Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमाचा मसुदा सात डिसेंबरपर्यंत तयार

$
0
0
राज्यात शैक्षणिक वर्ष २०१३पासून लागू करण्यात येणाऱ्या प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या मसुद्याविषयी राज्यभरातून ४७५६ प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत. ज्ञानरचनावाद आणि आनंददायी शिक्षणावर भर देणाऱ्या आणि पाठ्यपुस्तकांचे ओझे कमी करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक कौशल्ये देऊ शकणाऱ्या या अभ्यासक्रमाविषयीच्या प्रतिक्रियांच्या समावेशाविषयी सध्या विचार सुरू आहे.

धरणे आंदोलनाचा एसटीला फटका

$
0
0
एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित केलेल्या धरणे आंदोलनाचा फटका पुण्यातील एसटी बससेवेला बसला. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे दिवसभरात स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन बसस्थानकावरील अनेक बसगाड्या रद्द करण्याची नामुष्की एसटी प्रशासनावर ओढावली.

मेळघाटात यंदाही भरणार शंभर दिवसांची शाळा

$
0
0
मेळघाटातील शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘मैत्री’चे स्वयंसेवक डिसेंबर ते मार्च या दरम्यान मेळघाटात जाणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत ८४ स्वयंसेवक या भागात जाऊन शंभर दिवस तेथील मुलांना शिकविणार आहेत. संस्थेचे कार्यकर्ते मधुकर माने यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पुण्यात आज मिनी विधानसभा विधानमंडळ अमृतमहोत्सवी वर्ष

$
0
0
विधानमंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुण्यात शुक्रवारी (९ नोव्हेंबर) मिनी विधानसभा भरणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी, विरोधी पक्षनेते आणि आमदारांची मांदियाळी अमृतमहोत्सवी कार्यक्रमात असणार आहे.

माजी आमदार सावंत यांची जामिनावर सुटका

$
0
0
भारतीय कामगार संघटनेचे सचिव रघुनाथ कुचिक यांच्या घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार अरविंद सावंत यांची १५ हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. आर. नाईक यांनी हा आदेश दिला.

पाणी मीटर बसविण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत

$
0
0
पिंपरी-चिंचवडमधील ज्या नागरिकांनी अद्याप पाण्याचे मीटर बसविलेले नाहीत, अशांनी येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत मीटर बसवून घ्यावेत अन्यथा न‍ळजोड तोडण्यात येतील आणि कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पिंपरी महापालिकेने दिला आहे.

प्राधिकरण कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान

$
0
0
पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय प्राधिकरणाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये ही ३०१ वी सभा घेण्यात आली.

आर्थिक दुर्बल महिलांसाठी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड सरसावले

$
0
0
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना सक्षम करण्यासाठी आता पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डानेच पुढाकार घेतला असून, अशा महिलांसाठी बचत गट तयार करण्यात येणार आहेत. या बचत गटांच्या माध्यामूत महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. बोर्डाच्या शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या बचत गटांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

पाषाण तलावाचे सुशोभीकरण ‘पक्षिसंमेलना’च्या मुळावर

$
0
0
पुणेकरांना तलाव चांगला दिसावा म्हणून महापालिकेने पाषाण तलावाच्या सुशोभीकरणाचा घाट घातला खरा, पण अनैसर्गिक सजावटीमुळे येथे येणाऱ्या परदेशी पाहुण्यांची मात्र दारे बंद झाली आहेत. तलावातील दलदल गायब केल्याने थंडीत येणारे स्थलांतरी पक्षी यंदा तलावपरिसरात नव्हे, तर जवळच्या एका बांधावर उतरले आहेत.

सक्तीच्या शिक्षणाची काटेकोर अंमलबजावणी हवी

$
0
0
बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकाराची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी सूचना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम यांनी खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बैठकीत नुकतीच केली.

बुरशीवर नवी वेबसाइट

$
0
0
भारतातील बुरशीच्या ज्ञात प्रकारांविषयीची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी आणि बुरशीविषयक संशोधक-विद्यार्थ्यांचा त्याकामी खर्ची होणारा वेळ वाचावा, या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या www.fungifromindia.com या वेबसाइटचे नुकतेच पुण्यात प्रकाशन झाले.

आम्हालाही महापालिकेत घ्या!

$
0
0
‘विरोध होत असला तरी, आमची गावे महापालिकेत घ्या. रस्ते, पाणी आणि चांगली आरोग्य सेवा तरी मिळेल. शहराची वाढ होऊ लागल्याने या गावाचीही प्रगती होईल,’ अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. राजकीय पक्षांच्या विरोधाला न जुमानता आता या गावांत पायाभूत सु‌विधा उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी नगरविकास विभागाकडे केली आहे.

२४ तासांत सहा सोनसाखळ्या चोरल्या

$
0
0
शहरात सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरू असतानाच सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. गेल्या चोविस तासांत चोरट्यांनी सोनसाखळ्या हिसकावण्याच्या सहा घटना घडल्या आहेत. या वर्षी शहरात सोनसाखळी चोरीचे प्रमाण दीड पटीने वाढले असून पुढील दोन महिन्यांचा विचार करता हे प्रमाण दुप्पट होण्याची भीतीही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मुलांची एन्ड्युरो स्पर्धा २ डिसेंबरला

$
0
0
अॅडव्हेंचर स्पोर्ट्‍‍स लहानपणीच मुलांमध्ये रुजावे, गेम्स, कम्प्युटर यांतून बाहेर पडण्याची अन् निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याची आवड मुलांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी आता मुलांकरिताही एन्ड्युरो स्पर्धा होणार आहे. २ डिसेंबरला आयोजित या स्पर्धेतून ट्रेकिंग, सायकलिंग, नेव्हिगेशन या उपक्रमांची मजा मुलांनाही लुटता येणार आहे.

दिवसभरात २२ जणांना डेंगी बाधा

$
0
0
शहराच्या हद्दीलगतच्या भागापाठोपाठ रविवार पेठ, नाना पेठ, कर्वे रस्ता यांसारख्या मध्य वस्तीतील नागरिकांनाही डेंगीची लागण झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. शहरात दिवसभरात २२ जणांना डेंगीची लागण झाली असून नोव्हेंबर महिन्यात अवघ्या आठ दिवसांत २०८ जणांना उपचारासाठी दाखल व्हावे लागले.

प्राचार्य महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0
बिबवेवाडी येथील एका खासगी शिक्षण संस्थेच्या महिला प्राचार्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या शिक्षण संस्थेचे आणि येथील शिक्षकांचे गेल्या सात-आठ वर्षांपासून वाद आहेत. या वादातून हा प्रकार झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

अल्पवयीन मुलांनी फोडली ४ दुकाने

$
0
0
टिंबर मार्केट, भवानी पेठ आणि पूना कॉलेज ​परिसरातील दुकानांचे शटर उचकटून रोख रक्कम चोरणाऱ्या दोघा अल्पवयीन मुलांना खडक पोलिसांनी ताब्यात घेतले. या मुलांनी चोरीचे चार गुन्हे केले असल्याचे खडक पोलिसांनी सांगितले.

पुण्यातील १४ लाख कुटुंबे ‘गरीब’

$
0
0
पुणे शहर आणि जिल्ह्यात असलेल्या सोळा लाख रेशनकार्ड धारकांपैकी फक्त दीड लाख कुटुंबीयांना तीन सिलिंडरचे अनुदान मिळणार नाही. उर्वरित साडेचौदा लाखाहून अधिक ‘गरीब’ कुटुंबांना राज्य सरकारने जाहीर केलेल्या नऊ सिलिंडरचा फायदा मिळणार असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

मेळघाटात यंदाही भरणार १०० दिवसांची शाळा

$
0
0
मेळघाटात यंदाही भरणार शंभर दिवसांची शाळा शिक्षणापासून वंचित मुलांसाठी 'मैत्री'चा उपक्रम.

पाण्याचा मीटर हवेच

$
0
0
‘पाण्याच्या गंभीर समस्येचा विचार करता त्याच्या न्याय्य आणि शास्त्रोक्त वापरासाठी यापुढील काळात पिण्यासह शेतीच्याही पाण्याला मीटर लावण्याची गरज आहे,’ अशी आग्रही भूमिका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images