Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘त्यातल्या त्यात बरा उमेदवार आला’

$
0
0
अमेरिकेतील निवडणुकीचे राजकीय विश्लेषण काहीही असो, काही महिन्यांच्या अभ्यासक्रमासाठी पुण्यात आलेल्या अमेरिकन विद्यार्थ्यांसाठी मात्र बराक ओबामा निवडून येणे म्हणजे त्यातला त्यात बरा उमेदवार निवडून येणे आहे!

नॅपकिन्सची विल्हेवाट : पालिकेचा स्वतंत्र प्रकल्प

$
0
0
महापालिकेकडून दररोज गोळा केल्या जाणाऱ्या कचऱ्यात सुमारे अडीच लाख सॅनिटरी नॅपकिन्सचे प्रमाण असल्याने इतरा कचरा प्रदूषित होते आहे. त्यामुळे लवकरच या नॅपकिन्सच्या विल्हेवाटीसाठी प्रायोगिक तत्त्वावर स्वतंत्र प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्यप्रमुख एस. टी. परदेशी यांनी दिली.

पुलंच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार मिळणे हे भाग्यच

$
0
0
‘पुलंसारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार मिळणं ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. मला याचा अपार आनंद आहे. कारण, पुलं असं नुसतं म्हटलं, तरी त्यात संगीत, साहित्य, नाटक, हास्य असं सगळंच येतं...’ मेवाती घराण्याचे प्रख्यात गायक पंडित जसराज यांनी पुलोत्सवात दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराविषयी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या.

पुणे-नाशिक प्रवास आता वातानुकुलित

$
0
0
प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने पुणे-नाशिक मार्गावर शीतल या निमआराम वातानुकुलित बससेवेला मंगळवारपासून प्रारंभ केला. पुणे-नाशिक मार्गावर धावणाऱ्या शीतल बसचे भाडे ३५५ रुपये ठेवण्यात आले आहे.

विद्यापीठाकडून पालकांनाही उडवाउडवीचीच उत्तरे

$
0
0
‘एक तर निकाल वेळेवर लावत नाहीत. रिव्हॅल्युएशनचे निकाल वेळेवर लावायला आम्ही बांधील नाही, असं सांगतात आणि वर माहिती अधिकारात अपील करा असंही म्हणतात.

विश्रांतवाडी चौकातील पादचारी पुलास विरोध

$
0
0
शहरातील पादचारी पुलांचा वापर होत नसतानाही विश्रांतवाडी चौकात पादचारी पूल उभारण्यास भाजपने विरोध केला असून, पादचारी पुलाऐवजी भुयारी मार्ग करण्याची मागणी केली आहे.

डीपी, डीसी रूल्स नगरसेवकांना मिळणार

$
0
0
शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यातील (डीपी) आरक्षणे, विकास नियंत्रण नियमावली (डीसी रूल्स) पाहण्यासाठी प्रशासनाला धारेवर धरणाऱ्या नगरसेवकांना अखेर या दोन्ही गोष्टी उपलब्ध होणार आहेत.

खडक पोलिस ठाण्यात सौरऊर्जा पॉवर पॅक

$
0
0
खडक पोलिस ठाण्यात सौरऊर्जा पॉवर पॅक यंत्रणा उभारण्यात आली आहे. या यंत्रणेचा उपयोग करून पोलिस ठाण्यातील कम्प्युटर आणि सौरदिवे कार्यान्वित होणार असल्याची माहिती आमदार मोहन जोशी यांनी दिली.

विमान तिकीट फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

$
0
0
ख्रिसमसच्या सुटीनंतर अमेरिकेचे परतीचे विमानतिकीट देण्याचे आश्वासन देत पुण्यातील दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. देशात चारशेहून अधिक विद्यार्थ्यांसह सुमारे वीस कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

तक्रारीवर महिन्याच्या आत निर्णय ‘मस्ट’

$
0
0
लोकशाही दिनामध्ये नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर एका महिन्याच्या आत निर्णय घेणे आता बंधनकारक ठरविण्यात आले आहे. त्यामध्येही ‘कार्यवाही सुरू आहे,’ यासारखी टाळाटाळ उत्तरे यापुढे चालणार नाही, असेही राज्य सरकारने बजावले आहे. त्यामुळे हेलपाटे घालून थकलेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

जिल्हा काँग्रेसचा फुकाचा ‘शो’

$
0
0
‘राष्ट्रवादी’च्या प्रभावामुळे आचके देत असलेल्या जिल्हा काँग्रेसला लोकसभेचे दोन मतदारसंघ हवे आहेत. पक्षाच्या निरीक्षकांकडे या मतदारसंघांची मागणी करताना मात्र त्यांना संभाव्य उमेदवारांची नावे आठवून सांगावी लागली !

भाडेकरूंची माहिती दडविणाऱ्या घरमालकांवर गुन्हे

$
0
0
भाडेकरूंची माहिती पोलिस स्टेशनला न देणाऱ्या ३६१ घरमालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून संबंधित कागदपत्रे व पुराव्यांची पूर्तता न केल्यास अटकेच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यापुढील काळातही भाडेकरूंची माहिती देण्यास टाळाटाळ करणारे घरमालक आणि एजंटांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस स्टेशनला देण्यात आले आहेत.

१२.५ लाखांचा दंड केबलचालकांकडून वसूल

$
0
0
जिल्हा प्रशासनाला खोटी माहिती देऊन केबलचा कर बुडविणाऱ्या केबल व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारत करमणूक कर विभागाने धनकवडी परिसरातील केबलचालकांना तब्बल साडेबारा लाख रूपये दंडाची नोटीस बजावली आहे. चुकीची माहिती देऊन करमणूक कर बुडविल्याने या नोटीसा काढण्यात आल्या आहेत.

रंगभूमीच्या ‘बाईं’चा रंगला ‘मास्टर क्लास’

$
0
0
अभिनय म्हणजे नक्की काय... प्रेक्षकांपर्यंत अभिनय पोहोचविण्याची प्रक्रिया कशी असते... अभिनेत्याने कोणत्या गोष्टींचे भान ठेवावे.... असे ‘धडे’ देत उपस्थित विद्यार्थ्यांच्याच सादरीकरणातून रंगभूमीवरील ‘बाईं’चा ‘मास्टर क्लास’ बुधवारी रंगला.

खुला झाला पुस्तकांचा खजिना

$
0
0
नामवंत शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, पुस्तक विक्रेते यांचा सहभाग, माहिती-तंत्रज्ञान, आरोग्य, व्यवस्थापन, व्यापार, कायदा, धर्म, चालू घडामोडी यावरील माहितीचा खजिना तसेच मराठी, हिंदी, ऊर्दू, संस्कृत आणि इंग्रजी अशा अनेकविध भाषांतील पुस्तकांचा खजिना वाचनप्रेमींसाठी खुला झाला आहे.

नवजात बालकांसाठी ‘ताराचंद’मध्ये ICU

$
0
0
तारांचद हॉस्पिटलला मिळालेल्या ४२ लाख रुपयांच्या देणगीतून नव्याने नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभागाची (आयसीयू) उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे नवजात बालकांना आता संजीवनी देण्याचे काम हॉस्पिटल करणार आहे.

नार्को टेस्ट करण्याची आंधळकरांची मागणी

$
0
0
‘तळेगाव दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या खून प्रकरणात सीबीआयने पोलिस खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संशयित ठरविले आहे. या प्रकारामुळे पोलिस खात्याची बदनामी होत असून ही बदनामी थांबविण्यासाठी आपल्यासह अन्य साथीदारांची सीबीआयने नार्को टेस्ट करावी,’ अशी मागणी पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलिस निरिक्षक भाऊसाहेब आंधळकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

इमारत दुर्घटनेतील मृतांना १ लाख

$
0
0
तळजाई येथे इमारत पडून मृत पावलेल्या ११ नागरिकांच्या नातेवाईकांना समृद्ध जीवन फाउंडेशच्यावतीने प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. या कार्यक्रमास अॅड हर्षद निंबाळकर, नगरसेवक आप्पा रेणुसे, विशाल तांबे, मोहिनी देवकर, वैशाली मोतेवार, लीना मोतेवार, धनकवडी गावचे माजी उपसरपंच सुनील खेडेकर यांच्यासह आदी उपस्थित होते.

३ गुंठ्यांपर्यंतचे क्षेत्र तुकडेबंदीतून वगळावे

$
0
0
महापालिकेची हद्दवाढ लक्षात घेता शहरापासून दहा किलोमीटर अंतरापर्यंत तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी राज्य सरकारला पाठविला आहे. मात्र, या प्रस्तावाला अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही.

विधानभवनात रंगणार अमृतमहोत्सवी सोहळा

$
0
0
विधानमंडळाचे अमृतमहोत्सवी वर्ष व यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुण्यातील ऐतिहासिक विधानभवनात येत्या नऊ नोव्हेंबरला परिसंवाद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images