किशोरी सरीन, आरोही किंबहुने यांनी भाग घेतला. राजेंद्र पुराणिक (तबला) यांनी साथ केली. संजय जाधव, शर्मिला शिंदे, चित्रा रासने, जयमाला घुगरी, पद्मजा सैंदाणे, मंगला मस्तुद, विजया चव्हाण, किरण बेंद्रे, स्मिता सराफ आदींनी संयोजन केले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : सुगम संगीत (पहिली ते चौथी गट) - प्रथम - सर्वेश मांडे, द्वितीय - हिरण्मयी वांगीकर, तृतीय - आर्या जोशी, उत्तेजनार्थ - सFया लोढा, (पाचवी ते सातवी) - प्रथम - सिद्धार्थ गुगळे, द्वितीय - रिया भागवत, तृतीय - आभा कटके, उत्तेजनार्थ - अनुष्का देशपांडे, श्रीनिधी तिवाटणे, सिद्धी महाजन, (आठवी ते दहावी) - प्रथम - तेजल कुलकर्णी, द्वितीय - चारुशिला मसुरे, उत्तेजनार्थ - अक्षता उपळेकर, (१६ ते ३० वर्षे वयोगट) - प्रथम - पल्लवी भिसे, द्वितीय - सुनील तोंडे, तृतीय - आदिती आठवले आणि स्नेहल कुलकर्णी, उत्तेजनार्थ - हर्षराज जाधव, समीर चव्हाण, प्रतीक सलगर, (३१ ते ४५ वर्षे वयोगट) - प्रथम - सोनाली कुलकर्णी, द्वितीय - लक्ष्मी भट, तृतीय - चारुदत्त देशपांडे, (४६ ते त्यापुढे) - प्रथम - सुषमा झोरे, द्वितीय - दीपाली गोगटे, तृतीय - दीपक म्हसकर, प्रमोद इनामदार, शास्त्रीय गायन (खुला गट) - प्रथम - प्रीती जोशी, द्वितीय - पूजा कुलकर्णी, तृतीय - अबोली गद्रे, केदार केळकर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​गांधीविचार समजून घेण्याची गरज

$
0
0

डॉ. कुमार सप्तर्षी यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘देशाला एकसंध बांधून ठेवण्यासाठी महात्मा गांधींचे विचार प्रत्येक नागरिकाने समजावून घेण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी गांधीजींनी सांगितलेले विचार महत्त्वाचे असून, तेदेखील नागरिकांनी आत्मसात करण्याची गरज आहे,’ असे मत युवक क्रांती दलाचे (युक्रांद) संस्थापक अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सोमवारी व्यक्त केले.

महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त गांधी स्मारक निधीतर्फे आयोजित केलेल्या ‘गांधीजींचे विचार आणि आजचे राजकारण’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. सप्तर्षी बोलत होते. या वेळी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. सप्तर्षी म्हणाले, ‘देशामध्ये ग्रामपरिवर्तनाची सुरुवात गांधीजींनी केली. सध्या देशाची परिस्थिती पाहता देशाला एकसंध ठेवण्यासाठी त्यांचे विचार समजून घेणे आवश्यक आहे. त्यांच्या विचारांनीच देशाला एकसंध बांधून ठेवता येणार आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यांचे विचार अमूल्य आहेत. त्यामुळेच ग्रामीण भागाचा विकास होईपर्यंत गांधींचे विचार संपणार नाहीत. जगामध्ये अहिंसक समाज निर्माण झाला पाहिजे, ही गांधीजी आणि थोर संतांची भूमिका होती. देशामध्ये संतांनी संघर्ष न करता मानवता व अहिंसा टिकवून ठेवली. गांधींनी अध्यात्मातून भक्तिमार्गाची सुरुवात केली आणि अहिंसेचे महत्त्व लोकांना विविध प्रकारे पटवून सांगितले.’

‘देशाची एकंदरीत परिस्थिती पाहता गांधीजींचे विचार जोपासण्याची गरज आहे. सध्या शहरात व महाराष्ट्रात विविध नाटकांमधून गांधींचे विचार चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर मांडले जात असून हे थांबवले पाहिजे,’ असे मत राजन यांनी व्यक्त केले. संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.

.......

दीडशे व्याख्याने

महात्मा गांधीजींची दीडशेवी जयंती २०१९मध्ये आहे. त्या निमित्ताने चौधरींनी राज्यात विविध ठिकाणी गांधींवर १५० व्याख्याने देण्याचा संकल्प केला आहे. याचबरोबर १५० तरुणांनी या उपक्रमात सहभागी होऊन १५० व्याख्याने द्यावीत, असे गांधी स्मारक समितीतर्फे सांगण्यात आले. दरम्यान, या तरुणांना तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येईल, असे राजन यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​विद्यार्थ्यांना ‘गोड न्यूज’

$
0
0

विद्यापीठातील जेवणात अंडाकरी, गोडधोड पदार्थांचा समावेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जेवणात आता आ‍ठवड्यातून एकदा अंडाकरी आणि गोडधोड पदार्थांचा समावेश होणार आहे. जेवणाचा दर्जाही उत्तम राखला जाणार आहे. तसेच, विद्यापीठाच्या परिसरात विनामूल्य फिरण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या दोन गाड्या उपलब्ध केल्या जाणार आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) विविध मागण्यांसाठी केलेल्या उपोषणाची दखल घेऊन विद्यापीठ प्रशासनाने हे निर्णय घेतले आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मिळणाऱ्या भोजनाचा दर्जा सुधारावा आणि मांसाहारी पदार्थ मिळावेत, ‘कमवा आणि शिकवा’ योजनेतील मानधन वाढवावे, विद्यापीठात मोफत बस सुरू करावी, आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्याची सुविधा निर्माण करावी, अशा मागण्यांसाठी ‘अभाविप’ने मंगळवारी आमरण उपोषणाला सुरुवात केली. आरोग्य केंद्रात विद्यार्थ्यांवर केवळ तात्पुरत्या स्वरूपात उपचार न करता त्यांना दाखल करून घेण्याची सुविधा निर्माण करावी आणि विद्यापीठाच्या ‘रिफेक्टरी’त मिळणाऱ्या भोजनाचा दर्जा सुधारावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. उपोषणात प्रतीक दामा, हरीष पाटील, ऐश्वर्या भणगे, कृणाल सपकाळे, सागर रायते, श्रीराम कंधारे आदींनी सहभाग घेतला. त्याची दखल घेऊन विद्यापीठ प्रशासनाने वरील निर्णय घेतले आहेत.

विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडाकरी आणि गोड पदार्थ मिळणार आहेत. ‘रिफेक्टरी’तील भोजनाचा दर्जा सुधारण्यासाठी नवीन कंत्राटदार नेमण्यात येणार असून, त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तेथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील. तसेच, येत्या काळात ‘रिफेक्टरी’ आ‍ठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार आहे. वसतिगृह आठमध्ये विद्यार्थ्यांना दोन्ही वेळी जेवण पुरवण्यात येणार आहे. तसेच वसतिगृह नऊमध्येदेखील विद्यार्थ्यांना दोन वेळचे जेवण मिळण्याची सुविधा निर्माण केली जाईल. दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना विद्यापीठातील आरोग्य केंद्रात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याची सुविधा लवकर निर्माण केली जाणार आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांनी याबाबतचे निर्णय घेऊन तसे लेखी आश्वासन उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना दिले आहे.

‘विद्यापीठाच्या परिसरात विनामूल्य फिरण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात एक इलेक्ट्रिक कार व टाटा सुमो उपलब्ध करून देण्यात येईल. येत्या ४५ दिवसांत बॅटरीवर चालणाऱ्या दोन गाड्या उपलब्ध होणार आहेत,’ असेही सांगण्यात आले.

......

‘कमवा व शिका’च्या मानधनात वाढ

‘कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना प्रतितास ३० रुपयांऐवजी ४५ रुपये मिळणार आहेत. या निर्णयामुळे योजनेत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. हा निर्णय एक फेब्रुवारीपासून लागू करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएमपी’ची बस जळून खाक

$
0
0

पुणे : चांदणी चौकात गुरुवारी चालत्या ‘पीएमपी’ बसला आग लागून ती जळून खाक झाली. अग्निशमन दलाने अवघ्या पंधरा मिनिटांत आग विझवली, तरी बसचे पूर्णपणे नुकसान झाले. बसचालक अशोक थोपटे यांच्या वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी प्रवाशांना तत्काळ खाली उतरवले. यादरम्यान वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी पोकलेनच्या साह्याने बस उचलून रस्त्याच्या कडेला ठेवली आणि वाहतूक पूर्ववत केली. अग्निशमन दलाचे अधिकारी गजानन पाथरूडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आग विझवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तांत्रिक अडचणींमुळे टायपिंग परीक्षेत चुका

$
0
0

परीक्षा पुन्हा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शासकीय कम्प्युटर टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेत (मराठी) गुरुवारी विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे कम्प्युटरवर मराठी शब्दच व्यवस्थित टाइप न करता आल्याने त्यांची भंबेरी उडाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना टायपिंगचा पेपरच व्यवस्थितपणे सोडवता आला नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांची काहीही चूक नसताना त्यांना मनस्ताप सहन करावा लागल्याने परीक्षेत उत्तीर्ण होण्याची कोणतीही शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे ही परीक्षा पुन्हा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून राज्यात शासकीय कम्प्युटर टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांना परिषदेकडून प्रमाणपत्र दिले जाते. सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी या प्रमाणपत्राची आवश्यकता असते. त्यामुळे या परीक्षेला दर वेळी राज्यातील हजारो विद्यार्थी बसतात; मात्र प्रत्येक वेळी परीक्षेमध्ये अडथळे उद्भवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. ‘सिंहगड कॉलेज ऑफ कॉमर्स’मध्ये गुरुवारी झालेल्या परीक्षेत अशाच प्रकारचा अडथळा निर्माण झाला. या अडथळ्यांमुळे अनेक विद्यार्थ्यांवर परीक्षेत अनुत्तीर्ण होण्याची वेळ येणार असल्याचे सांगण्यात आले. परीक्षेसाठी सरकारच्या अधिकृत केंद्रांमधून अर्ज करण्यासाठी आणि त्यासोबत क्लास करण्यासाठी सुरुवातीला सहा हजार ५०० रुपये एकत्रित भरावे लागतात. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यायची झाल्यास दोन हजार २०० रुपये भरावे लागतात. त्यामुळे परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याची तक्रार विद्यार्थ्यानी केली आहे.

राज्यातील विविध केंद्रांवर दोन ते पाच फेब्रुवारीदरम्यान राज्यात सकाळी साडेनऊ ते साडेसहा कालावधीत ही परीक्षा पार पडत आहे. ही परीक्षा १०० गुणांची असून, त्यासाठी दीड तासाचा कालावधी देण्यात आला होता; मात्र पेपर सोडवताना विद्यार्थ्यांना कम्प्युटरवर मराठीतील काही शब्दच टाइप करता येत नव्हते. या परीक्षेत विद्यार्थ्यांना वीस गुणांसाठी एक परिच्छेद सलग टाइप करवा लागतो. यात टायपिंगमध्ये एकदा झालेली चूक पुन्हा दुरुस्त करता येत नाही. विद्यार्थ्यांना मराठीतील काही शब्दच व्यवस्थित टाइप करता आले नसल्याने विद्यार्थ्यांच्या भरपूर चुका झाल्या आहेत. अशाच प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या चुका पेपरमधील विविध भागांत झाल्या आहेत. परीक्षेत हे अडथळे संगणकीय प्रणालीमुळे झाले, की टायपिंगसाठी असेलेल्या मराठी फाँटमध्ये आलेल्या अडचणींमुळे झाले, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान, या अडचणी दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेत कम्प्युटर ‘रिस्टार्ट’ करण्याच्या सूचना परीक्षा केंद्रांवर देण्यात येत होत्या.

.........

विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्रांमधून नियमावलीनुसार शासकीय कम्प्युटर टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांना कदाचित परीक्षेत मराठी टाइप करताना फाँट किंवा इतर गोष्टींचा त्रास झाला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची यात कोणत्याच प्रकारची चूक नाही.

- दिनकर पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...आणि बछड्यांची आईशी पुन्हा भेट झाली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जुन्नर

किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या सोमतवाडी येथे सापडलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांची त्यांच्या आईशी पुन्हा गाठ घालून देण्यात वन विभागाला यश आले.

ऊसतोडणी करत असताना सतीश परदेशी यांच्या शेतात मजुरांना एक फेब्रुवारीला एक नर आणि एक मादी असे दोन बछडे आढळले होते. ही घटना वन विभागाचे वनरक्षक संजय गायकवाड यांना कळवण्यात आली. त्यांनी ही माहिती बिबट्या निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांना कळवली.

रात्रीच्या वेळी सहायक महेंद्र ढोरे यांच्या मदतीने या दोन्ही बछड्यांना टोमॅटोच्या क्रेटमध्ये ठेवण्यात आले. बछड्यांची आई रात्री सव्वानऊच्या सुमारास पिलांचा माग काढत तेथे आली. तिने पिलांना पाहून त्यांना उचलून नेले. मादी पिल्लांना नेण्यासाठी आली असतानाचा फोटो या ठिकाणी लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात टिपला गेल्याने मादी पिल्लांना घेऊन गेल्याचे शिक्कामोर्तब झाले. २००९पासून आतापर्यंत साठ बछड्यांना

त्यांच्या आईकडे पाठवण्यात वन विभागाला यश आले असल्याचे डॉ. देशमुख यांनी ‘मटा’ला सांगितले. ही जगातील एक आगळीवेगळी नोंद असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपची पहिली यादी जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत समाप्त होण्याच्या आदल्या दिवशीपर्यंत भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची नावे गुलदस्तात ठेवली. यापैकी काही जणांना थेट अर्ज भरण्याच्या सूचना करण्यात आल्या. मात्र, आघाडीचा निर्णय झाल्यानंतर आणखी काही तगड्या उमेदवारांचे इनकमिंग होण्याच्या प्रतीक्षेत पक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्रीपर्यंत निश्चित झालेली नावे या प्रमाणे.....

प्रभाग क्र १-कळस-धानोरी : अनिल ऊर्फ बॉबी टिंगरे, अलका खाडे, नानासाहेब ऊर्फ मारुती सांगडे
प्रभाग क्र २-फुलेनगर-नागपूर चाळ : शीतल सावंत, डॉ. सिद्धार्थ धेंडे (आरपीआय)
प्रभाग क्र ३- विमाननगर-सोमनाथनगर : राहुल भंडारे, बापूराव कर्णे गुरुजी
प्रभाग क्र ४-खराडी-चंदननगर : सचिन सातपुते, शैलैश बनसोड, सोनल चव्हाण
प्रभाग क्र ५-वडगाव शेरी-कल्याणीनगर : अद्याप जाहीर नाही
प्रभाग क्र ६-येरवडा : राजेंद्र एंडल, शिल्पा राजगुरू
प्रभाग क्र ७-पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी : अद्याप जाहीर नाही
प्रभाग क्र ८-औंध-बोपोडी : प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, परशुराम वाडेकर यांच्या पत्नी (आरपीआय)
प्रभाग क्र ९-बाणेर-बालेवाडी-पाषाण : अमोल बालवडकर, राहुल कोकाटे, ज्योती कळमकर
प्रभाग क्र १०-बावधन-कोथरूड डेपो : अल्पना वर्पे, दिलीप वेडे-पाटील, श्रद्धा प्रभुणे, किरण दगडे
प्रभाग क्र ११-रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर : छाया मारणे, दिलीप उंबरकर, मनीषा बुटाला
प्रभाग क्र १२-मयूर कॉलनी-डहाणूकर कॉलनी : मुरली मोहोळ, ज्योत्स्ना कुलकर्णी, वर्षा डहाळे
प्रभाग क्र १३-एरंडवणा-हॅपी कॉलनी : माधुरी सहस्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर
प्रभाग क्र १४-डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी : सिद्धार्थ शिरोळे, नीलिमा खाडे,
प्रभाग क्र १५-शनिवार पेठ-सदाशिव पेठ : हेमंत रासने, मुक्ता टिळक, राजेश येनपुरे, गायत्री खडके
प्रभाग क्र १६-कसबा पेठ-सोमवार पेठ : गणेश बीडकर, योगेश समेळ, वैशाली सोनवणे, रिना आल्हाट (आरपीआय)
प्रभाग क्र १७-रास्ता पेठ-रविवार पेठ : उमेश चव्हाण, अरविंद कोठारी, रोहिणी बापू नाईक, अपर्णा तेजेंद्र कोंढरे
प्रभाग क्र १८-खडकमाळ आळी-महात्मा फुले पेठः विजयालक्ष्मी मोतीलाल हरिहर, आरती सचिन कोंढरे, सम्राट थोरात, अजय खेडेकर
प्रभाग क्र १९-लोहियानगर-कासेवाडी : शंतनू बापू कांबळे, मनीषा लडकत, रफीक शेख
प्रभाग क्र २०-ताडीवाला रोड-ससून हॉस्पिटल : दिलीप बहिरट
प्रभाग क्र २१-कोरेगाव पार्क-घोरपडी : लता धायरकर, नवनाथ कांबळे (आरपीआय)
प्रभाग क्र २२-मुंढवा-मगरपट्टा : आबा तुपे, सुनील जमदाडे
प्रभाग क्र २३-हडपसर गावठाण, सातववाडी : अद्याप जाहीर नाही
प्रभाग क्र २४-रामटेकडी, सय्यदनगर : इम्तियाज मोमीन, संजय कांबळे
प्रभाग क्र २५-वानवडी : दिनेश होले, धनंजय घोगरे, कोमल शेंडे
प्रभाग क्र २६-महंमदवाडी-कौसरबाग : अद्याप जाहीर नाही
प्रभाग क्र २७-कोंढवा खुर्द-मीठानगर : अद्याप जाहीर नाही
प्रभाग क्र २८-सॅलिसबरी पार्क-महर्षीनगर : कविता वैरागे, प्रवीण चोरबेले, श्रीनाथ भिमाले, आशा बिबवे
प्रभाग क्र २९-नवी पेठ-पर्वती : धीरज घाटे, स्मिता वस्ते, महेश लडकत
प्रभाग क्र ३०-जनता वसाहत,दत्तवाडी : शंकर पवार,
प्रभाग क्र ३१-कर्वेनगर : राजा बराटे, सुषमा चौधरी, सुशील मेंगडे
प्रभाग क्र ३२-वारजे-माळवाडी : किरण बारटक्के
प्रभाग क्र ३३-वडगाव धायरी : राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, हेमलता नवले,
प्रभाग क्र ३४-हिंगणे-सनसिटी : श्रीकांत जगताप, प्रसन्न जगताप, मंजूषा नागपुरे,
प्रभाग क्र ३५-सहकारनगर-पद्मावती : गणेश घोष
प्रभाग क्र ३६-मार्केटयार्ड, लोअर इंदिरानगर : गोपाळ चिंतल, मानसी देशपांडे, सुनील कांबळे, अनसुया चव्हाण
प्रभाग क्र ३७-अप्पर-सुपर इंदिरानगर : रुपाली धाडवे, गौरव घुले
प्रभाग क्र ३८-राजीव गांधी उद्यान-बालाजीनगर : दिगंबर डवरी,
प्रभाग क्र ३९-धनकवडी-आंबेगाव पठार : मोहिनी देवकर, वर्षा तापकीर
प्रभाग क्र ४०-दत्तनगर, कात्रज गावठाण : संदीप बेलदरे, अभिजित कदम
प्रभाग क्र ४१-कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी : रंजना टिळेकर, सौ. राजवाडे
(टीप : ही यादी आरक्षणानुसार नाही.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images