Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वीज कमी वापरली तर जादा बिल?

0
0
दरमहा वीजवापर कमी असेल, तर ग्राहकांना सरसकट अंदाजपंचे जादा रकमेची बिले पाठविण्याचा सपाटा महावितरणने लावल्याची टीका स्वयंसेवी संघटनांनी केली आहे. यासंदर्भात महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रार करण्यात आली आहे.

बोअरिंग 'लेक्चर' इतिहासजमा होणार

0
0
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थीच नाही, तर प्राथमिक शिक्षकही नव्या अभ्यासक्रमाला सामोरे जाणार आहेत. शिक्षकांमध्ये नवा अभ्यासक्रम रुजविण्यासाठी एससीईआरटी नेहमीच्या ‘लेक्चर’ प्रशिक्षणाला फाटा देऊन तंत्रज्ञान आणि संवादी पद्धतींचा अवलंब करणार आहे.

ऊस आंदोलनावर सरकारचे नमते?

0
0
ऊसदराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हिंसक आंदोलनापुढे राज्य सरकारने नमते घेतल्याचे दिसून येत असून ‘ऊसदराबाबत हस्तक्षेप करणार नाही,’ असे आजवर म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी ‘ऊसाला चांगला दर मिळण्यासाठी प्रयत्न करू,’ असे आश्वासन मंगळवारी शेतकऱ्यांना दिले.

एसटी बससेवा सुरू

0
0
ऊस दरवाढीच्या आंदोलनामुळे ठप्प झालेली एसटीची वाहतूक पूर्वपदावर येऊ लागली आहे. कोल्हापूर, सोलापूर याठिकाणची बससेवा गुरुवारी दिवसभर सुरू होती. मात्र, सांगली आणि पंढरपूरची बससेवा सलग तिसऱ्या दिवशी एसटी प्रशासनाकडून बंद ठेवण्यात आली.

स्वारगेट-बोरिवली सेवा ठाणेमार्गे

0
0
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती नाजूक झाल्यामुळे मुंबईत वांद्रा परिसरात जाण्यासाठी वाहतूक सकाळपासून वाढली होती. त्यामुळे गुरुवारी स्वारगेटकडून बोरिवलीकडे जाणाऱ्या बस ठाणेमार्गे वळवण्याचा निर्णय एसटी प्रशासनाकडून घेण्यात आला.

पुण्यातूनही ‘नाऊकास्टिंग’

0
0
पुणे शहराचे पुढच्या आठ तासांचे तापमान काय असेल; पुढच्या सहा ते आठ तासांत पावसाची शक्यता आहे, की केवळ हवामान ढगाळ राहील; रात्रीचा गारठा वाढेल का, यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे नागरिकांना देण्यासाठी लवकरच पुणे वेधशाळेतर्फे ‘नाऊकास्टिंग’ची सेवा सुरू केली जाणार आहे.

नदीपात्रात महिलेचा मृतदेह सापडला

0
0
नवी पेठेतील एस. एम. जोशी पुलाखाली नदीपात्रात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. मात्र, अद्याप महिलेची ओळख पटू शकलेली नाही. तिने आत्महत्या केली असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

रिक्षाचालकाला मारहाण; लाखाचा ऐवज प‍‍ळ‍वला

0
0
रिक्षाचालकाला मारहाण करून रिक्षा, रोकड आणि मोबाइल असा सुमारे एक लाखाहून अधिक किमतीचा ऐवज पळवून नेल्याची घटना भाजी मंडई परिसरात बुधवारी रात्री दोन वाजता घडली. या प्रकरणी हडपसर पोलिसांन‌ी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पाणीवापर संस्थांसाठी घेणार एनजीओची मदत

0
0
महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्पांतर्गत घोड, कुकडी व मांगी या पाणीवापर संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येणार असून त्यासाठी स्वयंसेवी संस्थेची (एनजीओ) नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणीवापर संस्थांचा क्षमता विकास, परिणामकारक कार्यास उत्तेजन व त्यांचे संवर्धन करण्याचे काम ही एनजीओ करणार आहे.

सशस्त्र दरोड्यात ९० हजारांचा ऐवज लंपास

0
0
वैजापूर तालुक्यातील आघूर व रोटेगाव शिवारात सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने दोन घरांवर दरोडा टाकत एकाच कुटुंबातील तीन जणांना गंभीर जखमी केले. बुधवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत दरोडेखोरांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

दिवाळीत चॉकलेटना मागणी

0
0
दिवाळीच्या सणाला तोंड गोड करण्यासाठी यंदा देशवासियांनी वेगवेगळ्या मिठायांपेक्षा आकर्षक चॉकलेट्सना पसंती दिल्याचा ट्रेंड समोर आला आहे. यंदा मागणीत तब्बल ४५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे आढळून आले आहे. भारतीयांच्या बदलत्या आवडीनिवडींमुळे चॉकलेट्सचे मार्केट तब्बल साडेचार हजार कोटी रूपयांवर पोहोचले आहे.

शिक्षणातील गुणवत्तेचा होणार ऊहापोह

0
0
महाराष्ट्र बालशिक्षण परिषद, ग्राममंगल आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळातर्फे (एमकेसीएल) १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान एकोणिसाव्या राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाबरोबरच रचनावादी शिक्षणावरील प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात येणार आहे.

ऐन दिवाळीत एसटीचे दिवाळे

0
0
ऊस दरवाढीसाठी शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनामुळे पुण्याहून कोल्हापूर, सांगली, सोलापूरकडे जाणारी एसटीची बससेवा सलग तीन दिवस बंद राहिली. त्यामुळे एसटीच्या स्वारगेट आगाराचे पाच लाख ६८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

पुणे क्राइम डायरी

0
0
प्रेमाचे नाटक करून, लग्नाचे आमिष दाखवून, घरकाम करणाऱ्या मुलीला (वय १८, रा. पिंपळे निलख) शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी (१३ नोव्हेंबर) रात्री नऊ वाजता सांगवीमध्ये घडली. या प्रकरणी प्रदीप मोहन पासलकर (वय २४, अमोल पिंपळे निलख) याला पोलिसांनी अटक करण्यात आले आहे. (पुणे क्राइम डायरी)

दिवाळीचा मुहूर्त असाध्यच

0
0
शिवाजीनगर कोर्टाजवळ उभारण्यात येत असलेल्या नवीन फॅमिली कोर्टाच्या इमारतीचे बांधकाम निधीअभावी थंडावले आहे. फॅमिली कोर्टाचे दिवाळीत स्थलांतर करण्याच्या घोषणेला अद्यापही मुहूर्त लागणार नसल्याची चिन्हे आहेत.

हा तर न परवडणारा!

0
0
उसाला तीन हजार रुपये दर देण्याची शेतकरी संघटनांची मागणी ही साखर कारखान्यांना परवडणारी नाही. संघटनांच्या मागणीनुसार भाव दिल्यास पश्चिम महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने गोत्यात येत‌ील, अशी भीती सोलापूर जिल्ह्यातील ‘दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लिमिटेड, माळीनगर’चे चेअरमन कृष्णकांत कुदळे यांनी व्यक्त केली.

५०वर्षांनंतरही लष्कराचे हात रिकामे

0
0
संरक्षण विभागाची मुंढवा व भोसरी येथील ४१९ एकर १२ गुंठे जमीन औद्योगिक वसाहतीसाठी हस्तांतरीत करण्याबाबत राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री व संरक्षण मंत्र्यांमध्ये झालेल्या कराराला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, या जमिनीच्या बदल्यात संरक्षण विभागाला तेवढीच जमीन परत करण्याच्या अटीची पूर्तता अद्याप झालेली नाही.

माहितीची टाळाटाळ; दहा हजार दंड

0
0
प्रथम अपिल अधिकाऱ्यांची माहिती अर्जात नमूद केली नसल्याचे कारण सांगून माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या माहिती अधिकाऱ्याला त्यांच्या सेवेतील त्रुटी आणि निष्काळजीपणाबद्दल ग्राहक मंचाने फटकारले आहे.

शेट्टी-केजरीवाल भेट लांबणीवर

0
0
इंडिया अगेन्स्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल यांचा आजचा (शुक्रवार) नियोजित पुणे दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करा!

0
0
‘उसाच्या दरासाठी राज्यभरात आंदोलन करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शांतता पाळा आणि अहिंसेच्या मार्गाने आपला निषेध व्यक्त करावा,’ असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी केले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images