Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

तरुणांवर वार अन् वाहनांची तोडफोड

$
0
0
तिघा तरुणांवर तलवारीने वार आणि वाहनांची तोडफोड केल्याच्या आरोपावरून कोथरूड पोलिसांनी गुरुवारी तिघांना अटक केली. सुतारदऱ्यातील दत्तनगरमध्ये गुरुवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली. सकाळीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीती पसरली होती.

जातींचे अस्तित्व मजबूत होतेय!

$
0
0
‘सामाजिक चळवळींची स्थिती ढाळसण्याला आर्थिक व सामाजिक कारणे जबाबदार आहेत. जागतिकीकरणामुळे आपली मानसिकता अर्थकेंद्री झाली. त्यामुळे जनता आंदोलनापासून दूर गेली,’ असे असे मत ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी गुरूवारी व्यक्त केले. ‘आज जातींचे अस्तित्व मजबूत होत असून त्यामागे सत्ताकारण आणि अर्थकारणच कारणीभूत आहे,’ असेही डॉ. कोत्तापल्ले म्हणाले.

राजू शेट्टी यांना जामीन मंजूर

$
0
0
ऊसदरवाढीसाठी आंदोलनाचा वणवा भडकवणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी चार दिवसानंतर कोठडीतून बाहेर आले आहेत. त्यांना बारामती, दौड आणि इंदापूर अशा तीन तालुक्यांमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

गुन्हेगारांच्या माहितीसाठी CID चा खास विभाग

$
0
0
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून गुन्हेगारांची माहिती एकत्रित संकलित करण्यासाठी ‘क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन विंग’ या खास विभागाची स्थापना करण्यात आली आहे. या विंगमार्फत संबंधित पोलिस स्टेशन, रेल्वे, जेलमधील गुन्हेगारांची माहिती गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे, अशी माहिती सीआयडीचे अप्पर पोलिस महासंचालक एस. पी. यादव यांनी दिली.

उत्सवी माहौल अन् कामाच्या नावाने बोंब

$
0
0
दिवाळी साजरी करण्यासाठी नोव्हेंबरमध्ये पाच कर्मचाऱ्यांमागे एका कर्मचाऱ्याने रजा घेतल्याने किंवा उत्सवी वातावरणामुळे कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यातही आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी बाजी मारली असून, सुट्ट्यांच्या बाबतीत ते आघाडीवर आहेत. ‘असोचेम’ने केलेल्या पाहणीत हा निष्कर्ष निघाला आहे.

राज्य सहकारी बँकेला अजूनही परवाना नाहीच

$
0
0
राज्य सहकारी बँकेला अद्याप बँकिंग परवाना देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. ‘कर्जे आणि पुरेशा वसुलीसंदर्भात काही समस्या असल्याने ही बँक अजून बँकिंग परवान्यासाठी पात्र ठरलेली नाही,’ असे ते म्हणाले.

शरद जोशींनी घेतली नलावडे कुटुंबीयांची भेट

$
0
0
वसगडे येथे झालेल्या गोळीबाराला राजकीय वास येतो, त्यामुळे या गोळीबाराची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केली. त्यांनी शुक्रवारी वसगडे येथे जाऊन गोळीबारात बळी पडलेले शेतकरी चंद्रकांत नलावडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

देखभाल, दुरूस्तीसाठी २ लोकल्स रद्द

$
0
0
लोणावळा आणि मळवली रेल्वे स्थानकादरम्यान १६ ते २० नोव्हेंबरदरम्यान देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्यामुळे पुणे-लोणावळा दरम्यान दोन लोकलसेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

टीव्हीवरील बातम्यांचे ‘साइन इन’

$
0
0
कर्णबधिर व्यक्तींसाठी एक खूशखबर आहे. हिंदी आणि इंग्रजी भाषेतील शब्द थेट चिन्हांच्या भाषेत (साइन लॅँग्वेज) रूपांतरित होतील, असे सॉफ्टवेअर सी-डॅक तर्फे विकसित केले जात आहे. यामध्ये एक अॅनिमेटेड व्यक्तिरेखा चेहऱ्यावरील भावनांसह सांकेतिक भाषेतील रूपांतर सादर करणार आहे.

पुण्यात वर्षभरात २ कोटी रुपयांच्या चेन स्नॅचिंग

$
0
0
दरोडे घरफोड्या करण्यापेक्षा चोरट्यांना सोनसाखळी चोरी करणे आजकाल सोपे झाले आहे. गेल्या वर्षभराची सोनसाखळी चोरींची रक्कम पाहिली तर याचा अंदाज येईल... पुण्यात वर्षभरात आतापर्यंत तब्बल दोन कोटी १५ लाख रुपयांच्या सोनसाखळ्या चोरीला गेल्या आहेत!

चलनवाढीचा दर अजूनही उच्च

$
0
0
देशाच्या वाढीच्या दराची जाण रिझर्व्ह बँकेला असून, बँक त्याबाबत सजग आहे. मात्र, चलनवाढीचा दर हा अजूनही ‘उच्च’ आहे, असे बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी स्पष्ट केले. वाढीचा दर मंदावला असल्याने बँकेने व्याजदरात कपात करावी, अशी मागणी गेल्या काही काळापासून होत आहे.

रिक्षाच्या धडकेने साखळीचोर नागरिकांच्या तावडीत

$
0
0
पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून पळून जात असलेला चोरटा दुचाकी रिक्षाला धडकून खाली पडल्याने नागरिकांच्या तावडीत सापडला. कर्वेरोड येथे गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

दोन साखळीचोरांकडून २५ गुन्हे उघड

$
0
0
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोनसाखळी चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून २५ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. चोरट्यांकडून १३ लाख ११ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

राजू शेट्टी यांची सुटका

$
0
0
उसाच्या दरावरून सुरू झालेल्या आंदोलनाप्रकरणी अटक झालेले स्वाभिमानी शे‌तकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांचा जामीन शुक्रवारी बारामती कोर्टाने मंजूर केला.

‘सिमेंटच्या जंगला’वर कर्वेनगरमध्ये हातोडा

$
0
0
कर्वेनगरमधील राखीव वनासाठी आरक्षित असलेल्या सुमारे वीस एकर जमिनीवरील बेकायदा झोपड्या आणि पक्क्या घरांच्या अतिक्रमणांवर हातोडा टाकण्यात येणार आहे. महसूल विभाग आणि महापालिकेमार्फत येत्या काही दिवसांत ही कारवाई केली जाणार आहे.

ई-कच-याच्या ‘स्वच्छ’तेला उत्तम प्रतिसाद

$
0
0
लॅपटॉप आल्यामुळे घरच्या जुन्या कम्प्युटरचे करायचे काय… माझ्या आजोबांच्या काळातील रेडिओ माळ्यावर धूळ खात पडून आहे…तुटलेले चार्जर, बॅटरी, मिक्सर, ट्यूबचे टाकायच्या कुठे...असे अनेक यक्षप्रश्न सध्या बहुतांश घरांमध्ये निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘स्वच्छ’ संघटनेने ई-कचरा गोळा करण्याच्या हाती घेतलेल्या उपक्रमाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

कोट्यावधींना गंडा घालणा-यास अटक

$
0
0
स्टेशनरी व्यवसायात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत पुणे, पिंपरी, चाकण, राजगुरूनगर आणि साताऱ्यामध्ये अनेकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या भामट्यास सुमारे एक हजार कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली.

मासेमारीवरील बंदी कात्रजला पडली महाग

$
0
0
व्यावसायिक मासेमारी आणि बोटिंग बंद केल्यानंतर राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील तलावाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मृत मासे सध्या तलावाच्या पाण्यावर तरंगत आहेत, तर काही जलपर्णीत अडकून कुजल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

प्रज्ञाशोध केवळ १०वीच्याच विद्यार्थ्यांसाठी

$
0
0
राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा आता फक्त दहावीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच देता येणार आहे. परीक्षेचे संयोजन करणाऱ्या एनसीईआरटीतर्फे परीक्षेच्या नियमावलीमध्ये बदल करण्यात आला आहे. पूर्वी आठवीपासूनचे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकत होते.

एसटी स्थानकांचे विकेंद्रीकरण हवेच

$
0
0
शहरात असणाऱ्या एसटी बसस्थानकांचे विकेंद्रीकरण करावे, यावर वाहतूक पोलिस आग्रही आहेत. त्यासाठी एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्याबरोबर बैठक घेण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. बसस्थानकाच्या विकेंद्रीकरणाचा प्रश्न मार्गी लागल्यास शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा दावा वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी केला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images