Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गुंडांच्या पक्षाला पाठिंबा नाही

$
0
0

गुंडांच्या पक्षाला पाठिंबा नाही

म. टा. वृत्तसेवा, दौंड
‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, की विरोधी पक्षनेते आहेत हेच कळत नाही. फक्त हात हलवून बेंबीच्या देठापासून बोलतात. त्यांच्या पक्षाची गुंडांचा पक्ष म्हणून प्रतिमा निर्माण झाली आहे. शिवसेनेने या गुंडांच्या पक्षाचा पाठिंबा काढून घेतल्यास हे सरकार पडेल. त्यावेळी आमचा पक्ष भाजपला पाठिंबा देणार नाही,’ असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ दौंड तालुक्यातील चौफुला येथील बोरमलनाथ मंदिरात झाला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘मोदी सरकारच्या काळात पाकिस्तानच्या कुरघोड्या वाढल्या आहेत. सीमेवर असणारे आपले जवान मोठ्या संख्येने हुतात्मा झाले आहेत. मोदी सरकार पाकिस्तानला जशास तसे उत्तर न देता बघ्याची भूमिका घेत आहे,’ असेही पवार म्हणाले.
‘मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेऊन ८० दिवस होऊन गेले तरी परिस्थिती न बदलता अर्थव्यवस्था कोलमडलेलीच आहे. पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखाना हा आर्थिक अडचणीच्या कारणामुळे या वर्षी सुरू होऊ शकला नाही. या कारखान्यावर कोट्यवधीचे कर्ज आहे. राज्य सरकारने हमी दिल्यास या भीमा सहकारी साखर कारखान्यास पुणे जिल्हा बँक मदत करण्यास तयार आहे,’
असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘साहित्यिक अभिव्यक्ती व्यापक होत आहे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘जाती व्यवस्थेची बंधने, जुन्या प्रथा परंपरा, पारंपरिक रूढी यांमुळे मर्यादित असलेली साहित्यिक अभिव्यक्ती आता व्यापक होत असून, त्यामुळे साहित्य संकल्पनेची व्याख्याही आता अभिव्यक्ती होऊ पाहत आहे,’ असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी केले
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीच्या वृत्तपत्रविद्या व संज्ञावपन विभागातर्फे आयोजित ‘मराठी पुरवण्या आणि साहित्य व्यवहार’ या चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी, डॉ. मनोहर जाधव, वृत्तपत्रविद्या व संज्ञापन विभागाच्या प्रमुख डॉ. माधवी रेड्डी, प्रा. संजय तांबट आदी या वेळी उपस्थित होते.
जोशी म्हणाले, ‘साहित्य व्यवहार अभिव्यक्तीकडे झुकल्याने अभिव्यक्तीचा तपासणी व्हायला हवी, मराठी वृत्तपत्रातील पुरवण्यांमध्ये साहित्यिक लेखन होते तेव्हा ही गोष्ट कटाक्षाने पाळणे गरजेचे आहे. वृत्तपत्रातील पुरवण्यांचे आणि साहित्याचे समाजवास्तवाशी असलेले नाते तपासणे गरजेचे आहे.’ ‘संपादकांची साहित्य व्यवहाराकडे पाहण्याची दृष्टी कशी असते, यावर पुरवण्यांमधील साहित्य लेखनाचा दर्जा ठरतो. सध्या वाचकांच्या अभिरुचीप्रमाणे लेखन करण्याची वृत्तपत्रांमध्ये प्रथा पडली आहे. वृत्तपत्रांमधील पुरवण्यातून कसदार लेखन करण्याचा प्रयत्न व्हायला हवा,’ असे जोशी यांनी नमूद केले. डॉ. मनोहर जाधव म्हणाले, ‘लेखकांना लिहिते करण्याचे काम वृत्तपत्रातील पुरवण्यांनी केले. वृत्तपत्रातील लेखन हे तत्कालिन असते. मात्र, त्या लेखनात ताकद असेल तर ते कालसुसंगत राहते. वाचकांची वाङ्मयीन जडणघडण करण्यात पुरवण्यांचा मोठा वाटा आहे.’
‘महाराष्ट्र टाइम्स’चे वरिष्ठ सहसंपादक श्रीधर लोणी, ज्येष्ठ पत्रकार आल्हाद गोडबोले, राम जगताप, संतोष शेणई, प्रा. विश्राम ढोले, सचिन परब यांनी या चर्चासत्रात भाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाभारताच्या उपसंहाराचे काम पन्नास वर्षांत पूर्ण नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘महाभारतावरील खंडाला पन्नास वर्षे पूर्ण झाली. हे काम पूर्ण होताच महाभारताच्या उपसंहाराचे काम हाती घ्यायला हवे होते. चिंतामण विनायक वैद्य या एका व्यक्तीने शंभर वर्षांपूर्वी हे काम करून दाखवले, पण ‘भांडारकर’सारख्या संस्थेला ते पन्नास वर्षांतही पूर्ण करता आलेले नाही,’ अशी कबुली संस्थेचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी दिली. उपसंहाराच्या कामाला विलंब झाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
प्रफुल्लता प्रकाशनातर्फे चिंतामण विनायक वैद्य यांच्या ‘महाभारताचा उपसंहार’ या ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात झालेल्या कार्यक्रमात प्रकाशनाचे गुलाब सपकाळ उपस्थित होते.
डॉ. बहुलीकर म्हणाले, ‘भांडारकर संस्थेने महाभारताचे काम हाती घेतले त्याला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. महाभारताची एकोणीस खंडांची प्रचंड आवृत्ती १९६६ साली भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या हस्ते प्रकाशित झाली. या कामास पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. काम पूर्ण होताच उपसंहाराचे काम हाती घ्यायला हवे होते, पण त्यास विलंब झाला. अजूनही ते काम सुरू आहे. वैद्य या एका व्यक्तीने ते काम केले.’ ‘प्राचीन व आधुनिक ज्ञान मराठीत असावे. या उद्देशाने या ग्रंथाची निर्मिती झाली. आज बहुसंख्येने ग्रंथ प्रकाशित होत आहेत. पण त्या तोडीची निर्मिती होताना दिसत नाही. म्हणून या ग्रंथाचे महत्त्व अधिक आहे,’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
डॉ. मोरे म्हणाले, ‘आपले महाभारत अशोकाच्या काळातील आहे, हे वैद्य यांनी सांगितले आहे. महाभारताच्या लेखनाचा इतिहास त्यांनी सांगितला आहे. राजकीय, सामाजिक संघर्ष या ग्रंथात आहेत. महाभारत तीन टप्प्यांत आहे असे सांगितले जाते. त्यामुळे भगवदगीता कोणत्या टप्प्यातील आहे, असा प्रश्न केला जातो. मात्र गीता व्यासांनी पहिल्या टप्प्यातच लिहिली आहे, असे वैद्य यांनी स्पष्ट केले आहे. गौतम बुद्धांनंतर वैदिक लोकांची प्रतिक्रांती सुरू झाल्यानंतर गीता निर्माण झाली, असा एक मतप्रवाह आहे.’ सूत्रसंचालन श्रीनंद बापट यांनी केले. अमृता नातू यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुस्तकांची खरेदी होणार

$
0
0

ग्रंथालय संचलनालयाने केली ४१६ ग्रंथांची निवड; पुढील महिन्यांत आदेशाची शक्यता
म. टा. प्रतिनिधी, पुणे
गेल्या दोन वर्षांमध्ये राज्य सरकारच्या ग्रंथ खरेदी योजनेअंतर्गत एकही पुस्तक खरेदी न करणाऱ्या ग्रंथालय संचलनालयाला अखेर जाग आली आहे. ग्रंथालय संचालनालयाकडून २०१४ मध्ये प्रकाशित झालेल्या ४१६ ग्रंथांची निवड करण्यात आली असून, पुढील महिन्यात पुस्तक खरेदीचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे.
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता आणि राज्याच्या ग्रंथालय संचलनालयातर्फे सुरू करण्यात आलेल्या पुस्तक खरेदी योजनेला खीळ बसली होती. गेल्या दोन वर्षांमध्ये एकही पुस्तक खरेदी केले गेले नाही. राज्यातील शासकीय आणि सार्वजनिक ग्रंथालयांना नव्या पुस्तकांचा पुरवठा होऊ शकलेला नव्हता. याबाबत ‘मटा’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर ग्रंथालय संचालकांना जाग आली असून, त्यांनी नेमलेल्या समितीने २०१४ मध्ये प्रकाशित झालेल्या ४१६ पुस्तकांची निवड केली आहे. परंतु राज्यातील आठ हजार कार्यक्षम ग्रंथालयांचा विचार करता केवळ ४१६ पुस्तके पुरणार का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अद्यापही २०१५ आणि २०१६ या शैक्षणिक वर्षांमधील पुस्तक खरेदी शिल्लक असल्याने मरगळलेल्या अवस्थेतच या योजनेची अंमलबजावणी केली जात असल्याचे चित्र आहे.
‘संचालनालयाकडून निवडण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये ३३५ मराठी, ४५ हिंदी आणि ३६ इंग्रजी पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील आणि देशभरातील विविध प्रकाशकांची पुस्तके निवडण्यात आली आहेत. त्यावर हरकती घेण्यासाठी ३१ जानेवारी पर्यंतची मुदत देण्यात आली होती. पुस्तकांसंदर्भातील हरकतींवर संचलनालयाच्या बैठकीत चर्चा करून पुस्तकांची खरेदी करण्यात येईल. पुढील दोन महिन्यात ही प्रक्रिया पार पडेल,’ अशी माहिती ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी दिली.
तीस वर्षांपासून कोलकात्याचे राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळ वाढावी, यासाठी राज्य सरकारला अर्थिक मदत करते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून विविध प्रकारचे ललित साहित्य, बालसाहित्य, कथासंग्रह, काव्यसंग्रह आणि माहितीपर पुस्तकांची खरेदी केली जाते. २०१३पर्यंत दर वर्षी राज्यातील प्रकाशकांकडून पुस्तके खरेदी करून ती वितरीत केली जात होती. २०१४ सालापासून पुस्तक खरेदी रखडली. तेव्हापासून आत्तापर्यंत एकाही पुस्तकाची खरेदी करण्यात आलेली नाही. या संदर्भात माध्यमांकडून टीका झाल्यावर संचलनालयामार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या ४१६ पुस्तकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या पुस्तकांची लवकरात लवकर खरेदी करून ती ग्रंथालयांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. २०१५ सालची पुस्तक खरेदीही याच वर्षी करण्यात येईल, असे संकेतही ग्रंथालय संचालकांनी दिले आहेत. त्यांची अंमलबजावणी करून मरगळलेल्या योजनेला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जावा, अशी अपेक्षा लेखक आणि प्रकाशकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
----------
संचालनालयाकडून निवडण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये ३३५ मराठी, ४५ हिंदी आणि ३६ इंग्रजी पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील आणि देशभरातील विविध प्रकाशकांची पुस्तके निवडण्यात आली आहेत. त्यावर हरकती घेण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पुस्तकांसंदर्भातील हरकतींवर संचलनालयाच्या बैठकीत चर्चा करून पुस्तकांची खरेदी करण्यात येईल. पुढील दोन महिन्यात ही प्रक्रिया पार पडेल.
- किरण धांडोरे, ग्रंथालय संचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शक असते तर वाद झाला नसता

$
0
0

शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासांच्या भेटीबाबत चिंचोलकर यांचे मत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘समर्थ रामदास स्वामी यांनी ज्या हस्तलिखितांच्या नकला केल्या, त्याच्या खाली शक, मठाचे नाव या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे; पण त्यांनी स्वतः ज्या रचना केल्या त्यात एकाही ठिकाणी शक, ठिकाणाचा उल्लेख नाही. शिवाजी महाराजांना समर्थांनी पत्र लिहिले, पण त्या खाली शकाचा उल्लेख नाही. हा उल्लेख असता तर शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट नेमकी केव्हा झाली हे कळू शकले असते आणि वादाचा जन्मच झाला नसता,’ असे मत संत साहित्याचे अभ्यासक सुनील चिंचोलकर यांनी व्यक्त केले.
गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे नित्यानंद सभागृहात आयोजित ‘समर्थ रामदास : व्यक्ती, काव्य आणि कार्य’ या विषयावर अभ्यास परिषदेत ते बोलत होते. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत, विश्वस्त डॉ. भालचंद्र कापरेकर, रामदासी वाङ्मयाचे संग्राहक अ. भा. चितळे उपस्थित होते. राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ. शं. भा. चांदेकर, माजी प्राचार्य डॉ. अशोक दाणी, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. ल. का. मोहरीर, डॉ. समिता टिल्लू, डॉ. माधवी महाजन, डॉ. आशा आवळे यांच्यासह २० अभ्यासक परिषदेत सहभागी झाले होते.
‘माझ्याकडून हे सगळे श्रीराम लिहून घेतो आहे, अशी भूमिका समर्थ रामदासांनी घेतली. आपण जे लिहिले त्याबाबतीत ते अलिप्त होते. त्यामुळेच स्वतःचे नाव, काळाचा उल्लेख त्यांनी केलेला नाही. हे उल्लेख असते तर अभ्यासकांना मोठी मदत झाली असती,’ याकडे चिंचोलकर यांनी लक्ष वेधले.
कामत म्हणाले, ‘सगळ्याच संतांच्या वाङ्मयाकडे आपण सारख्या भावनेने पाहिले पाहिजे. त्यांनी मराठी भाषेला, मराठी संस्कृतीला काय दिले याचा अभ्यास सामूहिक पद्धतीने झाला पाहिजे. प्रदेश, बोली आणि संप्रदायानुसार त्यात विभाजन करता कामा नये. संप्रदायांच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या विचारांच्या, वयाच्या लोकांनी एकत्र येऊन सामूहिक पद्धतीने संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास झाल्यास त्याला व्यापक बैठक प्राप्त होऊ शकते.'
--------------
समर्थ रामदास यांचा काळ, त्यांचे समकालीन संत, त्यांचे सामाजिक व राजकीय तत्त्वज्ञान, त्यांचे परिसरज्ञान, शीख आणि समर्थ, समर्थांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन या विविध विषयांवरील निबंध या परिषदेसाठी मागविण्यात आले होते. २० अभ्यासकांनी समर्थ रामदास यांच्या एकेका पैलूवर संशोधन करून निबंध लिहिलेले आहेत. हे सर्व निबंध एकत्र करून ‘समर्थ रामदास : व्यक्ती आणि वाङ्मय’ हा चारशे पानांचा ग्रंथ ३१ मार्च पूर्वी प्रकाशित करण्यात येणार आहे.
- डॉ. भालचंद्र कापरेकर , विश्वस्त, गुरुकुल प्रतिष्ठान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तावडेविरुद्ध खटल्याला स्थगिती देण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात ‘सीबीआय’ने डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले असून याप्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्यामुळे या खटल्याची सुनावणी तहकूब करण्यात यावी, असा अर्ज ‘सीबीआय’तर्फे मंगळवारी पुन्हा कोर्टात सादर केला. ‘सीबीआय’तर्फे यापूर्वी ही मागणी करणारा अर्ज कोर्टापुढे दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर पुढील सुनावणी १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांच्या कोर्टात हा अर्ज दाखल करण्यात आला आहे.

‘सीबीआय’तर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात डॉ. तावडे यांच्याविरुद्ध कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तावडेविरुद्ध कलम १२० ब, आणि भारतीय दंड विधान कायदा कलम ३०२ नुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास अजून सुरू आहे.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात वापरण्यात आलेली दुचाकी, हत्या प्रकरणात हात असलेले आरोपी, कट रचणारे यांचा तपास सुरू आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सुरू असलेल्या तपासासंदर्भातील अहवाल मुंबई हायकोर्टाकडे दाखल करण्यात आला आहे. हायकोर्टात १७ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. मुंबई हायकोर्टात याबाबत सुनावणी सुरू असल्यामुळे पुणे जिल्हा न्यायालयातील डॉ. तावडेविरुद्धची सुनावणी सुरू करण्यास स्थगिती देण्यात यावी, असा अर्ज ‘सीबीआय’तर्फे करण्यात आला आहे.

डॉ. तावडे याच्यातर्फे वकील अॅड. नागेश ताकभाते यांनी ‘सीबीआय’च्या या अर्जाला विरोध केला. ‘सीबीआय’तर्फे अशा प्रकारचे आतापर्यंत दहा अर्ज दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या खटल्याच्या सुनावणीला स्थगिती देण्याची मागणी आहे. तसेच हायकोर्टातही सुनावणी सुरू असल्यामुळे जिल्हा न्यायालयात सुनावणी होऊ नये या मागणीला आपला विरोध असल्याचे अॅड. ताकभाते यांनी सांगितले. हायकोर्टात दाखल असलेल्या अर्जावर सुनावणी सुरू असली, तरी जिल्हा न्यायालयातील सुनावणी सुरू करण्यात यावी अशी आपली मागणी आहे, असे डॉ. ताकभाते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात रिक्षांचा कडकडीत बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
परिवहन शुल्क वाढीच्या विरोधात रिक्षा, स्कूल व्हॅन या प्रवासी वाहनांसह माल वाहतूक करणाऱ्या वाहनांनी मंगळवारी कडकडीत संप पाळण्याने नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. शहरातील बहुतांश सर्वच रिक्षा स्टँडवर रिक्षा नसल्याचे दिसून आले.

केंद्र सरकारच्या आदेशाने राज्याच्या परिवहन विभागाने शुल्कात प्रचंड वाढ केली आहे. त्या विरोधात विविध प्रवासी संघटनांनी ‘चक्का जाम’ आंदोलन पुकारले होते. यामध्ये रिक्षासह स्कूल व्हॅनचालक देखील सहभागी झाले होते. त्यामुळे सकाळच्या वेळेत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची धांदल उडाली होती.

प्राथमिक शाळा या बहुतांश सकाळच्या वेळेत असल्याने पालकांची धांदल उडाली होती. तसेच, ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाठी मुख्य साधन असलेल्या रिक्षा उपलब्ध न झाल्याने त्यांना पर्यायी साधने मिळविताना कसरत करावी लागली. तर, तुरळक ठिकाणी रिक्षा चालक प्रवासी सेवा देत असल्याचे निदर्शनास आले.

मात्र, त्यामध्ये संपकरी रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी सेवा देणाऱ्यांच्या रिक्षाच्या चाकातील हवा सोडून दिली, त्यांना जबरदस्ती रिक्षा बंद ठेवण्यास भाग पाडल्याचे प्रकारही घडले.

बंद दरम्यान रस्त्यावर नेहमीच्या तुलनेत काही प्रमाणात गर्दी कमी होती. त्यामुळे रस्ते मोकळे वाटत होते. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमध्ये नेहमीपेक्षा किंचितच जास्त गर्दी असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, जे प्रवासी किंवा शाळकरी विद्यार्थी पीएमपी बसने प्रवास करीत नाहीत, त्यांना बस व मार्ग माहिती नसल्याने काही प्रमाणात अडचण झाली.

‘पीएमपी’ला कमी उत्पन्न

पीएमपीच्या रोज चौदाशे ते साडेचौदाशे बस प्रवासी सेवेत असतात. ‘चक्का जाम’च्या पार्श्वभूमीवर पीएमपीने दोनशे ते अडीचशे जादा बसचे नियोजन करण्याचे ठरविले होते. मात्र, वर्कशॉप विभागाकडून नादुरुस्त बस उपलब्ध होऊ न शकल्याने केवळ १५०७ बस मार्गावर धावल्या. तर, सायंकाळी पाच वाजेपर्यंत पीएमपीच्या ९७ आणि भाडेतत्त्वावरील १०५ गाड्या ब्रेक डाऊन झाल्या. त्यामुळे या एका दिवसात अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्न मिळाल्याचे पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इन्फोसिस’ला जाब विचारणार

$
0
0

पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांचे स्पष्टीकरण

पुणे : ‘हिंजवडीतील ‘इन्फोसिस’ कंपनीमध्ये आयटी इंजिनीअर तरुणीच्या खून प्रकरणात सुरक्षिततेच्या काय उपाययोजना केल्या होत्या. याबबात कंपनीला पत्र लिहून विचारणा करणार आहे,’ असे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले. तसेच, महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत निर्माण होणाऱ्या प्रश्नांची विचारणा पत्रातून केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘इन्फोसिस’ कंपनीमध्येच सुरक्षारक्षकाने रसिला राजू ओ. पी. हिचा खून केल्याने आयटी कंपन्यांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आयटी कंपन्या सुरक्षेची साधने पुरवण्यापुरतीच जबाबदारी घेत असून त्याच्या वापराकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे उघड झाले आहे. ‘इन्फोसिस’ कंपनीच्या आतमध्ये ही घटना घडल्याने संपूर्ण आयटी क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या तरुण-तरुणींमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या घटनेमुळे सुरक्षिततेबाबतचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

‘इन्फोसिस’ कंपनीच्या परिसरात आणि विभागामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. पण, ते कोणी पाहत होते का, एकट्या महिलेला रविवारी कामाला बोलविण्यात आले होते. त्या वेळी संपूर्ण मजल्यावर ती एकटी होती. ज्या ठिकाणी सुरक्षारक्षकांना जाण्याची परवानगी नाही, तेथे भावेन सैकिया हा तीन ते चार वेळा कसा गेला, सीसीटीव्हीवरून कोणी लक्ष ठेवून असते, तर त्यांच्या ही गोष्ट कशी लक्षात आली नाही, आपल्या कामाच्या जागेवर रसिला दोन ते तीन तास नाही, ती कॉन्फरन्स रूममध्ये होती. हे सीसीटीव्हीवर कोणी लक्ष ठेवून असते, तर त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होते. बेंगळुरूच्या कार्यालयातून फोन आला नसता, तर रसिलाचा मृत्यू झाला आहे हे समजायला आणखी वेळ लागला असता. सुपरवायझरने त्यावर लक्ष का ठेवले नाही, अशा प्रसंगी अलार्मची सुविधा पुरविली गेली पाहिजे, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सुट्टीच्या दिवशी कसे बोलविले?

‘इन्फोसिस’ कंपनीमध्ये रसिला राजू ओ. पी. ही सुटीच्या दिवशी कामावर आली होती. त्याबाबत बोलताना पोलिस आयुक्त शुक्ला म्हणाल्या, ‘आयटी कंपन्यांमध्ये महिलांना पुरेशी सुरक्षा पुरविली जात नाही, असे या घटनेवरून दिसून येत आहे. तेथे सीसीटीव्ही असले, तरी त्यावर लक्ष ठेवले जात नव्हते. सुट्टीच्या दिवशी एकाच मुलीला कामाला कसे बोलविले हाही कंपनी व्यवस्थापनाने विचार करण्याचा मुद्दा आहे. याबाबत कंपनीला पत्र लिहून विचारणा करणार आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आयटी’ कर्मचारी दहशतीत

$
0
0

पुणे : हिंजवडी आयटी पार्कमध्ये स्थानिक आणि बाहेरचे या संघर्षातून घडणाऱ्या किरकोळ चकमकींमुळे ‘आयटीयन्स’ दहशतीखाली वावरत असल्याची भावना व्यक्त होत आहेत. प्रत्येक वेळी पोलिसांकडे तक्रार करणे शक्य नसल्याने ‘स्ट्रीट क्राइम’ तरी रोखा, अशी या आयटी कर्मचाऱ्यांची विनंती आहे.

दहशतीमुळे आयटी पार्कमध्ये गेल्यापासून तेथून बाहेरपडेपर्यंत स्थानिकांपासून स्वत:ला दूर कसे ठेवता येईल, याचाच विचार होतो. रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करताना, पेट्रोल पंपावर रांगेत उभे राहताना, चहाच्या टपरीवर चहा पिताना, खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर शुल्लक कारणांवरून भांडणांचे प्रकार घडत आहेत. त्यातून स्थानिक, बाहेरचा अशी वर्गवारी होत असून ‘आयटीयन्स’ मार खात असल्याच्या घटना घडल्या आहेत. परराज्यातील ‘आयटीयन्स’ला हा त्रास अधिक आहे.

‘इन्फोसिस’ची कर्मचारी रसिला राजू ओ. पी. हिच्या खुनाच्या घटनेनंतर येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आयटी पार्कमध्ये बहुराष्ट्रीय आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे बहुतांश कर्मचारी हे पुण्याबाहेरील आहेत. या परिसरात काही वर्षांपासून अनोखळी लोकांकडून शुल्लक कारणांहून हल्ले होत आहे, कर्मचाऱ्यांकडील पाकीट व मोबाइल हिसकावून घेण्याचे प्रकार वाढले आहेत. रस्त्यावर वाहन चालवताना एखाद्याला चुकून धक्का लागला, तरी त्याचा मोठा गाजावाजा होतो. अनेकदा अपमानास्पद वागणूक मिळते, कधी मारहाणही होते. पैशांची मागणी होते. या घटनांनी ‘आयटीयन्स’ वैतागले असल्याची भावना प्रितेशने (नाव बदलले आहे) व्यक्त केली. परराज्यातील एखादी व्यक्ती असेल, तर तिला वेगळाच अनुभव येतो, असे सागरने (नाव बदलले आहे) सांगितले.

पोलिसांची गस्त वाढवा

‘आयटी पार्क’मध्ये रात्रीच्या वेळी वर्दळ कमी असते, तसेच कंपन्यांच्या आवारात पोलिसांची गस्त कमी असते. काही ठराविक व्यक्ती ‘आयटीयन्स’ची टिंगल-टवाळी करतात. मारहाण होण्याच्या भीतीने त्यांना विरोध होत नाही. किरकोळ लुटमारीचे प्रकार नित्याचे झाले आहेत. त्याची फारशी पोलिसांत तक्रारही होत नाही, असे अभिजितने (नाव बदलले आहे) सांगितले. सुटीच्या दिवशी आणि रात्रपाळीत महिला कर्मचाऱ्यांना नोकरीवर बोलवण्याचे कंपनी प्रशासनाने टाळावे, असे श्रुतीने (नाव बदलले आहे) सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा

$
0
0

‘इन्फोसिस’मधील तरुणीच्या खून प्रकरणानंतर चिंता

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘आमच्या कंपनीतील महिला आणि पुरुष कर्मचारी सुरक्षित आहेत, असे सांगून जबाबदारीपासून झटकणाऱ्या कंपन्यांसाठी हिंजवडीत रविवारी घडलेली घटना ही धोक्याची घंटा आहे. कंपनीतील यंत्रसामुग्रीची जेवढी देखभाल करता, तेवढीच काळजी कर्मचाऱ्यांचीही घेतलीच पाहिजे,’ असे स्पष्ट मत ‘कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज’च्या (सीआयआय) पश्चिम विभागाचे माजी अध्यक्ष प्रदीप भार्गव यांनी व्यक्त केले.

दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर भार्गव यांच्या नेतृत्त्वाखाली ‘सीआयआय’ने महिलांच्या सुरक्षेबद्दल पुढाकार घेतला होता. या अंतर्गत शहरातील विविध आयटी सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये जाऊन ‘कार्यालयात महिलांवर होणारा हिंसाचार’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आल्या. महिलांच्या सुरक्षेसाठी अस्तित्वात असलेले कायदे, सरकारी पातळीवर राबविण्यात येत असलेले उपक्रम आणि तंत्रज्ञानाचा सुरक्षेसाठी होणारा उपयोग अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये चार हजारांहून अधिक महिला कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. या उपक्रमातील निरीक्षणे भार्गव यांनी ‘मटा’शी शेअर केली.

‘आजही अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांबद्दल गंभीर नाहीत. आमच्याकडे कोणतेही गैरप्रकार घडत नसून महिला सुरक्षित आहेत. स्वतंत्र समित्यांची आम्हाला गरज वाटत नाही, अशी उत्तरे कार्यशाळांदरम्यान बहुतांश अधिकाऱ्यांनी दिली. दुसऱ्या बाजूला महिला कर्मचारी स्वतःच्या सुरक्षेबद्दल जागरूक नसल्याचे दिसून आले,’ असे भार्गव यांनी सांगितले.

‘महिला आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने अनेक नियम बनवले आहेत. मात्र त्याच्या अंमलबजावणीमध्ये कंपन्या कमी पडत आहेत. या कंपन्यांमध्ये घडणाऱ्या गैरप्रकारांवर पोलिस किंवा शासकीय यंत्रणा नियंत्रण करू शकणार नाही. ते अधिकाऱ्यांना करावे लागतील. हिंजवडीमध्ये सातत्याने घडत असलेल्या घटना या धोक्याची घंटा आहे. एकीकडे कंपन्यांमधील यंत्रसामुग्रीची नियमित देखभाल, वेगवेगळ्या प्रकारचा विमा उतरवण्याबद्दल कंपन्या जागरूक असतात. मात्र कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होते आहे,’ असे भार्गव म्हणाले.

सिक्युरिटी एजन्सीचा परवाना संपलेला

‘इन्फोसिस’ कंपनीने अंतर्गत सुरक्षेचे कामकाज दिलेल्या ‘टेरीटरी सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रा. लि.’ या कंपनीचा परवाना संपल्याचे समोर आले आहे. या कंपनीने परवाना नूतनीकरणासाठी पोलिसांकडे अर्ज केला होता. पण, अपूर्ण कागदपत्रांमुळे परवाना नूतनीकरण झाले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याप्रकरणी कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल,’ अशी माहिती सहपोलिस आयुक्त सुनील रामांद यांनी दिली. ‘इन्फोसिस’मधील महिला कर्मचाऱ्याच्या खुनच्या घटनेनंतर कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इन्फोसिस कंपनीतील अंतर्गत सुरक्षेचे काम बेंगळुरू येथील ‘टेरीटरी सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रा. लि.’ या कंपनीला दिले होते. या कंपनीने तत्कालीन सहपोलिस आयुक्तांकडून २०११मध्ये सिक्युरिटी एजन्सीचा परवाना घेतला होता. त्याची मुदत नोव्हेंबर २०१६पर्यंत होती. अद्यापर्यंत परवान्याचे नूतनीकरण झालेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गैरप्रकार रोखण्यासाठी खबरदारी घेणार’

$
0
0

पुणे : ‘हिंजवडीतील सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणीची हत्या ही अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. मात्र, भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी योग्य खबरदारी घेण्यात येईल. महिला कर्मचाऱ्यांशी संवाद वाढविण्याबरोबरच शक्यतो त्या एकट्या असणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल. तसेच सिक्युरिटी एजन्सीजबाबतही आवश्यक दक्षता घेण्यात येईल,’ अशी माहिती हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पटवर्धन यांनी दिली.

विविध माध्यमातून महिला कर्मचाऱ्यांशी संवाद वाढविण्यासाठी ‘एचआयए’च्या सदस्य कंपन्यांना सूचना देण्यात येत आहेत. त्यासाठी हिंजवडी पोलिसांच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. असे कार्यक्रम आयोजित करून काय करावे, काय करू नये, याचे मार्गदर्शन केले जाईल, असे पटवर्धन यांनी स्पष्ट केले. ‘कॉर्पोरेट क्षेत्रात नव्याने येणाऱ्यांसाठी ‘बडी’ संकल्पना राबविण्यात येते. यामध्ये एखादा अनुभवी सहकारी या नव्या सहकाऱ्याला तो कॉर्पोरेट क्षेत्रात रूळेपर्यंत मार्गदर्शन करतो. कोणती सिक्युरिटी एजन्सी नेमायची, याचा निर्णय संबंधित कंपनीचा असतो. मात्र, त्याविषयी योग्य दक्षता बाळगणे आणि सिक्युरिटी एजन्सींना त्यांच्या कर्मचाऱ्यांवरील लक्ष वाढविण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

एखाद्या प्रकल्पावर काम करत असताना त्या संदर्भातील निर्णय परिस्थितीनुसार घ्यावे लागतात. त्यामुळेच संबंधित युवतीला कामावर यावे लागले असेल. मात्र, शक्यतो कोणीही एकट्याने कामावर येणार नाही, या संदर्भात यापुढे दक्षता घ्यावी लागेल. हिंजवडी आयटी पार्क परिसरातील सुरक्षा व्यवस्थेसाठी जॉइंट सिक्युरिटी टास्क फोर्सच्या माध्यमातून बंदुकधारी जवान गस्त घालत आहेत. तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मेट्रोझिप प्रकल्प राबविला जात आहे,’ असेही पटवर्धन यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅम्प भागात तरुणीचा विनयभंग

$
0
0

पुणे : हिंजवडी येथील आयटी कंपनीत इंजिनीअर तरुणीच्या खुनाची घटना ताजी असतानाच कॅम्पात वडिलांसोबत फुटपाथवरून निघालेल्या तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री घडला. तरुणीने आरडा-ओरडा केल्यानंतर आरोपीला नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर नियत्रंण कक्षाला फोन करून घटेची माहिती दिली. लष्कर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. या घटनेनंतर परिसरात चांगलाच गोंधळ उडाला होता.

अनिलकुमार बंसीघर शेट्टी (रा. कोहिनूर हॉटेल, एम. जी. रोड) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी २४ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार, लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पीडित तरुणी नोकरी करते. तिचे वडील लष्करामधून कमांडर या पदावरून निवृत्त झाले आहेत. वडिलांसोबत ती राहते. आरोपी अनिलकुमार हा हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. तो काम संपल्यानंतर तेथील फुटपाथवर थांबलेला असतो. सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी व तिचे वडील कॅम्प परिसरातील अरोरा टॉवर येथील फुटपाथवरून पायी जात होते.

तरुणी ही वडिलांच्या मागे चालत होती. त्या वेळी आरोपी अनिलकुमार हा तरुणीच्या पाठीमागे गेला. तरुणीने त्याला दोन वेळेस पाठीमागे का येतोस, असे विचारले. मात्र, तरीही तो तिच्या पाठीमागे येत होता. त्यानंतर त्याने तरुणीचा विनयभंग केला. त्यानंतर तरुणीने त्याला धरून ठेवत आरडा-ओरडा केला. त्या वेळी तेथील लोकांनी धाव घेऊन अनिलकुमारला चोप दिला. नागरिकांनी पोलिस नियत्रंण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली. नियत्रंण कक्षाने लष्कर पोलिसांना माहिती कळवली. त्यानंतर लष्कर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अनिलकुमारला ताब्यात घेतले. या प्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे जिल्ह्यात ‘चक्का जाम’

$
0
0

टीम मटा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी यासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी जिल्हाभरात ठिकठिकाणी ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग रोखून धरले होते.

सोलापूर महामार्ग रोखला

दौंड : सकल मराठा समाजाने आरक्षणसह विविध मागण्यांसाठी केलेले ‘चक्का जाम’ आंदोलन दौंड तालुक्यात शांततेत पार पडले. दौंड तालुक्यातुन जाणाऱ्या पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर कासुर्डी टोल नाका, केडगाव चौफुला, कुरकुंभ, खडकी येथे आंदोलन झाल्याने महामार्ग ठप्प झाला होता.

दौंड तालुक्यातील राज्य मार्गांवरही ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले. बारामती-कर्जत राज्यमार्गावर आटोळे वस्ती राजेगाव येथे, चौफुला-शिरूर मार्गावर पारगाव येथे, दौंड शहरात नगर मोरी चौक येथे मराठा समाजातर्फे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सकाळी अकराच्या दरम्यान वाहतूक रोखून धरली होती. तरुण आणि शेतकरी रस्त्यावर उतरले होते. काहि ठिकाणी महिला आणि तरुणींची उपस्थिती लक्षणीय होती. कुरकुंभ, दौंड येथे पोलिस आणि महसूल खात्याच्या प्रतिनिधींना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.

न्हावरा फाट्यावर आंदोलन

शिरूर : पुणे-नगर रस्त्यावर न्हावरा फाटा येथे शिरूरमधील सकल मराठा समाजाने ‘चक्का जाम’ आंदोलन केले. आमदार बाबुराव पाचर्णे, पंचायत समितीचे माजी उपसभापती आनंद हरगुडे, शिरूर मुद्रण संघटनेचे अध्यक्ष बाबुराव पाचंगे, संतोष मोरे, कैलास भोसले, शिरूर नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे, तर्डोबाचीवाडीचे उपसरपंच संभाजी कर्डिले, सचिन जाधव, कुणाल काळे, राहुल दसगुडे, नामदेव घावटे, संजय शितोळे आदी या वेळी उपस्थित होते.

आंदोलनकांच्या वतीने तहसीलदार राजेंद्र पोळ यांना सानिका खोडदे, ऋतुजा गणेश खोले यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना तातडीने फाशी द्यावी, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी, शिवस्मारकाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे आदी मागण्या करण्यात आल्या. रवींद्र मांढरे यांनी सूत्रसंचालन केले, तर बाबुराव पाचंगे यांनी आभार मानले.

बारामतीतही आंदोलन

बारामती : मराठा क्रांती मोर्चानंतर विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बारामती शहरासह तालुक्याच्या विविध भागात सकल मराठा समाजाच्या वतीने ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना अनेक भागात वाहतूक कोडींचा सामना करावा लागल्याचे चित्र दिसले.

बारामती शहरातील मोरगाव, भिगवण, पाटस, इंदापूर रोड येथील सर्व टोलनाके त्याचप्रमाणे फलटण रोड, तर तालुक्यातील माळेगाव, मोरगाव, उंडवडी, सांगवी, भवानीनगर, करंजेपूल, सोमेश्वरमध्ये ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले.

मराठा आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल, कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. पोलिसांनी आंदोलकांना बाजूला करून महामार्ग मोकळा केला. आंदोलकांवर मुंबई पोलिस अधिनियम ६८/६९ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे, असे पोलिस अधीक्षक तान्हाजी चिखले यांनी सांगितले.

येरवड्यात रास्ता रोको

येरवडा : ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’...‘आरक्षण आमच्या हक्काचे’...‘कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशी झालीच पाहिजे’...अशा घोषणा देत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी येरवड्यातील पर्णकुटी चौकात मंगळवारी रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी राज्याच्या विविध जिल्ह्यांत मूक मोर्चाद्वारे रान पेटवले होते. लाखोंच्या संख्येने मराठा समाजाने मोर्चे काढूनही सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला नाही. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा समाजाने विविध जिल्ह्यांत मंगळवारी चक्का जाम आंदोलन केले. येरवड्यातील पर्णकुटी चौकात आंदोलनात यशवंत देवकर, शैलेश राजगुरू, अविनाश सुकुंडे, योगेश शेटे, किशोर बोंबले, गणेश पानसरे, श्रीनिवास दिसले आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पर्णकुटी चौकात बंदोबस्त तैनात केला होता.

आंदोलकांच्या हालचाली टिपण्यासाठी येरवडा पोलिसांकडून प्रथमच ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला. मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त अरविंद चावरीया, विशेष विभागाचे श्रीकांत पाठक सकाळपासूनच पर्णकुटी पोलीस चौकीत तळ ठोकून होते. खडकीचे सहायक आयुक्त वसंत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा, विमानतळ आणि चंदननगर पोलिस ठाण्यांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त सुनील खळदकर, पोलिस निरीक्षक बाजीराव मोळे आणि कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाकणला कारखान्यात आग

$
0
0

राजगुरूनगर : चाकण औद्योगिक वसाहतीतील नाणेकरवाडी हद्दीत असलेल्या ‘अल्फा फॉम’ या कंपनीला मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

आग लागली त्या वेळी कामगारांची जेवणाची सुट्टी झाली होती. त्यामुळे सुदैवाने या आगीत कुणीही जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच बंब आणि पाण्याच्या टँकरचा वापर करून दुपारी तीनपर्यंत ही आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेत कारखान्याच्या पाठीमागे असलेल्या औद्योगिक शॉपसह कच्चा व पक्का माल, काही यंत्रसामग्री, फर्निचर जळून खाक झाले. संबंधित कंपनीत फॉम (प्लास्टिक) असल्याने अवघ्या काही वेळात आग सर्वत्र पसरली. आगीचे नेमेके कारण स्पष्ट होऊ शकले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोंदूबाबाने लांबवले महिलेचे ३५ तोळे सोने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

घरात वास्तुशास्त्राचा दोष असल्याची भीती दाखवून भोंदूबाबाने विधवा महिलेचे ३५ तोळे दागिने लांबवल्याचा प्रकार वानवडीत. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी भोंदूबाबाला अटक केली असून, त्याच्याकडून सोने जप्त करण्यात आले आहे.
हितेंद्र सतीश इंगळे (वय ३२, रा. संजीवनी सोसायटी, सहकारनगर) असे भोंदूचे नाव आहे. या बाबत एका महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचा सोपानबाग येथे बंगला आहे. २०१३ मध्ये तिच्या पतीचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यानंतर सासूचे निधन झाले. त्यामुळे महिला एकटीच राहात होती. त्यानंतर तिच्या मैत्रिणीने भोंदूची माहिती दिली. तो घरातील दोष दूर करेल, असेही सांगितले.
भोंदूबाबा महिलेच्या घरी आला. त्याने तुमच्या वास्तुमध्ये दोष असून, त्यासाठी पूजा करावी लागेल असे सांगितले. तसेच, पूजेसाठी ३५ हजार रुपये घेतले. तसेच, तुमचे आणि मुलांचे बरेवाईट होईल, अशी भीतीही दाखविली. या वस्तू शुद्ध करू घ्यावी लागेल असेही सांगितले. महिलेने सोने लॉकरमध्ये असल्याचे सांगितले. लॉकरमधील सोने पेटीत घालून आण आणि या विषयी कोणालाही वाच्यता न करण्यास बजावले. पण, महिलेने सोने पाहिल्याने ते नदीत फेकून देण्याविषयी बजावले. त्यानंतर बाबाचा संपर्क होत नसल्याने ती रडकुंडीला आली. त्यानंतर ओळखीच्या मंडळींनी या फसवणुकीविरोधात पोलिसांना संपर्क करण्यास सांगितले. त्यानंतर या महिलेने वानवडी पोलिसांकडे जाऊन वरिष्ठ निरीक्षक सचिन सावंत यांच्याकडे तक्रार केली. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागूल यांच्या पथकाने भोंदूच्या मुसक्य वळल्या. त्याच्याकडून महिलेचे ३५ तोळे सोने पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी बागूल अधिक तपास करत आहेत.

सोनसाखळी चोर अटकेत
शहरातील पंधरापेक्षा अधिक गुन्ह्यांत फरार असलेल्या अल्पवयीन सोनसाखळी चोराला वानवडी पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून वानवडी पोलिसांच्या हद्दीतील चार सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. दोन लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विविध मागण्यांसाठी विद्यापीठात उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मिळणाऱ्या भोजनाचा दर्जा सुधारावा आणि मांसाहारी पदार्थ मिळावेत, ‘कमवा आणि शिकवा’ योजनेत मानधन वाढवावे, विद्यापीठात मोफत बस सुरू करावी, आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्याची सुविधा निर्माण करावी अशा विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. उपोषणात विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.
अभाविपने विद्यापीठ प्रशासनाच्या कारभाराविरोधात तसेच विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात प्रतीक दामा, हरीष पाटील, ऐश्वर्या भणगे, कृणाल सपकाळे, सागर रायते, श्रीराम कंधारे आदी सहभागी झाले आहेत. ‘कमवा आणि शिका’ योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणारे मानधन वाढवावे. विद्यापीठात रिफेक्ट्रीत मिळणाऱ्या भोजनाचा दर्जा सुधारण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर भोजनात मांसाहारी पदार्थांचा समावेश करण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. विद्यापीठाचा परिसर मोठा असल्याने परिसरात फिरण्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत बससेवा पुरविण्यात यावी तसेच विद्यार्थ्यांना चांगले भोजन मिळण्यासाठी विद्यापीठाच्या आर्थिक संकल्पातून भोजनासाठी तरतूद करावी, अशा मागण्या केल्या आहेत.
आरोग्य केंद्रात विद्यार्थ्यांवर केवळ तात्पुरत्या स्वरूपात उपचार न करता त्यांना दाखल करुन घेण्याची सुविधा निर्माण करावी, अशीही मागणी या वेळी विद्यार्थ्यांनी केली. दरम्यान, मागण्यांची पूर्तता होईपर्यत आमरण उपोषण सुरु राहील, असे अभाविप विद्यापीठ शाखेचे अध्यक्ष प्रतीक दामा यांनी सांगितले.

‘डॉ. गाडे बायोडाटा द्या’
काही दिवयसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांच्यावर बायोडेटावरून आरोप करण्यात आले होते. त्यावर डॉ. गाडे यांनी बायोडेटाबाबत खुलासा जाहीर करू, असे सांगितले होते. मात्र, डॉ. गाडे यांनी अद्याप बायोडेटाची माहिती दिलेली नाही. त्यामुळे डॉ. गाडे यांनी बायोडेटाची माहिती द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतप्रकटीकरण विध्वंसक नसावे

$
0
0

गडकरीपुतळाप्रकरणी अमोल पालेकर यांचे मत; कलाकारांची बैठक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘ऐतिहासिक गोष्टींविषयीची आपली मते विध्वंसक पद्धतीने व्यक्त करणे चुकीचे आहे. या गोष्टींचा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ठामपणे; परंतु अहिंसक व कायदेशीर पद्धतीने निषेध करणे आवश्यक आहे,’ असे मत प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी व्यक्त केले.
राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करण्यासाठी मंगळवारी कलाकारांनी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीनंतर पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला आणि पालिका आयुक्त कुणाल कुमार यांना निवेदन देण्यात आले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अंतर्गत कलाकारांनी ही बैठक घेतली. ‘पुतळ्याची पुनर्स्थापना होईपर्यंत महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक नाट्यप्रयोगादरम्यान आपल्या भूमिकेची मांडणी करावी. प्रेक्षकांपर्यंत विचार पोहोचवावा. कलावंतांनी एकत्र येऊन फक्त निषेध केला, एवढ्यापुरते हे मर्यादित न राहता, रसिक प्रेक्षक, मराठी माणूस आपल्या पाठीमागे उभा आहे, हे चित्र यातून दिसावे. हे जर दिसले, तर आपण जे सांगू पाहायचा प्रयत्न करतो आहोत, ते नागरिक, प्रशासन, सरकार आणि हे कृत्य करणाऱ्यांपर्यंत ठामपणे पोहोचेल,’ असेही पालेकर म्हणाले.
या बैठकीत नाट्यकर्मी सतीश आळेकर, अभिनेते डॉ. मोहन आगाशे, दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, अभिनेता पुष्कर श्रोत्री, अभिनेता ऋषीकेश जोशी यांनीही मनोगत व्यक्त केले. इतिहासाकडे इतिहास म्हणून पाहायला हवे. सांस्कृतिक इतिहास जतन करायला हवा. आपल्याला आवडला नाही, म्हणून त्याचा विध्वंस करणे योग्य नाही. कलाकारांची किंवा कोणत्याची अभिव्यक्तीची अशा प्रकारे मुस्कटदाबी करणे योग्य नाही. गडकरी यांचे लेखन समजून घेतले गेलेले नाही. त्यांच्या लिखाणाबाबतच्या अज्ञानातून हे कृत्य घडले आहे, अशी मते या वेळी व्यक्त झाली. साऱ्यांनीच या घटनेचा निषेध करून सांस्कृतिक इतिहासाच्या जतनाविषयी आपली मते व्यक्त केली. श्रीरंग गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले.
या बैठकीस अभिनेता शरद पोंक्षे, दिग्दर्शक संध्या गोखले, अजय नाईक, प्रवीण तरडे, कार्तिक केंढे, संगीतकार राहुल रानडे, कवी संदीप खरे, विभावरी देशपांडे, रमेश परदेशी, योगिनी पोफळे आणि पुणे-मुंबईतील कलाकार उपस्थित होते.

‘गडकरी पोहोचावेत’

राम गणेश गडकरी यांचे लेखन, त्यांचे साहित्य आणि ज्यावरून वाद सुरू झाला ते राजसंन्यास नाटक यांविषयी अभिनेता ऋषीकेश जोशी यांनी सविस्तर माहिती दिली. गडकरी हा ऋषीकेश यांच्या अभ्यासाचा विषय आहे. त्यांनी नाटकातील लेखन कोणत्या भूमिकेतून झाले होते, गडकरी यांनी शेवटचा अंक लिहिला होता, त्या अंकातून गडकरी यांनी संभाजी महाराजांविषयी कोणती भूमिका मांडली आहे, हे सांगितले. या सर्व गोष्टी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या साहित्याचे वाचन गावोगावी होण्याच्या दृष्टीने काम सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तक्रारदार तरुणीलाच धमकी

$
0
0

Rohit.Athavale@timesgroup.com

Tweet : @AthavaleRohitMT

पिंपरी : वारंवार फोन करून त्रास दिल्याच्या तक्रारीवर कारवाई होण्याऐवजी उलट संबंधिताच्या धमकीला सामोरे जाण्याची वेळ हिंजवडीतील एका आयटी इंजिनीअर तरुणीवर आली आहे.

इन्फोसिसमधील रसिला राजू ओपी या तरुणीचा खून केल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली असतानाच असा आणखी एक प्रकार समोर आला आहे. संबंधित युवती एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत होती. तेव्हा तिला वेळोवेळी एका मोबाइलवरून सतत फोन येत होते. कंपनीत ने-आण करणारा कॅब चालकच फोन करीत असल्याचे तिला समजले. त्यामुळे तिने याबाबत त्याला तंबी दिली; तसेच कंपनीकडे तक्रारही केली. तिच्या घराच्या परिसरातील पोलिसांनाही लेखी स्वरूपात हा प्रकार कळविण्यात आला होता.

त्यानंतर या युवतीने सोमवारीच अन्य एका कंपनीत नोकरी स्वीकारली आणि तिथे ती रुजू झाली. रसिलाच्या खुनाचे वृत्त रविवारी सर्वत्र पसरले. याच वेळात नव्या कंपनीत रुजू झालेल्या त्या युवतीला अन्य एका मोबाइलवरून पुन्हा त्या कॅबचालकाने फोन केला आहे. त्याने केलेल्या प्रश्नामुळे संबंधित युवतीचे कुटुंब पूर्णतः घाबरून गेले आहे.

संबंधित युवतीबरोबर अन्य काहींनीही तक्रार केली होती. मात्र, याच युवतीला कॅबचालकाने फोन कसा केला, तिने तक्रार केल्याची माहिती कॅबचालकाला कोणी दिली, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहे. दरम्यान, रसिलाच्या खुनाप्रकरणी ‘इन्फोसिस’ला पत्र लिहून खुलासा मागविणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली.

एक कोटी रुपयांची मदत

सुरक्षारक्षकाने खून केलेल्या रसिला राजू ओपी या तरुणीच्या कुटुंबीयांस एक कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्याची तयारी ‘इन्फोसिस’ने दर्शविली आहे. यासंदर्भात कंपनीच्या प्रशासनाने एक पत्र लिहिले आहे. आर्थिक मदतीबरोबरच कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याची तयारीही कंपनीने दर्शविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवार दहा लाखांपर्यंत खर्च करु शकतात

$
0
0

पुणेः महापालिका, जिल्हा परिषद; तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. खर्चाची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांना दहा लाख रुपयांपर्यंत खर्च करता येणार आहे. निवडणुकीत सोशल मीडियावरही जिल्हा प्रशासनाची नजर असणार आहे.

महापालिका, जिल्हा परिषद; तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. खर्चाची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांना दहा लाख रुपयांपर्यंत खर्च करता येणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव नि. ज. वागळे यांच्या सहीने हा अध्यादेश सर्व महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी प्रसिद्ध करण्यात आला आहे. महापालिकेच्या सदस्य संख्येनुसार हा खर्च ठरवण्यात आला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची जिल्ह्यानुसार मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने ३० जुलै २०११ रोजी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषदा, नगर पंचायती आणि ग्रामपंचायती यांच्या निवडणुकांसाठी उमेदवाराने करायच्या खर्चाची मर्यादा निश्चित केली होती. मात्र, ती पुरेशी नसल्यामुळे आगामी महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने सुधारित करणे आवश्यक आहे, असे या अध्यादेशात म्हटले आहे. राज्य निवडणूक आयोगाला असलेल्या अधिकारानुसार ही वाढ करण्यात आली आहे.

बृहन्मुंबईसह १६१ ते १७५ सदस्य संख्या असलेल्या महापालिकांसाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा पाच लाखांवरून दहा लाख करण्यात आली आहे. यामध्ये पुणे महापालिकेचा समावेश होतो. आयोगाने घेतलेल्या या निर्णयामुळे पालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवाराला आता दहा लाख रुपयांपर्यंत खर्च करता येणार आहे. याबरोबरच १५१ ते १६० सदस्यसंख्या असलेल्या महापालिकांसाठी दहा लाख रुपये, ११६ ते १५० सदस्यसंख्या असलेल्या महापालिकेसाठी आठ लाख रुपये, ८६ ते ११५ सदस्यसंख्या असलेल्या महापालिकेला सात लाख रुपये, तर ६५ ते ८५ सदस्यसंख्या असलेल्या महापालिकेसाठी पाच लाख रुपयांपर्यंत मर्यादा वाढविण्यात आली आहे.

पंचायत समित्यांसाठी चार लाख रुपये

जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांमध्ये ७१ ते ७५ निवडणूक विभाग असलेल्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेसाठी सहा लाख रुपये, तर पंचायत समित्यांसाठी चार लाख रुपये उमेदवारांसाठी मर्यादा ठरवण्यात आली आहे; तसेच ६१ ते ७० निवडणूक विभाग असलेल्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेसाठी पाच लाख, तर पंचायत समित्यांसाठी साडेतीन लाख रुपये मर्यादा ठरवण्यात आली आहे. ५० ते ६० विभाग असलेल्या जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांसाठी चार लाख रुपये आणि पंचायतसमित्यांसाठी तीन लाख रुपये खर्चाची मर्यादा उमेदवारांना घालण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटी कंपन्यांनी काय करावे?

$
0
0

आयटी कंपन्यांनी काय करावे?

पोलिस आयुक्तांनी नाग‌रिकांकडून मागवल्या सूचना

म. टा. प्रतिनिधी, पुणे
इन्फोसिसमधील आयटी इंजिनीअर रसिला राजू ओपी हिच्या खुनाच्या घटनेमुळे आयटी पार्कमधील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आयटी पार्कमधील महिलांच्या सुरक्षिततेबाबत आयटी कंपन्यांनी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात, याची माहिती नागरिकांनी पाठवावी, असे आवाहन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केले आहे.
रसिला रविवारी नोकरीवर हजर होती. घटना घडली त्या मजल्यावर ती एकटीच काम करत होती. त्या वेळी सुरक्षारक्षक तिच्याकडे एकटक पाहत होता. त्याला विचारणा केली म्हणून त्याने तिचा खून केल्याची घटना घडली. रसिलाला रविवारी नोकरीवर का बोलावण्यात आले, ती एकटीच फ्लोअरवर कशी होती, सुरक्षा यंत्रणेकडून सीसीटीव्ही कॅमेरे मॉनिटर केले जात नव्हते का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर शुक्ला यांनी महिलांच्या सुर‌क्षिततेबाबत कंपन्यांनी कुठल्या उपाययोजना कराव्यात, यासाठी नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत. रसिलाच्या खुनाच्या घटनेमुळे आयटी कंपन्यांमधील अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महिला कर्मचाऱ्यांचे ‘वर्किंग अवर्स’, ‘वर्किंग शिफ्टस्’बद्दल सोशल मीडियावर चर्चा झडत आहेत. कंपन्यांच्या अंतर्गत सुरक्षिततेत अनेक त्रुटी असल्याचे बोलले जात आहे. त्या अनुषंगाने वस्तुस्थिती पोलिसांना समजावी आणि त्या अनुषंगाने उपाययोजना व्हाव्यात, यासाठी नागरिकांकडून, आयटी इंजिनीअर्सकडून उपाययोजना मागवण्यात आल्या आहेत, असे शुक्ला म्हणाल्या.
आयटी इंजिनीअर्स, पालक, सुरक्षिततेबाबत काम करणाऱ्या व्यक्तींना कंपन्यांतील अंतर्गत सुर​क्षेबाबतच्या सूचना www.punepolice.co.in या संकेतस्थळावर मांडाव्यात. त्यातील चांगल्या उपाययोजना स्वीकारून त्याचा अहवाल तयार केला जाणार आहे. त्यानंतर आयटी कंपन्यांमधील वरिष्ठ अधिकारी, ‘एचआर’ यांच्याशी चर्चा करून या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात येतील, असे शुक्ला यांनी सांगितले.
.................
सुरक्षा एजन्सींवर नजर
रसिलाच्या खुनाच्या घटनेने सुरक्षेतील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. पोलिसांच्या तपासातही कंपन्यांतील अंतर्गत सुरक्षिततेबाबत काही मुद्दे उपस्थित झाले आहेत. या अनुषंगाने पोलिसांनी बैठक घेत नियमावली तयार केली आहे. कंपन्यांमध्ये नेमण्यात येणाऱ्या सुरक्षा एजन्सीबाबतही पोलिसांकडून ठोस पावले उचलण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images