Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गावांच्या समावेशाचा गोंधळात गोंधळ

0
0
महापालिकेच्या हद्दीत गावांचा समावेश करण्याच्या गोंधळात आणखी भर पडली आहे. एकीकडे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली असतानाच फुरसुंगी ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. राज्य सरकारच्याच दोन विभागांच्या या परस्परविरोधी कारभारामुळे संभ्रमात भर पडली आहे.

मावळात अवैध धंदे सुरूच

0
0
काही महिन्यापूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक पदाची मनोजकुमार लोहिया यांनी सूत्र घेतल्याने पुणे जिल्ह्यासह मावळात राजरोसपणे सुरू असलेले दारू, मटका, जुगार अड्डे, अवैध वहातुकीसारखे बंद झाले होते.

एमएस आणि एमडीसाठी सामंजस्य करार

0
0
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात एमएस आणि एमडीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाबाबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे.

फेसबुक वॉल झाले ओबामामय

0
0
ओबामांच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या ‘व्होट ओबामा’ या फेसबुक पेजवरचा ‘फोर मोअर इअर्स’ हा स्टेटस मेसेज बुधवारी क्षणाक्षणाला हजारोंच्या संख्येने लाइक्स मिळवत होता... मिशेल ओबामांच्या मिठीमध्ये ‘हुश्श्श.. सुटलो’ अशा निवांतपणाच्या भावना अनुभवणाऱ्या ओबामांचे छायाचित्र त्यासोबतच्या लाइक्स आणि शेअर्सचा आकडा वाढवत अनेकांच्या वॉल्सवर झळकताना दिसत होते.

जन्मदात्याने फेकले, नियतीने तारले

0
0
बायकोबरोबर भांडण झाल्याचा राग मनात धरून संतापलेल्या वडिलांनी आपल्या सात महिन्याच्या बालकाला आई आणि असंख्य नागरिकांच्या समोर रेल्वे पुलावरून खाली फेकल्याचा प्रकार पिंपरीमध्ये बुधवारी दुपारी घडला. ४० फूट उंचावरून खाली पडूनही बालक सुखरूप असल्याचे वायसीएम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले.

अबब...साडेतीन कोटींचे सोने जप्त

0
0
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील चौघा सराफांना फसवणाऱ्या चार आरोपींकडून गुन्हे शाखेने सुमारे साडेदहा किलो वजनाची सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत.

रिक्षाचालकांचे 'नकार डे' सुरू

0
0
सणासुदीच्या काळात शहरातील रिक्षावाल्यांनी प्रवाशांची अडवणूक सुरू केली आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडणारे प्रवासी रिक्षावाल्यांच्या ‘मनमानी’चे बळी ठरत असून, महिन्याकाठी ६० तक्रारी ‘आरटीओ’कडे येत आहेत. त्यात सर्वाधिक तक्रारी भाडे नाकारण्याच्या आहेत. गेल्या सहा म‌हिन्यांत सुमारे सव्वाचारशे तक्रारी आल्या आहेत.

डेगींचा आणखी एक बळी

0
0
डेंगीच्या विषाणूंची लागण होऊन विश्रांतवाडी येथील एका ४३ वर्षाच्या पेशंटचा बुधवारी मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. शहरात सातवा बळी गेला असला तरी प्रत्यक्षात आरोग्य खात्याने त्याची नोंद अद्याप केलेली नाही. खात्याच्या मृत्यू सत्यशोधन समितीने खातरजमा केल्याशिवाय त्याची नोंद होणार नसल्याचे सांगण्यात येते.

पुण्यासाठी १६ टीएमसी पाणी हवेच!

0
0
पुणे महापालिकेने मार्च महिन्यात पाटबंधारे खात्याकडे दरवर्षी १८.९४ टीएमसी पाणीसाठ्याची मागणी केली होती. मात्र, सर्वांगीण विचार करून महापालिकेने १६ टीएमसी पाणी देण्याचे सुचवले आहे.

‘फिप्टी-फिप्टी’वर शिक्कामोर्तब

0
0
राज्यातील इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सन २०१४-१५ पासून ‘जेईई-मेन’ला ५० टक्के आणि बारावीच्या गुणांना ५० टक्के महत्त्व देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दोन्ही परीक्षांमधील प्राप्त गुणांनुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे.

बनावट कागदपत्रांद्वारे सिमकार्ड विकणारा अटकेत

0
0
बनावट कागदपत्रांद्वारे टाटा डोकोमो आणि एअरटेल कंपनीच्या ५० सिमकार्ड्‍‍सची विक्री करणाऱ्या एका दुकानदाराला दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता १४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. बोस यांनी हा आदेश दिला.

सणस स्पोर्टस ग्राउंड फक्त अॅथलेटिक्ससाठीच

0
0
सणस स्पोर्टस मैदानाचा वापर अन्य उपक्रमांसाठी होत असल्याने या मैदानाचा उपयोग फक्त अॅथलेटिक्ससाठीच करण्याचा निर्णय क्रीडा समितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.

शहरातील ३८ रस्ते दुभाजकांचे खासगी तत्त्वावर सुशोभीकरण

0
0
शहरातील ३८ रस्त्यांवरील डिव्हायडर खासगी तत्त्वावर विकसित करण्यात येणार आहेत. या योजनेमुळे महापालिकेला खर्च न करताही डिव्हायडर ​सुशोभित करता येणार असून, त्यामध्ये खासगी कंपन्यांबरोबरच गणेश मंडळेदेखील सहभागी होऊ शकतील.

गोखले रोडचा काही भाग प्रायोगिक तत्त्वावर वन-वे

0
0
दीप बंगला चौकाजवळील सिंबायोसिस इन्स्टिट्यूटवरून गणेशखिंड रोडकडे येणाऱ्या गोखले रोडचा काही भाग एकेरी करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. या रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे गणेशखिंड रोडवर बऱ्याचदा ट्रॅफिक जॅम होत असते. त्यामुळे वाहतुकीचा तिढा सोडविण्यासाठी सिंबायोसिस इन्स्टिट्यूटकडून गणेशखिंड रस्त्याकडे जाणारी वाहतूक एकेरी करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.

कात्रजच्या बोगद्यात ट्रकने पेट घेतला

0
0
मुंबई-बंग‍ळुरू महामार्गावरील बोगद्यामध्ये गुरुवारी दुपारी एका ट्रकने पेट घेतल्याने धुराचे लोट पसरले होते. या आगीमुळे बंगळुरूकडे जाणारी वाहतूक बराच वेळ थांबविण्यात आली होती. फायर ब्रिगेडच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ आग विझवली.

वाहतूक पर्यायांत ‘लाइट रेल’ची भर

0
0
मेट्रो आणि बीआरटी यांच्यासह शिवाजीनगर ते हिंजवडीदरम्यान लाइट रेलची सेवा सुरू करणे शक्य आहे का, याचा पर्याय पडताळून पाहण्यात येत आहे. या संदर्भात जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीच्या साह्याने प्राथमिक अभ्यास सुरू आहे.

एकाच दिवसात सव्वापाच कोटींची वसुली

0
0
महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन खात्याच्या वतीने गेल्या सात महिन्यांत ४६५ कोटी रुपयांच्या मिळकतकराची वसुली करण्यात आली आहे. बुधवारी राबविण्यात आलेल्या मोहिमेत एकाच दिवसात सव्वापाच कोटी रुपयांच्या थकबाकीची विक्रमी वसुली करण्यात आली.

‘डीपी’तील आरक्षणांची स्थळपाहणी पूर्ण

0
0
पुणे महापालिकेच्या वाढीव हद्दीच्या विकास आराखड्यात (डीपी) नगरविकास विभागामार्फत करण्यात आलेल्या फेरबदलांनंतर आरक्षण ठेवलेल्या जमिनींची स्थळपाहणी करण्याचे काम गुरुवारी पूर्ण करण्यात आले. या पाहणीनंतरच्या सद्यस्थितीचा अहवाल लवकरच राज्य शासनाला पाठविण्यात येणार असल्याचे नगररचना उपसंचालक अविनाश पाटील यांनी सांगितले.

‘पुलं’च्या नावाचा पुरस्कार ही कौतुकाची थाप’

0
0
‘पु. ल. देशपांडे हे व्यक्तिमत्त्व आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भेटत आले. त्यांचे आपल्या जीवनातील स्थान अनन्यसाधारण आहे. पेन ते पेटी इतका मोठा आवाका असलेल्या पुलंच्या नावाचा पुरस्कार मिळणे म्हणजे आजवरच्या कामासाठी पाठीवर दिलेली कौतुकाची थाप आहे’, अशी भावना पुलोत्सव तरुणाई सन्मान विजेत्यांनी व्यक्त केली.

रिक्षा उलटून महिला ठार

0
0
पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा येथील डॉ. कणसे हॉस्पिटलसमोर प्रवासी रिक्षा उलटून गुरुवारी झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याची माहिती आळेफाटा पोलिसांनी दिली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images