Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

रस्तेखोदाई शुल्क सातशे रुपयांनी वाढणार

$
0
0
विविध केबल टाकण्यासाठी कराव्या लागणाऱ्या रस्तेखोदाईपोटी आकारण्यात येणाऱ्या खोदाई शुल्कामध्ये सातशे रुपयांनी वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिकेत सादर करण्यात आला आहे.

शिस्तीच्या अभावामुळे वाहतूक कोंडी

$
0
0
पिंपरी- चिंचवडमधील वाढती लोकसंख्या आणि बरोबरीने वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेता वाहतुकीच्या नियंत्रणासाठी कर्मचाऱ्यांच्याच शिस्तबद्ध कार्यपद्धतीचा अभाव असल्याचा आरोप पर्यावरण संवर्धन समितीने केला आहे.

सर्व्हर डाऊन:पालिकेची कामे ठप्प

$
0
0
महापालिकेच्या इंटरनेट कनेक्शनमध्ये बिघाड झाल्यामुळे जन्म-मृत्यू नोंदणीसह विविध कार्यालये आणि क्षेत्रीय कार्यालयांमधील कामकाज विस्कळीत झाले आहे. गेल्या आठवड्याभरात ही अडचण दूर न झाल्याने शेकडो नागरिकांची कामे अडली आहेत.

एमबीए प्रवेशाचे ‘दोन तुकडे’

$
0
0
राज्यांतील एमबीए प्रवेशासाठी यंदा अखिल भारतीय स्तरावर होत असलेल्या ‘कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट’ अर्थात ‘सीमॅट’ या परीक्षेचा स्कोअर ग्राह्य धरण्यात येणार असला, तरी प्रवेश प्रक्रियेचाच भाग असलेले ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू (जीडीपीआय) राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फतच (डीटीई) होणार आहेत.

सांगली जिल्हा 'अशांत' घोषित

$
0
0
ऊसदरासाठी हिंसक आंदोलन झाल्याच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा बुधवारपर्यंत (२१ नोव्हेंबर) ‘अशांत क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी सांगितले. या काळात जमावबंदी आदेशाचीही कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.

कातिल हत्येचा अहवाल सरकारकडे

$
0
0
येरवडा जेलमध्ये दहशतवादी कातिल सिद्दीकीच्या झालेल्या खूनप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्यात आली असून त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. या अहवालात ‘सीआयडी’तर्फे जेलमधील सुरक्षेसंदर्भात काही सूचना देण्यात आल्या असून राज्य सरकारने त्या मान्य केल्या आहेत.

पवारांच्या पोटातील जात ओठावर!

$
0
0
आपली ‘जात’ काढून केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या पोटात होते ते ओठात आले आहे. माझी जात ही शेतकऱ्यांची आहे, अशा शब्दात स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पवारांच्या टीकेला उत्तर दिले.

केबल वॉर: सातजणांना जन्मठेप

$
0
0
केबल वॉरमधून एका केबल व्यावसायिकाचा भरदिवसा निर्घृण खून आणि त्याच्या भावाला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातजणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सत्र न्यायाधीश एस. डी. दरणे यांनी नुकताच हा निकाल दिला. ही घटना दहा जून २०१० रोजी घडली होती.

सहकारमंत्र्यांचा ऊस पेटवला

$
0
0
ऊसदर आंदोलन भडकल्यानंतर सुरू झालेल्या एसटी जाळपोळीनंतर आता आंदोलकांनी आपला मोर्चा उसाकडे वळवला आहे. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा कळशी गावातील तीन एकर आणि त्यांचे जवळचे सहकारी मंगेश पाटील यांचा इंदापूर शहराजवळ असलेला पाच एकर ऊस जाळण्यात आला आहे.

मुबंईकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बंदोबस्त

$
0
0
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंदर्शनाला जाण्यासाठी शिवसैनिकांची रिघ लागणार असल्याची शक्यता लक्षात घेता मुंबईकडे जाणाऱ्या सर्व महामार्गांवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

थिएटर-नाट्यगृहांत ‘ब्लॅकआउट’

$
0
0
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाची शोककळा थिएटर आणि नाट्यगृहांमध्येही शनिवारी पसरली. नाट्यगृहांनी रात्रीच्या नाटकाचे प्रयोग, तर थिएटरवाल्यांनी संध्याकाळी सहा वाजल्यापासून सिनेमाचे शो रद्द केले. हा बंद आज, रविवारीही ( १८ नोव्हेंबर) कायम राहाणार असल्याचे समजते.

पीएफसी-एअर इंडिया लढत पुढे ढकलली

$
0
0
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील पुणे फुटबॉल क्लब विरुद्ध एअर इंडिया ही लढत पुढे ढकलण्यात आली आहे.

उत्स्फूर्त बंद, अंधारले आकाशकंदील!

$
0
0
शि‍वसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शहरातील दुकानदार, मॉल्स व हॉटेल्सचालकांनी आपले व्यवसाय बंद करून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. शहरातील प्रमुख बाजारपेठांसह व्यावसायिकांनी उत्स्फूर्तपणे बंद केला.

फेसबुकच्या वॉलचाही ‘वाघा’ला सलाम

$
0
0
बाळासाहेब ठाकरे गेले आणि अवघा महाराष्ट्र सुन्न झाला. बाळासाहेबांच्या निधनाची बातमी पसरताच काही वेळातच फेसबुकवर बाळासाहेबांच्या आठवणी जागविणाऱ्या पोस्ट आणि बाळासाहेबांच्या फोटोंनी फेसबुकची वॉल भरून गेली.

खडकीत कडकडीत बंद

$
0
0
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त बाजारपेठेत वाऱ्यासारखे पसरले आणि बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद करण्यास सुरवात केली. बाळासाहेबांना आदरांजली वाहणारा मजकूर सर्वच राजकीय पक्षांच्या आणि संघटनांच्या फलकावर दिसू लागला.

मैत्र जिवांचे...

$
0
0
राज्यभरात दरारा असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वैयक्तिक जीवनात कलाकार-चित्रकारांना महत्त्वाचे स्थान होते. अनेक कलाकारांबरोबर त्यांच्या गप्पा या एखाद्या मैफलीसारख्याच रंगत. त्यांचा हजरजबाबीपणाही अशा मैफलीत ठळकपणे समोर येतो. ठाकरे यांचे सुहृद ज्येष्ठ व्यंगचित्रकार हरिश्चंद्र लचके यांचे चिरंजीव आणि विज्ञानलेखक अनिल लचके यांनी सांगितलेल्या ‘कार्टूनिस्ट’ साहेबांच्या आठवणी...

वैद्य वाड्यातही होते ठाकरे कुटुंबीयांचे वास्तव्य

$
0
0
गांजवे चौक परिसरातील जुनी सदाशिव पेठ आताच्या नव्या पेठेचे रूप पालटले असले, तरी पूर्वी या भागातील जुन्या वाड्यांमध्ये दिग्गज मंडळी वास्तव्यास होती. आताचे मधुमत अपार्टमेंट आणि पूर्वीच्या वैद्य वाड्यामध्ये ठाकरे कुटुंबियही काही काळ राहत होते.

बाळासाहेबांमुळे अनेकांचा राजकीय जन्म

$
0
0
साहेबांचा सहवास लाभल्याने आणि त्यांच्या समवेत पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात दौरे करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. पुण्यात शिवसेनेच्या कार्याला सुभाष सर्वगौड यांच्यासह चौदा जणांनी सुरुवात केली. त्यात मी देखील होतो.

बाजारपेठा आज बंद

$
0
0
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाची बातमी कानावर येताच बंद झालेल्या शहरातील बाजारपेठा रविवारीही उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या भागातील भुसार, इलेक्ट्रीक बाजारासह सर्वच बाजारपेठा बंद राहतील. मार्केट यार्ड उत्स्फूर्तपणे बंद राहण्याची शक्यता आहे.

'कॉमन मॅन' दुखावला

$
0
0
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्याची बातमी टीव्हीवर पाहिली नि बाळासाहेबांचे जवळचे मित्र आणि एकेकाळचे ‘फ्री प्रेस जर्नल’मधील सहकारी ख्यातनाम व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांना धक्का बसला. सर्व लक्ष्मण कुटुंबीय टीव्हीसमोर येऊन बसले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images