Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पाणी न देणे ही आपली संस्कृती नाही

$
0
0
‘तहानलेल्या माणसाला पाणी द्यायचे नाही, ही आपली संस्कृती नाही. पाणी देणार नाही, असे म्हणणे ही माणुसकी नव्हे. पिण्याचे पाणी मिळाले नाही, तर जनता देशोधडीला लागेल आणि महाराष्ट्र एकसंध राहणार नाही,’ अशा भाषेत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दुष्काळी भागांतील नागरिकांना पाणी देण्यास विरोध करणा-यांना शुक्रवारी खडे बोल सुनाविले.

तानासुगर्नचा डोनाला धक्का

$
0
0
थायलंडच्या तामाराइन तानासुगर्नने रॉयल इंडियन ओपन डब्ल्यूटीए चॅलेंजर टेनिस स्पर्धेत तिस-या मानांकित डोना व्हेकिचला (क्रोएशिया) ६-२, ६-४ असा पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरी गाठली. शिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा सुरू आहे.

शतकी खेळी; महाराष्ट्र ३ बाद ३३९

$
0
0
सलामीवीर हर्षद खडीवाले आणि संग्राम अतितकर यांच्या अर्धशतकांनंतर केदार जाधवने अखेरच्या टप्प्यात केलेल्या आक्रमक शतकी खेळीच्या जोरावर यजमान महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील उत्तर प्रदेशविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ३ बाद ३३९ धावांपर्यंत मजल मारली.

इंजिनीअरिंगसाठी '५०-५०'

$
0
0
राज्यातील इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी २०१४-१५ या वर्षापासून 'जेईई-मेन'चे ५० टक्के आणि बारावीचे ५० टक्के गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दोन्ही परीक्षांमधील प्राप्त गुणांनुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार असून यासंबंधीचा 'जीआर' अखेर जारी करण्यात आला.

पोलिस ठाण्यांना आता 'तपास निधी'

$
0
0
‘राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यास तपासासाठी तसेच किरकोळ खर्चास दरवर्षी २५ हजार रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय विचारधीन आहे. ‘इनव्हेस्टिगेशन फंड’ या नावाने हा निधी देण्यात येणार असून आगामी काळात ही रक्कम एक लाखापर्यंत वाढविण्यात येईल,’ असे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांचे पुनर्मिलन

$
0
0
तिचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते असे कुणीतरी सांगिल्यामुळे तो संतापला. लग्नानंतरही तिचे प्रेमसंबंध सुरुच असावेत या संशयापोटी त्याच्या त्रास वाढू लागला. चार वर्षांच्या सुखी संसाराला नजर लागली. शेवटी मुलीला घेऊन तिला माहेरी जावे लागले. पोटगीच्या दाव्यादरम्यान कोर्टातील समुपदेशकांनी या जोडप्यात संवाद घडवून आणला.

सदाशिव पेठेत बिल्डरचा खून

$
0
0
सदाशिव पेठेतील शंतनू लॉजसमोर शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी एका बांधकाम व्यावसायिकाचा गोळ्या घालून खून केला. तेज बहादूरसिंग ठाकूर (वय ६५) असे गोळीबारात ठार झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.

दोन बसमध्ये चिरडून मुलाचा मृत्यू

$
0
0
दिवाळीसाठी गावी निघालेल्या दहा वर्षाच्या मुलाचा स्वारगेट एसटी स्टँडवर दोन एसटी बसगाड्यांमध्ये सापडून रविवारी सकाळी मृत्यू झाला. या प्रकरणी दोन्ही बसचालकांना पोलिसांनी अटक केली. चालकांचा निष्काळजीपणा आणि स्टँडवरील असुविधांमुळेच या मुलाला जीव गमवावा लागला असून, दिवाळीच्या पहिल्याच घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमधून हळहळ व्यक्त झाली.

१.५ लाख विद्यार्थी टाळणार फटाक्यांचा मोह

$
0
0
यंदाच्या दिवाळीत शहर आणि परिसरातील शाळा-महाविद्यालयांच्या सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प सोडला आहे. या संकल्पामुळे फटाक्यांसाठीच्या अडीच कोटी रुपयांची बचत होणार असून ही रक्कम खेळणी, खाऊ आणि पुस्तकांसाठी वापरली जाणार आहे.

पुणे आणि देहूरोड पाठोपाठ खडकीतही हेल्मेटसक्ती

$
0
0
खडकी कँन्टान्मेंट बोर्डाच्या हद्दीत येणा-या प्रत्येक दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती करण्याचा प्रस्ताव स्टेशन हेडक्वार्टरने बोर्डाकडे पाठविला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. चंद्रशेखर यांनी बोर्डाच्या बैठकीमध्ये दिली. या प्रस्तावाला बोर्डाच्या सर्व सदस्यांनी विरोध केला. त्यामुळे हा प्रस्ताव तात्पुरता मागे घेण्यात आला आहे.

खडकीकरांच्या रक्षणासाठी फक्त एकच फायरमन

$
0
0
खडकी कँन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत राहणा-या एक लाख नागरिकांचे आपत्कालीन परिस्थितीमध्ये रक्षण करण्याची जबाबदारी फक्त एकाच फायरमनच्या खांद्यावर आहे. बाकी सर्व सफाई कर्मचारी काम करत असल्याची माहिती पुढे आली आहे. माहिती अधिकारातून ही माहिती मिळाली आहे.

पुण्यातूनही सुरू होणार ‘नाऊकास्टिंग’

$
0
0
शहराचे पुढच्या आठ तासांचे तापमान काय असेल; पुढच्या सहा ते आठ तासांत पावसाची शक्यता आहे, की केवळ हवामान ढगाळ राहील; रात्रीचा गारठा वाढेल का, यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे नागरिकांना देण्यासाठी लवकरच पुणे वेधशाळेतर्फेही ‘नाऊकास्टिंग’ची सेवा सुरू केली जाणार आहे.

वैकुंठातील दीपोत्सवात भाऊबीजेचाही दीप…

$
0
0
वंचितांच्या जगण्याला प्रोत्साहनाचे पाठबळ देत त्यांच्या आयुष्यात माणुसकीचे रंग भरा, असा संदेश देत वैकुंठ परिवारातर्फे सोमवारी वैकुंठ स्मशानभूमीत दीपोत्सव साजरा करण्यात आला. वाळू तस्करांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या अनिल सोनवणे यांच्या पत्नी मनीषा यांना परिवाराने पाच हजार रुपयांचा निधी आणि पाचशे किलो धान्याची भाऊबीजही भेट दिली.

सिलिंडरच्या तुटवड्याने ग्राहकांच्या संतापात भरच

$
0
0
अनुदानित सिलिंडरचा कोटा संपल्यानंतर मिळणारा सातवा विनाअनुदानित सिलिंडर ग्राहकांना त्वरीत मिळेल, हे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचे आश्वासन फक्त आश्वासनच राहिले आहे. सुरळीत आणि पुरेशा पुरवठ्याचे गाजर दाखवूनही इंधन कंपन्यांचा पुरवठा तोकडा आणि विस्कळित असल्याने ऐन दिवाळीत ग्राहकांना खेटे मारावे लागत आहेत, असा दावा एजन्सीचालक करीत आहेत.

वडगावशेरी मतदारसंघ टँकरमुक्त करा

$
0
0
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ टँकरमुक्त करून या मतदारसंघात २४ तास पाणीपुरवठा करण्याची मागणी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत छाजेड यांनी सोमवारी केली. विशेषतः राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार बापू पठारे यांनी पाणीपुरवठ्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर छाजेड यांनी ही मागणी केली आहे.

बाबा-दादा-भाऊ यांची एकत्र ‘भरारी’

$
0
0
ऐन दिवाळीत कोणतीही राजकीय फटाकेबाजी न करता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी एकत्र ‘भरारी’ घेतली. हे विजोड त्रिकुट एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.

‘बीएसयूपी’ गैरप्रकारांच्या चौकशीला गुपचूप कुलुप

$
0
0
‘बीएसयूपी’ योजनेतील गैरप्रकारांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यासंदर्भात केलेला ठराव स्थायी समितीने सोमवारी गुपचूप रद्द केला. त्यामुळे यामागे काय गौडबंगाल असावे, याबाबत महापालिकेत चर्चा सुरू झाली आहे.

सानुग्रह अनुदान देण्यास स्थायी ‌समितीची मान्यता

$
0
0
पीएमपीएमएलच्या कर्मचा-यांना महापालिकेच्या कर्मचा-यांइतकेच, म्हणजे सहा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याच्या निर्णयास स्थायी समितीने अखेर सोमवारी मान्यता दिली. ठराव झालेला नसल्यामुळे हा निर्णय गेला आठवडाभर रखडला होता.

... तर कोणत्याही क्षणी चक्का जाम

$
0
0
एसटी कर्मचा-यांच्या प्रलंबित वेतन करारासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीने बैठक घेतली नाही, तर अचानक चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने दिला आहे.

पर्स पळवून १ लाखांचा ऐवज लंपास

$
0
0
पायी जाणा-या महिलेच्या पर्समधील सोन्याचे गंठण आणि साखळी असा सुमारे एक लाख १० हजार रुपयांचा ऐवज मोटार सायकलवरून आलेल्या चोरट्यांनी पळवून नेले. धनकवडीतील स्नेहसदन बंगल्यासमोर शुक्रवारी पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images